Home Blog Page 3275

दिलेले जबाबदारी पूर्ण करणे हे प्रदीप रावत यांचे वैशिष्ट्य – खा.अनिल शिरोळे.

0
पुणे-आपल्याला राजकारणात आणि समाजकारणात अनेक जबाबदाऱ्या मिळतात मात्र मिळालेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करणे ही प्रदीपदादा रावत यांचे वैशिष्ट्य असून शिपिंग कॉर्पोरेशन च्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही दादा रावत समर्थपणे पार पाडतील असे गौरवोदगार अनिल शिरोळे यांनी काढले.क्रीएटिव्ह फौंडेशन आयोजित कोथरूड नवरात्र उत्सवात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.आमदार मेधा कुलकर्णी या खरोखरच रणरागिणी आमदार असुन त्या संवेदनशील आहेत या संदीप खर्डेकर यांच्या भाषणातील वाक्याचा संदर्भ देत त्यांनी आ मेधा कुलकर्णी यांचा ही मराठी भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला व भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच भाजपच्या पुणे शहराच्या पहिल्या महापौर हा मान मुक्ता टिळक यांनी मिळविला असुन त्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास अनिल शिरोळे यांनी व्यक्त केला.
कोथरूड नवरात्र महोत्सवात आज फक्त महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महापौर मुक्ता टिळक व खा अनिल शिरोळे यांच्या हस्ते प्रदीप रावत तसेच मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके,मंदार बलकवडे व उमेश भेलके उपस्थित होते.
महापौर मुक्ता टिळक यांनी प्रदीप रावत आणि मेधा कुलकर्णी यांचा गौरव करतानाच ” आपण शहर विकासासाठी कार्यरत असून विशेषत: महिलांसाठी आपण लवकरच महापौर बचत बाजार सुरु करणार असून या द्वारे उद्योजक महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होइल असे ही त्या म्हणाल्या.
आज ललिता पंचमी च्या दिवशी मुलींचे पूजन केले जाते,याच बरोबर सर्व महिलांनी आपल्या मुलांना शिक्षित आणि संस्कारित करावे असेही त्या म्हणाल्या.आमचा सत्कार करताना जिजाऊ आणि बाल शिवाजी ची प्रतिमा देण्यात आली हे औचित्यपूर्ण असून ज्याप्रमाणे जिजामातानी शिवरायांवर संस्कार केले तसेच संस्कार प्रत्येक आई ने आपल्या मुलांवर करावेत आणि त्याहीपेक्षा मुलांवर असे संस्कार करावेत की महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होइल अशी अपेक्षा आ मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.प्रदीप रावत यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात तनिष्का दुगड या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जर्मनीतील मेटल मॅथ्स कॅल्क्युलेशन च्या जागतिक ज्युनियर चॅम्पिअनशिप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाल्याबद्दल   सत्कार करण्यात आला,
तत्पूर्वी काल रात्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी नगरसेवक दीपक पोटे,सुशील मेंगडे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
असे महोत्सव हे नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात असे नमूद करुन आपण कोथरूड सह एकूणच शहराच्या विकासासाठी निधी ची कमतरता भासु देणार नाही व शहराचा अर्थसंकल्प त्याच धर्तीवर समतोल साधणारा आहे असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.यानंतर आई रिटायर होतीये हे नाटक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.मंदार बलकवडे,उमेश भेलके व विशाल भेलके यांनी स्वागत केले.

‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग !

0

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’  ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं युगान्त हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसं दडपण होतं. हे नाटक जरी चांगलं असलं तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता, पण ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’ला  मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, पस्तीस वर्षापूर्वी एका नाटककारानं लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक आजही प्रेक्षकांना भिडतं आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे. ‘युगान्त आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल या उद्देशानं ही नाट्यत्रयी प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अशी ‘नाट्यत्रयी’ प्रथमच सादर होत आहे हे विशेष. म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडणारी ही अभिजात नाट्यकृती सादर होणं ही ऐतिहासिक गोष्ट असून ती महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आलं याचा आनंद ही व्यक्त केला.

या ‘नाट्यत्रयीचा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला  रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग  होणार असून ते दर रविवारी सादर होतील. मुंबई- पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे. या ‘नाट्यत्रयी’चं ऑनलाईन बुकिंग बुधवार २० सप्टेंबरपासून सुरु झालं असून सलग नाट्य प्रयोगच्या तिकीटांसोबत नाटकाच्या तिनीही भागांची स्वतंत्र तिकीटंसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट विक्रीच्या दिवसापासून सीझनं तिकिटं बुकिंग काऊंटरवर उपलब्ध होतील.

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचं असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.

निवेदिता सराफ, भारती पाटील,  वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड, आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचं आहे. प्रकाश योजना रवी रसिक यांची आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर याचे निर्माते असून सहनिर्माते अर्जुन मुद्दा व संज्योत वैद्य आहेत. जीवनानुभव देत वास्तवाचा ठाव घेणारी ही ‘नाट्यत्रयी निश्चितच एक अविस्मरणीय नाट्यानुभव देऊन जाईल

विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवा : शरद पवार

0
आबा बागुल यांचे कार्य आदर्शवत, आता मुंबईची संधी द्या 
पुणे :विकासकामे कोणतीही असू द्या, त्यात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. नगरसेवक आबा बागुल यांची कल्पकता आणि सातत्याने राबविलेले विकासाचे प्रकल्प हे आदर्शवत आहेत. 30 वर्षे लोकप्रतिनिधी असलेल्या आबा बागुल यांना आता मुंबईत पाठविण्याची गरज आहे. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी बागुल यांच्या कार्याचा गौरव केला. 
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी माता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक व अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनला मी परदेशात असल्याने येऊ शकलो नाही. याची मला अस्वस्थता होती. त्यामुळे मी आज आवर्जुन याठिकाणी आलो आहे. तसं मी यापूर्वी कै. वसंतराव बागुल उद्यान उद्घाटनावेळी तसेच महर्षी पुरस्कार वितरण आणि अन्य एका कार्यक्रमासाठी आलो आहे. असे स्पष्ट करून पवार म्हणाले, आबा बागुल यांच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसराचा सर्वांगीण विकास करताना जनतेच्या हिताला दिलेले प्राधान्य हे सर्वांसाठी आदर्शवत आहेत. सातत्याने विकासाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी कसे होतील याकडे सदैव लक्ष असणारे आबा बागुल हे एक दक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आज 30 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून आबा कार्यरत आहेत. आणखी 20 वर्षे झाली की ते माझ्या रांगेत येऊन बसतील. त्यामुळे आता आबा बागुलांना मुंबईला पाठवलेच पाहिजे, असेही पवार म्हणाले.
आबा बागुल यांच्या काशी यात्रेचा उल्लेख करताना पवार म्हणाले, खरंच प्रत्येाकाला वाटतं काशीला एकदा जावून यावे. पण, मी इथे एक सूचना करतो, एक वर्ष काशी यात्रा घ्या. दुसर्‍या वर्षी भारतात जालियानवाला बाग, वाघा बॉर्डर अशी अनेक ठिकाणे आहेत, तेथे लोकांना घेऊन जा. सर्वधर्म समभाव कसा जोपासला जाईल याबरोबरच सियाचीन सारख्या भागामध्ये आपले जवान देशासाठी कसे कार्यरत आहेत, हे ही यानिमित्ताने लोकांना कळेल. विविध भाषा, प्रांत याचीही संपूर्ण माहिती होईल. 
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये आबा बागुल यांनी तारांगण उभे केले आहे. खरंच, ही बाब कौतुकास्पद आहे. पण, निव्वळ तारांगण सुरू केल्यानंतर तिथे प्रत्येक दिवशी कसा कार्यक्रम असावा, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी आबा बागुल आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईतील  जवाहरलाल नेहरू प्लॅनोटोरियम सेंटरला भेट द्यावी. त्याचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे तारांगणाच्या परिपूर्ण प्रक़ल्पासाठी आपल्याला मी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल खरंच आदर्शवत शाळा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणले. पण, ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आबा बागुल यांनी खर्‍या अर्थाने ही शाळा उभारली. या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात उज्ज्वल भविष्य नक्कीच असेल, असेही ते म्हणाले. 
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीय. परिणामी पर्यावरणाचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे. वृक्षवल्ली कशी जोपासली जाईल, परिसर कसा हिरवागार करता येईल, त्यासाठी कृती कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आबा बागुल यांनी त्यांच्या परिसरातील नाल्यांचा केलेला विकास खूप चांगला आहे. नाल्यांचा विकास करताना परिसर हरित केला, त्या दृष्टीने सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. 
प्रास्तविकात आबा बागुल म्हणाले, 23 वर्षांनी आज शरद पवार यांचे पुनरागमन झाले आहे. माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात शरद पवार यांचा आदर्श आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान पद मिळण्याचे एकमेव नेेतृत्व आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार. पुढील 50 वर्षात असे नेतृत्व, व्यक्तिमत्त्व होणे शक्य नाही. 
सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले.

जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार: पालकमंत्री गिरीश बापट

0
पुणे : जिल्ह्यात  सुरु असलेल्या  राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार असून यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक आज  पुणे येथे पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस.डी. चिटणीस यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.तसेच रस्त्यांच्या कामाचा विभागानुसार आढावा घेतला.
 पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनी मार्फत सुरु आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊन सुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. सदर रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ सुरु करावे. अन्यथा रिलायन्स इन्फ्रा कढून हे काम काढून घ्यावे अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
 नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी या रस्त्यासाठी लागणारी 80 टक्क्यांहून अधिक जमीन ताब्यात आली आहे.त्याचप्रमाणे या मार्गातील प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरु करण्यात अडथळा येणार नाही.इंद्रायणी नदी ये खेड या रस्त्याच्या भूसंपादनाचा निवाडा प्रक्रिया अंतिम टप्यात असून या महिना अखेर सर्व निवाडे जाहीर केले जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या कामाचे टेंडर लवकरात लवकर काढून 1 जानेवारी पर्यंत काम सुरु  करण्याच्या सूचना दिल्या.
चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ शकते त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे तसेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं.
 ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी  निश्चित करून काम जलद गतीने पूर्ण होईल या करिता योग्य ते नियोजन करावे, कामामध्ये काही अडचणी असल्यास त्याबद्दलचा सविस्तर आढावा माझ्याकडे सादर करावा. सर्व विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असेही या वेळी  पालकमंत्री म्हणाले.

विध्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता वाढवण्याची गरज- महापौर

0

पुणे-  शहरात विध्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने कमी पडत आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यासाठीच्या विकासासाठी मैदानांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदाने ब क्रीडांगणासाठी आरक्षण टाकण्यात आली आहेत. हि आरक्षणे बदलू नयेत यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वानी सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी महेश बालभवनच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात व्यक्त केले.

कोथरूड येथील महेश बालभवन च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या सभागृहात काल  शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता  टिळक यांच्या हस्ते रौप्य्महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,प्रसिद्ध उद्योगपती महेश नागरी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री धनराजजी राठी, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी, महेश बालभवनच्या अध्यक्षा सौ. संगीत लाहोटी,सचिव गणेश मुंदडा, कार्याध्यक्ष रमेश धूत, सचिव सुशीला राठी, सुरेखा करवा, सदस्य श्रीमती अंजली तापडिया, श्री मनोज कास्ट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालभवनच्या विध्यार्थ्यानी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विजेत्या विध्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी महापौर मुकता टिळक, खासदार वंदना चव्हाण, मुरलीधर मोहोळ, श्री धनराजजी राठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या कि, पुणे शहरात पूर्वी मुलांना खेळण्यासाठी भरपूर मैदाने होती. आत्ता मैदानांची संख्या कमी होत चालली आहेत. हे लक्षात आल्यांनंतर आम्ही पुणे मनपाच्या विकास आराखड्यात मैदाने बी क्रीडांगणासाठी आरक्षणाची तरतूद केली. काळाच्या ओघात ती बदलण्याचा प्रयत्नही झाला. तो आम्ही वेळीच विरोध करून थांबवले. आत्ता मुलांच्या क्रीडा कौशल्याच्या विकासासाठी मैदाने वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.

महापौर टिळक आपल्या भाषणात म्हणाल्या कि मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वचजण झटत आहेत. परंतु मुलांच्या मानसिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे काही मुले मानसिदृष्ट्या कमकुवत होतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वानी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

बालभवनच्या अध्यक्षा संगीता लाहोटी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देताना सांगितले कि, बालभवन संस्थेने पालकांमध्ये चांगलाच विश्वास निर्माण केला. बालभवनच्या विध्यार्थ्यानी संपूर्ण भारतात संस्थेचे नाव रोशन केले. याप्रसंगी श्री राठी, मोहोळ आदींची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार गणेश मुंदडा  यांनी मानले.सूत्रसंचालन संगीत पिपंळीकर यांनी मानले

लक्ष्यला सर्वोत्तम एनजीओचा राष्ट्रीय पुरस्कार – क्रीडा क्षेत्राच्या उत्कर्षासाठी प्रशंसनीय लक्ष्यचे कार्य

0

पुणे: पुण्यातील लक्ष्य या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशांतील क्रीडा क्षेत्रासाठीची सर्वोत्तम एनजीओ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बंगळूर येथे पार पडलेल्या जागतिक सीएसआर दिनानिमित्त राष्ट्रीय सीएसआर लिडरशिप काँग्रेसमध्ये झालेल्या एका शानदार समारंभात हा पुरस्कार लक्ष्यला देण्यात आला. मायब्रेन इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक अॅलिस्टर स्कोफिल्ड यांच्या हस्ते लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि क्रीडा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभिजित कुंटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

याचप्रसंगी इतर गटातील पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये सीएसआरमधील सर्वोत्तम संस्था, कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सौर ऊर्जा, ऊर्जेचा पुनर्वापर व पर्यावरण या पुरस्कारांचा समावेश होता. क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या इच्छेने पुण्यातील हौशी व उत्साही क्रीडा प्रेमींनी भारताला जागतिक क्रीडा विश्वात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये फेब्रुवारी २००९च्या दरम्यान लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. या ना नफा ना तोटा तत्वावरील या एनजीओ संस्थेने विविध क्रीडा प्रकारांतील १०० हुन अधिक गुणवान क्रीडा पटूंची विविध चाचण्यांमधून निवड करण्यात आली. त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सर्व बाबतीत त्यांना साहाय्य केले आणि जागतिक स्तरापर्यंत पोहोचेपर्यँत त्यांचा पाठपुरावा केला.  सध्या विविध उद्योगसमूहांच्या साहाय्याने २६ नामवंत क्रीडा पटूंना लक्ष्यच्या वतीने सर्वोतोपरी पाठिंबा देण्यात येत आहे. त्यामुळे हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.

रेवन्स, स्पुटनिक्‍स, ईगल्स आणि फाल्कन्स संघांची आगेकूच

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित पाचव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेवन्स, स्पुटनिक्‍स, ईगल्स आणि फाल्कन्स या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत आगेकूच केली. 
पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात श्रीयश वर्तक व केदार नाडगोंडे, हर्षद बर्वे व चैत्राली नवरे,  राजश्री भावे व वेदांत खटोड, श्रीदत्त शानभाग व प्रशांत वैद्य यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रेवन्स संघाने टोरॅनाडोजचा 4-3 असा पराभव केला. फाल्कन्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत डोव्हजचा 4-3 असा पराभव करून आगेकूच केली. फाल्कन्सकडून आदिती महाजन व आनंद शहा, विनीत रुकारी व अमर श्रॉफ, प्रवीण गुजर व आमोद प्रधान, सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा यांनी अफलातून कामगिरी केली. 
 
अन्य लढतीत स्पुटनिक्‍सने कॉमेट्‌सचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. ईगल्सने ब्लॅक हॉक्‍सचा 5-2 असा सहज पराभव केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
रेवन्स विजयी विरुद्ध टोरॅनाडोज 4-3. 12-6 गुण
गोल्ड खुला दुहेरी गट : श्रीयश वर्तक व केदार नाडगोंडे वि.वि. महेश उतगिकर व विक्रांत पाटील 21-20, 21-18; सिल्वर खुला दुहेरी गट : हर्षद बर्वे व चैत्राली नवरे वि.वि. अविनाश दोशी व गिरीश रानडे 15-12, 15-6; गोल्ड मिश्र दुहेरी गट : राजश्री भावे व वेदांत खटोड वि.वि. हर्षवर्धन आपटे व सिद्धी महाजन 7-21, 21-19, 11-10; सिल्वर मिश्र दुहेरी ः भाग्यश्री देशपांडे व शिरीष साठे पराभूत विरुद्ध अनिकेत सहस्रबुद्धे व गौरी कुलकर्णी 15-12, 5-15, 9-11; चिल्ड्रन गट एकेरी : दिया प्रभू पराभूत विरुद्ध यश चितळे 4-11, 4-11; सिल्व्हर खुला दुहेरी गट : विनायक भिडे व अभिजित खानविलकर पराभूत विरुद्ध शैलेश लिमये व राजशेखर करमरकर 14-15, 15-14, 5-11; 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी गट ः श्रीदत्त शानभाग व प्रशांत वैद्य वि.वि. शीतल काळभोर व विनय काळभोर 21-10, 21-18; गोल्ड खुला दुहेरी गट ः सारंग लागू व मिहीर विंझे पराभूत विरुद्ध तेजस किंजवडेकर व देवेंद्र चितळे 19-21, 16-21.
————————-
2) स्पुटनिक्‍स विजयी विरुद्ध कॉमेट्‌स 4-3. (11-6 गुण)
गोल्ड खुला दुहेरी गट : आश्‍विन शहा व दीप्ती सरदेसाई पराभूत विरुद्ध पराग चोपडा व गिरीश मुजुमदार
14-21, 17-21; सिल्वर खुला दुहेरी गट : विश्वेश कटककर व नील हळबे पराभूत विरुद्ध जयदीप कुंटे व तुषार नगरकर 6-15, 8-15; गोल्ड मिश्र दुहेरी गट : अनिश राणे व सारा नवरे वि.वि. आदिती रोडे व तेजस चितळे 21-16, 21-14; सिल्वर मिश्र दुहेरी गट : प्रीती सप्रे व संदीप
तपस्वी वि.वि. रश्‍मी रुकारी व सलिल गुप्ते 15-1, 15-1; चिल्ड्रन एकेरी गट : अनया राजवाडे वि.वि. ईशान गुप्ते 11-2, 11-2; सिल्वर दुहेरी गट : नीलेश केळकर व अमोल मेहेंदळे पराभूत विरुद्ध सुदर्शन बिहाणी व अतुल बिनीवाले 14-15, 10-15; 49 वर्षावरील गोल्ड दुहेरी गट : बाळ कुलकर्णी व बिपिन चोभे वि.वि. अनिल देडगे व राजेंद्र नाखरे 21-17, 21-19; गोल्ड खुला दुहेरी गट : अंकित दामले व बिपिन देव वि.वि. अंकुश जाधव व मिहीर केळकर 21-19, 14-21, 11-8.
———————-
3) ईगल्स विजयी विरुद्ध ब्लॅक हॉक्‍स 5-2. (14-7 गुणांनी)
गोल्ड खुला दुहेरी गट : आर्य देवधर व अमित देवधर वि.वि. आदित्य काळे व अनिरुद्ध आपटे 21-14, 21-20, सिल्व्हर खुला दुहेरी ः मंदार विंझे व मधुर इंगळहळीकर वि.वि. अमित नाटेकर व अभिषेक ताम्हाणे 15-10. 15-13, गोल्ड मिश्र दुहेरी ः दीपा खरे व मिहीर पाळंदे पराभूत विरुद्ध
तन्मय चोभे व राधिका इंगळहळीकर 12-21, 17-21, सिल्व्हर मिश्र दुहेरी ः संग्राम पाटील व गोपिका किंजवडेकर वि.वि. मृदुला राठी व गोपाळ काणे 15-11, 15-5, सिल्व्हर खुला दुहेरी ः निनाद देशमुख व अजिंक्‍य मुठे वि.वि. विमल हंसराज व केदार तळवलकर 15-12, 15-5
49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी ः हरिष गलानी व नितीन कोणकर वि.वि. विवेक जोशी व गिरीश करंबेळकर 21-9, 21-9. गोल्ड खुला दुहेरी ः मकरंद चितळे व नरेंद्र पटवर्धन पराभूत विरुद्ध ईशान तळवलकर व आलोक तेलंग 11-21, 11-21.
———————–
4) फाल्कन्स विजयी विरुद्ध डोव्हज 4-3 (11-10 गुणांनी)
गोल्ड खुला दुहेरी गट : सारंग आठवले व रणजित पांडे पराभूत विरुद्ध सुधांशू मेडशीकर व अनिश रुईकर 14-21, 19-21, सिल्व्हर खुला दुहेरी ः दत्ता देशपांडे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध करण पाटील व ऋत्विक गाडगीळ 10-15, 8-15, गोल्ड मिश्र दुहेरी ः अद्वैत जोशी व तनया केळकर पराभूत विरुद्ध रूषी पुरिया व केदार भिडे 8-21, 7-21. सिल्व्हर मिश्र दुहेरी ः आदिती महाजन व आनंद शहा वि.वि. गायत्री वर्तक व आकाश सूर्यवंशी 15-11, 6-15, 11-4, चिल्ड्रन गट एकेरी : आरूषी पांडे पराभूत विरुद्ध ईशान लागू 10-11, 11-9, 7-11, सिल्व्हर खुला दुहेरी ः विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि. जयकांत वैद्य व सचिन जोशी 15-7, 15-7, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी ः प्रवीण गुजर व आमोद प्रधान वि.वि. आनंद घाटे व रवी बापट 21-13, 21-15, गोल्ड खुला दुहेरी ः सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. तन्मय आगाशे व संतोष पाटील 21-17, 18-21, 11-4. 

गुणवंत स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा- गीता गोयल

0

गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव 

पुणे: स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करणा-या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला. गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने गंगा ग्लिटझ, उड्री येथे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया सोहळ्यात स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन गीता गोयल यांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले.

गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त गीता गोयल यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक स्तरात कर्तृत्ववान स्त्रिया कार्यरत असताना दिसतात. कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता काम करणा-या व प्रसिध्दीपासून दूर असलेल्या गुणवंत स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा यासाठीच आम्ही गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने  त्यांना सन्मानित करत आहोत.

पर्यावरणप्रेमी व दिव्यांगासाठी काम  करणा-या सुषमा भालेराव या चित्रकार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घेतात. अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून समाज कार्य करणा-या दिपाली निखील या स्वतःच्या खर्चातून दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. आशा मोरे व सविता भोसले या महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. डी. वाय. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम आत्मियतेने करतात.

सातारा येथील बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणा-या कोमल दिगंबर बेलखेडे या तरुणीने खडतर परिस्थितीवर मात करत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या स्त्रियांनी स्वतःच्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे. कर्तव्य भावनेतून त्या हे काम करत आहेत. त्यांचा साधेपणा, कर्तव्याला जागण्याची सेवाभावी वृत्ती ही गौरवास पात्र आहे. त्यामुळेच आम्ही या स्त्रियांना सन्मान करत आहोत. समाजात सकारात्मक भावना वाढीस लागावी हा या पुरस्कारा मागचा हेतू आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने रासदांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

सलोनी  गोयल, अतुल गोयल,जयप्रकाश गोयल आणि बॉईज चित्रपटातील कलाकार दिग्विजय जोशी यावेळी उपस्थित होते. रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी जागेगी नारी, तो जागेगा इंडिया असा जयघोष करत सन्मानित करण्यात आलेल्या महिलांच्या कर्तृत्वाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.दिग्विजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

महापालिका शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ पूर्वसूचना न देताच शाळा बंदचे आदेश विद्यार्थी, पालकांमधून संताप

0

या निर्णयाचा प्रशासनाने फेरविचार करावा : माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी

 

पिंपरी । प्रतिनिधी:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उरो रुग्णालय शाळा क्र. 100 ला कोणतीही
पूर्वसूचना न देता सोमवार (दि. 25 सप्टेंबर) पासून शाळा बंद करण्याचे
आदेश मिळाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक धास्तावले आहेत. मध्यातच शाळा
बंद झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना दुसरी शाळा शोधण्यासोबतच आर्थिक
भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या हा
निर्णय दुर्दैवी असून, विद्यार्थीहित लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने
या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप
यांनी केली आहे.
नवी सांगवीत औंध उरो रुग्णालय महपालिका शाळा क्र. 100 गेल्या अनेक
वर्षापासून सुरु आहे. सध्या या शाळेत सुमारे 60 ते 70 विद्यार्थी शिक्षण
घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी पहिली ते सातवी इयत्तांमधील असून, गरीब
कुटुंबातील आहेत. त्यातच आता शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना अन्य
शाळेत जुळवून घ्यावे लागणार आहे. जून ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या
कालावधीत अभ्यासक्रमही बहुतांश शिकवून झाला आहे. सर्वकाही सुरळीत असताना
शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या निम्म्यात शाळा बंद करण्याचे आदेश
दिले आहेत. या विद्यार्थ्यांना नजिकच्या बा.रा. घोलप शाळेत जाण्यास
सांगण्यात आले आहे. मात्र, बा.रा. घोलप शाळेत हे 60 विद्यार्थी अतिरिक्त
ठरणार आहे. तिथल्या शिक्षकांवरही याचा ताण येणार आहे. या शाळेत
वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याचे आव्हानही बा.रा. घोलप शाळेवर असणार आहे.
दरम्यान, पालकांनी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेत
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवाहन केले आहे. याबाबत
राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की महापालिका शिक्षण मंडळाला शाळा बंद
करायचीच होती, तर त्याचे आदेश जूनपूर्वीच देणे आवश्यक होते. एक दिवस
अगोदर शाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचे आहे. किमान चालू शैक्षणिक वर्ष
तरी शाळा सुरु ठेवावी. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
प्रगतीवर परिणाम होणार आहे. बा.रा. घोलप शाळा या विद्यार्थ्यांना कसे
अचानक सामावून घेणार आहे. तिथल्या व्यवस्थापनावर याचा ताण पडणार आहे.
त्यामुळे शिक्षण विभागाने याचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी माजी
नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार म्हणाले, की शिक्षण मंडळाने असा
शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत शाळा बंदचा निर्णय घेताना
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करणे गरजेचे होते. जूनमध्ये
शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळा बंद करण्याचा आदेश काढला असता, तर
विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेत प्रवेश घेणे सोपे गेले असते.

चतुःशृंगीच्या यात्रेत आजीबाईंचा भोंडला

0

पुणे – ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव सुने, असं कसं झालं माझ्या नशिबी आलं, अक्कल माती चिकन माती, आडबाई आडोनी अशी पारंपरिक गाणी म्हणत निवारा वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांनी भोंडल्याचा आनंद लुटला.
सुयोग मित्र मंडळ आणि चतुःशृंगी मंदीर ट्रस्टच्या वतीने चतुःशृंगीच्या यात्रेत आजीबाईंच्या भोंडल्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ महिलांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या. ङ्गेर धरत, झिम्मा आणि ङ्गुगड्या खेळत महिलांनी आनंद लुटला. खिरापत वाटपानंतर देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बोलताना चतुःशृंगी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य गंगाधर अनगळ म्हणाले, भोंडला हा पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला महिलांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून तिच्या भोवती महिला व मुली ङ्गेर धरतात. पृथ्वीच्या सुङ्गलीकरणाचा हा उत्सव आहे. वृध्दाश्रमातील महिलांना गतस्मृतींना उजाळा देता यावा आणि आनंद मिळावा यासाठी गेली सात वर्षे सुयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने या उपक‘माचे आयोजन करण्यात येते. नंदा माने, अश्विनी अदवडे, वर्षा खामकर, मनीषा तडके, सारिका धुमाळ, अनुराधा मांडवकर, मनीषा सुपेकर, संगीता वाईकर, रंजना पवार, सुवर्णा कानिटकर, सुनंदा मोहिते, पल्लवी शर्मा यांनी संयोजन केले.

काय झालं कळंना चित्रपटातील धमाकेदार आयटम सॉंग हिना पांचाल म्हणतेय टकमक टकमक नजरा तुमच्या

0

सध्या मराठी चित्रपटात एकापाठोपाठ एक हिंदीतील तारका आयटम सॉंगवर थिरकताना दिसतायेत. बॉलीवूड आणि टॅालीवूडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचाल आता मराठी चित्रपटात आपला जलवा  दाखवणार आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत ‘काय झालं कळंना’ या मराठी चित्रपटात हिना पांचाल वर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे.

‘टकमक टकमक नजरा तुमच्या, होऊ दे आता बत्ती गुल’ असे बोल असलेल्या या हटके आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच झाले. या आयटम सॉंगची कोरीओग्राफी सुजीत कुमार यांनी केली आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. वलय मुलगुंद यांनी हे गीत लिहिले आहे. हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास हिना यांनी व्यक्त केला. चित्रपटातील हिनाचा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.

काय झालं कळंना या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची हलकी–फुलकी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची  निर्मिती पंकज गुप्ता यांची असून दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांचं आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

कोल्हापूर-शिर्डी दरम्यान धावणार विशेष रेल्वे

0

पुणे-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर त साईनगर शिर्डी दरम्यान विशेष गाडी सुरु करण्यात येत असून कोल्हापूर-शिर्डी मार्गावर 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे. तर शिर्डी-कोल्हापूर मार्गावर 28 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे.

गाडी क्रमांक (01409) ही गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वरून दर बुधवारी दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी पहाटे 5.55 वाजता साईनगर शिर्डी स्थानकावर पोहोचेल. कोल्हापूर-शिर्डी दरम्यान गाडी हातकणंगले, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापुर, पुणतांबा स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर रात्री 11.25 वाजता येणार आहे.

गाडी क्रमांक (01410) ही गाडी साईनगर शिर्डी वरून दर गुरुवारी सकाळी 8.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.25 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. शिर्डी-कोल्हापूर दरम्यान गाडी पुणतांबा, बेलापूर, अहमदनगर, दौंड, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज आणि हातकणंगले या स्थानकांवर थांबणार आहे.

या गाडीसाठी सोमवार (दि. 25 सप्टेंबर) पासून आरक्षण सुरु होणार आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोटनिवडणूक प्रभाग क्र. २१ साठी उमेदवारी अर्ज दाखल धनंजय गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात

0
पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या  प्रभाग क्र. २१ मधील पोटनिवडणूकीसाठी आज (शनिवारी ) पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने धनंजय सूर्यकांत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल केला.
यावेळी आमदार जयदेव गायकवाड, प्रवक्ते अंकुश काकडे, निरीक्षक कृष्णकांत कुदळे, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक रवींद्र माळवदकर, नगरसेवक प्रदीप गायकवाड, माजी महापौर प्रशांत जगताप, मोहनसिंग राजपाल, उपाध्यक्ष अशोक राठी, भगवानराव वैराट व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, ‘ही लढाई भाजपाच्या विरोधात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात वाढत चाललेल्या अराजकतेमुळे संपुर्ण लोकमानसात असंतुष्टतेची भावना निर्माण होत आहे. लोकांचा कल पाहता सामान्य नागरिकांमध्ये ह्या भाजप सरकारच्या विरोधात आक्रोश अनेक प्रकारे व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे आणि म्हणूनच आम्ही ही पोटनिवडणूक लढवत आहोत.’

स्पुटनिक्‍स, फाल्कन्स संघांचा सलग दुसरा विजय

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब तर्फे आयोजित पाचव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत फाल्कन्स, ईगल्स, स्पुटनिक्‍स आणि कॉमेंट्‌स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत फाल्कन्स संघाने ब्लॅक हॉक्‍सचा 5-2 असा 16-3 अशा गुणांनी पराभव करत सलग दुसरा विजय संपादन केला. 
तर स्पुटनिक्‍सने टोरॅनाजडोजचा 4-3 असा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला परंतु दोन्ही संघाना प्रत्येकी अकरा गुण मिळविता आले.
ईगल्सने डोव्हजचा 4-3 असा 13-6 अशा गुणांनी पराभव केला.  तर कॉमेंट्‌सने रेवन्स संघाचा 5-2 असा 17-5 असा मोठ्या गुणांनी पराभव केला. 

स्पर्धेचा सविस्तर  निकाल – गट साखळी फेरी
गट क- फाल्कन्स वि.वि  ब्लॅक हॉक्‍स 5-2: 
गोल्ड खुला गट दुहेरी 
: सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. ईशान तळवलकर व अनिरुद्ध आपटे 21-10, 21-18, सिल्व्हर खुला दुहेरी : विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि. आदित्य काळे व गिरीश करंबेळकर 15-7, 15-10, गोल्ड मिश्र दुहेरी : आदिती महाजन व रणजित पांडे वि.वि. तन्मय चोभे व राधिका इंगळहळीकर 21-20, 18-21, 11-10. सिल्व्हर मिश्र दुहेरी : आनंद शहा व मेघना रानडे पराभूत विरुद्ध मृदुला राठी व गोपाळ काणे 15-12, 10-15, 7-11. चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी माया निवसरकर वि.वि. आनंदिता गोडबोले 11-6, 8-11, 11-6. सिल्व्हर खुला दुहेरी : संदीप साठे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध विमल हमराज व अमित नाटेकर 6-15, 8-15. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी : प्रवीण गुजर व आमोद प्रधान वि.वि. अनिल आगाशे व केदार तळवलकर 21-9, 21-9. गोल्ड खुला दुहेरी सारंग आठवले व अद्वैत जोशी वि.वि. आलोक तेलंग व विवेक जोशी 21-9, 20-21, 11-2,

गट ब-  ईगल्स 
वि.वि डोव्हज 4-3: गोल्ड खुला गट दुहेरी :आर्य देवधर व मिहीर पाळंदे वि.वि. केदार भिडे व तन्मय आगाशे 12-21, 21-6,11-4, सिल्व्हर खुला दुहेरी : निनाद देशमुख व अजिंक्‍य मुठे वि.वि. संतोष पाटील व सचिन जोशी 15-7, 15-10, गोल्ड मिश्र दुहेरी दीपा खरे व अमित देवधर पराभूत विरुद्ध रिशी पूरिया व सुधांशू मेडशीकर 12-21, 15-21, सिल्व्हर मिश्र दुहेरी : गोपिका किंजवडेकर व मंदार विंझे पराभूत विरुद्ध करण पाटील व गायत्री वर्तक 15-13, 14-15, 6-11, चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी निखिल चितळे वि.वि. अनया आगाशे 11-2, 11-4, सिल्व्हर खुला दुहेरी : मकरंद चितळे व हरेश गलानी वि.वि. आकाश सूर्यवंशी व ऋत्विक गाडगीळ 15-12, 15-7. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी : अविनाश भोसले व नितीन कोनकर वि.वि. रवी बापट व अभय राजगुरू 21-7, 21-5, गोल्ड खुला दुहेरी संग्राम पाटील व मधुर इंगळहळीकर वि.वि. जयकांत वैद्य व अनिश रुईकर (पुढे चाल)

गट ब- स्पुटनिक्‍स 
वि.वि टोरॅनाजडोज 4-3: गोल्ड खुला गट दुहेरी : अभिजित राजवाडे व विश्‍वेश कटककर पराभूत विरुद्ध हर्षवर्धन आपटे व अनिकेत सहस्रबुद्धे 9-21, 18-21, सिल्व्हर खुला दुहेरी : बाळ कुलकर्णी व श्रीधर चिपळूणकर वि.वि. अविनाश जोशी व विनय काळभोर 15-11, 15-14, गोल्ड मिश्र दुहेरी : अंकित दामले व सारा नवरे पराभूत विरुद्ध तेजस किंजवडेकर व सिद्धी महाजन 20-21, 10-21, सिल्व्हर मिश्र दुहेरी : अनिष राणे व प्रीती सप्रे वि.वि. गौरी कुलकर्णी व तुषार मेगंळे 15-6, 15-8, चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी : पार्थ केळकर वि.वि. यश चितळे 11-8, 11-5, सिल्व्हर खुला दुहेरी : नीलेश केळकर व अमोल मेहेंदळे वि.वि. देवेंद्र चितळे व राजशेखर करमरकर 15-12, 15-10, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी : बिपिन देव व बिपिन चोभे वि.वि. शीतल काळभोर व गिरीश रानडे 21-11, 21-3. गोल्ड खुला दुहेरी : आश्‍विन शहा व दीप्ती सरदेसाई पराभूत विरुद्ध महेश उतगीकर व विक्रांत पाटील 10-21, 6-21.

गट क- कॉमेंट्‌स 
वि.वि रेवन्स 5-2: गोल्ड खुला गट दुहेरी : अंकुश जाधव व तेजस चितळे वि.वि. सारंग लागू व हर्षद बर्वे 21-5, 21-9, सिल्व्हर खुला दुहेरी : पराग चोपडा व अनिल देडगे वि.वि. श्रीदत्त शानभाग व प्रशांत वैद्य 15-13, 15-9, गोल्ड मिश्र दुहेरी : आदिती रोडे व मिहीर केळकर वि.वि. राजश्री भावे व केदार नाडगोंडे 21-15, 21-5, सिल्व्हर मिश्र दुहेरी : दिव्या मुथा व अमेय कुलकर्णी पराभूत विरुद्ध चैत्राली नवरे व अभिजित खानविलकर 1-15, 4-15, चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी : नील केळकर पराभूत विरुद्ध अर्जुन खानविलकर 8-11, 6-11, सिल्व्हर खुला दुहेरी : जयदीप कुंटे व तुषार नगरकर वि.वि. देवेंद्र राठी व वेदांत खटोड 15-9, 15-13, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी : अतुल बिनीवाले व राजेंद्र नाखरे वि.वि. शिरीष कर्णिक व विनायक भिडे पुढे चाल, गोल्ड खुला दुहेरी : सलोनी तपस्वी व नीतेश जैन पराभूत विरुद्ध श्रीयश वर्तक व मिहीर विंझे 5-21, 6-21.
——————
पहिला दिवस 
स्पुटनिक्‍स विजयी विरुद्ध रेवन्स 5-2 (14-8 गुणांनी)
टोरॅनाजडोज विजयी विरुद्ध कॉमेंट्‌स 4-3 (12-9 गुणांनी)
डोव्हज विजयी विरुद्ध ब्लॉक हॉक्‍स 5-2 (14-8 गुणांनी)
फाल्कन्स संघ विजयी विरुद्ध ईगल्स 4-3 (13-8 गुणांनी)
——————-
दुसरा दिवस 
फाल्कन्स संघ विजयी विरुद्ध ब्लॅक हॉक्‍सचा 5-2 (16-3 गुणांनी)
ईगल्स विजयी विरुद्ध डोव्हजचा 4-3 (13-6 गुणांनी)
स्पुटनिक्‍स विजयी विरुद्ध टोरॅनाजडोज 4-3 (11-11 गुणांनी)
कॉमेंट्‌स विजयी विरुद्ध रेवन्स संघ 5-2 (17-5 गुणांनी)
————————— 

बड्या चोरांच्या ४५२ कोटीच्या थकबाकी ला अभय कोणाचे ? सत्ताधारी भाजपला तुपे पाटलांचा सवाल (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेचे करापोटीचे ४५२ कोटी ९० लाखाची रक्कम मोबाईल टॉवर उभारणाऱ्या बड्या कंपन्यांकडून येणे असून हि  रक्कम थकीत ठेवायला कोणाकोणाचे अभय आहे ? असा सवाल महापालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी करत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा ला टार्गेट केले आहे. एकीकडे प्रत्येक लिटरमागे ४० रुपये लुबाडणाऱ्या आणि किरकोळ थकबाकीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या भाजपला हि थकबाकी का दिसत नाही ? का यांनी डोळ्यावर कातडे पांघरून घेतले आहे ? असा सवाल करीत या कंपन्यांकडून त्वरित थकबाकीची रक्कम कायद्याप्रमाणे  तिप्पट दंड आकारून वसूल करा अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला आहे. पहा आणि ऐका नेमके चेतन तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे ….