Home Blog Page 3242

पाणीकपातीच्या पत्रामुळे शिवसेनेचे आंदोलन

0

पुणे- शहरातील साडेसहा टीएमसी पाणीकपात करण्याच्या जलसंपदा विभागाच्या आदेशाचा शिवसेनेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली हंडा आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. महापालिकेत मोठ्या संख्येने हंडा घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी गटनेते संजय भोसले म्हणाले की, राज्य शासनाने पुणे महापालिकेला २०२१ पर्यंत वार्षिक ११.५० टीएमसी पाणी मंजूर केले आहे. आता महापालिका हद्दीमध्ये ११ गावांचा समावेश झाल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली आहे. सरकार आणि प्रशासनाने पाणी कपात केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.

शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असल्याने जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला आणि शेतीला पाणी मिळत नसल्याचे सांगून वार्षिक १६ टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेच्या पाणीवाटपात तब्बल साडेसहा टीएमसीने कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यानुसार शहराला वार्षिक ८.९९ टीएमसी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास दंडाची आकारणी करण्याचा इशाराही जलसंपदा विभागाने पालिकेला दिला आहे.

शाळेत वंदेमातरम – शिवसेना आणि कॉंग्रेस गटनेते, आमने सामने (व्हिडीओ)

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे  गटनेते आणि शिवसेना गटनेते  ‘वंदेमातरम’ च्या मुद्द्यावरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत  . काही महिन्यापूर्वी सर्व पक्षीय असलेल्या पक्षनेत्यांच्या सभेत  सेनेचा  ‘ महापालिका शाळेत वंदेमातरम व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावावी असा विषय मंजूर केला होता. प्रथम तो पुढे ढकलण्यात आला आणि नंतर तो मंजूर करण्यात आला .पक्षनेत्यांच्या सभेतून थेट  महापालिकेच्या मुख्य सभेत गेल्या १० नोव्हेंबर ला मंजुरीसाठी आला .तेव्हा विशेष म्हणजे कॉंग्रेसचे एकमेव सदस्य उपस्थित होते .ते म्हणजे स्वतः गटनेते अरविंद शिंदे …. तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य उपस्थित होते . वंदेमातरम चा विषय मुख्य सभेत चर्चेला येणार असल्याचे खरे तर शिवसेना गटनेते ,कॉंग्रेस गटनेते यांनाच  ठाऊक होते  . पण कॉंग्रेसचे अन्य नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे अन्य नगर सेवक या सभेला उपस्थित होते पण हा विषय चर्चेला येण्यापूर्वीच निघून गेले होते .
या सभेत अरविंद शिंदे यांनी हा प्रस्ताव येताच ‘ वंदेमातरम ची सक्ती नसावी याबाबत ऐच्छिकता असावी ‘ अशा स्वरूपाची उपसूचना दिली . यास राष्ट्रवादीचे योगेश ससाणे यांनी अनुमोदन दिले . मात्र शिवसेनेचे गटनेते भोसले यांनी या उपसूचनेला विरोध केला आणि मतदान झाले . यावेळी चक्क उपसुचनेच्या बाजूने कॉंग्रेस चे एकट्या अरविंद शिंदे यांचे मत आणि राष्ट्रवादीची 3 अशी केवळ 4मते पडली . तर विरोधात भाजपा सेनेची ३७ मते पडली . त्यामुळे उपसूचना फेटाळण्यात आली . आणि सेनेचा मूळ प्रस्ताव देखील अशाच मताधिक्यांनी मंजूर करण्यात आला .
दरम्यान भोसले आणि शिंदे हे दोघेही एकाच विधानसभा मतदार संघात आपापल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे .

इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2017 स्पर्धेत टायगर्स संघाला विजेतेपद महिला गटात पिंक संघाला विजेतेपद

0

पुणे- कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित  इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2017 स्पर्धेत रोहन दामले(92धावा)याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टायगर्स संघाने एनएच वुल्स संघाचा 60धावांनी दारुण पराभव करत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना टायगर्स संघाने 6षटकात बिनबाद 110धावांचा डोंगर उभा केला. यात रोहन दामलेने 26 चेंडूत 3चौकार व 11 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची तडाखेबंद खेळी केली. रोहन दामलेला अभिषेक ताम्हाणेने नाबाद 13 धावा करून सुरेख साथ दिली. रोहन दामले(92धावा) व अभिषेक ताम्हाणे(13धावा) या सलामीच्या जोडीने  36 चेंडूत 110 धावांची भागीदारी केली. 110धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या एनएच वुल्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 6षटकात 3बाद 50धावावर गारद झाला. यात अभिषेक परमार 16, नाहुश जाधव 15, प्रशांत वैद्य 11यांनी थोडासा प्रतिकार केला. टायगर्सकडून अभिषेक ताम्हाणे(1-2), प्रतीक वांगीकर(1-2), अभिषेक गोडबोले(1-15) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर हा ‘किताब रोहन दामले याला देण्यात आला.

महिला गटात अंतिम फेरीच्या सामन्यात प्रीती मराठेच्या उपयुक्त 25धावांच्या जोरावर पिंक संघाने ब्लु संघाचा 17धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या संघाला स्वर्गीय ज्ञानेश्वर आगाशे करंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंडो शॉटलेचे अनिल जलिहाल, इंडो शॉटलेचे संचालक अशोक बेहेरे, पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष विजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव राजू भालेकर, ब्रिहंसचे मंदार आगाशे, होडेकचे अभिजित खानविलकर, एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे, कारा इंटलेक्टचे रणजित पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
टायगर्स: 6षटकात बिनबाद 110धावा(रोहन दामले नाबाद 92(26, 3चौकार, 11षटकार), अभिषेक ताम्हाणे 13(12, 1षटकार)वि.वि. एनएच वुल्स: 6षटकात 3बाद 50धावा(अभिषेक परमार 16(7, 2षटकार), नाहुश जाधव 15( 6, 2षटकार), प्रशांत वैद्य 11(14, 1षटकार), अभिषेक ताम्हाणे 1-2, प्रतीक वांगीकर 1-2, अभिषेक गोडबोले 1-15);सामनावीर-रोहन दामले.

महिला गट:
पिंक संघ: 6षटकात 3बाद 55धावा(प्रीती मराठे नाबाद 25(15, 4चौकार), भाग्यश्री देशपांडे नाबाद 15(10, 2चौकार), दीप्ती सरदेसाई 3) वि.वि. ब्लु संघ: 6षटकात 3बाद 28धावा(अंकिता 12(9, 1चौकार), साधना नाबाद 9(6, 1चौकार), दीप्ती सरदेसाई 1-1); सामनावीर-प्रीती मराठे.

इतर पारितोषिके

सर्वोत्कृष्ट फलंदाज: अभिषेक परमार(236धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: अभिषेक ताम्हणे(8विकेट्स)
मालिकावीर: रोहन दामले(321 धावा)
मोस्ट डिसिप्लिन टीम: जेपी शार्कस;
मोस्ट स्पोर्टींग टीम: रेड बुल्स;
मोस्ट व्हॅल्युएबल सिनिअर प्लेयर:विक्रांत पाटील;
मोस्ट व्हॅल्युएबल ज्युनिअर प्लेयर: नील हळबे;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: आशिष राठी;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: मनिष साबडे;
मोस्ट इम्पॅक्ट प्लेयर: श्रेयश वर्तक((203धावा, 4विकेट्स)

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत यार्डी, अॅटॉस्‌ संघांची विजयी सलामी

0

पुणे,दि.13 नोव्हेंबर 2017- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत यार्डी संघाने गालाघर संघाचा तर अॅटॉस्‌ संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पुना क्लब क्रिकेट मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत विघ्नेश मोहन नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर अॅटॉस्‌ संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने दोन चेंडू बाकी असताना 19.4 षटकात सर्वबाद 135 धावा केल्या. यात शंतनु बुट्टे पाटीलने 38 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 135 धावांचे लक्ष विघ्नेश मोहनच्या नाबाद 55 तर आनंद सावंतच्या 47 धावांच्या जोरावर अॅटॉस्‌ संघाने केवळ 17.5 षटकात 4 बाद 136 धावांसह पुर्ण करत विजयी सलामी दिली. विघ्नेश मोहन सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत स्वप्निल घाटगेच्या 76 धावांच्या जोरावर यार्डी संघाने गालाघर संघाचा 83 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना यार्डी संघाने 20 षटकात सर्वबाद 190 धावा केल्या. यात तरूण नोटानी याने 38  धावा करून स्वप्निलला सुरेख साथ दिली. 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंकित राव, गौतम तुळपुळे व जीवन गोसावी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे गालाघरसंघाचा डाव 20 षटकात 9 बाद 107 धावांत गोरद झाला. स्वप्निल घाटगे सामनावीर ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज्‌ अ सास इंडियाचे संचालक प्रशांत केएस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीयाज्‌ अ सास इंडियाचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज्‌ अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स् आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 19.4 षटकात सर्वबाद 135 धावा(शंतनु बुट्टे पाटील 38, प्रफुल्ल मानकर 26, स्वप्निल चिखले 21, विघ्नेश मोहन 3-24, ईशान नारंग 4-29) पराभूत वि अॅटॉस्‌– 17.5 षटकात 4 बाद 136 धावा(आनंद सावंत 47, विघ्नेश मोहन नाबाद 55, गिरिष ओक 3-14) सामनावीर- विघ्नेश मोहन

अॅटॉस्‌ संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.

 

यार्डी- 20 षटकात सर्वबाद 190 धावा(स्वप्निल घाटगे 76, तरूण नोटानी 38, जीवन गोसावी 26, सिध्दार्थ शर्मा 2-43, गौरव बाजपई 2-36) वि.वि गालाघर- 20 षटकात 9 बाद 107 धावा(तन्मय आचार्य21, अंकित राव 3-14, गौतम तुळपुळे 2-18, जीवन गोसावी 2-19) सामनावीर- स्वप्निल घाटगे

यार्डी संघाने 83 धावांनी सामना जिंकला.

अनिकेतच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत, उज्वल निकम लढवणार खटला

0

मुंबई-सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात राज्य सरकार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत कोथळे या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अनिकेत पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, सखोल चौकशीत पोलिसांचे बिंग फुटले आणि युवराज व अन्य पाच पोलिसांची रवानगी पोलीस कोठडीत झाली.

जनतेच्या सुरक्षेची जबाबदार असलेले पोलिसच गुन्हेगार झाल्याने सांगलीत संतापाची लाट उसळली. सोमवारी सांगलीत बंद पाळण्यात आला. दुसरीकडे मुंबईत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद देऊन कोथळे कुटुंबियांना मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युवराज कामटे गुन्हा घडला त्या कालावधीत कुठे कुठे गेले याचा सखोल तपास केला जाईल, तसेच पोलीस कोठडीतील नियमांबाबत आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्याची तसेच सीबीआय चौकशीची मागणीही जोर धरु लागली आहे. याबाबत केसरकर म्हणाले, या प्रकरणाचा तपास २४ तासांत लागला असून सध्या तपास योग्य दिशेने सुरु आहे. जर सीआयडीचा तपास पुढे सरकला नाही तर सीबीआयचा विचार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणातील साक्षीदार अमोल भांडारे आणि पीडित कोथळे कुटुंबीय यांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आ

व्होडाफोन छोटा चम्पियन – केवळ 38* रुपयांत राहा पूर्ण महिनाभर कनेक्टेड

0

मुंबई, 13 नोव्हेंबर 2017 – व्होडाफोन इंडियाने आज अत्यंत कमी किमतीतील व्होडाफोन छोटा चॅम्पियन एकात्मिक व्हॉइस आणि डेटा पॅकची सेवा सुरू केली. व्होडाफोन छोटा चॅम्पियनद्वारे प्रीपेड ग्राहकांना केवळ 38* रुपयांत 28 दिवसांच्या कालावधीसाठी 100 स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग मिनिटे, तसेच 100 एमबी 3-जी/4-जी डेटा मिळेल.

व्होडाफोन छोटा चॅम्पियनबाबत बोलताना व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘ग्राहकांना अधिकाधिक सेवामूल्य देण्यासाठी व्होडाफोन सातत्याने नवतेच्या शोधात आहे. व्होडाफोन छोटा चॅम्पियन पॅक हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. परवडेल अशा किमतीत पूर्ण महिनाभर कनेक्टेड राहण्याची मुभा देणारी ही अशा प्रकारची पहिलीच एकात्मिक सेवा आहे. ग्राहकांना आणखी लाभ देण्याच्या उद्देशाने आम्ही 100 एमबी डेटाचाही त्यात समावेश केला असून, यामुळे ग्राहकांच्या इंटरनेट प्रवासाची सुरुवात होईल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या सर्वोत्तम नेटवर्कवर आता आत्मविश्वासाने कनेक्टेड राहा आणि व्होडाफोन सुपरनेट 4-जी अनुभवाचा आनंद घ्या.’

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार आणि झारखंड, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगण या परिमंडळातील व्होडाफोन ग्राहकांना 38 रुपयांत 28 दिवसांसाठी 100 स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग मिनिट, तसेच 200 एमबी 2जी डेटा मिळू शकेल.

व्होडाफोन छोटा चॅम्पियन पॅक सर्व रिटेल आउटलेट्स, यूएसएसडी, वेबसाइट आमि मायव्होडाफोन एपवर उपलब्ध आहे.

(* किमती परिमंडळानुसार बदलू शकतात.)

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यां २२३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजन

0

pune-लहुजी महासंघ पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यां २२३ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते . पर्वतीमधील सहयाद्री मैदानावर कार्यक्रमाला स्वारगेट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार , नगरसेविका  सरस्वती शेंडगे,   स्मिता वस्ते , नगरसेवक  धीरज घाटे, योगेश समेळ , लहुजी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश  वैराळ,  लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे , लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे , लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष सुनीलभाऊ खंडाळे ,  मनोज तोरडमल, गणेश क्षीरसागर, मा. राजाभाऊ शेळके , सचिन जोगदंड , स्वाभिमान संघटनेचे  पुणे शहर अध्यक्ष  सुधीर आण्णा शिंदे , श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत क्षीरसागर ,अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे सचिव निखिल मुनोत  आदी मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संयोजन लहुजी महासंघाचे पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष मंगेश जाधव, संदीप दसवडकर , बाळासाहेब मोहिते , मालती अवघडे , अश्विन दोडके , अरविंद वाघमारे , राजू चांदणे , अतिश कापसे , सुमित अडागळे , संतोष सरोदे , गणेश लांडगे आदींनी केले .

          या रक्तदान शिबिरासाठी के. इ. एम. रुग्णालयाच्या रक्तपेढीने विशेष सहकार्य केले .रक्तपेढीचे प्रमुख  डॉ. किशोर धुमाळ यांनी विशेष सहकार्य केले . रक्तदान करणाऱ्याना वृक्ष , प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला . 

‘चांदण बिलोरी कळ्या’ गीताला अमृता फडणवीस यांचा स्वरसाज

0

अनेक भाव–भावना गीत-संगीताच्या माध्यमांतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करता येतात. असंख्य गीतांतून  आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहेच. आई आणि मुलगी यांच्या प्रेमाची वेगळी छटा दाखविणारं असेच एक हृदयस्पर्शी गीत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. गायिका अमृता फडणवीस यांच्या आवाजात नुकतंच हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं.

‘चांदण बिलोरी कळ्या आकाशीच्या विझल्या’

‘स्वप्नातल्या त्या पऱ्या पापण्यांना ओढूनिया निजल्या’

अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी सुरेख संगीत साज चढविला आहे. हे गीत श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देणार असेल असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.  अंगाईच्या धाटणीचे हे गीत गाण्यासाठी तितक्याच मधाळ स्वराची आवश्यकता होती. अमृता फडणवीस यांनी तितक्याच तरलतेने गायलेलं हे गीत रसिकांच्या मनाचा ठाव घेईल अशी आशा गीतकार अभिषेक खणकर व संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी व्यक्त केली.

नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह आहेत. सहनिर्माता संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत. प्रोजेक्ट हेड भूषण सावळे आहेत.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अहमं भारत कार्यक्रम

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा ‘अहमं भारत विभाग’ आणि ‘लक्ष्य फाउंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंसमवेत परिवर्तनाच्या विचारांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये देशाभिमान व सैनिकांप्रती आदराची भावना वाढीस लागावल या उद्देशाने कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते
सैन्यात भरती होण्यासाठी धैर्य, श्रध्दा, बांधिलकी, शिस्त, समर्पण, दृढनिश्‍चय आणि वाहून घेण्याची वृत्ती हे गुण विद्यार्थ्यांनी वृध्दिंगत करावेत असे आवाहन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी यावेळी केले. मु‘याध्यापक नागेश मोने अध्यक्षस्थानी होते.
दोन दिवसांच्या या कार्यक‘मात कर्नल पराग मोडक यानी श्रीनगर, अरुणाचल प्रदेश येथील सैन्य दलातील अनुभव कथन केले. सकारात्मक दृष्टिकोन आणि इंग्रजीचा न्यूनगंड बाळगू नये असे विचार त्यांनी मांडले.
डॉ. आशीष चव्हाण यांनी दृकश्राव्य सादरीकरणातून ‘सलाम मृत्युंजयांना’ या कार्यक‘मात शहीद जवानांची माहिती दिली. अनुराधा प्रभुदेसाई यांनी सैनिकांसोबतच्या आठवणी सांगितल्या. ‘पोलादी शार्क’ हे दृकश्राव्य सादरीकरण गिरीश मंद्रुपकर यांनी आपल्या नौदल सक्षमतेची माहिती दिली.
पुष्कर औरंगाबादकर यांनी ‘मी कीर्तीवंत, यशवंत’ या कार्यक‘मांतर्गत यशस्वीतेचे मंत्र दिले.दुसर्‍या दिवशी कर्नल गौरव दत्ता यांच्याशी अनुराधा प्रभुदेसाई यांनी संवाद साधला. कायद्याचे बोला या विषयावर ऍड. आशिष चव्हाण यांनी माहिती दिली. ‘शक्तीशाली शांतीदूत’ हा कार्यक्रम पुष्कर औरंगाबादकर यांनी सादर केला. शिरीषा साठे यांनी ‘सावरे मना’ हा कार्यक्रम सादर केला.आनंदा पाटील, शैलेश बर्गे, योगेश पाटील, निमिता महाजन, सुरेश वरगंटीवार, शैजजा कोमपिल्ली, प्रियांका भालचिम यांनी संयोजन केले.

सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराणा क्रीडा युवा,बारामती स्पोर्टस् अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

0
पुणे,दि 13 नोव्हेंबर 2017- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बारामती विभागात
महाराणा क्रीडा युवा संघाने राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाचा तर  बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने आर.एस.एफ सासवड संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 क्रीडा संकुल, बारामती येथे सुरू असलेल्या बारामती विभागातील मुलाांच्या गटात महाराणा क्रीडा युवा संघाने राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाचा  23-8 असा तर बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने आर.एस.एफ सासवड संघाचा 23-22 चूरशीच्या लढतीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराणा क्रीडा युवा संघ व बारामती स्पोर्टस् अकादमी या संघाची 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे होणा-या सुपर प्लेऑफ सामन्यांसाठी निवड
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्य फेरी
महाराणा क्रीडा युवा संघ- 23 वि.वि राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ-8 
बारामती स्पोर्टस् अकादमी- 23 वि.वि आर.एस.एफ सासवड- 22

थकीत वीजबिलांपोटी पाच दिवसांत 52 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

0

पुणे, दि. 13 : पुणे परिमंडलात महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेल्या विशेष मोहिमेत गेल्या पाच दिवसांत 52 हजार 262 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 23 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात ही कारवाई सुरु आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 14) स्थानिक सुट्टी आहे. तथापि, थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील. तसेच थकबाकीदारांविरोधात मोहीमसुद्धा सुरु राहणार आहे.

वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या पाच दिवसांत रविवार (दि. 12) पर्यंत 52 हजार 262 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामधील 20 हजार 599 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

पुणे शहरातील महावितरणच्या 7 विभागांतर्गत आतापर्यंत 43 हजार 424 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 21 कोटी 60 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला आहे. यातील 19 हजार 173 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी व चिंचवड शहरात 1818 वीजग्राहकांचा वीजपुरवठा 2 कोटी 79 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर यातील 201 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात 7020 ग्राहकांचा वीजपुरवठा 7 कोटी 84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. यात 1225 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्रांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

भारताच्या साकेत मायनेनी, एन.श्रीराम बालाजी यांचा दुस-या फेरीत प्रवेश

0

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा

भारताच्या  सिद्धार्थ रावत, एन. विजय सुंदर प्रशांत यांचे आव्हान संपुष्टात 

पुणे, दि.13 नोव्हेंबर 2017- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या  एन.श्रीराम बालाजी याने इजिप्तच्या करिम मोहोमद मामौन तर साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या  फेरीत भारताच्या वाइल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या  साकेत मायनेनीने बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याचा 6-3, 4-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये साकेतने सुरेख सुरुवात करत आपल्या बिनतोड सर्व्हिसेसच्या जोरावर टोमीस्लाव्ह ब्रेकीकचा 6-3 असा पराभव करून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सुरुवातीला दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 4-4अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये ब्रेकीकने साकेतची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्येसाकेतने जबरदस्त पुनरागमन करत टोमीस्लाव्ह ब्रेकिकची पहिल्या व पाचव्या  गेममध्ये  सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2असा सहज जिंकला व सामन्यावर शिक्कामोर्तब केले. नवव्या मानांकीत कझाकस्तानच्या अॅलेक्झांडर नेदोव्येसोव याच्याकडून भारताच्या वाइल्ड कार्ड मिळालेल्या विष्णु वर्धन याला 3-6, 6-4, 6-7 असा पराभव पत्करावा लागला.

 

दुहेरी गटात पहिल्या फेरीत भारताच्या सुमित नागल व जपानच्या नाओकी नाकागावा या जोडीने भारताच्या सिध्दांत बांठिया व जयेश पुंगलीया यांचा 7-5, 6-0 असा पराभव केला, तर ग्रेट ब्रिटनच्या ब्रायडन क्लीन व ऑस्ट्रेलीयाच्या मार्क पोलमन्स यांनी सर्बियाच्या पेदजा क्रिस्टीन व तायपेच्या स्तुंग-ह्यु यांग यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी

काईची उचीडा(जपान, 1) वि.वि अॅलेक्सी पॉपरीन(ऑस्ट्रेलीया, 8) 6-4, 6-2

अॅनटोनी इस्कोफीर(फ्रांस, 3) वि.वि सिद्धार्थ रावत(भारत, 5) 6-2,6-3

हुगो ग्रेनिअर(फ्रांस, 4) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान) 6-2, 6-2

बोर्ना गोजो (क्रोटाया) वि.वि एन. विजय सुंदर प्रशांत(भारत,7) 6-1, 6-2

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट-पहिली फेरी

अॅलेक्झांडर नेदोव्येसोव(कझाकस्तान,9)वि.वि.विष्णु वर्धन(भारत) 3-6, 6-4, 6-7

एन.श्रीराम बालाजी(भारत) वि.वि करिम मोहोमद मामौन(इजिप्त) 6-4, 6-2

साकेत मायनेनी(भारत) वि.वि.टोमीस्लाव्ह ब्रेकीक(बोस्निया)6-3, 4-6, 6-2

जय क्लर्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि.मारीओ विलेल्ला मार्टीनेझ(स्पेन) 3-6, 6-4, 6-4

 

दुहेरी गट- पहिली फेरी

ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन)/मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलीया,2) वि.वि पेदजा क्रिस्टीन (सर्बिया)/स्तुंग-ह्यु यांग(तायपे) 7-6, 6-3

 

सुमित नागल(भारत)/नाओकी नाकागावा(जपान) वि.वि.सिध्दांत बांठिया(भारत)/ जयेश पुंगलीया(भारत) 7-5, 6-0

स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरु -शिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतिक- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

0
पुणे:स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरु -शिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतिक होते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज केले.

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग’ च्या वतीने ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचेे प्रकाशन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले.

स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता यांच्या ऑक्टोबर 2017 पासून 150 व्या जयंती वर्षास प्रारंभ झाला आहे, त्यानिमित्त या पुस्तक संचातील चार पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या वतीने करण्यात आले.व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे ,अभय बापट,सुधीर जोगळेकर, प्रकाश पाठक, डॉ.सुरुची पांडे, मृणालिनी चितळे, आदिती जोगळेकर हर्डीकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘ गुरूची आचारसंहिता स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहून कळते, तसेच शिष्य कसा असावा हे भगिनी निवेदिता यांच्या समर्पित व्यक्तीमत्वाकडे पाहून कळते. या देशात बाहेरुन आल्यावर त्या देशाशी , देशाच्या मूल्यांशी एकरुप झाल्या. स्वातंत्र्यलढयातील त्यांच्या सहभागापासून शिक्षण, कला विचारापर्यंत निवेदिता यांचे पैलू एकमेवाद्वितिय आहेत.त्यांच्या राष्ट्र विचाराची ज्योत प्रत्येकाच्या हदयाला भिडून पुढे काम करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.विवेकानंद केंद्राच्या निवेदिता भिडे तसेच लेखिका मृणालिनी चितळे,सुरुची पांडे, आदिती जोगळेकर -हर्डीकर यांनी मनोगत व्यक्,केले

​ महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या ,’भगिनी निवेदिता यांचे कार्य प्रेरणादायक होते . त्यांचे विचार पुस्तकरूपात येत आहेत ही महत्वपूर्ण बाब आहे ‘

शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी लोकमान्य सभागृह, केसरीवाडा  येथे हा  प्रकाशन सोहळा झाला,प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांमध्ये ‘भारतीय मूल्यविचार’ :  डॉ. सुरूचि पांडे, ‘शिक्षण विचार’: डॉ. स्वर्णलता भिशीकर, ‘स्वातंत्र्यलढा-सहभाग आणि चिंतन’ : प्रा.मृणालिनी चितळे, ‘कला आणि राष्ट्रविचार’ : आदिती जोगळेकर-हर्डीकर यांचा समावेश आहे. 800 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तक संचाचे मूल्य 700 रुपये आहे.

25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत रोमानीयाच्या जॅकलीन अदिना क्रिस्टीनला दुहेरी मुकुट

0

पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॅकलीन अदिना क्रिस्टीन हीने दुहेरी गटातील विजेतेपदा बरोबरच एकेरी गटातही विजेतेपद संपादन करत दुहेरी मुकुट संपादन केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात अंतिम फेरीत एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे रंगलेल्या लढतीत भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीला रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॅकलीन अदिना क्रिस्टीन कडून 6-3, 1-6, 6-0 असा पराभव पत्करावा लागला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये जॅकलीन अदिना क्रिस्टीनने कारमानची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकुन आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये करमानने आपल्या जबरदस्त सर्व्हिस व आक्रमक खेळीच्या जोरावर हा सेट जॅकलीन विरूध्द 6-1 असा जिंकुन बरोबरी साधली. तिस-या व निर्णायक सेटमध्ये आपल्या अनुभव व कौशल्याचा वापर करत दुस-या चौथ्या गेममध्ये जॅकलीनने करमानची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा जिंकुन विजेतेपद संपादन केले. जॅकलीनने ईस्तमबुल येथे 25000डॉलर आयटीएफ स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

दुहेरी गटात जॅकलीन अदिना क्रिस्टीनने स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवाच्या साथीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांचा 4-6, 6-3, 10-7 असा पराभव करत दुहेरीचे विजेपद पटकावेल.

 या स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 3900डॉलर, करंडक व  60डब्लुटीए गुण, उपविजेत्या खेळाडूला 2590 डॉलर, करंडक व 36 डब्लुटीए गुण देण्यात आले. तसेच उपांत्य फेरीतील खेळाडूंना 22 डब्लुटीए गुण, उपांत्यपुर्व फेरीतील खेळाडूला 11 डब्लुटीए गुण, दुसर्‍या फेरीतील खेळाडूला 6 डब्लुटीए गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूला 1 डब्लुटीए गुण देण्यात आला.

दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूंना करंडक व 50 डब्लुटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 30 डब्लुटीए गुण देण्यात आले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आय.पी.एस अधिकारी विक्रम बोके व कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, नियोजन सचिव अश्विन गिरमे, पुणे ओपन फाऊंडेशनचे सदस्य शिवाजी चौधरी, समिर भांबरे व आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्य फेरी

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि करमान कौर थंडी(भारत,3) 6-3, 1-6, 6-0

सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाला विजेतेपद

0
पुणे,दि 11 नोव्हेंबर 2017- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बारामती विभागात मुलींच्या गटात समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाने बारामती क्रीडा आकादमी संघाचा  पराभव करत बारामती विभागाचे विजेतेपद पटकावले.
क्रीडा संकुल, बारामती येथे सुरू असलेल्या बारामती विभागातील मुलींच्या गटात  प्राजक्ता दोरगेच्या 14 गुणांच्या बळावर समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ संघाने बारामती क्रीडा आकादमी संघाचा 41-39 असा असा पराभव करत बारामती विभागाचे विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात उपांत्यपुर्व गटात महाराणा क्रीडा युवा संस्था संघाने नवमहाराष्ट्र कबड्डी संघ संघाचा 32-19 असा पराभव केला. राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ संघाने हनुमान स्पर्टस् क्लब संघाचा 25-21 असा पराभव केला. तर आर.एस.एफ सासवड संघाने इगल क्लब संघाचा 30-12 असा पराभव केला तर बारामती स्पोर्टस् अकादमी संघाने सोमेश्वर न्यु क्रीडा मंडळ संघाचा 47-16 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुली- अंतीम फेरी 
समर्थ रामदास स्वमी क्रीडा मंडळ-41(प्राजक्ता दोरगे 14, प्राजक्ता गायकवाड 10) वि.वि बारामती क्रीडा आकादमी- 39
 
मुले-उपांत्यपुर्व फेरी- 
महाराणा क्रीडा युवा संस्था-32 वि.वि नवमहाराष्ट्र कबड्डी संघ-19
राजे उमाजी नाईक क्रीडा मंडळ-25 वि.वि हनुमान स्पर्टस् क्लब- 21
आर.एस.एफ सासवड- 30 वि.वि इगल क्लब-12
बारामती स्पोर्टस् अकादमी- 47 वि.वि सोमेश्वर न्यु क्रीडा मंडळ- 16