Home Blog Page 3061

देशभरातील ब्राह्मण संघटनांनी एकत्रित यावे -कलराज मिश्र

0
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन
पुणे : “सध्या देशभर फिरत असून, ब्राह्मण समाजाशी संवाद साधत आहे. समाजात अस्वस्थता असून, युवकवर्गासह सर्वांच्याच मनात अन्याय झाल्याची भावना आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी, तसेच हितासाठी देशभरातील ब्राह्मण संघटनानी एकत्र येत ‘वन नेशन वन ऑर्गनायझेशन’ या भावनेतून काम करावे,” असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कलराज मिश्र यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात देशभरातील ब्राह्मण संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजिले होते. यामध्ये अनेक ठराव पारित करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात २९ ऑक्टोबरपर्यंत ब्राह्मण उद्योजकांचे प्रदर्शन आयोजिले आहे. यावेळी बंगलोर येथील पंडित अरालूमल्लिगे पार्थसारथी, जम्मू येथील पंडित देवेंद्र शर्मा, हैदराबाद येथील वेणूगोपालाचार्य, बिहार येथील पंडित विनायक पांडे, बडोदा येथील शैलेशभाई मेहता यांना ‘समाजभूषण पुरस्कार’, तर सुप्रिया बडवे, नीलिमा तपस्वी व धनश्री जोग याना ‘उद्योजिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कलराज मिश्र म्हणाले, “आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राह्मण समाजातील युवक बेचैन आहे. त्याबाबत आपण विचार केला पाहिजे. महिला संघटन, युवक संघटन केले पाहिजे. ब्राह्मण समाजाला त्यागाची परंपरा आहे. संस्कृतीरक्षणासाठी ब्राह्मण समाजाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे आपण सर्व संघटनांनी एकत्र येत देशाला दिशा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “या राष्ट्रीय संमेलनात पाच प्रमुख ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये राममंदिराचा प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे. हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, काश्मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन त्यांच्या मूळ ठिकाणी केले जावे. ब्रह्मन् समाजाला आरक्षणापेक्षाही संरक्षण प्राधान्याने द्यावे आणि आरक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुनर्वमूल्यांकन होऊन त्यात कालानुरूप आवश्यक बदल करावेत.”

धरणात पाणी असूनही पाणीकपात कशासाठी ? कॉंग्रेस ने महापौरांना भेटून केला धिक्कार …

0

पुणे- यंदा पुरेसा पाऊस झाला आहे ,धरणात आवश्यक तेवढा पाणी साठा देखील झाला .पाटबंधारेला थकीत रकमेतील ६५ कोटी देखील देण्यात आले .तरीही पुणेकरांवर पाणी कपातीची तलवार का चालविण्यात येते आहे . असा सवाल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे . राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी हा पवित्रा जाहीर केला ,’ हि पाणी कपात नाही असे सांगत ,भाजप प्रत्यक्षात पाणी कपात लादत आहे असा आरोप केला तर , कॉंग्रेस पक्षानेही आज याप्रकरणी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊनच या पाणी कपातीचा धिक्कार केला ,नियोजन अभावी पाणी असूनही पुणेकरांच्या तोंडचे पाणी सणासुदीच्या दिवसात तरी पळवू नका अशी मागणी करत माजी आमदार मोहन जोशी ,नगरसेवक अविनाश बागवे ,लता राजगुरू, पीएमटी चे माजी अध्यक्ष शेखर कपोते  आदी कॉंग्रेस जणांनी महापौरांना प्रत्यक्ष भेटून टँकरची प्रतिकृती भेट देवून आपला निषेध नोंदविला .


यावेळी महापौर टिळक यांनी ,’ हि कपात नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला ,पण आपण सांगता एक आणि करता एक .. हे लवकरच सिद्ध होईल असे सांगून , पाणी कपात करू नकाच अशी मागणी मोहन जोशी यांनी केली .

सुरतच्या डायमंड किंगने दिवाळी बोनस म्हणून कर्मचार्‍यांना दिल्या 600 कार, 3 मॅनजर्सला दिल्या मर्सिडीज

0

सुरत- हिरे निर्यात करणारी कंपनी ‘हरे कृष्‍णा एक्स्पोर्ट्‍स’चे मालक सावजीभाई ढोलकिया यांनी सलग चौथ्या वर्षी कर्मचाऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. सावजीभाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 600 कार गिफ्ट केल्या आहेत. तसेच 900 कर्मचार्‍यांना फिक्सड डिपॉजिट म्हणून मोठी रक्कम दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे.गेल्या ३ वर्षात  कंपनीतील 5 हजार कर्मचार्‍यांना इन्सेंटिव्हचा लाभ मिळाला आहे. अातापर्यंत 1875 कर्मचार्‍यांना कार गिफ्ट करण्‍यात आल्या आहेत. कर्मचार्‍यांमधील कार्य कुशलता वाढविण्यासाठी सावजीभाई यांनी बंपर बोनस देण्याची परंपरा सुरु केली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याला प्रति महिना 6 हजार रुपयांचा बोनसही दिला जातो.

सुरतमधील जेम अॅण्‍ड ज्वेलरी पार्क यूनिटमध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता झालेल्या कार्यक्रमात कोर्‍या करकरीत गाड्या कर्मचार्‍यांना देण्यात आल्या. याच वेळी दिल्लीत एक दिव्यांग महिलेसह चार कर्मचार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कारची चावी देण्यात आली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सच्याच्या माध्यमातून सुरतमधील कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सुमारे 20 हजार लोक उपस्थित होते.

कंपनीचे मालिक सावजीभाई यांनी सांगितले की, यंदा स्किल इंडिया इन्सेंटिव्हमध्ये कंपनीतील 1500 कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पैकी 900 कर्मचार्‍यांना फिक्सड डिपॉजिट म्हणून मोठी रक्कम दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच 30 कोटी रुपये खर्च करून 600 कर्मचार्‍यांना दोन प्रकाराच्या कार (मारूतीची सॅलेरिओ आणि रेनॉल्डची क्विड) गिफ्ट करण्‍यात आल्या आहे. सावजीभाई यांनी यापूर्वी आपल्या कंपनीतील 1260 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली होती तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यासाठी मदत केली होती.

1875 कर्मचार्‍यांना द‍िल्या आहेत कार…
– 2014 मध्ये कंपनीने 491 कर्मचार्‍यांना कार, 503 कर्मचार्‍यांना ज्वैलरी आणि 207 कर्मचार्‍यांना 2 बीएचके फ्लॅट इन्सेंटिव्ह म्हणून देण्यात आला होता. डायमंड इंडस्ट्रीसह कार्पोरेट वर्ल्डमध्ये सावजीभाई यांची एकच चर्चा सुरु आहे. इन्सेंटिव्हवर कंपनीने 45 कोटी रुपये खर्च केले आहेत.

– 2013 मध्ये कंपनीने 70 कर्मचार्‍यांना इन्सेंटिव्ह म्हणून कार गिफ्ट केल्या होत्या. कंपनीने परफॉर्मेन्स क्रायटेरिया निर्धारित केला आहे. त्यात कर्मचार्‍यांची वर्तवणूक, कंपनीच्या विकासातील त्यांची योगदान आणि डायमंड कटिंगमधील व्हॅल्यू एडिशन या सारख्या निकषांचा त्यात समावेश आहे.

फडणवीस, गडकरींना घातल्या शिव्या; पोलिसाचं निलंबन

0

नागपूर- पाचगाव पोलीस चौकीत एका पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, पाचगाव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदर्श गाव योजनेसाठी दत्तक घेतलेलं गाव आहे. दरम्यान, या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

प्रदीप मने असं निलंबीत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गावात झालेल्या एका भांडणाची तक्रार करायला काही तरुण पाचगाव पोलीस चौकीत गेले होते. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित प्रदीप मने नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांची तक्रार लिहून घेण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली. दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सर्वांना शिव्या देणाऱ्या या पोलिसाचा प्रताप तक्रार करायला आलेल्या तरुणांनी मोबाइलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा पोलीस अजूनच भडकला, आणि त्याने अजूनच शिव्या द्यायला सुरूवात केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यावर पोलीस अधिक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीने के. एन. राधाकृष्णन यांची संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी केली नियुक्ती

0

चेन्नई,- टीव्हीएस मोटर कंपनी या जगातील प्रतिष्ठित टू-व्हीलर व थ्री-व्हीलर उत्पादकाने कंपनीचे पूर्ण वेळ संचालक या पदी आज के. एन. राधाकृष्णन यांची नियुक्ती केली. राधाकृष्णन 23 ऑक्टोबर 2018 पासून पाच वर्षे कालावधीसाठी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

त्यांनी 1986 मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (1986) म्हणून सुंदरम क्लेटॉन येथे करिअर सुरू केले आणि त्यांनी समूहामध्ये बिझनेस प्लानिंग व टीक्यूएम प्रमुख म्हणून प्रगती केली. हे पद भूषवत असताना त्यांनी प्रतिष्ठेचे डेमिंग प्राइझ जिंकण्यासाठी सुंदरम क्लेटॉनचे नेतृत्व केले. हे बक्षीस जिंकणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली. 2004 मध्ये, त्यांना टीव्हीएस मोटरचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली व 2008 मध्ये ते अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली, टीव्हीएसने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकला जाणारा टू-व्हीलर ब्रँड म्हणून स्थान मिळवले. गेली सलग तीन वर्षे, टीव्हीएस मोटरला जे. डी. पॉवरने कस्टमर सॅटिसफॅक्शन यासाठी टू-व्हीलर श्रेणीमध्ये पहिला क्रमांक दिला आहे, तसेच कंपनीच्या व्यक्तिगत उत्पादनांना गुणवत्ता व ग्राहकांची पसंती या बाबतीत श्रेणीतील आघाडीची म्हणून गौरवले आहे. कंपनीने अलीकडेच टीव्हीएस अपाचे आरआर 310 दाखल करून सुपर प्रीमिअम श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. राधाकृष्णन यांनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारांत टीव्हीएसचा विस्तार करण्यासाठी नेतृत्व केले आहे. गुणवत्तेला महत्त्व, ग्राहकांप्रती पॅशन, काटेकोर नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब यासाठी राधाकृष्णन नवाजले जातात.

या नियुक्तीविषयी, टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले,के. एन. राधाकृष्णन यांच्याकडे संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची सूत्रे देताना टीव्हीएस मोटर कंपनीला अतिशय आनंद होत आहे. गेल्या काही दशकांत, त्यांनी दर्जेदार उत्पादनांचा जागतिक उत्पादक बनण्याच्या दिशेने सुरू असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीच्या वाटचालीला योग्य आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीला लक्षणीय मैलाचे टप्पे साध्य करण्यासाठी, त्यांचा कंपनीतील प्रदीर्घ अनुभव ऑटोमोबाइल उद्योगातील प्रतिष्ठेचे स्थान मोलाचे ठरणार आहे. भविष्यात कंपनीला आणखी उंचीवर नेण्यासाठी ते कंपनीचे सक्षम नेतृत्व करतील, याची खात्री आहे.” 

के. एन. राधाकृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी), चेन्नई येथून मास्टर्स डिग्री घेतली आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), अहमदाबाद येथून मॅनेजमेंट एज्युकेशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.

दहा लाखाचे बारा लाख घ्या — ठकसेन ‘बंटी बबली ‘पोलिसांच्या जाळ्यात ..

0
ओतुर(संजोक काळदंते)-
निवडणुकीसाठी सुटे हवेत ,दहा लाख द्या …तुम्हाला बारा लाखाच्या -दोनशेच्या नोटा देतो….. असे आमिष दाखवुन त्यामध्ये बोगस नोटा देणा-या एका टोळीच्या  महिला मोहरक्याला आणी तीच्या एकुण अकरा साथीदाराना आळेफाटा पोलीसांनी बुधवारी(दि.२४)सांयकाळी जेरबंद केले.या घटनेमुळे बोगस नोटा छापुन सर्वसामान्य नागरीकांना “ठकवणा-या”चे …रॅकेट आळेफाटा पोलीसांच्या हाती लागणार..? आळेफाटा पोलीसांनी केलेल्या कामगीरीमुळे सर्वसामान्य नागरीकांमधुन कौतुक केले जात आहे.
याबाबत आधिक समजलेली माहिती अशी की….पाबळ येथील एक व्यक्तीला..निवडणुकीसाठी सुट्टे पैसे लागणार अशी कुणकुण या टोळीची म्होरक्या असणारी महिला आणी तीचा साथीदार याला लागली.त्यांनी ज्याला पैशाची निकड आहे त्याला फोन करून दहा लाख घेऊन या…तुम्हाला दहा लाख आणी त्या बदल्यात दोन लाखाच्या सर्व दोनशे रूपयांच्या नोटा उपलब्ध करून देतो असे सांगीतले .आणी झाले तसेच त्यांनी स्थानिक बॅंकेतुन दहा लाखाच्या नोटा या महिलेच्या सुपुर्द केल्या व त्याबदल्यात सर्व २००/- रूपयांच्या नोटा असणारे १२ लाखाचे बंडल बॅग मधे भरून दिल्या…
मात्र थोडा कालावधी गेल्यावर त्याची फसवणुक झाल्याची लक्षात आले..कारण बॅग मधे २०० च्या बंडल मधे सर्व दोनशेच्या नोटा खोट्या आढळुन आल्या.तर त्या बंडलच्या खाली फक्त कोरेच कागद आढळुन आले. असता याबाबत त्यांनी आळेफाटा पोलीसांना माहिती दिली.
तात्काळ आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जी.आर उगले  आणी महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती डमाले यांनी आपल्या कर्मचा-यासोबत संपुर्ण  माहितीचा तपास करून पुणे येथुन “बंट्या बबलीला “ताब्यात घेतले आहे.
यामधे वि.का.सोसायटीमधे लाखो रूपयांना चंदन लावणा-या एक सचिव व तसेच एका शासकीय बॅंकेत मॅनेजर या पदावर काम करणा-यांचा समावेश आहे.
सांयकाळी साडे सात पर्यंत त्यांची कसुन तपासणी आणी गुन्हा नोंद करण्याची प्रोसेस चालु होती.हे मात्र खरे…!

ओतूरला विजेचा धक्का बसुन तिसरीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु जिल्हा परिषद शाळेतील घटना

0
ओतूर (संजोक काळदंते)-
ओतूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नंबर दोन मधील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या कु.सिध्दी बाळासाहेब सोमवंशी (वय-९ वर्षे,रा.तांबेमळा,ओतुर,ता.जुन्नर,जि.पुणे) ही बुधवार (दि.२४)दुपारी ३:१५ वाजता या शाळेेेमध्ये असलेल्या पाणी शुध्दीकरण मशीनचे पाणी पिण्यासाठी मशीन जवळ गेली असता या विद्यार्थिनीला शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मशीनचा विजेचा धक्का बसुन दुर्दैवी मृत्यू झाला.असल्याची माहीती ठाणेअंमलदार कैलास काळे यांनी दिली.
दुपारच्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर पाण्याची बाटली भरून आणण्यासाठी मशीन जवळ सिध्दी ही गेली असता विजेचा धक्का बसुन ही दुर्दैवी घटना घडली.याबाबत मुलीचे मामा भुषण चंद्रकांत तांबे (रा.ओतुर,ता.जुन्नर)यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार के.व्ही.पाटोळे करीत आहेत.
सदर घटनास्थळी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत,गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे,केंद्रप्रमुख यश मस्करे यांनी भेट देऊन चौकशी केली.

बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला -गोविंद कुलकर्णी

0

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-२०१८’चे उद्घाटन

पुणे : “बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. आज ब्राह्मण महासंघाच्या विविध आघाड्यांमार्फत समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आर्थिक सक्षम होण्याबरोबरच संस्कार टिकवून ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धीवर ब्राह्मण समाजाने भर द्यावा,” असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पंडित वसंतराव गाडगीळ, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नानासाहेब चितळे, भाजप नेत्या शोभा उपाध्याय, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात ब्राह्मण उद्योजकांचे प्रदर्शन आयोजिले असून, त्याचेही उद्घाटन मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले.

गोविंद कुलकर्णी म्हणाले, “समाजाच्या उत्कर्षासाठी केवळ सरकारवर विसंबून राहून चालणार नाही. आपण प्रत्येकाने आपल्या परीने समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. उद्योग, महिला, वकील आणि अशा एकूण ३२ आघाड्या समाजासाठी काम करताहेत, ही आनंदाची बाब आहे. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे व समाजातील इतरांना बरोबर घेऊन समाज सदृढ होण्यासाठी योगदान द्यावे. हे करताना आपल्या मूल्यांचा, संस्कारांचा विसर पडू देऊ नये.”

पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, “तपश्चर्या, त्याग, समर्पण या जोरावर ब्राह्मण समाजाने आजवर आपली प्रगती केली आहे. अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून समाजबांधवांच्या उत्कर्ष होईल, या दृष्टीने आपले काम करावे.” मुक्ता टिळक यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेटी देऊन उद्योजकांना प्रोत्साहित केले. प्रास्ताविक उदय महा यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.

स्वदेशी कपडे, स्वदेशी फॅशनला चालना

0
खेड्यातील कारागीर आणि हातमागाला चालना देत आहे इंडिया इम्प्रीनट्स. 
पुणे-पुण्यामध्ये नुकतेच एक आगळे वेगळे आणि अनोखे दुकान उघडले आहे ज्याचे नाव आहे इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints). ह्या दुकानात वेगवेगळ्या भारतीय ब्रांडच्या संपूर्ण स्वदेशी आणि भारतीय जीवनशैलीच्या वस्तू उपलब्ध आहेत. भारतीय हातमागाला चालना देणारे आणि भारतीय कारागिरांना प्रोत्साहन आणि रोजगार देण्याचे महत्वाचे काम ह्यातून होत आहे.
येथे मिळणाऱ्या सर्व वस्तू भारतीय कारागीरांनी बनविलेल्या आणि भारतीय संस्कृतीशी ताळमेळ साधत भारतीय जीवनशैलीशी समतोल राखणाऱ्या आहेत.  यातुनच स्वदेशी कपडे, स्वदेशी फॅशन, स्वदेशी हातमाग आणि पारंपारिक भारतीय कारागीरांना देखील चालना मिळत आहे .
येथे भारतीय ब्रान्डच्या, संपूर्णपणे स्वदेशी आणि अन्यत्र कोठेही पाहावयास मिळणार नाहीत अशा अनन्यसाधारण साड्या, दुपट्टे वगैरे कपडे  आपणास पाहावयास मिळतील ज्या भारतातील दूर दूरच्या खेडेगावातील कारागिरांकडून  बनवून घेतलेल्या आहेत. काही अनन्य साधारण साड्या अशाही आहेत की ज्यावर रामायण, महाभारत, पंचतंत्र मधील काही गोष्टी हाताने रंगविलेल्या (hand painted) आहेत. साडीसाठी, दुपट्ट्यासाठी वापरले जाणारे कापड देखील हाताने विणलेले आहे. भारतीय कलेला जपणारे आणि भारतीय कारागिरांचा आदर करणारे असे हे दुकान पुण्यात प्रभात रोड, गल्ली नं ८ मध्ये दिमाखात सुरु झाले आहे.
ह्या दुकानात वेगवेगळ्या ब्रांडच्या भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तू विकायला तर आहेतच परंतु वर्षभर तेथे सतत वेगवेगळ्या कार्यशाळा देखील भरवील्या जातात जसे की “दाबू प्रिंटींग” कसे केले जाते ह्यावर कार्यशाळा, “गोमी तेनी” ह्या उत्तर कर्नाटकातील संस्कृतीतील साड्या इत्यादी प्रकारच्या कार्यशाळांना लोकांनी प्रचंड मोठा प्रतीसात दिलेला आहेच. ह्यातून लोकांना भारतीय कालेबाद्दल्चे प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रात्याक्षिके पाहायला मिळतात. अशा ह्या निरनिराळ्या कार्यशाळा वर्षभर आयोजित करण्यात येतात.
त्याच प्रमाणे इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) ह्या आगळ्या वेगळ्या भारतीय कलेवर आधारित सुरु झालेल्या दुकानात, ग्राहकांसाठी एक वेगळाच अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्नही केला गेला आहे जसे की – तेथे एक छोटीशी पुस्तकांची लायब्ररी आहे ज्यात भारतातील निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत “भारतीय कला”, “भारतीय पाककला”, “भारत अर्थशास्त्र”, “भारतिय राजकारण” अशी भारताशी संबंधित निरनिराळी पुस्तके उपलब्ध आहेत की जी इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) च्या सभासदांना तेथेच बसून वाचताही येणार आहेत. दर तिमाहीला ही पुस्तके बदलली जातात जेणेकरून सभासदांना निरनिराळ्या वीशयवरिल साहित्य वाचायला मिळते आहे.
हे दुकान  दोन स्त्रियांनी – सौ. अपर्णा मिलिंद फडके आणि सौ. केतकी आशिष अन्नछत्रे यांनी सुरु केले आहे जे महीला सशक्तिकरणाच्या दृष्टीने देखील हे दुकान खूप महत्वाचे आहे.तर या, इंडिया इम्प्रीनट्स (India Imprints) ह्या दुकानाला सकाळी १० ते सायंकाळी ७:३० ह्या वेळात भेट द्या आणि भारतीय संस्कृती, परंपरा, वारसा आणि कारागिरी जपण्यास आपलाही मौल्यवान हातभार लावा.

‘यूबीएस’चे पुण्यात दुसरे कार्यालय सुरू

0

पुणेभारतात व्यवसाय वाढ करण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करीत यूबीएस कंपनीने पुण्यात आपले दुसरे कार्यालय सुरू केले आहे. यूबीएसचे हे भारतातील चौथे कार्यालय आहे. नवे कार्यालय इऑन आयटी पार्क येथे प्रशस्त जागेत व आधुनिक वातावरणात सुरू झाले आहे. कंपनीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि आणि व्यावसाय प्रक्रियेचा विकास करण्याचे काम या ठिकाणी होणार आहे.

 भारतात दीर्घ काळासाठी व्यवसाय करण्याचे यूबीएसचे उद्दीष्ट आहे. 2017 ते 2019 या काळात येथील कर्मचाऱ्यांची संख्या 211 टक्क्यांनी वाढविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या सप्टेंबरमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची भारतातील संख्या 3 हजारांहून अधिक झाली आहे, असे यूबीएसचे भारतातील प्रमुख हेरॉल्ड एगर म्हणाले.

 यूबीएसचे पुण्यात पहिले कार्यालय 2015 मध्ये येरवडा येथे सुरू झाले. कंपनीच्या जगभरातील कामकाजाचा आढावा येथून नियमित घेण्यात येत असतो. यूबीएसची मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आणि नवी मुंबईत एेरोली येथेही कार्यालये आहेत.

 भारतात गुणवंत व बुद्धिमान युवकांची संख्या मोठी आहेयातीलच अनेक तरुण यूबीएससाठी  काम करतात.,’’ असेही एगर यांनी सांगितले.

 ‘’एेरोलीमध्ये गेल्या वर्षी कार्यालय सुरू करून डिजिटल युगात आंमचा ठसा उमटविण्याच्या उद्दीष्टाला हात घातला आहे. पुण्यातदेखील अशा काही क्षमता निर्माण करण्याचे आमचे धोरण आहे,’’ असे यूबीएसचे जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख माईक डार्गन यांनी नमूद केले

 .’’पुणे हे भारतातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारे शहर आहे. तसेच शिक्षण, तंत्रज्ञान आणि उत्पादन यांत ते जागतिक स्वरुपाचे केंद्र बनले आहे,’’ असे यूबीएसचे एशिया पॅसिफिक विभागाचे तंत्रज्ञान प्रमुख उदय ओडेद्रा यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमच्या समुहाने ठरविलेल्या धोरणानुसार, सर्वोत्तम असे बुध्दीमान कर्मचारी व अधिकारी नेमून कंपनीच्या तंत्रज्ञानात मोलाची भर घालण्यात येत आहे.

 यूबीएसच्या भारतातील कॉर्पोरेट व सामाजिक जबाबदारी (सीएसआर) योजनेची माहितीही यावेळी देण्यात आली. यूबीएस ऑप्टिमस फाऊंडेशनतर्फे राजस्थानातील मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या काही प्रकल्पांना निधी पुरविण्यात आला आहे. या फाऊंडेशनचे स्वयंसेवक स्थानिक स्वरुपाची सामाजिक कामे करीत असतात. या दोन्ही कार्यक्रमांतून भारतात मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम उभे राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 ‘’वंचित मुलांच्या शिक्षणासाठी व इतर बाबींसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटनांमध्ये जाऊन काम करण्यास आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना उद्युक्त करीत असतो. भारतातील यूबीएसच्या सर्व कार्यालयांना हा एकच सीएसआर स्वरुपाचा कार्यक्रम देऊन आम्ही तो मोठ्या प्रमाणात चालवणार आहोत. 2020 या वर्षीपर्यंत आमचे 40 टक्के कर्मचारी अशा प्रकारच्या सामाजिक कांमांमध्ये सहभागी झालेले असतील, असे आमचे उद्दीष्ट आहे,’’ असे एगर यांनी सांगितले.

सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत

0
 ‘जॅक अँड दिल’ हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन कारंडे.  सिनेमाबद्दल सचिन सांगतो की, लग्नानंतर नवरा-बायकोमधले प्रेम का कमी होते?, लग्नानंतर जबाबदाऱ्या, आपली प्राधान्य का वेगळी होतात? याचा शोध घेणारा सिनेमा म्हणजे ‘जॅक अँड दिल’. या सिनेमामध्ये अमित साध, अरबाज खान, सोनाल चौहान, एवलिन शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत.
सिनेमाच्या कथानकाबद्दल सचिन सांगतो की, “व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यांच्यामधला तोल सांभाळता आलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यावेळी लग्नानंतर नवरा पैसे कमवण्याच्या इतका मागे की त्याला बायकोसाठी एक साधा रविवार देणे ही कठीण होते अशा परिस्थितीत प्रॉब्लेम चालू होतात. मग हे असं का होतं? हाच धागा पकडून बनवलेला हा सिनेमा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या सिनेमातील जॅक म्हणजेच अमित साध हा एका डिक्टेटिव्हच्या भूमिकेत दिसणार आहे तर, तर अरबाज खान याने वालीयाची भुमिका साकारली आहे. सोनल चौहान हिने वालियाच्या बायकोची भूमिका साकारली आहे. अरबाज खान आणि सोनाल चौहान यांचे ३ वर्षापूर्वी लग्न होते आणि अरबाज त्याच्या कामामध्ये इतका व्यस्त होतो की त्याला आपल्या बायकोकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही.
मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतर त्याला आपल्या बायकोवर संशय यायला लागतो की तिचं बाहेर कुठे प्रेमप्रकरण आहे का. ती सारखी घराबाहेर का राहते ? हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतानाच त्याला अमित साध हा एक वेडा, ज्याचं कशातच लक्ष नसतं पण त्याला अशी हेरगिरी करण्याची खूप हौस असते, अशा व्यक्तीशी गाठ पडते. मग अरबाज त्याला पाच दिवसांसाठी  आपल्या पत्नीच्या मागावर पाठवतो. पण जासूसगिरी करताना दुसऱ्याच दिवशी तो पकडला जातो. पण नंतर त्याची आणि सोनलची मैत्री होते आणि पाच दिवस संपल्यानंतर अमित अरबाजकडे जातो आणि त्याला सांगतो की, तुमच्या बायकोचे प्रेमप्रकरण माझ्यासोबतच चालू आहे. असं सांगितल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घटना कशापद्धतीने वेगळी वळणं घेतात.अशी सिनेमाची कथा आहे. हा सिनेमा 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ब्राह्मणांनी यापूर्वीही देशाचं नेतृत्व केलंय, पुढेही करतील; भाजपा आमदार मेधा कुलकर्णीं

पुणे : “समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. पण ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे लक्षात येत नाही, की यापुर्वीही देशाचे नेतृत्व ब्राम्हण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल. काहीवेळा अनुनयत्व पत्करले व देशाच्या एकात्मतेला तडा जाऊ दिला नाही. संत ज्ञानेश्वरांनी दुसऱ्यासाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आपलं आयुष्य झिजवले. याचा अर्थ असा, की ब्राहमण समाज पूर्वीपासून दुसऱ्यांसाठी करत आला आहे.”असे स्पष्ट वक्तव्य आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी येथे केलं
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनीताई पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘मातृशक्तीचा जागर’ मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
“स्त्री-पुरुषांनी एकमेकांना समजून काम केले पाहिजे. आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्र निषिद्ध नाही. अभिनयासह कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा; पण त्यासोबतच मूल्ये आणि तत्वे सोडू नका. महिलांनी ‘सुपरवुमन’ बनण्याच्या मागे लागू नये,” असे प्रतिपादन यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शोभाताई फडणवीस म्हणाल्या, “महिलांमध्ये अफाट शक्ती असते. तिचा वापर आपण केला पाहिजे. समाज घडविणे आपल्या हातात असून, देशासाठी चांगली पिढी निर्माण करण्याचे काम महिला करू शकतात. निर्भीड, क्रांतिकारी, विचारी आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. सध्या शहरी नक्षलवाद, दहशतवाद हे प्रश्न सतावत आहेत. त्याला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र आले पाहिजे.”
मनीषा कायंदे म्हणाल्या, “ब्राह्मण समाजातील महिला कल्पक, बुद्धिमान आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार अनुरूप पावले टाकली पाहिजेत. ग्रामीण भागात फिरताना अनेकदा ब्राह्मण समाज उपेक्षित असल्याचे दिसते. त्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करीत समाजाला पुढे घेऊन जाण्याचा आपला उद्देश असावा. ‘मी टू’ चळवळीमुळे महिला बोलू लागल्यात. कोणत्याही समाजाची महिला  असली, तरी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.”
मुक्ता टिळक म्हणाल्या, “राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण असले, तरी अजूनही महिलांचे प्रमाण कमी आहे. सुशिक्षित महिला राजकारणात आल्या, तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वच्छ वातावरण निर्माण होईल. शिक्षणाची ओढ महिलांमध्ये आहे. त्यांना शिकू दिले पाहिजे.”

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई

0
ओतुर (संजोक काळदंते)-
 नवनवीन युक्त्या वापरुन वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तितक्याच अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ झाला असुन आळेेेेफाटा उपविभागीय कार्यालय अंतर्गत २० ग्राहकांवर कारवाईचा बडगा महावितरणने उचलला असुन यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
                आकडे टाकुन वीजचोरी या नेहमीच्या वीजचोरी पद्धती बरोबरच अलीकडच्या काळात वीजचोर विवीध क्लुप्त्या वापरुन वीजचोरी करत असल्याचे काही दिवसांपुर्वी निदर्शनास आले होते. याच पार्श्वभुमीवर महावितरणच्या आळेेेेफाटा उपविभाग अंतर्गत गेल्या आठवड्या पासुन कारवाईस प्रारंभ झाला आहे. यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे या मध्ये उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, सहा. अभियंता विशाल नाईकनवरे, श्रीशैल्य लोहारे, रोहीत गांधी, लेखाविभागाचे महेंद्र पैठणे, एम आर काळे, लक्ष्मीकांत लिंगायत, विवेक लव्हाळे, राहुल लालगुडे आदींचा समावेश आहे. या पथकाने पहिल्या टप्प्यात ओतुर शहर शाखा अंतर्गत मिटर मध्ये फेरफार करुन वीज चोरी करणाऱ्या २० ग्राहकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील ही कारवाई नियमीत सुुुुरु राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे यांनी सांगीतले. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांंचे धाबे दणाणले आहे. तर अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती सुजान नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास कळवावी असे आवाहन गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नाईकनवरे यांनी केले आहे.
वीजचोरी करणे हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहेे तसेच हा गंभीर स्वरुपाचा दंडणीय गुन्हा आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी न करता प्रामाणिकपणे व गरजेपुरता वीज वापर करावा. तसेच वीज चोरी करणाऱ्यांंविरोधात कारवाई यापुढे नियमीत सुरु राहील.
–  श्रीकांत लोथे ( उपकार्यकारी अभियंता,आळेफाटा विभाग ) 

प्रधानमंत्री आवास योजेनेला निगडे मोसे ग्रामपंचायतीचा सकारात्मक प्रतिसाद – २०० लाभार्थ्यांनी घरांसाठी भरले अर्ज

0

पुणे-प्रधानमंत्री आवास योजनेतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याला घरकुल बांधण्यास
अनुदान या घटकांची अंमलबजावणी करणेत येत असून त्याचा लाभ ८४१ गावातील लाभार्थ्यांना घेता येणार आहे.
या घटकात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान असून
घरकुल बांधकामासाठी शासकीय अनुदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल
तसेच कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाचे घर किंवा कुटुंबाच्या
मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल असे घर असणे आवश्यक आहे. यात लाभार्थ्याला ३०० चौ. मी. चटई
क्षेत्राचे घर बांधता येणार असून २.५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे यासाठी वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा
कमी असलेले लाभार्थी पात्र होणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणेसाठी मा. आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली
आवास योजनेसाठी अभियान राबविले. या अभियानाला वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निगडे मोसे यांचेवतीने
सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ग्रामपंचायत निगडे मोसे यांनी दि. २४/१०/२०१८ रोजी गावातील आर्थिक
दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याला योजना व अर्ज भरणेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते.
यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करणेत आले व तेथच पात्र लाभार्यांचे
अर्ज भरून घेण्यात आले. त्याला लाभार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून २०० लाभार्थ्यांनी सदर
घटकांतर्गत घर बांधणीसाठी अर्ज केलेले आहेत. यावेळी वेल्हे तालुक्यातील जि. प. सदस्य अमोल नलावडे, सरपंच,
सदस्य व पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेकरिता
अर्ज करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या http://pmrdapmay.com या संकेतस्थळावर
नागरिकांनी अर्ज करावा.

स्मृती इराणींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे-शबरीमला मंदीर प्रवेशावरून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी महिलाविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराची ग्रामदेवता तांबडी जोगेशवरी मंदिरा बाहेर निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण आणि शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की,महिलांविषयी भाजपच्या अनेक मंत्री आणि पदाधिकायाकडून बेताल वक्तव्य केली जात आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.ही निषेधार्थ बाब असून स्मृती इराणी यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी –
रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. देवाच्या मंदिरात जाणं आणि तिथे जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे. तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे.
महिलांना मासिक पाळी येते ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे असेही इराणी यांनी म्हटले आहे. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे एक परिषद आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी त्यांचे मत मांडले आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे मी एक केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही पण माझे व्यक्तीगत मत मी इथे व्यक्त केले आहे.