Home Blog Page 317

बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.१०: पुणे शहरातील सर्वे क्रमांक ५७९/१ब, मौजे बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करुन अनधिकृतपणे डोंगरफोड करणाऱ्या विरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे; यापुढे अनधिकृतपणे उत्खनन करुन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

मौजे बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करुन जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली; या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. या ठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करुन जागा सपाटीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आणि प्रशासनाच्यावतीने ते तात्काळ थांबविण्यात आले. याकामी वापरण्यात आलेले पोकलँड हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे. या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून त्यांनी व विकसकानी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणाकरीता शासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कार्यवाहीत निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले,हवेली तहसीलदार किरण सूरवसे, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्यवाही केली आहे, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध स्थगितीची घोषणा

परराष्ट्र सचिव म्हणाले- आता जमीनी आणि हवाई हल्ले करणार नाही; संध्याकाळी 5 वाजता सहमती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता ट्विट करून ही माहिती दिली, त्यांनी म्हटले आहे कि,’

अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी संध्याकाळी ६ वाजता सांगितले की, ‘संधीयुद्धविराम संध्याकाळी ५ वाजल्यापासून लागू होईल.’ ते म्हणाले, ‘आता दोन्ही देश जमीन, आकाश आणि समुद्रातून एकमेकांवर हल्ला करणार नाहीत.’ भारत-पाकिस्तान डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता चर्चा करतील.अमेरिकेच्या मध्यस्थीने ही युद्धबंदी करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता ट्विट करून ही माहिती दिली.ते म्हणाले, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीखाली काल रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने हल्ले त्वरित आणि पूर्णपणे थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी एक समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि उपराष्ट्रपतींनी मोदींशी चर्चा केली- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, उपाध्यक्ष जेडी वेन्स आणि मी स्वतः गेल्या ४८ तासांपासून भारत-पाकिस्तान अधिकाऱ्यांशी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी बोलत आहोत.ते म्हणाले, ‘मला हे कळवण्यास आनंद होत आहे की पाकिस्तान आणि भारत सरकारांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी निष्पक्ष व्यासपीठावर वाद सोडवण्यासाठी चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.

पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी १५:३५ वाजता भारतीय डीजीएमओंना फोन केला. त्यांच्यात असा करार झाला की दोन्ही बाजू भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५:०० वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रात सर्व प्रकारचे गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवतील.आज दोन्ही पक्षांना हा करार लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२:०० वाजता पुन्हा बोलतील.
आज सकाळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर, पंजाबमधील पठाणकोट, आदमपूर आणि गुजरातमधील भूज एअरबेसवर हायस्पीड क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ज्यामुळे आमचे नुकसान झाले.पाकिस्तानने रुग्णालये आणि शाळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताने हाणून पाडला. ब्राह्मोस सुविधा नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे. भारतीय एस-४०० संरक्षण प्रणाली देखील पूर्णपणे सुरक्षित आहे.

भारत-पाकिस्तान युद्धबंदी: कमोडोर रवी नायर म्हणतात, “परराष्ट्र सचिवांनी म्हटल्याप्रमाणे, समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एक सामंजस्य करार झाला आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाला या सामंजस्य कराराचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेबद्दल जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (@OmarAbdullah) म्हणाले: “मी भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेचे मनापासून स्वागत करतो. जर ते दोन दिवस आधी झाले असते तर उशिरा झाले असते तर आपण रक्तपात आणि मौल्यवान जीव गमावणे टाळले असते. परंतु अखेर, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (DGMOs) फोनवरून चर्चा केली आणि सर्व क्षेत्रांमध्ये युद्धबंदी पुन्हा स्थापित करण्यास सहमती दर्शविली. आता, प्रभावित भागात झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करणे आणि विलंब न करता लोकांना मदत करणे सुरू करणे ही जम्मू-काश्मीर प्रशासनाची जबाबदारी आहे.”

खर्च व व्यवस्थापन लेखापाल हे आजचे व्यवसायिक नेतृत्व 

मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर ; द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन 

पुणे :  जुन्या बँकिंग पद्धतीत जेव्हा संगणक आले तेव्हा नोकऱ्या गेल्या नाहीत. नोकरीचे स्वरूप बदलले. आज ग्राहकांची अपेक्षा वाढली आहे आणि भारतातले लोक जागतिक मानकांनुसार काम करायला तयार नाहीत. जागतिक पातळीवर आपल्याला अनेक दबावांना सामोरे जावे लागत आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अद्ययावत राहणे गरजेचे आहे. खर्च व व्यवस्थापन लेखापाल (सीएमए) फक्त अकाउंटंट नसून डिजिटल तंत्रज्ञानात निपुण व्यवसायिक मार्गदर्शक असतो, असे मत मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधी अधिवेशनाचे उद्घाटन आयोजन  कर्वेनगर येथील सीमए भवन येथे  करण्यात आले होते. यावेळी करंदीकर बोलत होते. माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमात ६० हून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव करण्यात आला. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील २०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. 

दीपक करंदीकर म्हणाले, एआय, ऑटोमेशन, डेटा सायन्स मुळे डिजिटल युगात सीएमए ची भूमिका बदलते आहे. जो तंत्रज्ञानाचा स्वीकार करतो, डेटा विश्लेषण शिकतो तो पुढे जातो. काळाशी जुळून घ्या नाहीतर नष्ट व्हाल, हे सत्य आहे. सीएमएची भूमिका पूर्वी फक्त बजेटिंग, रिपोर्टिंग, कॉस्ट मॅनेजमेंट होती. आता ते व्यवसाय धोरणाचे भागीदार आहेत. त्यामुळे सतत शिकणे आणि सर्टिफिकेशन अद्यतन करणे आवश्यक आहे.

डॉ. धनंजय जोशी म्हणाले, प्रॅक्टिस करणारे सदस्य आणि उद्योगातील सदस्य यांच्यात एक प्रकारची दरी आहे. प्रॅक्टिस करणाऱ्यांबद्दल आणि उद्योगात काम करणाऱ्यांबद्दल काही पूर्वग्रह आहेत. दोघेही एकाच संस्थेचे सर्टिफाईड कॉस्ट अकाउंटंट्स आहेत तरी ही दरी आहे. ५०-५५ वर्षांपासून ही दरी कमी झालेली मला दिसली नाही. संस्थेतील तरुण लेखापालांनी ही दरी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्योगात काम करणाऱ्यांना वेळेची मर्यादा आहे तरीही पण संस्थेशी जोडलेले राहा, कृतज्ञ रहा. संस्थेला पैशाची नाही तर अनुभवाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अरिंदम गोस्वामी म्हणाले,  आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. डिजिटल परिवर्तनामुळे व्यवसायांचे स्वरूप बदलत आहे, आणि या बदलात खर्च व व्यवस्थापन लेखापाल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. सीमए केवळ आकड्यांवर आधारित निर्णय घेत नाहीत, तर ते नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, व्यावसायिक धोरणे आणि निर्णय प्रक्रिया साधतात.  

नीरज जोशी म्हणाले,  द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स पुणे विभागाच्या वतीने एआय वर आधारित कोर्सेस सुरु करण्यात आली आहेत. उद्योग क्षेत्रातील सदस्यांनी त्यांच्या अनुभवाचे आदानप्रदान करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. 

देवदत्त केकाटपुरे, नीरज जोशी, हर्षद देशपांडे, मुकेश गुप्ता, ब्रिजेश माळी, आशिष देवडे, नीरज जंगीद, डॉ. मर्झुन जोखी, सुभेंदू चक्रवर्ती यांनी विविध सत्रात मार्गदर्शन केले. तसेच चर्चासत्रात सोमा घोष, श्रद्धानंद देसाई, अनिता खिस्ती, डॉ. अजय महाजन, विद्यासागर अप्पूकुटन, शिल्पा पारखी यांनी सहभाग घेतला. यावेळी चैतन्य मोहरीर यांनी प्रास्ताविकात एआय चे महत्व विशद केले. तर, मिहिर व्यास आशिष थत्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

मुंबईत फटाक्यांना बंदी:-दक्षिण पुण्यात मध्यरात्रीनंतर फटाक्यांच्या आवाजाने अनेकांची उडाली झोप

पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांचा मोठा आवाज ऐकून कोणालाही गैरसमज होऊ नये म्हणून हे करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.तर पुण्यात भारत- पुढील साठ दिवसांसाठी बीम लाईट तसेच लेझर बीम लाईट सारखे प्रखर प्रकाश झोत सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी (९ मे) सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.मात्र मध्य रात्री नंतर म्हणजे AM १२ ते १ आणि चक्क AM २ ते ३ च्या दक्षिण पुण्यात कुठे तरी झालेल्या जोरदार फटाक्यांच्या आवाजाने अनेकांची झोप उडाली अशा बहाद्दरांना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरीकातून होते आहे.

दरम्यान कालच लोहगाव येथे हवाई दलाचा तसेच नागरी विमानतळ आहे. वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखर झोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपवून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळपासून १५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या वायुक्षेत्रात पुढील ६० दिवसांसाठी प्रखर झोत सोडण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश शर्मा यांनी दिले. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानाने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी. समाज माध्यमातील संदेशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या फाईलकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

‘इंद्रायणी’ शुद्धीकरण प्रकल्पाचा लवकरच प्रारंभ…

पुणे- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी काल आळंदी देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊलींचा रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आळंदीची नगर प्रदक्षिणा करून इंद्रायणीकाठी तब्बल साडेसात हजार महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त हभप चैतन्यमहाराज लोंढे, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ॲड. रोहिणताई पवार, विश्वस्त हभप पुरुषोत्तममहाराज पाटील यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी, आळंदीचे ग्रामस्थ आणि वारकरी यांनी उपस्थित राहून माऊलींना वंदन केले. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोपही यावेळी करण्यात आला.

यावेळी मंत्री महोदयांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून इंद्रायणी नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला असून लवकरच कामाचा प्रारंभ होणार आहे. इंद्रायणीचं ऐतिहासिक महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची इंद्रायणीबद्दल असणारी आस्था शब्दात वर्णन करण्यापलिकडची आहे. म्हणूनच सदरील प्रकल्प प्राध्यानाने हाती घेण्यात आला आहे.असे जाहीर केले.

पुणे जिल्हा समिती, अग्रोहा विकास ट्रस्ट, अग्रोहा धामची स्थापना

पुणे:
अग्रोहा विकास ट्रस्ट, अग्रोहा धामच्या पुणे जिल्हा समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक आज अध्यक्ष श्री सुनील रोशनलाल अग्रवाल (जिल्हा अध्यक्ष) यांच्या येरवडा येथील निवासस्थानी यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांनी भूषवले. राज्य सचिव सीए के. एल. बंसल आणि राज्य महिला अध्यक्षा श्रीमती नीता चंद्रशेखर अग्रवाल यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी पुणे जिल्हा समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पुणे जिल्हा समितीचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत:

  1. सुनील रोशनलाल अग्रवाल, कृष्णा ग्रुप, पुरु सोसायटी, येरवडा – अध्यक्ष
  2. सतीश पुरणचंद गुप्ता, मंत्रा ग्रुप, पुणे – उपाध्यक्ष
  3. नितीन जयप्रकाश अग्रवाल – उपाध्यक्ष (ग्रामीण)
  4. सीए राजेश अग्रवाल, पुणे – सचिव (WIRC सदस्य)
  5. रोहित गंगौरीलाल अग्रवाल, कात्रज – कोषाध्यक्ष
  6. सौ. सरस्वती गोयल, पुणे – महिला अध्यक्षा
  7. कुणाल तोडी – युवा प्रकोष्ठ अध्यक्ष
  8. रोहतास बंसल, पुणे – सदस्य
  9. प्रशांत बंसल, कल्याणी नगर – सदस्य
  10. सौ. प्रीती रूपेश गोयल, धनोरी – सदस्य
  11. सीए योगेश पोद्दार, पुणे – सदस्य
  12. अमित नरेंद्रकुमार गुप्ता, निगडी – आय.टी. विशेषज्ञ सदस्य
  13. दिनेश रामगोपाल अग्रवाल, निगडी – सदस्य
  14. अजय संजय गर्ग, रावेत – आय.टी. विशेषज्ञ सदस्य
  15. नवीन रघुनाथ बंसल, कसारवाडी – सदस्य
  16. अजय जिंदल – सदस्य
  17. सुधीर गोयल, लुल्ला नगर – सदस्य
  18. अरविंद अग्रवाल – सदस्य

या प्रसंगी ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए उत्तमप्रकाश अग्रवाल यांनी ऑनलाईन माध्यमातून सर्व नवनियुक्त सदस्यांशी संवाद साधला व समाजसेवेच्या या कार्यासाठी सर्वांना प्रेरणा दिली.सर्व सदस्यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आणि एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पथ विक्रेत्यांच्या समस्या निराकरण नावाने प्रशासनाचेही राजकारण

शहरातील बड्याबड्या अनधिकृत बांधकामांकडे सर्रास दुर्लक्ष अन पोट भरणाऱ्या हातगाडीवाल्यांवर कारवाई

आयत्या वेळेला बैठकीची वेळ बदल्याचे मेसेज अन उडाला गोंधळ

पुणे, दि. १० मे: पथ विक्रेत्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगर पथ विक्रेता समितीने आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळेत अचानक बदल करण्यात आल्याने गोंधळ उडाला. यासाठी मनपाच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागच्या आयुक्तांना नगर पथ विक्रेता समिती टीव्हीसी सदस्य पुणे महानगरपालिकेने या पत्राद्वारे विनंती करून नगर पथ विक्रेता समितीची बैठक लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे.
पथ विक्रेत्यांशी संबधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगर पथ विक्रेता समितीची बैठक ६ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे या बैठकीची वेळ बदल्यामुळे सर्व पथविक्रेते सदस्यांमध्ये गोंधळ उडाला.
प्रशासनाकडून दुपारी ४.३० ऐवजी सकाळी ११.३० वाजता ही बैठक घेण्यात आली. यासंबंधी दूरध्वनीद्वारे अधिकृत पूर्वसूचना बहुतेक सदस्यांना केवळ एक तास आधी मिळाली. त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या वेळेत कोणतेही सदस्य उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे या बैठकीत चर्चा होऊ शकलेले मुद्दे प्रलंबित राहिले असल्यामुळे नव्याने नगर पथ विक्रेता समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करावी. अशी विनंती या पत्राद्वारे करण्याची माहिती समितीचे सदस्य सागर दहिभाते, गजानन पवार, नीलम अय्यर व कमल जगधने यांनी दिली.

चोरडिया परिवाराचा सामाजिक कार्याचा असाही वसा..अपंग कल्याणकारी संस्थेत ‘जीना इसी का नाम है’

पुणे : रंगकर्मी दिवंगत संतोष चोरडिया यांच्या कुटुंबियांनी आणि मित्र परिवाराने चोरडिया यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत सुरू ठेवला आहे. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संतोष चोरडिया यांनी ‘जीना इसी का नाम है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वेगळेपणा जपला होता. हाच वसा पुढे सुरू ठेवण्यात आला आहे. रंगकर्मी चोरडिया फाऊंडेशन आणि आयलीज् डान्स अकॅडमीतर्फे वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेत ‘जीना इसी का नाम है’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर उपस्थित कलाकारांनी विविध गाणी सादर केली. नृत्य, गीत आणि हास्यकिस्से अशा मनोरंजनपूर्ण कार्यक्रमाचा संस्थेतील दिव्यांग मुलांनी भरपूर आनंद लुटला. गायक राजेश शिंगाडे आणि गायिका डॉ. अश्विनी रानडे यांच्या गीतांना या मुलांनी दाद दिली तर अभिनेत्री आयली घिया व आयलीज् डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या मुलांना नृत्यात सामील करून त्यांचे मनोरंजन केले.
या प्रसंगी स्व. संतोष चोरडिया यांचे सुपुत्र अजिंक्य चोरडिया यांनी अनेक किस्से सांगून मुलांना खळखळून हसवले. त्यांनी केलेल्या मकरंद अनासपुरेंच्या मिमिक्रीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. या कार्यक्रमात संस्थेतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. झिंगाट गाण्यावर ताल धरून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता घिया आणि अजिंक्य चोरडिया यांनी केले तर विजय भोंडे, श्रीकांत खडके, राजू विधाते यांनी साथसंगत दिली.
या प्रसंगी शाळेचे विश्वस्त अ‍ॅड. मधुकरराव कचरे, शिक्षकवृंद, कर्मचारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन

पुणे, दि. १० -श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ,
ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कुबेर, डॉ भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, ॲड.रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथे स्वागत

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.१०- प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे हे ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळालायचे अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.

जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.

भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वारीत स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि माहिती फलक लावा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : जुन्नर तालुक्यातील खोडद गावाजवळील वडाच्या झाडा जवळ मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि उपवनसंरक्षक, पुणे यांना तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जिल्ह्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती. मात्र, अद्याप या दिशेने पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी पुणे यांनी तत्काळ सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून मधमाश्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण होईल अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात.

या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी असेही सुचवले आहे की, जिल्हाधिकारी यांनी संभाव्य धोकादायक ठिकाणे निश्चित करून तेथील नागरिक आणि पर्यटकांना मधमाश्यांपासून संरक्षण कसे करावे याची माहिती द्यावी. यासाठी माहिती फलक, पत्रके आणि इतर माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यात यावी. याचबरोबर पुरातत्व विभागाने त्यांच्या अधिपत्यातील ऐतिहासिक स्थळांवर मधमाश्यांपासून बचावासाठी विशेष उपाययोजना आखाव्यात. उपवनसंरक्षकांनी तज्ज्ञांच्या मदतीने मधमाश्यांचे स्थलांतर किंवा नियंत्रित व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

“लोकांचे प्राण, सुरक्षितता, पर्यावरणाचे रक्षण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने आणि समन्वितपणे कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक पावले उचलून केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांच्या कार्यालयास कळवावी, असे निर्देशही दिले आहेत.

शहरातील हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आढावा

पुणे, दि. १०: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सद्यस्थिती व त्यासाठीच्या निधी उपलब्धतेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिके करिता मंजुर एकूण ९१ दवाखान्यांपैकी पुणे महानगरपालिके अंतर्गत ०८ व पिंपरी चिंचवडमधील ०७ दवाखाने सुरू झाले असून उर्वरीत आपला दवाखाने तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील नाळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दिप्ती देशमुख, विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील विविध शहरांमध्ये गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपला दवाखाना सुरु करण्यासाठी ज्याठिकाणी स्वतःच्या जागा उपलब्ध आहेत तेथील भाड्यापोटी मिळणारा निधी जागेची डागडुजी, नूतनीकरण, यंत्र सामुग्री खरेदी, अतिरिक्त औषधे खरेदी यासाठी वापरण्यास मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, प्रस्तावास मान्यता मिळेपर्यंत स्वतःच्या जागेवर आपला दवाखाना सुरु करण्यात यावेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णांच्या सोयीसाठी जनरेटर, डास संरक्षक जाळ्या, आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. झोपडपट्टी भागात पावसाळ्यात पाणी साठून रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी जागा निवडावी, अशा ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरुन बांधकाम, डागडुजी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्या पुढे म्हणाल्या, आरोग्य सेवा तत्परतेने देणे गरजेचे असून महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती कळवावी. ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असेल तेथे जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी आणि दवाखाने कार्यान्वित करावेत.दि २५ मे पासुन शासनाचा आरोग्य विभाग, मनपा व सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने आरोग्य शिबिरे या ठिकाणी घेण्याचे नियोजित असून महिलांची रक्त तपासणी,कॅल्शियम व लोह कमतरता तपासून औषध वाटप इत्यादी आरोग्य सुविधांवर भर देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले .
000

हडपसर जोधपुर रेल्वे सुरु होण्यापूर्वीच झाली बंद, झेलम एक्स्प्रेस दिल्ली पर्यंतच …

हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर–जोधपूर एक्सप्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते ३ मे रोजी करण्यात आले. त्यावेळी हि रेल्वे सेवा ५ मे पासून सुरु होईल असे सांगण्यात आले पण त्यानंतर रेल्वे ने प्रत्यक्षात हि रेल्वे १० मे रोजी सुरु होईल असे सांगण्यात आले .परंतु आपत्कालीन व अपरिहार्य परिस्थितीमुळे खालील गाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे.त्यामुळे रेल्वेने प्रसिद्धीपत्रक काढून काही रेल्वे सेवा बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

रद्द व मार्ग बदललेल्या गाड्यांची नावे :

  1. गाड्यांचे रद्द करणे:

गाडी क्र. 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस दिनांक 10.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे।

गाडी क्र. 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस दिनांक 11.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे।

  1. मार्गातच समाप्त (शॉर्ट टर्मिनेशन):

गाडी क्र. 11077 पुणे – जम्मू तवी एक्सप्रेस दिनांक 09.05.2025, 10.05.2025, व 11.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथे समाप्त केल्या जातील।

  1. मार्गातच प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेशन):

गाडी क्र. 11078 जम्मू तावी – पुणे एक्सप्रेस दिनांक 11.05.2025, 12.05.2025 व 13.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथून सुरू होतील।

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी 139, प्रवासी माहिती प्रणाली किंवा www.enquiry.indianrail.gov.in यावर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी. स्थानकांवर नियमित घोषणाही करण्यात येतील असे रेल्वेने कळविले आहे.

काँग्रेसच्या फालतू टीकेकडे बघण्याची वेळ नाही,देशातील युद्धाच्या स्थितीत राजकीय आरोप करणे लज्जास्पद:भाजप नेते केशव उपाध्ये यांचे प्रत्युत्तर

मुंबई- भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. आयएमएफच्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज मिळणार आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याला आता भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील युद्धाच्या स्थिती असताना अशा काळात सरकारवर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणे हे लज्जास्पद असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.टीका आत्ताच करायची होती? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याची वेळ नाही. देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचे सोडून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे. ही राजकीय टीकेची वेळ नाही, एवढे भान काँग्रेस पक्षाला कधी येणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

या संबंधीत एका पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, आयएमएफ ने पाकिस्तानला बेल आउट पॅकेज जाहीर केलं असून या अंतर्गत त्यांना 1.3 अमेरिकन बिलियन डॉलर चे कर्ज मिळणार आहे. अर्थात हे कर्ज मिळू नये म्हणून भारताने IMF विषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण त्यासाठी झालेल्या मतदानाला अनुपस्थित राहिला, यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर काल टीका केली. वास्तविक पाहता साठ वर्षं या देशाची सत्ता भोगलेल्या काँग्रेसला IMF मधील नियम माहीत असायला हवेत; कारण IMF मध्ये कोणतेही नकारात्मक मतदान घेतले जात नाही. म्हणजे एकतर हो म्हणून मत देता येते किंवा मतदानावर बहिष्कार टाकता येतो. आणि आपण भारत देश म्हणून याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करीत बहिष्कार टाकला. जयराम रमेश यांच्यासारख्या जेष्ठ काँग्रेस नेत्याने काल मोदी सरकार घाबरून मागे सरकले, अशी टीका केली. देश युद्धाच्या स्थितीत असताना अशा काळात सरकार वर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणे लज्जास्पद आहे. राजकारणाची ही वेळ नाही. काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याचीही ही वेळी नाही; परंतु देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभं रहायचं सोडून काँग्रेस राजकारण करत आहे. सरकार जर घाबरत असते, तर पाकिस्तानची जी भीक मागण्याची दयनीय अवस्था आज झाली आहे, ती झाली नसती. असो, राजकीय टीकेची ही वेळ नाही एवढ किमान भान काँग्रेस पक्षाला कधी येणार? असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

ब्रह्मोस फॅसिलिटीवर हल्ल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा:S400 डिफेन्स सिस्टिमही सुरक्षित; प्रत्युत्तराच्या कारवाईत PAKचे सियालकोट एअरबेस उद्ध्वस्त

नवी दिल्ली-कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासह परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पत्रकार परिषदेत आज सकाळी भारत -पाक हल्ल्या दरम्यानची माहिती दिली .

पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबमधील हवाई तळांवर हल्ले केले. भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष्य केलं. पाकच्याही लष्करी तळांवरच आम्हीही हल्ले चढवले. सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्ध्वस्त केलं आहे. लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून पाकनं हल्ले केलेत, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. तसेच पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य करुनही भारतानं संयम राखलाय, असंही सोफिया कुरेशी (Sofia qureshi) यांनी सांगितले.

पाकिस्ताननं अनेक फेक न्यूज पसरवल्यात. भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल सुरु आहे. पाकचे दावे भारत फेटाळून लावतंय. पाककडून सीमाभागात लष्करी तैनात वाढतेय. भारतानं पाकिस्तानला आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय युद्धप्रणाली पाकिस्तानच्या युद्धप्रणाली उद्ध्वस्त करताय, अशी माहती सोफिया कुरेश यांनी दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत विविध माहिती दिली.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले की, पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने भारताच्या लष्करी तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने जवळपास सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर , भटिंडा येथे लष्करी तळावर काहीप्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले की, पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने भारताच्या लष्करी तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने जवळपास सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर , भटिंडा येथे लष्करी तळावर काहीप्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या टेक्निकल इन्स्टॉलेशन, कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केले. पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी हे सुरु आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.