Home Blog Page 3265

खाणींमध्ये पाऊस पडल्याने निर्माण झालेले संकट 2000 मेगावॉटची तूट-तात्पुरते भारनियमन : ऊर्जामंत्री

0
खुल्या बाजारांमध्ये वीज उपलब्ध नाही
नागपूर-
महानिर्मिती व खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले असून येत्या 15 दिवसात विजेची परिस्थिती सुधारेल. तसेच एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी कमी कोळसा उपलब्ध झाल्यामुळे भारनियमन करावे लागत असून नागरिकांनी सध्या ऊर्जा बचतीचा प्रयत्न करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारपरिषदेत केले.
याप्रसंगी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत असून मुंबईत भारनियमन होणार नाही. तसेच महानगरांमध्येही भारनियमन होणार नाही. टाटा पॉवरकडून सध्या 850 मेगावॉट, जलविद्युतद्वारे 410 मेगावॉट, डहाणूकडून 240 मेगावॉट, व्हीआयपीएल 310 मेगावॉट, लघुकालिन निविदा व एक्स्चेंजच्या माध्यमातून 1530 मेगावॉट वीज मिळत आहे. महानिर्मितीकडून औष्णिक व वायू प्रकल्पातून 4980 मेगावॉट, कोयना जलविद्युत प्रक़ल्पातून 1360 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून 4100 मेगावॉट वीज मिळत आहे. खुल्या बाजारातही वीज उपलब्ध नाही.
खाजगी वीज प्रकल्प अदानीकडून 1750 मेगावॉट, रतन इंडियाकडून 380 मेगावॉट, सीजीपीएलकडून 560 मेगावॉट व सौर, पवनऊर्जा, एमको, जिंदाल यांच्याकडून 200 मेगावॉट वीज मिळत आहे. सध्या अंदाजे 2000 मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. तूर्तास पवनऊर्जा, अणुऊर्जा व जलविद्युत प्रकल्प बंद आहेत. त्यामुळेच वीज तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. ही स्थिती 15 दिवसात सुधारणार आहे. त्यामुळे सध्याचे भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपातील आहे. विजेची मागणी असताना विजेचा तुटवडा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आपण आपल्या राज्याची मागणी पूर्ण करून उत्तरप्रदेशला वीज दिली आहे. तसेच 30 मार्च 2017 ला सुमारे 24 हजार मेगावॉट विजेचे यशस्वी वितरण आणि पारेषण आपण केले आहे, याकडेही ऊर्जामंत्र्यांनी लक्ष वेधले.
वेस्टर्न कोल फिल्डसने कोळसा पुरवठा वाढवला आहे. खाणीमध्ये झालेल्या पावसामुळे एसईसीएलचा कोळसा पुरवठा कमी झाला. महानिर्मितीची 10 हजार मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता आहे. पण 7 हजार मेगावॉट वीज महावितरणला द्यावी लागते. सी गटात सध्या भारनियमन सुरु आहे. पण लवकरच तेही भारनियमन संपणार आहे. ज्या गटात वीजचोरी आणि वीज वहनाचा तोटा तसेच वीजबिल वसुली कमी आहे, तेथे भारनियमन राहणार आहे. भारनियमनाची संकट लक्षात घेता वीज नियामक आयोगाने नुकतीच 1200 मेगावॉट वीज खुल्या बाजारातून घेण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांनी आणि मनपा, नपा यांनी वीजबचत करून या संकटातून राज्याला बाहेर पडण्यास सहकार्य करावे असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.

जास्तीत जास्त लोकांनी “सीपीआर” शिकावे – खा. अनिल शिरोळे

0

पुणे-अचानक येणार्‍या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागणार्‍या घटना टाळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सीपीआर तंत्रज्ञान  शिकावे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याच समाजासाठी होऊ शकेल असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणे शहर पोलिसांसाठी आयोजित सी. पी. आर’ प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. ह्या प्रसंगी पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता  टिळक, पुणे पोलीस सह आयुक्त श्री रवींद्र कदम, पुणे अपर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, लारडेल मेडिकल चे पुष्कर इंगळे, डामेनिक मॅथ्यु, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. महापौर मुक्ता टिळक यांनी १२-१२ तास ड्युटी करताना पोलिसाना येणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणा बद्दल सहानुभूती व्यक्त करतानाच असे जीव वाचिवण्याचे कौशल्य पोलिसांना स्वत:साठी देखील उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली.

पोलिस मुख्यालय शिवाजीनगर येथे दोन दिवस चालणार्‍या ह्या शिबिरात सी.पी.आर चे प्रशिक्षण नोर्वे स्थित लारडेल मेडिकल द्वारा २०० मॅनिकिन्स (डमी बाहुल्या) द्वारा पुणे शहर पोलिस दलातील सुमारे २००० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी ह्यांना देण्यात येणार आहे. पोलीस सह. आयुक्त श्री रवींद्र कदम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पोलीस उपायुक्त श्री. शेषराव सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.

टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 उत्तमोत्तम सिनेमे सादर करणार

0

पुणे: टाटा स्काय या प्रामुख्याने भारतीय बाजारासाठी इंटरॅक्टिव्ह सेवा देण्यासाठी
नावाजल्या जाणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंटेट वितरण सुविधेतर्फे एका आनंददायी बातमीने
यंदाच्या सणासुदीची सुरुवात होणार आहे. टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे वेध सर्वांनाच लागले
असून दोन महिने चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्व काही असणार आहे – भारताच्या कानाकोपऱ्यातील
आणि जगभरातील सिनेमे तसेच पुरस्कारविजेते, कौतुक झालेले उत्तम चित्रपट. आणि विशेष म्हणजे हे
सिनेमे पुण्यातील तुमच्या घरी बसून तुम्हाला अगदी आरामात पाहता येणार आहेत. हे चित्रपट टाटा
स्कायवर स्टार आणि जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने उपलब्ध असणार आहेत.
पुणेकरांना टाटा स्कायवर मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 मध्ये बरेच काही पाहता येणार आहे. या
वर्षी, नटरंग, फँड्री, व्हेंटिलेटर, तसे कुर्दी व गंगूबाई अशा मराठी सिनेमांसह अनेक इतर भाषिक
चित्रपटांचा समावेश देखील फेस्टिव्हलमध्ये असणार आहे.
कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता टाटा स्कायच्या सबस्क्रायबर्ससाठी 20+ सिनेमे उपलब्ध
करणाऱ्या यशस्वी 2016 टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल नंतर, कंपनीने आज अधिक मोठ्या व
उत्तम प्रतीच्या टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 ची घोषणा केली. यामार्फत टाटा स्काय
आपल्या सबस्क्रायबर्ससाठी भारतातील काही उत्तम सिनेमे सादर करणार आहे, जे अन्यथा पुण्यातील
प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नसते.
पुणे येथे लाँच करताना, टाटा स्कायचे चीफ कंटेट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले, “उच्च
गुणवत्तेच्या व कौतुक झालेल्या सिनेमांचा मोठा प्रेक्षकवर्ग असल्याचे गेल्या वर्षी टाटा स्काय मुंबई
फिल्म फेस्टिव्हलला मिळालेल्या प्रतिसादातून निदर्शनात आल्याने, एकाहून एक सरस सिनेमे
शोधण्याचे व प्रेक्षकांसाठी सादर करण्याचे प्रोत्साहन आम्हाला मिळाले. टाटा स्काय स्वतःल एक कंटेट
व प्रेक्षकांच्या शोधाचे व्यासपीठ मानते व या व्यासपीठाचा उद्देश दरवर्षी अत्यंत दर्जेदार सिनेमे
जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर आणणे हा आहे. आमच्या व्याप्तीमुळे आम्हाला भारतात प्रामुख्याने
चित्रपट महोत्सव उपलब्ध नसणाऱ्या व मुख्य सांस्कृतिक केंद्रांपासून दूर असलेल्या प्रदेशांत चांगल्या
कलेला व उत्तम टॅलेण्टला पाठिंबा देणे शक्य होते.”
त्यांनी पुढे सांगितले, “आमच्या मते, ही सेवा प्रेक्षकांना केवळ चांगले सिनेमे देणारे ठिकाण यापेक्षाही
मोठी आहे. सिनेमा उद्योगाच्या दृष्टीनेही सिनेमा दाखवण्यासाठी हे आणखी एक व्यासपीठ ठरते.”

टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2017 ची ठळक वैशिष्ट्ये पुढील आहेत:
 स्टार फॉर टीव्हीसह, जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या सहयोगाने खास सिनेमे : दोन
महिन्यांच्या कालावधीमध्ये दाखवले जाणार अंदाजे 30 चित्रपट
 कौतुक झालेल्या, पुरस्कारविजेत्या उत्तम सिनेमांचा आणि नव्या तसेच अगोदर न पाहिलेल्या
कंटेटचा योग्य मेळ
 भाषा: हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, आसामी, मणिपुरी, आंतरराष्ट्रीय (सबटायटल्ससह)
 कालावधी: 2 महिने (1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर)
 येथे उपलब्ध: एचडीमध्ये चॅनल क्रमांक: #302 आणि एसडीमध्ये #303 (एकाच वेळी)
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या संचालक अनुपमा चोप्रा यांनी सांगितले :“टाटा स्कायबरोबरची
आमची ही भागीदारी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भारतात सिनेमाबद्दल प्रचंड प्रेम आहे.
अनेक फिल्ममेकर्स अप्रतिम कथा साकारत असतात. या खास व्यासपीठामुळे या सर्व कथा नव्या व
वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. टाटा स्कायवरील मुंबई फिल्म फेस्टिव्हल फिल्म बनवणाऱ्यांसाठी
व चित्रपटांचे चाहते असलेल्यांसाठी महत्त्वाचे आहे.

नेहरू विचार जागविण्याची गरज – अ‍ॅड. राज कुलकर्णी

0
पुणे ः ‘भारतीय स्वातंत्र्य लढा हा मानवमुक्ती चळवळीतील    एक भाग आहे ‘ असे सांगणारे पंडीत नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले.नेहरूंविषयी काश्मीर-फाळणी, चीनसंदर्भात केली जाणारी टीका कुजबूज तथ्यहीन आहे. आजच्या संदर्भात ‘नेहरू विचार’ पुन्हा जागविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंडीत नेहरूंचे अभ्यासक अॅड. राज कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ मध्ये आधुनिक भारताचे निर्माते-पंडीत नेहरू ‘या विषयावरील खुल्या संवादात ते बोलत होते.
गांधीभवन, कोथरूड येथे हा खुला संवाद झाला. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते.
राज कुलकर्णी म्हणाले, ‘राष्ट्रवाद हा भूभागापुरता मर्यादित नसावा, तो जनतेशी निगडीत असावा, अशी पंडीत नेहरूंची भूमिका होती. आपल्या लिखाणातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आंतरराष्ट्रीयकरण केले. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगातील मानवमुक्ती चळवळीचा भाग आहे, असे त्यांनी लिहिले होते. हिटलर, मुसोलिनी यांच्या भेटी त्यांनी टाळल्या, यावरून त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होती, हे लक्षात येते.’
नेहरूंवरील आरोप हे तथ्यहीन आहेत असे त्यांनी सांगितले. भारतात न येणारा काश्मीर नेहरूंमुळे सामील झाला. त्यामुळे काश्मीरला 370 कलमासारख्या काही जास्तीच्या गोष्टी द्याव्या लागल्या. सिक्युरिटी कौन्सिलच्या सदस्यत्वाची ऑफर भारताला आलेली नव्हती. म्हणून भारत सदस्य बनू शकला नाही. त्यात नेहरूंना दोष देता येत नाही. चीनशी पंचशील करार 25 वर्षांचा व्हावा, असे त्यांचे मत होते. मात्र, तो आठच वर्षांचा झाला. हा करार संपल्यावर चीन लगेचच हल्ला करेल, असे कोणालाच वाटले नव्हते. तसेच ते नेहरू यांनाही वाटले नव्हते.
देशाची फाळणी देखील अगदी अपरिहार्य बनल्यानेच सर्वांनी स्वीकारली. मात्र, अनेक बाबतीत नेहरूंना जबाबदार धरण्याची फॅशन बनली आहे. तरीही नरेंद्र मोदींच्या काळातच लोक नेहरूंविषयी अधिक सजग होऊन वाचू लागले आहेत, ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
यावेळी डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे उपस्थित होते.

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आर्यन भाटिया, सान्या सिंग यांना दुहेरी मुकुट

0

पाचगणी, दि.6 ऑक्टोबर  2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या आर्यन भाटिया याने, तर मुलींच्या गटात सान्या सिंग या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या  या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात सातव्या मानांकित व मुंबईच्या आर्यन भाटियाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित व कर्नाटकाच्या निखिल निरंजनचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. १ तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात पाहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर आर्यन याने नेटजवळून आक्रमक खेळ करत निखिलची पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये आर्यनने आपले वर्चस्व कायम राखत निखिलची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-२ असा सहज जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित सान्या सिंग हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित हृदया शहाचा ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना १तास ४५ मिनिटे चालला.  दुहेरीत अंतिम फेरीत सान्या सिंगने शनाया नाईकच्या साथीत राधिका महाजन व इशिता जाधव यांचा ६-४, ७-५ असा पराभव करून एकेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच या गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.

दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत आर्यन भाटियाने आदित्य बालसेकरच्या साथीत हितेश पी. व आर्य राज या जोडीचा ६-३, १-६, १०-७ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक जावेद सुनेसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले:

आर्यन भाटिया(७)वि.वि.निखिल निरंजन(२)६-३, ६-२;

मुली: सान्या सिंग(१)वि.वि.हृदया शहा(३)६-३, ६-३;

 

दुहेरी गट: मुले: उपांत्य फेरी:

हितेश पी./आर्य राज(४)वि.वि.सर्वेश बिरमाने/निरंजन निखिल(१)६-४, २-६, १०-६;

आदित्य बालसेकर/आर्यन भाटिया वि.वि.अर्जुन कुंडू/संस्कार चोभे ६-१, ७-६(२);

अंतिम फेरी:आदित्य बालसेकर/आर्यन भाटिया वि.वि.हितेश पी./आर्य राज(४)६-३, १-६, १०-७;

मुली: उपांत्य फेरी:

राधिका महाजन/इशिता जाधव(४)वि.वि. गार्गी पवार/हृदया शहा(१)६-७(५), ६-४, १०-८;

शनाया नाईक/सान्या सिंग(२)वि.वि.कथा बिरमाने/हर्षिता बांगेरा ६-३, ६-२;

अंतिम फेरी: शनाया नाईक/सान्या सिंग(२)वि.वि.राधिका महाजन/इशिता जाधव(४)६-४, ७-५.

विजेवर चालणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांचे प्रदर्शन

0

पुणे, दि. 6 : प्रादेशिक परिवहन, पुणे व वाहन उत्पादक यांच्या संयुक्त विद्यामाने शुन्य प्रदुषण करणाऱ्या, विजेवर चालणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांचे प्रदर्शन 8 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10-30 ते 6 यावेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दुचाकी स्कुटर, ऑटोरिक्षा, कार इत्यादी विजेवर चालणाऱ्या विविध उत्पादकांची वाहने व त्यांचे सुटे भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. वाहन तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या नागरिकांनी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी, पर्यावरण प्रेमी नागरीकांना आधुनिक वाहन तंत्रज्ञान समजून घेण्याची ही सुवर्णसंधी असुन ती त्यांनी प्राप्त करावी. सदर प्रदर्शन पाहण्‌यासाठी प्रवेश मुक्त आहे. तसेच याप्रसंगी वरील तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले असून त्यामध्ये तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

शोभेची दारु व फटाका विक्री तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज करावेत

0

पुणे, दि. 6: आगामी दिवाळी उत्सवानिमित्त ऑक्टोबर 2017 मध्ये खेड उपविभाग खेड (राजगुरुनगर) या उपविभागात शोभेची दारु व फटाका विक्रीचे तात्पुरते परवाने उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांचे कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील पध्दत अवलंबिवली जाणार आहे.

अर्ज साध्या कागदावर उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) या पत्यावर दिनांक 16 ऑक्टोबर 2017 पुर्वी करावा. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जास रु 10 चे कोर्ट फी स्टँप लावणे आवश्यक आहे, ज्या जागेत व्यवसाय कारावयाचा आहे, त्या जागेचा मिळकत रजिष्टर उतारा, ग्रामपंचायत मिळकत उतारा, 7/12 उतारा जोडणे आवश्यक असून सदर जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करणेस संबंधिताचे रु 100 चे स्टँप पेपरवर संमतीपत्र आवश्यक आहे, पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा शोभेची दारु, फटाके साठा व विक्री करणेच्या सुरक्षिततेबाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे?  याबाबतचे प्रमाणपत्र तसेच ना हरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असलेबाबत प्रमाणपत्र आवश्यक आहे. नगरपरिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, नगरपरिषद हद्दीतील मालकीची स्टॉलसाठी जागा दिलेचे पत्राची प्रत, अर्जासोबत परवाना फी रु 600 कार्यालयात शासकीय पावतीने जमा करुन त्याची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

अष्टभुजा माता मंदिराचा जिर्णोव्दार करून लोकार्पण सोहळा उत्साहात

0

पुणे-कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार पेठमधील अखिल मंगळवार पेठ नवरात्र महोत्सव समितीच्यावतीने अष्टभुजा माता मंदिराचा जिर्णोव्दार करून लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आयोजन संजयभाऊ खुडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल देवकुळे , कार्याध्यक्ष सनी मायनर  , समितीचे अध्यक्ष कपिल लोंढे , उपकार्याध्यक्ष किरण धेंडे , खजिनदार कुमार वेळेकर , उपाध्यक्ष पैलवान विजय खुडे यांनी केले होते .

       या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट , अध्यात्मिक गुरुवर्य बाळासाहेब ठोंबरे , शिवसेना शहर संघटक अजय भोसले , माजी नगरसेवक सदानंद शेट्टी , कामगार नेते सतीश लालबिगे , नगरसेविका पल्लवी जावळे , उमेश चांदगुडे , नितीन परतानी ,माजी नगरसेवक प्रशांत बधे , नगरसेविका सरस्वती शेंडगे , माजी नगरसेवक विजय मारटकरआदी मान्यवर उपस्थित होते .

     यावेळी होमहवन व महाप्रसाद , देवीची मिरवणूक संपन्न झाली . तसेच मंगळवार पेठ भागात स्वछता अभियान राबविण्यात आले . जेष्ठ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . भोंडला आणि रासदांडियाचा कार्यक्रम झाला . मिरवणूक मंगळवार पेठ , श्रमिक नगर , श्रीकृष्ण चौक , भीमनगर , कमला नेहरू चौक , शेट्टी कॉर्नर , तोडकर हॉस्पिटल व पारगे चौक या भागात काढण्यात आली .

रस्त्यावरची १० हजार मुले , शिकवून करणार मोठी …(व्हिडीओ)

0

पुणे- रस्त्यावर फिरून भिक मागणारी १० हजार मुले शिकवून मोठी करण्याचा निर्धार पुणे महापालिका आणि  बजाज फौन्डेशन च्या सहाय्याने केल्याची माहिती उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यांनी येथे दिली .

मागासवर्गीय कल्याण निधी ची बैठक नवीन टर्म मध्ये पहिल्यांदाच झाल्याचे सांगून उपमहापौर धेंडे म्हणाले , आम्ही आता दोन नवीन प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर अंमलबजावणी सुरु करणार आहोत . ‘बार्टी’च्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करणे आणि रस्त्यावरची १० हजार मुलांचे शिक्षण , निवास आणि पालन पोषण अशी जबाबदारी स्वीकारणे . या वर्षी १२१ कोटी रुपये मागासवर्गीय कल्याण योजनांसाठी आर्थिक तरतूद असून , सध्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेणे आणि नवीन नवीन योजनाचे प्रस्ताव सदर करून त्यावर अंमल करणे यासाठी आता आम्ही प्रयत्नशील रहाणार आहोत . त्यासाठी मागासवर्गीय कल्याण निधी विभागाची दर गुरुवारी बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .

पहा नेमके उपमहापौर डॉ . धेंडे काय म्हणाले …..

पुणे-मागासवर्गीयांसाठी प्रस्ताव देण्यात उणे (व्हिडीओ… )

0

पुणे- महापालिकेतील  प्रशासन आणि एकूणच राजकारण यावर पुणेरी राजकारणाचाच जणू प्रभाव भारी असावा. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांचे प्रस्ताव मंजूर करू शकते , पण अशा प्रकारे प्रस्ताव पाठविण्यास उत्साह च येथे कोणाला नाही . आणि आहे त्या योजनांची देखील धड अंमलबजावणी होत नाही असा आरोप नेहमी होत आला आहे . आज नेमका हाच विषय उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी छेडला … पहा आणि ऐकाच… नेमके ते काय म्हणाले .. व्हिडीओ…

‘महाराष्ट्र का ४२० -फडणवीस’ -या घोषणेसह भामा आसखेड च्या पाण्यासाठी जेलभरो (व्हिडीओ)

0

पुणे-” जेल मध्ये टाका परंतु सर्व सामान्य नागरिकांचे पाणी आडवू नका ” अशीआक्रमक भूमिका घेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने,भामा आसखेड प्रकल्पाचे आरक्षण रद्द केल्याच्या कारणास्तव जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी केवळ राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ने भामा आसखेड च्या पाण्याची योजना पुण्यासाठी राबविली म्हणून आता ते पाणीच पुण्याला द्यायचे नाही अशी भूमिका घेणारे भाजप सरकार हे घातकी सरकार आहे अशा पद्धतीने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर देखील दरोडा घालणे उचित नाही अशी टीका यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आली काही दिवसांपुर्वीच भामा आसखेड धरणातून पुण्याला पिण्याचे पाणी देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीने या प्रकरणी आता आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे . या पार्श्वभूमीवर आंदोलाकाहून दुप्पट संख्येने पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता . भर उन्हात नागरिकांनी अत्यंत शांततामय पद्धतीने हे आंदोलन केले
या वेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, नगरसेविका सुमनताई पठारे, संजिलाताई पठारे, सामाजिक कार्यकर्ते आशिष माने, मनोज पाचपुते व परिसरातील पक्षाचे नेते-कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्ये ने उपस्थीत होते.आंदोलनानंतर पोलिसांनी या सर्वांना पोलीस गाडीत घालून ताब्यात घेतले .

त्रैभाषिक मुशायऱ्याने जिंकली मने !

0
पुणे :  कधी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या महागाईवर गंमतीशीर टिप्पणी , तर कधी प्रेमाचा गुलकंद आठवत त्रैभाषिक मुशायराने रसिकांची मने जिंकली ! महाराष्ट्र गांधी  स्मारक निधी आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त कोजागिरीचे औचित्य साधून हा मुशायरा आयोजित करण्यात आला होता.
प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी नझीर फतेहपुरी, जिया बागपती, सुमित पॉल, भाग्यश्री कुलकर्णी यांनी उर्दू, मराठी, हिंदीतून एकामागोमाग सुरेख गझला सादर केल्या
” कवी म्हणजे बोलका कवी, रसिक म्हणजे मुका कवी ” 
असे सांगून निफाडकर यांनी उपस्थितांना विश्वासात घेतले.
” हा चंद्र , हे चांदणे, घेऊन जा तुमच्या घरी,
मुक्काम करते माझ्या घरी, रोज कोजागिरी ” 
असा कवीचा आत्मविश्वास ही त्यांनी दाखवला.
डॉ.कुमार सप्तर्षी समोर पाहून
” हे उन्हाने वाळलेले पान आहे,
वृध्द नाही, अनुभवाचे रान आहे ” 
या  निफाडकरांच्या ओळी दाद घेऊन गेल्या.
” दाढी के बाल अब पकने लगे है,
हमे वो चाचा जान कहने लगे है “
अशी व्यथा सुमीत पॉल यांनी व्यक्त केली.
तर प्रचलीत परिस्थितीवर भाष्य करत जिया बागपतींनी शेर ऐकवला. ते म्हणाले..
” कद किसी का रहे चाहे गगन से उंचा,
कोई हो सकता नही, अपने वतन से उंचा !
भाग्यश्री कुलकर्णी यांनी या त्रैभाषिक मुशायरा मध्ये उर्दू , हिंदी कवीतील फरक सांगीतला
” उर्दू और हिंदी में फर्क है इतना,
वो देखते है ख्वाब , हम देखते है सपना “
नझीर फतेहपुरी यांनी अध्यक्षस्थानावरुन बहारदार गझला , दोहे ऐकवले. द्वेष नको प्रेम हवे, सांगताना ते म्हणाले…
” फुल को हार की जरूरत है,
यार को यार की जरूरत है,
नफरतों को हवा न दो भाई,
देश को प्यार की जरूरत है “
संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी , डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन उपस्थित होते.

साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान, बीजभांडवल योजना(माहिती )

0

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्यापैकीच साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुढील प्रमाणे.

मातंग व तत्सम 12 पोट जातीतील  म्हणजेच मांग, मातंग, मिनी मादगी, मादीग,दान खणी मांग, मांग महाशी, मदारी,  राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या पोट जातीतील लोकांना अर्ज करता येतील.

योजनेचे स्वरुप- महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीज भांडवल योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकुण 4.72 कोटींच्या उदिष्टाची तरतूद आहे.यात अनुदान योजनेतर्गत 2 कोटीची तरतूद आहे. त्यात 2000 प्रकरणे केली  जातील. बीजभांडवल  योजनेंतर्गत 330 लाभार्थीकरीता 2.39 कोटींचे उदिष्ट आहे. यात नवीन 330 प्रकरणे केली जातील. दोन्ही योजनांची बॅक  निहाय उदिष्ट जिल्हयाच्या अग्रणी बँक अधिकारी  यांच्या मार्फत पुणे जिल्हयातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.

विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान  वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्‍या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक  हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते 7 लाखापर्यंत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के  महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह ) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.

अर्ज करण्याची पध्दत-

या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील गरजुंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातुन घेवून जिल्हा कार्यालयातच जमा  करणे  आवश्यक.

संपर्क कार्यालयाचे नाव-  जिल्हा व्यस्थापक, 424, मंगळवार पेठ, लडकत पेट्रोल पंप जवळ, पुणे.

-विशाल कार्लेकरसर्वसाधारण सहायक; जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

  

                                                                                    

                                                                                                                 

विदेशात ‘हाफ तिकीट’चा डंका

0

लहान मुलांचं भावविश्व मोठ्या कॅनव्हासवर मांडत दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या हाफ तिकिटया मराठी चित्रपटाने विदेशातही मराठीचा झेंडा फडकवला आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा हाफ तिकिट हा चित्रपट कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्की (Carrousel international du film de Rimouski) या चित्रपट महोत्सवातही कौतुकास पात्र ठरला आहे.  भारतामध्ये जुलै २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या हाफ तिकिटने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंच; त्यासोबत बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज विदेशातही या चित्रपटाचा डंका वाजतोय. कॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या कॅरॉसेल इंटरनॅशनल ड्यू फिल्म डे रिमोस्कीमध्ये हाफ तिकिट ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट महोत्सव लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. रिमोस्कीच्या अनेक शाळांमध्ये ‘हाफ तिकिट चित्रपट दाखवण्यात आला असून  यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिग्दर्शक समित कक्कड यांनी उत्तंर दिली. या महोत्सवानंतर टोराण्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवासाठी (Toronto from Rimouski for the 17th Reelworld film festival 2017) हाफ तिकिट जाणार आहे.

या चित्रपटात कक्कड यांनी मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन लहान मुलांची मांडलेली गोष्ट लहानग्या प्रेक्षकांसोबतच मोठ्यांनाही भावली. या शोला समित कक्कडही उपस्थित होते. त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय हाफ तिकिटच्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल यांचं अभिनंदनही केलं.

व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा अचूक मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड सादर केली आहे. या चित्रपटात भाऊ कदमप्रियांका बोसउषा नाईकशशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘काक मुत्ताई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकृत रूपांतरण असलेल्या हाफ तिकीट’ या सिनेमाने आजवर बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्समध्ये बाजी मारली आहे.

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध उभे रहा :अनिल सद्गोपाल

0
पुणे :शिक्षण हे परिवर्तन आणि सामाजिक विकासाचे साधन उरले नाही तर अर्थव्यवस्थेचे गुलाम निर्माण करणारे साधन बनले असल्याने आणि त्यातून  वर्णवर्चस्ववादी ,फॅसिस्ट विचार लादले जात असल्याने शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध उभे राहण्याची वेळ आली आहे ‘असे प्रतिपादन एकलव्य संस्थेचे संस्थापक अनिल सद्गोपाल यांनी केले .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘आयोजित गांधी सप्ताहानिमित्त  ‘शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि उपाय ‘ या विषयावर ते बोलत होते . गांधी भवन येथे मंगळवारी सायंकाळी हे व्याख्यान झाले .
अनिल सद्गोपाल म्हणाले ,’ शिक्षणाला भारतात मोठा सामाजिक प्रगतीचा आणि ध्येय्यवादाचा इतिहास आहे . १९८६ नंतर जागतिक दबावाखाली शिक्षणावरील खर्च कमी करून  खासगीकरणाचे दरवाजे उघडण्यात आले . शिक्षण व्यवस्था त्यामुळे व्यवसाय बनली आहे . शिक्षण हे देशस्थिती शी नाते सांगणारे परिवर्तनाचे साधन होते . ते  आता अर्थव्यवस्थेला अपेक्षित गुलाम निर्माण करणारे साधन झाले आहे . शिक्षण क्षेत्रावर आणि त्यातील चारित्र्यावर आता खासगी आणि आंतरराष्ट्रीय शक्तींचा अंकुश राहणार आहे . यातून रोजगार विहीन अर्थव्यवस्था उभी राहत असून कोणतेही सरकार रोजगार देऊ शकत नाही .
सध्याचे सरकार शिक्षणाच्या नावाखाली फॅसिस्ट ,वर्णवर्चस्ववादी विचार शिक्षण क्षेत्रावर लादत असून प्रश्न विचारणाऱ्यांना  देश द्रोही ठरवले जात आहे . शिक्षणाच्या खासगीकरणाचा आणि बाजारीकरणाच्या धोका आपण समजू शकलो नाही तर ऐतिहासिक चूक होणार आहे .
डॉ  कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते . संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी अन्वर राजन ,डॉ उर्मिला सप्तर्षी इत्यादी उपस्थित होते