किशोरकुमार यांच्या अखेरच्या श्वासाची कहाणी… लीना चंदावरकर यांच्या शब्दात …ऐका….
(पुणे पत्रकार परिषद -२२/१२/२०१५ )
किशोरकुमार यांच्या अखेरच्या श्वासाची कहाणी… लीना चंदावरकर यांच्या शब्दात …ऐका….
महावितरणमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी
मुंबई :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध पदांच्या नोकर भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी महावितरणच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली असून या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडलात करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर उमेदवारांची नियुक्ती संबंधित परिमंडलांतर्गत करण्यात येईल.
परिमंडलातील रिक्त व उपलब्ध पदांच्या अनुषंगाने आणि उमेदवारांनी नियुक्तीकरिता दिलेल्या पर्यायाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन उमेदवारांचा परिमंडलनिहाय कागदपत्रांचा पडताळणी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच परिमंडलात सविस्तर नेमणूक देण्यात येईल.
या निवड झालेल्या उमेदवारांपैकी सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी दि. 04 जानेवारी 2016 ला तर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर निवड झालेल्या उमेवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. 11 जानेवारी 2016 ला संबंधित परिमंडल कार्यालयामध्ये करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक व आवश्यक त्या मूळ प्रमाणपत्रांसह निश्चित केलेल्या परिमंडलात व निर्धारित केलेल्या दिवशी आपल्या कागदपत्रांच्या पडताळणीकरिता हजर रहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्री. संजीव कुमार
मुंबई :-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्री. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. श्री. संजीव कुमार हे 1993 च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आयएएस) तुकडीचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील महत्त्वांच्या पदांवर काम केलेले आहे.
श्री.संजीव कुमार यांनी आयआयटी रुरकी येथून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केले असून आयआयटी कानपूर येथून कम्युनिकेशन इंजिनियरींगमध्ये एम.टेक केलेले आहे. तसेच मुंबई विद्यापीठातून एम.बी.ए. केलेलेे आहे.
श्री. संजीव कुमार केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि दारिद्र्य निमूर्लन (शहर) या विभागात सहसचिव आणि सर्वांसाठी घरकुल या विभागाचे मिशन संचालक म्हणून कार्यरत होेते. तसेच त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्रालयात संचालकम्हणून व राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आणि आर-एपीडीआरपी या योजनांच्या प्रमुख पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण, विक्रीकर, उद्योग या विभागांसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी)सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. संजीव कुमार यांनी कार्यभार सांभाळला आहे. तसेच त्यांनी गोंदिया आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अशा विविध पदांवरही काम केलेले आहे.
पुणे ‘हिट आर्यंलंड’ होणार नाही यासाठी काम करा: खासदार वंदना चव्हाण
‘गुरु’च्या तालावर थिरकायला सज्ज होणार महाराष्ट्र
किशोरदा यांनी मला जगण्याचे मोठे बळ दिले: लीना चंदावरकर -लीनाजीनी लिहिलेल्या ‘सपने बनाता हूँ या अल्बमचे उद्या प्रकाशन
पुणे: एरव्ही मरण्याचे नाटक करणारे माझे पती जेव्हा १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा मला वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले. त्यांच्या प्रेरणेनेच मी गीतकारही झाले, अशी कृतज्ञ भावना १९७०च्या दशकातील हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय नायिका लीना चंदावरकर यांनी व्यक्त केली.
गुलमोहोर कन्स्ट्रक्शन आयोजित हार्मोनी पुणे तर्फे ‘मैने कुछ खोया है, मैने कुछ पाया है’ या कार्यक‘मात लीनाजी यांनी त्यांच्या सुपरहिट सिनेमातील काही निवडक गाणी सादर करण्यात येत आहेत. त्यात ढल गया दिन, गम का फसाना, जाने क्यो लोग महोब्बत करते है, इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. लीना चंदावरकर यांच्याबरोबर होत असणार्या या गप्पांच्या मैफिलीत त्यांचा स्वत:चा तसेच किशोरदांबरोबरचा जीवनप्रवास त्या सांगणार आहेत, असे आयोजक व गायक मकरंद पाटणकर यांनी सांगितले. पाटणकर यांच्यासह या कार्यक‘मात अली हुसेन, सुवर्णा माटेगावकर, मेधा चांदवडकर गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजन विवेक परांजपे यांचे असून या कार्यक‘माचे निवेदन आर. जे. स्मिता करणार आहेत.
धारवाड येथील आपले बालपण ते वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ‘मन का मित’ या सिनेमातील काम करण्यापासून ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी विवाह, किशोर कुमार यांच्याशी दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू र्आँखो देखा हाल त्यांनी कथन केला.
किशोरदांचे निधन झाल्यानंतर १९९० पासून आपण गीतकार झालो. गीत लिहिताना ते जणू मला प्रॉमटिंग करताहेत असे वाटते, असे लीना चंदावरकर म्हणाल्या. कुमार ब‘दर्स मीडिया (केबीएम)तर्फे ‘बाबा मेरे’ आणि आता ‘सपने बनाता हूँ’ हा लीनाजींचा दुसरा म्युझिक अल्बम बुधवारी यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात संपन्न होत आहे. या अल्बममध्ये एकंदर १० गाणी असून त्यातल्या अमीत कुमार यांनी गायलेल्या एका गाण्याचे दृकश्राव्य प्रदर्शन यावेळी करण्यात येईल, असे पाटणकरांनी सांगितले.
‘नटसम्राट’च्या कलाकारांसह ‘चला हवा येवू द्या ‘बुधवारी बालेवाडीत …
पुणे-येत्या १ जानेवारीला प्रदर्शित होणारा बहुचर्चीत ”नटसम्राट’ ‘ च्या कलावंतांचा संच आणि झी मराठीवरील ‘चला हवा येवू द्या ‘ चा जोरदार कार्यक्रम अशी पर्वणी परवा बुधवारी २३ तारखेला पुणेकरांना बालेवाडी क्रीडासंकुलात उपलब्ध झाली आहे .येथे विनोदाचे वादळ घेवून येणारे ” डॉ. निलेश साबळे , भाऊ कदम , भारत गणेशपुरे , कुशल बद्रिके ,सागर कारंडे,आणि विनीत बोंडे आज पुण्यात दाखल झाले . चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचा सध्या महारष्ट्र दौरा सुरु आहे . पनवेल पासून सुरु झालेला हा दौरा सुमारे २ महिने चालणार आहे . या पूर्वी कोल्हापूर सांगली येथे कार्यक्रम करून आल्यावर आता परवा पुण्यात हा जंगी कार्यक्रम होतो आहे .ज्याचे भाग २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी झी मराठीवर प्रदर्शित होणार आहेत . नटसम्राट मधील नाना पाटेकर , मेधा मांजरेकर , सुनील बर्वे , नेहा पेंडसे , मृण्मयी देशपांडे , तसेच महेश मांजरेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . बालेवाडी ची थुरकटवाडी कशी होते ते आता बुधवारीच समजणार आहे . दरम्यान या थुरकट वाडीतील कलाकार कुशल बद्रिके आज पुण्यात काय म्हणाला ते पहा ….
अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो मनाशी … डॉ. निलेश साबळे
पुणे- आज अमिताभ बच्चन , शाहरुख खान , सलमान खान अशी बडी बडी स्टार मंडळी जरी छोट्या पडद्यावर येण्यासाठी लक्षपूर्वक वाटचाल ठेवीत असली आणि झी टीव्ही च्या माध्यमातून ‘चला हवा येवू द्या’च्या कार्यक्रमातून जरी मी घराघरात पोहोचलो असलो तरीही … मी इथे हिरो होण्यासाठीच आलो होतो ; स्ट्रगल केला तो हिरो होण्यासाठीच … आता दिग्दर्शक झालो आहे , भविष्यात निर्माता हि होईल पण … अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पद्यावरचा हिरो होण्याचे ….असे सांगत अभिनेता निलेश साबळे म्हणाला , आयुष्यात स्ट्रगल खूप केले पण म्हणावे तसे समाधानकारक यश मिळाले नाही अशा वातावरणात झी टीव्ही ची साथ मिळाली आणि आयुष्यात आता रंगबिरंगी हवा येवू लागली आहे हे खरे आहे . आता टीव्ही वरून खूप प्रसिद्धी मिळाली आहे पण तरी हि मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो होण्याचे स्वप्न अजूनही उराशी आहेचआज निलेश साबळे ‘चला हवा येवू द्या ‘ च्या टीम सह पुण्यात आला होता . यावेळी तो बोलत होतामुळचा पुणे जिल्ह्यातील सासवडचा असलेला निलेश पुण्याबद्दल बोलताना पहा काय म्हणाला ….
‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी रोजगार निर्मीती आणि प्रशासनाचा प्रतिसाद महत्वाचा : अरुण फिरोदिया
पोलीस बिनतारी संदेश विभागात ७२८ जागांवर भरती…
पुणे-अभियांत्रिकी पदवीधारक , आय टी आय उतीर्ण, उमेदवारांसाठी राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागात नौकरीच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे पुणे पोलिसांनी कळविले आहे . एकुण ७२८ जागांवर हि भरती होणार आहे .
सहायक पोलीस उपनिरीक्षक -रेडीओ यांत्रिकी १९१ पदे, पोलीस हवालदार , बिनतारी यंत्र चालक ४३२ पदे, पोलीस शिपाई कर्मशाळा मदतनीस ५३ पदे … यावर भारती होणार असून ६ जानेवारी २०१६ हि अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे . www.maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईट वरून अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज दाखल करावेत असे पोलिसांनी कळविले आहे
सोबत पोलिसांचे पत्रक जोडले हे ते पहावे .
युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार : डॉ.रघूनाथ माशेलकर
कर्वेनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई
पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे वतीने कर्वेनगर
परिसरातील पाणंद रस्ता, कर्वेनगर स्मशानभूमी रस्ता येथील सुमारे ४६ मिळकतदारांनी अनधिकृत विनापरवाना
केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात येऊन २५३२५ चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
तसेच कारवाई अंतर्गत १ हातगाडी, ८ अन्य शेड्स, २० बोर्डस, ७ फ्लेक्स, ६२ बॅनर्स यावरही कारवाई करण्यात आली
सदरच्या मिळकतदारांनी मिळकतीच्या पुढील व मागील व लगतच्या मोकळ्या जागेत शेड, पार्टीशन, रेqलग,
ओqनग शेड या स्वरुपात अनधिकृत बांधकाम केलेले होते.
कारवाईत सहाय्यक अभियंता श्री. वायसे, श्री. देसले, अतिक्रमण निरीक्षक श्री. qशदे, श्री. मुरगुंड, श्री.
qपगळे तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.
‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची पुण्यात स्थापना इंद्रेश कुमार, शहानवाज हुसेन यांची उपस्थिती
ब्राम्हण महासंघाचे कार्य योग्य दिशेने – मोहन जी भागवत
पुणे-
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे शिष्टमंडळ दि. १६/१२/१५ रोजी नागपूर येथील संघ
मुख्यालय, महाल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांना भेटले व त्यांना
अ.भा.ब्रा.म. च्या कार्याची तपशीलवार माहिती देण्यात आली. अशी माहिती प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी येथे दिली
ते म्हणाले , महासंघाच्या कार्याचा आढावा घेतल्या नंतर मोहनजींनी ब्राह्मण महासंघाचे कार्य योग्य दिशेने
चालले आहे व ह्याच दिशेने काम चालत राहावे अशी आशा व्यक्त केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री
गोविंद कुलकर्णी व सरसंघचालक यांच्या मधे राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली.
ब्राह्मण महासंघाने ब्राह्मणांच्या हिताबरोबरच राष्ट्रातील प्रत्त्येक घटकाच्या हिताचे कार्य करावे,
देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन समोर जाण्याचे कार्य करावे असे आवाहन यावेळी मोहनजींनी केले.
सरसंघचालकांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेले वक्तव्य योग्यच होते, त्या वक्तव्याचा राजकीय
लाभाकरिता दुरुपयोग करण्यात आला असे मत ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भागवतांकडे व्यक्त केले .
या वेळी शाल व श्रीफळ देऊन महासंघाच्या वतीने सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला. या
शिष्टमंडळामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशवजी भास्करे महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत
धडफळे, उपाध्यक्ष श्री मिथिलेश पाध्ये, चिटणीस भूषण पांढरे, जिल्हा सरचिटणीस श्री आनंद घारे,
कोषाध्यक्ष श्री भूषण बाभरेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. संपदा गोडबोले उपस्थित होते.
‘दिलवाले’ने कमविले ४१ कोटी तर ‘बाजीराव’ २८ कोटीवर …२ दिवसांची कमाई
मुंबई – बाजीराव मस्तानी पेक्षा कमी प्रसिद्धी आणि कमी मार्केटिंग करूनही दिलवाले या चित्रपटाने ‘बाजीराव ‘ ला मागे टाकले आहे गेल्या दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी दिलवालेने बॉक्स ऑफिस वर ४१ कोटी ९लाख रुपये मिळविले तर बाजीराव ने २८ कोटी ३२ लाख रुपये मिळविले . बाजीराव ला झालेला विरोध हा बाजीरावची पीछेहाट होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते . संजय लीला भन्साळी यांना हा मोठा धक्का असणार आहे . शाहरुख आणि काजोल हि जोडी आताच्या तरुणाईला मानवेल काय ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते , रणवीर सिंह आणि दीपिका- प्रियांका या बॉलीवूड मधील तरुणाईला देखील काजोल आणि शाहरुख ची आज हि एवढी लोकप्रियता असल्याचे दिसून आले आहे .









