Home Blog Page 3528

‘‘मंगळवारी लोकशाही दिनाचे आयोजन

0

सोमवार दिनांक ७/१२/२०१५ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त पुणे महानगरपालिकेस सुट्टी असल्यामुळे शासन

निर्णयानुसार माहे  डिसेंबर २०१५ मधील लोकशाही दिन मंगळवार दि. ८/१२/२०१५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळात

महापालिकेच्या मुख्य भवनात मा.महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारी संदर्भात आवश्यक नमूना प्रपत्र १ (ब) नमून्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

प्रकरणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती अर्जासह सादर कराव्यात. अर्ज सादर केल्यानंतर सुनावणी

प्रसंगी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

न्यायप्रविष्ठ बाबी, माहिती अधिकाराअंतर्गत सादर केलेले अर्ज, मनपा सेवकांच्या व अधिकारी यांचे संदर्भांतील अर्ज,

वारंवार एकाच विषयाचे येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. संबंधित खात्याने दिलेल्या अंतिम उत्तरासंदर्भांत

समाधान झाले नाही अथवा अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर अशा अर्जदारांनी दुसèया आठवड्यातील सोमवारी

सकाळी १० वाजता मा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे १ (कौन्सिल हॉल) येथे अर्जासह, आवश्यक कागदपत्रांसह

विभागीय लोकशाही दिनात संपर्क साधावा.

महापालिका मुख्य भवनातील लोकशाही दिनात प्रथमत: अर्ज करणारांनी परस्पर न येता प्रथम मनपाच्या क्षेत्रिय

उपायुक्त कार्यालयात महिन्यातील तिसèया सोमवारी आयोजीत केल्या जाणाèया लोकशाही दिनात सकाळी १० ते १२

या वेळात अर्ज सादर करावेत. क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयामार्फत एक महिन्यात कार्यवाही झाली नाही तर मनपा

मुख्य भवनात महिन्यातील पहिल्या सोमवारी लोकशाही दिनात अर्जासह उपस्थित रहावे. मनपा मुख्य भवनातील

लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास १५ दिवस अर्ज अगोदर करणे आवश्यक आहे.

अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :

१. महापालिका आयुक्त यांना उद्देशून अर्ज.

२. वरीलप्रमाणे अर्जास क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिन टोकन क्र. प्रत.

३. क्षेत्रिय उप आयुक्तांच्या उत्तराची प्रत.

४. अर्जासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी माहिती व जनसंपर्क कार्यालय,

पुणे महानगरपालिका येथे दिलेला अथवा पाठविलेला असणे आवश्यक आहे.

५. बांधकाम विषयक तक्रारी असल्यास अशा अर्जदारांनी आपले अर्ज मुख्य भवनातील पहिल्या मजल्यावरील

बांधकाम विभागामध्ये आपले अर्ज सादर करावेत.

६. वरील प्रमाणे बाबींची पूर्तता केली नाही .तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही.

७. कामाचे स्वरुप अथवा विभाग थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालय अथवा मनपा मुख्य भवनातील अन्य

विभागांचे स्तरांवर संबंधित असेल तर क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाहीत

नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in.या संकेत

स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००

झरी चित्रपटाचे पोस्टर अनावरण संपन्न

0

मुंबई – काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या आमदार नीलम गोह्रे यांनी विधानपरिषदेत विदर्भातील एका सवेंदनशिल समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता, जो अद्यापही सुटलेला नाही, त्याची दाहकता लक्षात घेता, लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी, सौ. राधा बिडकर निर्मित झरी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, नुकतेच झरी या चित्रपटाचे पोस्टर अनावरण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार नीलम गोह्रे, जोगेन्द्र कवाडे, राजेन्द्र गवई, आ.बळीराम सिरस्कर, आ.विनोद बंब, आ.रमेश शेंडगे, आ.नरसय्या अडाम, आ.लक्ष्मण तायडे, आ.सुभाष ठाकरे, माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे व अभिनेते अनंत जोग. मिलिंद शिंदे, तुकाराम बिडकर, निशा परुळेकर, नम्रता गायकवाड आणि अनिकेत केळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, खरोखरच झरी चित्रपट हा कौतुकास पात्र आहे कारण, गल्लाभरु व विनोदीपटांच्या लाटेत विदर्भातील सवेंदनशील विषयावर हा चित्रपट भाष्य करणारा आहे. महसुल राज्यमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले की, आज भारत स्वतंत्र होवुन इतकी वर्ष झाली तरी दुर्गम भागात मूलभूत सोयींचा अभाव आहे आणि या विषयावर असलेला झरी चित्रपट सर्वानाच प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, झरी चित्रपटातील लोकेशन, व्हराडी भाषा आणि विदर्भातील जटिल समस्या यांचा योग्य मिलाफ साधत लेखक- दिग्दर्शकाने चित्रपट माध्यमाचा प्रभावी आणि सुयोग्य वापर करत एका वास्तववादी आणि विदारक अशा सत्याचा परिचय समाजाला करून दिला आहे.

लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यावेळी म्हणाले की, आजही भारतात असे अनेक दुर्गम क्षेत्र आहेत, जिथल्या लोकांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आहे, गरीबी, अज्ञान, सुख सोयींचा अभाव व व्यवस्थेच्या नाकरतेपणामुळे दुर्गम भागातील लोक मुख्य प्रवाहात येऊच शकले नाहीत, त्यांचे शारीरिक शोषण करणारा वर्ग अस्तित्वात आहे, त्यांच्या स्त्रीयांचा भोग घेउन त्यांना कुमारी माता म्हणुन लाजिरवाणे जीणे जगण्यास भाग पाडत आहेत, परंतु परिस्थिती परिवर्तनशील असते, जेव्हा गुलाम पेटून उठतो, तेव्हाच गुलामगिरी भस्म होते या वास्तवाची जाणीव त्यांना होते व झरी च्या प्रतिनिधिक रुपात… एका क्रांतीला सुरुवात होते.

 

‘वजीर ‘ या आगामी हिंदी सिनेमाचे पहिले गाणे सादर …

0

‘वजीर ‘ या आगामी हिंदी सिनेमाचे पहिले गाणे काल मुंबईतील सबर्बन थिएटर मध्ये  सादर करण्यात आले यावेळी विनोद चोप्रा , फरहान अख्तर , आदिती राव , सोनू निगम , श्रेय घोशाल , आदी उपस्थित होते ..पहा फोटो

index index1 index2 index4 index5index6

‘दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील ‘रोटरी क्लब पुणे प्राईड’ च्या रक्तपेढीचे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन

0
index1 index2
पुणे :
‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’चे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झाले
. हा समारंभ शुक्रवार, दिनांक 4 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सौद बाहवान कक्ष, 8 वा मजला, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आला होता .
रोटरी इंटरनॅशनलचे माजी आंतर राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण बॅनर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , रोटरी 3131 चे प्रांतपाल सुबोध जोशी, मोहन पालेशा, डॉ.मंदा आमटे, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, रूग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते
‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’च्या उद्घटनानिमित्त सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजीव केतकर यांनी संयोजन केले
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने पुढाकार घेऊन उभारलेल्या या प्रकल्पामधे ‘रोटरी फौन्डेशन’चा आणि दक्षिण कोरियाच्या ‘रोटरी क्लब ऑफ सनराईज’चा मोठा सहभाग आहे. दरवर्षी 25,000 हून अधिक रुग्णांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे. याच ‘पुणे प्राईड क्लब’ने दीनानाथ रुग्णालयाला दूर अंतरावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक फिरते वाहनही दिले आहे. ‘रोग प्रतिबंध आणि उपाय’ या रोटरीच्या उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प उभारला आहे.
पुण्यातील सर्वात मोठी रक्तपेढी
————–
ही रक्तपेढी विद्यमान पेढीपेक्षा अडीच पटीने मोठी आहे. यामधे रक्ताचे विविध घटक वेगवेगळे करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आहेत. रक्ताची योग्य तपासणी करण्यासाठी आणि त्याचा मागोवा राखण्यासाठी सुविधा आहेत. 5,500 हजार चौरस फुटांहून अधिक जागा व्यापलेली ही पुण्यातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक रक्तपेढी आहे. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 6 महिन्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या रक्तपेढीत जमा करून प्रक्रिया केलेल्या रक्तापैकी काही भाग हा समाजातील गरीब वर्गातील रुग्णांसाठी मोफत किंवा कमी खर्चात उपलब्ध करून दिला जाईल.

यंदाचा १४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते २१ जानेवारी दरम्यान

0

piff1

पुणे  :  पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १४ ते २१ जानेवारी २०१६ दरम्यान होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून यंदाच्या महोत्सवासाठी प्राथमिक निवड प्रक्रिया प्रवेशासाठी १०४ पेक्षा जास्त देशातील तब्बल ९८६ चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर, एन.एफ.ए.आय चे संचालक प्रकाश मगदूम आणि डि. एस. के. एन्टरटेनमेंट चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज जगाला दहशतवादाची झळ बसत असताना केवळ ‘खेळ’ आणि ‘चित्रपट’ ही दोन अशी माध्यमे आहेत की ज्याद्वारे टोकाचे शत्रुत्व असलेले देशही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सलोखा वाढविण्याच्या दृष्टीनेच ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. या महोत्सवा दरम्यान जगभरातील अनेक देशांचे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

महोत्सवादरम्यान एकून १५ विभागांपेक्षा जास्त विभागात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ज्यामध्ये उद्घाटनपर चित्रपट, पुरस्कार्थींचे चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धात्मक विभाग, मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धात्मक विभाग (कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद एक पर्यटन स्थळ – बिवी का मकबरा), जागतिक चित्रपट, देश विशेष (कंट्री फोकस), विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप), खेळ व चित्रपट, मनुष्याचे अंतरंग (ह्युमन माईंडस्), साहित्य आणि चित्रपट, डीएसके अॅनिमेशन चित्रपट, बदलत्या महाराष्ट्रावरील लघुपट, सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचे मराठी चित्रपट (मराठी सिनेमा टुडे), फिल्म्स् डिव्हिजन माहितीपट, जेम्स फ्रॉम नॅशनल फिल्म्स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय), ट्रीब्युट, आशिया खंडामधील मधील चित्रपट अशा विभागांचा समावेश असेल.

यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ७ वेगवेगळ्या ठिकाणी या महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या बरोबर पिंपरी-चिंचवड येथील दोन स्क्रीन्सचा समावेश असेल.’’

महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांशी निगडीत विषयांवरील परिसंवाद आणि मिडीया सेंटरमध्ये होणारी दररोजची भारतीय व परदेशी मान्यवरांची मनोगते, मुलाखती ही नित्याची वैशिष्ट्ये याही वर्षी असणार आहेत.

महोत्सवात जागतिक स्पर्धात्मक विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ (१० लाख रुपये), ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्कार (५ लाख), मराठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागात ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट मराठी चित्रपट’ (रोख पुरस्कार ५ लाख रुपये) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट छायांकन यासाठी प्रत्येकी रु. २५ हजार असे रोख पुरस्कारही दिले जाणार आहेत.

फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर्स, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनीमुद्रण यासाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटास (भारत) १००० अमेरिकन डॉलर्स आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर्स अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धा’ पुरस्कार या विभागात कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद, एक पर्यटन स्थळ –बिवी का मकबरा या तीनही विभागासाठी प्रथम क्रमांकास रुपये १ लाख २५ हजार तर द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७५ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

याशिवाय एफटीआयआयच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मारिया प्रोशस्कोवा संस्थेतर्फे ‘पिफ स्पेशल अॅवॉर्ड’ (२५ हजार रुपये रोख) ही देण्यात येईल.

अधिकृत ओळखपत्र असलेल्या फिल्म क्लब सभासद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पिफ’च्या कॅटलॉगची किंमत रुपये ५०० असून इतर इच्छुकांसाठी ही किंमत रुपये ७०० इतकी असेल याची कृपया नोंद घ्यावी.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना आजपासून (४ डिसेंबर) www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोदंणी क्रमांकासोबत इच्छुकांना वरील ठिकाणांवर जाऊन स्पॉट रजिस्ट्रेशनही करावे लागेल हेही महत्वाचे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २९ डिसेंबरपासून सुरू होईल, असेही रवी गुप्ता यांनी सांगितले.

महाराष्ट्र इंस्टिट्युट  ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, भारती विद्यापीठ, डीएसके सपइन्फोकॉम संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विशेष सहकार्य यावर्षीच्या महोत्सवास प्राप्त होणार आहे.

महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ अंतर्गत मुळशीमध्ये एक दिवसात 1195 कामे

0

पुणे, दि. 04 : महावितरणच्या मुळशी विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये एका दिवसात विविध प्रकारचे 1195 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्णत्वास गेली. यात 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या तर 866 कामांमध्ये वीजदेयके व विविध ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.

महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रम मुळशी विभागातील (कंसात उपविभाग) लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर व गोरे बुद्गुक (मुळशी), कापुर ओहोळ (नसरापूर) या ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आला. या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये एकूण 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सोबतच 169 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 22 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 110 मीटरचे रिंडींग घेण्यात आले. 12 वीजग्राहकांच्या नावांत बदल करून देण्यात आला. वीजदेयकाबाबत तक्रारी दूर करण्यासाठी या कार्यक्रमात एकूण 325 कामे करण्यात आली.

याशिवाय वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 541 कामे पूर्ण करण्यात आली.

लोणीकंद येथील ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी लोणीकंदच्या सरपंच सौ. लक्ष्मी कंद, उपसरपंच श्री. सोपान कंद उपस्थित होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी लोणीकंद व थेऊन येथे भेट देऊन त्रिसुत्री कार्यक्रमातील विविध कामांची पाहणी केली व यावेळी त्यांनी महावितरणचे कर्मचारी व ग्राहकांशीही संवाद साधला.

त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री किरण सरोदे, राहुल डेरे, राजेंद्ग भुजबळ, कल्याण गिरी यांच्यासह प्रत्येक ग्रामपंचायतींध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 90 ते 95 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते. वीजयंत्रणा, नवीन वीजजोडणी, वीजदेयकांबाबत असलेल्या तक्रारी एकाच दिवशी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीत ‘त्रिसुत्री ‘ – महावितरणने मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये दर गुरुवारी त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेत काल झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद, उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना त्रिसुत्री कार्यक्रमाबाबत कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार यांनी माहिती दिली.

 महावितरणच्या त्रिसुत्री एक दिवसीय कार्यक्रमातील कामांची पाहणी करताना मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे व कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार.
महावितरणच्या त्रिसुत्री एक दिवसीय कार्यक्रमातील कामांची पाहणी करताना मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे व कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार.

“बंध नायलॉनचे” या सिनेमाच्या निमित्ताने जमली दोन मित्रांची जोडी !

0
मराठी सिनेसृष्टीत अनेक सेलिब्रेटिंच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकले आहेत. अशा सेलिब्रेटी मैत्रीची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मराठी सिनेसृष्टीत अशी मैत्री आपल्याला “बंध नायलॉनचे” या सिनेमाच्या निमित्ताने ऐकायला  मिळणार आहे. संगीतकार अमितराज आणि अवधूत गुप्ते अगदी चांगले मित्र आहेत. आणि याचं मैत्रीखातर अवधूत यांनी अमितराज संगीत देत असलेल्या बंध नायलॉनचे या सिनेमासाठी एक गाणं गायलं आहे.  होंडा स्टुडिओ येथे नुकतंच या सिनेमातील “कुणीतरी” हे गाणं अवधूतच्या सुरेल आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.
     सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया यांचा वापर  वाढत चाललेला आहे. टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा सिनेमा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमितराज आणि अवधूत हे दोघेही चांगले मित्र असले तरी या निमित्ताने दोघांनीही पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
      अवधुत  गुप्ते यांनी आतापर्यंत अनेक गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध केले आहे. त्यांच्या याचं आवाजाची जादू आपल्याला “कुणीतरी” या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे. “कुणीतरी” हे गाणं बंध नायलॉनचे या सिनेमातील एका परिस्थितीला अनुसरून असणारे आहे. अमितराज यांच्या संगीताची जादू आपण अनेक चित्रपटांमधून पाहतोच. अमितराज यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी सिनेसृष्टीपासून केली. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी विचारले असता, ” अमित राज हा गेल्या २० वर्षांपासूनचा मित्र आहे. आमचं क्षेत्र संगीतच होतं, मात्र वाटा वेगळ्या होत्या. मी मराठीत काम करीत होतो, तर अमित हिंदीत करीत होता. त्याच्या संगीतामध्ये मला बॉलीवूड स्टाईल जाणवते. त्याच्या सोबत हे गाणं करताना खूप चांगल वाटलं. एका चांगल्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतोय याचाही मला खूप आनंद आहे.”, तर अवधूतविषयी अमितराज यांना विचारले असता, “मी आणि अवधूत खूप चांगले मित्र असून त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायक आहे. जेव्हा गाणं लिहून पूर्ण झालं त्यावेळी हे गाणं अवधूतकडूनचं गाऊन घ्यायचं, असं आमचं ठरलं.  आधी मला थोडं टेन्शन आलं होतं.  मराठीतला नावाजलेला संगीतकार, एक चांगला दिग्दर्शक मी कंपोज  केलेलं गाणं गाणार आहे. पण गाणं गातेवेळी अवधूत मला फक्त एक गायकचं दिसला. अगदी स्मूथली त्याने हे गाणं गायलं आहे “
       जतिन वागळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि संवाद साधण्यावर विश्वास ठेवणारी पिढी यांची सुरेख गुंफण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिजी नायर आणि सुनील चंद्रिका नायर यांच्या झिरो हिट्स  या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध  नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा सिनेमा असून महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे , प्रांजल परब हे कलाकार आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून सिनेमाची गीते लिहिली आहेत. मानवी नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डीएसकें तर्फे ‘ डीएसके मास्टर प्लॅन’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन

0

पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स यांच्या ३ नव्या गृहप्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त दि. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ‘डीएसकेज् मास्टर प्लॅन’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात डीएसके शैलीतले ३ नवे प्रिमियम गृहप्रकल्प सादर करण्यात आले आहेत. आधुनिकता, तंत्रज्ञान आणि सुखसुविधा अशा सर्वच बाबतीत हे तीनही गृहप्रकल्प अव्वल श्रेणीचे आहेत. नव्या गृहप्रकल्पांचा शुभारंभ करताना ग्राहकांच्या फायद्याची वैशिष्ठ्यपूर्ण योजनाही सादर करणे ही डीएसकेंची परंपरा आहे. याच परंपरेला अनुसरून या प्रदर्शनातही ग्राहकांना फक्त सव्वा आठ वर्षात कर्जमुक्ती करणारी एक अभिनव कर्ज योजना सदर करण्यात आली आहे. या प्रदर्शनात घर बुक करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेत येईल. आतापर्यंत कुणीही दिलेली नसेल अशी हि अद्वितीय योजना असून या योजनेमुळे घर घेताना ग्राहकांवरील कर्जाचा भार अतिशय हलका होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन डी. एस. कुलकर्णी डेव्हपर्सच्या संचालिका सौ. हेमंती कुलकर्णी यांनी केले आहे.

उद्यम विकास सहकारी बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन संपन्न

0
बँकेने छोट्या व्यावसायिकांना ही कर्ज द्यावे-ना.गिरीश बापट यांची सूचना.
उद्यम बँकेच्या संचालाकांमुळे ही बँक आपली असल्याची कोथरूड करांची भावना-.शशिकांत सुतार.
केंद्र सरकारच्या विविध योजना राबविणाऱ्या उद्यम बँकेचे कार्य कौतुकास्पद-आ.मेधा कुलकर्णी.
index1 index2
पुणे-
उद्यम विकास सहकारी बँकेच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन पौड रोड,कोथरूड येथे ना.गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडले.यावेळी आ.प्रा.मेधा कुलकर्णी,मा.शशिकांत भाऊ सुतार,जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.
उद्यम बेंकेचे संचालक हे नितीमत्ता पाळतात,ते नातेवाईकांना कर्ज देत नाहीत,वाहन भत्ता किंवा इतर मानधन घेत नाहीत,यामुळेच ही बँक भरभराटीला आली असून या बँकेचा उत्कर्ष होईल व त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू असे उद्घाटक अन्न नागरी पुरवठा व संसदीय कार्य मंत्री .गिरीश बापट म्हणाले,बँकेने छोट्या व्यावसायिकांना ही कर्ज द्यावीत,अगदी दोन हजार,पाच हजार इतकी छोटी रक्कम मागणारे ही छोटे छोटे व्यावसायिक असून सहकारी बँकांनी त्यांना आधार दिला पाहिजे असे ही पालक मंत्र्यांनी स्पष्ट केले.मा.शशिकांत सुतार यांनी संचालक मंडळाचे कौतुक करताना सांगितले कि हे सर्व्संचालक सर्वसामान्यान कुटुंबातून आले असून कोथरूड भागात तळा गाळात काम करणारे कार्यकर्ते असून त्यांच्या माध्यमातून या परिसरात उद्यम बँकेच्या शाखेचे उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब असून या भागात जुन्या काळात एकाच सोनाराचे दुकान  होते ,मात्र  आज  कोथरूड परिसर व्यवसायाचे केंद्र बनले आहे,त्याचाच एक भाग म्हणून येथे अनेक सहकारी बँक झाल्या असल्या तरी उद्यम बँकेचे संचालक स्थानिक असल्याने कोथरूड कर त्यांना स्वीकारतील व बँक निश्चित प्रगती करेल.
आ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या “सचोटीने कारभार करून उद्यम बँकेने नावलौकिक मिळविले आहे,सहाव्या शाखेच्या उद्घाटना च्या माध्यमातून पंतप्रधान विमा योजना व अन्य शासकीय योजना ही सामान्य माणसा पर्यंत पोचविण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे.त्यास माझे सर्वतोपरी सहकार्य असेल,”
बँकेचे अध्यक्ष दिलीप उंबरकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडताना झीरो एन.पी.ए.असल्याचा उल्लेख केला व शून्य थकबाकी साठी बँकेस अनेक पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.तसेच बँकेस रिजर्व बँकेकडून सातत्याने अ दर्जा मिळाला असून आमच्या संचालक मंडळाने ३२ कोटी वरून बँकेचे ठेवी ८५ कोटी पर्यंत नेल्या असून पुढील कालावधीत १०० कोटी चे उद्दिष्ट्य पूर्ण करू असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप उंबरकर यांनी केले,कार्यकारी संचालक निरंजन फडके यांनी स्वागत,उपाध्यक्ष पी.के.कुलकर्णी यांनी आभार मानले.बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले.या वेळी कोथरूड परिसरातील विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पै आय. टी. ऑलिंपियाड’चे पारितोषिक वितरण संपन्न

0
index1
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै आय.टी ऑलिंपियाड’चे पारितोषिक वितरण नीरव कुलश्रेष्ठ (फर्स्ट फ्युएल सॉफ्टवेअर), अमिताव पाल (इन ओपन टेक्नॉलॉजी) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार होते. देशभर ऑनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पाचवे वर्षे होते. 149 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
कनिष्ठ गटात अमीना बुबरे (भिवंडी) प्रथम आली. हतीम ताहेरी सैफी द्वितीय तर स्वरीत बिडवलकर तृतीय आला. वरिष्ठ गटात रहमतुल्ला उमराणी महंमद प्रथम आला. सानिया शेख द्वितीय, महमदी नदीम मणियार तृतीय आली.
केएमईएस इंग्लिश मीडियम हायस्कूल (भिवंडी) हे कनिष्ठ गटात विजेते ठरले, तर ‘अ‍ॅग्लो उर्दू हायस्कूल’ वरिष्ठ गटात विजेते ठरले. त्यांना आय.टी. ऑलिंपियाडचा फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच विजेत्यांना आयपॅड, टॅब्लेट भेट देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी मोहन गिरी (बीएसएनएल), संदीप पाठक, उदय सोनवणे, इरफान शेख, आबेदा इनामदार उपस्थित होते. प्रा.ऋषी आचार्य यांनी सूत्रसंचालन केले.

आय.एम.ई.डी. मध्ये ‘व्यवस्थापनातील अकौटिंग, ऑडिटिंग’ विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

0
index1
पुणे:
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आय.एम.ई.डी.) च्या वतीने ‘सार्क ग्रुप ऑफ नेशन’ मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमातील ‘अकाऊंटींग, ऑडिटींग, गव्हर्नन्स अ‍ॅण्ड कन्टेपरी इश्यू इन मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ही परिषद गुरुवारी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड येथे झाली असून, या परिषदेला एम.बी.ए., एम.सी.ए. च्या अभ्यासक्रमाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. ‘व्यवस्थापनशास्त्र शाखेचे’ अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. महेश जोशी (आर.एम.आय.टी. विद्यापीठ, मेलबर्न) यांनी बीजभाषण केले. ‘संशोधकांनी आपल्या अभ्यास विषयात लेखन चांगल्या जर्नल्स्मध्ये प्रसिद्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. संशोधनातील संधींवर डॉ.जी.एस.बात्रा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी ही मार्गदर्शन केले. डॉ. किर्ती गुप्ता यांनी आभार मानले.

व्हिट्स लक्झरी हॉटेलकडून पुण्यात ‘द क्लब ऑर्चीड’चे अनावरण

0

हॉटेल उदयोगातील एक मानांकित हॉटेलची संखला असलेल्या व्हिट्स लक्झरी हॉटेल द्वारा पुण्यात ‘द क्लब ऑर्चीड’चे अनावरण करण्यात आले. ११ एकर परिसरात पसरलेल्या हा क्लब फक्त सभासदांसाठीच उपलब्ध असणार आहे. हा एक उच्च दर्जाचा क्लब असून या ठिकाणी फ्यूजन प्रिमीयम, आरोग्य,  आहार, साहसी खेळ, यांची मेजवानी अनुभवता येईल. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना स्नूकर/ पुल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, स्पा, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ आणि अन्य गेमिंग मशिनचा अनुभव घेता येईल. 

2

ऑर्चीड क्लब काही टप्प्यात कार्यान्वीत होणार आहे. पंरतू सध्या सभासदांना काही ठिकाणी त्वरीत प्रवशे मिळू शकतो.  ऑर्चीड क्लबचे सदस्य जेवणाच्या ठिकाणी विशेष सवलत प्राप्त करू शकतात. या विशेष सवलतीचा फायदा सभासद घेऊ शकतात. क्लब ऑर्चीडच्या ‘द बॉऊलेर्ड कॉफी शॉप’ आणि ‘द अटिर्म कॉफी शॉप’मध्ये ३० टक्के सवलत प्राप्त होईल. या पॅकजच्या अंतर्गत सदस्यांना २ रूम एका रात्रीसाठी  व्हिट्स लक्झरी हॉटेल पुणे इथे मोफत मिळू शकते. यामध्ये सदस्यांच्या कुटुंबियांचा समावेश असेल, ज्यात पती-पत्नी आणि दोन मुले सहभागी होऊ शकतील

या क्लबच्या दुसऱ्या टप्यात ग्रंथालय आणि वाचनालयाचा, कार्ड रूम, इनडोअर बॅडमिंटन कोर्ट तसेच आरोग्याच्या दुष्टीने योगा आणि एरोबिकच्या वर्गाचा समावेश असेल. क्लबमधील खेलाचे वातावरण उत्साही ठेवण्यासाठी या ठिकाणी फुटबॉल/ क्रिकेट ग्राऊंडचा समावेश असेल जे संपुर्ण नेटने झाकलेले असेल. या ठिकाणी गो कार्ट ट्रेकचा अनुभवही घेता येईल. या ठिकाणी क्लबचे रेस्टॉरंट आणि बारचा समावेश असेल विशेष क्लबच्या दराने जिथे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याची सोयही असेल.

व्हिट्स लक्झरी हॉटेल्स सध्या १० ठिकाणी कार्यान्वित असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, भूवनेश्वर, नाशिक, लातूर, तिरूपूर, अंकालेश्वर, कुंडापूर, आणि बेल्लारी इथे शाखा आहेत. या हॉटेल श्रुखंलेद्वारा ९०० खोल्यांसह बॅन्केव्ट, कॉन्फरंस रूम, रेस्टॉरंट, आणि लाईफस्टाईलच्या सुविधा पुरवते. व्हिट्स लवकरच मुंबई, चाकण, नांदेड, सुरत, दहेज, अहमदबाद, चंद्रपुर आणि मंगळूरू या ठिकाणी शाखा सुरू करून देशभर पोहचण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये १५ जागांचा समावेश असून द्वितीय दर्जा आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरात येत्या तीन वर्षात या हॉटेलच्या सुविधा कार्यान्वित होतील.

सर्व नव्या शाखा ह्या फ्रेचाईझी तत्वाने कार्य करतील. सध्या व्हिट्स लक्झरी हॉटेल आपल्या सेवेत ४०० खोल्यांचा समावेश करत असून या सोबतच बेन्केवॅटींग आणि रेस्टॉरंटची सुविधा असणार आहे. व्हिट्स सध्या माफक दरात आपल्या सेवा पुरवत असून ग्राहकांना सर्व ठिकाणी इतर हॉटेल्सच्या तुलनेत ७८ % दरात सेवा मिळतील.

कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडने KHIL अत्यंत समर्थपणे आपल्या पाच ब्रँडची स्थापना केली आहे. यात द ऑर्चीड, एन इकोटेल हॉटेल (5 Star), व्हिटस लक्झरी हॉटेल (4 Star) गंभ हॉटेल, लोट्स रेस्टोरंट, आणि विठ्ठल कामत ओरिजनल फॅमिली रेस्टोरंटचा समावेश आहे. KHIL यांनी गेल्या आर्थीक वर्षात १३९.३१ कोटीचा व्यवहार केला असून या वर्षी हा व्यवहार १५२ कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.

क्लब ऑर्चीड, व्हिट्स लक्झरी हॉटेल, छत्रपती शिवाजी क्रिडा भवनाजवळ, पुणे बंगळूरू हायवे, बालेवाडी, पुणे ४११०४५

ऑर्चीडच्या सदस्य बनण्यासाठी कॉल करा – +91-8422970165 / +91-08422971064

Email :-  agmclub@orchidvitshotels.com / salesclub@orchidvitshotels.com

पहा ‘नटसम्राट’ चा ट्रेलर

0

नव्या वर्षाचे मराठी सिनेसृष्टीचे सर्वात मोठ्ठे आकर्षण

रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका ‘ नटसम्राट’

0

 

अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर

01 02

“कुणी घर देता का रे घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’.

विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर हे मुख्य पात्र रंगभूमीवर साकारलं होतं ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी. अप्पासाहेबांची ही भूमिका करायला मिळावी हे त्याकाळातही आणि आजही प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्नच. डॉ. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर आणि राजा गोसावी यांच्याही वाट्याला ही भूमिका आली. आजही अभिनयाचं परिमाण म्हणून या भूमिकेकडे बघितलं जातं. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक आता रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या माध्यमातून. आपला दमदार आवाज आणि अभिनयसंपन्नतेच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारत आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निर्मिती करणा-या झी स्टुडिओज् या संस्थेमार्फत ‘नटसम्राट’ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका शानदार सोहळ्यात सादर करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर, महेश मांजरेकर, अभिनेते विक्रम गोखले, झी स्टुडिओजचे प्रमुख नितीन केणी, व्यवसाय प्रमुख निखिल साने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

704051

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “ नटसम्राट ज्यावेळी पहिल्यांदा रंगभूमीवर आलं म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी त्यावेळी मी मी साधारणपणे वयाच्या विशीत होतो. डॉ. लागूंच्या प्रभावी अभिनयाने आणि नटसम्राट नाटकाने त्यावेळी प्रत्येकाला डंख मारला होता आणि त्या डंखाची नशा ती झिंग नकळतपणे आमच्यात भिनली होती. त्या काळी नटसम्राटची सर्व स्वगते मला मुखोद्गत होती. नटसम्राट करायला मिळावं हे स्वप्न तेव्हापासूनच जपलं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालंय. या निमित्ताने ती सारी झिंग बाहेर पडली याचा मनापासून आनंद आहे. तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) यांची भाषा हे या नाटकाचं सर्वात मोठं बलस्थान. सामान्य माणसालाही भावणा-या आणि त्याच्या काळजाला भिडणा-या या भाषेमुळेच हे नाटक अभिजात कलाकृती म्हणून ओळखल्या गेलं. माझ्या मते नटसम्राट हे नाटक करणं फार त्रासदायक काम होतं. ती भूमिका त्या पद्धतीने जगून, प्रत्येक प्रयोगात विविध पद्धतीने समजून घेऊन डॉ. लागू ज्या प्रकारे सादर करायचे ते खूप आव्हानत्मक काम होतं. पुढे दत्ता भट, सतीश दुभाषी शेवटच्या काळात चंद्रकांत गोखले यांनी ते सादर केलं. या सर्वांचं यातलं योगदान खूप मोठं आहे. आता ही भूमिका चित्रपटाच्या रूपाने माझ्या वाट्याला आली हे मी माझं भाग्य समजतो.”

6

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, “मी नटसम्राट नाटक रंगभूमीवर बघितलं नव्हतं परंतू ते पुस्तक वाचल्यानंतर त्याबद्दलची एक उत्सुकता मनात तयार झाली आणि यावर आधारित चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. या भूमिकेसाठी नानाशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्याचा विचार मनाला शिवला नाही कारण अप्पासाहेबांसारखी ताकदीची भूमिका साकारण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच अभिनय, देहबोली, भाषेवरचं प्रभुत्व, आवाजातील चढ उतार आणि मुळात म्हणजे नाटकावरचं आणि भूमिकेवरचं प्रेम हे सर्व काही नानामध्ये आहे. त्यामुळे या भूमिकेला नानाशिवाय इतर कुणी एवढ्या चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकणार याबद्दलची खात्री मनात होती.”

34

‘नटसम्राट’ या नाटकाची ओळख ठरली ती याची संहिता आणि अभिनयसंपन्नता. अप्पासाहेब बेलवलकरांसोबतच त्यांची पत्नी कावेरीचं पात्रही यात तेवढंच दमदार आणि महत्त्वाचं होतं. रंगभूमीवर ज्युलियस सिझर, ऑथेल्लो, सुधाकर, हॅम्लेट अशी एकाहून एक सरस पात्र ज्याने लीलया साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली त्या नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा. अभिनयाची कारकीर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा.. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे नटसम्राट हे नाटक. याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येतेय अतिशय भव्य रूपात. यातील अप्पासाहेबांच्या भूमिकेकडे प्रत्येक अभिनेता शिवधनुष्य म्हणूनच बघतो आणि या भूमिकेचे कंगोरेही एवढे आहेत की ती प्रत्येकालाच साकारायला जमणं तसं अवघडंच. प्रसिद्धीच्या झोतात असताना चेह-यावर येणारा तो रूबाब आणि ती रया गेल्यानंतर चेह-यावर आलेली विषण्णता, जवळच्या लोकांनी दूर लोटल्यानंतर आयुष्यात आलेली हतबलता या सर्व गोष्टी समर्थपणे दाखवणं हे मोठं आव्हानचं. डॉ. लागू यांनी साकारलेली ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. हीच भूमिका आता चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे नाना पाटेकरांसारख्या तेवढ्याच ताकदीच्या अभिनेत्याच्या अभिनयातून.

अप्पासाहेब बेलवलकरांइतकीच महत्त्वाची असलेली त्यांची पत्नी कावेरीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी. याशिवाय चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हेही एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनी विक्रम गोखले आणि नाना पाटेकर हे दोन दिग्गज अभिनेते रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. याव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, नेहा पेंडसे, अजित परब आणि जयवंत वाडकर या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे यांची असून संवाद किरण यज्ञोपवित आणि अभिजीत देशपांडे यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय परेश मांजरेकर यांनी तर कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांचे आहे तर छायाचित्रण केलंय अजित व्ही. रेड्डी यांनी. या चित्रपटात दोन गाणी असून ती अजित परब यांनी संगीतबद्ध केली आहेत.

फिनक्राफ्ट मिडिया, गजानन चित्र आणि ग्रेट मराठा यांची निर्मिती असलेला हा ‘नटसम्राट’ येत्या १ जानेवारीला झी स्टुडिओजच्या माध्यमातून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने

0

पुणे-

भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर आणि भारतीय जनता पार्टी  पुणे कॅनटोन्मेन्ट बोर्ड विभागाच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रवक्ते नवाब मलिक यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करून  पुणे लष्कर भागात भोपळे चौकात त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली  .  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर  अध्यक्ष मनिषभाऊ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . यावेळी पुणे कॅनटोन्मेन्ट बोर्ड नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक अतुल गायकवाड , जयप्रकाश पुरोहित , संतोष इंदुरकर , सतीश गायकवाड , सुखदेव अडागळे , नितीन राख , संजय व्हावळ , राजू जारखंडे, दीपक शिंदे , सुहास गायकवाड ,किरण क्षीरसागर , अशोक खंडागळे , विश्वास घोलप , संदीप जांभळे , दिनेश नायकु , किशोर शिंगवी ,महेद्र भोज , दीपक कुराडे , अमित वोरा , प्रवीण जाधव , ईश्वर कांकलिया , मामा शिवले , गणेश यादव , प्रसाद कांबळे , समीर शेख , राहुल सोनवणे, सुखदेव वाघमारे , तुषार मंत्री , संतोष कांबळे  आदी मान्यवर सहभागी झाले होते .

  यावेळी  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर  अध्यक्ष मनिष साळुंके यांनी सांगितले कि , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रवक्ते नवाब मलिक यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला . बिनबुडाचे आरोप करू नका , अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही , तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला . यावेळी अन्य मान्यवरांनी निषेधात्मक भाषणे केली . या आंदोलनाचा समारोप सुखदेव अडागळे यांच्या भाषणाने झाला .