Home Blog Page 3535

कात्रज च्या ‘तिरंगा साईदीप लॉज वर छापा-नेपाळी असलेल्या व्यवस्थापक आणि वेटर ला अटक …

0

पुणे-कात्रज -मांगडेवाडी येथील ‘तिरंगा साईदीप ‘ या कुख्यात लॉज वर अखेर पोलिसांनी छापा टाकला .. वेश्याव्यवसाय चालविल्याच्या  आरोपावरून   इथे नौकरीसाठी नेपाळहून आलेल्या दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आणि  एका सज्ञान मुलीची सुटका करून येथील कारवाई पूर्ण करण्यात आली .

विष्णू निम्लाल घोसल (वय २१ – रा -सध्या येथे लॉजवरच मुळगाव -छापा – जिल्हा – शेगदा; नेपाल ) हा इथे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता आणि नेपाळचाच इथे वेटर म्हणून काम करणारा गंगाप्रसाद निल्प्रसाद शर्मा (वय -५६ ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे .

गेली कित्येक वर्षे कात्रज परिसरातील हॉटेल लॉजवर वेश्याव्यवसाय आणि बेकायदा दारू विक्रीचा व्यवसाय चालतो . पहाटे ५ वाजेपर्यत इथले हॉटेल डबल ते चारपट किमतीत दारूविक्री करीत असतात .  सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी गणेश जगताप यांना येथी या लॉजबद्दलची माहिती मिळाली . त्यांनतर अप्पर पोलीस आयुक्त सी एच वाकडे ,उप आयुक्त पी आर पाटील , किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली

CRIME_jpg_475x310_q85

पिंपरी, सांगवी, दापोडी, रहाटणी परिसरात 37 ठिकाणी 17 लाखांची वीजचोरी उघड ; महावितरणची विशेष मोहिमेतील कारवाई

0

 

पुणे, दि. 26 : पिंपरी विभागअंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 37 ठिकाणी 1,24,900 युनिटची म्हणजे 16 लाख 78 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे महावितरणच्या महिला अभियंत्यांनी या मोहिमेतील पथकांचे नेतृत्व केले.

पिंपरी विभागातील पिंपरी गाव, दापोडी, थेरगाव, सांगवी, हिंजवडी, रहाटणी, पिंपळे निलख आदी परिसरातील सुमारे 140 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजमीटरची दि. 23 व 24 नोव्हेंबरला तपासणी करण्यात आली. यासाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात अभियंता, लेखा लिपिक व दोन जनमित्र अशा चार जणांचा समावेश होता.

वीजमीटरच्या तपासणीत चिंचवड- 6, खराळवाडी- 18 आणि सांगवी उपविभागात 13 अशा 37 ठिकाणी 1,24,900 युनिटच्या 16 लाख 78 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. याआधी ऑक्टोबरमध्ये वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत खराळवाडी, चिंचवड, सांगवी उपविभागातील 42 ठिकाणी 16 लाख 85 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली होती. वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर, सहाय्यक अभियंता शैलजा सानप, वहिदा बागवान, स्मिता ओहोळ, सुरेखा पोळ, सुरेखा भारती, निवेदिता पाटील, ऐश्वर्या वस्त्रद, सुप्रिया जोशी व कार्यालयीन सहाय्यक दिपाली झापर्डे, पुजा गजघाटे आदींसह सुमारे 65अभियंता, कर्मचारी, जनमित्र या मोहिमेत सहभागी झाले होते.

तरुणांच्या हातात देश देण्याची खरच वेळ आली आहे — डॉ.राजीव शारंगपाणी

0

 

पुणे—देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे असे सर्वजन म्हणतात मात्र, त्यांच्या हातात कोणी देश देत नाही. सध्या

देशात जे काही सुरु आहे ते बघता तरुणांच्या हातात देश देण्याची खरच वेळ आली आहे असे मत प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ

डॉ. राजीव शारंगपाणी यांनी व्यक्त केले.

पुण्यातील जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख या दोन महाविद्यालयीन युवकांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या

सायकल प्रवासावर आधारित, ‘काश्मीर ते कन्याकुमारी – सायकल प्रवास’ या राहुल रायकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. शारंगपाणी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक विकासनाना दांगट पाटील, जिल्हा

परिषद सदस्य अमोल नलावडे, सोहम इंडस्ट्रीजचे मधुकर बनकर, पुस्तकाचे लेखक राहुल रायकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. शारंगपाणी यांनी जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख या दोन तरुणांनी केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल

प्रवासात त्यांनी दिलेल्या पर्यावरणाचा संदेशाचा गौरव करत ठराविक वयात अशा प्रकारचा ‘मॅड’पणा केलाच पाहिजे

असे नमूद केले. आत्ताच्या तरुण पिढीचे विचार बघता देश त्यांच्या हातात देश देण्याची आवश्यकता आहे असे सांगून डॉ.

शारंगपाणी म्हणाले, म्हातारे झाले म्हणजे शहाणपण येत नाही. वयाने फक्त अनुभव वाढतो, शहाणपण नाही. कोणत्याही

वयात या मुलांसारखी गोष्ट करता आली पाहिजे. त्यासाठी आपले वय झाले असे कोणी समजता कामा नये.

आयुष्याची मजा ही मृत्यूकडे तोंड करून नाही तर पाठ करून चालण्यात आहे,  म्हणजे आपोआप वाट दिसते. या दोन

युवकांनी केलेल्या ‘मॅड’पणा  सारखा ‘मॅड’पणा सर्वांनी करावा. त्यामध्ये अपयश आले तर काही बिघडत नाही. तुम्ही

काहीतरी करताय हे तुमचे यश आहे. आचरटपणा करणारी माणसे आवश्यक आहेत. धोका घेण्यातच खरी आयुष्याची

मजा आहे. मर्यादा न सोडता धोका घेतला तर त्याने आयुष्य सुंदर होते असेही ते म्हणाले.

विकासनाना दांगट पाटील म्हणाले, या दोन युवकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल

प्रवास केला ही अभिनंदनीय बाब आहे. या युवकांसारखी आजची तरुण पिढी सद्मार्गाला  लागली तर स्व. डॉ. अब्दुल

कलाम यांच्या स्वप्नातील २०२० साली भारत महासत्ता नक्की बनेल. सध्या नदीचे प्रदुषण, वाहनांमुळे होणारे प्रदुषण या

समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, त्याविरोधात सर्वांनी जबाबदारी घेऊन एकत्रितरित्या काम केले तर नक्की परिवर्तन घडू

शकते असे त्यांनी सांगितले.

अमोल नलावडे म्हणाले, काहीतरी चांगले घडण्यासाठी वेडे व्हावे लागते हे या दोन तरुणांनी सिध्द केले आहे. आजच्या

नवीन पिढीत देशात चांगले घडविण्याची ताकद आहे असे त्यांनी नमूद केले.

मधुकर बनकर म्हाणाले, आपला देश जर जवळून बघायचा असेल तर पायी किंवा सायकलने परवस करून प्रवास करा.

जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारी माणसे या प्रवासात आपल्याला भेटतात.

राहुल रायकर यांनी पुस्तकाबद्दल माहिती देऊन या दोन युवकांच्या प्रवासातील काही किस्से सांगितले.

जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रवासातील अनुभव कथन केले. निष्कारण वेळ घालवणाऱ्या गोष्टींमध्ये

न अडकता चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास त्याचा फायदा देशाला, समाजाला व आपल्या स्वत;ला होतो असा संदेश

त्यांनी यावेळी दिला.

डिसेंबर महिन्यात जयदीप शिंदे आणि संकेत देशमुख यांच्यासह त्यांचे अजून चार मित्र दिब्रुगड (आसाम) ते गुजरात असा

सायकल प्रवास करणार आहेत त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन …..ढगे व …..जगदाळे यांनी केले.

महावितरणमध्ये संविधान दिन उत्साहात

0

 

पुणे, दि. 26 : महावितरणच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात गुरुवारी (ता. 26) संविधान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. उद्धव कानडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून ती उपस्थितांकडून वदवून घेतली. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

‘राक्षस’ सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

0
दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित ‘राक्षस’ हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. राक्षस सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या ‘राक्षस’ सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे. सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. ‘शाळा’, ‘फॅंड्री’, ‘सिद्धांत’ या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले ‘चौर्य’, ‘राक्षस’ आणि ‘एक नंबर’ हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे
आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. ‘शाळा’चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ,  ‘फॅंड्री’चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. ‘राक्षस’ हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण  खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे.

अहिल्यादेवी प्रशालेत संविधान दिन साजरा

0

index index1

पुणे, २६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी प्रशालेत संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायीक वाचन करण्यात आले. सोसायटीच्या सदस्या डॉ. सविता केळकर आणि मु‘याध्यापिका तिलोतमा रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.

मराठी साम्राज्य चित्रपट सेना च्या वतीने २६/११ हल्ला च्या पार्श्वभुमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली

0

index

पुणे :-मराठी साम्राज्य चित्रपट सेना च्या वतीने २६/११ हल्ला च्या पार्श्वभुमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी दहशतवाद विरोधी जनजागृती माहीती पत्रकाचे वाटप करण्यात आले .यावेळी पुणे शहरातील दहशतवाद विरोधी पथकाचे सहा्यक पोलीस आयुक्त.भानुप्रताप बर्गे  यांनी पोलीस श्रेत्रातील  अतुलनीय कामगीरी बद्दल गौरव स्वरूपात देण्यात येणारा विर शहीद अशोक कामटे जिवन गौरव पुरस्काराने सन्नमानीत करण्यात आले यावेळी संघटनेच्या वताने प्रदेश अध्यक्ष अविनाश संकुडे प्रदेश उपाध्यक्ष श्री ठाकुर , गणेश काची ,अँड.रमेश राठोड , गोपाळ पाटील ,विनोद वैरागर , शुभम मोरे ,ओम गुंजाळ , योगेश सातकर , चेतन शिंदे , चेतन गीरी, ओमकार वारंग, ह्रषीकेश कांबळे , अशय पवार , गणेश पवार ,दिलाप मोरे , प्रमोद ननावरे , रौफ शेख , प्रशात ढवळे , जाफर खान आदी उपस्थित होते.

संविधान दिनानिमित दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

index1

पुणे-

संविधान दिनानिमित दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने पुणे लष्कर भागातील मराठी , उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या अकरा शाळामधील  ८०० विद्यार्थ्यानी ” प्रभात फेरी ” काढून साविधानाविषयी जनजागृती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले . या प्रभात फेरीची सुरुवात लष्कर भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यानच्या प्रवेशद्वारापासून पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी ध्वज उंचावून केले .यावेळी  प्रभात फेरीचे सयोजंक दि मुस्लिम वेलफेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहीद इनामदार , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक अतुल गायकवाड , मनजितसिंग विरदी , ग्रंथमित्र दिलीप भिकुले , दि मुस्लिम बँकेचे माजी संचालक चांद शेख , संदीप भोसले , असिफ शेख , अझिम गुडाकुवाला , विजय भोसले , विकास भांबुरे , भारती अंकलेल्लु , जेम्स पॉल , सेंट मार्गारेट शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , अंग्लो उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यपिक प्रा. सिकंदर शेख , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे मुख्याध्यापक प्रा. अहमद शेख , कॅम्प एजुकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जगताप , मोलेदिना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  नसीम खान व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो …… , संविधान दिन चिरायु  होवो अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या .

 या  ” प्रभात फेरी ” चा समारोप महात्मा गांधी रोडवरील अरोरा टावर्स जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .या प्रभात फेरीमध्ये हाजी सालेह मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा , कॅम्प एजुकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा सेंट अंथोनी इंग्लिश प्राथमिक शाळा , सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा , मोलेदिना इंग्लिश प्राथमिक शाळा , अब्दुल वाहेद उर्दू प्राथमिक शाळा , उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक शाळा , तैयाबिया अनाथ आश्रम , मोलेदिना टेक्निकल हायस्कूल  व अन्य मराठी इंग्लिश शाळा सहभागी झाला .  हि प्रभात फेरी महावीर चौक , महात्मा गांधी रोड , अरोरा टावर्स , डॉ बाबसाहेब आंबेडकर रोड , इस्ट स्ट्रीट , इंदिरा गांधी चौक समाप्त करण्यात आली . या फेरीचे मार्गावर विविध संस्था आणि मंडळानी स्वागत केले

 

आकुर्डीमध्ये 13 ठिकाणी 12 लाखांची वीजचोरी उघड

0

पुणे : आकुर्डी परिसरात 13 घरगुती ग्राहकांकडे सुरु असलेली 91,103 युनिटस्‌ची म्हणजे 11 लाख 62 हजार 910 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. महावितरणच्या वतीने गेल्या दोन दिवसांतील विशेष मोहिमेत ही वीजचोरी उघड झाली.

याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत आकुर्डी उपविभागातील मोरेवस्ती, विवेकनगर, पांढरकरवस्ती, मोशी आदी परिसरात महावितरणचे अभियंते व जनमित्रांच्या पथकांनी वीजमीटरची विशेष तपासणी मोहीम सुरु केली. यात एका घरगुती ग्राहकाने महावितरणची अधिकृत वीजजोडणी घेतलेली नव्हती. या ग्राहकाकडे बाहेरून आणलेले मीटर लावून त्यावर दुसर्‍या अधिकृत वीजग्राहकाचा क्रमांक लिहून सर्रास वीजचोरी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला. सहा खोल्यांसाठी हा वीजवापर सुरु होता. एकाच ग्राहक क्रमांकाचे दोन मीटर दिसून आल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना संशय आला व तपासणीनंतर यात 42,228 युनिटस्‌ची म्हणजे 7 लाख 10 हजार 910 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली.

यासोबतच 12 घरगुती ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आलेल्या आहेत. यात मीटर बायपास करून वीजवापर करणे, मीटरमध्ये फेरफार करून त्याची गती संथ करणे आदी प्रकार आढळून आले. या 12 ठिकाणी 49,875 युनिटस्‌ची म्हणजे 4 लाख 52 हजार रुपयांची वीजचोरी उघड झाली. या 13 वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

power-project-maha

शरद पवार यांनी शहीद महाडिक यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

0

12278733_620675051403662_8911203415761186762_n

सातारा –

कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या जन्मगावी जाऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहीद महाडिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास पवार यांनी महाडिक यांच्या कुटुंबियांना दिला. शहीद कर्नल संतोष महाडिक यांनी देशाप्रती केलेल्या त्यागाबद्दल, बलिदानाबद्दल समाज त्यांचा सदैव ऋणी राहील, अशी भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली. या भेटीदरम्यान विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित होते.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह …

0

मुंबई -शरद पवार यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील ७५ सुवर्ण क्षणांचा विस्तृत माहिती असलेले पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू अशा पाच भाषांत असेल. दिल्ली आणि मुंबई येथे कार्यक्रम  निमंत्रतासाठी आणि  २० डिसेंबरला पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन राज्यातील कार्यकर्ते आणि जनतेसोबत हा आनंदोत्सव आम्ही साजरा करणार आहोत.अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी येथे दिली

ते म्हणाले ,’शरद पवार यांची आजवरची राजकीय वाटचाल आदर्शवत अशी राहिली आहे. विद्यार्थीदशेपासूनच पुण्याच्या परिसरात त्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली. गोवामुक्ती संग्राम, शनिवार वाड्यात केलेले पहिले जाहीर भाषण, युवक प्रदेशाध्यक्ष, तरूण आमदार, तरूण राज्यमंत्री-कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून केलेले कामकाज, विरोधी पक्षनेते, युपीए सरकारचे काम ते कृषीमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आतापर्यंत १३ निवडणुकांत ते अपराजित राहिलेले आहेत. १२ डिसेंबर २०१५ रोजी पवार साहेब अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या प्रेरणादायक वाटचालीचा इतिहासच नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम पक्षातर्फे करण्यात येणार आहे.

१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर हा आठवडा कृतज्ञता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. यामध्ये जिल्हा व तालुकानिहाय कार्यक्रम होणार आहेत. यात विशेषतः रक्तदान शिबीर, मुला-मुलींची सायकल स्पर्धा आणि साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रिडा, विज्ञान, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ वर्षांवरील मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, फ्रंटल आणि विविध सेलचे प्रमुख यांच्या सहभागातून होईल.

तसेच या सर्वांच्या माध्यमातून डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या दोन महिन्यांत वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन चालणार आहे.

तसेच १० डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात पवार यांच्या राजकीय, सामाजिक योगदानातून झालेला विकास दर्शविणाऱ्या गौरव ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस आणि देशातील सर्व पक्षिय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे सकाळी ९ ते १ यावेळेत स्वतः पवार साहेब उपस्थित राहून जनसामान्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करणार आहेत. तसेच संध्याकाळी मुंबईतील नेहरू सेंटर येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील ७५ सुवर्ण क्षणांचा विस्तृत माहिती असलेले पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू अशा पाच भाषांत असेल. दिल्ली आणि मुंबई येथील दोन्ही कार्यक्रम जरी केवळ निमंत्रतासाठीच असले, तरी २० डिसेंबरला पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन राज्यातील कार्यकर्ते आणि जनतेसोबत हा आनंदोत्सव आम्ही साजरा करणार आहोत.

मंचरमध्ये महावितरणचा त्रिसुत्री एकदिवसीय उपक्रम प्रत्येक गुरुवारी

0

पुणे: महावितरणच्या मंचर विभागात त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना पाच ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 26) सुरवात होत आहे. या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.

या आठवड्यात मंचर विभागातील (कंसात उपविभाग) निरगुडसर (मंचर), लांडेवाडी (घोडेगाव), पिंपळवंडी (नारायणगाव), बुचकेवाडी (जुन्नर) आणि टिकेकरवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 26) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढे मंचर विभागात दर गुरुवारी प्रत्येक उपविभागातील एक अशा एकूण पाच ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम घेण्यात येणारआहे.

विद्युत ग्रामस्वच्छ अभियान, वीज देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. विद्युत ग्रामस्वच्छ अभियानात झुकलेले वीजखांब सरळ करणे, लोंबकळणार्‍या तारांची, रोहित्र बॉक्सची दुरुस्ती आदी काम होतील. वीजबिल दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे व वीज देयक दुरुस्त करून देणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, प्रतीक्षा यादीनुसार वीजजोडणी देण्याची अंमलबजावणी करणे, ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे संबंधीत उपविभागातील सर्व अभियंते, कर्मचारी व जनमित्र ग्रामपंचायतीमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सहभागी होणार आहे. मंचर विभागातील संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

rsz_1logo-for-portal

इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधवचा ‘&’ देणार प्रेक्षकांना देणार एक इमोशनल कहानी

0

आजपर्यंत चित्रपट रसिकांनी  निर्माण झालेल्या गोल्डन एरातीलसिनेमांना आणि कंटेम्पपरी सिनेमांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. तोच विश्वास सार्थ ठरवत मराठी चित्रपटांचा यशस्वी आलेख उंचावणारा आहे. इरॉस इंटरनॅशनलचा ‘& बरंच काही’ हा अजून एक सिनेमा येत्या वर्षाची छान भेट घेऊन येत आहेत. इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमाप्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणारा असेल. इरॉस इंटरनॅशनलच्या निर्माती क्रीशिका  लुल्ला यांचा फुंतरु नंतर हा दुसरा सिनेमा  आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांचे आहे. नुकताच या सिनेमाचा मुहुर्त गोरेगाव आरे कॉलेनीयेथील लक्ष्मी स्टुडियोत पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचं शूटिंग ज्या सेटवर करण्यात आलं  त्याच ठिकाणी या सिनेमाचं पहिलं चित्रिकरण करण्यात आलं आहे.

रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक असून सध्या हिंदी सिनेसृष्टीतही  कार्यरत आहेत,  त्यांच्या ‘& बरंच काही’ चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर हा चित्रपट करावा अस वाटलं.  रवी जाधव यांच्यासोबत मिळून काम करण्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. मराठीत हा सिनेमा बनवल्यानंतर कन्नड भाषेतही हा सिनेमा करण्याचा विचार इरॉस करीत आहेत. रवी जाधव यांच्यासोबत ‘& बरंच काही’ सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास हा असाच पुढेही चालू राहणार आहे कारण आम्ही मिळून अनेक प्रोजेक्ट करीत आहोत.  हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे मत इरॉसच्या क्रीशिका लुल्ला यांनी यावेळी व्यक्त केले. तर इरॉस इंटरनॅशनलचे आभार मानत रवी जाधव म्हणाले, “& बरंच काही’ चित्रपटाची कथा क्रीशिका यांना ऐकल्यावरनंतर त्यांनी हा सिनेमा करूया अस मला सांगितले.  ‘& बरंच काही’ या सिनेमाची कथा वेगळी पण कॉमन आहे. दोन पिढ्यांमधले नातेसंबंध या सिनेमात पाहायला मिळणार आहे. माय – लेक, वडील – मुलगा यांच्यात असणाऱ्या गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेऊन आमच्या सोबत भागीदारी केलेल्या इरॉस इंटरनॅशनलचा मी  आभारी आहे. ”

मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सोनाली खरे, स्पृहा जोशी, सिद्धार्थ मेनन आणि शिवानी रंगोळे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करणार आहे. मिताली जोशी यांनी सिनेमाची कथा लिहिली असून आदित्य बिरवडकर हे सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आहेत. भावनांच्या गर्तेत सापडलेल्या आणि त्यातून मनाने निर्णय घ्यावा किंवा बुद्धीने अशा द्वीधा मन:स्थितीत सापडलेल्या कुटुंबाची कथा आहे.

खडक पोलिसांकडून दुष्काळग्रस्तांसाठी १० हजार किलो धान्य रवाना…

0

index1

पुणे- खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळे आणि कार्यकर्ते  यांच्या मदतीने खडक चे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि त्यांच्या  पोलीस सहकार्यांनी यांनी १० हजार किलो धान्य गोळा करून अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी रवाना केले आहे . संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे , उप आयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी तसेच आनंद सराफ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

रणबीर -दीपिकाचा रेल्वे ‘तमाशा’ … पहा फोटो ..

0

2 4 5 6 7 8 9 10 11 index1

“तमाशा‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणनेरेल्वेने प्रवास करण्याचा मार्ग निवडला  आहे  , दिग्दर्शक इम्तियाझ अली यांच्यासोबत ते चक्क रेल्वेने दिल्लीला प्रवास -म्हणजे सुविधा एक्‍स्प्रेसमधून बडोदा, कोटा येथे थांबा घेतल्यानंतर ते थेट राजधानीतजायचे आणि परत ययाचे  . दरम्यान, अभिनेत्यांनी रेल्वेतून चित्रपट प्रमोशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रवासाबाबत मी खूप उत्साही असल्याचे दीपिकाने सांगितले. आम्ही आधी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता, पण ऐनेवळी दीपिकाच्या आग्रहामुळे आता रेल्वेने जातो आहोत, असे रणबीरने स्पष्ट केले.

index index2 index3 index