Home Blog Page 3274

सभागृहनेते भिमालेंची आयुक्तांना दमबाजी … पहा जसेच्या तसे ..(व्हिडीओ)

0


पुणे- प्रशासनाच्या धोरणांना वैतागलेल्या सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आज आयुक्तांना आज मुख्य सभेत बरेच काही सुनावले . प्रत्येक प्रभागातील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळे शहरात कचऱ्याची समस्या उग्र होते आहे हा अनेक नगरसेवकांच्या तक्रारीचा धागा पकडून भिमाले यांनी आज सभागृहात , आयुक्तांना म्हटले , भाटीया प्रकरणाची आठवण करून दिली , सहा महिन्यांपासून प्रशासन अशा पद्धतीने काम करते आहे कि ज्यामुळे कचऱ्याचा प्रश्न जैसे थे राहतो आहे , अनेक विकास कामे रखडली आहेत . असा मनमानी कारभार करणार असाल तर आम्ही सर्व पक्षीय एकत्र येवून तुम्हाला राज्य शासनाकडे परत पाठ्विण्याचा ठराव करू शकतो असा इशारा हि त्यांनी दिला .. अर्थात हि सारी भीमगर्जना ,भिमाले स्टाईल.. हि आयुक्तांना समोर ठेवून त्यांनी केली असली तरी एएसआय आणि डीएसाय यांच्या बदल्या करणारे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या मागे टार्गेट होत्या अशीही माहिती उजेडात आली आहे . कारण या सर्व भिमटोल्यांना उत्तरे नंतर आयुक्तांनी नाही तर त्यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी अत्यंत शांतपणे दिली …. पहा कशा पद्धतीने भिमाले यांनी लगावले प्रशासनाला भिम टोले … जसेच्या तसे ….

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या पाककृती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगीता गांधी, शिला होनराव, अलका ओझरकर विजेत्या

0
पुणे –
 
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सुमारे ३०० महिलांनी सहभाग घेतला. संगीता गांधी, शिला होनराव,  अलका ओझरकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 
सहकारनगर, शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री. लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रागंणात महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. बटाट्यापासून तिखट पदार्थ आणि नारळापासून गोड पदार्थ हा पाककृती स्पर्धेसाठी विषय ठेवण्यात आला. त्यात तीनशे महिलांनी सहभाग घेतला. यात संगीता गांधी यांनी प्रथम तर  शिला होनराव यांनी द्वितीय आणि  अलका ओझरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर उत्तेजनार्थ पारितोषिके वर्षा तेलंग , अनिता काळे यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीपाली दुबे यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, शोभा इंदाणी , अंजली पुराणिक यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे संयोजन हर्षदा बागुल , दीपा बागुल , सोनम बागुल, नूपुर बागुल यांनी केले. 

रँन्को पोपोविच एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक

0
पुणे: राजेश वाधवान यांच्या मालकीच्या  इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघाने रँन्को पोपोविच यांची आज मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली. मूळ सर्बियाचे असलेले रँन्को पोपोविच हे इंडियन सुपर लीगमधील आपले पदार्पण एफसी पुणे सिटीच्या माध्यमातून २०१७८-१८ या मौसमपासून सुरु करणार आहेत.
 
पोपोविच यांनी आपल्या व्यवस्थापकीय कारकिर्दीची व्यावसायिक सुरुवात २००१मध्ये टस एफसी आर्नफेल्स या ऑस्ट्रेलियन क्लबपासून केली. त्यांनतर एफसी पॅचर्न या आणखी एका ऑस्ट्रियन क्लब मध्ये त्यांनी २००४ ते २००६ या दरम्यान काम केले. त्यांनतर त्यांनी २००६मध्ये सँफ्रिश हिरोशिमा या संघाची सूत्रे सांभाळल्यानंतर ते एफसी पारटेक सोबोटीका या आपल्या संघाकडे परतले आणि २००९पर्यंत त्यांनी सर्बियन्स सुपर लिगा स्पर्धेत आपली सेवा रुजू केली. 
 
त्यानंतर पोपोविच जपानकडे परतले आणि त्यांनी ओयटा ट्रिनिटा, एफसी माचेडा झेलविया व एफसी टोकिओ या संघांचे व्यवस्थापक पद सांभाळत थेट जपान लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य अशा सेरेझो ओसाका या क्लबच्या मुख्य व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली.  त्यांच्याच कार्यकाळात ओसाका क्लबने डिएगो फरलॉन या उरुग्वेच्या जगप्रसिद्ध खेळाडूला करारबद्ध केले. तसेच, त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुणवान युवा खेळाडूंना संधी दिली व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पुढे आणले. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच त्यांना राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी संघाचे निमंत्रण मिळाले. त्यांच्या संघाने दोन वेळा सुपर लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नोंदविला. 
 
पोपोविच यांनी त्यानंतर स्पेनमध्ये पदार्पण करून सेगुंडा डिव्हिजन मधील रिअल झारा गोहा या क्लबचे प्रशिक्षपद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ला लिगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुढच्याच मौसमात पोपोविच यांनी थायलंडच्या प्रीमिअर लीग विजेत्या बरीरॅम युनायटेड एफसी संघाचे  प्रशिक्षक पद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबने थायलंड लीग क्लब आणि मेकाँग चॅम्पियनशिप जिंकली. 
 
पोपोविच यांच्या नेमणुकीबद्दल एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, रँन्को पोपोविच यांच्या निम्मिताने आम्हांला १५ वर्षापेक्षाही अधिक काळ प्रशिक्षक पदाचा अनुभव असलेला एक नामवंत कार्यक्षम व्यवस्थापक मिळालेला आहे. त्यांना विविध लीगमधील फुटबॉल संस्कृतींचा आणि विशेषकरून आशियांतील वैविध्यपूर्ण फुटबॉल शैलींचा मोठा अनुभव आहे. आमच्या क्लबला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. पोपोविच हे विविध भाषांमध्ये प्रविण असून खेळाडूंशी सवांद साधने आणि गुणवान खेळाडूंचा विकास घडविणे याबाबदतीत त्यांची खासियत आहे. त्यांच्या बरोबर काही वेळ घालविल्यानंतर फुटबॉलमधील त्यांच्या ज्ञानाने मी खूपच प्रभावित झालो. त्यांचे खेळाविषयीचे सखोल ज्ञान, यश मिळविण्याची जिद्द आणि भारतांतील परिस्थितीत काम करण्याची क्षमता यामुळे एफसी पुणे सिटी संघासाठी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरणार आहे. 
 
पोपोविच म्हणाले कि, एफसी पुणे संघात सहभागी होऊन मला अतिशय आनंद झाला आहे.  मोडवेल यांची खेळाविषयीची दूरदृष्टी व संघाची बांधणी करण्याची जिद्द त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला यश मिळवून देऊ यात शंका नाही. 

दारूबंदीसाठी राज्यसरकारला महापालिकेचे साकडे (व्हिडीओ)

0

पुणे-गुजरात आणि बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी करावी अशी राज्य सरकारकडे मागणी आणि विनंती करणारा ठराव आज महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने संमत करण्यात आला.
उपमहापौर सिद्धार्थ धेंडे  आणि सुनिता वाडेकर यांनी हा ठराव 3 एप्रिल रोजी सादर केला होता . सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर लगतच्या परिसरात दारूबंदी ची अंमलबजावणी केल्याने याबाबत शासनाचे अभिनंदन याच ठरावात करण्यात आले आहे . जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवाला नुसार दारूसेवनाच्या दुष्परिणामांमुळे प्रत्येक दिवसाला १५ जणांचा मृत्यू होतो यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो .दारूच्या दुष्परिणामामुळे राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नकसान होत आहे .या बाबींचा विचार करून राज्यात दारूबंदी लागू करावी आणि आणि नागरिकांचे हीत जोपासावे अशी शिफारस या ठरावान्वये करण्यात आली आहे .

हिंजेवाडी येथील रॅडिसन ब्ल्युने जलसंवर्धन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले पाऊल

0
पुणे: विशेषज्ञांचा अंदाज आहे की, 2025 पर्यंत जगाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्य पाण्यासंबंधित समस्यांचा सामना करणार आहे. समुदायाची सेवा करणे रेडिसन ब्ल्युच्या स्वभावातच आहे. म्हणूनच पुण्यातील हिंजेवाडी येथील त्यांच्या टीमने ब्लू प्लॅनेट इनिशिएटिव्ह अंतर्गत पृथ्वीवरील  अमूल्य जलसंपत्ती व त्याचे संरक्षण करण्यासाठी उपक्रम राबविला. समुदायाची सेवा आणि जनजागृती करण्याचा दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
रॅडिसन ब्ल्यु टीमने अत्यंत उत्साहाने स्थानिक समुदायांमध्ये औदार्याची भावना पसरवित पसरवीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी काम केले. यावेळी त्यांनी जलशुद्धीकरण व स्टोरेज टँकच्या स्थापनेचे कामकाज सुरु असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ‘अवेअरनेस ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर’ या सत्राचे आयोजन  केले. या सत्रामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याविषयी बाळगावयाची सावधानता व शौचालयातील स्वच्छतेतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
या जिल्हा परिषद शाळेत एकच पाण्याची टाकी होती जी विविध कामांसाठी वापरात होती. मूलभूत गरजेपासून शाळेला वंचित झालेले पाहून रॅडिसन ब्ल्यु टीमने स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी शाळेला मदत करायचे ठरविले. विकासाच्या खूप मोठ्या कल्पनांमधून लहान पण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहून जातात. असे दुर्लक्षित मुद्दे शोधून व त्यांच्यावर काम करून आमूलाग्र बदल घडविण्याची जाणीव रॅडिसन ब्ल्यु टीम ठेवते.
या शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ वेताळ म्हणाले की, “शाळेच्या आवारात पिण्यायोग्य पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही झगडत होतो. पुण्यातील हिंजेवाडीच्या रॅडिसन ब्ल्युने पुढाकार घेऊन आमच्या या संघर्षाला पूर्णविराम दिला. शाळेत फक्त पाण्याची टाकी असणे पुरेसे नाही तर स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे”.
त्यांनी वॉटर हार्डनेस ४५० पीपीएम वरून ५ पीपीएम पर्यंत घटवून टोटल डिजॉल्वड सॉलिड्स म्हणजेच एकूण विसर्जित घनपदार्थ ३०० एमजी प्रति लिटर वरून २० एमजी प्रति लिटर पर्यंत खाली आणले.
एका व्यक्तीपासून ते समुदायाने केलेल्या एकाधिक आणि योग्य कृत्यांमुळे आमूलाग्र बदल घडविता येतात. आजूबाजूचा परिसर वेळोवेळी स्वच्छ करून रॅडिसन ब्ल्युने स्वछ भारत अभियानाला हातभार लावला आहे. वैद्यकीय व रक्तदान शिबीर आयोजित करणे, स्थानिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठीदेखील कार्य केले आहे.
याप्रसंगी रॅडिसन ब्ल्युचे पंकज सक्सेना म्हणाले की, “ज्या समुदायामध्ये आपण वावरतो त्यावर सकारात्मक प्रभाव टाकणे आमच्या मिशनचे अविभाज्य भाग आहे. ही फक्त एक नम्र सुरवात आहे. सकारात्मक दृष्टीने आयुष्यांना स्पर्श करणे हा खूप संतुष्ट करणारा अनुभव असतो”.

अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते राऊंड टेबल इंडिया स्कूल ‘जनता विद्यालय’ चे भूमिपूजन

0

पुणे: राउंड टेबल इंडियाने अलीकडेच पिंपरी सांदेस, नावाच्या खेड्यात पेरने फाट्याजवळ जनता विद्यालयाची स्थापना केली आले, ह्यावेळी बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता ते राउंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

‘जनता विद्यालया’मध्ये सध्या 650 विद्यार्थी आहेत आणि राउंड टेबल इंडिया या गावातील मुलांसाठी शाळा बांधत आहे. या कार्यक्रमात राऊंड टेबल इंडियाचे वरिष्ठ सदस्य ललित पीट्टी, अविनाश अगरवाल, प्रकाश शाह, विकास गोयल, सचिन खंडेलवाल आणि राहुल वाधवा उपस्थित होते.

ह्या आनंदाच्या प्रसंगी जॅकी श्रॅाफ सर्व विद्यार्थी आणि गावकर्यांबरोबर रमले, ते म्हणाले की मला खूप आनंद झाला आहे की ललित पिट्टी ( अध्यक्ष, पीएसआरटी १७७) ने मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. माझे असे मत आहे कि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. या कार्यक्रमाला आसपासच्या खेड्यातील जवळपास 2000 लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमात एका विशेष वृक्षारोपण मोहीम देखील राबविण्यात आली होती ज्यात  जॅकी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी रोपे लावली.

अमृता फडणवीस व जीत गांगुली करतायेत पाठलाग

0

गायिका अमृता फडणवीस आणि ‘आशिकी २’ फेम संगीतकार जीत गांगुली नेमका कोणाचा व कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ? त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे.

रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखी

दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाची

असे बोल असलेल्या या गीताचे रेकोर्डिंग नुकतेच संपन्न झाले. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डाव  ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

 

डाव या सिनेमातील ‘पाठलाग’ हे थ्रिलर सॉंग गायिका अमृता फडणवीस यांनी गायलं असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रोमांचकारी भयाने खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाचे हे शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. या गीतासाठी ‘जॅझ’ पीसचा वापर केल्याने हे गीत आशयातील गूढता आणखीन वाढवते.

 

जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गीत एक थरारक अनुभव देईल, असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृता यांनी ज्या खुबीने हे गीत गायलं आहे ते अंतर्मनाचा ठाव घेईल असा विश्वास संगीतकार जीत गांगुली व्यक्त करतात. सोबत मराठी चित्रपटासाठी संगीत देण्याचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांच्या मते हे गीत तसेच हा सिनेमाही प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा असेल.

डाव या थरारपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे 
१९व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 सहकारनगर , शिवदर्शन येथील प्रसिद्ध लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात इयत्ता ४ थी ते ६ वी. व इयत्ता ७ वी ते ९ वी या लहान व मोठा  गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी केले.यावेळी ३०० मुला -मुलींनी सहभाग घेतला. त्यात  छोट्या गटामध्ये आदित्य विश्वे याने प्रथम तर आवनी जाजू हिने द्वितीय ,रिया भंडारी हिने तृतीय क्रमांक आणि श्रेयस मुनोत , चैतन्य लोढी या दोघांच्या उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावली. तर मोठ्या गटात दिव्या गुरव हिने प्रथम क्रमांक ,मोक्ष शहा द्वितीय तर निधी मुथा हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रियाल कोटक  व ओम सातकर या दोघांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. परीक्षक म्हणून राजेश्वरी

​करले

यांनी कामकाज  पाहिले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल

​, उपाध्यक्षा निर्मला जगताप, हर्षदा बागुल , नुपूर बागुल, नम्रता जगताप, संगीता बागुल , ​

गजानन माने , श्रीकांत बागुल यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

नादुरुस्त वीजवाहिनीमुळे पेठांमध्ये भारनियमन

0

 

पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ व रविवार पेठाच्या परिसरात रविवारी (दि. 24) सायंकाळी उशिरानंतर प्रत्येकी एक तासांचे भारनियमन करण्यात आले.

दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. 23) सायंकाळीपर्यंत 75 टक्के पूर्ण झाले होते. वीजवाहिनीला चारपैकी तीन ठिकाणी जाईंट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे तर एक जाईंट लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.

नादुरुस्त वीजवाहिनीचे काम आज रात्री उशिरापर्यंत किंवा सोमवारी (दि. 25) दुपारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर महापारेषणच्या रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राचा व तेथून सद्यस्थितीत बंद असलेल्या महावितरणच्या सहा उपकेंद्रांचाही वीजपुरवठा सुरु होईल. त्यानंतर इतर उपकेंद्रांतून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु असलेल्या पुणे शहरातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसराचा वीजपुरवठा सहा उपकेंद्रातून पूर्ववत करण्यात येईल.

अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

0

पुणे-अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब अग्रसेन यांच्यावतीने चंदन नगर येथे साईबाबा मंदिर हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  यामध्ये दंत , नेत्र , चिकित्सा शिबीर घेण्यात आले  मोफत चष्मे वाटप करण्यात आले . फिजिओथेरपी , होमिओपॅथी तपासणी आदींचे शिबीर घेण्यात आले .

    या शिबिरात ३८० नागरिकांनी लाभ घेतला . या शिबीराचे आयोजन राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल , अग्रवाल समाज नगर रोड , अग्रसेन डायनोस्टिक सेंटर , अग्रसेन सेवा संस्था यांनी केली . शिबिराचे उदघाटन लायन परमानंद शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे अमोद गोयल , विनोद अग्रवाल , सुरेश अग्रवाल , महेश अग्रवाल , उमेश अग्रवाल , विशाल अग्रवाल , त्रिलोकचंद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरासाठी डॉ अविनाश वाघमारे , डॉ. शीतल भुतडा , तनुजा रॉड्रिक्स , डॉ. विनायक चौधरी , डॉ. शिलभद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले

दिलेले जबाबदारी पूर्ण करणे हे प्रदीप रावत यांचे वैशिष्ट्य – खा.अनिल शिरोळे.

0
पुणे-आपल्याला राजकारणात आणि समाजकारणात अनेक जबाबदाऱ्या मिळतात मात्र मिळालेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करणे ही प्रदीपदादा रावत यांचे वैशिष्ट्य असून शिपिंग कॉर्पोरेशन च्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही दादा रावत समर्थपणे पार पाडतील असे गौरवोदगार अनिल शिरोळे यांनी काढले.क्रीएटिव्ह फौंडेशन आयोजित कोथरूड नवरात्र उत्सवात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.आमदार मेधा कुलकर्णी या खरोखरच रणरागिणी आमदार असुन त्या संवेदनशील आहेत या संदीप खर्डेकर यांच्या भाषणातील वाक्याचा संदर्भ देत त्यांनी आ मेधा कुलकर्णी यांचा ही मराठी भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला व भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच भाजपच्या पुणे शहराच्या पहिल्या महापौर हा मान मुक्ता टिळक यांनी मिळविला असुन त्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास अनिल शिरोळे यांनी व्यक्त केला.
कोथरूड नवरात्र महोत्सवात आज फक्त महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महापौर मुक्ता टिळक व खा अनिल शिरोळे यांच्या हस्ते प्रदीप रावत तसेच मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके,मंदार बलकवडे व उमेश भेलके उपस्थित होते.
महापौर मुक्ता टिळक यांनी प्रदीप रावत आणि मेधा कुलकर्णी यांचा गौरव करतानाच ” आपण शहर विकासासाठी कार्यरत असून विशेषत: महिलांसाठी आपण लवकरच महापौर बचत बाजार सुरु करणार असून या द्वारे उद्योजक महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होइल असे ही त्या म्हणाल्या.
आज ललिता पंचमी च्या दिवशी मुलींचे पूजन केले जाते,याच बरोबर सर्व महिलांनी आपल्या मुलांना शिक्षित आणि संस्कारित करावे असेही त्या म्हणाल्या.आमचा सत्कार करताना जिजाऊ आणि बाल शिवाजी ची प्रतिमा देण्यात आली हे औचित्यपूर्ण असून ज्याप्रमाणे जिजामातानी शिवरायांवर संस्कार केले तसेच संस्कार प्रत्येक आई ने आपल्या मुलांवर करावेत आणि त्याहीपेक्षा मुलांवर असे संस्कार करावेत की महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होइल अशी अपेक्षा आ मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.प्रदीप रावत यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात तनिष्का दुगड या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जर्मनीतील मेटल मॅथ्स कॅल्क्युलेशन च्या जागतिक ज्युनियर चॅम्पिअनशिप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाल्याबद्दल   सत्कार करण्यात आला,
तत्पूर्वी काल रात्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी नगरसेवक दीपक पोटे,सुशील मेंगडे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
असे महोत्सव हे नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात असे नमूद करुन आपण कोथरूड सह एकूणच शहराच्या विकासासाठी निधी ची कमतरता भासु देणार नाही व शहराचा अर्थसंकल्प त्याच धर्तीवर समतोल साधणारा आहे असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.यानंतर आई रिटायर होतीये हे नाटक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.मंदार बलकवडे,उमेश भेलके व विशाल भेलके यांनी स्वागत केले.

‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग !

0

‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’  ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं युगान्त हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसं दडपण होतं. हे नाटक जरी चांगलं असलं तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता, पण ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’ला  मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, पस्तीस वर्षापूर्वी एका नाटककारानं लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक आजही प्रेक्षकांना भिडतं आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे. ‘युगान्त आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल या उद्देशानं ही नाट्यत्रयी प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अशी ‘नाट्यत्रयी’ प्रथमच सादर होत आहे हे विशेष. म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडणारी ही अभिजात नाट्यकृती सादर होणं ही ऐतिहासिक गोष्ट असून ती महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आलं याचा आनंद ही व्यक्त केला.

या ‘नाट्यत्रयीचा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला  रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग  होणार असून ते दर रविवारी सादर होतील. मुंबई- पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे. या ‘नाट्यत्रयी’चं ऑनलाईन बुकिंग बुधवार २० सप्टेंबरपासून सुरु झालं असून सलग नाट्य प्रयोगच्या तिकीटांसोबत नाटकाच्या तिनीही भागांची स्वतंत्र तिकीटंसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट विक्रीच्या दिवसापासून सीझनं तिकिटं बुकिंग काऊंटरवर उपलब्ध होतील.

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचं असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.

निवेदिता सराफ, भारती पाटील,  वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड, आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचं आहे. प्रकाश योजना रवी रसिक यांची आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर याचे निर्माते असून सहनिर्माते अर्जुन मुद्दा व संज्योत वैद्य आहेत. जीवनानुभव देत वास्तवाचा ठाव घेणारी ही ‘नाट्यत्रयी निश्चितच एक अविस्मरणीय नाट्यानुभव देऊन जाईल

विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवा : शरद पवार

0
आबा बागुल यांचे कार्य आदर्शवत, आता मुंबईची संधी द्या 
पुणे :विकासकामे कोणतीही असू द्या, त्यात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. नगरसेवक आबा बागुल यांची कल्पकता आणि सातत्याने राबविलेले विकासाचे प्रकल्प हे आदर्शवत आहेत. 30 वर्षे लोकप्रतिनिधी असलेल्या आबा बागुल यांना आता मुंबईत पाठविण्याची गरज आहे. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी बागुल यांच्या कार्याचा गौरव केला. 
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी माता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक व अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनला मी परदेशात असल्याने येऊ शकलो नाही. याची मला अस्वस्थता होती. त्यामुळे मी आज आवर्जुन याठिकाणी आलो आहे. तसं मी यापूर्वी कै. वसंतराव बागुल उद्यान उद्घाटनावेळी तसेच महर्षी पुरस्कार वितरण आणि अन्य एका कार्यक्रमासाठी आलो आहे. असे स्पष्ट करून पवार म्हणाले, आबा बागुल यांच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसराचा सर्वांगीण विकास करताना जनतेच्या हिताला दिलेले प्राधान्य हे सर्वांसाठी आदर्शवत आहेत. सातत्याने विकासाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी कसे होतील याकडे सदैव लक्ष असणारे आबा बागुल हे एक दक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आज 30 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून आबा कार्यरत आहेत. आणखी 20 वर्षे झाली की ते माझ्या रांगेत येऊन बसतील. त्यामुळे आता आबा बागुलांना मुंबईला पाठवलेच पाहिजे, असेही पवार म्हणाले.
आबा बागुल यांच्या काशी यात्रेचा उल्लेख करताना पवार म्हणाले, खरंच प्रत्येाकाला वाटतं काशीला एकदा जावून यावे. पण, मी इथे एक सूचना करतो, एक वर्ष काशी यात्रा घ्या. दुसर्‍या वर्षी भारतात जालियानवाला बाग, वाघा बॉर्डर अशी अनेक ठिकाणे आहेत, तेथे लोकांना घेऊन जा. सर्वधर्म समभाव कसा जोपासला जाईल याबरोबरच सियाचीन सारख्या भागामध्ये आपले जवान देशासाठी कसे कार्यरत आहेत, हे ही यानिमित्ताने लोकांना कळेल. विविध भाषा, प्रांत याचीही संपूर्ण माहिती होईल. 
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये आबा बागुल यांनी तारांगण उभे केले आहे. खरंच, ही बाब कौतुकास्पद आहे. पण, निव्वळ तारांगण सुरू केल्यानंतर तिथे प्रत्येक दिवशी कसा कार्यक्रम असावा, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी आबा बागुल आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईतील  जवाहरलाल नेहरू प्लॅनोटोरियम सेंटरला भेट द्यावी. त्याचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे तारांगणाच्या परिपूर्ण प्रक़ल्पासाठी आपल्याला मी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल खरंच आदर्शवत शाळा आहे. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणले. पण, ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आबा बागुल यांनी खर्‍या अर्थाने ही शाळा उभारली. या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात उज्ज्वल भविष्य नक्कीच असेल, असेही ते म्हणाले. 
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीय. परिणामी पर्यावरणाचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे. वृक्षवल्ली कशी जोपासली जाईल, परिसर कसा हिरवागार करता येईल, त्यासाठी कृती कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आबा बागुल यांनी त्यांच्या परिसरातील नाल्यांचा केलेला विकास खूप चांगला आहे. नाल्यांचा विकास करताना परिसर हरित केला, त्या दृष्टीने सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. 
प्रास्तविकात आबा बागुल म्हणाले, 23 वर्षांनी आज शरद पवार यांचे पुनरागमन झाले आहे. माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात शरद पवार यांचा आदर्श आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान पद मिळण्याचे एकमेव नेेतृत्व आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार. पुढील 50 वर्षात असे नेतृत्व, व्यक्तिमत्त्व होणे शक्य नाही. 
सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले.

जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार: पालकमंत्री गिरीश बापट

0
पुणे : जिल्ह्यात  सुरु असलेल्या  राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार असून यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक आज  पुणे येथे पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस.डी. चिटणीस यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त होण्यासाठी या कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.तसेच रस्त्यांच्या कामाचा विभागानुसार आढावा घेतला.
 पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनी मार्फत सुरु आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊन सुद्धा या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. सदर रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ सुरु करावे. अन्यथा रिलायन्स इन्फ्रा कढून हे काम काढून घ्यावे अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
 नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी या रस्त्यासाठी लागणारी 80 टक्क्यांहून अधिक जमीन ताब्यात आली आहे.त्याचप्रमाणे या मार्गातील प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेने काढून टाकल्याने काम सुरु करण्यात अडथळा येणार नाही.इंद्रायणी नदी ये खेड या रस्त्याच्या भूसंपादनाचा निवाडा प्रक्रिया अंतिम टप्यात असून या महिना अखेर सर्व निवाडे जाहीर केले जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या कामाचे टेंडर लवकरात लवकर काढून 1 जानेवारी पर्यंत काम सुरु  करण्याच्या सूचना दिल्या.
चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव चाकण शिक्रापूर नावरा चौफुला या रस्त्यावरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ शकते त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे तसेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं.
 ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यातील रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत जबाबदारी  निश्चित करून काम जलद गतीने पूर्ण होईल या करिता योग्य ते नियोजन करावे, कामामध्ये काही अडचणी असल्यास त्याबद्दलचा सविस्तर आढावा माझ्याकडे सादर करावा. सर्व विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असेही या वेळी  पालकमंत्री म्हणाले.

विध्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता वाढवण्याची गरज- महापौर

0

पुणे-  शहरात विध्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने कमी पडत आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यासाठीच्या विकासासाठी मैदानांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदाने ब क्रीडांगणासाठी आरक्षण टाकण्यात आली आहेत. हि आरक्षणे बदलू नयेत यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वानी सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी महेश बालभवनच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात व्यक्त केले.

कोथरूड येथील महेश बालभवन च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या सभागृहात काल  शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता  टिळक यांच्या हस्ते रौप्य्महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,प्रसिद्ध उद्योगपती महेश नागरी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री धनराजजी राठी, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी, महेश बालभवनच्या अध्यक्षा सौ. संगीत लाहोटी,सचिव गणेश मुंदडा, कार्याध्यक्ष रमेश धूत, सचिव सुशीला राठी, सुरेखा करवा, सदस्य श्रीमती अंजली तापडिया, श्री मनोज कास्ट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालभवनच्या विध्यार्थ्यानी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विजेत्या विध्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी महापौर मुकता टिळक, खासदार वंदना चव्हाण, मुरलीधर मोहोळ, श्री धनराजजी राठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या कि, पुणे शहरात पूर्वी मुलांना खेळण्यासाठी भरपूर मैदाने होती. आत्ता मैदानांची संख्या कमी होत चालली आहेत. हे लक्षात आल्यांनंतर आम्ही पुणे मनपाच्या विकास आराखड्यात मैदाने बी क्रीडांगणासाठी आरक्षणाची तरतूद केली. काळाच्या ओघात ती बदलण्याचा प्रयत्नही झाला. तो आम्ही वेळीच विरोध करून थांबवले. आत्ता मुलांच्या क्रीडा कौशल्याच्या विकासासाठी मैदाने वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.

महापौर टिळक आपल्या भाषणात म्हणाल्या कि मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वचजण झटत आहेत. परंतु मुलांच्या मानसिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे काही मुले मानसिदृष्ट्या कमकुवत होतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वानी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

बालभवनच्या अध्यक्षा संगीता लाहोटी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देताना सांगितले कि, बालभवन संस्थेने पालकांमध्ये चांगलाच विश्वास निर्माण केला. बालभवनच्या विध्यार्थ्यानी संपूर्ण भारतात संस्थेचे नाव रोशन केले. याप्रसंगी श्री राठी, मोहोळ आदींची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार गणेश मुंदडा  यांनी मानले.सूत्रसंचालन संगीत पिपंळीकर यांनी मानले