Home Blog Page 3189

कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र शासनासोबत ‘यशस्वी’ संस्थेचा सामंजस्य करार

0

पुणे :  मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनची भागीदार संस्था असलेल्या पुण्यातील ‘यशस्वी एकेडमी  फॉर स्किल्स’ या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला.  इंडस्ट्री लिंक्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम  (आयएलएसडीपी) या संकल्पनेअंतर्गत  करण्यात आलेल्या या सामंजस्य करारामुळे रोजगारनिर्मिती होण्यासाठी चालना मिळणार असून बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक  कंपनीत ऑन  द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

यामध्ये विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी युवकांना  कौशल्य प्रदान करण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी,  आणि कार्यकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.   या करारानुसार यशस्वी अकॅडमी फार स्किल च्या माध्यमातून ऑटो मोबाईल, रिटेल व बीएसएफआय क्षेत्रात ३ वर्षासाठी प्रशिक्षण देणार असून ५००० लाभार्थ्यांना यातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून त्यासाठी आपण सर्व एकत्रित रित्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करु  व उत्तम प्रकारे त्याची अंमलबजावणी करून, प्रगतशील देश घडवू असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.

बापट -केळकर विवाह उत्साहात …

पुणे :पालकमंत्री गिरीश आणि गिरीजा बापट यांचे चिरंजीव गौरव व श्रीरंग आणि नीता केळकर यांची कन्या  स्वरदा यांचा शुभविवाह आज शुभारंभ लॉन्स येथे अत्यंत साधेपणाने झाला. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , प्रकाश जावडेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यमंत्रिमंडळातील श्री बापट यांचे सहकारी, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, समाजातील सर्व स्तरातील  प्रतिष्ठित नागरिक , आप्तेष्ट, हितचिंतक या मंगल सोहळ्याला उपस्थित होते. 

शुंभारंभ लॉन येथे उभारलेल्या मंडपामध्ये आकर्षक सजावट व  विद्युतरोषणाई  करण्यात आली होती. सुगंधी फुलांची झुंबरं  व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था  करण्यात आली होती. आज सकाळी ९.३०  वाजल्यापासून कार्यालयात बापट परिवार आणि त्यांच्या चाहत्यांची गर्दी झाली होती. या सोहळ्यासाठी पार्किंगची वेगळी  उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी  परिसरातील सात ते आठ मैदानावर मोटारी  लावण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांना  मिष्टान्न भोजनाचा आनंद यावेळी लुटला.  पोलीस आणि मिलेट्री बँड  पथक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

 

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रकाश मेहता, सुभाष देशमुख, गिरिश महाजन, पंकजा मुंडे, पांडुरंग फुंडकर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेवराव जानकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मदन येरावार, रणजित पाटील, प्रवीण पाटील, दिलीप कांबळे, सदाभाऊ खोत,  दीपक केसरकर, विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार योगेश टिळेकर, दत्ता बारणे, राहुल कुल, बाळा भेगडे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, शरद रणपिसे,महेश लांडगे,लक्ष्मण  जगताप, अनिल भोसले, दिलीप सोपल, राज पुरोहित, बाबुराव पाचर्णे, शरद रणपिसे, सुरेश खाडे, अतुल भापकळकर, जगदीश मुळीक, पंकज भुजबळ, बाळा नांदगावकर , श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे,अमर साबळे, वंदना चव्हाण, आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे,माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, रमेश बागवे, लक्ष्मणराव ढोबळे,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, बाळासाहेब शिवलकर, अशोक पवार, कमल ढोले पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार, विनायक निम्हण, दिलीपराव सोपल,  माजी खासदार रणजीत मोहिते पाटील, अशोक मोहोळ,  कॉंग्रेसचे विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, गटनेते श्रीनाथ भिमाले, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे  महापौर  नितीन काळजे, मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष, महेश लडकत,दिलीप वेडे पाटील,किरण दगडे पाटील, बाबू  नायर उमेश गायकवाड, अमोल बालवडकर, गायत्री खडके, एकनाथ पवार, हेमंत रासने,  उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, शिवसेनेचे अजय भोसले, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, श्याम जाजू, रवी भुसारी, रवी अनासपुरे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, तृप्ती देसाई,  दत्ताजीराव गायकवाड, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील , अन्न नागरी पुरवठा सचिव महेश पाठक, पोलिस उपमहासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त पोलिस महासंचालक सी.आय.डी. श्री सिंगल, आयुक्त कुणाल कुमार, वजनमापे नियंत्रक अमिताभ गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप ,पीएमआयडीएचे मुख्य कार्यकरी अधिकारी किरण गित्ते, मेट्रोचे एम.डी.ब्रिजेश दीक्षित यांच्या सह अन्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सिनेसृष्टीतील कलाकार विक्रम गोखले आणि प्रवीण तरडे हे देखील आवर्जून उपस्थित होते. 

राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक(पहा कोण कोण करणार किती किती गुंतवणूक )

0

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 मधील गुंतवणूक

गृह निर्माण – 7 प्रस्ताव 3 लाख 85 हजार गुंतवणूक

कृषी – 8 प्रस्ताव 10 हजार 278 कोटी गुंतवणूक

पर्यटन व सांस्कृतिक – 17 प्रस्ताव 3 हजार 716 कोटींची गुंतवणूक

ऊर्जा – 17 प्रस्ताव 1 लाख 60 हजार 268 कोटींची गुंतवणूक

इतर – 408 प्रस्ताव 95 हजार कोटींची गुंतवणूक

कौशल्य विकास – 113 प्रस्तावातून 1 लाख 767 रोजगार निर्मिती

उच्च शिक्षण – 12 प्रस्ताव, 2 हजार 436 कोटी गुंतवणूक

महाआयटी – 8 प्रस्ताव 5 हजार 700 कोटी गुंतवणूक

उद्योग क्षेत्र – 3516 प्रस्ताव, 5 लाख 48 हजार 166 कोटींची गुंतवणूक

असे एकूण 4106 प्रस्तावातून 12 लाख 10 हजार 464 कोटींची गुंतवणूक

प्रमुख औद्योगिक प्रकल्प

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड – 60 हजार कोटी

व्हर्जिन हायपरलूप वन – 40 हजार कोटी

थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) – 35 हजार कोटी

जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल – 6 हजार कोटी

ह्योसंग कंपनी – 1250 कोटी

महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल – 500 कोटी

अविकसित भागातील महत्त्वाचे प्रकल्प

लॉइड मेटल अँड एनर्जी, गडचिरोली – 700 कोटी

जिनस पेपर अँड बोर्ड, नंदूरबार – 700 कोटी

टेक्नोकार्ट इंडस्ट्री, अमरावती – 183 कोटी

इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेड, नांदेड – 200 कोटी

शिऊर ॲग्रो लिमिटेड, हिंगोली – 125 कोटी

मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

कॉयर क्लस्टर, सिंधुदुर्ग – 7.56 कोटी

मेगा लेदर क्लस्टर, रायगड – 500 कोटी

चित्रावारली फाऊंडेशन आर्ट अँड क्राफ्ट क्लस्टर – पालघर – 1 कोटी

इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, नागपूर – 5 कोटी

गोल्ड ज्वेलरी क्लस्टर, अहमदनगर

महत्त्वाचे गृहनिर्माण प्रकल्प

क्रेडाई महाराष्ट्र – 1 लाख कोटी (पाच लाख परवडणारी घरे)

नारेडको – 90 हजार कोटी (3 लाख परवडणारी घरे)

खलिजी कमर्शियल बँक अँड भूमी राज – 50 हजार कोटी (2 लाख परवडणारी घरे)

पोद्दार हाऊसिंग – 20 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)

कन्सेप्टच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिस – 25 हजार कोटी (1 लाख परवडणारी घरे)

वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

ह्योसंग – 1250 कोटी

निर्वाण सिल्क – 296 कोटी

पलक इंडस्ट्रिज, अमरावती – 25 कोटी

सुपर ब्ल्यू डेनिम – 125 कोटी

व्हेरिटो टेक्स्टाईल अमरावती – 25 कोटी

ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प

अदानी ग्रीन एनर्जी – 7 हजार कोटी

रि न्यू पॉवर व्हेंचर – 14 हजार कोटी

टाटा पॉवर – 15 हजार कोटी

सॉफ्ट बँक एनर्जी – 23 हजार कोटी

युनिव्हर्जी थिंक ग्रीन – 24 हजार कोटी

कृषी व विपणन क्षेत्रातील प्रकल्प

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प – 4 हजार कोटी

आयसीआरआयएसएटी, हैद्राबाद, किसानमित्र – विदर्भातील अकरा जिल्ह्यात 66 कोटी गुंतवणूक

रॉयल ॲग्रो फूडस् – 1400 कोटी

पलासा ॲग्रो – 2700 कोटी

फ्युचरिस्टिक सेगमेंट

व्हर्जिन हायपरलूप वन – 40 हजार कोटी

रिलायन्स इंडस्ट्रिज – 60 हजार कोटी

आयएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल – 6 हजार कोटी

महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेइकल – 500 कोटी

लॉजिस्टिक मधील महत्त्वाचे प्रकल्प  

देवीसिटी लॉजिस्टिक पार्क नागपूर – 424 कोटी

राज बिल्ड इन्फ्रा – 3 हजार कोटी

लॉजिस्टिक पार्क, पुणे – 100 कोटी

थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प

कॅरियर मिडिया इंडिया प्रा. लि. – 300 कोटी

एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट – 815 कोटी

आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया – 750 कोटी

एलजी इलेक्ट्रॉनिक्स – 350 कोटी

ओव्हनस कॉर्निंग इंडिया – 1050 कोटी

पेरी विर्क – 728 कोटी

पायाभूत सुविधांमधील प्रकल्पामध्ये शासनाची गुंतवणूक

वाहतूक आणि बंदरे – 48 प्रकल्प, 59 हजार 32 कोटींची गुंतवणूक

सार्वजनिक बांधकाम – 5 प्रकल्प, 1 लाख 21 हजार 50 कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगरपालिका – 18 प्रकल्प, 54 हजार 433 कोटींची गुंतवणूक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – 30 प्रकल्प, 1 लाख 32 हजार 761 कोटी

नगर विकास – 3 प्रकल्प, 23 हजार 143 कोटी

 

 

मुंबई- : मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स 2018 च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपये गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘सहभाग’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या यशस्वीते विषयी मुख्यमंत्री म्हणाले, एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात 5 लाख 48 हजार 166 कोटी एवढी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात 3 लाख 85 हजार तर ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे. शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 2 लाख 6 हजार 266 रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

आज रेल्वेसोबत झालेल्या 600 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे 350 एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात 15 हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण 2 हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डब्बे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठविण्यात येतील. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षात कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वे सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिताला चालना मिळणार आहे.

राज्याच्या गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदूरबार यासारख्या औद्योगिक दृष्ट्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सहभाग’ वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले, महाराष्ट्राने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. केंद्र शासनाने 2004 ते 2014 या पाच वर्षात 5 हजार 857 कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतविले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत 24 हजार 400 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोच निर्मिती कारखाना अवघ्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमिन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली. या गतिमान निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी निर्माण होणारे मेट्रोचे कोच हे देशातच नव्हे तर जागतिकस्तरावर पाठविण्यात येतील. मेट्रोच्या कोचला 50 टक्के मागणी ही अवघ्या महाराष्ट्रातूनच होते, असेही श्री. गोयल यांनी सांगितले.

उद्योग मंत्री श्री. देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सचा आज समारोप असला तरी यामध्ये असलेले प्रदर्शन पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी दोन वर्षात 61 टक्के सामंजस्य करार प्रत्यक्षात कार्यरत झाले. यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्सच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 13 विविध धोरणे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असल्याचे सांगत श्री. देसाई यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले.

 

‘मुक्तछंद’चे सावरकर पुरस्कार जाहीर

0

पुणे- ‘मुक्तछंद’च्या वतीने देण्यात येणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कारांसाठी संस्कृतचे अभ्यासक पंडित गुलाम बिराजदार, हिंदी साहित्यिक डॉ. सुनील देवधर, लेखक वसंत लिमये, वृत्तपत्र चित्रकार नीलेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
राज्याचे अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. २५ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार वितरण होणार आहे. ही माहिती संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा, मेधा कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 

….तर स्वतंत्र महापालिकेसाठी हडपसरचा संघर्ष अटळ -चेतन तुपे पाटील

0

पुणे- पुण्याची सारी घाण, सारे कचरा डेपो पूर्वेलाच ,आमच्याच माथी मारणार असाल ..तर नको आम्हाला तुमची पुणे महापालिका ..  ….तर स्वतंत्र महापालिकेसाठी हडपसरचा संघर्ष अटळ असेल … अशा आशयाचा स्पष्ट इशारा आज महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी दिला .
हडपसर रामटेकडी येथे कचरा डेपो करण्यास आज मुख्य सभेने मान्यता दिली. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसे ने या प्रस्तावास विरोध केला तर भाजपा शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांनी बहुमताने (मतदानाने )या प्रस्तावास मान्यता दिली . यावेळी या प्रस्तावास विरोध करताना राष्ट्रवादी ने दिलेली उपसूचना मतदानाने फेटाळून लावत कचरा डेपोचा हा विषय मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही .
नेमके या वेळी चेतन पाटील तुपे काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका ….

आमदारांच्या घरातच ‘अच्छे दिन ‘

पुणे : ‘अच्छे दिन आयो रे भैय्या , हो मैय्या  ..आयोरे …’.चा नारा पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या च्या जागा निवडल्यानंतर  भाजपमधील इच्छुक होते ,अशांना आता हताश होवून मनातल्या मनात गुणगुनावा लागतो आहे .महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सदस्य निवडताना भारतीय जनता पक्षाने दोन आमदारांच्या घरात पदे दिल्याने पक्षाने आमदारांच्या घरातच महापालिकेच्या स्थायी समितीची खिरापत वाटल्याने हे नैराश्य आज अनेक इच्छुकांना आले होते . तर  कॉंग्रेस मध्ये सत्ताधाऱ्यांशी दोन हात करणारा खमक्या चेहरा न देता नवा चेहरा दिल्याने भाजपच्या वरिष्ठ गोटात समाधान होते .

स्थायी समिती मध्ये चार जागांवर निवड घोषित होताच , भाजपची पालिकेत सत्ता असल्याने या पक्षातील जुन्या-नव्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा मोठा उमटला . आणि धुसफूस व   पक्षांतर्गंत सुंदोपसुंदीसुरु होणार काय ? असा प्रश्न उपस्थित झाला .या चारपैकी दोघेजण महापालिका निवडणुकीच्या आधी इतर राजकीय पक्षातून भाजपमध्ये आले असून तरीही त्यांना एवढ्या कमी वेळेत संधी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी मांडण्यास सुरवता केली आहे. “अशा लोकांना संधी दिली, मग ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाचे स्वयंसेवक म्हणून काम केले, त्यांचा आता विसर पडला का, ‘ असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.

स्थायी समितीतून भाजपचे चार सदस्य निवृत्त झाल्याने या पदासाठी पक्षातील दोन डझन सदस्य इच्छुक होते. त्यातील अनुभवी आणि एका नव्या सदस्यांच्या नावाचा विचार होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली, मात्र आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री आणि ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांना संधी देण्यात आली.  यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले दिलीप वेडे-पाटील आणि उमेश गायकवाड यांना संधी देण्यात आली. हे नवोदित असल्याने त्यांना संधी दिल्याबद्दल तक्रारीचा सूर नाही पण  यापैकी दोन जागा आमदारांच्या घरात गेल्याने अन्य इच्छुकांनी उघडपणे नाराजी मांडली.

मुळीक हे दुसऱ्यांना निवडून आले असून, आधी म्हणजे, गेल्या पाच वर्षात ते दोनदा स्थायीचे सदस्य होते. तर, टिळेकर याआधीही निवडून आल्या होत्या. भाजपकडे बहुतांशी सदस्य नवखे असल्याने स्थायी समितीत अनुभवी सदस्यांना संधी देण्याची मागणी पक्षातील एका गटाने लावून धरली होती. तर, आगामी निवडणुका लक्षात घेऊन ज्या भागात पक्षाची ताकद कमी आहे, त्या भागातील सदस्यांना स्थायीत स्थान मिळेल, असेही सांगण्यात येत होते. पण, दोघा आमदारांच्या घरात आणि दोन नव्या सदस्यांना संधी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल, एमआरपीएल संघांची विजयी सलामी

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाने सीपीसीएल संघाचा 23-15 तर एमआरपीएल संघाने ईआयएल संघाचा 30-12 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीत  सामन्याच्या पहिल्या सत्रात बीपीसीएल व सीपीसीएल या दोन्ही संघांनी एकमेकांची ताकद आजमावत सावध व संथ खेळ करत असतानाही भक्कम आघाडी मिळवत मध्यंतरापुर्वी 16-6 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर बीपीसीएल संघाच्या काशिलिंग अडके व महेंद्र राऊत यांनी त्यांच्या लौकीकाला साजेल अशा चढाया करत संघांच्या गुणांमध्ये झपाट्याने वाढ केली. सीपीसीएल संघाच्या पेरा रसन व दयालन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बीपीसीएल संघाच्या संघाच्या विशाल मानेने उत्कृष्ट पकडी करत सीपीसीएल संघाचा 23-15 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

दुस-या लढतीत एमआरपीएल संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा राखत इआयएल संघाचा 30-12 असा एकतर्फी पराभव करत सहज विजय मिळवला. मध्यंतरापुर्वी एमआरपीएल संघाने 15-4 अशी भक्कम आघाडी मिळवली. स्टिव्हन व दिपक यांनी आक्रमक चढाया करत संघाला 30-12 असा सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबीन फेरी

बीपीसीएल वि.वि सीपीसीएल-23-15(16-6 मध्यांतरापुर्वी)

एमआरपीएल वि.वि ईआयएल- 30-12(15-4 मध्यांतरापुर्वी)

4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत समुराईज्, लॅन्सर्स, गनर्स, सेंच्यूरियन्स, ग्लॅडिएटर्स संघांचे विजय

0

पुणे-  ग्रीन बॉक्स्  यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत अभिराज शिरोळे अॅन्ड असोसिएट्स समुराईज्, गोयल गंगा लॅन्सर्स, युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स, हिल्योज् सेंच्यूरियन्स, एमपी ग्रुप मावरीक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

कॅसल रॉयल, एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निशिथ हेगडे(8, 16मि.) याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रा.लिमिटेड बायसन्सचा 2-0असा पराभव केला. गोयल गंगा लॅन्सर्स संघाने माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स संघाचा 2-0असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून शॉन बॉब, पृथ्वीराज सातव यांनी प्रत्येकी एक गोल केला. हिल्योज् सेंच्यूरियन्स संघाने चिताज नाईट्सचा 3-2असा संघर्षपूर्ण पराभव केला. अभिराज शिरोळे अॅन्ड असोसिएट्स समुराईज् संघाने केएसएच बोल्टस् चा 1-0असा सनसनाटी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अभिराज शिरोळे अॅन्ड असोसिएट्स समुराईज्- 1(विपूल त्रिवेदी 6मि) वि.वि  केएसएच बोल्टस्- 0

गोयल गंगा लॅन्सर्स- 2(शॉन बॉब 7मि., पृथ्वीराज सातव 13मि.)वि.वि माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स- 0

युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स -2(निशिथ हेगडे 8, 16मि.)वि.वि.रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रा.लिमिटेड बायसन्स- 0

हिल्योज् सेंच्यूरियन्स- 3(शॉन थॉमसराजे 7, 12, 18 मि.) वि.वि.चिताज नाईट्स- 2(इग्नोटिज कारडोझ 11मि., सुरज थापा 16मि.)

एमपी ग्रुप मावरीक्स- 1(यश जैन 14मि.) वि.वि  परांजपे स्पार्टन्स् – 0

निओट्रीक फिनोलेक्स्(सीपी) -रेझरबॅक्स- 1(अक्षय नायर 15मि.) वि.वि  एबीआयएल  अॅझटेक्स- 0

रावेतकर ग्लॅडिएटर्स-2(सुमेध सपकाळ 13मि., कौशल वालेचा 16मि.) वि.वि  आयएमई फायरबर्डस्- 1(सौरभ कदम 18मि.)

डीएसके पलाडियन्स – 2( विवेक नायर 14मीस्वयं गोल, निखिल माळी 17मी) वि.वि  एसएस रॉय वायकिंग्स- 1(ओमकार यादव 19मी)

 

पंकज अडवाणीचा 124गुणांचा स्पर्धेतील हायेस्ट ब्रेक

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे  14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत ओएनजीसी व  बीपीसीएल या संघांनी अनुक्रमे जीएआयएल व इंडियन ऑईल या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात गतविजेत्या ओएनजीसी संघाने जीएआयएल संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. जागतिक विजेता पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत इशप्रित चड्डाचा 208(124)-66अशा गुणांनी पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. पंकज याने आपल्या खेळीत 124 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आलोक कुमारने आशुतोष पाधीवर 200(81,67)-44 अशा फरकाने विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बीपीसीएल संघाने इंडियन ऑईलचा 2-0अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. बीपीसीएल एस श्रीकृष्णनने इंडियन ऑईलच्या  ब्रिजेश दमानीचा 200(63,57)-53असा पराभव केला. एस श्रीकृष्णनने आपल्या खेळीत 63व 57गुणांचा ब्रेक नोंदविला. मनन चंद्रा याने ध्वज हरियाचा 202(61)-73(57)असा पराभव  करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचा सांघिक गटातील ओएनजीसी व बीपीसीएल यांच्यातील अंतिम फेरीचा सामना आज(दि.21 फेब्रुवारी रोजी)सकाळी 10 वाजता होणार आहे.

याआधीच्या बाद फेरीत इंडियन ऑईल संघाने एनआरएलचा 2-0असा पराभव केला. यामध्ये ब्रिजेश दमानीने पंकज रॉय 201-51असा तर, ध्वज हरियाने सईद तझुद्दीन अली अहमदचा  201-10असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनन चंद्रा, एस श्रीकृष्णन यांच्या विजयी कामगिरीच्या सामन्यात बीपीसीएल संघाने एमआरपीएल 2-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचे उदघाटन बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव शशांक हळबे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: उपांत्यपूर्व फेरी: इंडियन ऑईल वि.वि.एनआरएल 2-0(ब्रिजेश दमानी वि.वि.पंकज रॉय 201-51; ध्वज हरिया वि.वि.सईद तझुद्दीन अली अहमद 200(94)-10);

बीपीसीएल वि.वि.एमआरपीएल 2-0(मनन चंद्रा वि.वि.आतिश श्रीवास्तव 201-25; एस श्रीकृष्णन वि.वि.जे पी शेट्टी 200-38);

जीएआयएल वि.वि.ऑईल 2-0(आशुतोष पाध्ये वि.वि.ए कमलपुरी 200-50; इशप्रित चड्डा वि.वि.तुलन बरुआ 200(94)-88);

उपांत्य फेरी: ओएनजीसी वि.वि.जीएआयएल (पंकज अडवाणी वि.वि.इशप्रित चड्डा 208(124)-66; आलोक कुमार वि.वि.आशुतोष पाधी 200(81,67)-44);

बीपीसीएल वि.वि.इंडियन ऑईल( एस  श्रीकृष्णन वि.वि.ब्रिजेश दमानी 200(63,57)-53; मनन चंद्रा वि.वि.ध्वज हरिया
202(61)-73(57);

14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जीएआयएल, इंडियन ऑईल, बीपीसीएल, ओएनजीसी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे  14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जीएआयएल, इंडियन ऑईलबीपीसीएल या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत सांघिक गटात उपांत्यपूर्व फेरीत इंडियन ऑईल संघाने एनआरएलचा 2-0असा पराभव केला. यामध्ये ब्रिजेश दमानीने पंकज रॉय 201-51असा तर, ध्वज हरियाने आपल्या खेळात 94 गुणांचा ब्रेक नोंदवला व सईद तझुद्दीन अली अहमदचा  200(94)-10असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनन चंद्रा, एस श्रीकृष्णन यांच्या विजयी कामगिरीच्या सामन्यात बीपीसीएल संघाने एमआरपीएल 2-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. गतविजेत्या ओएनजीसी संघाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.

जीएआयएल संघाने ऑईल संघाचा 2-0 असा पराभव केला. यात आशुतोष पाधीने ए कमलपुरी याचा 200-50 असा तर  इशप्रित चड्डाने याने आपल्या खेळात 94 गुणांचा ब्रेक नोंदवला व तुलन बरुआ याचा 200(94)-88 असा पराभव करत विजय संपादन केला.

स्पर्धेचे उदघाटन बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव शशांक हळबे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: उपांत्यपूर्व फेरी:
इंडियन ऑईल वि.वि.एनआरएल 2-0(ब्रिजेश दमानी वि.वि.पंकज रॉय 201-51; ध्वज हरिया वि.वि.सईद तझुद्दीन अली अहमद 200(94)-10);

बीपीसीएल वि.वि.एमआरपीएल 2-0(मनन चंद्रा वि.वि.आतिश श्रीवास्तव 201-25; एस श्रीकृष्णन वि.वि.जे पी शेट्टी 200-38);

जीएआयएल वि.वि.ऑईल 2-0(आशुतोष पाधी वि.वि.ए कमलपुरी 200-50; इशप्रित चड्डा वि.वि.तुलन बरुआ 200(94)-88)

‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ तर्फे दहाव्या ‘चेकमेट 2018’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

विनोद जैन ( पुणे ), आणि जी. नागराजन (बंगळूरू )यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ च्या वतीने ‘चेकमेट 2018’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीची दहावी आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी 2018 रोजी हॉटेल अरोरा टॉवर्स, एम.जी.रोड, पुणे येथे सकाळी 9 ते 6 यावेळेत होणार आहे. ‘चॅलेंजिंग ग्लोबल कॉम्पेटेटीव्ह लँडस्केप अ‍ॅण्ड इमर्जिंग बिझीनेस स्ट्रॅटेजिज्’ हा परिषदेचा विषय आहे, अशी माहिती ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक डॉ. आर. गणेसन यांनी दिली. इन्स्टिट्यूटच्या वतीने दरवर्षी ‘चेकमेट’ या नावाने आंतररराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. डॉ. कैलाश काटकर (‘क्वीक हिल टेक्नॉलॉजीज् लि.’ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार आणि उपाध्यक्ष आबेदा इनामदार उपस्थित राहणार आहेत. विनोद जैन ( पुणे ) आणि जी. नागराजन (बंगळूरू )यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. विनोद जैन हे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते असून, ते वृक्ष सरंक्षण करिता कार्यरत आहेत. जी. नागराजन बंगळूरू यांनी केलेल्या कर्नाटकमधील ग्रामीण स्त्रीयांच्या सबलीकरणातील कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. ‘चेकमेट 2018’ या परिषदेमध्ये देशभरातून विविध कंपन्यांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. परिषदेत हे अधिकारी आपले विचार आणि मत मांडणार आहेत. दिनेश पिलाई (‘महिंद्रा स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप’ चे मुख्यकार्यकारी अधिकारी) यांच्या उपस्थितीत दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता परिषदेचा समारोप होणार आहे.

जयंती ;पुण्यतिथी साजरी करताना सामाजिक बांधीलकी जपावी – संदीप खर्डेकर.

0
पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोथरूड शिवजयंती महोत्सवात आज एस एन डी टी कन्याशाळेतील २५ गरजू विध्यार्थीनीना गणवेश वाटप करण्यात आले.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि इंडो ग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक राहुल बग्गा यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना श्री राहुल बग्गा म्हणाले ” गरजूंना मदत करणे हाच शिवजयंतीचा संदेश असून क्रिएटिव्ह फाउंडेशन ने या मुलींना गणवेश भेट देउन एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित अशी रयतेची सेवा केली आहे “
महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलताना क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष व महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले ” कोणत्याही महनीय व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो,यालाच अनुसरून शिवजयंतीतील कार्यक्रमाचा खर्च कमी करुन या शाळेतील विद्यार्थ्यांनीना आवश्यक असलेले गणवेश देण्याचा आम्ही निर्णय घेतला ” समाजातील सर्वच संस्था संघटना यांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवुन उपलब्ध निधी खर्च केल्यास उत्सवांचा आनंद द्विगुणित होइल आणि त्या त्या महनीय व्यक्तीने घालून दिलेल्या आदर्शाचे पालन देखील होइल.
पुढील शैक्षणिक वर्षात गुणवत्ता मिळविणाऱ्या ५ मुलींची शिक्षणाची सर्व जबाबदारी कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान व क्रिएटिव्ह फाउंडेशन घेइल असे महोत्सवाचे सह संयोजक विशाल भेलके यांनी जाहीर केले.
यावेळी उमेश भेलके,मंदार बलकवडे,सुरेश जपे,अक्षय मोरे,गणेश इंगळे,मंदार महाडिक राकेश शहा सतीश दिघे मंगेश कलाटे इ उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनावणे,मधुरा तांगडे,देवकर मॅडम व पालक प्रतिनिधी सोनाली मगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले,संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.

आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसेपाटील

0

आंबेगाव- तालुका पत्रकार संघाची २०१८ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया रविवार दिनांक १८ रोजी अतिशय खेळीमेळीत पार पडली.या बैठकी साठी पत्रकार संघातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि सर्वनुमते कार्यकारणी निवडण्यात आली…

अध्यक्ष – संतोष वळसेपाटील
उपाध्यक्ष– अशोक शेंगाळे
सचिव कांताराम भवारी
खजिनदार – सुदाम बिडकर
मंचर प्रसिद्धी प्रमुख – विवेक शिंदे
घोडेगाव प्रसिद्धी प्रमुख – विकास गाडे
हिशोब तपासनीस गोरडे सर
सल्लागार– डी के वळसेपाटील,विलास शेटे,काका होनराव,चंद्रकांत घोडेकर,सुनील झोडगे, अविनाश गुंजाळ….
कार्यकारणी सदस्य – जयेश शहा,सुनील तोत्रे, अशोक वळसे, ढोबळे,प्रताप हिंगे,विश्वास काळे,सावता झोडगे,अरुण सरोदे…

पुणे जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .

नेत्यांचे धक्कातंत्र – स्थायी समितीत पहा कोणाची झाली निवड …

पुणे- ज्येष्ठ कोण ? अभ्यासू कोण ? पक्षाला फायदा होईल असा परफॉर्मन्स कोण दाखवू शकेल ? या सर्व प्रश्नांना डावलून विविध पक्षांच्या नेत्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती मध्ये नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणे महत्वाचे मानून आज आपापल्या सदस्यांची नावे महापौरांना कळविली .आज त्यांची निवड पालिकेच्या मुख्य सभेत महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केली ..
यांची झाली निवड …
शिवसेना -संगीता ठोसर
कॉंग्रेस -वैशाली मराठे,
राष्ट्रवादी -लक्ष्मी दुधाने
स्मिता कोंढरे
भाजपा-दिलीप वेडे पाटील ,योगेश मुळीक ,रंजना टिळेकर ,उमेश गायकवाड

भाजपच्या 4 पैकी  दोन आमदारांच्या घरातील सदस्य आहेत .एकूण आठ सदस्यांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे .

धनकवडीत पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी

0
धनकवडी :-  तुतारी , हलगी , भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेश धारण करून अकरा महाविद्यालयातील तरुणांनी
 एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिद्धीविनायक ग्रुपने  किल्ले सिंहगड ते कात्रज प्रज्वलित मशाल दौड , शिवाज
 महाराजांच्या प्रतिमेचे पूजन , भव्य मिरवणूक , आरोग्य तपासणी शिबीर , वृक्षारोपण , अनाथाश्रम मध्ये खाऊ 
वाटप अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करीत शिव जयंती उत्साहात साजरी केली. तर प्रा. फुलचंद चाटे 
यांच्या हस्तेयावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली 
                  सायंकाळी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले
,  अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगतात , चाटे शिक्षण समुहाचे विभागिय संचालक
 फुलचंद चाटे , डाँ. वैभव ताड  यांच्या उपस्थित भव्य मिरवणूकीला सुरुवात झाली. यामध्ये ढोल ताशांचा गजर
 , तुतारी , सनई चौघड्यांचे स्वर शिवाजी महाराजांचा जयजयकार  होत होता. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान , 
उपस्थित मान्यवरांचे स्वागत ,  पारंपरिक  वेश धारण केलेली तरुण - तरुणी मिरवणुकीची शोभा वाढवत होते.
 शिवाजी महाराजांचा वेशातील कलाकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. महाराजांना मुजरा करण्यासाठी 
चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीही गर्दी केली होती.
 सिंहगड किल्याची स्वच्छता , दिंडीतील वारकऱ्यांना मदत , ममता फौंडेशन मधील एचआयव्ही ग्रस्त मुलांसोबत
वाळी व वाढदिवस साजरा , वृक्षारोपण , पर्यावरण जतन अशी सामाजिक कामे सिद्धीविनायक ग्रुप अनेक वर्षे
 करीत आहेत.पद्मनाभ ढोल पथक आणि महिलांच्या हस्ते पुजा हे या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण होते अँड. दिलीप जगताप
 यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोख्या व पारंपरिक शिवजयंती उत्सव संपन्न झाला.