‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली तसेच यावेळी ‘त्रिशरण पंचशील’ प्रार्थनाही केली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपावर हेलिकॉप्टरने राज्य शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश देशाला दिला आहे. भारतीय संविधानाद्वारे त्यांनी आधुनिक भारताची मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता, बंधुता आणि एकात्मतेच्या बळावरच राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल.
समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शोषित, पिडीत यांचा विकास करुन समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेबांच्या संविधानामुळेच समतेचं राज्य स्थापन होणार – मुख्यमंत्री
चंद्रपूर : हिमालयासारखी उंची असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. या संविधानामुळेच देशात स्वातंत्र्य, समता व बंधूत्वाचा भाव निर्माण झाला. ही बाब भारतीय लोकशाहीला मजबूत करणारीच ठरली नाही तर जगातील सर्वात मोठी समृध्द लोकशाही असणारा देश म्हणून या देशाकडे जगाचे लक्ष गेले. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी बाबासाहेब होते त्या स्थळांचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करणार असून या देशात, या महाराष्ट्रात संविधानावर आधारित समतेचं राज्य स्थापन होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, उपमहापौर वसंत देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, आर.पी.आय. नेते व्ही. डी. मेश्राम, राजू भगत, प्रवीण खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
श्री. फडणविस म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी संविधानावर आधारित राज्य स्थापन होत असतानाच बाबासाहेबांच्या आठवणी जोपासणे आणि संविधानाची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. या संविधानामुळे देशातील गरीब नागरिक देखील पंतप्रधान होऊ शकतो. ही शक्ती ओळखून आम्ही संविधानाचा स्वीकार केलाचं पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यांत आले. जपान येथील कोयासान विद्यापिठात बाबासाहेबांचा भव्य पुतळा या सरकारने दिला. लंडन मधील घर खरेदी करण्यात येऊन तेथे बाबासाहेबांची फोटोबायोग्राफी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब भारताचे नव्हे तर साऱ्या जगाचे आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण विश्वाला दिशा देणारे आहे. त्यामुळे जेथे-जेथे बाबासाहेब होते त्या सर्व भारतातील वास्तु राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी बाबासाहेबांच्या पुर्णाकती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना वाहिली. सोबतचं कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही. डी. मेश्राम यांनी केले.
माईंचे गांव होणार ‘आदर्श गाव’
येथील डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपुरातील आंबेडकर चौकात 59 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्त्री असते. महामानव डॉ. आंबेडकरांच्या मागे महामाई रमाबाई आंबेडकर होत्या. त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला आदर्श ग्राम बनविण्यासाठी मार्च महिन्यात 2 कोटी रूपये देण्यात येईल.
राजगुरुनगर विभागात महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ अंतर्गत 572 कामे पूर्णत्वास
पुणे, दि. 06 : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमात राजगुरुनगर विभागातील दोन ग्रामपंचायतींमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्ती व वीजसेवेची विविध 572 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्ण करण्यात आली. यात ‘महावितरण आपल्या दारी’मध्ये 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली.
वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे यातील सदुंबरे (ता. मावळ) हे केंद्ग सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेतील गाव आहे. सदुंबरे येथील पाणीपुरवठा योजनेला योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची क्षमता दुप्पट करून ती 200 केव्हीए करण्यात आली. या त्रिसुत्री कार्यक्रमातून पाणीपुरवठा योजनेच्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
सदुंबरे व वाडा या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये 119 ठिकाणी वीजयंत्रणेची विविध दुरुस्ती कामे करण्यात आली. यात वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्र देखभाल, नवीन वीजखांब, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामांचा समावेश आहे. वीजसेवेमध्ये वीजदेयकांची दुरुस्ती, रिडींग घेणे, मीटर बदलणे आदी 373 कामे करण्यात आली तर 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांनी सदुंबरे ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी केली. सदुंबरे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच सौ. संगिता भांगे, तालुका वीज समन्वयक समितीचे सदस्य श्री. नितीन गाडे उपस्थित होते. एकाच दिवसात वीजयंत्रणेची दुरुस्ती, वीजसेवेविषयक तक्रारींचा गावातच निपटारा व नवीन वीजजोडणीची प्रक्रिया झाल्याने ग्रामस्थांनी त्रिसुत्री कार्यक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे यांच्यासह 67 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री अभियानात सहभागी झाले होते.
एलईडीच्या एका बल्बची किंमत 100 रुपयेच ; चढ्या दराने विक्री केल्यास माहिती कळवा
पुणे, : सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम () अंतर्गत घरगुती ग्राहकांना वितरीत होणारे बल्ब प्रत्येकी 100 रुपयांत उपलब्ध आहे. त्यापेक्षा चढ्या दराने या बल्बची विक्री होत असल्यास एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) अधिकार्यांना माहिती देण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
सरकारच्या ईईएसएल या कंपनीकडून पुणे शहर व काही ग्रामीण भागात महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना एलईडी बल्ब वितरणाचे काम सुरु झाले आहे. एलईडीच्या एका बल्बची किंमत 100 रुपये असताना राजगुरुनगर येथे एका ठिकाणी चढ्या दराने बल्बची विक्री होत असल्याचा प्रकार महावितरणच्या कर्मचार्याच्या निदर्शनास आला आहे. याबाबत ईईएसएल कंपनीला महावितरणने माहिती दिली असून नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे. वीजग्राहकांनी प्रत्येकी 100 रुपये दरानेच एलईडी बल्बची खरेदी करावी व त्यापेक्षा अधिक किंमतीत विक्री होत असल्यास त्याची माहिती ईईएसएलचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक कोकाटे (मोबा. 9867978106), श्री. सचिन शर्मा (मोबा. 8450913582) किंवा ईईएसएलच्या 7841929103 किंवा 9657884191 या कॉल सेंटरच्या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी केले आहे.
या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी 7 वॅटचे एकूण 10 एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. 100 रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब रोक्ष्ख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना 10 पैकी जास्तीत जास्त 4 एलईडी बल्ब हे प्रत्येकी 10 रुपये अॅडव्हॉन्स भरून खरेदी करता येईल व या 4 बल्बची उर्वरित रक्कम 10 हप्त्यांत वीजदेयकातून भरावी लागणार आहे. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी पिरेडमध्ये नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलईडी बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केनिया, इथिओपियाचे समिश्र यश ;पुर्ण मॅरेथॉनमध्ये बेलाय अबॅडोयो विजेता ;अर्धमॅरेथॉनमध्ये केनियाचे वर्चस्व पुरुष अर्धमॅरेथॉनमध्ये मुटेटीने जेतेपद राखले
पुणे : शंभरहून अधिक परदेशी स्पर्धकांसह देशभरातील २० हजारांहून अधिक धावपटूंच्या सळसळत्या उत्साहात आणि सकाळच्या अल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या ३०व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथिओपिया व केनियाच्या धावपटूंनी समिश्र यश मिळविले. पुरूष पूर्ण मॅरेथॉनमध्ये (४२ कि. मी.) इथिओपियाच्या बेलाय अबॅडोयो याने केनियन प्रतिस्पध्र्याला धोबिपछाड देत प्रथम क्रमांक पटकाविला. गतविजेत्या मैयो मैडीला अवघ्या दशांश सेंकदाने मागे पडल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला अर्धमॅरेथॉनमध्ये यावेळीही केनियाच्या डोरकास किथोमे हिने बाजी मारलंी तर पुरूषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये डॅनिएल मुटेटी याने सलग दुसNयांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. यंदा प्रथमच नव्या मार्गावर धावलेली ही शर्यत विनाअडथळा पार पडली व धावपटूंनीही या नव्या मार्गाचे कौतुक केले.
महेश मोतेवार प्रकरणात … किरीट सोमय्यांना यश येणार काय ?
पुणे- : धनकवडी येथील बालाजीनगर मध्ये सर्वप्रथम गुरुकृपा मार्केटिंग नंतर समृध्द जीवन आणि टीव्ही चॅनल्स चालवीत असलेल्या महेश मोतेवार यांच्याबद्दल वारंवार येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांनंतर आता मोतेवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कार्यवाही सुरु झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे . दरम्यान मोतेवार यांच्यावर खरेच कारवाई होईल कि केवळ त्यांच्याबाबत वेगवेगळ्या बातम्याच येत राहतील … याबाबत आता पुण्यासह सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जातो आहे . भाजपचे किरीट सोमय्या आर्थिक गुन्हे उघड करण्यात मशहूर झाले आहेत . पण त्यांना मोतेवार प्रकरणी यश येणार काय ? आले तर ते कितपत येईल ?असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत .
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल ‘साई प्रसाद’या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले साईप्रसाद ग्रुप कंपनीच्या सहा राज्यातील कार्यालयावर काल छापेमारी झाली. याशिवाय 15 बँकातील 192 अकाऊंट सील करण्यात आलेत. साईप्रसाद कंपनीविरोधात देशभर पाच गुन्हे दाखल आहेत.साईप्रसाद प्रॉंपर्टीज ली. गोवा आणि साईप्रसाद फुड्स ली. पुणे याचा चेअरमन बाळासाहेब भापकर याला शनिवारी अटक करण्यात आली त्याच्याबरोबर त्याचे आणखी ५ सहकारी लवकरच गजाआड केले जातील असे आर्थीक गुन्हे शाखेचे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी म्हटले आहे . दरम्यान याचवेळी हि मोतेवार यांची ही बातमी आली यात असे म्हटले आहे कि पुण्यात ‘समृद्ध्जीवन ‘ या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.मोतेवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरु झाली आहे. बोगस चिट फंड कपंन्यांविरोधात सेबी ने सुरु केलेल्या मोहिमेला यामुळे यश मिळतंय.महेश मोतेवार यांनी लोकांच्या पैशाच्या जोरावर टीव्ही चॅनल्स सुरु केले. याबद्दल देखील केंद्र सरकारनं CBI ला कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटले आहे . लक्षावधी गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या ‘समृद्ध जीवन’ला माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी नोव्हेबर २०१५ मध्ये एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना केला होता . सेबीचे प्रतिबंध असतानाही या कंपनीने तब्बल ४६३ कोटींचे व्यवहार केल्याचा आरोप करीत ‘समृद्ध जीवन’च्या घोटाळ्याचा आकडा १ हजार २०० कोटींहून अधिक असल्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली होती . ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांच्यावर आघाडी सरकारकडून योग्य वेळी कारवाई झाली असती तर ‘समृद्ध जीवन’चे प्रस्थ एवढे वाढले नसते; असे सोमैय्या यांनी यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता मोतेवार यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कार्यवाही सुरु झाल्याचे वृत्त काल वाहिन्यांनी दिले आहे .
मोतेवारप्रकरणी सोमय्या यांना किती यश येईल हे येणारा काळच सांगेल पण असे प्रश्न उपस्थित होण्यामागे कारणही तसेच आहे . २६ सप्टेंबर २०१२ रोजी मोतेवार यांनी घेतलेल्या रक्तदान शिबीरास खुद्द तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार , यांच्यासह जयंत पाटील ,उद्धव ठाकरे अशा अनेक मान्यवर नेत्यांच्या शुभेच्छ्या मोतेवार यांच्या टीव्ही चॅनल्स ने मिळविल्या होत्या . ज्या आज हि समृध्द जिवन च्या वेबसाईटवर नमूद आहेत यु ट्युबवर नमूद आहेत . मोतेवार यांनी रक्तदान शिबीर आणि अन्य सामाजिक कार्याचा केलेला तथाकथित डोलारा या वेबसाईटवर आहे जो पहिला कि एवढी मोठमोठी माणसे जमवून त्यांनी निर्माण केलेले विश्व पाहता किरीट सोमय्या शेवटपर्यंत हा विषय तडीस नेतील का असे विचारले जात आहे . वास्तविक पाहता या सर्व मान्यवरांनी केवळ विधायक कार्यास –रक्तदान शिबिरास शुभेछ्या देवून रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे .
पहा हे स्क्रीन शॉट -याची लिंक आहे – http://samruddhajeevanfoundation.in/gallery.aspx
आणि या काही लिंक्स ज्या आजही समृध्द जिवन फौन्डेशन च्या वेबसाईटवर आणि यु ट्युबवर आहेत .
पहा केवळ रक्तदान शिबिराला या मान्यवरांच्या घेतल्या होत्या शुभेछ्या …..
आता पाहू मोतेवार यांना मिळालेले काही पुरस्कार –
जे त्यांच्या http://maheshmotewar.com/ या वेबसाईटवर नमूद आहेत .
क्या दिन थे वो भी … विरु आणि जय ची ४० वर्षापूर्वीची दोस्ती आजही प्रचलित –अमिताभ बच्चन
मुंबई- ‘शोले’तील जय आणि विरु च्या दोस्तीच्या आठवणीत खुद्द बिग बी अमिताभ यांनी क्या दिन थे वो भी … असे वाक्य जाणीवपूर्वक नमूद करीत ४० वर्षे झाली तरी आज हि हि दोस्ती प्रचलित आहे ; असे क्वचितच पाहायला मिळते असे आपल्या ब्लॉग वर नमूद केले आहे




1975मध्ये आलेल्या सुपरहिट ‘शोले’ सिनेमाची मुख्य जोडी जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) अलीकडेच ‘आज की रात है जिंदगी’ या टीव्ही शोमध्ये आले होते. बिग बींव्दारा होस्ट करण्यात आलेल्या या शोच्या फिनाले एपिसोडमध्ये धर्मेंद्र आपल्या सनी देओल या थोरल्या मुलासोबत उपस्थित होते.घायल -२ च्या प्रमोशन साठी हे बापलेक आले असले तरी अमिताभ यांनी मात्र यास भावनिक टच दिला .
या सुपरहिट जोडीने स्टेजवर 40 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘शोले’ सिनेमातील आयकॉनिक सीनला री-क्रिएट केले. धर्मेंद्र यांच्या बाईकवर बिग बी स्वार झाले आणि दोघे ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ गाण्याची झलक पुन्हा सादर करीत त्यांनी धमाल हि केली
मुद्रा कर्ज योजनेंअंतर्गत अडीच कोटी रुपये धनादेशाचे वाटप
महत्त्वाकांक्षेच्या धर्तीवर फुलणारं प्रेम ‘शासन’सिनेमात
भारतीय राजकारणावर नेमके पद्धतीने भाष्य करणारा शासन सिनेमा प्रेम, महत्वाकांक्षा या भावनां देखील मार्मिकरित्या मांडल्या आहेत. या सिनेमात प्रेम आणि महत्त्वाकांक्षेच्या भावविश्वाची नाजूक गुंफण पाहायला मिळणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री मनवा नाईक यांचे हळुवार फुलत जाणारे ‘प्रेम’ शासन मध्ये पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने हि दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील. राजकारणात येण्याचे स्वप्न बाळगणा-या तरुण युवकाची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली असून मनवा नाईकने सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कंपनीच्या कामगार संघटनेचा प्रमुख असणा-या जितेंद्रची आणि मनवामध्ये खुलणारे प्रेम आणि वेळेनुरूप त्याचे बदलणारे महत्व सिनेमात अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहे. प्रेम आणि महत्वाकांक्षा याच्यातील यात नेमकं काय जिंकतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ जानेवारी पर्यंतची वाट हवी लागणार आहे. श्रेया फिल्म्सचे निर्माते शेखर पाठक यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला शासन सिनेमा सामान्य माणसाच्या राजकारणातील मानसिकतेचा वेध घेतला आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘मँगो डॉली’ला पाहून प्रेक्षक म्हणतील वाह ‘गुरु’
गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की उर्मिला कानिटकर- कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आल्या शिवाय रहात नाही. दुनियादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहत्यांना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉईश नंदिनीने प्रेक्षकांची झोपचं उडवली. आता तर उर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्मिती असलेला ‘गुरु’ सिनेमा २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात उर्मिलाचा नुसताच वेगळा रोल नाहीये तर तिचा हटके मेक ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरीच्या ‘सनग्लासेस’ च्या स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच उर्मिला तिच्या जबरदस्त लुकमुळे रॉकऑन झालीये. तिने ‘गुरु’ सिनेमात साकारलेली ‘मँगो डॉली’ तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पहिली नसेल. ‘गुरु’ मधील तिचा रावडी लुक तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल यात शंका नाही. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा चोळीचा पेहराव आणि एकंदरच तिने वठवलेली भूमिका पाहून वाह ‘गुरु’ म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतील. म्हणण्याची मध्ये तिची चौकटीच्या बाहेर भूमिका असणार आहे.
व्हायब्रंट भव्य चित्र प्रदर्शनाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद
‘ग्रामीण भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाकडे लक्ष देण्याची गरज’ ‘स्टार्स फोरम’च्या 6 व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
‘एस ए ई इंडिया’ च्या वतीनेआयोजित ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’चे उद्घाटन 240 विद्यार्थ्यांचा सहभाग
भोसरी एमआयडीसीमध्ये 10 लाखांची वीजचोरी उघड
पुणे, : भोसरी एमआयडीसीमधील शिरभाते इंडस्ट्रीजमध्ये 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी एमआयडीसीमध्ये प्लॉट क्र. 232, सेक्टर 7 मधील मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत फेरफार केल्याचे दिसून आल्यानंतर वीजमीटर व सीटी यंत्रणा (करंट ट्रान्सफार्मर) पंचनामा करून जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीत वीजमीटर व सीटी यंत्रणेत वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर तांत्रिक फेरफार केल्याचे आढळून आले. यात 79,396 युनिटची म्हणजे 10 लाख 39 हजार 60 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप गिरी, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स शिरभाते इंडस्ट्रीजच्या जागेचे मालक सुनील येडे, वीजवापरकर्ते जाकीर शेख, शशिकांत प्रकाश निकम, इरफान शेख, फुलचंद रामदुलार विश्वकर्मा आदी सहा जणांविरुद्ध बुधवारी (दि. 2) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.














