Home Blog Page 3248

‘आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील ज​​वानांना’ : पालकमंत्री गिरीष बापट

0

पुणे : ‘देशवासियांकडून मिळणारे आत्मबळ आणि आत्मसन्मान याची खरी गरज सीमेवरील जवा​नांना असते, सैनिकांच्या 

कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी या उपक्रमासारखे व्यासपीठ ​वारंवार ​मिळणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले. 
भाजपानगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’, भवानी पेठ यांच्या वतीने आयोजित सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या 40 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 
गिरीष बापट बोलताना म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी सैनिक जवानांबरोबर साजरी केली, त्याप्रमाणे भाजप कार्यकर्ते तेजेंद्र कोंढरे देखील अशा प्रकारचा उपक्रम राबवुन शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आधार आणि सन्मान देण्याचे स्तुत्य कार्य करीत आहेत’.
योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख), कर्नल संभाजी पाटील आणि समाजसेविका स्वाती चिकलकर यांची भाषणे झाली.

कसबा मतदार संघाचे चिटणीस आणि ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’ चे अध्यक्ष तेजेंद्र नथुराम कोंढरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कृतज्ञता सन्मान आणि दिवाळी कार्यक्रम रविवारी जय महाराष्ट्र तरूण मंडळ, भवानी पेठ, पालखी विठोबा चौक येथे सायंकाळी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख) होते. यावेेळी कर्नल संभाजी पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मूरलीधर मोहोळ, प्रमोद कोंढरे ( भाजपा कसबा सरचिटणीस), छगन बुखाले (भाजपा सरचिटणीस, कसबा मतदार संघ), नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मनिषा लडकत, अशोक येनपुरे, वैशाली नाईक (

​कसबा महिला आघाडी, अध्यक्ष) मान्यवर उपस्थित होते.राजु परदेशी, सागर शिंदे, पप्पूशेठ कोठारी, संजय देशमुख, राहूल कोंढरे आदी कार्यकत्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 
या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. भाज​पा नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे (प्रभाग क्रमांक 17) आयोजित उपक्रमात सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांचा आणि सीमेंतर्गत चांगली कामगिरी बजावणार्‍या सैनिकांचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.

नदी – प्रदूषण टाळणाराच खरा वारकरी होय- डॉ.राजेंद्र शेंडे

0
पुणे: “पाणी अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे वाढत्या नदी प्रदूषणाचे नियंत्रण करणे हे वारकर्‍यांचे खरे कर्तव्य आहे. माऊली म्हणून संबोधिल्या जाणार्‍या नद्यांना घाण व कचरा अर्पण करू नये. नदीच्या काठावरूनच तीर्थक्षेत्र निर्माण होत असते आणि त्या क्षेत्राला पवित्र व समृद्ध ठेवण्यासाठी सर्वांना प्रदूषण नियंत्रणाचे भान ठेवावे लागेल.” असे उद्गार युनायटेड नेशन्स पर्यावरण विभागाचे माजी संचालक आणि सामूहिक नोबेल पुरस्काराचे मानकरी, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी काढले.
विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने ‘पवित्र चंद्रभागे’ ची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, सौ.उषा विश्‍वनाथ कराड, भगवान महाराज कराड, दिलीप कराड, सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशमुख, संजय देशमुख, दत्तात्रय बडवे इ. उपस्थित होते.
डॉ.राजेंद्र शेंडे म्हणाले,“ज्या ठिकाणाहून नदी लुप्त झाली, ते क्षेत्र मनुष्यरहित झाले. इतिहासात याची उत्तम उदाहरणे म्हणजे ग्रीस, मोहेंजो दडो ही ठिकाणे आहेत. त्यामुळे नद्यांना वाचविणे ही काळाची गरज आहे. सध्या जगातील तीस टक्के नद्या या समुद्रापर्यंत पोहचतच नाहीत. नद्यांवर आपले जीवन अवलंबून आहे, असा विचार केल्यास सर्व नद्या प्रदूषणमुक्त व स्वच्छ राहण्यास मदत होईल. सरोवर, नाले व छोटे छोटे ओढे यांनासुध्दा प्रदूषणमुक्त करून तेथे आरती करावी. त्यासाठी प्रत्येक गावाला पुढाकार घ्यावा लागेल. बदलत्या काळानुसार तीर्थ क्षेत्र हे ज्ञानतीर्थक्षेत्र बनावे आणि त्यासाठी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांना पुनर्जीवन  मिळेल. पाणी म्हणजे जीवन आहे. त्यामुळे यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या ठिकाणी उत्तम प्रकाराच्या घाटांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून ते ज्ञानपंढरी म्हणून ओळखले जाते.भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये ज्ञानाची पूजा आणि सत्याचा शोध घेतला जातो. त्याग आणि समर्पण या दोन गोष्टींना भारतीय संस्कृतीमध्ये वेगळे महत्व आहे.”
डॉ.एस.एन.पठाण यांनी आपल्या प्रस्ताविकात महाआरतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. सृष्टीमधील अनेक नद्या मृत झाल्या आहेत. त्यांना वाचविणे हे आपले कर्तव्य आहे. चंद्रभागेतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. जेथे नदी जीवंत असते, तेथील समाज आनंदी असतो. त्यामुळे नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी वारकर्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्याच प्रमाणे पं.वसंतराव गाडगीळ, ह.भ.प. भगवान महाराज कराड, श्रीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आळंदी देहूचा ज्या प्रकारे कायाकल्प झाला आहे, तसाच येथे व्हावा. चंद्रभागेची आरती झाली, तशी आरती महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत, तेथे व्हावी.
शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, आभार मानले.

‘साजन चले ससुराल २’ ची घोषणा- राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

0

हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची घोषणा नुकतीच एका शानदार समारंभात केली. या चित्रपटासह ‘राधे मुरारी या मराठी चित्रपटाची घोषणा ही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.साजन चले ससुराल २ चे  कथालेखन आणि दिग्दर्शन एन. एन सिद्दीकी करणार आहेत. अनस फिल्म्स् आणि ए.ए ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साजन चले ससुराल २’ निर्मिती केली जाणार आहे. लवकरच या चित्रपटातील नायक, नायिका तसेच इतर कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा तयार झाली असून सोबत उदय टिकेकर, दाक्षिणात्य अभिनेता गुलू दादा, सोनल माँटेरीयो या कलाकारांची निवड चित्रपटासाठी करण्यात आली आहे. या हिंदी चित्रपटासोबत सिद्दीकी राधे मुरारी या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एन. एन सिद्दीकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून ‘राधे मुरारी या मराठी चित्रपटात अमित रायन पाटील, गौरव घाटणेकर, उदय टिकेकर, दिपाली सय्यद, किर्ती आडारकर या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. दिग्दर्शक एन. एन सिद्दीकी यांचा ‘हिरो’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी याआधी ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटासोबतच ‘रंग’, ‘ताकत’, ‘दिल ने फिर याद किया’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. डेव्हीड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘साजन चले ससुराल’मधील ‘राम नारायण बाजा बजाता…’, ‘दिल जान जिगर तुझपे निसार…’, ‘बाय बाय मिस गुड नाईट…’ आदी गाणी खूप गाजली होती. सुमधूर गीतसंगीताची हीच परंपरा पुढे सुरू ठेवत साजन चले ससुराल २च्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट देण्याचा सिद्दीकी यांचा मानस आहे

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

0

पुणे : पालक मंत्री गिरीश बापट यांनी आज सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीबरोबरच कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांच्या सध्यस्थिती बाबत  माहिती घेतली.

या बैठकीस महाराष्ट्र  कृष्णा खारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. रा.ब.घोटे, श्री. वि.ग. राजपूत, मुख्य अभियंता (विप्र), श्री. सं.द. चोपडे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ यांचेसह कार्यकारी अभियंते व  विविध क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत श्री. रा.ब.घोटे, कार्यकारी संचालक यांनी महामंडळांतर्गत सर्व प्रकल्पांचे या वर्षीचे पाणीसाठे व गतवर्षीचे पाणीसाठे याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. त्याचप्रमाणे पुणे पाटब्ंधारे मंडळ अधीक्षक अभियंता,श्री चोपडे यांनी पुणे जिल्हयातील या वर्षीचे पाणीसाठे व गतवर्षीचे पाणीसाठे याबाबत तुलनात्मक माहिती दिली.

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरांसाठी पिण्याचे पाणी पुरवठ्याकरीता धरणातील पाणीसाठ्यांची सद्यस्थिती श्री बापट यांनी जाणून घेतली व धरणातील असलेले पाणीसाठे आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी राखून ठेवण्यात यावेत व उर्वरित पाणीसाठ्यांचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नियोजन करुन अत्यंत काटेकोरपणे पाणी वापरावे, असे निर्देश मा.पालकमंत्री यांनी दिले.

खडकवासला प्रकल्पाच्या जुन्या मुठा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.  मुख्यत्वेकरुन या कालव्यावरील पुलांच्याकामाची माहिती त्यांनी घेतली व सर्व उर्वरित दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.  तसेच जुन्या मुठा उजव्या कालव्यावरील उर्वरित कामांचे जे प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर केलेले आहेत त्या प्रस्तावांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करुन मान्यता देण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना श्री. बापट यांनी दिल्या.  यांत्रिकी विभागाच्या मशिनरींमार्फत पुणे जिल्हयातील कालव्याची दुरुस्ती करुन सर्व कालवे प्रणाली सुस्थितीत ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी यांनी दिल्या.

कृष्णा खोरे महामंडळांतर्गत सुरु असलेल्या बांधकामाधीन प्रकल्पांची प्रकल्पनिहाय सखोल आढावा पालकमंत्र्यांनी घेतला व कामे लवकर पुर्ण करण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या.

मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी पिण्याला मिळणेबाबतच्या विषयाबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली.  याबाबत टाटा पॉवर व भारत सरकार यांचेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या करारनाम्याबाबत चर्चा झाली.  या करारनाम्यातील तरतुदींचा अभ्यास करुन जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पाणी हा विकासाचा महत्वाचा घटक असल्यामुळे पाणी साठ्यांचा वापर अत्यंत काटकसरीने करणे गरजेचे आहे.  यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

सभागृहात भोंगा वाजविणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी …(व्हिडीओ)

0

पुणे-हडपसर येथील कचरा प्रकल्पाच्या विरोधाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी भोंगा वाजवून आपला निषेध नोंदवला.यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि  राजेंद्र शिळीमकर यांनी त्यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी केली .

पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथी नव्याने उभारण्यात येणाऱ्या 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने कचरा गाड्या अडवणे, घंटानाद आंदोलन करणे यामधून या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. या विरोधाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिकेच्या आज , झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी भोंगा वाजवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मात्र सभागृहात अशा प्रकारे भोंगा वाजवणे म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत ससाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप सभासदांनी केली. महापौरांनी पालिकेच्या शिपायांमार्फत तो भोंगा जप्त केला. मात्र या प्रकारामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कॉग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

राज्यातील वीज बिल थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना’ : ऊर्जामंत्री

0

नागपूर : महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना २०१७जाहीर करीत असून या योजनेमुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्त्यांत थकबाकी भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

या योजनेत तीस हजारापेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मुळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले तर तीस हजारापेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मुळ थकबाकीचे दहा समान हप्त्यात भरणा करावयाचा असून या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बिल नोव्हेंबर 2017 पर्यंत भरून डिसेंबर 2017 पासून मुळ थकबाकीपैकी 20 टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतक-यांना भरावा लागेल, त्यानंतर मार्च २०१८ मध्ये 20 टक्के, जून २०१८ मध्ये 20 टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये 20 तक्के व डिसेंबर २०१८ अखेरीस 20 टक्क्यासह पुर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे. या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्या जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांवर थकीत वीज बिलांचा अधिक भार पडणार नाही हे लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांकडील मूळ थकीत रकमेचे पाच समान हप्ते केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याचे शासनाच्या विचाराधिन आहे.

वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण यासाठी येणारा खर्च बघता वीजबिल भरण्याबाबत शेतकऱ्यांप्रती सकारात्मक विचार करण्याची शासनाची भुमिका आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी शासनाची ही भुमिका समजून घ्यावी व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात एकूण अंदाजे ४१ लाख चालू स्थितीतील कृषी ग्राहक असून त्यांचा एकूण विद्युत जोडभार २ कोटी १२ लाख एच.पी. एवढा आहे. सदर ४१ लाख चालू स्थितीतील ग्राहकांपैकी २५.४१ लाख ग्राहकांना मीटरव्दारे व १५.४१ लाख ग्राहकांची वीजजोडणी अश्वशक्तीवर आधारीत देण्यात आली आहे. शेतीला वीज जोडणी देण्यासाठी प्रत्येक वीजजोडणीमागे अंदाजे रू. १.१६ लाख इतका खर्च येतो. महावितरण कृषी ग्राहकांकडून केवळ अनामत रक्क्त (Security Deposite) तीन हजार ते साडेसात हजार रुपयांपर्यंत घेऊन कृषी जोडणी दिली जाते. कृषीपंप वीजजोडणी करिता येणारा रू. १.१६ लाख इतका जो खर्च येतो तो शासनातर्फे अनुदान स्वरूपात (Equity) या महावितरण कंपनी कर्ज घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी करते.

मा. वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष २०१६-१७ या कालावधीकरिता रु ६.५० प्रतियुनिट एवढा सरासरी वीजपुरवठा दर मंजूर केला आहे. कृषी ग्राहकांसाठी सरासरी वीज आकारणी दर रु. ३.४० प्रति युनिट मंजूर केला असून उर्वरीत ३.१० रुपये प्रति युनिट क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून इतर वर्गवारीतील ग्राहकांमार्फ़त तसेच जसे की “औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांना” आकारण्यात येते. शासनामार्फ़त मा. आयोगाच्या सरासरी वीज आकारणी दरात सरासरी १.६० प्रति युनिट सवलत देऊन कृषी ग्राहकांना रु. १.८० प्रति युनिट दराने वीज देयकाची आकारणी करण्यात येते. क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून कृषी ग्राहकांसाठी वार्षिक साडेसात हजार कोटी रुपये व शासनामार्फ़त वीज दर सवलतीपोटी वार्षिक साडेचार हजार कोटी रुपये देण्यात येतात.

चालू स्थितीतील ग्राहकांपैकी ३७. ६५ लाख ग्राहक हे थकबाकीत असून त्यांची ३१ मार्च २०१७ पर्यंतची एकूण थकबाकी खालीलप्रमाणे आहे.

१. मूळ थकबाकी – रु. १०,८९० कोटी

२. व्याज – रु. ८,१६४ कोटी

३. दंड – रु. २१८ कोटी

४. एकूण – रु. १९,२७२ कोटी

तसेच २०१७-१८ या वित्तीय वर्षातील माहे एप्रिल ते जून ह्या तिमाहीची वीज देयक आकारणी व देयक भरणा खालीललप्रमाणे आहे.

१. तिमाही मागणी (माहे एप्रिल ते जून २०१७) – रु. १,०५८ कोटी

२. ग्राहकांनी भरलेली – रु. १९५ कोटी

३. मूळ थकबाकी – रु. ८६३ कोटी

कृषीपंपधारकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व त्यांना त्यांची थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना २०१७ची ठळक वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत.

१) माहे एप्रिल ते जून २०१७ हे त्रैमासिक चालू बिल नोव्हेंबर २०१७ पूर्वी भरुन ह्या योजनेत सहभागी होता येईल.

२) दि. ३१ मार्च २०१७ अखेरीस असलेली मूळ थकबाकी रक्कम पाच त्रैमासिक समान हप्त्यात भरावयाची मुभा आहे.

३) ज्याप्रमाणात पाच समान हप्ते कृषी ग्राहक वेळेवर भरतील त्याप्रमाणात कृषीपंप ग्राहकाचे व्याज व दंडनिय आकार माफ़ करण्याबाबत शासनातर्फ़े विचार करण्यात येईल.

४) पाच त्रैमासिक हप्ते हे अनुक्रमे डिसेंबर २०१७, मार्च २०१८, जून २०१८, सप्टेंबर २०१८ व डिसेंबर २०१८ अखेरीस भरणे आवश्यक राहील.

उदा. १) मूळ थकबाकी – रु. १२,५००

२) व्याज – रु. ९,५००

३) दंड – रु. ५००

४) एकूण थकबाकी – रू. २२,५०० (३१ मार्च २०१७ अखेरीस)

५) चालू देयक – रु. २२००

चालू बिल – रु. २२०० असेल तर या योजनेत सहभागी होण्यासाठी भरावयाची रक्क्म व तारीख

१) नोव्हेंबर २०१७ – रु. २,२००

२) डिसेंबर २०१७ – रु. २,५००

३) मार्च २०१८ – रु. २,५००

४) जून २०१८ – रु. २,५००

५) सप्टेंबर २०१८ – रु. २,५००

६) डिसेंबर २०१८ – रु. २,५००

(यासोबतच वीज ग्राहकांनी चालू वीज देयके भरणे क्रमप्राप्त आहे)

५) सदर योजनेत भाग घेऊन माहे मार्च २०१७ अखेरची मुळ थकबाकी दिनांक ३१ डिसेंबर २०१८ च्या पुर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहित भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या वीज देयकांच्या वसुलीसाठी शिबिर लावण्यात येतील हे शिबिर माहे नोव्हेंबर २०१७ तसेच प्रत्येक तीन महिन्यांमध्ये त्या त्या स्थानिक कार्यालयांच्या पातळिवर बाजाराच्या दिवशी आयोजित करण्यात येतील, जेणेकरून शेतक-यांना वीज देयके भरण्यास सोईचे होईल, असेही ऊर्जामंत्री यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनीच्या कामांना सुरुवात झाली असून या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सेराटेक सिटीच्यावतीने जनसेवा फाऊंडेशनला जीवनउपयोगी वस्तूंचे मोफत वाटप

0

पुणे-कात्रज येथील जनसेवा फाऊंडेशनच्या  वृद्धाश्रमास येवलेवाडी येथील सेराटेक सिटीच्यावतीने जीवनउपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले . जीवनउपयोगी वस्तूंमध्ये १०० किलो तांदूळ , सहा किलो लाडू ,  ४० ब्लॅंकेट , ४० बेडशीट , ४ बकेट , बारा मग , टूथपेस्ट , डेटॉल साबण ,क्रिकेट बॅट , टेनिस बॉल , बिस्कीट बॉक्स , चॉकलेट बॉक्स , डायपर बॉक्स आदी वस्तूंचा समावेश होता .

         कार्यक्रमाची सांगता श्री गणेशाची प्रार्थना लहान मुलांच्यावतीने करण्यात आली . या जनसेवा फाऊंडेशनच्या निराधार केंद्रात गेल्या २७ वर्षांपासून आरोग्यसेवा , वृध्द सेवा , निराधार सेवा , शिक्षण , प्रशिक्षण , संशोधन व आदर्श गाव विकास आदी विकास क्षेत्रातून समाजसेवा करीत आहे . सुमारे १०० निराधार स्त्री पुरुष असून ५० मुले मुलींची येथे सोया केली असून शालेय शिक्षण दिले जाते . यावेळी मुनिराम अग्रवाल ,सागर महामूनकर , पंढरीनाथ तुसे , जितेंद्र जैन , रविंद्र वर्मा , एस. खोडके , नीलिमा बोरकर , जितेंद्र राठोड , सुधीर बरमे , कांचन वर्मा , वैशाली पापल , काका गर्दे , ब्रजेश  सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी जनसेवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते सुषमा चव्हाण , मालती भावसार , दुर्गा लिंगडे,  अरुणा तातरव प्रमोद महिषी आदी मान्यवर उपस्थित होते .

संकटग्रस्त महिलांसाठी ‘सखी’- एक थांबा केंद्र – एका छताखाली सर्व सुविधा

0

पुणे- येरवडा येथील स्‍व. राजीव गांधी हॉस्पिटलमध्‍ये संकटग्रस्त महिलांसाठी ‘सखी’ एक थांबा (निवारा) केंद्राचा प्रारंभ जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्‍या हस्‍ते झाला. यावेळी उपायुक्‍त प्रशांत शिर्के,जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्‍प अधिकारी उज्‍वला जाधव, जिल्‍हा संरक्षण अधिकारी अंजना मोजर, पद्माकर सुरवसे, उषा वायदंडे, नूतन देवकर, सानिका हुंबरे, राजश्री खंडारे, रंजना मोरे, स्‍मिता शिंदे, एस.आर. कुंभार पद्मश्री महाले, मोहिनी जोशी, राजश्री मोहिते आदींची उपस्थिती होती.

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रायोगिक तत्त्वावर संकटग्रस्त महिलांसाठी निर्भया एक थांबा केंद्र स्थापन करण्‍याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रात अकरा केंद्र  स्थापन करण्याबाबत प्रस्तावित आहेत.  त्यापैकी पुणे जिल्ह्यासाठी दोन निर्भया केंद्र तात्पुरत्या स्वरूपात शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल  व राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा, पुणे येथे महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रात प्रामुख्याने शारिरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचारास सामोरे जाणाऱ्या महिलांना आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली देणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना निवासासह पोलीस, वकील, समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचाराची सोय या सुविधा या केंद्रामार्फत पुरविण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये संकटग्रस्त महिला, युवती पाच दिवस राहू शकतात.

केंद्रामध्ये कायदेशीर मदत पुरविण्यासाठी विधी सल्लागार / वकील, वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, समुपदेशक तसेच पोलीस विभागाकडील एक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येईल. तसेच सदर केंद्राचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी / कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कामकाज पाहत आहेत.

 

महेश सांस्कृतिक भवनात साजरा झाला अन्नकोट महोत्सव . .

0

पुणे- पवित्र मंत्राग्नीच्या साक्षीत …आकर्षक रांगोळीचा सडा …. फुलांची मन वेधून घेणारी सुवासिक आरास …. विविध प्रकारच्या मिठाईचा व पदार्थांचा प्रसाद … यशोदामैय्या व गोविंदाचा (श्रीकृष्णाचा ) जयघोषात बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवनात रविवारी सायंकाळी ५ हजार नागरिकांनी उत्साहात पारंपरिक व धार्मिक पद्धतीने अन्नकोट महोत्सव साजरा केला. हि माहिती माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव शामसुंदर कलंत्री व सल्लागार संजय बिहाणी यांनी आज सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितली
माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनतर्फे काल रविवारी सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवनात अन्नकोट महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवास माहेश्वरी समाजातील बालांपासून, महिला, तरुण,तरुणी, ते जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर पुण्यातील अन्य नागरिक, प्रतिष्ठित नागरिकांनी या अन्नकोट महोत्सवास हजेरी लावून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. जेष्ठ उद्योगपती विठ्लशेठ मणियार, हिरालाल मालू, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष पुनमचंद धूत ,प्रदीप राठी,नगरसेवक वसंत मोरे, विशाल तांबे, साईनाथ बाबर,नगरसेविका गायत्री खडके, किशोर तोष्णीवाल , मुकुंददास लोहिया, रवींद्र राठी, संजय बिहाणी जितेंद्र राठी,पुणे माहेश्वरी संघाचे अध्यक्ष नरेंद्र चांडक,जवाहर बाहेती जुगल मालू,जुगल पुंगलिया,,भगवानदास लढ्ढा ,फौंडेशनचे सचिव शामसुंदर कलंत्री,कोशाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी , विश्वस्त मंडळाचे विश्वस्त बालाप्रसाद बजाज , राजेंद्र भट्टड , हरी भुतडा , मदनलाल भुतडा,संजय चांडक , दिलीप धूत , संतोष लढ्ढा , विजयराज मुंदडा , भंवरलाल पुंगलिया , अशोक राठी , महेश सोमाणी , रामविलास तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून गोपी, गवळ्यांचे वरुणराजाच्या मुसळधार पावसाच्या बरसातीपासून संरक्षण केले होते. या काळात सर्वजण ७ दिवस उपाशी होते. त्या ७ दिवसांच्या कालावधीत यशोदामैया दररोज भोग (प्रसाद ) लावत होती. या घटनेच्या स्मृतीच्या आठवणी म्हणून माहेश्वरी समाजातर्फे दीपावलीच्या काळात दरवर्षी अन्नकोट महोत्सव आयोजित करण्यात येतो.
काल रविवारी सायंकाळी भगवान श्रीकृष्णाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली . त्यांनतर भगवान श्रीकृष्णा समोर करंजी , चकली, लाडू, मिठाई आदी विविध प्रकारच्या ५६ मिठाई ठेवून गोविंदा चा जयघोष करण्यात आला . यांनतर अन्नकोट महोत्सवास आलेल्या नागरिकांचे फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. नागरिकांनी देवाचे दर्शन घेऊन अन्नकोट महोत्सवाचा आंनद साजरा केला.

‘रातोरात झाडे कापण्याची प्रशासनाची कृती हा पुणेकरांचा विश्‍वासघात’ : खा.वंदना चव्हाण

0
पुणे :
पुणे विद्यापीठ रस्त्यावरील झाडे तोडण्याच्या विषयाबाबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली जाईल असे ठरलेले असताना रातोरात झाडे कापण्याची पालिका प्रशासनाची कृती हा पुणेकरांचा विश्‍वासघात आहे, अशी टीका खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली.
‘लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज ऐकावा हा संकेत आहे. पुणे पालिकेतील भाजपाची सत्ता झाडे वाचविणार्‍या नागरिकांचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही. सरकार आणि भाजपाची महापालिकेतील सत्ता पर्यावरणाविषयी असंवेदनशील आहे, ही शोकांतिका आहे,’ असे खा. चव्हाण यांनी पत्रकात म्हणले आहे.
‘पुणे पालिकेतील भाजपाची सत्ता अधिकारीच त्यांच्या अधिकारशाहीने गाजवत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला असून, झाडे कापण्याच्या कृतीचा निषेध केला आहे.

सूर, ताल, लयातून पं. आजाद यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

0
पुणे – दोन भिन्न स्वररयंत्रातून उमटणारा पद्मभूषण पं राजन साजन मिश्रा यांचा एक मधुर स्वर, विशाल कृष्ण यांचा मनमोहक पदन्यास आणि ‘वाह आजाद..’अशी रसिक प्रेक्षकांची सहज दाद मिळणारी पं अरविंदकुमार आजाद यांची तबल्यावरील थाप अशा संगीतमय वातावरणात काल (बाल) गंधर्व दरबार अक्षरशः न्हाऊन निघाला. निमित्त होते तालायनतर्फे आयोजित केलेल्या उन्मुक्त मैफलीचे.
बनारस घराण्याच्या वादन कलेचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणारे पं. किशनमहाराज यांचा ९५ वा स्मृतिदिन तर परंपरेत राहून नाविण्याचा शोध घेणारे प्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आजाद यांचा ५० वा जन्मदिवस या औचित्याने तालयन म्युझिक सर्कलतर्फे झालेली मैफल रसिक पुणेकरांच्या पसंतीस उतरली. यावेळी बनारस घराण्याच्या कलावंतांकडून ‘उन्मुक्त’ कलेची उधळण झाल्याचा स्वानुभव उपस्थित प्रेक्षकांना आला.
पं. सीतारादेवी यांचा वारसा आणि आशीर्वाद लाभलेले विशाल कृष्ण यांनी ‘देवी सुरेश्वर भगवती गंगे’ या रचनेने मैफलीची सुरुवात केली. सदाबहार ताल तीन ताल सादर करताना त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पं किशनमहाराज, पं गोपीकृष्ण, पं सीतारादेवी यांनी रचलेल्या बंदिश सादर करताना त्याला खास विशाल कृष्ण ‘टच’ देत कथकला लाभलेल्या असीमतेचे वरदान त्यांनी आपल्या लयकारीतून उलगडले. कृष्ण गत, सखी अर्थात घुंगट गत या माध्यमातून नृत्याबरोबरच अभिनयाचेही दर्शन त्यांनी प्रेक्षकांना घडविले. खास चक्राकार शैलीतून विशाल कृष्ण यांनी सादर केलेल्या नृत्यास रसिक प्रेक्षकांची विशेष दाद लाभली. त्यांना सुरंजन खंडाळकर (गायन), देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), रोहित वनकर (बासरी) तर पं. अरविंदकुमार आजाद (तबला) यांनी समर्पक साथ दिली.
बनारसचे संस्कृती आणि कलेसोबत जवळचे नाते आहे. हे नाते आपल्या सुमधूर स्वरातून पं राजन साजन मिश्रा यांनी उलगडले. राग गोरख कल्याण राजन साजन यांच्या ख्याल गायकीतून श्रवण करताना अधिकच सुंदर भासत होता. ‘पार करो मोरी नाव’ ही बंदिश त्यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कधी अवकाशात स्वच्छंदी विहार करणारी लयकारी, तर कधी भारदस्त आवाजात खर्जातून थेट तार सप्तकाचा प्रवास घडवणारी सुरेल अदाकारी… कधी गुरुजनांना सुरेल भेट तर कधी त्यांच्या आठवणींना उजाळा अशा वैविध्यपूर्ण गायकीतून पं राजन साजन मिश्रा यांनी पं गिरीजादेवी, पं किशनमहाराज यांना स्वरांजली अर्पण केली. तर पं गिरीजादेवी यांच्या स्मरणार्थ भैरवी सादर करुन त्यांनी आपल्या गायकीची सुरेल सांगता केली. यावेळी त्यांना धरमनाथ मिश्रा (संवादिनी), मोहन दरेकर आणि सुहास गोरे (तानपुरा), अरविंकुमार आजाद (तबला) यांनी साथसंगत केली.
यावेळी पं आजाद यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवर कलावंतांनी दिलेल्या शुभेच्छा तसेच गानसरस्वती महोत्सवात गिरीजादेवी यांनी सादर केलेली भैरवी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, उस्मान खान, फैयाज हुसेन, रघुनंदन पळशीकर, पं लालजी श्रीवास्तव यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.
पं अरविंदकुमार आजाद यांना मानपत्र व तुळशीचा हार देऊन विशेष सत्कार समस्त रसिकांच्या वतीने यावेेेळी करण्यात आला. तसेच ‘उन्मुक्त’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा निवेदक आनंद देशमुख आणि नीरजा आपटे यांनी समर्थपणे सांभाळली. ताल, सूर आणि लयाच्या साक्षीने रंगलेली उन्मुक्त मैफल रसिकांसाठी जणू सांगीतिक मेजवानीच ठरली.

चुकवू नये अशी … कलाविष्कार आणि कलावंताच्या सन्मानाची सायंकाळ ‘रंगभूमी दिन सोहळा ‘

0


पुणे- नाट्य आणि सिने सृष्टीतील अभिनेते रमेश भाटकर ,अशोक शिंदे आणि चेतन दळवी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर झाला आहे.चुकवू नये अशी …नृत्य,गाणी आणि कलावंताच्या सन्मानाची रम्य सायंकाळ मानल्या जाणाऱ्या सलाम पुणे च्या रंगभूमी दिन सोहळ्यात हे पुरस्कार भारत सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक ,आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके तसेच शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , अरविंद शिंदे, अविनाश बागवे ,भाजपचे आनंद रेखी , संदीप खर्डेकर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सुहास कुलकर्णी , उज्वल केसकर ,नगरसेवक गोपाळ चिंतल ,राष्ट्रवादीचे महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे .अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर ,हॉलीवूडचा बेस्ट अक्ट्रेस पुरस्कार विजेती बॉलीवूड ची अभिनेत्री किरण दुबे, दाक्षिणात्य  सिनेमा गाजविणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे यांच्यासह असंख्य मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो आहे . येत्या रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा संपन्न होतो आहे  . अभिनेता मयूर लोणकर ,अभिनेत्री मालविका बर्वे, नृत्यदिग्दर्शक सचिन घोरपडे आदी कलावंताच्या संचाकडून यावेळी गाणी नृत्य अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यामध्ये विविध कलाकारांच्या गुणांचे अविष्कार रसिकांना पहायला मिळतील .तर स्वरध्यास संगीत विद्यालयाचे दत्तप्रसाद पांडे यांच्या मराठी गायनाच्या कार्यक्रमाचा यात समावेश आहे . हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असून पहिल्या 5 रांगा, मान्यवर पाहुणे,कलाकार ,नगरसेवक आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत .ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि निवेदन करणार आहेत .

‘छंद प्रितीचा’ – 10 नोव्हेंबर ला

0

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत… त्यात लोकसंगीताचा बाज आला तर रसिकमनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याच धाटणीचा लोकसंगीताशी निगडीत “छंद प्रितीचा” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात एका शाहीराचा संगीतमय प्रवास उलगडत जातो. प्रेमला पिक्चर्स निर्मित हा चित्रपट 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

कलेच्या उपासकांची कलेवरील श्रध्दा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहीराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ… त्यातून कलाप्रेमी शाहीराच्या आयुष्यात होत जाणारे बदल… याची कथा म्हणजे ‘छंद प्रितीचा’… या चित्रपटाच्या कथेला लोकसंगीताचा बाज लाभला आहे. ज्यात शाहीरी लावणी, सवाल – जवाब, श्रृंगारीक लावणी या सगळ्याच प्रकारांची मजा प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत.

चित्रपटाच्या कथेला साजेसं संगीत प्रविण कुवर यांनी दिलं असून बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत, आणि नंदेश उमप यांचे स्वर लाभले आहेत.

या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णीबरोबर विकास समुद्रे शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. चित्रपटाचे छायाचित्रपदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांनी तर संकलन अपूर्वा मोतीवाले यांनी केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते एक मराठा लाख मराठा चित्रपटाचे पोस्टर अनावरण !

0

एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा लाख मराठा या मराठी चित्रपटातून मांडला आहे. अलीकडेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. ओम साई सिने फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत गणेश शिंदे यांनी या सिनेमाची  निर्मिती केली आहे. सेन्सॉरच्या अनेक गुंतागुंतीत अखेर या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला आहे. आता २४ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

याप्रसंगी राजे म्हणाले की, गणेशच्या लहान वयातील हे मोठे धाडस कौतुकास्पद आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथल्या घटना सिनेमातुन मांडण्याचे धाडस त्याने केले आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने हा सिनेमा नक्की बघावा. गणेशला शुभेच्छा देत हा सिनेमा बघण्याची इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागात राहणाऱ्या गणेशची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, परंतु सिनेमा क्षेत्रात काहीतरी करण्याचे स्वप्न उराही बाळगून असल्याने, प्रसंगी हॉटेल आणि मंडप डेकोरेटर्सकडे काम करून दिवस काढत, अनेक दिग्गजांना वेळवेळी भेटून त्यांच्याकडून सिनेमाचे तंत्र अवगत केले. चित्रपट निर्मिती, वितरण या सर्व बाबींचा अनेक वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर एक मराठा लाख मराठा या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य गणेश शिंदेने पेलले आहे.

गणेश सिनेमाबद्दल सांगतात की, एक मराठा लाख मराठा हा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे. शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचे रूपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसे होते ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. यात तो यशस्वी होतो का? त्याचे पुढे काय होते यासाठी तुम्हाला एक मराठा लाख मराठा हा सिनेमा बघावा लागेल.

सिनेमात मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, राधिका पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांचे संगीत लाभले आहे.

अग्रवाल समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

0

पुणे-दापोडीयेथील अग्रसेन भवनमध्ये अग्रसेन भगवान चॅरिटेबल  फाऊंडेशन आणि अग्रवाल समाज दापोडी यांच्यासंयुक्त विद्यमाने   अग्रवाल समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्याचे उदघाटन अग्रकुल प्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने वधू , वर , विधवा , विधुर , विकलांग आणि घटस्फोटित वधू वर सहभागी होऊन आपला परिचय करून दिला . तसेच पालकवर्ग देखील उपस्थित होते .

दापोडी येथे पहिल्यांदा  अग्रवाल समाजाचा वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता . राज्यभरातून या मेळाव्यास १८० वर  व ७० वधू सहभागी झाले होते . या मेळाव्यामध्ये पुणे , मुंबई , सातारा , कोल्हापूर , अकोला , नागपूर , हुबळी , रायपूर , नाशिक आदी भागामधून  अग्रवाल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या मेळाव्यामध्ये २५ विवाह जमले .

या मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेश अग्रवाल आणि शीला अग्रवाल यांनी केले . या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका आशा शेंडगे , जयकिशन अग्रवाल , सरला गोकुळ महाजन , राजेंद्र गर्ग , मुकेश मित्तल , डॉ. अशोक अग्रवाल , सतपाल गोयल , नरेंद्र बंसल , सुभाष सिंघल , सुधीर अग्रवाल , विजय मित्तल , विनोद जालान , रितेश सिंघल , रतनलाल गोयल , वेदप्रकाश गुप्ता , संदीप गुप्ता , अनिल अग्रवाल , शामा  गोयल व शशि अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते .