Home Blog Page 3531

आय.एम.ई.डी. मध्ये ‘व्यवस्थापनातील अकौटिंग, ऑडिटिंग’ विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

0
index1
पुणे:
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आय.एम.ई.डी.) च्या वतीने ‘सार्क ग्रुप ऑफ नेशन’ मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील ‘अकाऊंटींग, ऑडिटींग, गव्हर्नन्स अ‍ॅण्ड कन्टेपरी इश्यू इन मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ही परिषद गुरुवारी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड येथे झाली असून, या परिषदेला एम.बी.ए., एम.सी.ए. च्या अभ्यासक्रमाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. ‘व्यवस्थापनशास्त्र शाखेचे’ अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. महेश जोशी (आर.एम.आय.टी. विद्यापीठ, मेलबर्न) यांनी बीजभाषण केले. ‘संशोधकांनी आपल्या अभ्यास विषयात लेखन चांगल्या जर्नल्स्मध्ये प्रसिद्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. संशोधनातील संधींवर डॉ.जी.एस.बात्रा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी ही मार्गदर्शन केले. डॉ. किर्ती गुप्ता यांनी आभार मानले.

व्हिट्स लक्झरी हॉटेलकडून पुण्यात ‘द क्लब ऑर्चीड’चे अनावरण

0

हॉटेल उदयोगातील एक मानांकित हॉटेलची संखला असलेल्या व्हिट्स लक्झरी हॉटेल द्वारा पुण्यात ‘द क्लब ऑर्चीड’चे अनावरण करण्यात आले. ११ एकर परिसरात पसरलेल्या हा क्लब फक्त सभासदांसाठीच उपलब्ध असणार आहे. हा एक उच्च दर्जाचा क्लब असून या ठिकाणी फ्यूजन प्रिमीयम, आरोग्य,  आहार, साहसी खेळ, यांची मेजवानी अनुभवता येईल. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना स्नूकर/ पुल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, स्पा, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ आणि अन्य गेमिंग मशिनचा अनुभव घेता येईल. 

2

ऑर्चीड क्लब काही टप्प्यात कार्यान्वीत होणार आहे. पंरतू सध्या सभासदांना काही ठिकाणी त्वरीत प्रवशे मिळू शकतो.  ऑर्चीड क्लबचे सदस्य जेवणाच्या ठिकाणी विशेष सवलत प्राप्त करू शकतात. या विशेष सवलतीचा फायदा सभासद घेऊ शकतात. क्लब ऑर्चीडच्या ‘द बॉऊलेर्ड कॉफी शॉप’ आणि ‘द अटिर्म कॉफी शॉप’मध्ये ३० टक्के सवलत प्राप्त होईल. या पॅकजच्या अंतर्गत सदस्यांना २ रूम एका रात्रीसाठी  व्हिट्स लक्झरी हॉटेल पुणे इथे मोफत मिळू शकते. यामध्ये सदस्यांच्या कुटुंबियांचा समावेश असेल, ज्यात पती-पत्नी आणि दोन मुले सहभागी होऊ शकतील

या क्लबच्या दुसऱ्या टप्यात ग्रंथालय आणि वाचनालयाचा, कार्ड रूम, इनडोअर बॅडमिंटन कोर्ट तसेच आरोग्याच्या दुष्टीने योगा आणि एरोबिकच्या वर्गाचा समावेश असेल. क्लबमधील खेलाचे वातावरण उत्साही ठेवण्यासाठी या ठिकाणी फुटबॉल/ क्रिकेट ग्राऊंडचा समावेश असेल जे संपुर्ण नेटने झाकलेले असेल. या ठिकाणी गो कार्ट ट्रेकचा अनुभवही घेता येईल. या ठिकाणी क्लबचे रेस्टॉरंट आणि बारचा समावेश असेल विशेष क्लबच्या दराने जिथे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याची सोयही असेल.

व्हिट्स लक्झरी हॉटेल्स सध्या १० ठिकाणी कार्यान्वित असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, भूवनेश्वर, नाशिक, लातूर, तिरूपूर, अंकालेश्वर, कुंडापूर, आणि बेल्लारी इथे शाखा आहेत. या हॉटेल श्रुखंलेद्वारा ९०० खोल्यांसह बॅन्केव्ट, कॉन्फरंस रूम, रेस्टॉरंट, आणि लाईफस्टाईलच्या सुविधा पुरवते. व्हिट्स लवकरच मुंबई, चाकण, नांदेड, सुरत, दहेज, अहमदबाद, चंद्रपुर आणि मंगळूरू या ठिकाणी शाखा सुरू करून देशभर पोहचण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये १५ जागांचा समावेश असून द्वितीय दर्जा आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरात येत्या तीन वर्षात या हॉटेलच्या सुविधा कार्यान्वित होतील.

सर्व नव्या शाखा ह्या फ्रेचाईझी तत्वाने कार्य करतील. सध्या व्हिट्स लक्झरी हॉटेल आपल्या सेवेत ४०० खोल्यांचा समावेश करत असून या सोबतच बेन्केवॅटींग आणि रेस्टॉरंटची सुविधा असणार आहे. व्हिट्स सध्या माफक दरात आपल्या सेवा पुरवत असून ग्राहकांना सर्व ठिकाणी इतर हॉटेल्सच्या तुलनेत ७८ % दरात सेवा मिळतील.

कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडने KHIL अत्यंत समर्थपणे आपल्या पाच ब्रँडची स्थापना केली आहे. यात द ऑर्चीड, एन इकोटेल हॉटेल (5 Star), व्हिटस लक्झरी हॉटेल (4 Star) गंभ हॉटेल, लोट्स रेस्टोरंट, आणि विठ्ठल कामत ओरिजनल फॅमिली रेस्टोरंटचा समावेश आहे. KHIL यांनी गेल्या आर्थीक वर्षात १३९.३१ कोटीचा व्यवहार केला असून या वर्षी हा व्यवहार १५२ कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.

क्लब ऑर्चीड, व्हिट्स लक्झरी हॉटेल, छत्रपती शिवाजी क्रिडा भवनाजवळ, पुणे बंगळूरू हायवे, बालेवाडी, पुणे ४११०४५

ऑर्चीडच्या सदस्य बनण्यासाठी कॉल करा – +91-8422970165 / +91-08422971064

Email :-  agmclub@orchidvitshotels.com / salesclub@orchidvitshotels.com

पहा ‘नटसम्राट’ चा ट्रेलर

0

नव्या वर्षाचे मराठी सिनेसृष्टीचे सर्वात मोठ्ठे आकर्षण

रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका ‘ नटसम्राट’

0

 

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर

01 02

“कुणी घर देता का रे घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’.

विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र रंगभूमीवर साकारलं होतं ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी. अप्पासाहेबांची ही भूमिका करायला मिळावी हे त्याकाळातही आणि आजही प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्नच. डॉ. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर आणि राजा गोसावी यांच्याही वाट्याला ही भूमिका आली. आजही अभिनयाचं परिमाण म्हणून या भूमिकेकडे बघितलं जातं. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक आता रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या माध्यमातून. आपला दमदार आवाज आणि अभिनयसंपन्नतेच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारत आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निर्मिती करणा-या झी स्टुडिओज् या संस्थेमार्फत ‘नटसम्राट’ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका शानदार सोहळ्यात सादर करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर, महेश मांजरेकर, अभिनेते विक्रम गोखले, झी स्टुडिओजचे प्रमुख नितीन केणी, व्यवसाय प्रमुख निखिल साने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

704051

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “ नटसम्राट ज्यावेळी पहिल्यांदा रंगभूमीवर आलं म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी त्यावेळी मी मी साधारणपणे वयाच्या विशीत होतो. डॉ. लागूंच्या प्रभावी अभिनयाने आणि नटसम्राट नाटकाने त्यावेळी प्रत्येकाला डंख मारला होता आणि त्या डंखाची नशा ती झिंग नकळतपणे आमच्यात भिनली होती. त्या काळी नटसम्राटची सर्व स्वगते मला मुखोद्गत होती. नटसम्राट करायला मिळावं हे स्वप्न तेव्हापासूनच जपलं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालंय. या निमित्ताने ती सारी झिंग बाहेर पडली याचा मनापासून आनंद आहे. तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) यांची भाषा हे या नाटकाचं सर्वात मोठं बलस्थान. सामान्य माणसालाही भावणा-या आणि त्याच्या काळजाला भिडणा-या या भाषेमुळेच हे नाटक अभिजात कलाकृती म्हणून ओळखल्या गेलं. माझ्या मते नटसम्राट हे नाटक करणं फार त्रासदायक काम होतं. ती भूमिका त्या पद्धतीने जगून, प्रत्येक प्रयोगात विविध पद्धतीने समजून घेऊन डॉ. लागू ज्या प्रकारे सादर करायचे ते खूप आव्हानत्मक काम होतं. पुढे दत्ता भट, सतीश दुभाषी शेवटच्या काळात चंद्रकांत गोखले यांनी ते सादर केलं. या सर्वांचं यातलं योगदान खूप मोठं आहे. आता ही भूमिका चित्रपटाच्या रूपाने माझ्या वाट्याला आली हे मी माझं भाग्य समजतो.”

6

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, “मी नटसम्राट नाटक रंगभूमीवर बघितलं नव्हतं परंतू ते पुस्तक वाचल्यानंतर त्याबद्दलची एक उत्सुकता मनात तयार झाली आणि यावर आधारित चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. या भूमिकेसाठी नानाशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्याचा विचार मनाला शिवला नाही कारण अप्पासाहेबांसारखी ताकदीची भूमिका साकारण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच अभिनय, देहबोली, भाषेवरचं प्रभुत्व, आवाजातील चढ उतार आणि मुळात म्हणजे नाटकावरचं आणि भूमिकेवरचं प्रेम हे सर्व काही नानामध्ये आहे. त्यामुळे या भूमिकेला नानाशिवाय इतर कुणी एवढ्या चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकणार याबद्दलची खात्री मनात होती.”

34

‘नटसम्राट’ या नाटकाची ओळख ठरली ती याची संहिता आणि अभिनयसंपन्नता. अप्पासाहेब बेलवलकरांसोबतच त्यांची पत्नी कावेरीचं पात्रही यात तेवढंच दमदार आणि महत्त्वाचं होतं. रंगभूमीवर ज्युलियस सिझर, ऑथेल्लो, सुधाकर, हॅम्लेट अशी एकाहून एक सरस पात्र ज्याने लीलया साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्या नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा. अभिनयाची कारकीर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा.. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे नटसम्राट हे नाटक. याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येतेय अतिशय भव्य रूपात. यातील अप्पासाहेबांच्या भूमिकेकडे प्रत्येक अभिनेता शिवधनुष्य म्हणूनच बघतो आणि या भूमिकेचे कंगोरेही एवढे आहेत की ती प्रत्येकालाच साकारायला जमणं तसं अवघडंच. प्रसिद्धीच्या झोतात असताना चेह-यावर येणारा तो रूबाब आणि ती रया गेल्यानंतर चेह-यावर आलेली विषण्णता, जवळच्या लोकांनी दूर लोटल्यानंतर आयुष्यात आलेली हतबलता या सर्व गोष्टी समर्थपणे दाखवणं हे मोठं आव्हानचं. डॉ. लागू यांनी साकारलेली ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. हीच भूमिका आता चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे नाना पाटेकरांसारख्या तेवढ्याच ताकदीच्या अभिनेत्याच्या अभिनयातून.

अप्पासाहेब बेलवलकरांइतकीच महत्त्वाची असलेली त्यांची पत्नी कावेरीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी. याशिवाय चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हेही एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनी विक्रम गोखले आणि नाना पाटेकर हे दोन दिग्गज अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. याव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, नेहा पेंडसे, अजित परब आणि जयवंत वाडकर या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे यांची असून संवाद किरण यज्ञोपवित आणि अभिजीत देशपांडे यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय परेश मांजरेकर यांनी तर कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांचे आहे तर छायाचित्रण केलंय अजित व्ही. रेड्डी यांनी. या चित्रपटात दोन गाणी असून ती अजित परब यांनी संगीतबद्ध केली आहेत.

फिनक्राफ्ट मिडिया, गजानन चित्र आणि ग्रेट मराठा यांची निर्मिती असलेला हा ‘नटसम्राट’ येत्या १ जानेवारीला झी स्टुडिओजच्या माध्यमातून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने

0

पुणे-

भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर आणि भारतीय जनता पार्टी  पुणे कॅनटोन्मेन्ट बोर्ड विभागाच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रवक्ते नवाब मलिक यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करून  पुणे लष्कर भागात भोपळे चौकात त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली  .  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर  अध्यक्ष मनिषभाऊ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . यावेळी पुणे कॅनटोन्मेन्ट बोर्ड नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक अतुल गायकवाड , जयप्रकाश पुरोहित , संतोष इंदुरकर , सतीश गायकवाड , सुखदेव अडागळे , नितीन राख , संजय व्हावळ , राजू जारखंडे, दीपक शिंदे , सुहास गायकवाड ,किरण क्षीरसागर , अशोक खंडागळे , विश्वास घोलप , संदीप जांभळे , दिनेश नायकु , किशोर शिंगवी ,महेद्र भोज , दीपक कुराडे , अमित वोरा , प्रवीण जाधव , ईश्वर कांकलिया , मामा शिवले , गणेश यादव , प्रसाद कांबळे , समीर शेख , राहुल सोनवणे, सुखदेव वाघमारे , तुषार मंत्री , संतोष कांबळे  आदी मान्यवर सहभागी झाले होते .

  यावेळी  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर  अध्यक्ष मनिष साळुंके यांनी सांगितले कि , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रवक्ते नवाब मलिक यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला . बिनबुडाचे आरोप करू नका , अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही , तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला . यावेळी अन्य मान्यवरांनी निषेधात्मक भाषणे केली . या आंदोलनाचा समारोप सुखदेव अडागळे यांच्या भाषणाने झाला .

दौंडमधील पारगांवमध्ये 500 ग्रामस्थांसाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका सेवेच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

0

 

पुणे :
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या जनजागृतीसाठी दौंडमधील पारगांव येथे 500 ग्रामस्थांसाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पारगांव चे सरपंच दत्तात्रय शिवराम कुंभार, उपसरपंच संभाजी दत्तात्रय ताकवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या या सेवेची जनजागृती होण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. या प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित 500 ग्रामस्थांना ‘डायल 108’ सेवेच्या कार्याची माहिती देण्यात आली.
या जनजागृती प्रात्यक्षिकाचे संयोजन डॉ. रूपाली भागवत, डॉ. हनुमंत अर्जुन, विजय वाघ, गजानन बिवटे, बी.आर.कोळी यांनी केले.
अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते’ याबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना त्याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
index

सावकारांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय किडनी चोरीचे रॅकेट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे- नवाब मलिक

0

मुंबई –

राज्यात सावकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याचे मोठे रॅकेट सुरु आहे. त्यामुळे या सर्व किडनी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे व जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने १७१ कोटींची तरतूद केली होती. पण औरंगाबाद जिल्हाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात याची अमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी १७१ कोटींची तरतूद करूनही फक्त १ कोटी २९ लाख खर्च करण्यात आले. यामागचे रहस्य काय आहे ते सरकारनेच स्पष्ट करावे, असे मलिक यांनी म्हटले.

औरंगाबादमधील संचेती नामक एकाच सावकाराला ७९ लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली. सरकार भाजपशी संबंधित सावकारांना शोधून शोधून कर्जमाफी देत आहे का, असा सवालही मलिक यांनी केला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जळगावात शिवसेनेच्या एका आमदाराने प्रश्न केला होती की भाजपच्या एका वजनदार मंत्र्यांची किडनी कुठून आली? श्रीलंकेत त्यांनी किडनीचे प्रत्यारोपण करताना हॉस्पटलमध्ये त्याची नोंद का नाही? कुठल्या व्यक्तीने ती किडनी दान केली याची नोंद का नाही? सत्ताधारी पक्षाचेच आमदार ज्यावेळी असे प्रश्न निर्माण करतात त्यावेळी सरकारला या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक आहे, असे मलिक यावेळी म्हणाले.

सावकारांनी कर्जापायी शेतकऱ्यांच्या किडनी काढण्याचा प्रकार फक्त अकोल्यातच नाही. तर राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांच्या किडनी काढण्यात आल्या आहेत. सरकारने सावकारापासून कर्जमुक्तीची घोषणा करून देखील शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त झालेला नाही. कुठेतरी हे सर्व किडनी काढणाऱ्या सावकारांना मदत करण्याचा कार्यक्रम आहे काय ? याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले

महापौर आणि सभागृहनेत्यांच्या कारभाराने संतप्त होवून नगरसेवक विशाल तांबे यांचा राजीनामा .. चैतन्यनगर च्या भूखंडावरून वादंग …

0

पुणे-पुण्याचे आताचे मावळते महापौर दत्ता धनकवडे आणि त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक विशाल तांबे  यांच्यातील राजकीय खेचाखेची अखेर चव्हाट्यावर आली असून यातून संताप – नैराश्य आलेल्या विशाल तांबे यांनी आज नगरसेवक पदाचाच राजीनामा दिला . दक्षिण पुण्याला राष्ट्रवादीने महापालिकेतील अनेक महत्वाची पदे देवूनही  राष्ट्रवादीच्या तथकथित नेत्यांमधील रस्सीखेच थांबलेली नाही . महापौर , सभागृह नेता , स्थायी समिती अध्यक्ष अशी महापालिकेतील पदे , आणि युवक अध्यक्ष असे पक्षातील पद राष्ट्रवादीने दक्षिण पुण्याच्या वाटेला टाकून हि हा वाद पराकोटीला गेला आहे . चैतन्य नगरच्या भूखंडावरून हा वाद उफाळला आहे .

न्यायालयीन लढाई जिंकून मिळविलेल्या भूखंडावर उद्यान उभारण्यासाठी दिलेला प्रस्ताव महापौर आणि सभागृहनेता जाणीवपूर्वक पुढे ढकलत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनकवडी येथील नगरसेवक विशाल तांबे यांनी आज नगरसेवकपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठविला . केवळ बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात असून धनकवडी आणि चैतन्यनगर येथील नागरिकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून याठिकाणी उद्यान उभारण्यासाठी प्रयत्न करेन, असेही तांबे यांनी राजीनाम्यामध्ये नमूद केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हा बांधकाम व्यावसायिक कोण हे मात्र समजू शकलेले नाही
या राजीनाम्याची प्रत पक्षाचे विधीमंडळातील नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहरअध्यक्षा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनाही पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहिती अशी की धनकवडी येथील चैतन्यनगर येथील सुमारे एक एकरचा भूखंड उदयानासाठी आरक्षित करण्यासाठीची प्रक्रिया येत्या ९० दिवसांत पूर्ण करा, असा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे येत्या ११ दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास धनकवडीमध्ये उद्यान साकारणार आहेे. परंतू या ठिकाणी इमारत बांधण्यास एक बांधकाम व्यावसायीक प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानीक नगरसेवक विशाल तांबे यांनी याठिकाणी उद्यान उभारणीस मान्यता देण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर ठेवला आहे. परंतू १९ नोव्हेंबरची सभा ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
३० नोव्हेंबरला सभेमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. विशेष म्हणजे ३० तारखेला सकाळी ११ वाजल्यापासून ८ सभांचे कामकाज झाले. नेमके नोव्हेंबर महिन्याची कार्यपत्रिका अंतिम होती. आजच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास उद्यान निर्मितीचा मार्ग खुला होईल, ही बाब तांबे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि सभागृहनेते बंडू केमसे यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतू उपमहापौर आबा बागुल यांनी मधेच कोरमचा मुद्दा उपस्थित केला. तांबे यांनी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर बागुल यांनी कोरमची मागणी मागे घेतली. मात्र, महापौर आणि सभागृहनेत्यांनी कोरम नसल्याने सभा तहकुब केली. यामुळे प्रस्ताव आणखी १७ दिवस पुढे ढकलला गेला आणि नागरिकांचे उद्यानाचे स्वप्न अधिकच अंधुक झाले.
. या जागेवर उद्यान व्हावे यासाठी चैतन्यनगर येथील नागरिकांनी याठिकाणी उद्यानाचे आरक्षण व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तांबे यांनी यासाठी सातत्याने ८ वर्षे पाठपुरावा केला. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेउन ९० दिवसांत याठिकाणी उद्यानाचे आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. परंतू महापौर धनकवडे आणि सभागृहनेते बंडू केमसे यांनी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव प्रलंबीत राहील यासाठी प्रयत्न करून नागरिकांना उद्यानापासून वंचित ठेवले. केवळ या जागेवर डोळा असलेल्या बांधकाम व्यावसायीकासाठीच हा प्रयत्न करण्यात आला असून मला नगरसेवक पदापेक्षा नागरिकांचे हित महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहाणार असून नागरिकांच्या उद्यानाच्या मागणीसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा लढा सुरूच ठेवणार, असे तांबे यांनी राजीनामा पत्रात नमुद केले आहे.

उरुळीकांचन, हडपसर ग्रामीणमध्ये 30 लाखांची वीजचोरी उघड

0

 

महावितरणची विशेष मोहिमेतील कारवाई

पुणे, दि. 03 : महावितरणच्या मुळशी विभागअंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 89 ठिकाणी 3 लाख 46 हजार युनिटची म्हणजे 29 लाख 91 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली आहे.

मुळशी विभाग अंतर्गत हडपसर ग्रामीण, उरुळीकांचन, लोणी काळभोर, कुंजिरवाडी, वाघोली, लोणीकंद, इनामदारवस्ती, मांजरी आदी परिसरातील 351 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजमीटरची मंगळवारी (दि. 1) तपासणी करण्यात आली. यासाठी 72 अभियंता, जनमित्र यांची 13 पथके तयार करण्यात आली होती.

वीजमीटरच्या तपासणीत हडपसर ग्रामीण उपविभागात 53 ठिकाणी 12 लाख 91 हजार रुपयांची तर उरुळीकांचन उपविभागात 36 ठिकाणी 17 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. या सर्व वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता श्री. कल्याण गिरी, श्री. राजेंद्ग भुजबळ यांच्यासह अभियंते व जनमित्र यांनी वीजचोरीविरोधी मोहिम राबविली.

power_big_10

कृषिसंजीवनी योजनेतून 35735 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त

0

पुणे, दि. 03 : महावितरण कृषिसंजीवनी योजनेतून मार्च 2015पर्यंत पुणे परिमंडलातील वीजदेयकांचे थकबाकीदार 35,735 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. या योजनेला येत्या मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आणखी 42365 शेतकर्‍यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, नियमित व प्रामाणिकपणे वीजदेयकांचा भरणा करणार्‍या पुणे परिमंडलातील 71,264 शेतकर्‍यांचे या योजनेतून दोन त्रैमासिक वीजदेयकांतील 50 टक्के रक्कम म्हणजे 7 कोटी 7 लाख 79 हजार रुपये माफ करण्यात आले आहेत.

कृषिसंजीवनी 2014 या योजनेत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, मंचर व राजगुरुनगर या विभागांसह रास्तापेठ व गणेशखिंड मंडलमध्ये एकूण 35735 थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकर्‍यांनी  मार्च 2015 पर्यंत मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम म्हणजे 10 कोटी 11 लाख 63 हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकर्‍यांचे 50 टक्के मूळ थकबाकी व संपूर्ण व्याज व विलंब शुल्क असे एकूण 15 कोटी 34 लाख रुपये माफ झालेले आहेत.

आता कृषिसंजीवनी योजनेला राज्य शासनाने येत्या मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे पुणे परिमंडलातील आणखी 42,365 कृषीपंपधारक शेतकर्‍यांना थकबाकीमुक्तीची संधी आहे. या शेतकर्‍यांकडे एकूण 80 कोटी 6 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आहे. यात मूळ थकबाकीचे 53 कोटी 45 लाख 82 हजार रुपये, विलंब शुल्काचे 1 कोटी 6 लाख 91 हजार व व्याजाच्या 25 कोटी 53 लाख 76 हजार रुपयांचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी मूळ थकबाकीच्या 26 कोटी 72 लाख 91 हजार रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के मूळ थकबाकी, संपूर्ण व्याज व दंडाचे एकूण 53 कोटी 33 लाख 58 हजार रुपये माफ होणार आहेत.

योजनेचे स्वरुप थकबाकीदार कृषीपंपधारकांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या मूळ थकबाकीतील 50 टक्के रकमेचा एकरकमी किंवा समान हप्त्यांत येत्या 31 मार्च 2016 पर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के मूळ थकबाकीची रक्कम राज्य शासन महावितरणला अनुदान स्वरुपात देणार आहे. तर विलंब आकार व व्याजाची संपूर्ण रक्कम महावितरणकडून माफ करण्यात येणार आहे. ही योजना तात्पुरत्या व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारकांसाठी तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहणार आहे.                               

पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, हडपसर, मंचर, राजगुरुनगर, नसरापूर, उरळीकांचन, लोणावळा, तळेगाव, चाकण, वडगाव मावळ, घोडेगाव, आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर या उपविभागातील 37,831 थकबाकीदार कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्तीची संधी आहे. उर्वरित 4534 थकबाकीदार हे रास्तापेठ व गणेशखिंड मंडलातील आहेत.

थकबाकीदार शेतकरी बांधवांनी मुदतवाढ मिळालेल्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या संबंधीत शाखा किंवा उपविभाग कार्यालयांत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पै आय सीटी अ‍ॅकॅडमीतर्फे 110 संगणक प्रशिक्षकांसाठी शिबिर

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै आय. सी.टी. अ‍ॅकॅडमी’तर्फे संगणक प्रशिक्षकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. राज्यातील 110 संगणक प्रशिक्षकांनी या शिबिरात भाग घेतला. त्यांना सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग, इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिरामध्ये पुणे, खेड, गुहागर, रत्नागिरी, कुडची (कर्नाटक), नाशिक, औरंगाबाद, श्रीरामपूर, सोलापूर, मुंबई, बुलढाणा, लोणावळा येथील प्रशिक्षक सहभागी झाले. या सर्व ठिकाणी पी. ए. इनामदार संगणक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
 पी. ए. इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युुकेशन सोसायटी), मुमताज सय्यद (अ‍ॅकॅडमीच्या संचालक) यांनी सहभागी प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षकांची परीक्षा घेऊन यशस्वी प्रशिक्षकांना पदके, प्रमाणपत्र देऊन पी. ए. इनामदार (अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युुकेशन सोसायटी) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नगररोड, विश्रांतवाडी परिसरात 16 ठिकाणी वीजचोरी उघड

0

power_big_10

पुणे, दि. 02 : नगररोड विभाग अंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 16 ठिकाणी 2 लाख 32 हजार रुपयांची वीजचोरी तर 5 ठिकाणी 1 लाख 97 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला.

नगररोड विभाग अंतर्गत नुकतीच वीजमीटरची विशेष तपासणी मोहीम झाली. यात नगररोड उपविभागात 11 ठिकाणी 1 लाख 20 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. वडगाव शेरी उपविभागात 2 ठिकाणी 3 हजारांची वीजचोरी तर 3 ठिकाणी 1 लाख 74 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर दिसून आला. विश्रांतवाडी उपविभागात 3 ठिकाणी 82 हजारांची वीजचोरी तर 2 ठिकाणी 23 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. वीजचोरी प्रकरणी कलम 135 अन्वये तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

——————————————————————-

वीजग्राहक दिनात 25 तक्रारी दाखल

पुणे, दि. 02 : महावितरणच्या दरमहा वीजग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात बुधवारी (दि. 2) पुणे परिमंडलातील विभागीय कार्यालयांत प्राप्त झालेल्या एकूण 25 पैकी 08 तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित 17 तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित उपविभाग कार्यालयांकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सर्व विभाग कार्यालयांत ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे.

‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने मोफत हृदयशस्त्रक्रिया मदत प्रकल्पातील दीनानाथ रूग्णालयातील रूग्ण बालकांची डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे घेणार भेट

0
पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने बालकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत हृदयशस्त्रक्रिया मदत प्रकल्पातील रूग्ण बालकांची डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीमधील कार्डियाक विभाग येथे हेमलकसा मधील रूग्ण बालकांना डॉ. आमटे दांपत्याच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष सुरेश अभ्यंकर यांनी दिली.
हृदयविकार झालेल्या बालकांसाठी मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याचा प्रकल्प ‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’ने हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत नवजात अर्भके, अल्पवयीन गरीब, गरजू बालके यांना या ‘हृदय शस्त्रक्रिया मदत प्रकल्पा’चा लाभ दिला जातो. हेमंत खिरे यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने दानशूर, देणगीदार, रुग्णालये, पालिका, सरकार अशांशी देखील संपर्क साधून मदत मिळवून दिली जाते. आतापर्यंत 26 बालकांवर या प्रकल्पांतर्गत हदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यातील 15 दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, 11 शस्त्रक्रिया यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत एकूण 26 लाख रूपये खर्च रोटेरियन विनय कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून करण्यात आला आहे.
या शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉ. धनंजय केळकर, डॉ. रणजीत जगताप, डॉ. संतोष जोशी, डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे यांनी सहकार्य केले. तर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉ. अपुर्वा शहा, डॉ. सिद्धार्थ गाडगे यांनी सहकार्य केले.
rsz_1logo-for-portal

54 व्या ‘राष्ट्रीय फार्मसी सप्ताहा’मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ला सर्वसाधारण विजेतेपद

0
पुणे:
54 व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहात झालेल्या स्पर्धांमध्ये सलग सहाव्या वर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा)’ ने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. हा सप्ताह ‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’ (आयपीए, पुणे शाखा) आणि पुण्यातील विविध फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. बी. सुरेश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी डॉ. एम. डी. कार्वेकर, डॉ. के. बंगारूराजन, डॉ. आत्माराम पवार, सचिन इटकर आणि प्रशांत हंबर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, सचिव लतिफ मगदूम, इरफान शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताहातील 15 स्पर्धांमधील 7 स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने जिंकल्या. तर 9 स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. पी. ए. इनामदार, लतिफ मगदूम, इरफान शेख, प्रा. व्ही. एन. जगताप यांनी आभार मानले.

पुणे महानगरपालिका व आय ई ई ई पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार

0

 

पुणे महानगरपालिका व इन्स्टिट्यूट ऑफ इलेकिट्रकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्स, पुणे यांच्यामध्ये आज

पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात सामंजस्य करार संपन्न झाला.

सामंजस्य कारावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तसेच

आय ई ई ई, पुणे संस्थेच्या सचिव मा. डॉ. सुरेखा देशमुख व संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक जी.एस. मनी यांनी

या संदर्भात मा. डॉ. सुरेखा देशमुख व प्राध्यापक जी.एस. मनी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या

अनुषंगाने पुणे शहरामध्ये वापरल्या जाणाèया विविध प्रकल्पातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबीमधील दर्जा व

मानांकनानुसार पडताळणी करणे व आवश्यकतेप्रमाणे सुचना करणे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाèया अभियंते व अधिकाèयांना नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व माहिती

देण्याबाबत सहकार्य केले जाईल.

स्मार्ट सिटी संदर्भातील विविध विषयाबाबत कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे

जागतिक स्तरावर अशा प्रकारची निवड होण्याकरिता भारतातील व जगातील इतर मोठ्या प्रमाणावर विविध

शहरांनी प्रयत्न केले होते. तथापि या निवड स्पर्धेत जागतिक स्तरावर सदर संस्थेनी पुणे शहराची निवड केली आहे.

अमेरिका स्थित असलेल्या जागतिक पातळीवरील आय ई ई ई या संस्थेनी पुणे शहराची निवड त्यांच्या

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पामध्ये एक संलग्न शहर म्हणून पुणे शहराची निवड केलेली असून पुणेकर नागरिकांसाठी

ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रसंगी सांगितले.

त्यामुळे स्थानिक स्तरावर कार्यरत असलेली आय ई ई ई पुणे या संस्थेनी पुणे महानगरपालिकेशी

भवितव्यात कार्यरत राहण्यासाठी आज सांमजस्य करारावर सह्या केल्या आहेत.

आय ई ई ई पुणे या संस्थेचे स्थानिक स्तरावरील सुमारे १५०० पेक्षा जास्त सदस्य कार्यरत आहेत व एकूण

२२ विद्यार्थी शाखा आणि ६ विशेष तंत्रशाखा कार्यरत आहेत.

मागील वर्षी या स्थानिक स्तरावरील संस्थेची जागतिक पातळीवर अत्यंत सकारात्मक दृष्ट्या कार्यरत

असलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे शहरातील जास्त रहदारी असलेले नो हॉकर्स म्हणून घोषित केलेल्या ४५ मुख्य रस्त्यांवरील तसेच

जास्त वर्दख व रहदारी असलेल्या १५३ चौकांमधील रस्ता पदपथावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे व या र स्त्यांचे व

चौकाचे लगत असलेल्या खाजगी मिळकतीमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम इ. व सर्व संबंधित

विभागामार्फत संयुक्त कारवाई बांधकाम विभागामार्फत चालू करण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत कारवाई करुन

स्टॉल १, हातगाडी ७३, पथारी ६३, नादुरुस्त वाहने ८, इतर ३६ अशा एकूण १८१ अनधिकृत व्यवसायधारकांवर कारवाई

करुन रस्ता, पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत.

Pune_anna295x200