Home Blog Page 3066

भेसळयुक्त दुधाचे आठ टॅन्कर पकडले – गिरीश बापट

0

मुंबई : दुधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येते. याचाच भाग म्हणून मुंबई मध्ये काल अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत मुंबईत दूध पुरवठादारांकडून होणाऱ्या दुधाची तपासणी करुन भेसळयुक्त दुध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करण्यात आली. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

 मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच ठिकाणी यात मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका, मुंलुंड पूर्व नाका ही मोहिम राबवली गेली. या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे ६० ते ७० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाचही ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहिम  सुरु होती. या तपासणीमध्ये २२७ वाहनांतील ९,२२,९२८  लिटर दुध तपासण्यात आले या प्राथमिक तपासणीत दुधाचे पाच ब्रँडचे नमुने कमी प्रतीच्या दर्जाचे आढळले त्यामुळे  ३,४४,००० लिटर दुध सील केले तसेच दुधाच्या आठ टँकरमध्ये भेसळयुक्त दुध आढळून आले या भेसळीमध्ये अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले.

त्यामुळे हे १९२५० लिटर दुध नष्ट करण्यात आले व हे दुध ज्या जिल्हयातून आले होते. त्या जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांवर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.  दुधाला पूर्ण अन्न म्हणून मान्यता आहे. आजही प्रत्येक घरात लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत दूध घेतले जाते. या दूधापासून खवा, दही, पनीर, चीज, आईसक्रीम व विविध प्रकारच्या मिठाई तयार होतात. मात्र दुधाची वाढती मागणी लक्षात घेता भेसळखोरांकडून यात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावर बंधन आणण्यासाठी शासन कठोरात कठोर कारवाई करणार आहे अशी माहिती बापट यांनी दिली.

आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार

0
पुणे: एचसीएल या जगातील आघाडीच्या समूहातर्फे दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात डेक्कन जिमखाना येथे दि. २० ते २७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
हि अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने व आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत आहे. जगातील १८ वर्षाखालील कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर आशियांतील बी१ गटातील एकमेव स्पर्धांपैकी एक अशी हि स्पर्धा आहे. स्पर्धेत चीन, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया, हाँग-काँग, मलेशिया, ईराण, कझाकस्तान, उझबेकिस्तान, इंडोनेशिया आणि भारत  या ११ देशातील विविध भागातून खेळाडू सहभागी झाले आहेत.
एचसीएलच्या माध्यमातून घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करता यावे, हा यामागचा उद्देश्य आहे. कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्मसह महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवून उपलब्ध करून देण्याबरोबरच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आगेकूच करण्याची संधी मिळणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अजिंक्यपद स्पर्धेत १००हुन अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात आपला सहभाग नोंदविला आहे.  ३२टक्के खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि यामध्ये हाँग यी कोडी वांग(हाँग काँग, जागतिक क्र. २८), थासपोर्न नाकलो(थायलंड, जागतिक क्र. ३८) आणि डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान, जागतिक क्र.५१)हे अव्वल मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेत प्रत्येक गटात ३२चा ड्रॉ असणार असून यामध्ये अव्वल २२खेळाडूंना(आयटीएफ क्रमवारीच्या आधारावर) मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित आणि वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना पात्रता फेरीत प्रवेश मिळणार आहे.
याविषयी बोलताना एचसीएल कॉर्पोरेशन आणि शिव नादर फाऊंडेशनचे धोरण व्यवस्थापकीय सुंदर महालिंगम म्हणाले कि, आम्ही क्रीडा व संगीत क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांनी कारकीर्द समृद्ध करण्याचे तत्वज्ञान एचसीएलने ठेवले आहे. क्रीडा उमक्रमांचा एक भाग म्हणून एचसीएल गेल्या तीन वर्षांपासून टेनिसला पाठिंबा देत आहे आणि आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करून अव्वल कुमार भारतीय खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी व आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. तसेच, हि स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची अशी स्पर्धा असून सहभागी खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतील, अशी आशा आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची आशियाई कुमार टेनिस स्पर्धा आहे. भारतात सलग दुसऱ्या वर्षी हि स्पर्धा होत असून एचसीएलने या स्पर्धेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. याआधीच्या २०१७च्या मालिकेतदेखील देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि यावर्षीदेखील ११देशांतून अव्वल मानांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे भारतीय खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतील आणि सर्व वयोगटात विजेतेपद पटकावतील, अशी आशा आहे.

जुहू येथील आदर्श नवरात्री उत्सवात देवेंद्र फडणवीस, मधुरा व अभिजित साटम

0
पुणे-महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू येथील अमित साटम आयोजित आदर्श नवरात्री उत्सवास उपस्थिती दर्शवून सोहोळ्याची शोभा वाढविली. प्रसंगी मुख्यामंत्र्यांनी सीएम चषक अंतर्गत ‘सेलिब्रेट अंधेरी’ या स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन केले. सीएम चषक हा उपक्रम विविध प्रकारच्या क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे. देवेंद्र फडणवीस सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत म्हणाले की, “तुम्हा सर्वांस सुख-शांती, यश  संपत्ती लाभो आणि आपल्या देशाची उत्तोमोत्तम प्रगती होवो अशी मी देवी चरणी प्रार्थना करतो.” 
अभिनेत्री मधुरा वेलणकर व अभिनेता-निर्माता अभिजित साटम यांनि देखील आदर्श नवरात्री उत्सवास उपस्थिती दर्शवून सोहोळ्यास रंगत आणली. 

तृतीयपंथीयांच्या प्रश्नात लक्ष घालणार -खा अनिल शिरोळे

0
पुणे-तृतीयपंथीयांना समाजात समान वागणूक मिळायला हवी,मी त्यांच्या विविध प्रश्नांमधे निश्चितच लक्ष घालेन व चांदनी यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर व प्रलंबित विधेयकाचा पाठपुरावा करेन असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले.क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज तृतीयपंथीयांच्या हस्ते देवी ची आरती व बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.ह्या महोत्सवातील विविध कार्यक्रम हे रसिकांना मेजवानीच असून आजच्या बाल जत्रेत खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटणारी मुले पाहिली की समाधान लाभते असे ही ते म्हणाले.यावेळी तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी व त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चांदनी,सोनाली,जान्हवी,डिंपल आणि रुहाना यांना श्री शिरोळे यांच्या हस्ते साड्या देउन त्यांचा नवरात्रीनिमित्त सन्मान करण्यात आला.
तृतीयपंथी ह्या खऱ्या अर्थाने देवीच्या भक्त असून त्यांच्या समस्या लोकांना कळाव्यात आणि त्यांच्या प्रती समाजाचा दृष्टीकोण बदलावा यासाठी आज त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक किरण दगडे पाटील,भाजपचे उदय कड,बाळासाहेब टेमकर,दिलीप उंबरकर,कुलदीप सावळेकर,रमेश चव्हाण,सुमीत दिकोंडा,माणिकताई दीक्षित,सुवर्णा ताई काकडे इ मान्यवर उपस्थित होते.
बालजत्रेत लहान मुलांसाठी टॅटू काढणे,जंपिंग जॅक,बंदुकीने फुगे फोडणे यासह विविध खेळ मोफत ठेवण्यात आले होते.या सर्व खेळांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक उमेश भेलके व विशाल भेलके यांनी उपस्थितांचे स्वागत तर सौ मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

..तरच मिळेल आयुष्यात सफलता आणि आत्मिक समाधान -आयुक्त सौरव रावांनी दिला मूलमंत्र (व्हिडीओ)

0

पुणे-यूपीएससी.एमपीएससीपरीक्षा उत्तीर्ण होणे हा समाजसेवा करण्याचा निश्चित सर्वोत्कृष्ट मार्ग आहे ,पण याच क्षेत्रात काय कोणत्याही क्षेत्रात काम करा ..जेव्हा तुम्ही ‘चांगला माणूस ‘ बनलेला असाल तेव्हाच तुमच्या आयुष्यात सफलता आणि आत्मिक समाधान मिळू शकेल. आणि स्वीच दाबला कि लाईट लागेल अशा पद्धतीने चांगला माणूस घडत नाही ,तो आतापासूनच स्वतामध्ये घडविण्याचा प्रयत्न करा ..तेव्हा पुढे जाऊन घडेल ,आणि परीक्षेतील सफलतेचा देखील तेव्हाच उपयोग होईल . असे येथे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने पुणे कॅंटोंमेंट विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमंक १९ मध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते झाले .नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या या केंद्राच्या उद्घाटन समयी अरविंद शिंदे ,अजित दरेकर आदी मान्यवर नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी सौरव राव नेमके काय म्हणाले ते ऐका आणि पहा  त्यांच्याच शब्दात …

कधी येणार ती संध्याकाळ – तरुण नगरसेवकाने सभागृहात व्यक्त केली व्यथा (व्हिडीओ)

0

पुणे-…..इन काली सदियों के सर से, जब रात का आँचल ढलकेगा, जब दुःख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा ,जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नग्में गायेगी, वो सुबह कभी तो आयेगी…हे मुकेशजींचे गाणे ऐकले असेल बहुतेकांनी ,किंवा मोहम्मद रफींचे सुबह न आई , शाम न आई ..हे गाणे ऐकले असेल ..या गाण्यात जशी आर्तता आहे …तशीच ..पण वेगळ्या कारणाने … ‘ती ‘संध्याकाळ कधी येतच नाही … अशा वाक्याने एका तरुण आणि नवोदित नगरसेवकाने आपली व्यथा आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत व्यक्त केली . अर्थात ते कारण ..म्हणजे .. आपल्या वार्डात जेव्हा जेव्हा नळाला पाणी येत नाही ,तेव्हा तेव्हा मी  अधिकाऱ्यांना विचारतो ,आणि ते सांगतात संध्याकाळी येईल पाणी ..नागरिकांना मी सांगून सांगून वैतागलो ,संध्याकाळी पाणी येईल , पण ती संध्याकाळ कधी आलेली नाही … अशा शब्दात आपली व्यथा आज नगरसेवक आदित्य माळवे यांनी मांडली .

त्याला कारण हि तसेच झाले, गेल्या काही दिवसांपासून यंदा ऑक्टोबर महिन्यातच पाणी कपातीचा विषय गाजतो आहे . कालवा फुटल्यानंतर कपातीचा हा विषय सुरु झाला . शिवाजीनगरच्या पोलीस लाईन मध्ये पाणी न आल्याने तेथील नागरिकांनी पालकमंत्र्यांना घेरावो घातला . या सर्व पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांनी मुख्य सभेत पाणी कपातीच्या तथाकथित प्रयत्नांच्या विरोधात मुख्य सभेत निदर्शने केली आणि त्यावर बोलण्याची संधी महापौरांकडून मिळवून घेतली . विरोधक तर बोललेच . पण भाजप नगरसेवक देखील मागे राहिले नाहीत .त्यांनीही आपापल्या पाण्याच्या समस्येबद्दल च्या व्यथा मांडल्या . यावेळी भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी मोठ्या मार्मिक पणे आपल्या व्यथा मांडल्या ..पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात …

पाणी रे पाणी ..तेरा रंग कैसा ..नवरात्रीत नगरसेविका आल्या रिकामे हंडे घेवून नव्या सभागृहात …(व्हिडीओ)

0

पुणे : गेल्या आठवड्यापासून अपेक्षेप्रमाणे पुणे शहरात गाजणाऱ्या पाणीप्रश्नावरुन महापालिकेत गदारोळ करण्यात आला आहे. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले.यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कलशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली.
, कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते.यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले. अर्थात महापालिकेला या प्रकारची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडला.या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले ,प्रकाश कदम,नाना भानगिरे,नंदा लोणकर,वसंत मोरे बंडू गायकवाड,साईनाथ बाबर यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.

फेमसली फिल्मफेअर (मराठी) मध्ये लवकरच येणार सई ताम्हणकर

0

डिजिटल चॅट शो केवळ एमएक्स प्लेअरवर उपलब्ध

प्रसिद्ध चॅट शो, फेमसली फिल्मफेअर आता लवकरच नवीन येणार्‍या एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून स्ट्रीमिंग चालू करत आहे. या कार्यक्रमाच्या मराठी आवृत्तीमध्ये सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि रिंकू राजगुरू यांसारख्या तारकांचा समावेश असेल.

मराठी चित्रपटांना गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम ओळख मिळालेली असून त्याचे श्रेय कुशल दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, गायक या सर्वांना जाते कारण त्यांच्या मेहनतीमुळेच चित्रपट आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मराठीमधून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम तयार होत आहेत.

नवीन येणारा ओटीटी प्लॅटफॉर्म हा प्रांतिक प्रेक्षकांना पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम अशा त्यांच्या भाषेमधील कार्यक्रम तसेच हिंदी आणि इंग्रजीमधून सादर करण्याचा उद्देश ठेवून आहे. वैयक्तीकृत मूळ कार्यक्रम तसेच लायसंस्ड/परवानाकृत कार्यक्रम जसे की, वेब सीरीज, गेम शो, चॅट शो, चित्रपट अशा अनेक माध्यमांमधून वेगवेगळ्या भाषेमधून एमएक्स प्लेअर ओटीटीमध्ये मूलभूत बदल करत भारतभरामधील प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा मानस बाळगून आहे.

या कार्यक्रमाचे स्वरूप अतिशय खेळीमेळीचे आणि हलकेफुलके असून यामध्ये सिनेस्टार त्यांच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल, गमतीशीर आठवणींबद्दल आणि त्यांच्या आयुष्यामधील काही मजेदार बाबींबद्दल बोलतील, ज्याद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याची संधी मिळेल. प्रत्येक आठवड्याला एक नवीन स्टार प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यांचे फॅन त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊ शकतील.

महिलांनी साकारली एकत्रित महाआरती

0

पुणे-19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदीरात
हजारो भावीक महिलांनी एकत्रित महाआरती करून सारे वातावरण भक्तीमय केले. पुणे नवरात्रौ
महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या पुढाकाराने झालेल्या या महाआरती
कार्यक्रमात राज्याचे मंत्री श्री गिरीष बापट यांच्या पत्नी सौ. गिरीजा गिरीष बापट या देखील
सहभागी झाल्या होत्या.

पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी सोबत आरतीची थाळी आणली
होती. यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना जयश्री बागुल म्हणाल्या की, नवरात्रामध्ये झालेल्या
महिला महोत्सवामुळे सहभागी महिलांना नवीन उर्जा मिळते, स्वतःची ओळख पटते,
धार्मिकतेबरोबरच सामाजिक दृष्टी देखील विकसित होते. ही बाब खूप चांगली आहे असे सांगून
या महिला महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिलांना त्यांनी धन्यवाद दिले. दीपा बागुल यांनी
आभार प्रदर्शन केले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी सौ व श्री काटेकर, दत्तवाडी पोलिस ठाण्याचे
निरीक्षक देवीदास घेवारे व त्यांच्या पत्नी, नगरसेवीका लता राजगुरू, सुजाता शेट्टी हे मान्यवर
उपस्थित होते. यावेळी 12 राशींवर आधारित ‘राशीगीत’ हा रंगतदार कार्यक्रम श्रीमती करंदीकर व
त्यांच्या सून आश्विनी करंदीकर यांनी सादर केला. यावेळी भाग्यलक्ष्मी लकी ड्रॉ ही काढण्यात
आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक वंदना नवले (वॉशिंग मशीन), द्वितीय क्रमांक शांताबाई पठारे
(पैठणी) आणि तृतीय क्रमांक शुभांगी साकरे (इंडक्शन) तसेच 10 उत्तेजणार्थ बक्षीसे देण्यात आली.
उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेट देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेखा
झानपुरे, नर्मता गौड, विद्युलता साळी, वृशाली बागुल, श्रृतीका बागुल आणि नुपूर बागुल यांनी
विशेष प्रयत्न केले.

पुणे नवरात्रौ महोत्सवात रसिकांना हिंदी, मराठी गाण्यांचा नजराणा

0

पुणे-गाजलेल्या हिंदी, मराठी गीतांच्या सादरीकरणाने पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या सहाव्या
दिवसाच्या कार्यक्रमात रंगत आणली.


स्नेहगीत प्रस्तुत, नेहा चिपळूणकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या ‘गीतोंभरी शाम’ या कार्यक्रमाने
गणेश कला क्रीडा रंगमंचवरची संध्याकाळ खुलली. डॉ.नरेंद्र चिपळूणकर निर्मित या कार्यक्रमाचे
निवेदन सीमा घाटे यांनी केले. ‘मायभवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई सेवा मानून घे आई’
नेहा चिपळूणकर यांच्या या देवीच्या आळवणीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर आबा बागुल
यांच्या विनंतीवरून महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंतीच्या निमित्ताने, गांधीजींना उद्देशून असलेले
‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल हे गाणे सादर करण्यात आले. आणि पुढे मुसाफिर हूँ
यारो, गुलाबी आँखे जो तेरी देखी, मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू, छुप गये सारे नजारे, ए मेरा
दिल प्यार का दिवाना, हवा के साथ-साथ, खैके पान बनारसवाला, राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील
का….. आदी हिंदी मराठी गाण्यांनी सध्याकाळ उत्तरोत्तर रंगत गेली. नेहा चिपळूणकर यांच्यासह
आनंद मराठे, मंदार देशपांडे, विक्रम राव यांनी ही गाणी सादर केली. त्यांना वादनाची साथ संगत
डॉ.नरेंद्र चिपळूणकर, मिहिर भडकमकर यांनी केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.नरेंद्र चिपळूणकर म्हणाले की, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या या
कार्यक्रमात गेली वीस वर्षे आम्हाला सेवा देण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी महोत्सवाचे
अध्यक्ष आबा बागुल यांचा मी आभारी आहे. कलावंतांच्या पाठिशी आबा कायमच उभे असतात.
त्यांचा आम्हा कलावंतांना कायम आधार वाटतो.
कार्यक्रमातील कलावंतांचे सत्कार विशेष उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे नवरात्रौ
महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश
भंडारी आदी उपस्थित होते.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष
विरेंद्र किराड, सौ. किराड, उद्योगपती अतुल लुंकड, माजी शिक्षण संचालक अजित देशपांडे, झुबेर
पुनावाला, चंद्रशेखर पिंगळे, वृक्ष संवर्धन समितीचे द.स.पोळेकर, जयवंत जगताप, नंदूशेठ नगरे,
विश्वास दिघे, जयकुमार ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

मनसे’च्या रस्ते आस्थापना विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर

0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या जिल्हाध्यक्ष तथा संघटकपदी जगदीश मारुती वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र दिले. यावेळी उपाध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस योगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी मनसेचा हा विभाग सक्रियपणे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जिल्हास्तरीय नेमणूक केल्या आहेत.

खड्डे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला जाब विचारून असुविधांची कोंडी फोडण्यासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल, असे मत परुळेकर यांनी व्यक्त केले. तर पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करून दबावगट तयार केला जाईल व सदरचा अहवाल सादर करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास जगदीश वाल्हेकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपसंघटकपदी अनिल वरघडे व गणेश शेळके यांची, जुन्नर तालुका संघटकपदी दत्तात्रय खंडागळे यांची तर मावळ तालुका संघटकपदी संदीप पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे.

महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई- सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसाही मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व कृषीपंपांना नवीन वीजजोडणीसह दर्जेदार वीजपुरवठा देणाऱ्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महावितरणच्या नव्या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आज (दि. 16) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना व विद्युत वाहनांकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्स या तीन नव्या योजनांचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. श्री. प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री ना. श्री. विष्णू सावरा, सहकारमंत्री ना. श्री. सुभाष देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. श्री. गिरीश बापट, जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री ना. श्री. जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री ना. श्री. दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग राज्यमंत्री ना. श्री. प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव श्री. डी.के. जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे  राज्यातील सुमारे 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार असून उद्योगांवरील सबसीडीचा भार सुद्धा कमी होईल. मागील 4 वर्षांत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

यावेळी ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरकृषी वाहिनी योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून महावितरणच्या या तिनही योजना राज्याचा कायापालट करणाऱ्या ठरणार आहेत, असे सांगितले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्यातील आमदार, ऊर्जा सचिव श्री. अरविंद सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

कॅन्सर पीडितांना मदत करण्यासाठी एमनोरा मॉलमध्ये ५ वे बीएमसी ग्लोबल रन

0
२०,००० यूएस डॉलरची मदत राशि प्राप्त करने हा उद्येश्य
१२०० कर्मचार्यांनी घेतला चॅरिटेबल रनमध्ये भाग 
पुणे- प्रत्येक वर्षी प्रमाणे यावेळी देखील बीएमसी ग्लोबल रन अमानोरा मॉलमधून सुरु झाले आणि अमानोरा पार्क टाऊन येथे समाप्त झाले. १५ देश आणि २३ शहरांमध्ये एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. प्रशांति कैंसर केअर मिशनला समर्थन देण्यासाठी धनराशि प्राप्त करणे हा या ग्लोबल रनचा मुख्य उद्देश आहे.
या दरम्यान कर्मचारी आणि कंपनीने एकत्रितपणे  २०,००० अमेरिकन डॉलर दान केले आणि जगभरातील बीएमसी कर्मचार्यांच्या उत्फुर्त योगदानातुन ही राशि गोळा केली गेली.
या सामाजिक कार्यासाठी १२०० कर्मचार्यांनी भाग घेतला आणि स्वेच्छेने योगदान दिले’ अमानोरा मॉल’ आणि ‘अमानोरा पार्क टाऊनच्या’  या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन रनबडीजने केले होते.

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर रोजी

0

पुणे :‘तिरकस पुणेकरांनी सरळ पुणेकरांवर काढलेला दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या ८ व्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री, खा.नारायण राणे, सहकारी बँकिंग तज्ञ बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी युवराज शहा हे मान्यवरांच्या मुलाखतीतुन राजकीय फटकेबाजी करणार आहेत. ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

प्रकाशन समारंभ महावीर जैन विद्यालय पटांगण, बी एम सी सी कॉलेज शेजारी डेक्कन जिमखाना पुणे -४ येथे होणार आहे.

या वर्षीच्या अंकाचे पहिले पान बाळासाहेब उर्फ विद्याधर अनास्कर यांना समर्पित करण्यात आले आहे. पाच पुणेकरांना त्यांच्या कर्तत्वाबद्दल, योगदानाचा उल्लेख करुन ‘सन्मान’ पानावर स्थान देण्यात आले आहे.

प्रकाशन कार्यक्रमात युवराज शहा मान्यवर पाहुण्यांची खुमासदार मुलाखत घेणार आहेत

२०१७ साली पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रकाशन समारंभ झाला होता. २०१६ मध्ये दिवाळी अंकाचे वितरण पोस्टाद्वारे करणार्‍या पोस्टमन काकांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. २०१५ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या ‘पक्क्या’ पुणेकरांच्या हस्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते.

पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुणेकरांनी पुणेकरांसाठी ’दिवाळी अंक’ काढण्याची संकल्पना ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ने प्रत्यक्षात आणली. या अंकाला दरवर्षी दर्जेदार अंकांसाठी अनेक पारितोषिके मिळत असतात, अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत दक्ष अगरवाल, रिया भोसले याचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पाचगणी-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दक्ष अगरवाल याने, तर मुलींच्या गटात रिया भोसले या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगारमानांकीत दक्ष अगरवाल सहाव्या मानांकित आपला राज्य सहकारी यशराज दळवीचा 6-0, 6-3असा पराभव करून करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित फैज नस्याम याने प्रसाद इंगळेवर 6-4, 4-6, 6-2असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. आठव्या मानांकित अर्जुन गोहडने साहेब सोधीचे आव्हान 6-3, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात  महाराष्ट्राच्या रिया भोसले हिने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित आरणी येल्लूचा 6-2, 6-4असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित राधिका महाजनने श्रावणी खवळेला 6-3, 6-4असे नमवित आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 16वर्षाखालील मुले:

फैज नस्याम(महा)(1)वि.वि.प्रसाद इंगळे(महा)6-4, 4-6, 6-2;

दक्ष अगरवाल(महा)वि.वि.यशराज दळवी(महा)(6)6-0, 6-3;

आदित्य नांदल(हरियाणा)(4)वि.वि.अर्जुन चॅटर्जी(महा)6-3, 3-6, 6-0;

अर्जुन गोहड(महा)(8)वि.वि.साहेब सोधी(महा) 6-3, 4-6, 6-2;

करीम खान(महा)वि.वि.प्रणव गाडगीळ(महा) 6-1, 6-0;

सर्वेश बिरमाने(महा)(3)वि.वि.आर्यन शहा(महा)6-4, 6-0;

आयुश भट(कर्नाटक)(5)वि.वि.मानस धामणे(महा) 6-1, 4-6, 6-3;

ऋषी जलोटा(चंदीगड)(2)वि.वि.सिद्धार्थ जडली6-4, 3-6, 6-4;

16वर्षाखालील मुली:

आदिती आरे(तेलंगणा)(1)वि.वि.परी चव्हाण(महा)6-4, 7-5;

बान्ही पांचाळ(गुजरात)(7)वि.वि.जिया परेरा(महा)6-1, 6-0;

मधुरिमा सावंत(महा)वि.वि.स्वरा काटकर(महा) 6-2, 6-1;

हर्षिता बांगेरा(महा)(8)वि.वि.स्नेहा रानडे(महा) 6-3, 6-2;

रिया भोसले(महा)वि.वि.आरणी येल्लू(तेलंगणा)(5) 6-2, 6-4;

राधिका महाजन(महा)(3)वि.वि.श्रावणी खवळे(महा) 6-3, 6-4;

वैष्णवी वकीती(तेलंगणा)वि.वि.सिया देशमुख(महा) 6-1, 3-6, 7-5;

सायना देशपांडे(महा)वि.वि.सानिया मोरे(महा) 6-3, 6-1.