Home Blog Page 3302

उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी

0

मुंबई :  महाराष्ट्राचे आद्य क्रांती कारक उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी या मागणीसाठी रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.  संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह गृह राज्य मंत्री राम शिंदे यांनी  रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्याची ग्वाही दिली.  तसेच उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे ही मान्य केले.

इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर  रोजी  सर्वत्र साजरी केली जाते.  उमाजी नाईक यांची जयंती सरकारच्या वतीने साजरी व्हावी अशी रामोशी समाजाची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती. मात्र गेली अनेक वर्ष प्रयत्न करूनही सरकारी पातळीवर उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली जात नव्हती.  याबाबत आज .  याबाबत मुंबईतील आझाद मैदानात रामोशी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाची मंत्री गिरीश बापट  यांनी मा. मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली. या  चर्चेत  येत्या सात सप्टेबर रोजी साजरी होणारी क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती सरकारी इतमामाने आणि सरकारी खर्चाने साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्याच प्रमाणे पुरंदर येथे असलेल्या उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी सरकारच्या वतीने निधी मिळावा अशी ही  मागणी होती.   मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत  १ कोटी रुपयांचा जाहीर केला. तर  जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे श्री बापट यांनी मान्य केले.

रामोशी समाज सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा अशी ही शिष्टमंडळाची मागणी होती.  या बाबत ही शासनाकडून सकारात्मक प्रयत्न करण्याचे मान्य करण्यात आले.

श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते अ.ब.क चित्रपटातील स्फुर्ती गीताचे लोकार्पण

0

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित अ. ब. क या बहुचर्चित चित्रपटातील स्फुर्ती गीताचा लोकार्पण सोहळा नुकताच बेंगलोर येथे ‘आर्ट ऑफ लिविंग’चे सर्वेसर्वा गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल मा. किरण बेदी व मा. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या.

 

महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून प्रत्येक भारतीयाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाचा एक भाग बनला पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेद विसरून आपण मुलींच्या विकासासाठी कटीबद्द झालो पाहिजे; असे मत श्री. श्री. रविशंकर यांनी व्यक्त केले. चित्रपट निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा विषय निवडला त्याबद्दल श्री. श्रीनीं त्यांचे विशेष कौतुक केले

 

राज्यपाल किरण बेदी आपल्या भाषणात म्हणाल्या, की एक कर्तृत्ववान महिलाच कर्तुत्वान पुरुषाला जन्म देवू शकते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने महिलांच्या विकासाचा आणि तीच्या प्रगतीचा ध्यास घ्याला हवा. मुलगी शिकली प्रगती झाली एवढे म्हणून चालणार नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावायला हवा. त्याच बरोबर या प्रसंगी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आज मुलींचा टक्का कमी होत चालला असून ही चिंतेची बाब आहे. अ.ब.क सारख्या चित्रपटातून प्रबोधन झाल्यास महिला सबलीकरणास चालना मिळू शकेल.

 

‘पेटून उठू दे आज एक ज्वाला’ हे अश्विनी शेंडे यांचे मराठी तर ‘बंद थे जो बंद थे, जो मुझमें सारे, खुल गये हैं’ हे शामराज दत्ता यांचे हिंदी गीत प्रसिद्ध संगीतकार बापी – टूटूल यांनी संगीतबद्ध केले आहे. आणि दोन्ही गीतांचे पार्श्वगायन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

श्री. श्री. रविशंकर यांच्या आश्रमातील प्रचंड जनसमुदायाच्या समवेत अ.ब.क चित्रपटातील स्फुर्ती गीताचा सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील नायक लायन फेम सनी पवार, साहिल जोशी, आर्या घारे, दीपाली बोरकर या कलावंतास निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी, दिग्दर्शक – रामकुमार गोरखनाथ शेडगे, लेखक – आबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

‘चले जाव’चळवळीचा इतिहास जागवण्याचा प्रयत्न (व्हिडीओ)

0


पुणे- ८ ऑगस्ट १९४२ ला कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या विरोधात ‘चले जाव ‘ च्या आंदोलनाचा निर्णय घेतला . आणि तेव्हापासून सुरु झाला स्वातंत्र्यासाठी अंतिम टप्प्यातील लढा … या लढया च्या आठवणी जागे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेस च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज निवृत्त ले . जनरल मोती धर यांच्या हस्ते झाले . हे प्रदर्शन ९ ऑगस्ट अखेर पर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे .
कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे , तसेच म. वि अकोलकर ,अभय छाजेड, मोहन जोशी , अविनाश बागवे,अजित दरेकर,
राजूशेठ डांगी ,अमित बागुल ,चंद्रशेखर कपोते ,विठ्ठल थोरात, रवी म्हसकर, रवींद्र भिंगारे, संजय सोनावणे,अरुण गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माणुसकी जपण्यासाठी संस्कार जपणे आवश्यक : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : संस्कार नाही मिळाले तर माणसातील माणुसकी संपेल. माणुसकी जपण्यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. रक्षाबंधन सारख्या कार्यक्रमातून असे संस्कार आपण कायमच जतन करत असतो. त्यामुळे एकत्रित येऊन  सण उत्सव साजरे केले पाहिजेत. असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कसबा मतदार संघात आज सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी वैशाली नाईक, अश्विनी पवार, आशा शिंदे, सुनिता भागवत, निर्मला कदम, मदिना तांबोळी, अशोक  येनपुरे,नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत, योगेश समेळ, हेमंत रासने, सुलोचना कोंढरे सम्राट थोरात, अजय खेडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री बापट म्हणाले, सफाई कामगार हे परिसर स्वच्छ करण्याचे काम करत असतात. त्यांच्याविषयी आदर असलाच पाहिजे. मात्र समाजाची अजूनही अशी मानसिकता दिसून येत नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे. स्वच्छता ही सर्वांसाठी गरजेची आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत सर्वांनी मिळून हे काम केल पाहिजे. तरच आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल.

हिंदू संस्कृतीमध्ये  साजऱ्या होणाऱ्या सन उत्सवा पाठीमागे एक तत्वज्ञान आहे. म्हणूनच इतर देशांच्या पेक्षा आपली संस्कृती वेगळी आहे. या संस्कृतीचे पावित्र्य  टिकवण्यासाठी हे सण आपण साजरे करत असतो. आज  महिलांना सर्व क्षेत्रात समान  संधी उपलब्ध झाली आहे. तरीही त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. हे प्रोत्साहन देउन त्यांच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी भाजप सरकार कायमच प्रयत्नशील असते. महिलांच्या प्रगतीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर महिला अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करतील असा विश्वास हि त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रास्तविक वैशाली नाईक यांनी केले. ओवाळणी म्हणून आपला परिसर स्वत:  स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांसोबत काम करणार असल्याचे त्यांनी प्रास्तविकात सांगितले.  आभार क्रांती ठाकूर यांनी मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रक्षाबंधन फोटो पहा …

0

नवी दिल्ली -पंतप्रधान कार्यालयाकडूनआज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे फोटो  ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. , ज्यात १०३ वर्षांच्या वृद्ध महिलेनेआणि लहानग्या मुलींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे.

 

१०३ वर्षांच्या शरबती देवी यांना मोदींना भेटण्याची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत मोदींना पत्रही लिहिले होते. त्यानुसार मोदींनी शरबती देवींना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. शरबती देवी या आपल्या कुटुंबासमवेत मोदींच्या निवासस्थानी पोहोचल्या, त्यांनी यावेळी मोदींना राखी देखील बांधली. ५० वर्षांपूर्वी शरबती देवींच्या भावाचं निधन झालं होतं.  रक्षाबंधनच्या सणाला त्यांना नेहमीच आपल्या भावाची आठवण यायची.आज तब्बल पन्नास वर्षांनंतर त्यांनी मोदींना भाऊ मानून रक्षाबंधन संपन्न केले .

आज सकाळीच दादा -ताई चे रक्षाबंधन संपन्न

0

मुंबई- आज सोमवारी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर भावाला राखी बांधायची किंवा नाही, याबद्दल अनेक बहिणींच्या मनात साशंकता होती. त्यामुळे अनेकजणांनी रविवारीच रक्षाबंधन साजरे केले होते. मात्र, आजही अनेक भाऊ आणि बहिणी राखीपोर्णिमेचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज रक्षाबंधन सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत सुप्रिया सुळे त्यांचे बंधू व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधताना दिसत आहेत.आज सकाळीच ९ च्या आत त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला .आणि हौसेने आपले फोटो ट्विटर वर शेअरदेखील केले .

‘नंदिनी अंजली’ बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या ‘संगीत सम्राट’!!

0

मराठी संगीत क्षेत्रातील अभूतपूर्व टॅलेंट शो, ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील ‘नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड’ या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला. या दोन्ही बहिणींनी सुरुवाती पासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या सादरीकरणाला आदर्श आणि क्रांती या दोघांनीही उभे राहून कौतुक केले होते. जस जसा कार्यक्रम अंतिम सोहळ्याकडे वाटचाल करू लागला तसतसे ‘नंदिनी अंजली’ यांचा संगीत सम्राट बनण्याचा दावा बळकट होऊ लागला होता. महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती.  शात्रीय संगीताचा वारसा  लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळे परफॉर्मन्सच्या आधारे आपले सांगीतिक क्षेत्रातील अष्टपैलुत्व दाखवुन दिले. महा अंतिम सोहळ्यात या दोन्ही बहिणींनी सुधीर फडके यांची गाणी, बहारदार आणि तेवढ्याच निरागस पद्धतीने स्वरबद्ध करीत परीक्षकांना आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती दिली. महाअंतिम सोहळ्याला  इतर स्पर्धकांनी सुद्धा चांगले प्रदर्शन केले. मात्र परीक्षकांना शेवटी ८ मधून केवळ ३ स्पर्धक निवडायचे होते. आणि त्यातूनही एक संगीत सम्राट निवडायचा होता. सर्वांच्याच अतिशय उत्तम सादरीकरणामुळे परीक्षकांनी बरीच चर्चा करून उत्कृष्ट आणि सर्वोकृष्ट स्पर्धकांची निवड केली. निकाल जाहीर करताना परीक्षक सुद्धा एका तणावात होतेच पण स्पर्धक आणि त्यांच्यावर प्रेम करणारा संपूर्ण महाराष्ट्र ‘कोण होणार महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट? ‘ या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुर झाला होता. आणि शेवटी ती वेळ आली. क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम तिसऱ्या क्रमांकाचे नाव जाहीर केले ते होते जेजुरीचा ‘प्रथमेश मोरे’. दुसरे नाव म्हणजेच मुंबईच्या ‘दंगल गर्ल्स’ यांचे नाव आदर्श शिंदे जाहीर केले आणि शेवटी महाराष्ट्राच्या पहिल्या ‘संगीत सम्राट’ चे नाव ‘विशेष परीक्षक’ म्हणून उपस्थित असलेले मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते ‘श्री. सचिन पिळगावकर’ यांनी जाहीर केले आणि ते होते ‘नंदिनी अंजली’

 

आदर्श आणि क्रांती हे दोघेही महाराष्ट्राच्या पहिल्या ‘संगीत सम्राट’ झालेल्या ‘नंदिनी अंजली ‘ चे अभिनंदन करताना म्हणाले “महाराष्ट्राचा पहिला ‘संगीत सम्राट’ निवडणं हे आमच्यासाठी सुद्धा एक मोठे आव्हान होते. पण आम्ही सुद्धा अतिशय निपक्षपातीपाने होऊन, स्पर्धकांचे संगीताच्या सर्व स्तरावर परीक्षण करीत , योग्य स्पर्धक निवडला जाईल असे कटाक्षाने पाहिले. भविष्यकाळात या दोघीही महाराष्ट्रभर संगीताच्या क्षेत्रात नक्कीच नावाजल्या जातील.” सचिन पिळगावकर यांनी त्यांची भावना व्यक्त करताना सांगितले, की ” या दोन्ही लहान मुली महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या संगीताचे भविष्य आहेत. ‘नंदिनी अंजली’ या दोघीनींही असेच पुढे जात प्रेक्षकांना त्यांच्या गायनाने सुखद अनुभव द्यावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे “. झी युवा आणि झी टॉकीज चे व्यवसाय प्रमुख ‘बवेश जानवलेकर’ यांनी ‘संगीत सम्राट’ च्या महा अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने सांगितले की, ” झी युवाने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढत महाराष्टातील उत्तोमोत्तम कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ दिले. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, यानिमित्ताने आणि कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने झी युवा या वाहिनीने ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाची निर्मिती केली.’नंदिनी अंजली’ यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोनं केले आणि संगीत सम्राट या कार्यक्रमामुळे, झी युवा या वाहिनेने महाराष्ट्राला दोन उत्तम भावी पार्श्वगायिका दिल्या आहेत.  संगीत सम्राट या कार्यक्रमात फायनल पर्यंत पोहचलेला प्रत्येक स्पर्धक मग तो गायक किंवा वादक असो, त्यांच्या गुणवत्तेला दाद देत, स्पर्धेचा निकाल जाहीर होण्या आधीच मराठी कलाक्षेत्रातून कामाच्या विविध संधी उपलबध झाल्या आहेत.”

 

झी युवा वाहिनीवर रविवार दिनांक ६ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता या लोकप्रिय कार्यक्रमाचे प्रसारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या कार्यक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. परीक्षक आणि प्रेक्षकांच्या साक्षीने, इशिता विश्वकर्मा, मानस गोसावी, संगीत फॅक्टरी, इमोशन्स बँड, प्रथमेश मोरे, रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स  या ८ ही फाइनलिस्टच्या संगीत सम्राट च्या किताबासाठीचा अंतिम सोहळा दिमाखात रंगला. त्याच प्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी कार्यक्रमातील निवेदनाची भूमिका उत्तम सांभाळली.आजचा आघाडीचा लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा महा अंतिम सोहळ्याचा विशेष निवेदक होता. निवेदनात विविधता आणत स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक यांचे उत्तमरीत्या मनोरंजन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राटाचे विजेतेपद पटकाविल्यामुळे आता महाराष्ट्रतील संगीतरसिकांच्या कौतुकाच्या या दोन्ही बहिणी धनी झाल्या आहेत.

मुंढवा आणि घोरपडी पोलिस ठाण्यामध्ये पोलिस बांधवाना राख्या बांधल्या

0

पुणे-रक्षाबंधनानिमित्त रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था व शेतकरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढवा आणि घोरपडी पोलिस ठाण्यामध्ये पोलिस बांधवाना महिलांनी राख्या बांधल्या . या कार्यक्रमाचे संयोजन रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अल्पना देशमुख व शेतकरी महिला संघटनेच्या अध्यक्षा नंदा जाधव यांनी केले होते . या कार्यक्रमास आशा पाटील , कर्लिन अँथोनी , सुरेखा चितारे , सारिका साळवी , रोमिला पवार , लता गायकवाड , मनिषा चव्हाण , दीपा नलावडे , सपना जाधव व नितीन साळवी आदी उपस्थित होते .

पुणे रॉयल ग्रुप व लीलाबाई कपूरचंदजी राठोड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पुणे शहरामधील विविध सामाजिक संस्थांना नॅपकिन्स , सतरंज्या , राख्या व मिठाई भेट

0

पुणे

रक्षाबंधनानिमित्त पुणे रॉयल ग्रुप व लीलाबाई कपूरचंदजी राठोड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पुणे शहरामधील विविध सामाजिक संस्थांना नॅपकिन्स सतरंज्या राख्या व मिठाई भेट देण्यात आली  . शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थामध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता होती त्यानिमित्त रक्षाबंधन सणाचे औचित्यसाधून हि मदत करण्यात आली अशी माहिती पुणे रॉयल ग्रुपचे संस्थापक नितीन जैन यांनी दिली .

यावेळी विमल संघवी , नितीन जैन , संतोष राठोड , तुषांत  राठोड , हिराचंद राठोड महावीर पारेख , संतोष परमार , राजू नाणेचा , हितेश जैन , नरेंद्र ओसवाल , जीवन शहा , कल्पेश जैन , सुनिल जैन , बाळा ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी विमल संघवी यांनी सांगितले कि, आजच्या पवित्र रक्षाबंधन या सणानिमित्त पुणे शहरामधील सामाजिक संस्थांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत , जेणे करून हा सणाचा आनंद सर्वाना मिळावा . आणि आम्हा सर्वांचे पुण्य एकत्र बांधले जावे . पुणे रॉयल ग्रुपची स्थापना आजच्या जगात एकमेकांना शहरामधील विविध भागातील १०७ परिवारास एकत्र करून स्थापना करण्यात आली . या माध्यमातून स्नेहसंमेलन, समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात .

मका उत्पादन करणाऱ्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सी.पी. सीडसशी(थायलंड) सामंजस्य करार

0

–       सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास होणार मदत

–       कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाची सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन यांच्या पुढाकाराने सामंजस्य करार

 

पुणे: राज्य कृषि व पणन विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) तयार झालेल्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मका उत्पादनासाठी सी.पी. सीडस(थायलंड) या मका प्रक्रिया करणाऱ्या खाजगी कंपनीशी सामंजस्य सहकार्य करार केला. एमएसीपीच्या कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाची सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला.

नमामि चंद्रभागा ‘भीमाशंकर ते पंढरपूर यात्रा प्रारंभ

0

हुतात्मा राजगुरुंना राजगुरुनगरमध्ये नमन !

पुणे :

भीमा नदीच्या उगमापासून (भीमाशंकर) ते विजापूर अशी ‘नमामि चंद्रभागा- जल साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. दिनांक ७ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान हुतात्मा राजगुरू यांना राजगुरूनगर येथे नमन करण्यात आले. उगमस्थानी पूजा करुन यात्रेला आशीर्वाद घेतला. तसेच भीमाशंकर जंगलातील झाडांना राख्या बांधण्यात आल्या.

जल बिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद सिह म्हणाले, ‘माझ्या आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चर्चेतून जलसाक्षरता केंदाची कल्पना पुढे आली. आणि ती पूर्ण झाली. ‘

भीमाशंकर येथे डॉ. राजेंद्रसिंह यांनी उपस्थितांना सह्याद्री पर्वत हिरवागार ठेवण्याची, भीमा नदी स्वच्छ ठेवण्याची शपथ दिली. तहसिलदार सुनील जोशी, वनाधिकारी स्वाती जमदाडे, नरेंद चुघ, जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, संजय यादवराव, ‘जलबिरादरी’चे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष  विनोद बोधनकर, सुहास पटवर्धन उपस्थित होते. ‘नमामी चंद्रभागा ‘ पुस्तिकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन

0
पुणे –
 समाजाच्या रक्षणासाठी  सतत दक्ष असणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावताना वेळेचे बंधन नाही पर्यायाने कुटुंबासमवेत सण साजरा करताही येत नाही. सतत ताणतणावात असणारे पोलीस मात्र दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या  रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे तणावविरहित दिसले. 
समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलॆल्या पोलीसबांधवाना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी  सरचिटणीस अमित बागुल यांच्या पुढाकाराने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पाटील  ,गुन्हे शाखेचे इंदलकर , पीएसआय जाधव, संयोजक अमित बागुल  आणि पोलीसवर्ग उपस्थित होता. 
आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भगिनींना   दिले. 
… आणि उपस्थितही गहिवरले !
  रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी ‘ते’ येताच आई-वडिलांविना पोरकी असलेल्या  मुलां -मुलींनी  आमचे  भाऊ आले हे उदगार काढताच उपस्थित काही काळ गहिवरले. खाऊ , भेटवस्तू आणि गप्पा यात ही मुले त्यांचा दुर्धर आजारही काही क्षणासाठी विसरूनही गेले.  येवलेवाडी -कात्रज येथील ममता फौंडेशनच्या आश्रमातील दुर्धर आजाराने ग्रस्त मुलींसमवेत   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस अमित बागुल आणि कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन साजरी केली.

आदिवासी जीवन संस्कृतीवरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन जागतिक आदिवासी दिनी ९ ऑगस्टला उद्घाटन

0
पुणे :
 मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील १६ राज्यांमधील १२५ आदिवासीं जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इको फ्रेंडली वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ ऑगस्ट रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत शोभा धारीवाल (‘रसिकलाल एम.धारीवाल फाऊंडेशन’च्या विश्‍वस्त) यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ‘रिजनल अ‍ॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’)चे अध्यक्ष दिनकर शिलेदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
‘रिजनल अ‍ॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’) आणि ‘बालमुद्रा डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच ‘रसिकलाल एम. धारिवाल फाऊंडेशन’ च्या सहाय्याने आयोजित हे प्रदर्शन दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळात ‘राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी’, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड येथे आयोजित केले गेले आहेे. प्रदर्शन विनामुल्य आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या ‘हेडगेअर्स’ आणि ‘टॅटू’ चे विविध पैलू पाहायला मिळणार असल्याचे श्री.परांजपे यांनी सांगितले. पूर्वा परांजपे यांनी छायाचित्रांना शीर्षक देण्याचे काम पाहिले आहे.
आदिवासींची पेंटिग्ज, मनोरंजक चित्रे तसेच इतर वस्तू, केन, बांबू, ‘पाम ट्री’ च्या पानापासून तयार केलेल्या वस्तू, सवाई ग्रास, गोल्डन ग्रास पासून बनविलेल्या छोट्या छोट्या वस्तू, ‘पेपर मॅश’ पासून बनवलेल्या वस्तू, प्रसिद्ध ढोकरा आर्टच्या वस्तू, मूर्ती अशा प्रकारच्या कोणतेही शिक्षण न घेता आत्मसात केलेल्या आदिवासी लोकांच्या कला या प्रदर्शनाद्वारे अनुभवायाला मिळणार आहेत.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, नागालॅण्ड, अरुणाचल, मेघालय, जम्मू-काश्मीर, आसाम, केरळ, मिझोराम, मणीपूर, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक या प्रदेशात श्रीकृष्ण परांजपे जाऊन छायाचित्रण करून आले आहे. नक्षलवादी प्रदेशातही या छायाचित्राच्या निमित्ताने परांजपे यांनी भटकंती केली आहे.  आदिवासींच्या विविध जमातींच्या जीवनशैली, रितीरिवाज, परंपरा, सद्यस्थिती या सर्व गोष्टींचे डॉक्युमेंटेशन व्हावे या ध्येयाने श्रीकृष्ण परांजपे कार्यरत आहेत. त्यांची छायाचित्रे ‘ट्रायबल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (पुणे) च्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी राष्ट्रपतींना भेट देण्यात आली होती.
श्रीकृष्ण परांजपे हे ३० वर्षे छायाचित्रणाच्या क्षेत्रात आहेत.लहान मुलांच्या चेहर्‍याच्या छायाचित्रणांचे ‘बालमुद्रा’ हे प्रदर्शन त्यांनी १५ वर्षे यशस्वी केले आहे. या अंतर्गत त्यांनी दीड कोटी छायाचित्रे काढली असून, ८ वर्षांपासून आदिवासी जनजीवनाची २५ लाखाहून अधिक छायाचित्रे काढली आहेत. आदिवासी भागात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या ट्रस्टच्या वतीने राबविलेले आहेत.
‘रामा’ ही जाहिरात एजन्सी २४ वर्षापूर्वी सुरू केलेली संस्था असून, त्यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रथमच सामाजिक कार्याचे भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, त्याला ‘आर.एम.धारिवाल फाऊंडेशन’च्या वतीने सहाय्य मिळाल्यामुळेच उपक्रम साध्य होणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांना भारतीय आदिवासींची जीवनशैली जवळून पाहता येणार आहे’, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ‘रामा’ (‘रिजनल अ‍ॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’) चे अध्यक्ष दिनकर शिलेदार यांनी दिली.

किर्लोस्कर – कर्वे च्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पाच्या माध्यमातून मुळशीतील मांदेडे गावचा होणार सर्वांगीण विकास

0

पुणे- कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून मांदेडे ता. मुळशी सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणेसाठी पुण्याच्या शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (एस एल के ) ग्लोबल सोल्युशन्स कंपनीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या मदतीने सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांचे व प्रकल्पाचे उद्घाटन एस एल के चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल अमीन व कर्वे समाज सेवा संस्थेचे सचिव शिवकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

एस एल के च्या सी एस. आर विभागाचे प्रमुख इंदू शेखर मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष ऋषी अगरवाल तसेच  कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर व सी एस. आर विभागाचे मानद संचालक प्रा. महेश ठाकूर यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालय उद्घाटन व प्राथमिक शाळेतील ई लर्निंग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली

मांदेडे गावच्या महिला व सर्व ग्रामस्थांचा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी एस एल के सदैव तत्पर असून गावातील मुलभूत सोयी-सुविधा व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर आपण आघाडीने काम करणार असल्याचे गोपाल अमीन यांनी सांगितले.

मांदेडे गावच्या नागरिकांच्या विकासासाठी एस एल के कंपनी  व कर्वे समाज सेवा संस्था आधुनिक शेती, पशुधन व पारंपारिक उद्योग व्यवसायांसह इतर जीवनोपयोगी आधारित उत्पन्नाच्या कौशल्यावर भर देणार असून नागरिकांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वालोकर यांनी केले.

प्रकल्प संचालक प्रा. महेश ठाकूर म्हणाले, प्रकल्प राबविनेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ग्रामस्थांच्या सहभाग व मदतीने गावचा कायापालट होईल यात शंका नाही.

यावेळी इंदू शेखर, एम. शिवकुमार, गुरदीप सिंघ, इवान झाइसन, दीप्ती कांबळे , जि.प.सदस्य सागर काटकर, माजी मुळशी प. स. सभापती खंदारे आदीं प्रमुख उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.

पाहुण्यांचे स्वागत सरपंच कु अरुणा वीर व उपसरपंच संजय वीर यांनी केले. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक सागर लवटे यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. महेश ठाकूर, चयन पारधी, राजू घाडगे, तपस्या शेलार, शिक्षा मिश्रा, प्रा. चेतन दिवान, दीप्ती कांबळे, अरुणा वीर, मदन वीर, शंकर वीर, ग्रामसेवक वाकळे आदींनी परिश्रम घेतले.

बौध्द धर्म मानवतेची शिकवण देतो -उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे

0

पुणे- कॅम्प भागातील बौध्द धम्म सेवा संघाच्यावतीने सुप्रिया बौध्द विहारात पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांना भगवान गौतम बुध्दांची प्रतिमा देउन उज्वला मोरे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मधुकर कांबळे , सुधाकर कांबळे , वसंत म्हस्के , सुनिल भोसले , असित गांगुर्डे , प्रल्हाद जाधव , अरुण गायकवाड , दीपक कांबळे , सुशीला भोसले , जगन्नाथ कांबळे , सतीश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी पुणे शहराचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि , बौध्द धर्म हा अडीच वर्षांपासून धर्म असून विज्ञानिक आणि सत्यावर आधारित आहे .दुःखाचे निवारण कसे करावे , दुःखावर मात कशी करावी हे या बौध्द धर्मातून कळते . कर्मकांड विरहित असा बौध्द धर्म मानवतेची आपणास शिकवण देतो . चांगल्या पध्दतीने जगण्याचा शिकवण देतो . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बौध्द धर्माचा स्वीकार केला .