Home Blog Page 3517

जग समृद्ध करणाऱ्या मराठी माणसाला राज्याचे दालन सदैव खुले – मुख्यमंत्री

0

अमरावती : जगामध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात यशाची पताका फडकावित आहे. अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रात मराठी माणसाचे यश आपल्याला मराठीपणाचा अभिमान देत आहे. जग समृद्ध करणाऱ्या मराठी माणसाला राज्यात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. राज्याची ही दालने जगातल्या मराठी माणसासाठी सदैव खुली आहेत. त्यामुळे निश्चितच भविष्यात राज्य अशा व्यक्तीमत्वांच्या सहकार्याने समृद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जागतिक मराठी अकादमीच्यावतीने ‘शोध मराठी मनाचा संमेलन 2016’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, रवी राणा, डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदेले, वीरेंद्र जगताप, आमदार यशोमतीताई ठाकूर, महापौर श्रीमती रिना नंदा, मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उपाध्यक्ष गिरीष गांधी, डॉ. विजय जोशी, गायिका वैशाली माडे, केसरी पाटील, मंदार जोगळेकर, किशोर रांगणीकर, दीपक गेडा, सतीष राणे, मोहन गोरे, माजी आमदार बी. टी देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, बबलू देशमुख आदी उपस्थित होते.

शोध मराठी मनाचा संमेलन अमरावतीकरांसाठी पर्वणी असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, अशा संमेलनांमधून तळागाळातून पुढे आलेल्या व्यक्तीमत्वांचे विचार उलगडतात. युवा पिढीने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. समाजात एकेका क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या भरवशावर देश चालत असतो. अशा व्यक्तीमत्वांचा उलगडा संमेलनाच्या माध्यमातून होत असतो. तळागाळातील लोकांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांना वाव मिळत नाही. अशा व्यक्तींमधील गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शासन करीत आहे. ही मंडळी समाजाची ऐनकेन प्रकारे सेवाच करीत असतात.

भौतिक प्रगती झपाट्याने होत आहे. या प्रगतीमध्ये माणुसकी जपल्या गेली पाहिजे. भौतिक प्रगतीपेक्षा त्या देशाची, राज्याची बौद्धिक प्रगती किती आहे हे महत्त्वाचे ठरते. भौतिक संपदेपेक्षा बौद्धिक संपदा आवश्यक आहे. अशा राज्यातच निरपेक्ष, निकोप स्पर्धा वाढीस लागून सर्वसमावेशक प्रगती होत असते. तळागाळातून आलेले अनेक व्यक्तीमत्व समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या बळावर प्रगती करीत असतात. त्यामध्ये मराठी माणसांचा टक्का निश्चितच जास्त आहे. जगात मराठी माणूस अनेक क्षेत्रात मोठी जबाबदारी घेऊन काम करीत आहे. याचा राज्याला अभिमान आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

श्री. शिंदे म्हणाले, जगात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मराठी माणसांना एकसंघ ठेवण्याचे व दाखविण्याचे काम मराठी अकादमीने केले आहे. मराठी अकादमीची ही संमेलने म्हणजे चळवळच आहे. ही चळवळ अशीच सातत्याने पुढे सुरू राहिली पाहिजे.

श्री. पोटे म्हणाले, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी आहे. मराठीचा अभिमान त्याला असला पाहिजे. मराठी अकादमीने सुरू केलेला हा उपक्रम मराठीला आणखी उच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

कार्यक्रमप्रसंगी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठी तरूणाने जगात कुठेही उभे राहण्याची क्षमता विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान गायिका वैशाली माडे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर व शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचलन सोमेश्वर पुसदकर यांनी तर आभार प्रदर्शन निशान गांधी यांनी केले.

येरवडा मनोरूग्णालयातील सुविधांसाठी निधी देणार- डॉ. दीपक सावंत

0
पुणे : येरवडा येथील मनोरूग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या सुविधा पुरविण्यात येतील. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधीची तरतूद करू, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

डॉ. सावंत यांनी गुरूवारी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढाव बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. सावंत यांनी माहिती दिली.

डॉ. सावंत म्हणाले, राज्यात ठाणे, नागपूर, रत्नागिरी आणि पुणे येथे मनोरूग्णालये आहेत. त्यांच्या नुतनीकरणासाठी आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रूग्णालयांच्या जागावरही अतिक्रमण होत आहेत. त्यासाठी रूग्णालयाच्या संरक्षण भिंतीही उभ्या केल्या जात आहेत. येरवडा येथील रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी निधीही देण्यात आला आहे.

येरवडा येथे काही रूग्ण अनेक वर्षे आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना स्वीकारण्यात उत्सुक नसतात. अशा रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात मलेरिया, डेंग्यू यांच्या रूग्ण संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढेही साथ रोग फैलावले जाऊ नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गाची येत्या वर्षात सुमारे दहा हजार पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही सुमारे 1300 पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. कांचन जगताप, डॉ. संजीव कांबळे, उपसंचालक डॉ. बी.डी.पवार आदी उपस्थित होते.

 

वनराई आणि एशियन पेण्ट्स यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

0

पुणे – गुरुवार, दि. 31 डिसेंबर, 2015 रोजी खंडाळा तालुक्यातील (जि. सातारा) तीन शाळांमधील 500 गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना ‘वनराई’ आणि ‘एशियन पेंट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी 2000 रुपये आणि प्रमाणपत्र असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. हास्य अभिनेते मकरंद टिल्लू व ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते हा शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयात पार पडला. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वनराईचे वित्त विभाग प्रमुख श्री. सुधीर मेकल, ‘एशियन पेण्ट्स’चे श्री. महेश बारस्कर, शिक्षण समन्वय समितीचे विश्‍वस्त उदय गुजर, वनराईचे जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र घारे ‘वनराई’ मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. अमित वाडेकर आदी उपस्थित होते.

index1

लहान वयातच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार रुजावेत आणि

शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘वनराई’ आणि ‘एशियन

पेण्ट्स’च्या माध्यमातून राबविला जात असलेला शिष्यवृत्तीचा उपक्रम

अत्यंत स्तुत्य आहे. जागतिक तापमानवाढीची समस्या

सोडविण्यासाठी व मानव जात वाचविण्यासाठी कराव्या लागणार्‍या

पर्यावरणविषयक कार्यात वनराईचा मोलाचा वाटा आहे, असे मत खंडाळा

तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके यांनी व्यक्त केले.

‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया म्हणाले, ‘‘पॅरिसमध्ये पार

पडलेल्या जागतिक परिषदेतसुद्धा तापमानवाढीसंदर्भात चिंता व्यक्त

करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात पुरेशी जागृती होणे

आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांमध्ये

पर्यावरणासंदर्भात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने वनराई अनेक

शाळांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे.’’ यावेळी सातारा जिल्ह्याच्या

उपशिक्षण अधिकारी  सौ. यादव, किशोर मासिकाचे संपादक श्री. किरण

केंद्रे, हास्य अभिनेते श्री. मकरंद टिल्लू, शिक्षण समन्वय समिती,

खंडाळा विभागाचे अध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, यांनी आपल्या

भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे

प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले.

जलतरण तलाव सुरक्षितता, उपाय योजनांकरिता पुणे मनपास आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार

0

पुणे-महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहरातील जलतरण तलावावरील सुरक्षितता, करण्यात आलेल्या

उपाय योजना, जीवरक्षकांना देण्यात प्रशिक्षण याकरिता पुणे महानगरपालिकेस आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘‘कॉमनवेल्थ

प्रेसिडेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे

यु के मधील कॉमन वेल्थ हेड क्वार्टर, वॉरविकशायर येथील कॉमन वेल्थ लाईफ सेव्हींग, द रॉयल लाईफ

सेव्हींग सोसायटीचे अध्यक्ष एच आर एच प्रि़न्स मायकेल ऑफ केंट (जीसीव्हीओ) असून उपाध्यक्ष क्लाईव्ह हॉलंड आहेत .

राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी (इंडिया) चे अध्यक्ष सेवानिवृत्त रियर अ‍ॅडमिरल पुरुषोत्तम दत्त शर्मा हे

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉमनवेल्थ लाईफ सेव्हींग, द रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटीचे सदस्य असून त्यांच्या हस्ते

‘‘कॉमनवेल्थ प्रेसिडेंट अ‍ॅवॉर्ड पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. कुणाल कुमार यांनी नुकतेच प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी वानवडी येथील मनपाच्या जलतरण तलावाचे व्यवस्थापन करणारे जॉर्ज विश्वास घोलप व अन्य अधिकारी

उपस्थित होते. पुणे मनपातील मा. आयुक्त कार्यालयात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) च्या उपाध्यक्ष श्रीमती कविता

शर्मा यांनी सांगितले की, जलतरण तलावामध्ये अपघात होऊ नयेत, तरुणांचे जीव धोक्यात येऊ नये तसेच त्याकरिता

अर्थात जलतरण तलावाकरिता कार्यरत असणारे कर्मचारी, जीवरक्षक यांना प्रशिक्षण देणे, जलतरण तलाव बांधणारे

व्यावसायिक यांना मार्गदर्शन करणे, व एकूणच सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्था कार्यरत असून पुणे मनपाच्या सहकार्याने

विना मोबदला सदरची संस्था मनपाच्या जलतरण तलावावर मार्गदर्शन करणे,प्रशिक्षण देणेकरिता सन २००१ पासून

विना मोबदला कार्यरत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असून सन २०१० पासून मनपाच्या जलतरण

तलावावर अपघात, जिवीत हानी झाली नाही, आजपर्यंत सुमारे दहा हजारापेक्षा अधिक जीवरक्षकांना प्रशिक्षित करण्यात

आले असून सदरचे प्रशिक्षित जीवरक्षक संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर व देश विदेशात कार्यरत आहेत. पुणे

मनपाच्या जलतरण तलावांचा अभ्यास करुन ज्या उपाय योजना संस्थेच्या वतीने आल्या सुचविण्यात त्याबाबत पुणे

मनपाने वेळोवेळी दखल घेऊन उत्कृष्ट कामकाज केले व उत्तम दर्जा राखला आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय

स्तरावरील कॉमन वेल्थ लाईफ सेव्हिंग, द रॉयल  लाईफ सेव्हिंग सोसायटीने याबाबत माहिती मागविलेली होती. त्या

अनुषंगाने पुणे महानगरपालिकेनी महापालिकेच्या जलतरण तलावावर केलेल्या उपाय योजना, सुधारणा, जीवरक्षकांना

देण्यात आलेले प्रशिक्षण याबाबत निकषांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील संस्थेस सदरचा आंतरराष्ट्रीय

‘‘कॉमनवेल्थ प्रेसिडेंट अ‍ॅवॉर्डङ्कङ्क दिल्याचे सांगितले.

राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी (इंडिया) ही संस्था पुणे शहरात १७ वर्षे कार्यरत असल्याचे त्यांनी

सांगितले.

रेड एफ.एम च्या जाहिरातीबाबत संदीप खर्डेकर यांची तक्रार …

0

रेड एफ.एम च्या जाहिरातीबाबत भाजपचे  संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे  तक्रार केली आहे पहा नेमकी काय तक्रार केली आहे … प्रत्यक्षात पहा काय तक्रार आहे ते

प्रती,
मा.कुणाल कुमार,
आयुक्त पुणे मनपा.
विषय- रेड एफ.एम ची बेकायदा व अश्लील- फ्लेक्स व जाहिरातीबाबत…
मा.महोदय,
पुण्याच्या विविध चौकात व सिग्नल वर रेड एफ.एम ची जाहिरात (फ्लेक्स) झळकत आहे.सदर फ्लेक्स वर पुणे मनपा व पुणे पोलिसांचे बोधचिनह असुन या फ्लेक्स वर Dont be Horny-Horn nahin Red fm bajao असा मजकुर आहे.
या फ्लेक्स बाबत आकाशचिनह विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांच्याशी संपर्क साधला असता “या फ्लेक्स ला मनपा ने कोणतीही परवानगी दिलेली नाही,सदर फ्लेक्स बेकायदा लावण्यात आले असुन त्याचे कुठलेही शुल्क भरण्यात आलेले नाही” असे त्यानी स्पष्ट केले.
सदर फ्लेक्स वरील वाक्य Dont be horny हे अश्लीलतेकडे झुकणारे असुन त्याचा डिकशनरीतील अर्थ (Sexually excited,+easily aroused sexually ) असा आहे.पुण्या सारख्या सुसंस्क्रुत शहरात अश्या आशयाचे फ्लेक्स लागणे,त्यावर मनपा चे बोध चिनह असणे,त्याची परवानगी न घेणे,शुल्क न भरणे,हे मनपा च्या अकार्यक्षम कारभाराचे प्रतीक असुन,याविरुद्ध त्वरित कारवाई करावी व सदर वाहिनी कडुन दंडासह शुल्क रक्कम वसूल करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष क्रीएटिव्ह फाउंडेशन.
मो.9850999995
9823052596,

प्रत-मा.पोलीस आयुक्त.
मा.उपायुक्त वाहतूक शाखा
index

ऐका.. अदनान सामी ने भारतीयत्व मिळविलं..

0

नवी दिल्ली :ये जमीं रुक जाये …. आसमां झुक जाये … तेरा चेहरा जब नजर आये… राणी मुखर्जी ला घेवून गायलेले गाणे आठवतंय .. होय एकीकडे भारतात काही कलाकारांना अस्वस्थ वाटत असताना पाकिस्तानच्या  या  ग्रेट गायकाने आता भारतीय नागरिकत्व मिळविले आहे . पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारत सरकारनं नवीन वर्षांचं एक मोठ्ठं गिफ्ट दिलंय. अदनानला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान ‘भारतीय’ होणार आहे.भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अदनान सामी गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करत होता. अदनानच्या या अर्जाला गृह मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे, येत्या वर्षाचं स्वागत अदनान एक ‘भारतीय’ म्हणून करणार आहे. लाहोरला जन्मलेला अदनानचा १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा भारतात आला होता. 

सोमय्या ग्रेट पण , पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत उत्सुकता … ?

0
उमरगा- पुण्यात राहून असंख्य राज्यातून देशभर आपले फसवणुकीचे जाळे पसरवलेला महेश मोतेवार ला अखेर भाजपचे किरीट सोमय्या यांनी प्रामाणिकपणे सातत्यपूर्वक केलेल्या पाठपुराव्यामुळे जेलची हवा खावी लागत असून याप्रकरणी,आत्ता कुठे सुरुवात झाली आहे… गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत सोमय्या यांना मात्र हा लढा अजूनही पुढे द्यायचा आहे .. सोमय्या यांचे विविध स्तरातून कौतुक होत असले तरी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत मात्र उत्सुकता लागून आहे .
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या महेश मोतेवार याला  गुरुवार (ता. 31) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आज सकाळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोतेवारच्या समवेत  खाजगी सुरक्षारक्षक कसे होते ? आणि यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने आता येथील पत्रकार वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान ज्या पुण्यातून गुरुकृपा मार्केटिंग नावाने आपला गोरख धंदा मोतेवारने  सुरु केला त्या पुण्यातील पोलिसांची मोतेवारबाबत काय भूमिका आहे ? पुण्यात मोतेवार विरुध्द कोणते गुन्हे दाखल आहेत कि नाहीत ? असे प्रश्न निर्माण होत आहेत . 
मोतेवार याने  छातीत दु:खत असल्याचे नाटक केल्यामुळे त्यास उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरूवारी सकाळी त्यास सोलापूरला हलवण्यात येत होते,तेव्हा उस्मानाबाद शहरातील टीव्ही आणि वृत्तपत्राचे पत्रकार न्यूज कव्हर करण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात थांबले असता,महेश मोतेवार यास आयसीयुमधून अ‍ॅम्बुलन्समध्ये नेत असताना न्यूज चॅनलच्या कॅमेरामननी शुटींग सुरू केली,तेव्हा मोतेवारचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी (वय – २७, रा.बिबेवाडी,पुणे) हा झी २४ तासचे रिपोर्टर महेश पोतदार आणि टीव्ही ९ चे रिपोर्टर संतोष जाधव यांना धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली.त्यानंतर पोतदार यांनी काझी यास पकडून उस्मानाबाद शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर पोतदार आणि जाधव यांच्या तक्रारीवरून शहानूर काझी याच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की आणि अरेरावीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गृह राज्यमंत्री यांना निवेदन पाठवून काझी याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
“समृद्ध जीवन‘चा  सर्वेसर्वा महेश मोतेवार ला उस्मानाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 28) पुण्यातून ताब्यात घेतले होते  तात्यासाहेब शिवगौंडा पाटील (रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शिवचंद्र सायबण्णा रेवते (रा. येणेगूर, ता. उमरगा), सरोजा शिवचंद्र रेवते (रा. पुणे), प्रमोद पुजार (रा. पुणे) व महेश किशन मोतेवार (रा. पुणे) या चौघांविरुद्ध उमरगा येथील सहदिवाणी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाने चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मुरूम (ता. उमरगा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता; मात्र मोतेवार पोलिसांना सापडत नसल्याने मुरूम पोलिसांनी त्यांना फरारी घोषित केले होते. उस्मानाबाद गुन्हे शाखा पथकाने गेल्या सोमवारी दुपारी मोतेवार ला पुणे येथून ताब्यात घेतले.
दरम्यान आता मोतेवार ला जिथेजिथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या त्या ठिकाणांहून पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.

 

नवीन वर्षात खूप अॅडव्हेचर ट्राय करणार -अभिनेत्री अमृता खानविलकर

0

अभिनेत्री –  अमृता खानविलकर म्हणाली ,’

मी दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. नवीन काही तरी शिकते. तसंच येत्या वर्षात देखील मी नवीन अॅडव्हेचर करणार आहे. स्कूबा डायविंग, स्काय डायविंग अशा भन्नाट अॅडव्हेचर प्रकार मला माझ्या मित्र-मैत्रिणीसोबत एन्जॉय करायचं आहे.  नुकतीच आमची वन वे तिकीट सिनेमाची टीम स्पेन, इटली आणि फ्रांसमध्ये क्रूझवर शूट करून तो अनुभव देखील खूप मस्त होता.त्याठिकाणी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.

नवीन वर्षाचा सूर्योदय कुटुंबासोबत पाहणार..राकेश बापट

0

 

यंदाच्या वर्षी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आमच्या फार्महाऊसवर एकत्र जमून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. असे अभिनेता राकेश बापट याने सांगितले , तो म्हणाला ,’ माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवल्याचाही आनंद आणि नव्या वर्षाचं सेलेब्रिशन करता येईल. नवीन वर्षातील पहिल्या दिवसाचा सूर्योदय पाहण्याचा आम्ही बेत आखला आहे. त्याचसोबत २०१६ वर्षाचं रिजोल्यूशन सुद्धां मी केलं आहे. यावर्षी मी माझ्या कामाचं आणखी चांगल्यारीतीने प्लानिंग आणि त्याचं काटेकोर पद्धतीने पालन करणार आहे. गेल्या वर्षी माझं शेड्यूल्ड खूप मोघम होतं ज्यामुळे माझी रोजची कामं बऱ्याच प्रमाणात विस्कळीत होती. त्या गोष्टीची काळजी मी यावेळेस पुरेपूर घेणार आहे. येत्या वर्षात ५ फेब्रुवारी रोजी माझा ‘वृंदावन’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात मी पहिल्यांदाच अॅक्शनसीन दिले आहे जे पाहताना प्रेक्षकांना राकेश बापट एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळेल.

 

28 व्या ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये आपत्कालीन मदत कार्यासाठी ‘डायल 108 रूग्णवाहिका तैनात

0
पुणे :
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या रूग्णवाहिका 28 व्या ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेतील आपत्कालीन मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा दिनांक 30 डिसेंबर 2015 ते 9 जानेवारी 2016 या कालावधीमध्ये ‘आर्मी इन्स्टिटुट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’, रामटेकडी येथे तसेच दिनांक 3 ते 9 जानेवारी 2016 या कालावधीमध्ये ‘सणस ग्राऊंड’, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. रामटेकडी येथे आयोजित स्पर्धेच्या ठिकाणी ‘डायल 108 सेवेच्या 10 रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, ‘सणस ग्राऊंड’ येथील स्पर्धेच्या ठिकाणी 1 रूग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
स्पर्धेदरम्यान तैनात करण्यात येणार्‍या रूग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक आणि आपत्कालीन प्रसंगी लागणारी औषधे असणार आहेत. पोलीसांमध्ये ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेची जनजागृती होण्यासाठी तसेच स्पर्धेतील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य देण्याच्या प्रमुख उद्देशाने या रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी ‘आर्मी इन्स्टिटुट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’, रामटेकडी, हडपसर येथे सुरू झालेल्या या स्पर्धांदरम्यान फुटबॉल स्पर्धेतील स्पर्धकाला अचानक झटका (लेर्पीर्ींश्रीळेप) आल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. रूग्णाला डायल 108 सेवेच्या रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली. रूग्णवाहिकेद्वारे नजीकच्या वानवडी शिवरकर रूग्णालयात दाखल करण्यात आले, असे देखिल डॉ. सोमवंशी यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे डॉ.भूषण सोमवंशी (जिल्हा व्यवस्थापक), डॉ. राहुल गांधले, डॉ. सुनील वायदंडे, डॉ. अर्चना धडस, सागर थावरे, सुधीर कांबळे यांनी सहकार्य केले आहे.
पोलीसांमध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या डायल 108 रूग्णवाहिका सेवेची जनजागृती होण्यासाठी तसेच स्पर्धेतील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य देण्याच्या प्रमुख उद्देशाने या रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे डॉ.भूषण सोमवंशी यांनी सांगितले.
‘अपघात’, ‘जळीत’, ‘विषबाधा’, ‘हदयविकार’, ‘अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ‘डायल 108’ रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.
rsz_1logo-for-portal

इयत्ता 5 वी आणि 8 वीची परीक्षा अनिवार्य करावी- विनोद तावडे

0

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी आणि 8 वीची परीक्षा अनिवार्य करावी, निरंतर व सर्वसमावेशक मूल्यांकना(सीसीई)बाबत शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यावर भर देण्यात यावा, आदी महत्त्वाच्या सूचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केल्या.

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळांतर्गत शालेय शिक्षणाबाबत ‘विना अडथळा धोरणावर’(नो डिटेंशन पॉलिसी) फेरविचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या उपसमितीच्या बैठकीत श्री. तावडे बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आज इंडिया हॅबीटॅट येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी होते. मध्यप्रदेशचे शिक्षणमंत्री पारसचंद्र जैन, उत्तराखंडचे शिक्षणमंत्री मंत्रीप्रसाद निथानी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उपसचिव अनामिका सिंह यांच्यासह अन्य राज्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

केंद्राचे शिक्षणाबाबतचे ‘विना अडथळा धोरण’ अतिशय चांगले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काही बदल राज्यांकडून मांडण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने सूचना मांडताना श्री. तावडे म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणाचा मुख्य उद्देश सार्थ होण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. निरंतर व सर्वसमावेशक मूल्यांकनांतर्गत विद्यार्थ्यांचे कशा प्रकारे मूल्यांकन करण्यात यावे याची माहिती शिक्षकांना देण्यात आली पाहिजे. ‘डीएड’ आणि ‘बीएड’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, असे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांची इयत्ता 5 वी आणि 8 वीत परीक्षा घेण्यात यावी जर त्यात तो विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास पुन्हा एक महिन्याने त्याची परीक्षा घेतली पाहिजे. ही परीक्षा तो उत्तीर्ण न झाल्यास त्याला पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येऊ नये त्यामुळे विद्यार्थी कच्चा राहणार नाही व शिक्षणाचा दर्जाही राखला जाईल, असे मत श्री. तावडे यांनी मांडले.

शालेयस्तरावर विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणाबाबत ‘विना अडथळा धोरणाचा’ फेरविचार करण्यासाठी बोलविलेल्या या बैठकीत विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांची गळती कमी करताना त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. विद्यार्थ्यांची पहिली ते चौथी दरवर्षी परीक्षा घेण्यात यावी. त्याला पुढल्या वर्गात प्रवेश द्यावा. मात्र, 5 वी व 8 वीत विद्यार्थ्यांना परीक्षा अनिवार्य करण्यात यावी, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. पुढील आठवड्यात विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा समावेश असलेली ही उपसमिती आपला अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सोपविणार आहे.

रविवारी दुपारी झी मराठी वर मंगेश पाडगावकरांचे ‘नक्षत्रांचे देणे’

0

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’… जगण्याबद्दलचं तत्वज्ञान अशा सहज सोप्या भाषेत मांडत मराठी कवितेला आणि साहित्याला समृद्ध करणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मराठी मनांना चटका लावून गेले. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला सहज हात घालेल अशी कविता कशी लिहावी आणि ती कशी सादर करावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पाडगावकर. मराठी रसिकांना अनेक अर्थपूर्ण, भावपूर्ण, प्रेमाच्या कविता त्यांनी दिल्या. समाजव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणा-या, कोपरखळी मारणा-या मिश्किल कविता त्यांनी दिल्याच सोबतीला डोळ्यात अंजन घालणा-या झणझणीत शब्दांचे वारही त्यांनी केले. प्रत्येक प्रेमी युगलांच्या मनात रुंजी घालणारे अनेक प्रेमगीतेही पाडगावकरांचीच देण. त्यांच्या निधनाने या भावनांचा प्रवासही थांबला असला तरी त्यांच्या कविता आणि गीतांमधून त्यांचं अस्तित्व, त्यांच्या आठवणी कायमच आपल्यासोबत राहतील. त्यांच्या याच कविता आणि गीतांचा प्रवास झी मराठीने ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमामधून मांडला होता. या महान कविला भावपूर्ण आदरांजली म्हणून हा कार्यक्रम येत्या ३ जानेवारीला झी मराठीवरून दुपारी १ वा. प्रसारित करण्यात येणार आहे.

सचिन खेडेकर, अमृता सुभाष, विभावरी देशपांडे, अशोक बागवे यांचं निवेदन आणि सोबतीला कविता वाचन अशी ही मैफील आहे. हृषिकेश कामेरकर, रंजना जोगळेकर, अमेय दाते आणि इतर गायकांनी सादर केलेली ‘शुक्रतारा मंदवारा’, ‘जेव्हा तिची नी माझी’, ‘श्रावणात घननिळा’, ‘जेव्हा तुझ्या बटांना’ यांसारखी एक ना अनेक गाणी यात बघायला मिळतील. पाडगावकरांच्या कवितांचा भावार्थ समजावून सांगणा-या गोष्टी, त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारे किस्सेही यातून बघायला मिळतील तेही श्री.पु. भागवत, प्रा. शंकर वैद्य, यशवंत देव सारख्या दिग्गजांकडून. आणि या सर्वांसोबतच खुद्द पाडगावकरांनी सादर केलेल्या कविताही यात बघायला मिळतील हे विशेष. मराठी साहित्यातील या महान कविला त्याच्याच शब्दसुमनांनी वाहिलेली ही आदरांजली त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ठरेल.

mangesh-padgaonkar

शब्द आणि भावनांचा जादूगार काळाच्या पडद्याआड – आमदार वळसे पाटील; सकारात्मक जीवनविचार हलक्या फुलक्या शब्दात मांडणारा कवी हरपला – खासदार वंदना चव्हाण

0

मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने
शब्द आणि भावनांच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा जादुगार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात आमदार दिलीप वळसे- पाटील  यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            श्री. वळसे – पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणतात, साध्या शब्दात जीवनाचे सौंदर्य मांडणारे श्री. पाडगावकर हे प्रेम भावना कवितेतून व्यक्त करतांना तरुणाईच्याच भावनांना थेट  हात घालत.
प्रेम, जीवन त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येकासाठी श्री . पाडगांवकर विचार करत होते. त्यांच्या कवितेनं प्रस्थापित व्यवस्थेविरोधातही कठोर प्रहार केले. सत्तरीच्या दशकातील त्यांची सलाम ही कविता हा त्यांच्यातल्या विद्रोही कविचा अविष्कार होता.
‘या जन्मावर , या जगण्यावर , शतदा प्रेम करावे, असे सांगणारे श्री.  पाडगांवकर हे आयुष्यभर कविता,  साहित्याची सेवा करत राहिले. अशा या शब्द आणि भावनांचा जादुगार काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी साहित्याचे अगणित नुकसान झाले आहे. अशा या कविवर्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

सकारात्मक जीवनविचार हलक्या फुलक्या 
शब्दात मांडणारा कवी हरपला – खासदार वंदना चव्हाण
प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने धक्का बसला. अत्यंत, सकारात्मक जीवन विचार हलक्या फुलक्या कवितेत मांडणारा आणि कविता सर्व स्तरात लोकप्रिय करणारा हा महान कवी हरपला याचे विलक्षण दु:ख आहे. त्यांना विन्रम श्रद्धांजली.

mangesh-padgaonkar

पिंपरी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान; शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

0

पुणे- 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) मैदानावर भरणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन 16 जानेवारी रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आज  पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रथम ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 माधवी वैद्य यांनी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला. 15 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ग्रंथदिंडी निघणार असून दिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर मुळे, गिरीश प्रमुणे आणि डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी पावणेपाच वाजता डॉ. माधवी वैद्य आणि पी. डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता ग्रंथप्रदर्शनाचे 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

 संमेलनाचे उद्‌घाटन 16 जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ गीतकार गुलझाल, पालकमंत्री गिरीश बापट, सदानंद मोरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथ सिंह, सीताकांत महापात्र हे उपस्थित राहणार आहेत.

 संमेलनामध्ये विविध विषयांवरील 11 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगनगरीत संमेलन भरत असल्यामुळे ‘मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय अभिजात कथावाचन, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत लेखकांशी संवाद, बहुभाजिक कविसंमेलन, ज्येष्ठ गायिका आशा भोसले संगीत रजनी, तरुणांसाठी खास चेतन भगत यांच्याशी संवाद, मुलांसाठी मामाच्या गावाला जाऊया या कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह गुलझार, शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या मुलाखती होणार असून उपस्थितांना संदीप वासलेकर, ज्ञानेश्वर मुळे, श्रीनिवास दैठणकर, अच्युत गोडबोले यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

 संमेलनाचा समारोप 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आणि ज्येष्ठ कवी व गीतकार जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप समारंभानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी कार्यक्रम होणार आहे.

मंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते सन २०१६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

0

पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्यावतीने  अखिल मंगळवार पेठ येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते सन २०१६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी केली आहे .

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर ,माजी नगरसेवक दिलीप उंबरकर ,बांधकाम व्यावसयिक शरदप्रकाश अडोकिया , माजी नगरसेवक मनीष साळुंके ,  पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे सरचिटणीस  चरणजितसिंग सहानी , जयप्रकाश पुरोहित , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेशभाऊ आल्हाट , उध्वव मराठे , अशोक खंडागळे , दिनेश सामल , अमित चव्हाण ,  उमेश शिंदे , पवितसिंग सहानी , गोरख घोडके , युसुफ शेख , दत्ता पोळ , गोरख दुपारगुडे , कैलास पिसाळ , प्रताप सावंत , विशाल दरेकर , भिकन सुपेकर , सुरेश दरेकर , धनेश साबळे , शंतनू जावळे आदी मान्यवर उपस्थित होते .

या दिनदर्शिका रंगीत बारा पाणी असून  सुमारे पाच हजार प्रती छापण्यात आलेले आहे . या दिनदर्शिका अखिल मंगळवार पेठ , सोमवार पेठ , रास्ता पेठ येथे वाटप करण्यात येणार आहे . अशी माहिती दिनदर्शिकेची निर्मितीकार  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी दिली .

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , सतीश गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद आहे . सर्वाना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे . त्यांचा प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्क दांडगा आहे

 या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सतीश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन जयप्रकाश पुरोहित यांनी केले तर आभार  उध्वव मराठे यांनी मानले .