शिवभक्त ‘सदाचारी’ वैभव तत्ववादी
स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा अध्यक्षपदी संदेश दिवेकर यांची नियुक्ती
स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा अध्यक्षपदी संदेश दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे व सरचिटणीस संजीव साने यांनी दिले . स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत हि नियुक्ती करण्यात आली .
संदेश दिवेकर हे पुणे शहरात सामाजिक चळवळीत क्रियाशील कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी अण्णा हजारे यांनी जनलोकपाल पुकारलेल्या आंदोलन सक्रिय सहभागी झाले होते . त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या पुणे शहरात संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे .
या कार्यकारिणी बैठकीस स्वराज अभियान राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर , राज्य खजिनदार कॅप्टन दास , राज्यकारिणी सदस्य इब्राहीम खान उपस्थित होते .
या नियुक्तीनंतर बैठकीत पुणे महानगर- जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली , स्वराज अभियानचे सयोजंक योगेंद्र यादव , प्रशांत भूषण यांच्या विचाराने स्वराज अभियानचे पुणे महानगर जिल्ह्यामध्ये काम करणार असल्याचे संदेश दिवेकर यांनी नियुक्तीनंतर सांगितले .
सरचिटणीस – बाळ पाटील , उपाध्यक्ष – निलेश डांबरे , खजिनदार – सेन्थिल अय्यर , चिटणीस – हुसेन शेख , प्रसिध्दप्रमुख – अभिषेक निसाळ आदीची नियुक्ती करण्यात आली .
नील-स्वानंदीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का ?
‘नांदा सौख्य भरे’ मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग-पहा फोटो …
झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेत सध्या देशपांडे कुटुंबिय नील-स्वानंदीच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. स्वानंदीला सून म्हणून घरात न आणण्याचा घाट घालणारी ललिता आणि काहीही झालं तरी नील (इंद्रनील) आणि स्वानंदीचं लग्न लावूनच देणार असा चंग बांधलेली वच्छी आत्या या दोघींच्या शह-काटशहाच्या खेळात हे लग्न अडकलेलं आहे. हे लग्न होऊ नये म्हणून ललिता हर एक प्रकारे प्रयत्न करतेय तर त्या सर्व अडचणींवर मात करत वच्छी ही लग्न गाठ जुळवण्याचा प्रयत्न करतेय. एकीकडे नील-स्वानंदीच्या लग्नात या अडचणी तर दुसरीकडे व्हिजा मिळेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय करणारी संपदा या सर्वांमुळे देशपांडे कुटुंबियही चिंतेत आहे. या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करत ही दोन्ही लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? या प्रश्नाचं उत्तर बघायला मिळेल दोन तासांच्या एका विशेष भागात. येत्या १३ डिसेंबरला रविवारी रात्री ७ ते ९ या वेळेत ‘नांदा सौख्य भरे’ चा हा विशेष भाग झी मराठीवरून प्रसारित होईल.
आपल्या खोट्या श्रीमंतीचा बडेजाव करणारी आणि कर्ज-उधा-यांच्या फे-यात अडकलेली ललिता आपलं हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून सतत प्रयत्न करत असते. आपल्या या खोट्या वैभवामागील सत्य ती स्वानंदी आणि तिच्या घरच्यांनाही कळणार नाही यासाठी नियोजनबद्ध खेळी आखत असते. स्वानंदीचे वडिल आयकर विभागात मोठ्या पदावर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल आणि स्वानंदीला सून म्हणून आणल्यानंतर या नात्याच्या आधारे देशपांडेंकडून तो पैसा उकळता येईल असा ललिताचा कट असतो. परंतू देशपांडे हे एक अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे वरकमाईचा पैसा नसल्याचं कळाल्यापासून ललिताच्या सगळ्या आशा अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत त्यामुळे हे लग्न होऊ देण्याचा ती हरेक प्रकारे प्रयत्न करतेय. परंतु दुसरीकडे वच्छी आत्या तिचे हे सारे प्रयत्न हाणून पाडते. कर्जबाजारी होऊनही स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी ललिताकडे आपलं घर विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. एकीकडे नीलच्या लग्नाची आणि दुसरीकडे हे घर विकण्याची तयारी अशा दोन्ही गोष्टी एकत्र सुरू असल्यामुळे ललिता विचित्र पेचप्रसंगात अडकलेली आहे. यातही घर विकण्याची गोष्ट तिला कुणालाही कळू द्यायची नाही या लपवाछपवीत तिची तारांबळ उडालेली आहे. या सर्व गोष्टी मात्र वच्छी आत्याच्या लक्षात येतात. त्यामुळे ललिताचं हे भांडाफोड होणार का? आणि सत्य परिस्थिती देशपांडे कुटुंबियासमोर येणार का? हेही या विशेष भागात बघायला मिळणार आहे. स्वानंदीसोबतच संपदाचंही लग्न त्याच मांडवात होणार आहे. लग्नानंतर महेशसोबत परदेशात जाण्यासाठीचा व्हिजा मिळाल्याशिवाय आपण बोहल्यावर उभी राहणार नाही असा निर्णय संपदा घेते. हा निर्णय मागे घेण्यासाठी स्वानंदी तिची समजूत काढते आणि व्हिजाचं काम नक्की होईल असा विश्वास देते. लग्नाची वेळ जवळ येते आणि तिला व्हिजा नाकारला गेल्याचं कळतं.. यानंतर संपदा काय निर्णय घेते हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल. अशा अनेक नाट्यमय घटना घडामोडींनी भरलेला हा दोन तासांचा विशेष भाग असणार आहे. या घडामोडींचा शेवट काय होतो ? आणि ही दोन्ही लग्नसोहळे निर्विघ्नपणे पार पडतात का ? याचा उलगडा रविवारी रात्री ७ वा. प्रसारित होणा-या ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेच्या या विशेष भागातून होईल.
लोकशाही दिनी अपुऱ्या खुर्च्या :नागरिकांची जमिनीवर बसकण
सजग नागरिक मंचाकडून नागरिकांच्या हेलपाट्यांचे सर्वेक्षण
पुणे :
महिन्याच्या पहिल्या सोमवार ऐवजी आज मंगळवारी झालेल्या लोकशाही दिनाला नागरिकांनी गर्दी केल्याने खुर्च्या अपुऱ्या पडल्या !
विवेक वेलणकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जमिनीवर बसकण मारली .. यावेळी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर ,विश्वास सहस्त्रबुद्धे ,वृक्ष प्रेमी नंदकुमार गोसावी ,’ सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह ‘ चे दीपक बिडकर उपस्थित होते , थोड्या वेळाने खुर्च्या आल्या
सजग नागरिक मंचाने यावेळी सतत लोकशाही दिनाला येवूनही प्रश्न न सुटलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून माहिती गोळा केली . त्यात अनेक नागरिक सातत्याने १०-११ वेळा चकरा मारूनही प्रश्न सुटत नसल्याचे लक्षात आले . तसेच वैकुंठभाई मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेतील संभाव्य रस्ता रुंदीकरणा च्या आणि वृक्ष तोडीच्या विरोधात नागरिकांनी आजच्या लोकशाही दिनी आक्षेप नोंदविला
वायकॉम18 मोशन पिक्चर्सचा’ पोष्टर गर्ल’12 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
मुंबई :झपाटलेला 2 आणि गंगुबाई नॉनमॅट्रीकच्या धमाकेदार यशानंतर आता वायकॉम18 मोशन पिक्चर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे ‘पोष्टर गर्ल’. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं 12 फेब्रुवारी 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठीतली ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राज यांचे आहे.
“मराठी चित्रपटांचे प्रकाशक आणि वितरक यांच्या उत्कृष्ट समर्थनामुळे मराठी चित्रपट मोठमोठी शिखरे सर करण्यात यशस्वी होत आहेत. मराठी चित्रपट चाहत्यांनी नेहमीच चांगल्या विषयांना प्राधान्य दिले आहे. अशाचं एका वेगळ्या विषयावर बेतलेला पोश्टर गर्ल आम्ही घेऊन येत असल्याचे,” वायकॉम18 मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे यांनी म्हटले आहे. हिंदी आणि इंग्रजी मनोरंजन विश्वात मैलाचा दगड पार केल्यानंतर वायकॉम18 आता मराठी सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण करू इच्छित आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पोश्टर गर्ल मनोरंजनाबरोबरचं सामाजिक समस्यांवर जरूर प्रकाश टाकेल असं म्हणत, या चित्रपटासाठी वायकॉम18 अत्यंत उत्साही असल्याचे ते म्हणाले.
“मनोरंजन विश्वात एका वेगळ्या उंचीवर असणाऱ्या वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्याबरोबरमीमाझा दुसरा चित्रपट ‘पोष्टर गर्ल’ करत असल्याचा आनंद व्यक्त करत, जबाबरदारी वाढल्याचे, दिग्दर्शक समीर पाटील यांनी म्हटले आहे.
मराठी सिनेमाला अनुदान देतानाही वशिलेबाजी ? … सारेच त्रस्त अध्यक्ष मात्र मस्त … ?
मुंबई –
इम्पाचे संचालक बाळासाहेब गोरे यांनी ५० निर्माते घेवून काल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मुंबईतील कार्यालय गाठले आणि महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांना घेरावो घातला . ४० हून अधिक चित्रपटांना अनुदानास अपात्र ठरविण्याची घटना पाटकर यांच्याच कारकिर्दीत घडल्याने हा घेरावो घालण्यात आला . यावेळी वर्षभरात गैरप्रकार, फसवणूकीने मराठी सिनेसृष्टी त्रस्त झाल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात आले . वर्षभरात अध्यक्षांचे मात्र मोठ्ठ्या संख्येने चित्रपट झाले आणि पुण्या-मुंबईत पार्ट्याही झाल्या . त्यामुळे तुम्ही ‘मस्त ‘ आहात हो .. असा उपरोधिक शाब्दिक हल्लाही पाटकर यांच्यावर होतो आहे .
इम्पाचे निवडून आलेले सदस्य श्री बाळासाहेब गोरे तसेच दिलीप दळवी यांच्या पुढाकराने ५० च्या वर चित्रपट निर्माते व कलाकर्मी यांनी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांना घेरावो घातला याबद्दल त्यांनी तत्पूर्वी सोशल मीडियातून जागृती करून इशारा देवून हा घेरावो घातला . चित्रपट अनुदान परिक्षण समितीने पाटकर यांच्या कारकिर्दीत ४० हून अधिक चित्रपट अनुदान करिता अपात्र ठरविले त्या बद्दल जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले . यावेळी ऊपस्थित निर्माते यांनी परिक्षक समिती बद्दल रोष व्यक्त केला. आणि खुद्द समितीचे सदस्य यांच्यासह पाटकर यांच्यावर यावेळी आरोप केले
परीक्षक समित्यांवर झालेल्या नेमणुका कशा होतात इथपासून ते काही शासनाचे पुरस्कार मिळालेल्या आणि पुरस्काराच्या स्पर्धेत दाखल झालेल्या चित्रपटांना देखील अनुदानास अपात्र कसे ठरविले ?अध्यक्ष म्हणून आपण चित्रपटाच्या स्क्रीनिन्गला का उपस्थित राहिला नाहीत असा भडीमार केला या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्री पंकज भट, अविनाश मोहीते, शिवाजी दोलतडे, रोमेल रॉड्रीक्स, नितीन चांदोरकर, युवराज पवार, अमोल गायकवाड, विवेक साहू, रामदास तांबे, किशोर विभांडीक, प्रकाश भालेकर, मुरली नल्लप्पा, विशाल सावंत, मानसिंग पवार, हेमंत साखरकर, नंदकुमार विचारे, रेखा पेंटर, डॉ. देवदत्त कापडीया, विजय भानू, राजु शेवाळे, आनंद ओरस्कर, दिनेश विसपुते, गणेश तळेकर, मोरे, राजेश दुर्गे, बाबासाहेब पाटील, प्रशांत राणे, महिमा मालेगांवकर, किरण
कुडाळकर, शरदचंद्र जाधव, अँड. मनिष व्हटकर, रणजित दरेकर, सचिन पाताडे, विजय वैद्य, नितीन जाधव, नंदू कुमावत, तसेच महामंडळाचे संचालक संजीव नाईक, अनिल निकम व अनेक चित्रकर्मी ऊपस्थित होते.चित्रपटांना अनुदान देताना ११ प्रकारच्या वर्गात १०० मार्क्स दिले जातात . कथा -संगीत -दिग्दर्शन – चित्रीकरण स्थळे , छायाचित्रण , संकलन आदींचा त्यात समावेश असतो. किमान ५० मार्क्स मिळविले तरच अनुदान दिले जाते मार्क्स ५० ते ७० असतील तर ३० लाख रुपये आणि ७१ च्या पुढे असतील तर ४० लाख रुपये अनुदान दिले जाते .यापोटी महामंडळ एक टक्का रक्कम निर्मात्याकडून घेते हि रक्कम रीतसर आहे असे म्हणतात याशिवाय हि महामंडळाच्या अन्य परवानग्यांसाठी महामंडळाची प्रचंड फी असतेच पाटकर यांच्या काळात गैरप्रकार, फसवणूक आणि भ्रष्टाचाराने मराठी सिनेसृष्टी त्रस्त झाल्याचे चित्र आहे .
महामंडळाच्या पाटकर यांच्या अध्यक्षपदाला सन्मानाने लोकमान्यता दिलेल्या क्षणी पुण्यात पाटकरांनी निर्मात्यांची कार्यशाळा घेवू , चित्रपट क्षेत्रातील फसवणूकिला आळा घालू , छोट्या कलावंतआणि पडद्यामागील कलाकार यांच्या समस्या सोडवू अशी आश्वासने दिली होती पण प्रत्यक्षात आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांनी चक्क सात सिनेमे केले त्यातच … तसेच फसवे मार्केटिंग आणि फसव्या प्रसिद्धीचे जाळे टाकून गब्बर झालेल्या पुण्यातील एका तथाकथीताच्या फार्म हाऊसवर आणि पुण्यातील हॉटेलात आराम करण्यातच त्यांचा वेळ गेला असावा असाही आरोप होतो आहे . दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी महामंडळाच्या पुणे कार्यालयात आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता… येथील व्यवस्थापक आणि महामंडळ यांच्यात हिशेबावरून वादंग निर्माण झाल्याने आता येथे नव्याने व्यवस्थापक आले आहेत असे समजले . आणि आता रोख रकमेचा भरणा नाकारून केवळ धनादेश आणि डीडी नेच पैसे स्वीकारण्यात येतील असाही फलक येथे लावण्यात आला आहे . नव्या व्यवस्थापिकेला अर्ज देणे आणि चेक -डीडी घेणे यापलीकडे कशाचीही काहीही माहिती नसल्याचे ही सांगण्यात आले .

चला पाहू या सरू मावशीचे लग्न ..
(होणार सून मी या घरची- पहा लग्नाचा अल्बम )
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका होणार सून मी ह्या घरची मधील सरू मावशीचं लग्न पुढच्या आठवड्यात बघायला मिळणार असून तिचा जुना मित्र प्रद्युम्न उर्फ पप्पुशी हे लग्न होणार आहे. पप्पु काही वर्षांपूर्वी सरू मावशीला बघायला आलेला असतो परंतू त्याच्या घरातील लोकांचा स्वभाव न पटल्यामुळे लग्नाची बोलणी पुढे सरकत नाही. आता अनेक वर्षांनंतर पप्पू जेव्हा जान्हवीला भेटतो तेव्हा सरूचं अजून लग्न झालेलं नसल्याचं त्याला कळतं. दरम्यान पप्पुलाही मनासारखी जोडीदार न मिळाल्याने त्याचंही लग्न झालेलं नाहीये यामुळे पप्पू परत एकदा सरूशी लग्न करण्याची इच्छा जान्हवीकडे बोलून दाखवतो आणि श्री आणि जान्हवी हे लग्न करण्याचा घाट घालतात. गोखले कुटुंबात या लग्नावरून विरोध असला तरी श्री आणि जान्हवी सरू मावशीच्या आनंदासाठी घरच्यांची संमती मिळवण्यात यशस्वी होतात आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडतं. येत्या आठवड्यात सरू मावशीच्या लग्नाचा हा भाग बघायला मिळणार आहे. अभिनेता समीर चौगुलेने पप्पूची ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
लग्नाचा अल्बम
राज्यातील 5 हजार 851 बालकांचा रूग्णवाहिकेत जन्म स्त्रियांसाठी ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवा ठरली वरदान ! पुण्यात सर्वाधिक 385 बालकांचा रूग्णवाहिकेत जन्म
नेत्रतज्ज्ञ डॉ.रमेश मूर्ती यांना ‘डॉ.मधूसुदन झंवर नेत्रसेवा अॅवॉर्ड’ आणि ‘शुभदा एन.कुलकर्णी’ पारितोषिके प्रदान
‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली तसेच यावेळी ‘त्रिशरण पंचशील’ प्रार्थनाही केली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपावर हेलिकॉप्टरने राज्य शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश देशाला दिला आहे. भारतीय संविधानाद्वारे त्यांनी आधुनिक भारताची मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता, बंधुता आणि एकात्मतेच्या बळावरच राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल.
समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शोषित, पिडीत यांचा विकास करुन समाजातील शेवटच्या वर्गातील व्यक्तीचा विकास करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेबांच्या संविधानामुळेच समतेचं राज्य स्थापन होणार – मुख्यमंत्री
चंद्रपूर : हिमालयासारखी उंची असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. या संविधानामुळेच देशात स्वातंत्र्य, समता व बंधूत्वाचा भाव निर्माण झाला. ही बाब भारतीय लोकशाहीला मजबूत करणारीच ठरली नाही तर जगातील सर्वात मोठी समृध्द लोकशाही असणारा देश म्हणून या देशाकडे जगाचे लक्ष गेले. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी बाबासाहेब होते त्या स्थळांचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करणार असून या देशात, या महाराष्ट्रात संविधानावर आधारित समतेचं राज्य स्थापन होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, उपमहापौर वसंत देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, आर.पी.आय. नेते व्ही. डी. मेश्राम, राजू भगत, प्रवीण खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
श्री. फडणविस म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी संविधानावर आधारित राज्य स्थापन होत असतानाच बाबासाहेबांच्या आठवणी जोपासणे आणि संविधानाची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. या संविधानामुळे देशातील गरीब नागरिक देखील पंतप्रधान होऊ शकतो. ही शक्ती ओळखून आम्ही संविधानाचा स्वीकार केलाचं पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यांत आले. जपान येथील कोयासान विद्यापिठात बाबासाहेबांचा भव्य पुतळा या सरकारने दिला. लंडन मधील घर खरेदी करण्यात येऊन तेथे बाबासाहेबांची फोटोबायोग्राफी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब भारताचे नव्हे तर साऱ्या जगाचे आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण विश्वाला दिशा देणारे आहे. त्यामुळे जेथे-जेथे बाबासाहेब होते त्या सर्व भारतातील वास्तु राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी बाबासाहेबांच्या पुर्णाकती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना वाहिली. सोबतचं कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही. डी. मेश्राम यांनी केले.
माईंचे गांव होणार ‘आदर्श गाव’
येथील डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपुरातील आंबेडकर चौकात 59 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्त्री असते. महामानव डॉ. आंबेडकरांच्या मागे महामाई रमाबाई आंबेडकर होत्या. त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला आदर्श ग्राम बनविण्यासाठी मार्च महिन्यात 2 कोटी रूपये देण्यात येईल.
राजगुरुनगर विभागात महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ अंतर्गत 572 कामे पूर्णत्वास
पुणे, दि. 06 : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमात राजगुरुनगर विभागातील दोन ग्रामपंचायतींमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्ती व वीजसेवेची विविध 572 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्ण करण्यात आली. यात ‘महावितरण आपल्या दारी’मध्ये 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली.
वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे यातील सदुंबरे (ता. मावळ) हे केंद्ग सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेतील गाव आहे. सदुंबरे येथील पाणीपुरवठा योजनेला योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची क्षमता दुप्पट करून ती 200 केव्हीए करण्यात आली. या त्रिसुत्री कार्यक्रमातून पाणीपुरवठा योजनेच्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
सदुंबरे व वाडा या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये 119 ठिकाणी वीजयंत्रणेची विविध दुरुस्ती कामे करण्यात आली. यात वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्र देखभाल, नवीन वीजखांब, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामांचा समावेश आहे. वीजसेवेमध्ये वीजदेयकांची दुरुस्ती, रिडींग घेणे, मीटर बदलणे आदी 373 कामे करण्यात आली तर 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांनी सदुंबरे ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी केली. सदुंबरे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच सौ. संगिता भांगे, तालुका वीज समन्वयक समितीचे सदस्य श्री. नितीन गाडे उपस्थित होते. एकाच दिवसात वीजयंत्रणेची दुरुस्ती, वीजसेवेविषयक तक्रारींचा गावातच निपटारा व नवीन वीजजोडणीची प्रक्रिया झाल्याने ग्रामस्थांनी त्रिसुत्री कार्यक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे यांच्यासह 67 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री अभियानात सहभागी झाले होते.
एलईडीच्या एका बल्बची किंमत 100 रुपयेच ; चढ्या दराने विक्री केल्यास माहिती कळवा
पुणे, : सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम () अंतर्गत घरगुती ग्राहकांना वितरीत होणारे बल्ब प्रत्येकी 100 रुपयांत उपलब्ध आहे. त्यापेक्षा चढ्या दराने या बल्बची विक्री होत असल्यास एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) अधिकार्यांना माहिती देण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
सरकारच्या ईईएसएल या कंपनीकडून पुणे शहर व काही ग्रामीण भागात महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना एलईडी बल्ब वितरणाचे काम सुरु झाले आहे. एलईडीच्या एका बल्बची किंमत 100 रुपये असताना राजगुरुनगर येथे एका ठिकाणी चढ्या दराने बल्बची विक्री होत असल्याचा प्रकार महावितरणच्या कर्मचार्याच्या निदर्शनास आला आहे. याबाबत ईईएसएल कंपनीला महावितरणने माहिती दिली असून नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे. वीजग्राहकांनी प्रत्येकी 100 रुपये दरानेच एलईडी बल्बची खरेदी करावी व त्यापेक्षा अधिक किंमतीत विक्री होत असल्यास त्याची माहिती ईईएसएलचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक कोकाटे (मोबा. 9867978106), श्री. सचिन शर्मा (मोबा. 8450913582) किंवा ईईएसएलच्या 7841929103 किंवा 9657884191 या कॉल सेंटरच्या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी केले आहे.
या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी 7 वॅटचे एकूण 10 एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. 100 रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब रोक्ष्ख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना 10 पैकी जास्तीत जास्त 4 एलईडी बल्ब हे प्रत्येकी 10 रुपये अॅडव्हॉन्स भरून खरेदी करता येईल व या 4 बल्बची उर्वरित रक्कम 10 हप्त्यांत वीजदेयकातून भरावी लागणार आहे. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी पिरेडमध्ये नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलईडी बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केनिया, इथिओपियाचे समिश्र यश ;पुर्ण मॅरेथॉनमध्ये बेलाय अबॅडोयो विजेता ;अर्धमॅरेथॉनमध्ये केनियाचे वर्चस्व पुरुष अर्धमॅरेथॉनमध्ये मुटेटीने जेतेपद राखले
पुणे : शंभरहून अधिक परदेशी स्पर्धकांसह देशभरातील २० हजारांहून अधिक धावपटूंच्या सळसळत्या उत्साहात आणि सकाळच्या अल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या ३०व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथिओपिया व केनियाच्या धावपटूंनी समिश्र यश मिळविले. पुरूष पूर्ण मॅरेथॉनमध्ये (४२ कि. मी.) इथिओपियाच्या बेलाय अबॅडोयो याने केनियन प्रतिस्पध्र्याला धोबिपछाड देत प्रथम क्रमांक पटकाविला. गतविजेत्या मैयो मैडीला अवघ्या दशांश सेंकदाने मागे पडल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला अर्धमॅरेथॉनमध्ये यावेळीही केनियाच्या डोरकास किथोमे हिने बाजी मारलंी तर पुरूषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये डॅनिएल मुटेटी याने सलग दुसNयांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. यंदा प्रथमच नव्या मार्गावर धावलेली ही शर्यत विनाअडथळा पार पडली व धावपटूंनीही या नव्या मार्गाचे कौतुक केले.

















































