भारतीय राजकारणावर नेमके पद्धतीने भाष्य करणारा शासन सिनेमा प्रेम, महत्वाकांक्षा या भावनां देखील मार्मिकरित्या मांडल्या आहेत. या सिनेमात प्रेम आणि महत्त्वाकांक्षेच्या भावविश्वाची नाजूक गुंफण पाहायला मिळणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री मनवा नाईक यांचे हळुवार फुलत जाणारे ‘प्रेम’ शासन मध्ये पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने हि दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील. राजकारणात येण्याचे स्वप्न बाळगणा-या तरुण युवकाची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली असून मनवा नाईकने सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कंपनीच्या कामगार संघटनेचा प्रमुख असणा-या जितेंद्रची आणि मनवामध्ये खुलणारे प्रेम आणि वेळेनुरूप त्याचे बदलणारे महत्व सिनेमात अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहे. प्रेम आणि महत्वाकांक्षा याच्यातील यात नेमकं काय जिंकतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ जानेवारी पर्यंतची वाट हवी लागणार आहे. श्रेया फिल्म्सचे निर्माते शेखर पाठक यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला शासन सिनेमा सामान्य माणसाच्या राजकारणातील मानसिकतेचा वेध घेतला आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘मँगो डॉली’ला पाहून प्रेक्षक म्हणतील वाह ‘गुरु’
गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की उर्मिला कानिटकर- कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आल्या शिवाय रहात नाही. दुनियादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहत्यांना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉईश नंदिनीने प्रेक्षकांची झोपचं उडवली. आता तर उर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्मिती असलेला ‘गुरु’ सिनेमा २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात उर्मिलाचा नुसताच वेगळा रोल नाहीये तर तिचा हटके मेक ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरीच्या ‘सनग्लासेस’ च्या स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच उर्मिला तिच्या जबरदस्त लुकमुळे रॉकऑन झालीये. तिने ‘गुरु’ सिनेमात साकारलेली ‘मँगो डॉली’ तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पहिली नसेल. ‘गुरु’ मधील तिचा रावडी लुक तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल यात शंका नाही. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा चोळीचा पेहराव आणि एकंदरच तिने वठवलेली भूमिका पाहून वाह ‘गुरु’ म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतील. म्हणण्याची मध्ये तिची चौकटीच्या बाहेर भूमिका असणार आहे.
व्हायब्रंट भव्य चित्र प्रदर्शनाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद
‘ग्रामीण भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाकडे लक्ष देण्याची गरज’ ‘स्टार्स फोरम’च्या 6 व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
‘एस ए ई इंडिया’ च्या वतीनेआयोजित ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’चे उद्घाटन 240 विद्यार्थ्यांचा सहभाग
भोसरी एमआयडीसीमध्ये 10 लाखांची वीजचोरी उघड
पुणे, : भोसरी एमआयडीसीमधील शिरभाते इंडस्ट्रीजमध्ये 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमध्ये प्लॉट क्र. 232, सेक्टर 7 मधील मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत फेरफार केल्याचे दिसून आल्यानंतर वीजमीटर व सीटी यंत्रणा (करंट ट्रान्सफार्मर) पंचनामा करून जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीत वीजमीटर व सीटी यंत्रणेत वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर तांत्रिक फेरफार केल्याचे आढळून आले. यात 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप गिरी, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजच्या जागेचे मालक सुनील येडे, वीजवापरकर्ते जाकीर शेख, शशिकांत प्रकाश निकम, इरफान शेख, फुलचंद रामदुलार विश्वकर्मा आदी सहा जणांविरुद्ध बुधवारी (दि. 2) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर विभागातील महावितरणच्या ‘त्रिसुत्री’मध्ये दिवसभरात 890 कामे
पुणे, : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमात मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्ती व वीजसेवेबाबत विविध 890 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्ण करण्यात आली.
मंचर विभागातील खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) व बल्लाळवाडी (आळेफाटा उपविभाग) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी 890 वीजविषयक विविध कामे करण्यात आली. यात 389 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीमध्ये वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्र देखभाल, नवीन वीजखांब, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामांचा समावेश आहे. वीजसेवेमध्ये वीजदेयकांची दुरुस्ती, रिडींग घेणे, मीटर बदलणे आदी 462 कामे करण्यात आली तर 39 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. या पाच ग्रामपंचायतींमध्ये ‘त्रिसुत्री’मधील कामांच्या अंमलबजावणीसाठी मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर तसेच 224 अभियंते, कर्मचारी सहभागी झाले होते.
महावितरणच्या त्रिसुत्री कार्यक्रमाचे येत्या गुरुवारी (दि. 10) गावडेवाडी (मंचर), गंगापूर व पिंपळगाव (घोडेगाव), खिरेश्वर (आळेफाटा), कुसुर (जुन्नर) व निमगाव सावा (नारायणगाव उपविभाग) या पाच ग्रामपंचायतींमध्ये आयोजन करण्यात आले आहे
आर. माधवन बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता आर. माधवन आगामी स्पोर्टस बेस्ड सिनेमासाठी कसून तयारी करत असून लवकरच तो प्रेक्षकांना नव्या अवतारात दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये सध्या खेळांवर आधारित सिनेमांचा ट्रेन्ड असून विविध खेळांवर आधारित अनेक सिनेमे येत आहेत. यातील बरेचसे सिनेमे हे खेळांडूंच्या जीवनावर बेतलेले आहेत. क्रिड’ सिनेमातून सॅल्वेस्टर स्टॅलनने रॉकी सीरीज मध्ये पदार्पण कार्नर आहे. ‘क्रिड’ सिनेमात सॅल्वेस्टर स्टॅलनने साकारलेल्या प्रशिक्षकाची भूमिका केली आहे तर साल खडूस मध्ये माधवन प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांचा हा सिनेमा असून दोघेही या सिनेमासाठी चांगलेच उत्साहित आहेत. माधवनने यापूर्वी चॉकलेट बॉयच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता त्याला नव्या सिनेमात आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. माधवनसोबत या सिनेमात भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन रितीका सिंग ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘‘मंगळवारी लोकशाही दिनाचे आयोजन
सोमवार दिनांक ७/१२/२०१५ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त पुणे महानगरपालिकेस सुट्टी असल्यामुळे शासन
निर्णयानुसार माहे डिसेंबर २०१५ मधील लोकशाही दिन मंगळवार दि. ८/१२/२०१५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळात
महापालिकेच्या मुख्य भवनात मा.महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संदर्भात आवश्यक नमूना प्रपत्र १ (ब) नमून्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
प्रकरणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती अर्जासह सादर कराव्यात. अर्ज सादर केल्यानंतर सुनावणी
प्रसंगी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
न्यायप्रविष्ठ बाबी, माहिती अधिकाराअंतर्गत सादर केलेले अर्ज, मनपा सेवकांच्या व अधिकारी यांचे संदर्भांतील अर्ज,
वारंवार एकाच विषयाचे येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. संबंधित खात्याने दिलेल्या अंतिम उत्तरासंदर्भांत
समाधान झाले नाही अथवा अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर अशा अर्जदारांनी दुसèया आठवड्यातील सोमवारी
सकाळी १० वाजता मा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे १ (कौन्सिल हॉल) येथे अर्जासह, आवश्यक कागदपत्रांसह
विभागीय लोकशाही दिनात संपर्क साधावा.
महापालिका मुख्य भवनातील लोकशाही दिनात प्रथमत: अर्ज करणारांनी परस्पर न येता प्रथम मनपाच्या क्षेत्रिय
उपायुक्त कार्यालयात महिन्यातील तिसèया सोमवारी आयोजीत केल्या जाणाèया लोकशाही दिनात सकाळी १० ते १२
या वेळात अर्ज सादर करावेत. क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयामार्फत एक महिन्यात कार्यवाही झाली नाही तर मनपा
मुख्य भवनात महिन्यातील पहिल्या सोमवारी लोकशाही दिनात अर्जासह उपस्थित रहावे. मनपा मुख्य भवनातील
लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास १५ दिवस अर्ज अगोदर करणे आवश्यक आहे.
अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :
१. महापालिका आयुक्त यांना उद्देशून अर्ज.
२. वरीलप्रमाणे अर्जास क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिन टोकन क्र. प्रत.
३. क्षेत्रिय उप आयुक्तांच्या उत्तराची प्रत.
४. अर्जासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी माहिती व जनसंपर्क कार्यालय,
पुणे महानगरपालिका येथे दिलेला अथवा पाठविलेला असणे आवश्यक आहे.
५. बांधकाम विषयक तक्रारी असल्यास अशा अर्जदारांनी आपले अर्ज मुख्य भवनातील पहिल्या मजल्यावरील
बांधकाम विभागामध्ये आपले अर्ज सादर करावेत.
६. वरील प्रमाणे बाबींची पूर्तता केली नाही .तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही.
७. कामाचे स्वरुप अथवा विभाग थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालय अथवा मनपा मुख्य भवनातील अन्य
विभागांचे स्तरांवर संबंधित असेल तर क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाहीत
नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in.या संकेत
स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००
झरी चित्रपटाचे पोस्टर अनावरण संपन्न
मुंबई – काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या आमदार नीलम गोह्रे यांनी विधानपरिषदेत विदर्भातील एका सवेंदनशिल समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता, जो अद्यापही सुटलेला नाही, त्याची दाहकता लक्षात घेता, लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी, सौ. राधा बिडकर निर्मित झरी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, नुकतेच झरी या चित्रपटाचे पोस्टर अनावरण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार नीलम गोह्रे, जोगेन्द्र कवाडे, राजेन्द्र गवई, आ.बळीराम सिरस्कर, आ.विनोद बंब, आ.रमेश शेंडगे, आ.नरसय्या अडाम, आ.लक्ष्मण तायडे, आ.सुभाष ठाकरे, माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे व अभिनेते अनंत जोग. मिलिंद शिंदे, तुकाराम बिडकर, निशा परुळेकर, नम्रता गायकवाड आणि अनिकेत केळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, खरोखरच झरी चित्रपट हा कौतुकास पात्र आहे कारण, गल्लाभरु व विनोदीपटांच्या लाटेत विदर्भातील सवेंदनशील विषयावर हा चित्रपट भाष्य करणारा आहे. महसुल राज्यमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले की, आज भारत स्वतंत्र होवुन इतकी वर्ष झाली तरी दुर्गम भागात मूलभूत सोयींचा अभाव आहे आणि या विषयावर असलेला झरी चित्रपट सर्वानाच प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, झरी चित्रपटातील लोकेशन, व्हराडी भाषा आणि विदर्भातील जटिल समस्या यांचा योग्य मिलाफ साधत लेखक- दिग्दर्शकाने चित्रपट माध्यमाचा प्रभावी आणि सुयोग्य वापर करत एका वास्तववादी आणि विदारक अशा सत्याचा परिचय समाजाला करून दिला आहे.
लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यावेळी म्हणाले की, आजही भारतात असे अनेक दुर्गम क्षेत्र आहेत, जिथल्या लोकांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आहे, गरीबी, अज्ञान, सुख सोयींचा अभाव व व्यवस्थेच्या नाकरतेपणामुळे दुर्गम भागातील लोक मुख्य प्रवाहात येऊच शकले नाहीत, त्यांचे शारीरिक शोषण करणारा वर्ग अस्तित्वात आहे, त्यांच्या स्त्रीयांचा भोग घेउन त्यांना कुमारी माता म्हणुन लाजिरवाणे जीणे जगण्यास भाग पाडत आहेत, परंतु परिस्थिती परिवर्तनशील असते, जेव्हा गुलाम पेटून उठतो, तेव्हाच गुलामगिरी भस्म होते या वास्तवाची जाणीव त्यांना होते व झरी च्या प्रतिनिधिक रुपात… एका क्रांतीला सुरुवात होते.
‘दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील ‘रोटरी क्लब पुणे प्राईड’ च्या रक्तपेढीचे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन
यंदाचा १४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते २१ जानेवारी दरम्यान
पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १४ ते २१ जानेवारी २०१६ दरम्यान होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून यंदाच्या महोत्सवासाठी प्राथमिक निवड प्रक्रिया प्रवेशासाठी १०४ पेक्षा जास्त देशातील तब्बल ९८६ चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर समर नखाते, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर, एन.एफ.ए.आय चे संचालक प्रकाश मगदूम आणि डि. एस. के. एन्टरटेनमेंट चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज जगाला दहशतवादाची झळ बसत असताना केवळ ‘खेळ’ आणि ‘चित्रपट’ ही दोन अशी माध्यमे आहेत की ज्याद्वारे टोकाचे शत्रुत्व असलेले देशही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सलोखा वाढविण्याच्या दृष्टीनेच ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. या महोत्सवा दरम्यान जगभरातील अनेक देशांचे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
महोत्सवादरम्यान एकून १५ विभागांपेक्षा जास्त विभागात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ज्यामध्ये उद्घाटनपर चित्रपट, पुरस्कार्थींचे चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धात्मक विभाग, मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धात्मक विभाग (कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद एक पर्यटन स्थळ – बिवी का मकबरा), जागतिक चित्रपट, देश विशेष (कंट्री फोकस), विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप), खेळ व चित्रपट, मनुष्याचे अंतरंग (ह्युमन माईंडस्), साहित्य आणि चित्रपट, डीएसके अॅनिमेशन चित्रपट, बदलत्या महाराष्ट्रावरील लघुपट, सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचे मराठी चित्रपट (मराठी सिनेमा टुडे), फिल्म्स् डिव्हिजन माहितीपट, जेम्स फ्रॉम नॅशनल फिल्म्स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय), ट्रीब्युट, आशिया खंडामधील मधील चित्रपट अशा विभागांचा समावेश असेल.
यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये ७ वेगवेगळ्या ठिकाणी या महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या बरोबर पिंपरी-चिंचवड येथील दोन स्क्रीन्सचा समावेश असेल.’’
महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांशी निगडीत विषयांवरील परिसंवाद आणि मिडीया सेंटरमध्ये होणारी दररोजची भारतीय व परदेशी मान्यवरांची मनोगते, मुलाखती ही नित्याची वैशिष्ट्ये याही वर्षी असणार आहेत.
महोत्सवात जागतिक स्पर्धात्मक विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ (१० लाख रुपये), ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्कार (५ लाख), मराठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागात ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट मराठी चित्रपट’ (रोख पुरस्कार ५ लाख रुपये) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट छायांकन यासाठी प्रत्येकी रु. २५ हजार असे रोख पुरस्कारही दिले जाणार आहेत.
फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर्स, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनीमुद्रण यासाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटास (भारत) १००० अमेरिकन डॉलर्स आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर्स अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धा’ पुरस्कार या विभागात कोकण बीचेस आणि स्कुबा डायव्हिंग, वाईल्ड लाईफ ऑफ विदर्भ – ताडोबा आणि औरंगाबाद, एक पर्यटन स्थळ –बिवी का मकबरा या तीनही विभागासाठी प्रथम क्रमांकास रुपये १ लाख २५ हजार तर द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७५ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय एफटीआयआयच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मारिया प्रोशस्कोवा संस्थेतर्फे ‘पिफ स्पेशल अॅवॉर्ड’ (२५ हजार रुपये रोख) ही देण्यात येईल.
अधिकृत ओळखपत्र असलेल्या फिल्म क्लब सभासद आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पिफ’च्या कॅटलॉगची किंमत रुपये ५०० असून इतर इच्छुकांसाठी ही किंमत रुपये ७०० इतकी असेल याची कृपया नोंद घ्यावी.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना आजपासून (४ डिसेंबर) www.piffindia.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोदंणी क्रमांकासोबत इच्छुकांना वरील ठिकाणांवर जाऊन स्पॉट रजिस्ट्रेशनही करावे लागेल हेही महत्वाचे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २९ डिसेंबरपासून सुरू होईल, असेही रवी गुप्ता यांनी सांगितले.
महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, भारती विद्यापीठ, डीएसके सपइन्फोकॉम संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विशेष सहकार्य यावर्षीच्या महोत्सवास प्राप्त होणार आहे.
महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ अंतर्गत मुळशीमध्ये एक दिवसात 1195 कामे
पुणे, दि. 04 : महावितरणच्या मुळशी विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये एका दिवसात विविध प्रकारचे 1195 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्णत्वास गेली. यात 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या तर 866 कामांमध्ये वीजदेयके व विविध ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.
महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रम मुळशी विभागातील (कंसात उपविभाग) लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर व गोरे बुद्गुक (मुळशी), कापुर ओहोळ (नसरापूर) या ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आला. या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये एकूण 329 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सोबतच 169 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 22 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 110 मीटरचे रिंडींग घेण्यात आले. 12 वीजग्राहकांच्या नावांत बदल करून देण्यात आला. वीजदेयकाबाबत तक्रारी दूर करण्यासाठी या कार्यक्रमात एकूण 325 कामे करण्यात आली.
याशिवाय वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 541 कामे पूर्ण करण्यात आली.
लोणीकंद येथील ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोणीकंदच्या सरपंच सौ. लक्ष्मी कंद, उपसरपंच श्री. सोपान कंद उपस्थित होते. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी लोणीकंद व थेऊन येथे भेट देऊन त्रिसुत्री कार्यक्रमातील विविध कामांची पाहणी केली व यावेळी त्यांनी महावितरणचे कर्मचारी व ग्राहकांशीही संवाद साधला.
त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री किरण सरोदे, राहुल डेरे, राजेंद्ग भुजबळ, कल्याण गिरी यांच्यासह प्रत्येक ग्रामपंचायतींध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 90 ते 95 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते. वीजयंत्रणा, नवीन वीजजोडणी, वीजदेयकांबाबत असलेल्या तक्रारी एकाच दिवशी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीत ‘त्रिसुत्री ‘ – महावितरणने मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये दर गुरुवारी त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेत काल झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद, उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना त्रिसुत्री कार्यक्रमाबाबत कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार यांनी माहिती दिली.


















