Home Blog Page 3550

ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाच्यावतीने “ मोफत दंत तपासणी शिबीर ” संपन्न

0

unnamed unnamed1

ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाच्यावतीने चुडामण तालीमजवळील अलंकार मेडिकलजवळ ” मोफत  दंत  तपासणी शिबीर ” संपन्न झाले . या मोफत  दंत  तपासणी शिबीरामध्ये २०० जणांची दंत तपासणी करण्यात आली . या शिबिराचे संयोजन ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाचे अध्यक्ष मझहर गफर कुरेशी यांनी केले होते . या शिबिरासाठी रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या दंत विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद अन्वर उलहक व डॉ. रेखा शितोळे यांनी दंत तपासणी केली . यावेळी मोफत औषधे व सल्ला देण्यात आला . या शिबिरात अनेक जणांचे किडलेले दात , हिरड्या कमजोर असल्याचे तसेच , वेडेवाकडे दात आढळले . या शिबिराचे आयोजन ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन पुणे जिल्हा अध्यक्ष मोईनुद्दीन सय्यद , पुणे शहर अध्यक्ष सरफराज शेख , शाबीर शेख , संतोष पवार , सय्यद शरीफ , अयाझ खान , निझाम शेख , शहबाज खान , प्रल्हाद थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले .

चाकणमध्ये कारखान्यात 6.89 लाखांची वीजचोरी – संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

0

power-project-maha
पुणे: खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीमधील मे. हर्षल प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात

वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार करून 54 हजार 965 युनिटस्‌च्या 6 लाख 89 हजार 70 रुपयांची वीजचोरी झाल्याचे

नुकतेच उघड झाले. याप्रकरणी पुणे येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण एमआयडीसीमधील हर्षल प्रेसिंग प्रायव्हेट

लिमिटेड ही कंपनी महावितरणची उच्चदाब वीजग्राहक आहे. या कंपनीत विजेच्या वापराची नोंद होऊ नये यासाठी

वीजमीटरकडे जाणार्‍या वीजयंत्रणेमध्ये फेरफार करण्यात आल्याचे महावितरणच्या तपासणीत निदर्शनात आले. यात हर्षल

प्रेसिंग कंपनीने 20 जुलै ते 1 ऑक्टोबर 2015 या कालावधीत 54 हजार 965 युनिटस्‌च्या 6 लाख 89 हजार 70 रुपयांची

वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. कंपनीमधील वीजचोरीचा पंचनामा करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

याप्रकरणी कंपनीचे संचालक अरुण जगन्नाथ वराडे व इतर यांच्याविरुद्ध शुक्रवारी (दि. 2 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे) येथील

महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे जिल्हा माळी वधू वर सूचक मंडळाच्यावतीने वधू वर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

0

 

पुणे जिल्हा माळी वधू वर सूचक मंडळाच्यावतीने वधू वर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले . बुधवार पेठमधील संत सावतामाळी भवनमध्ये हा प्रकाशन कार्यक्रम पार पडला . यावेळी पुणे जिल्हा माळी वधू वर सूचक मंडळाचे संघटक राम झगडे , महेश जांभुळकर , संतोष रासकर , शंकुतला झगडे , संभाजी शिंदे , सुनील ढोले पाटील , महेश जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते .

  या वधू वर माहिती पुस्तिकेमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या रंगीत छायाचित्र  असून ४५० वधू व ४०० वरांची रंगीत छायाचित्रासहित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे .

‘कट्यार काळजात घुसली’ मधील खॉंसाहेबाची भूमिका हा माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट – सचिन पिळगावकर

0

‘हा माझा मार्ग एकला’ म्हणत बालवयातच अभिनयाची कारकिर्द सुरू करणारे आणि पुढे अभिनय हाच आपला मार्ग बनवत त्यावरून चालत मराठीसोबतच हिंदी चित्रपटांच्या प्रांतातही मनसोक्त मुशाफिरी करणारे, अभिनयासोबतच निर्माते, दिग्दर्शक, संकलक, गायक ते अगदी संगीतकार अशा नानाविध क्षेत्रांवर यशाची ठसठशीत मोहोर उमटविणारे व्यक्तिमत्व/कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर.

1

आपल्या कारकिर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर सचिनजी आजही त्याच जोमात आणि जोशात पुढे वाटचाल करीत आहेत. या वाटचालीत अनेक मैलांचे दगड निर्माण केल्यानंतर आता ते सज्ज झाले आहेत एका नव्या दमदार भूमिकेसाठी. एक अशी भूमिका जी मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. मराठी नाट्यसंगीतामध्ये अजरामर असलेलं नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली ज्यातील खॉंसाहेब हे पात्र आपल्या अभिनयाने आणि सदाबहार गायकीने रंगवलं होतं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी. याच नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यामध्ये खॉंसाहेबांची अजरामर अशी भूमिका रंगवणार आहेत अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांचा या चित्रपटातील हा ‘लूक’ नुकताच एका विशेष कार्यक्रमांत सादर करण्यात आला यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी आणि निखिल साने यांच्यासह सचिनजींचे कुटुंबियही उपस्थित होते.

2

या वेळी खॉंसाहेबांच्या भूमिकेविषयी बोलताना सचिनजी म्हणाले की, “या भूमिकेसाठी सुबोध भावे यांनी माझ्या नावाचा विचार केला हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. परंतू सुबोधने हा विश्वास दाखवला आणि विक्रम गायकवाड यांच्या रंगभूषेच्या जादूई प्रतिभेने हा विश्वास अजूनच दृढ झाला. या भूमिकेद्वारे मी माझ्या ५२ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच अशी नकारात्मक छटा असलेली भूमिका करत आहे.

4 5

कारकिर्दीच्या या टप्यावर ही भूमिका मिळणं हे मी एक अतिशय महत्त्वाचं वळण समजतो. ही भूमिका दोन गोष्टींसाठी माझ्या अतिशय जवळची आहे एक म्हणजे संगीतावरचं प्रेम आणि दुसरी म्हणजे ऊर्दू भाषेची गोडी. खॉंसाहेब हे पात्र बरेली शहरातलं असल्यामुळे या चित्रपटात मी पूर्णपणे केवळ ऊर्दू भाषा बोललो आहे. प्रभावी संवाद आणि सोबतीला अर्थूपर्ण शायरी याने ही व्यक्तिरेखा सजलेली आहे. भव्यतेचा अनुभव देणारी निर्मितीमुल्ये आणि लेखक प्रकाश कपाडिया, छायालेखक सुधीर पलसाने, अभिनेत्री साक्षी तन्वर, गायक-संगीतकार आणि आता अभिनेतेही शंकर महादेवन यांसारख्या हिंदीतील दिग्गज सहका-यांमुळे हा चित्रपट केवळ मराठीच नाही तर तो ख-या अर्थाने भारतीय चित्रपट झाला आहे असं मी मानतो” अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सचिनजींच्या पत्नी सुप्रिया, मुलगी श्रिया आणि त्यांच्या आईनेही या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दोन संगीत घराण्यातील संघर्षावर कट्यार काळजात घुसलीचं कथासूत्र बेतलेलं आहे. एखादी कला सादर करताना ती कला महत्त्वाची की सादर करणारा कलाकार हे या संघर्षाचं सूत्र. विश्रामपूरचे महाराज विष्णूराज यांच्या दरबारातील गायकाचं पद हे अतिशय मानाचं. शास्त्रीय गायक पंडित भानुशंकर यांनी आपल्या गायकीने राजाचं मन जिंकून राजगायक होण्याचा बहुमान मिळवलाय. परंतू हे राजगायक पद मिळवण्यासाठी एका बाजूने खॉंसाहेबांचाही आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पुढे अशा काही घटना घडतात की हे पद खॉंसाहेब मिळवतात आणि त्यासोबतच त्यांच्यावर जबाबदारी येते ती स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची आणि हे पद टिकवून ठेवण्याची. पण असं म्हणतात की एखाद्याला यश मिळतं तेव्हा त्यासोबतीने येतो तो अहंकार आणि या अहंकारातून जन्माला येतो एक नवा संघर्ष. हा संघर्ष आपल्या अभिनयातून अतिशय प्रभावीपणे मांडला होता पंडित वसंतराव देशपांडे यांनी. रंगभूमीवर एक नवा इतिहास रचणारी ही भूमिका आता रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सचिन पिळगावकर यांच्या चतुरस्र अभिनयाच्या माध्यमातून.

3

 ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध अभिनते सुबोध भावे हे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. चित्रपटात सचिनजीसोबतच अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शंकर महादेवन यांच्यावर चित्रीत झालेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं सूर निरागस हो हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालेलं आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक सोनु निगम, विशाल दादलानी, श्रेया घोषालपासून ते लतादिदी पर्यंत सर्वांनी या गाण्याची स्तुती करून ट्विटरवर याचा व्हिडीओ शेअर केला होता. तर हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आणि सुप्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही या गाण्याला पसंतीची पावती देत हा व्हिडीओ शेअर करून शंकरजींना शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे मराठी रसिकांसोबतच हिंदी जगतातही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

यावर्षी ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘टाईमपास २’, ‘डबलसीट’ सारखे सुपरहिट चित्रपट आणि ‘किल्ला’सारखी आशयघन कलाकृती देणा-या एस्सेल व्हिजनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् ने चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

आर्थिक सुधारणांना विलंब, तरीही भारताला मंदीची भीती नाही क्रेडाई पुणे – मेट्रोच्या सर्व साधारण सभेत डॉ . नरेंद्र जाधव यांचे मत

0

पुणे : “जीएसटी, जमीन सुधारणा अधिनियम अशा रचनात्मक सुधारणांना विलंब होत आहे, कृषी क्षेत्राला दुष्काळामुळे फटका बसल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. तरीही सांगितले जाते त्याप्रमाणे भारतात मंदी आलेली नाही, बांधकाम क्षेत्रात तर नाहीच नाही,” असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

क्रेडाई पुणे – मेट्रोची सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यामध्ये पार पडली.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम क्षेत्राच्या संदर्भात वर्तमान आर्थिक परिस्थिती या विषयावर डॉ. जाधव बोलत होते. या सभेला क्रेडाई पुण्याचे व महाराष्ट्रातील एकूण ३५० सभासद उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव यांनी व्यक्त केलेल्या आशावादाला सर्व सभासदांनी दाद दिली.

२००८ साली अमेरिकेत सुरू झालेल्या आणि जगभर पसरलेल्या आर्थिक मंदीच्या परिणामांचा आढावा घेत डॉ. जाधव यांनी 2011 मधील युरोपमधील संकट, 2015 चे ग्रीस संकट, तेलाच्या उतरलेल्या दरांचा परिणाम, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनी घेतलेली अपारंपरिक भूमिका आणि चीनमधील चलनाचे अवमूल्यन यांची माहिती देत रिझर्व बँकेचे काही धोरणे व त्यामध्ये पाळण्यात येणारी कठोर शिस्त तसेच मूळतः ती धोरणे मजबूत असल्याने, या मंदीचा गंभीर परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही असे सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले, की सरकारने, ‘वस्तू आणि सेवा करा’ची (जीएसटी) अंमलबजावणी केली पाहिजे. पायाभूत सुविधांच्या विकासाला लवकरात लवकर पुढे नेण्याची आवश्यकता आहे तसेच दुष्काळामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम झाला आहे त्या साठी योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे .

“२००० ते २००८ पर्यंत भारताची ६ ते ८ टक्के इतकी दरवाढ होती त्यानंतर ती ९.३ टक्के इतकी झाली, अमेरिका व जपानप्रमाणे हा दर उणे संख्यांमध्ये गेला नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालादेखील याचा मोठा फटका बसलेला नाही,” असे डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले.

“क्रूड ऑंईलचे दर अमेरिका व रशियामध्ये होत असलेल्या उत्पादनामुळे घसरत आहेत, १५० वरून ४५ डॉलरवर त्याची किमंत आली आहे. याचा फायदा भारत सरकारने घेतला पाहिजे. कमी दरात तेलाची आयात करून ते साठवून ठेवण्याची व्यवस्था भारताने केली पाहिजे.,” असेही ते यावेळी म्हणाले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

0

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव पी.एस. मीना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक आदींनीही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री

0

मुख्यमंत्र्यांनी केली दुर्मिळ ग्रंथांची पाहणी

मुंबई : ग्रंथ हेच आपले गुरू आहेत, ग्रंथांच्या वाचनानेच अनेकांचा विकास झाला. म्हणून एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातील हा दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा अत्यंत महत्त्वाचा असून पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुंबईतील टाऊन हॉल येथील एशियाटिक सोसायटी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे, उपाध्यक्ष संजीवनी खरे, डॉ. मंगला सरदेशपांडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतरत्न काणे हॉलमधील 15 व्या शतकापासूनच्या पुस्तकांची माहिती घेऊन पाहणी केली. शिवाय दुर्मिळ ग्रंथ व पुस्तकांच्या डिजिटल स्कॅनिंगबाबत माहिती घेतली. त्यानंतर ग्रंथालयातील दरबार हॉल येथे इ.स. 1350 पासूनच्या काळातील हस्तलिखिते, पुस्तके, चित्रे, नक्षीकाम यांची सविस्तर माहिती घेतली. इ.स. 1350 मधील दांते यांनी कातड्यावर लिहिलेली इटालियन भाषेतील देवाविषयींची गाथा (Divine comedy), इ. स. 1516 मधील महाभारतासंबंधित हस्तलिखित अरण्यक पर्व, इ. स. 1851 मधील मुद्रा (The Sundhya Or The daily prayers of the Brahmins), इ.स. 1874 मधील कपड्यावरील नक्षीकामांची माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्री. काळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मुंढवा जॅकवेलचे उदघाटन

0

पुणे : महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या मुंढवा जॅकवेलचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गुरूवारी झाले.

12088516_497818983727486_4383186352307183472_n 12063314_497818823727502_837885040480503528_n

मुंढवा केशवनगर येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून साडेसहा टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेला जॅकवेल, पंपहाऊस आणि साडेतीन किलोमीटरच्या पाईपलाईनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार अजित पवार, आमदार जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्यातील करारनाम्यानुसार 11.50 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून देताना 6.50 टीएमसी प्रक्रिया केलेले सांडपाणी मुठा उजवा बेबी कालव्यात सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची अट अंतर्भूत आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडून 6.50 टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना करण्यात आली आहे.

यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जलसंपदा विभागाचे अतुल कपोले, खडकवासला विभागाचे लोहार आदी उपस्थित होते.

शांताबाई!‘ या गाण्याचे गीतकार संजय लोंढे गायकाचा सन्मान करण्यात येऊन आर्थिक मदत

0

शिवसेना   पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने नाना पेठ भागातील राजेवाडी येथे  “नखरा चकरा नखरा चकरा नखरा… शांताबाई!या गाण्याचे गीतकार संजय लोंढे   गायकाचा  सन्मान करण्यात येऊन आर्थिक मदत देण्यात आली . यावेळी शिवसेना पुणे  शहर संघटक  अजय भोसले , डॉ अमोल देवळेकर , गजानन पंडित , जावेद खान , संजय मोरे , अभय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते .

  या कार्यक्रमाचे संयोजन राजन अवघडे , राजेवाडी शाखा शिवसैनिक सचिन शिंदे यांनी केले होते . यावेळी गीतकार संजय लोंढे यांना त्याच्या कारकीर्दीस शुभेछा देण्यात आल्या .

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन

0
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. खासदार, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम टीळक रोड येथील पक्ष कार्यालयात पार पडला. महात्मा गांधीजींच्या आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शंकर शिंदे, युसुफ शेख, मनाली भिलारे, अविनाश वेल्हाळ, राजूशेठ गिरे, सुरेश पवार, योगेश वराडे, शिल्पा भोसले, संजय गाडे, शालिनी जगताप, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
rsz_1logo-for-portal

गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे दिवस आले पाहिजेत :कुमार सप्तर्षी

0
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘गांधी सप्ताह ‘ चे उदघाटन
unnamed1
पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘महात्मा गांधी सप्ताह ‘ चे उद्घाटन आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे झाले . गांधी विचारांना उजाळा देताना मान्यवरांची वैचारिक जुगलबंदी रंगली
उपाशी बांधवाना खायला घालायचे कि नाही हा चर्चेचा विषय होण्याऐवजी घरी मांस खावे कि नाही  याची चर्चा होते  ,विचारवंतांच्या हत्या होताहेत, आपला  प्रवास कोणत्या दिशेने होतोय ,असा प्रश्न पडताना स्मशान शांततेतून बाहेर या असे आवाहन  फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले .
         सद्य परिस्थितीत गांधींचे स्मरण ही जोखीम झालीय का  ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी केला ,गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे कधी येणार ? असे डॉ  कुमार सप्तर्षी यांनी विचारले ,तर गांधीना टिंगलीचा विषय गांधी टोपी घालून गैर वर्तणूक करणाऱ्यांनी केला आणि धनंजय देसाई ,सनातन म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बजावले
व्यासपीठावर सर्व धर्मीय गुरु ,डॉ विश्वनाथ कराड ,डॉ शिवाजीराव कदम ,अन्वर राजन ,विश्वस्त एम एस जाधव ,माधव रत्नपारखी ,अभय छाजेड होते
उज्वला बर्वे यांनी सूत्र संचालन केले . अन्वर राजन यांनी आभार मानले
गांधी सप्ताहाचे हे ६ वे वर्ष होते .
यावेळी सर्व धर्मीय प्रार्थना झाल्या
अनंत दीक्षित म्हणाले ,’गांधींचे स्मरण हि जोखीम झालीय का ? असा प्रश्न पडत असला गांधी हे शाश्वत सत्याचा शोध घेणारे महामानव होते . देश काळाच्या पलीकडे जाण्याची ताकद त्यांच्यात होती . गांधी माणसाच्या सद सद विवेक बुद्धीला जागृत करीत होते ‘
फादर दिब्रिटो म्हणाले ,’जगाचे नागरिक होताना आपण संकुचित होत जाणे टाळणार का ?
दाभोळकर ,पानसरे ,कलबुर्गी हत्येनंतर आपला प्रवास कोणत्या दिशेने चालला आहे ?
 विचार खुंटले जात आहेत ,स्वातंत्र्य नाकारले जात आहे . त्यातून ‘ हे राष्ट्र भेकडांचे आणि भय ग्रस्तांचे,आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य दांभिकतेचे ‘ अशी अवस्था आली आहे . एका हातात धर्म ग्रंथ असला तरी दुसऱ्या हातातील संविधान सुटता कामा नये ‘
गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’ ,गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे आले पाहिजेत . त्यासाठी गांधी सप्ताहाचे प्रयोजन आहे ‘
पालक मंत्री गिरीश बापट म्हणाले ,’गांधीना टिंगलीचा विषय गांधी टोपी घालून गैर वर्तणूक करणाऱ्यांनी केला,गांधीना सोयीस्कर वापरून घेतले गेले  आणि धनंजय देसाई ,सनातन म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे . वैचारिक मतभेद झाले तरी टोकाची भूमिका घेता कामा नये. डॉ सप्तर्षी यांच्या विधायक कार्याला मदत करू  ‘

पुण्याच्या मझहर यासीन खान याने ” सिनियर नेशनल पॉवरलिफ्टिंग चेम्पशियनशिप ” जिंकली .

0

४१ वी  इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडेरेशन आयोजित केंद्रीय क्रीडा युवक संचालनालय व इंटरनेशनल एशियन पॉवरलिफ्टिंग फेडेरेशन आणि  इंडियन ओलम्पिक असोसिएशनमध्ये पुण्याच्या मझहर यासीन खान याने ” सिनियर नेशनल पॉवरलिफ्टिंग चेम्पशियनशिप ” जिंकली .

   मझहरने ९३५ किलो ग्रेमचा भार उचलला . ३६०किलो ग्रेममध्ये  स्क्वेड मारले , २४५ किलो ग्रेम बेंच प्रेस मारले , तर ३३० किलो ग्रेम डेड लिफ्ट मारले . रेलवे  स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड्स यांच्यावतीने मझहर खेळला . हि स्पर्धा उताराखंडमध्ये काशीपुर येथे पार पडल्या . रेल्वेच्या मझहर खानने ९३५ किलोचा भार उचलून जबरदस्त उत्साह दाखविला . इंडियन रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रक्शिशक (अर्जुन पुरस्कार विजेते ) संजीवन भास्करन यांचे मार्गदर्शन लाभले .

मझहर खान हा पुणे रेल्वे स्थानकात विद्युत विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत .

लायन्स ‘व्हीजन क्लिनिक’चे रविवार, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी उद्घाटन मावळ येथील 9 गावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

0
पुणे :
‘लायन्स क्लब इंटरनॅशनल 323 डी-2’च्या वतीने लायन्स शतक महोत्सवानिमित्त भाग म्हणून ‘व्हीजन क्लिनिक’ चा उद्घाटन समारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, आडले बुद्रूक, मावळ येथे रविवारी, दि. 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या ‘व्हीजन क्लिनिक’चे उद्घाटन संजय भेगडे (आमदार) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल राज मुछाल उपस्थित राहणार आहेत.
मावळ येथील आडले बुद्रूक, डोणे, आडले खुर्द, ओवळे, दिवडा, पुसाणे, चांदखेड, पाचाणे, कुसगाव या 9 गावांमध्ये ‘व्हीजन क्लिनिक’,  प्राथमिक आरोग्य केंद्र, आडले बुद्रूक, मावळ येथे मोतीबिंदू तपासणी, डायबेटीस तपासणी, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाच्या वतीने दंत चिकित्सा तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी, स्त्रीरोग तपासणी ‘साईट फस्ट टीम’ आणि ‘मधुमेह तपासणी टीम’ च्या सहाय्याने दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या रविवारी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये लायन्स नेत्र रूग्णालयाच्या संचालिका डॉ. वैभवी रावळ आणि प्रशांत चौधरी (‘पुणे सिरीऑलॉजिकल इन्स्टिट्यूट’ ब्लड बँक’) हे मार्गदर्शन करतील.
पुढील सहामहिन्यात या गावांमध्ये एकाही व्यक्तिला मोतीबिंदू राहणार नाही अशी योजना आहे. मोतीबिंदु असलेल्या सर्व रूग्णांची पुण्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी प्रांतपाल राज मुछाल यांनी दिली.
यावेळी ‘लायन्स क्लब ऑफ पुना 323 डी-2’ च्या अध्यक्ष रेखा ठाकोर गिरीश मालपाणी (उपप्रांतपाल), शरदचंद्र पाटणकर (माजी प्रांतपाल), विजय सारडा (व्हिजन क्लिनिक प्रोजेक्ट चेअर पर्सन), शुभांगी गजेंद्र घोटकुले (सरपंच, आडले बुद्रूक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
rsz_1logo-for-portal

कारला लाल दिवा लावून गोव्याच्या दारूची पुण्यात तस्करी …

0

पुणे- शासकीय  अंबर दिवा आणि  पोलीस स्टीकर असलेल्या स्विफ्ट कारमधून गोव्याची दारू पुण्यात आणली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

महेश रंगनाथ पायगुडे (वय ३४ रा. देशमुखवाडी , शिवणे , पुणे ) तसेच सोहन बुद्धी शहा (वय ३० ) संतोष जयसिंग विश्वकर्मा (वय २३ रा. उत्तमनगर ,पुणे ) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे . एम एच १२ जी एफ ७६०० या क्रमांकाची स्विफ्ट मोटार , आणि दीड लाखाचे गोवा राज्य निर्मित मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे . शिवण्यातील हॉटेल संस्कृती येथे हे मद्य आणून विकले जात . उप आयुक्त सुनील चव्हाण , अधीक्षक मोहन वरदे , निरीक्षक एस आर पाटील, पी बी सास्तूरकर ,दुय्यम निरीक्षक एस एस गोगावले आर पी शेवाळे आदींच्या पथकाने हि कारवाई केली

गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने मोफत कॅन्सर तपासणी वैद्यकीय शिबीर

0

unnamed१

पुणे कॅम्पमधील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने ” रोको  कॅन्सर ” हे मोफत कॅन्सर तपासणी वैद्यकीय शिबीर घेण्यात आले . गुरुद्वाराच्या आवारात घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचे उदघाटन मनजितसिंग विरदी फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी व भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांच्याहस्ते करण्यात आले . ग्यानी हरभजन सिंग यांनी आरदास करून शिबिरास सुरुवात करण्यात आली . या शिबिरात ६०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली .

यावेळी गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष हरमिंदरसिंग घई , सचिव चरणजितसिंग सहानी , उपाध्यक्ष करमजितसिंग आनंद  ,जनसंपर्क अधिकारी मोहिंदरसिंग कंधारी अमरजितसिंग छाबरा व गुरुद्वाराचे पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिरात सर्व कॅन्सरच्या तपासण्या मोफत करण्यात आले . ज्यांना कॅन्सर आजार आढळेल त्यांना ” रोको  कॅन्सर ” मार्फत सर्व वैद्यकीय उपचार मोफत केले जातील .

  या शिबिरासाठी पुणे कॉस्मोपॊलिटन राउंडटेबलचे अध्यक्ष समीर जैन , स्वप्नील कोठारी , रितेश मेहता , मनिष मुथ्था , शिल्पा ठक्कर व विन्सेट ओल्ड बॉयज असोसिएशनचे अध्यक्ष बॉबी जेकब यांनी विशेष परिश्रम घेतले .