‘दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील ‘रोटरी क्लब पुणे प्राईड’ च्या रक्तपेढीचे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते 4 डिसेंबर रोजी उद्घाटन
‘एस ए ई इंडिया’ च्या वतीने ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन
हिट ट्रिटमेंट कारखान्यातही रिमोटद्वारे होणारी 16 लाखांची वीजचोरी उघड भोसरी एमआयडीसीमधील प्रकार : 6 जणांविरुद्ध गुन्हा
पुणे: रिमोटद्वारे वीजचोरी करण्याचा चौथा प्रकार महावितरणने भोसरी एमआयडीसीमधील ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीच्या कारखान्यात उघडकीस आणला आहे. या कारखान्याच्या जागेत वीज वापर करणार्या लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीत 1,19,853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत भोसरी एमआयडीसीमधील एफ टू ब्लॉक, प्लॉट क्र. 17/3 येथे ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली आहे. या कारखान्याच्या जागेत लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचा वीजवापर सुरु आहे. महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या कारखान्यातील वीजवापराबाबत केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यामुळे या कारखान्यातील वीजमीटर यंत्रणेची पाहणी केली असता रेझीन कास्ट मोल्डेड सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) ही यंत्रणा वीजचोरीच्या हेतूने हाताळल्याचे दिसून आले. अधिक तपासणीसाठी ही सीटी फोडण्यात आली व त्यात वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर फेरफार करून रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत होती. या कारखान्यात 1 लाख 19 हजार 853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
रिमोटद्वारे होणार्या वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. रवींद्ग कंदारकर, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीचे अमरजीतसिंग अरोरा, वीजवापरकर्ता लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचे भागीदार कमलाकर चिंतामण गोगटे, दत्तात्रय रघुनाथ इनामदार, पुजा प्रदीप नागवेकर, सोमनाथ रामदास यादव, अंगित सुरेंद्गन नायर या सहा जणांविरुद्ध शुक्रवारी (दि. 27) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फोटो नेम व ओळ – MSEDCL Bhosari Theft 30112015 / वीजचोरीसाठी मीटरच्या यंत्रणेत बसविलेल्या रिमोट कंट्रोल सर्कीटची पाहणी करताना अधीक्षक अभियंता (चाचणी व गुणवत्ता) श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर व सहकारी.
—————————————
मुळशी, मंचर, राजगुरुनगरमध्ये
महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम
दि. 3 डिसेंबरला 12 ग्रामपंचायतीमध्ये आयोजन
पुणे, दि. 30 : महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागात त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभागातील 12 ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) या कार्यक्रमांतर्गत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
याआधी मागील आठवड्यात गुरुवारी मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच दिवशी विविध प्रकारचे तब्बल 638 कामे पूर्णत्वास गेली होती. त्यानंतर आता मंचरसह मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रम होणार आहे.
येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा), मुळशी विभागातील लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर (मुळशी), कापुर ओहोळ व केतकावळे (नसरापूर), राजगुरुनगर विभागातील वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या 12 ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विद्युत ग्रामस्वच्छ अभियान, वीज देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. विद्युत ग्रामस्वच्छ अभियानात झुकलेले वीजखांब सरळ करणे, लोंबकळणार्या तारांची, रोहित्र बॉक्सची दुरुस्ती आदी काम होतील. वीजबिल दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे व वीज देयक दुरुस्त करून देणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
————————————
बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे, दि. 30 : पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 2 डिसेंबर) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शनी शिंगणापूर येथे नव्या क्रांतीची नांदी झाली आहे : खासदार अॅड.वंदना चव्हाण
आयुष काटेचे दिल्ली आणि गोव्याच्या नृत्य स्पर्धेत यश
स्वातंत्र्य लढ्याची कथा सांगणारा “क्रिस्टो सिंग” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
आपल्या सिनेसृष्टीला स्वातंत्र्य लढ्याचे कायम आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्याचे संदर्भ देतानाच त्यावेळचा भारवलेला काळही रुपेरी पडद्यावर अत्यंत खुबीने उभारले जातात. अशा ऐतिहासिक चित्रपटांची अनेक उदाहरणं देत येतील. असाच एक हिंदी सिनेमा क्रिस्टो सिंग आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाची कथा ही बिहारचे स्वातंत्र्य सेनानी क्रिस्टो सिंग यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे. बिहारच्या या स्वातंत्र्य सेनानीच आपल्या स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्वाचा वाटा आहे. क्रिस्टो सिंग यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यांच्या लढयाची गोष्ट आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त “वंदे मातरम” या गाण्याच्या रेकॉर्डिंगने एँंझी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी क्रिस्टो सिंग यांचे नातू ही उपस्थित होते. “चक दे इंडिया” या सिनेमातलं मौला मेरे हे गाणं गायलेल्या क्रिश्ना बेऊरा या गायकाच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. याप्रसंगी क्रिश्ना म्हणाले, “मौला मेरे या माझ्या गाण्याला लोकांनी खूप पसंती दिली. वन्दे मातरम हे गाणं जोशपूर्ण आहे. या गाण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणं देखील प्रेक्षकांना तेवढंच आवडेल, अशी मला खात्री आहे. रिकी मिश्रा यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतो आहे. “
मावेन अँङ दावेन फिल्म्स या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून राजहंस कुंवर आणि अमित सिंग हे निर्माते आहेत. रिकी मिश्रा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची तसेच संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. वरदराज स्वामी यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असलेला क्रिस्टो सिंग हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महावितरणच्या त्रिसुत्री कार्यक्रमात एकाच दिवशी 638 कामे पूर्णत्वास -पाच ग्रामपंचायतींमध्ये मोठा प्रतिसाद
पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 242 अभियंते व कर्मचार्यांनी एकाच दिवशी विविध प्रकारचे 638 कामे पूर्णत्वास नेली. यात 20 नवीन वीजजोडण्या तर 280 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.
महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना गुरुवारी (दि. 26) मंचर विभागातील (कंसात उपविभाग) निरगुडसर (मंचर), लांडेवाडी (घोडेगाव), पिंपळवंडी (नारायणगाव), बुचकेवाडी (जुन्नर) आणि टिकेकरवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये सुरवात झाली. त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला व या कार्यक्रमाचे स्वागत केले.
या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये 12 घरगुती, 7 कृषीपंप व एक वाणिज्यिक असे एकूण 20 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वीजदेयकांबाबत तक्रारी दूर करण्यासाठी 45 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 121 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 101 मीटरचे रिंडींग घेणे सुरु करण्यात आले. तसेच 71 वीजमीटरची तपासणी करण्यात आली. वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 280 कामे पूर्ण करण्यात आली.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर यांनी ग्रामपंचायतींमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग घेतला. पाचही ग्रामपंचायतींमध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 40 ते 45 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते. या पाचही ग्रामपंचायतींमधील वीजयंत्रणा, वीजदेयक आदींबाबतच्या तक्रारी एकाच दिवशी व गावातच निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा आनंद दिसून आला व या कार्यक्रमाला त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत होते. या त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री रमेश कावळे (आळेफाटा), अविनाश चौगुले (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), विवेक सुर्यवंशी (नारायणगाव), जयंत गेटमे (जुन्नर) आदींसह 25 अभियंते, 206 जनमित्र व 9 लेखा लिपीकांनी सहभाग घेतला.
येत्या गुरुवारी 5 ग्रामपंचायतींमध्ये ‘त्रिसुत्री’ – येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
सुरेल संध्याकाळी ‘आयुष्यावर बोलू काही…’ डीएसके समूहाच्या वतीने आयोजन , रसिकांचा भरभरून प्रतिसाद
पुणे, ता. २८ : देते कोण देते…च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल…दमलात
तुम्ही आई बाबा, जरा झोपा आता गाढ… या गाण्यावर झालेला भावनांचा कल्लाेळ अन
मी मोर्चा नेला नाही… या गद्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी
वातावरणात पुणेकरांची शनिवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते डीएसके समूहाच्या
वतीने आयोजित कवी संदीप खरे व संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर
बोलू काही’च्या कार्यक्रमाचे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे ग्राहक आणि
हितचिंतकांसाठी न्यु इंंग्लिश स्कूल रमणबागेच्या प्रांगणावर स्नेहमेळाव्याचे आयोजन
केले होते. या वेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष
कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाचपोर, अमित कुलकर्णी, भाग्यश्री
कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी उपस्थित होते.
पाचशेहून अधिक प्रयोग केलेल्या या कार्यक्रमाचा आजचा प्रयोगही पहिल्या
प्रयोगाप्रमाणे तितकाच उत्साहवर्धक वाटतो, असे सलील कुलकर्णी म्हणाले. शुभंकर
याने आठ दिवस सहा पेपर नंतर सु्टटी, अप्रतिम गाणी सादर करत रसिकांची मने
जिंकली. तर आर्या आंबेकरचया अस्सल रागदारीतील आयटम साँग ‘देही वणवा
पिसाटला’, ‘अर्ध्या रात्री सोडून जायचं नाय’ या दोन गाण्यांना प्रेक्षकांना थिरकावयाला
लावले. संदीप खरे यांनी सादर केलेली ‘नसतेस घरी तू जेव्हा’, ‘दमलेल्या बाबाची
कहाणी’ या गाण्याने प्रेक्षकांची मन हेलावले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी ‘अगं बाई
ढग्गो बाई’ या गाणावर धरला. अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन,
ढोलकीच्या तालावर नाचविणारा नीलेश परब यांच्या सादरीकरणामुळे रसिक तृप्त
झाले.
या वेळी डी. एस कुलकर्णी यांनी डीएसके समूहाच्या नवीन प्रकल्पांविषयी आणि
भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. समूहाच्या प्रगतीत ग्राहक आणि ठेवीदार यांचा
सिंहाचा वाटा असल्याची कृतार्थ भावनाही त्यांनी व्यक्त केली.
ड्रीमसिटी सारख्या प्रकल्पामधून केवळ घरे बांधण्याचा विचार नसून कुटुंबातील
प्रत्येकाला एकत्र आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मेकिंग ऑफ
ड्रीमसिटी ही ध्वनिचित्रफितही दाखवण्यात आली.
यावेळी गायक आणि कलाकारांचा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आयुषच्या योजनांमधून समर्थ भारताचे स्वप्न साकार होईल—श्रीपाद नाईक
पुणे- आरोग्याच्या तक्रारीमुळे अनेक लोक व विशेषत: महिला पीडित आहेत. ‘आयुष’च्या
आरोग्याबाबत अनेक योजना आहे. ‘शारदा शक्ती’ सारख्या उर्जा असलेल्या संघटनांच्या
माध्यमातून ‘आयुष’च्या योजना गावागावात नेऊन जनजागृती झाली तर समर्थ भारताचे स्वप्न
पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी
केले.
‘शारदा शक्ति’ महिलांचे राष्ट्रीय संघटन ही ‘शक्ति’ या राष्ट्रीय संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील शाखा
आहे. त्यांच्या वतीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ
हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने ‘स्वस्थ नारी – समर्थ भारत’ हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून
आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्यः आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील दोन दिवसीय
राष्ट्रीय परिषदेचा समारोप श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. स्वागत
समिती अध्यक्ष डॉ. जयश्री फिरोदिया, या परिषदेचे स्थानिक पालक डॉ. विजय भटकर, डॉ.के. आर. संचेती,
शारदा शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाजी तिवारी, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे,
सचिव डॉ. लीना बावडेकर, डॉ. अंकिता बोहरे, श्रीमती बिंदू सुराज हे यावेळी उपस्थित होते. पुणेरी पगडी,
शाल, स्मृतीचिन्ह देवून संयोजकांनी नाईक यांचा सत्कार केला.
नाईक म्हणाले, आर्थिक, सामाजिक, राजकीय, आध्यत्मिक स्वास्थ्य जसे महत्वाचे आहे तसेच महिलांचे
शारीरिक स्वास्थ्य हेही महत्वाचे आहे. पूर्वी महिला घरातील धुणे धुणे, विहिरीतून पाणी काढणे, मसाला
तयार करणे अशी अंग मेह्नितीची कामे करत. त्या कामांमधून शरीरातील घाम बाहेर टाकला जात असे.
मात्र, आधुनिक युगात शारीरिक श्रमाची कामे महिला करत नाहीत. त्यामुळे शरीरातील घाम बाहेर पडत
नाही. पूर्वी पुरुषांमध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, असे आजार आता महिलांमध्येही आढळू लागले
आहेत. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नियमित
व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिला अजूनही कुपोषित आहेत. या महिला
‘अॅनिमिया’ने पीडित असतात. पोषणासंबंधी ग्रामीण भागात अजूनही स्रियांच्या बाबतीत भेदभाव केला
जातो. यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे कलाक्षेत्र, राजकारण अशी पुरुषांचे वर्चस्व
असलेले क्षेत्र स्रीयांनी पादाक्रांत केली आहेत. वैमानिक होण्यापर्यंत तिची मजल गेली आहे. तर दुसऱ्या
बाजूला तिचे शोषण अजूनही होते आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष’ विभागाच्या महिलांसाठी अनेक योजना
आहेत. त्या गावागावातील महिलांपर्यंत शारदा शक्ती सारख्या महिला संघटनांनी पोहचविल्या तर समर्थ
भारताचे स्वप्न नक्की साकार होईल.
या दोन दिवसांच्या परिषदेतून अनेक निष्कर्ष निघाले असतील त्यावर विचार करून ‘आयुष्’च्या
माध्यमातून उपाय केले जाऊ शकतात असे सांगून नाईक म्हणाले, आयुषच्या उपचार पद्धतीमुळे
लठ्ठपणा, दमा, यांसारखे रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी असते.
डॉ. संचेती म्हणाले, महिलांचे आरोग्य हा केंद्रबिंदू ठेऊन भरविण्यात आलेल्या अशा प्रकारच्या परिषदेची
अत्यंत आवश्यकता आहे. आपण गुढघ्याची शस्त्रक्रिया करत असलो तरी आयुर्वेदिक उपचार रुग्णांना देतो.
अॅलोपथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्या एकत्रित उपचाराचा चांगला उपयोग होतो असे त्यांनी
सांगितले.
डॉ. सुधा तिवारी म्हणाल्या, महिला या संस्कृती व संस्काराचे प्रतिक आहे तरी अजूनही भ्रूणहत्या,
कौटुंबिक हिंसाचार याला महिलांना सामोरे जावे लागते. ४२ टक्के महिलांची प्रसुती अजूनही दवाखान्यात
होत नाही. परंतु यासाठी सरकारने केवळ कायदे करून काही होणार नाही. त्यासाठी शारदा शक्ती सारख्या
संघटनांनी काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांचा सर्वांगीण विकास त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व
त्यांना सक्षम करण्यासाठी शारदा शक्तीतर्फे अनेक कार्यक्रम राबविले जातात असे त्यांनी सांगितले.
डॉ. लीना बावडेकर यांनी या परिषदेमागचा हेतू स्पष्ट केला, डॉ. माया तुळपुळे यांनी परिषदेच्या
वाटचालीची माहिती दिली तर डॉ. अरुणा चाफेकर यांनी दोन दिवसांच्या परिषदेचा आढावा घेतला.
या परिषदेत वैद्यकीय शाखेतील १३५ प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शोधनिबंध सादर केले. तसेच काही
संशोधकांनी आपले विषय पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केले होते. यातील उत्कृष्ट पाच शोधनिबंध व
चार पोस्टर्सना पारितोषिके यावेळी देण्यात आली.
डॉ. माधुरी पवार, ऐश्वर्या अग्रवाल, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. शोभित दवे, व लिली बेरा यांनी उत्कृष्ट
शोधनिबंधासाठी तर डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. पल्लवी गोरडे, डॉ. सरिता भुतडाव सेफिना वर्गीस यांना
उत्कृष्ट पोस्टर्ससाठी पारितोषिके देण्यात आली.
सुत्रसंचालन डॉ. रुपाली पानसे यांनी केले तर डॉ. राजश्री कशाळकर यांनी आभार मानले.
वैकुंठभाई मेहता नेशनल इन्स्टीटयुट को-ऑपरेटिव्ह मेनेजमेंट ‘ मधून रस्त्यासाठी २ हजाराहून अधिक झाडे कापण्यास नागरिकांचा ,पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध —–५ डिसेंबर रोजी विद्यापीठ चौकात निदर्शनाचा निर्णय
इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेसमधील 38 लाखांची वीजचोरी उघडकीस ; दोघांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, दि. 29 : विमाननगर येथील मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीतील 1,37,568 युनिटची म्हणजे तब्बल 37 लाख 81 हजार 945 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. 28) दोघांसह कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विविध कंपन्यांसाठी कॉलसेंटरची सेवा देणार्या बीपीओ सर्व्हिसेसमध्येही आता वीजमीटरमध्ये फेरफार करून होणार्या वीजचोरीचा प्रकार महावितरणने हाणून पाडला आहे व इन्फोनेट बीपीओ सर्व्हिेसेसमधील तब्बल 37 लाख 81 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.
याबाबत माहिती अशी, की नगररोड विभाग अंतर्गत विमाननगर येथील गंगा इम्पोरीया बिल्डिंगमध्ये मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या जागेसाठी महावितरणने वाणिज्यिक वीजजोडणी दिलेली आहे. या बीपीओ कंपनीमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी इन्फोनेट बीपीओमधील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. यात महावितरणकडून वीजमीटरला लावण्यात आलेले वेगवेगळे सील तुटलेले आढळून आले. प्राथमिक चाचणीत वीजमीटरची गती संथ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे हा वीजमीटर पंचनामा करून जप्त करण्यात आला. महावितरणच्या पुढील तपासणीत या वीजमीटरमध्ये फेरफार करून हेतूपुरस्सर मीटरची मूळ कार्यप्रणाली बंद केल्याचे व त्याद्वारे वीजचोरी केल्याचे दिसून आले. यात 1,37,568 युनिटची म्हणजे 37 लाख 81 हजार 945 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेडमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. गुलाबराव कडाळे, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. गिरीश भगत व श्री. पंडित दांडगे, सहाय्यक अभियंता कैलास कांबळे, विजय जाधव, राहुल पालके, अमित कांबळे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ सागर देसाई, सतीश उंडे, नंदकिशोर गायकवाड, निर्मल देशमुख आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रशासकीय अधिकारी संग्राम तोमर, वीजजोडणीधारक जितेंद्ग कपिलदेव गुप्ता, इन्फोनेट बीपीओचे संचालक मंडळ यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. 28) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
स्मार्ट सिटीकरिता नागरिक व मनपाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद -स्टीफन यारवूड,माजी महापौर,Adled
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणखी चार लसी मोफत — जे.पी.नड्डा
पुणे–बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या एक जानेवारीपासून आणखी चार
लसी मोफत दिल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी शनिवारी येथे दिली.
‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे लसीकरणाचे प्रमाण
वर्षभरात ५ टक्क्याने वाढले असून तीन वर्षात हे प्रमाण ९० टक्के करण्याचे सरकारचे उद्दिष्ठ
असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शारदा शक्ति’ महिलांचे राष्ट्रीय संघटन ही ‘शक्ति’ या राष्ट्रीय संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील शाखा
आहे. त्यांच्या वतीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ
हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने ‘स्वस्थ नारी – समर्थ भारत’ हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून
आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्यः आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील दोन दिवसीय
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रिय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
शनिवार दि. २८ नोव्हेंबर व रविवार दि. २९ नोव्हेंबर २०१५ असे दोन दिवस महाराष्ट्र एज्युकेशन
सोसायटीच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे या परिषद आयोजन करण्यात आले आहे., अखिल
भारतीय आर्युविज्ञान संस्थान, नवी दिल्लीच्या डॉ. रमा जयसुंदर ,स्वागत समिती अध्यक्ष डॉ. जयश्री
फिरोदिया, या परिषदेचे स्थानिक पालक डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री
ए. जयकुमार, शारदा शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाजी तिवारी, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
डॉ. विजय डोईफोडे, सेरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या
सहाय्यक महाव्यवस्थापक (रिकव्हरी) श्रीमती सुखिता भावे, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. माया
तुळपुळे, सचिव डॉ. लीना बावडेकर हे यावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या निमित्ताने केलेल्या स्मरणिकेचे
प्रकाशन नड्डा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन जे.पी.नड्डा
यांनी केले. पुणेरी पगडी, शाल, स्मृतीचिन्ह देवून संयोजकांनी त्यांचा सत्कार केला. अखिल भारतीय
आर्युविज्ञान संस्थान, नवी दिल्लीच्या डॉ. रमा जयसुंदर यांचे बीजभाषण झाले. त्यांनी आयुर्वेदाच्या मुळ
संकल्पना स्पष्ट करून वात, पित्त, कफ प्रकृती कशी असते आणि त्याचा एकमेकांशी संपर्क कसा असतो
याबाबत माहिती दिली. भौतिकशास्त्राच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाचे महत्व कसे आहे हे त्यांनी यावेळी
सांगितले.
महिला स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यासाठी त्या जागरूक असतात. परंतु महिला
म्हणून स्वतःचे आरोग्यविषयक प्रश्र्न कोणते आहेत, या बाबत त्या जागरूक नसतात. यासाठी महिलांमध्ये
स्वतंच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करावी, हे प्रश्र्न निर्माण होउु नयेत म्हणून कोणती काळजी
घ्यावी, त्यावर कोणते उपाय करावेत या सर्व गोष्टींची माहिती करून देण्यासाठी ही परिषद आय़ोजित
करण्यात आली आहे. आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, योग या सर्व विषयांतील तज्ज्ञ मंडळी
संपूर्ण भारतातून या परिषदेमध्ये संवाद साधणार आहेत.
जे.पी.नड्डा म्हणाले, सशक्त भारतासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. नवजात बालकामध्ये मृत्यू व
आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी मध्यम आहे. ‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत
राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या माध्यमातून धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, कावीळ, क्षयरोग,
गोवर, पोलिओ अशा सात आजारांसाठीच्या लसी मोफत दिल्या जातात त्यामध्ये आणखी चार लसींची वाढ
करून आता बालकांना जर्मन गोवर, रुबेला, जापनीज बीईन सेफलायटीस आणि रोटा व्हायरस या चार
लसी येत्या जानेवारीपासून मोफत दिल्या जाणार आहेत.
‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे लसीकरणाचे प्रमाण
गेल्या वर्षभरात ५ टक्क्याने वाढले असून ते ७० टक्के झाले आहे. तीन वर्षात हे प्रमाण ९० टक्के
करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५० टक्यांपेक्षा लसीकरण कमी असलेल्या २५०
जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली आहे. दुसर्या टप्यात आणखी २५० जिल्ह्यात ही मोहीम
राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील राहिलेल्या ठिकाणीही याबरोबरच लसीकरणाची मोहीम
राबविण्यात येईल. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या
बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करुन त्यांना पूर्ण संरक्षित करण्यात येणार आहे असे नड्डा यांनी
सांगितले.
गरोदर महिलांसाठी ‘मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीम’ हा उपक्रम राबविण्यात येत असून गरोदरपणात
कुठली काळजी घ्यायची हे त्यामाध्यमातून ‘एसएमएस’द्वारे त्या मातांना कळविले जाते. परंतु अशिक्षित
महिला, गरीब महिलांना हे ‘एसएमएस’ वाचता येत नाहीत त्यामुळे आता हे ‘एसएमएस’ ‘व्हॉईस
एसएमएस’मध्ये परिवर्तीत करून महिलांना ऐकवले जात असल्याने गरोदर महिलांना त्याचा उपयोग होत
आहे. ९ प्रादेशिक भाषांमध्ये ‘व्हॉईस एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या
योजनेचा ८ कोटी महिला लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्याची चांगली काळजी घ्यायची असेल आणि समाजातील तळाच्या व्यक्तीपर्यंत उपचार व स्वास्थ्य
पोहचवायचे असेल तर सर्वसमावेशक औषधोपचाराची संकल्पना विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून अॉल
इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या देशातील सहा केंद्रांमध्ये ‘आयुष’ चा स्वतंत्र विभाग सुरु
करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दिवसीय परिषदेच्या मंथनातून स्री आरोग्याच्या बाबतीत ज्या
काही सूचना शासनाकडे येतील त्याचा स्वीकार करून धोरण ठरविताना त्याचा विचार केला जाईल असेही
नड्डा यांनी नमूद केले.
डॉ. विजय भटकर म्हणाले, आता नारीयुग सुरु झाले आहे. इंजिनिअरींग, तंत्रज्ञान, समाजकारण,
राजकारण अशी विविध क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य हा महत्वाचा घटक
आहे. कुटुंबामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत आपण कधी मोकळेपणाने बोलत नाही किंवा चर्चा करत नाही.
महिलांचे २१ व्या शतकातही मानसिक, शारीरिक, सामाजिक शोषण होते ही दुर्दैवाची बाब असून जर
सशक्त भारत करायचा असेल महिला या सर्व दृष्टीने सशक्त होणे गरजेचे आहे.
सुखिता भावे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून स्रीच्या आरोग्यासाठी मानसिक, शारीरिक
आरोग्याबरोबरच आर्थिक आरोग्य कसे महत्वाचे आहे हे सांगितले.
परिषदेत वैद्यकीय शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी शोधनिबंध सादर करतील. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व
शाखांमधील एकूण १५० जनांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तसेच काही
संशोधकांनी आपले विषय पोस्टर्सच्या माध्यमातूनही प्रदर्शित केले आहेत. या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट
शोधनिबंधांसाठी पारितोषिके दिली जातील. निवडक उत्तम पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द करण्यात
येतील. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या परिषदेच्या ठिकाणी महिला आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यानिमित्ताने, आस्था संस्थेतर्फे ब्रेस्ट स्क्रिनिंग, शेठ ताराचंद रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य
तपासणी करण्यात येत आहे. तसेच टिळक आयुर्वेद महाविद्यालयातर्फे प्रकृती परिक्षण व आहारसल्ला
दिला जाणार आहे. रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत ही तपासणी केली जाईल.
याठिकाणी १५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये हर्बल मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती व
विक्री केली जात आहे. तसेच वजन कमी करणे, नॉर्मल डिलेव्हरी याबाबत माहिती देणारे स्टॉल्स आहेत.
डॉ. माया तुळपुळे यांनी या परिषदेमागील हेतू स्पष्ट केला. डॉ.लीना बावडेकर यांनी शारदा शक्ती या
संस्थेबद्दल माहिती दिली.
डॉ. राजश्री कशाळकर यांनी आभार मानले.
पाणी मिळणार नाही प्यायला; मेट्रो होईल मात्र धावायला ….
पुण्यात पाण्यासाठी ..किंवा आणखी पाणी साठवणुकीसाठी कोणतीही योजना राबविण्यात येणार नाही . नाही त्यासाठी जागा आणि पैसा … मात्र बीआरटी-स्काय बस फेल गेल्यावर आता १२०० कोटीची मेट्रो साठी जोरदार हालचाली होत आहेत . सध्या राज्यात दुष्काळ आहे आणि पुण्यात हि आहेच आहे . पुण्याच्या लोकसंख्येचा विचार करता आणि अवलंबून असलेल्या शेतीचा विचार करता येथे पाण्याची साठवणूक अत्यंत मर्यादित स्वरूपात होते आहे आणखी एखादे धरण बांधावे साठवणूक वाढवावी यासाठी कोणतेही प्रकल्प -विचार गेल्या कित्येक वर्षात मांडण्यात आलेले नाहीत मात्र वाहतुकीचा खेळखंडोबा करून हजारो कोटींचे प्रकल्पावर वेगाने काम होत आले आहे . त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्न पाण्याहुन्ही अत्यंत महत्वाचा असे स्वरूप येथे दिले गेले आहे
पुणे मेट्रो प्रकल्प टिपणी
महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक वाहतूक विषयाचा सर्वकश अभ्यास करण्यात येउन
महानगरासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार करण्यात आला. त्याव्दारे मेट्रो रेल्वे या
मोठया वहन क्षमतेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा निर्णय पुणे महानगरपालिका मुख्य सभेमार्फत
मार्गिका क्र.1 पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेची लांबी 16.59 कि.मी. पैकी 11.57 कि.मी.
उन्नत व 5.02 किे.मी. भूमिगत असून या मार्गिकेवर 9 उन्नत स्टेशन असून 6 भूमिगत स्टेशनचा
समावेश आहे. वनाज ते रामवाडी या मार्गिकेची लांबी 14.925 कि.मी. असून ही संपूर्ण मार्गिका उन्नत
आहे. व यावर 15 उन्नत स्टेशन्स आहेत.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सप्टेंबर 2008 च्या दराप्रमाणे मार्गिका क्र.१ चा अंदाजित खर्च रूपये
4911 कोटी व मार्गिका क्र.२ चा अंदाजित खर्च रू.2217 कोटी असा एकूण खर्च रू.7128 कोटी लागणार
होता व 2014-15 मध्ये प्रकल्प पूर्णवत्वाचा खर्च रू.(कंप्लीशन कॉस्ट) 9534 कोटी रूपये होता.
यानंतर केंद्रशासनाच्या सूचनेप्रमाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा खर्च ऑगस्ट 2014 च्या सुधारीत दराने
करण्यात आला. मार्गिका क्र.1 चा अंदाजित खर्च रू.5320 कोटी व मार्गिका क्र.2 चा अंदाजित खर्च रू.
2532 कोटी असून एकूण अंदाजित खर्च रू. 7852 कोटी होता व सन 2020-21 मध्ये एकूण पूर्णत्वाचा
अंदाजित खर्च रू.10869 कोटी होता.
यापूर्वी राज्य शासनाने 29 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णय क्र.पीएमआर3313/प्र.क्र.29/युडी-
7 अन्वये मेट्रो रेल प्रकल्पाच्या एकूण 31.5 कि.मी.लांबीच्या टप्पा क्र.1 ला मान्यता दिलेली आहे. केंद्रीय
शहर विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे जा.क्र. K – 14011/20/2012-MRTS- IV दि. 11 फेब्रुवारी 2014 चे
पत्रान्वये प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिलेली आहे. प्रकल्पाला केंद्रशासनाच्या दि. 21 ऑक्टोबर 2014
च्या राजपत्राव्दारे मेट्रो रेल्वे अॅक्ट 1978 (कन्स्ट्रक्शन व वक्र्स) तसेच मेट्रो रेल्वे अॅक्ट 2002
(ऑपरेशन् आणि मेंटेनन्स) लागू करण्यात आला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी (एस.पी.व्ही.) नोंदणी प्रक्रियेसाठी
राज्यशासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत आर्टिकल ऑफ असोसिएशन व मेमोरॅंडम ऑफ
असोसिएशनचे मसूदे केंद्रशासनाकडे पत्र क्र. PMR-3314/C.R. 69/UD-7 नगर विकास विभाग, मंत्रालय,
मुंबई दि. 28 एप्रिल 2015 अन्वये मंजूरीस्तव पाठविणेत आला आहे.
. मार्गिका क्र.2 वनाज ते रामवाडी मेट्रो जमिनीवर किंवा भुयारी याबाबत लोकप्रतिनिधी तसेच
स्वयंसेवी संस्थांनी काही मुद्दे उपस्थित केल्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या
अध्यक्षतेखाली शनिवार दि.07 मार्च 2015 रोजी कौन्सिल हॉल पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली
होती. मार्गिका क्र.1 बाबत कोणाचाही आक्षेप नसल्याने ही मार्गिका मंजूर करण्यात आली व मार्गिका क्र.2
जमिनीवर किंवा भुयारी बाबत सूचना आल्याने या मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी मा.पालकमंत्री यांच्या
नियंत्रणाखाली एक समिती नेमण्यात आलेली असून समिती सदस्यांनी याविषयी दि.11 मार्च 2015, 19
मार्च 2015 व 13 एप्रिल 2015 रोजी बैठका घेतल्या व या समितीच्या सदस्यांनी आपले प्रस्ताव/पर्याय दि.
16 मार्च 2015 रोजी मा. महापालिका आयुकत यांचेकडे सादर केले. मार्गिका क्र. 2 वनाज ते रामवाडीबाबत
समितीमधील सदस्यांचे प्रस्ताव/पर्याय व समितीचा याबाबतचा अहवाल दि. 20 एप्रिल 2015 रोजी मा.
प्रधान सचिव (1) नगर विकास यांचेकडे सादर केला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र, सदन, नवी दिल्ली येथे दि.9 सप्टेबर 2015 रोजी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये
राज्य सरकारने मा. पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी व दिल्ली मेट्रोने
बनविलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डिपीआर) स्विकारून पहिल्या टप्प्यातील काम त्वरीत सुरू करण्याचा
निर्णय या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठक अहवालानुसार मेट्रोचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड)
स्वरूपाचा तर आवश्यक्तेनुसार भुयारी आणि नदीकाठाने जाणारा असणार आहे.
नव्या बदलांनुसार मेट्रो मार्गिका क्र.2 खंडुजीबाबा चौक मार्गे नदीकाठाने बालगंधर्व
महापालिका भवन, धान्य गोडाऊन (कामगार पुतळा),संगम ब्रिज मार्गे पुणे स्टेशनवरून पुढे पूर्वीच्याच
आराखडयानुसार रामवाडी पर्यंत एलिव्हेटेड (उन्नत) जाणार आहे. या बदलाप्रमाणे मार्गिका क्र.२ ची लांबी
14.665कि.मी.इतकी असणार आहे. नोव्हेंबर 2015 च्या दरानुसार मार्गिका क्र.१ चा अंदाजित खर्च रूपये
5333 कोटी मार्गिका क्र.२ अंदाजित खर्च रू.2794 कोटी व एकूण अंदाजित खर्च रू.8127 कोटी व
प्रकल्पाचा पूर्णत्वाचा सन 2022-23 अंदाजित खर्च रू.11522 कोटी असणार आहे.
पी आय बी बैठक व केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीद्वारा प्रकल्पास आर्थिक सहभागासह अंतिम
मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाची पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे.







