Home Blog Page 3523

रीना वळसंगकर हिंदी मालिकेतला मराठमोळा चेहरा

0

आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर – अग्रवाल हिचादेखील समावेश होतो. हिंदीचा छोटा आणि मोठ्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रीना आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चांगल्या भूमिका वठवत आहे. रीनाची खासियत म्हणजे, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात तिने अभिनयाचा वेल बॅलेंस साधला आहे. ‘अजिंठा’ या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या  रीनाने हिंदी सिनेसृष्टीतला आपला करिअरचा ग्राफ चढता उंचावला आहेच, पण त्यासोबतच ती मराठी सिनेसृष्टीलादेखील तेवढेच प्राधान्य दिले आहे. सध्या रीना ‘एजंट राघव’ या मालिकेत डॉ. आरती मेस्त्रीची भूमिका साकारीत आहे. रीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे  “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. रीनाचे व्यक्तिमत्व देखील असेच डॅशिंग असल्यामुळे तिने साकारलेल्या इन्स्पेक्टर सविताच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. अशाप्रकारे मराठीतील ‘अजिंठा’ आणि हिंदीतील ‘तलाश’ या दोन महत्वाच्या सिनेमांमुळे तिच्या करिअरचा आलेख चांगलाच वाढला. अभिनेत्री म्हणून करिअर करण्यापूर्वी रीना ने एका खाजगी विमान कंपनीत  एअर होस्टेस म्हणून काम केले होते.  आपण पुढे जाऊन अभिनेत्री बनू असा स्वप्नातही विचार न  केलेल्या रीनाला तिच्या नृत्यकलेने अभिनय क्षेत्रात आणले. दिसायला सुंदर असणा-या रीनाचे हे नृत्यकौशल्य नितीन देसाई यांनी उत्तमरित्या हेरले. त्यांच्या ‘अजिंठा’ या सिनेमातील ‘कमला’ या सेकंड लीड भूमिकेसाठी रीनाची निवड करण्यात आली. रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’  या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबत काम केले आहे. सध्या रीना  ‘एजंट राघव’ या मालिकेसोबतच अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ”कृष्णप्रिया’ या संगीतनाटकात ‘उदा बाई’ आणि ‘राधा’ ची भूमिका करीत आहे.

“शहरांमधील सुविधा बघून सखेद आश्चर्य वाटतं.” – डॉ. निरुपमा देशपांडे

0
पुणे : “आज मी मेळघाटातून पुण्यात येते आणि येथील नागरिकांच्या सुख सुविधा जेव्हा बघते तेव्हा मला शहरात राहणाऱ्या लोकांचे आश्चर्य वाटतं. इतक्या सुविधा मागासवर्गीय आदिवासी प्रदेशांमध्ये केव्हा पोहचतील याबाबत मी अजूनही  साशंक आहे.” अशी भावना मेळघाट मध्ये कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाज करकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी ‘संजीवनी डेव्हलपर्स’ च्या एका कार्यक्रमात व्यक्त केली.
 
संजीवनी डेव्हलपर्स च्या वाकड येथील सोनचाफातील सदनिकाधारी स्नेहमेळाव्यात मेळघाट येथील ‘संपूर्ण बांबू’ या संस्थेच्या ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या डॉ. निरुपमा  देशपांडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुण्यातील सर्व सुख सुविधा बघून त्यांना येथील उच्च राहणीमानाचे आश्चर्य वाटत होते  तसेच आपण जेथे काम करतो तेथे या सुविधा पोचतील कि नाही याबाबतही साशंक होत्या. “मी जेथे काम करते तेथिल नागरिकांना रोज पोटभरीचं जेवण मिळेल की नाही याबाबत खात्री नसते. आज येथील एकेका सोसायटीमध्ये १५०० लोकांची वस्ती असते आणि मी १५०० लोकवस्तीच्या एका गावात राहते. त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत असतो. आम्हीही घरे तयार करतो फरक फक्त इतकाच आहे की आमचे घर हे बांबू पासून तयार केले जाते. शहरांप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी तिकडे किती वर्ष लागतील हे सांगता येणार नाही. तेथील लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपल्यासारख्या सुशिक्षित सज्ञान लोकांनीच दूर केला पाहिजे. त्यांना जितकी जमेल तितकी मदत केली पाहिजे.” अशी कळकळीची भावना डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो अशी भावना प्रत्येकाने ठेवली आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी सज्ज झालोत तर गरीब – श्रीमंत यातील दरी नक्कीच कमी होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.   
 
“थिंक ग्रीन, थिंक लाईफ़ याला  अनुसरूनच आमचे प्रत्येक प्रकल्प आम्ही उभारत असतो. पर्यावरणाचा ह्रास होण्यापासून आपणच पुढाकार घ्यायला हवा. तसेच आपण जर चांगल्या लोकांमध्ये सातत्याने राहत असू तर आपल्या हातून चांगलं घडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक सदनिकाधारी स्नेहमेळाव्यात थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना बोलवत असतो, जेणेकरून नागरिकांमध्ये सामाजिक ऋण फेडण्यासाठी उत्साह निर्माण होईल.” असे मत संजीवनी डेव्हलपर्सचे संचालक संजय देशपांडे यांनी व्यक्त केले. 
 
सुप्रसिद्ध धावपटू स्वाती गाढवे हिचा यावेळी गौरव यावेळी करण्यात आला. तिचे आई वडील शेतमजूर असून तिच्या स्कॉलरशीप व बक्षिसांच्या मिळकतीवर त्यांचे घर चालत आहे. संजीवनी डेव्हलपर्सकडून रोख रक्कम देऊन तिचा सत्कार करण्यात आला आहे.  सध्या ती येत्या ऑंलीम्पिक स्पर्धेसाठी उटी येथे तयारी करीत आहे. त्याचप्रमाणे सन्माननिय अतिथी म्हणून बँक ऑफ बडोद्याचे, पुणे विभागाचे शेखर सुरी यांनादेखील यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी डेव्हलपर्सच्या विक्री विपणन प्रमुख पल्लवी बापट व विपणन प्रमुख संजना पाटील यांनी केले.

महावितरणमध्ये उर्जा बचतीची प्रतिज्ञा उत्साहात

0

पुणे : राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनानिमित्त महावितरणच्या रास्तापेठ येथील कार्यालयात सोमवारी (दि. 14) उर्जा बचतीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

महावितरणच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. उद्धव कानडे यांनी उर्जा बचतीच्या शपथेचे वाचन करून ती उपस्थितांकडून वदवून घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, सुनील पावडे, सुभाष ढाकरे, विधी सल्लागार श्री. मुरलीधर पातळे, महाव्यवस्थापक (लेखा व वित्त) श्री. अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक श्री. एकनाथ चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्ग पवार, प्रकाश खांडेकर, दिनेश अग्रवाल, दत्तात्रय बनसोडे, सुरेश वानखेडे, प्रकाश जमधडे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

आणि मनसेचा विरोध मावळला …

0

पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पावर खास सभेत आज मनसे च्या रुपाली पाटील यांचेया प्रकल्पाला विरोध करणारे  खडाजंगी भाषण झाले आणि ते संपत असतानाच … मनसे गटनेते बाबू वागस्कर मोबाईलवर बोलत होते . रुपाली पाटील यांचे भाषण संपते न संपते तोच बाबू वागस्कर बोलले , आमचा स्मार्ट सिटी ला विरोध होता पण आता विरोध करणार नाही ,पण आमचे सदस्य यातील त्रुटी. आणि याबाबतच्या आपल्या भावना जरूर व्यक्त करतील , आताच मला मनसे प्रमुखांचा फोन आला होता , त्यंचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे आणि यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळे आमचा या प्रकल्पास आता विरोध असणार नाही पण आम्ही आमच्या सूचना आणि यातील चुका दुरुस्त करण्याचा आग्रह करू ….

दुपारी साडेतीन वाजता बाबू वागस्कर यांनी हे सभागृहात सांगितले , रात्री उशिरापर्यंत सभा सुरूच होती .

 

शनिवार वाड्यावर स्मार्ट सिटी चे सादरीकरण करा म्हणजे लोकभावना समजेल — रुपाली पाटील

0

पुणे-शनिवार वाड्यावर स्मार्ट सिटी चे सादरीकरण करा म्हणजे लोकभावना समजेल, असे सांगत मनसे च्या रुपाली पाटील यांनी हि आयुक्त हे केंद्र सरकारचे रोबोट असल्याची टीका केली …. महापालिकेच्या आज झालेल्या मुख्य सभेत , पाहू यात नेमके काय म्हणाल्या रुपाली पाटील

दबंगगीरी करून , तुम्ही व्हा हिरो … पण आम्हाला का व्हिलन ठरविता … सुनंदा गदाळे यांचा सवाल

0

पुणे- आज झालेल्या महापलिकेच्या खास सभेत आयुक्तांचे निवेदन संपताच काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गदाळे यांनी आयुक्तांना फैलावर घेतले . तुम्ही दबंगगीरी करून हिरो व्हा पण आम्हाला का व्हिलन बनविता … असा सवाल करीत जुन्या पुण्याचा स्मार्ट सिटीला का विसर पडला असा सवाल केला .

पदवीधर असूनही बेरोजगार असणाऱ्यांसाठी ‘ स्मार्ट सिटी ‘मध्ये का काही नाही ? दीपक मानकर

0

पुणे- महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवीत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात पदवीधर बेकारांसाठी काही योजना का नाही ? असा सवाल केला . ते म्हणाले ६ महिने आपण स्मार्ट सिटी साठी बिझी राहिलात .राज्याकडे महापालिकेच्या पडून असलेल्या  १३२ प्रस्तावात  हे ६ महिने घातले असते तर आजतागायत पुणे स्मार्ट झाले असते

स्वातंत्र्यापूर्वीचे निखारे आता पुन्हा ज्वलंत करण्याची गरज आहे असे या प्रकल्प प्रकारणी आपण वापरलेल्या कार्यपद्धतीवरून   वाटते असे ते म्हणाले … पाहू यात नेमके श्री मानकर काय म्हणाले ….

काही माध्यमांनी सुपारी घेतली –अजित अभ्यंकर

0

पुणे- आज सकाळी पुणे महापालिकेबाहेर स्मार्ट सिटी विरोधात निदर्शने करताना डाव्या विचारसरणीचे कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी काही माध्यमांनी स्मार्टसिटी प्रकल्पासाठी  सुपारी घेतल्याचा आरोप केला . पहा काय म्हणाले अभ्यंकर …

महापालिका आयुक्तांच्या दबंगगीरीने नगरसेवकांची स्मार्ट कोंडी ..

0

पुणे- महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी आज  राजकीय खेळीने आणि खुबीने  स्मार्टसिटी प्रकल्पाला  असलेला सारा राजकीय विरोध गुंडाळून ठेवल्याने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची महापालिकेच्या खास सभेत मोठ्ठी कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले  . या दबंगगीरीपुढे नांग्या  टाकीत काहींनी पटकन रंग बदलत भाषणे केली तर काहींनी आपला सर्वाधिक रोष व्यक्त करीत का होईनात नांग्या टाकल्या .तर एका  पक्षाचे  सदस्य हे   यावेळी नेत्यांच्या हातातील कठपुतली बनल्याचे चित्र सभागृहात दिसले .

दरम्यान आज सकाळपासून स्मार्टसिटी  प्रकल्पाला होणारा विरोध आणि समर्थन  सभागृहाबाहेर आणि सभागृहातही प्रगट होत होता पण आयुक्तांचा चेहरा मात्र आज ठाम विश्वासातच होता . सभा सुरु होण्यापूर्वी महापालिकेच्या प्रवेश द्वाराबाहेर पतितपावन संघटना स्मार्ट सिटी च्या समर्थनार्थ आणि पुणे शहर बचाव समिती स्मार्ट सिटी च्या विरोधात  निदर्शने करीत  होती

IMG_20151214_103945 IMG_20151214_103840 IMG_20151214_103919   IMG_20151214_113814

सकाळी अकरा वाजता सुरु होणारी सभा … वेळेत सुरु झालीच नाही या सभेला महापौर दत्ता धनकवडे हेच ११ वाजून २२ मिनिटांनी सभागृहात दाखल झाले . आणि त्यांनी प्रथम शेतकरी नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहिली . यावेळी सभा कोणी बोलाविली ती कायदेशीर आहे काय ? अशा प्रश्नांचा भडीमार मनसे आणि कॉंग्रेसच्या सभासदांकडून होत असतानाच आयुक्तांनी थेट स्मार्ट सिटी बद्दल प्रेझेन्टेशन च्या नाव्वाने निवेदन सुरु केले . यावेळी नगरसेवकांनी कर्तव्यात काय कसूर केला कलम ४४८ प्रमाणे हि सभा का बोलाविली ? अशा प्रश्नांचा भडीमार झाला ज्यावर  नगर सचिव  सुनील पारखी यांनी कायदेशीर माहिती दिली पण आयुक्तांनी  उत्तरे दिली नाहीत .

पूनावाला ग्रुपकडून १०० कोटीचे सहाय्य या प्रकल्पाला होणार असल्याचे सांगत कुणाल कुमार यांनी या प्रकल्पांतर्गत २४ तास पाणी पण मीटर पद्धतीने दिले जाईल,३५७  इ कचरा पेट्या  होतील , १०० इलेक्ट्रिक बसेस येतील १०० इ रिक्षा घेण्यात येतील ज्यास इंधन लागणार नाही . मोबाईलवर बसेस ची माहिती उपलब्ध करून देणारे अप्प्स येतील. अशा योजन्माचा उल्लेख केला . एलपीजी सबसिडी सोडा अशा योजनांप्रमाणे पाणी पट्टीवरील सबसिडी सोडा अशी योजनाही असल्याचे सांगितले .५४ स्मार्ट बस थांबे जिथे वायफाय सुविधा असेल बसेस चार्ज करण्याची सुविधा असेल एल इ डी जाहिराती असतील अशा योजेनेची माहिती दिली पायी ५ मिनिटांच्या अंतरावर १ बाग ;अंधार किंवा उजेड पडला कि स्वयंचलित  प्रकाशित होणारे पथ दिवे असतील ; ७४ सार्वजनिक शौचालये असतील अशी माहिती यावेळी दिली

१००० कोटी केंद्र -राज्य आणि महापालिका उदेणार असून अन्य ७०० कोटी केंद्राच्या योजनांमधून मिळू शकतील असेही ते म्हणाले . एसपीव्ही कंपनी या साऱ्याचा कारभार पाहिलं आणि या कंपनीत ६ राज्य शासनाचे ६ महापालिकांचे प्रतिनिधी असतील आणि ३ अधिकारी असतील स्मार्ट सिटी अंतर्गत औन्ध- बाणेर -बालेवाडी येथे महत्वपूर्ण योजना करण्यात येईल तिथे हि कंपनी कर गोळा करून तो पालिकेकडे जमा करेल असेही सांगितले.

 

दिलीप कुमार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित…

0

मुंबई -बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार  उपस्थित होते.
दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू देखील यावेळी उपस्थित होत्या. याक्षणी भावूक झालेल्या सायरा बानू यांनी  दिलीप यांच्या कपाळाचे चुंबन घेत त्यांचे अभिनंदन केले.  अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याला दिलीप यांना उपस्थित राहता आले नव्हते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

बीड : शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या-दलित, मागास जनतेसाठी सदैव संघर्षशील राहीलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे काम राज्य शासन करील असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथ गड’ या स्मारकाचे लोकार्पण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. तर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, दिवाकर रावते, गिरीष महाजन, विष्णू सावरा, गिरीष बापट, प्रकाश मेहता, राम शिंदे, बबनराव लोणीकर, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाऊसाहेब फुंडकर, सरोज पांडे, सर्वश्री खासदार रामदास आठवले, राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे, सर्वश्री आमदार विनायक मेटे, महादेव जानकर, श्रीमती प्रज्ञा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून मिळालेल्या अनुभवामुळेच आपण राज्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यामुळे आम्हाला मोठा आघात झाला, मात्र त्यांची कन्या पंकजाताईंनी या समाजाचे नेतृत्व पुढेचालविल्यामुळे या समाजातील प्रश्नांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गडाच्या निर्मिती मध्ये राज्य शासनाचा एकही पैसा नसून तो केवळ गोपीनाथरावांच्या प्रियजणांनी आपल्या घामाच्या पैशातून उभा केला आहे. हा गड आपल्या सर्वांना दीनदुबळ्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रेरण देत राहील.

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून राज्य शासन त्यांच्या स्मृती सतत तेवत ठेवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सतत जागरूक राहून संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राज्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रूपयांचा विमा काढण्यात येत आहे. सातत्याने ऊसतोड कामगारांसाठी लढा देणाऱ्या व त्यांच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ निर्माण केले असून, कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण तसेच कामगारांना सामाजिक सुरक्षा व पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने औरंगाबाद येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेसाठी शासन आवश्यक ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केले. त्याचप्रमाणे राज्य सरकार राज्यातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल आणि दाऊदची वाकडी नजर राज्यावर पडू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंडे साहेबांच्या प्रेरणेने पाच वर्षात राज्य सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न करीत राहील असा विश्वास व्यक्त केला.

समारंभाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात तळागाळातील जनतेसाठी गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून चांगले कार्य करीत असल्याचे सांगून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या विविध योजनांची माहिती सांगितली.

राज्य शासन चांगले काम करीत असून नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त करून श्री. शहा यांनी गोपीनाथगड पुढील काळात गरीबांच्या सेवेसाठी सरकारला सतत प्रेरणा देत राहील अशी भावना व्यक्त केली.

ग्रामविकास तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलतांना गडाची संकल्पना स्पष्ट केली. हा गड गोपीनाथ मुंडे यांच्यावर अमर्याद प्रेम करणाऱ्या जनमानसाने उभारला असून, हे गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या प्रेमाचे प्रतिक आहे असे सांगत वंचितांच्या विकासाचे मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड नेहमी प्रयत्नशिल राहणार असल्याचे स्पष्ट केले.

स्व. मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, त्यांची आठवण सदैव आपल्या मनात राहील, त्यांच्या संकल्पना, स्वप्न आणि कार्य पूर्ण करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गड आहे. दीनदुबळ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या पुढेही सुरू राहील. या गडामध्ये अनेक सामाजिक उपक्रम साकारले जाणार असून, ऊसतोड कामगार, दीनदुबळ्या वंचित समाजाच्या विकासाची सामाजिक जडणघडण या गोपीनाथ गडाच्या माध्यमातून भविष्यात करण्याचा मानसही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी प्रास्ताविकात गोपीनाथ गडाच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली. श्री. दानवे, श्री.आठवले आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी आपले विचार मांडले. यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांना व अकोला येथील किडनी रॅकेटमधील पीडितांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच गोपीनाथगडाच्या उभारणीमधील रचनाकार सतिश साबडे यांचा सत्कार करण्यात आला.

या समारंभास राज्यभरातून लाखोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. शेवटी फुलचंद कराड यांनी सर्वांचे आभार मानले.

(स्मार्ट सिटी)पक्ष श्रेष्ठींशी विचारविनिमय करणार – अभय छाजेड / विकासाला विरोध नाही कंपनीराजला विरोध – अरविंद शिंदे

0

IMG_20151213_131937

पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पाला महापलिकेत मान्यता द्यायची किंवा कसे ? याबाबत शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी पक्षश्रेष्ठी यांच्या शी विचारविनिमय करूनच निर्णय घेईल मात्र या प्रकल्पातील अडचणी आणि त्रुटी, त्याचे शहरावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणारे परिणाम यावर आपले आणि पक्षातील नगरसेवकांचे मत ठामपणे श्रेष्ठींना सांगू .. आणि त्याप्रमाणे उद्याच्या महापालिकेच्या खास सभेत निर्णय घेवू आणि आवाज उठवू असे शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी येथे सांगितले .आज कॉंग्रेस भवन येथे श्री छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली , स्मार्ट सिटी ‘ प्रकरणी नगरसेवकांची बैठक झाली यावेळी महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे , उपमहापौर आबा बागुल , कमलताई व्यवहारे , सुधीर जानज्योत , सनी निम्हण , अविनाश बागवे , संजय बालगुडे , सुनंदा गदाळे, शिवा मंत्री , अनिस सुंडके, अमित बागुल  आदी उपस्थित होते .

छाजेड म्हणाले , शहरात विकासाच्या योजना राबवायला मुळीच विरोध नाही . पण महापालिकेने त्या राबवाव्यात . त्यासाठी महापालिका सक्षम करावी . केंद्राने आणि राज्याने महापालिकेला नेहमीच आर्थिक मदत केली आहे . आता स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एसपीव्ही कंपनी कशासाठी आणली जाते आहे . यामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवर गदा येईल महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले ,’ हि एसपीव्ही कंपनी ही इस्ट इंडिया कंपनी प्रमाणे शिरकाव करू पाहते आहे आमचा नवनवीन विकासाच्या योजना राबवायला पाठींबा आहे पण कंपनीराज त्यासाठी आणायला विरोध आहे . नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले , ‘ एस पी व्ही कंपनी नकोच . या कंपनीला आमचा विरोध आहे . जे काही करायचे ते महापालिकेने करावे . त्यासाठी सरकारने महापालिकाच सक्षम करावी .

मोदींच्या विकासाच्या जनआंदोलनाची स्पष्टता नाही- डॉ. माधव गाडगीळ

0

पुणे—नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विकासाच्या जनआंदोलनाची घोषणा केली त्यावेळी समाधान

वाटले होते. मात्र, विकास म्हणजे नेमके काय? जनआंदोलन म्हणजे नेमके काय? याबाबत आजपर्यंत स्पष्टता

देण्यात आलेली दिसत नाही, ही स्पष्टता लोकांपुढे यायला हवी असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ

यांनी व्यक्त केले.

‘स्वच्छतेसाठी जनआंदोलन’ या विषयाला समर्पित वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ

पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते वनराई कार्यालयाच्या ‘इको हॉल’ सभागृहात झाले त्यावेळी

ते बोलत होते. , ‘भारतातील स्वच्छता व पर्यावरण’ याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. ‘वनराई’चे अध्यक्ष

श्री. रवींद्र धारिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष

अशोक गोडसे, माजी आमदार मोहन जोशी, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर,

भूषण पटवर्धन, डॉ. सतीश देसाई, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे आदी यावेळी उपस्थित होते. या

अंकामध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ

माशेलकर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर,

ज्येष्ठ विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम

ताकवले, ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ पर्यावरणवादी सुनिता नारायण, पुणे मनपा आयुक्त कुणाल

कुमार, ‘आदर्श गाव समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सफाई कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर यांसह

अनेक तज्ज्ञ मान्यवरांचे लेख आहेत.

डॉ. गाडगीळ म्हणाले, पर्यावरण व विकास हे परस्पर विरोधी समजण्याचे कारण नाही. या दोन्ही गोष्टींचा

एकत्रित मेळ घातला तर देशाची चांगली प्रगती होऊ शकते. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर

त्यांनी ‘विकास को जनआंदोलन बनायेंगे’ अशी घोषणा केली आणि आपल्या मनातीलच गोष्ट मोदी करता

आहेत हे ऐकून समाधान वाटले. मात्र, आता तसे वाटत नाही. जनआंदोलन म्हणजे नेमके काय? त्याची

रचना काय असावी? याबाबत तपशीलात जाण्याची आवश्यकता आहे. विकास म्हणजे नेमके काय?

जनआंदोलन म्हणजे नेमके काय? हे लोकांपुढे स्पष्ट करायला हवे.

ते म्हणाले, सह्याद्रीच्या कोकणात मे नेहेमी हिंडतो. कोकणचा भाग हा निसर्गरम्य व स्वच्छ आहे असे

सांगितले जाते परंतु दुर्दैवाने सर्वात जास्त गलीच्छ कोतवले हे गाव कोकणातील आहे. लोटे रासायनिक

उद्योग संकुलाच्या खाली हे गाव आहे. एकेकाळी या गावात स्वच्छ पाणी होते. आता मात्र संपूर्ण गाव व

नदी प्रदुषित आहे. सरकारी पातळीवरच्या अनास्थेचा अनुभव कथन करत डॉ. गाडगीळ म्हणाले, प्रदुषणाने

येथील माशांचे मृत्यू होतात. त्यामुळे दुर्गंधी सुटते व त्याचा येथील लोकांच्या व्यवसायावर परिणाम होतो.

२ ऑक्टोबरला गावागावात शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाते. परंतु त्याबाहेर २०१०-२०१५ पर्यंत

काहीच फरक पडलेला नाही. आजही तितकेच गलीच्छ पाणी या गावाच्या ओढ्यांमध्ये आणि वसिष्ट नदीत

वाहात आहे. त्यामुळे माश्यांच्या उपलब्ध जातीच नष्ट होत आहेत. ही परिस्थिती सर्व ठिकाणी आहे.

प्रदुषण मंडळ माशे मोठ्या प्रमाणात मरतात याची दाखल सुद्धा घेत नाहीत. प्रदुषण मंडळाने याची

माहिती ठेवायची नाही असे वरूनच आदेश असल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे

वास्तव दडपले जात आहे.

प्रदुषण मर्यादेबाहेर होत आहे. काही उद्योग बोअरवेल घेऊन विषारी जहर त्यामध्ये ओततात. पण आम्ही

बोलायला गेलो की आम्हाला दडपले जाते.  याच्यावरती जाहीर चर्चा चर्चा होऊ नये असेही सांगितले जाते

असे सांगून डॉ. गाडगीळ यांनी अलीकडे स्पष्ट वास्तव नुसत दडपायचं नाहीतर त्यावर जाहीर बोलायचेही

नाही हे सध्या देशात घडतय अशी टिप्पणीही केली.

युरोपीय देशांमध्ये, कॅलीफोर्नियामध्ये रचनात्मक गोष्टीबद्दल सार्वमत घेतले जाते. त्यामध्ये बहुमताने

झालेला निर्णय हा बंधनकारक असतो असे स्पष्ट करीत डॉ. गाडगीळ म्हणाले, आपल्याकडे विकेंद्रीकरणाची

प्रक्रिया खूप पुढे गेली आहे. ग्रामसभा, वॉर्डसभेला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. परंतु नागरिक

त्याचा वापर करीत नाहीत. वॉर्डचे ३० टक्के बजेट हे नागरिक ठरऊ शकतात मात्र जनता याबाबत

अनभिज्ञ आहे. जैवविविधता कायदा आला त्यानुसार गावागावात, नगरपालिका , महानगरपालिकांमध्ये

जैवविविधता व्यवस्थापन समित्या असायला हव्यात. मात्र त्या अद्याप नाहीत. पुणे शहरामध्ये २००२

पासूनच ही समिती असायला हवी होती मात्र आजही ही समिती नाही असे सांगून डॉ. गाडगीळ म्हणाले,

आपले घटनात्मक अधिकार वापरून एकूण व्यवस्था निट चालण्यासाठी सर्वानी प्रयत्न करायला हवेत.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांना आपली मते मांडण्यासाठी खूप चांगली सोय झाली आहे.

प्रदुषणमुक्ततेसाठी व निकोप निसर्ग सांभाळण्यासाठी केवळ पुण्यातच नव्हे तर गावपातळीवर जनआंदोलन

उभे करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व जनजागृती या क्षेत्रात वनराई संस्था

करीत असलेले कार्य निश्चितच दिशादर्शक आहे असेही त्यांनी नमूद केले.

श्री रवींद्र धारिया म्हणाले, स्वच्छतेची गोडी लहान मुलांच्या मनात रुजवली गेली तर १५-२० वर्षात भारत

देश स्वच्छ असेल. त्यामुळे सुजलाम सुफलाम भारत या म. गांधींच्या स्वप्नातील भारताकडे जाण्यासाठी

एक पाऊल आपण पुढे गेलो असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  वनराईच्या वतीने ज्या २५० ‘इको

क्लीन’ शाळा आहेत त्यामाध्यमातून या शाळेमधील विद्यार्थी आपल्या परिसरातील कचरा शाळेत गोळा

करून आणतील व त्याची विल्हेवाट लावली जाईल असा उपक्रम हाती घेण्यात येणार असून या

अभियानाच्या माध्यमातून मुले प्लास्टिक कचरा घराच्या बाहेर टाकू नका हा संदेश देतील व लोक त्यांचे

नक्की ऐकतील असे त्यांनी नमूद केले.

अशोक गोडसे व डॉ. सतीश देसाई यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

प्रारंभी या विशेषांकाचे संपादक अमित वाडेकर यांनी अंकाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व

सूत्रसंचालन प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले, आभार वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी

मानले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धा

0
मुंबई : सांस्कृतिक विभाग आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक 19 डिसेंबर 2015 ते 3 जानेवारी 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा विभागीय (प्राथमिक) आणि राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार आहे. औरंगाबाद विभाग- 19 डिसेंबर 2015, पुणे विभाग – 25 डिसेंबर 2015, नाशिक विभाग- 26 डिसेंबर 2015, कोकण विभाग, पनवेल- 27 डिसेंबर 2015, नागपूर विभाग – 2 जानेवारी 2016 आणि अमरावती विभाग – 3 जानेवारी 2016 रोजी होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 12 जानेवारी 2016 रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्या वेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी होणार आहे.

इच्छुक ढोल ताशा पथकांनी राहुल बाणावली यांच्याशी 9004765000 या मोबाईल क्रंमाकावर संपर्क साधावा तसेच मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 

‘स्मार्ट सिटी’ च्या समर्थनार्थ ‘फ्रेंडस् ऑफ बीजेपी’ ची पालिकेसमोर निदर्शने

0
‘स्मार्ट सिटी लाओ, पुणे बचाओ !’ चा निदर्शनात नारा
index1 index2
 पुणे :
पुणे शहराचे केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी राजकीय कारणावरून चाल-ढकल करणार्‍या पक्षांच्या विरोधात ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या फोरमच्या वतीने शनिवार, 12 डिसेंबर रोजी पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. ‘स्मार्ट सिटी लाओ, पुणे बचाओ !’ असा नारा या निदर्शन रॅलीतून देण्यात आला. या निदर्शनाचे नेतृत्व ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सहसमन्वयक उषा बाजपेयी यांनी केले.
या निदर्शन रॅलीमध्ये 1000 विद्यार्थी, गृहिणी, विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निदर्शन रॅलीस कन्याशाळा (नारायण पेठ) येथून सुरूवात होऊन पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली आणि रॅलीचा शनिवार वाडा येथे समारोप झाला.
‘राजकारण्यांनी पुण्याच्या भविष्याशी खेळू नये, पुण्याचा विकास हेच एकमेव उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवावे’, असे आवाहन निदर्शनामध्ये ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सहसमन्वयक उषा बाजपेयी यांनी केले.