Home Blog Page 3056

‘फ्लिकर’च्या चित्रीकरणाला सुरूवात…

0

मराठीत नेहमीच वेगवेगळया विषयांवर आधारित सिनेमे बनत असल्याचं इतर चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनीही कबूल केलं आहे. विषय आणि आशयाची एकसंध मांडणी करून लिहिलेली पटकथा आणि त्याला दिलेली मनोरंजक मूल्यांची जोड या कारणांमुळे मराठी चित्रपट इतर प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत उजवा ठरतो. याशिवाय अनोख्या शीर्षकांमुळेही मराठी चित्रपट वेगळं अस्तित्व जपण्यात यशस्वी होतो. असंच एक वेगळं शीर्षक असलेल्या‘फ्लिकर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.

            निर्माते राज सरकार यांनी ‘महेक फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘फ्लिकर’ या आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपल्या कोणत्याही कार्याची सुरूवात करणारे तसेच आपल्या मातृभाषेबाबत मनात अत्यंत आपुलकीची भावना असणाNया राज सरकार यांच्या म्हणण्यानुसार मराठी सिनेमा आशय आणि विषयाच्या बाबतीत जागतिक सिनेमाच्या तोडीचा आहेच, पण त्याला आणखी ग्लॅमरची जोड देण्याचा प्रयत्न ‘फ्लिकर’च्या निमित्ताने केला जात आहे. याबाबत विस्ताराने बोलताना सरकार म्हणाले की, हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून जीवन जगण्याचा अचूक मंत्र सांगणाराही असेल. मनाला भिडणारं कथानक, कर्णमधुर संगीत,सहजसुंदर अभिनय, नेत्रदीपक सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवला जाणारा ‘फ्लिकर’ हा सिनेमा मराठी रसिकांसोबतच अमराठी प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांनाही आपलासा वाटणारा ठरेल असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला.

            ‘फ्लिकर’च्या माध्यमातून मराठी सिनेपटलावर राजवीर सरकार या नव्या ता-याचा उदय होणार आहे. हँडसम लुक, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज, लक्षवेधी अभिनयशैली असं व्यक्तीमत्त्व असणा-या राजवीरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी रसिकांवर मोहिनी घालण्याची क्षमता त्याच्या ठायी आहे. राजवीरच्या जोडीला तन्वी किशोर ही अभिनेत्री या सिनेमात चमकणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पाडावे करीत आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांच्या जादुई संगीताचा स्पर्श लाभणं हे फ्लिकरचं अहोभाग्य म्हणावं लागेल. या निमित्ताने इलायराजा यांनी प्रथमच एखाद्या मराठी सिनेमाला पूर्णपणे संगीत दिलं आहे. याशिवाय‘कोलावरी डी…’ फेम धनुषने या चित्रपटासाठी एक गाणंही गायलं आहे.

            ‘फ्लिकरमध्ये राजवीर सरकारतन्वी किशोरसयाजी शिंदेसंजय मोनेशुभांगी लाटकर,पूजा पवारअरूण कदमगौरव घाटणेकरमनिषा केकरमौसमी तोंडवकरविशाखा सुभेदार,प्रभाकर मोरेसायली जाधवप्रतिक्षा शिर्के या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच अमोल पाडावे यांनीच या सिनेमाची कथादेखील लिहिली आहे. पटकथा जय अत्रे आणि मंदार चोकर यांनी लिहिली असून संवाद समीर सामंत आणि मंदार चोकर यांचे आहेत. कॅमेरामन उदयसिंग मोहिते या सिनेमाचे छायांकन करीत असून महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदिप काे यांच्याकडे असून प्रशांत राणे या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत.    

वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका – महावितरणचे आवाहन

0

पुणे : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ असलेला कचरा जाळण्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू किंवा जाळू नका असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मुंढवा येथे वीजयंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्याने पेट घेतल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले होते. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. अशा घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘मुळशी पॅटर्न’चा खतरनाक टीजर प्रदर्शित

0

अभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीजर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ च्या पहिल्या टीजर मध्ये चित्रपटाचा आशय मांडला आहे. या टीजरला नेटकऱ्यानी डोक्यावर घेतले आहे, तर या दुसऱ्या टीजर मधून चित्रपटातील काही व्यक्तिरेखांची ओळख झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याचा आजपर्यंत कधीही न बघितलेला असा अतिशय हटके लुक बघायला मिळतो. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये,प्रविण तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टांकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा ‘मुळशी पॅटर्न’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ची गीते ‘देऊळ बंद’ ची हळवी गाणी लिहिणारे गीतकार प्रणित कुलकर्णी यांची असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे, तर छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.

अतिशय धारदार, भारदस्त संवादातून लक्ष वेधून घेणाऱ्या या टीजर मध्ये विविध गटांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करतानाच गुन्हेगारी बद्दल काही सांगू पाहणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नक्क्की काय दडले आहे? हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.

सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

0

 प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाराआगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोजसावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अनिरुध्दबाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकर यांचे प्रमुख पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावरप्रदर्शित करण्यात आले होते. वय झाले असले तरी काय… आयुष्य आनंदाने जगण्याची इच्छा मनी बाळगणारा असा हाअनिरुध्द  दाते. पण आयुष्यातील खरा आनंद म्हणजे तारुण्य मानणा-या अनिरुध्दाची तारुण्य पुन्हा एकदा उपभोगण्याचीइच्छा आणि पुन्हा यंग होण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हा अनिरुध्द दातेचा एकंदरित प्रवास म्हणजे ‘लव्ह यु जिंदगी’. अशाया हलक्या-फुलक्या, सुंदर आणि प्रेमळ चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार असतील हेजाणून घेण्याची इच्छा नक्की अनेकांची असेल.

            ‘ लव्ह यु जिंदगी’ मध्ये सचिन पिळगांवकरांसोबत आणखी एका प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याचीउत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि ही उत्सुकता लक्षात घेता  नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवे-कोरे पोस्टरप्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थनाबेहरे या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.  नवीन पोस्टरच्या माध्यमातून याचित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आला आहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेकचित्रपटांतून  वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मकप्रतिसाद दिला आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हा एकदाप्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेली कुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेचआणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन आशय आणि नवीन विषय असलेल्या ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्तानेप्रार्थना बेहरे आणि सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरीनवीन, रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

      या चित्रपटातून सचिन पिळगांवकर यांनी साकारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायलामिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा पुन्हा एकदा नटखट स्वभाव देखील पाहायला मिळणार आहे. सचिन बामगुडे निर्मित‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरलाआयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

पाणी, माती, निसर्ग जपा ! विस्थापन थांबवा ! – डॉ. राजेंद्रसिंह राणा

0
पुणे :
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘   प्रदर्शन दालनांचे   डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते , पुण्याच्या  महापौर मुक्ता टिळक उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक , जर्मनीचे  ऑलिव्हर, मालदीव चे श्रीकांत, अमेरिकेचे ललीत महाडेश्वर, संयोजक संजय यादवराव, सहसंयोजक एम. क्यू. सय्यद, किशोर धारिया यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनामध्ये खाद्यसंस्कृती,पर्यटन, बांधकाम, रोजगार, लोककला विषयक दालनांचा समावेश आहे.हा कार्यक्रम लक्ष्मी लॉन, मगरपट्टा सिटी,हडपसर येथे झाला.
‘ कोकणाचा वारसा, नैसर्गिक साधनसंपत्ती जपत  शाश्वत विकास करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करावेत.वाहून जाणारे पाणी अडवावे, जमिनीची धूप थांबवावी आणि मनुष्यबळ, बुद्धीचे विस्थापन रोखावे, त्यातून कोकणातील गावे  तीर्थक्षेत्रे व्हावीत ‘ अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘ सर्वांच्या प्रयत्नातून कोकण हे पर्यटनाचे ग्लोबल हब झाले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला पर्यटनाच्या संधी मिळतील. कोकणचे सौंदर्य देश – विदेशात पोहचवले पाहिजे.कोकणचा वारसा, दूर्ग, किल्ले जपण्यासाठी सर्वसामान्यांनी ही लक्ष दिले पाहिजे.
यावेळी वसईचे माजी महापौर राजीव पाटील, संजीवनी जोगळेकर,बाबा धुमाळ, तसेच पुण्यातील कोकणवासीयांच्या ३oo संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’..प्रदर्शित होणार ….

0

पुणे-येत्या  २१ डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’..या चित्रपटाकडे कुतूहलाने लक्ष वेधले जाते आहे . यात अनुपम खेर यांनी हुबेहूब मनमोहन सिंह साकारला आहे तर   सुजेन बर्नर्ट नावाच्या अभिनेत्रीने यूपीए अध्यक्ष  सोनिया गांधी साकारली आहे .खेर हे अत्यंत अभ्यासू आणि उत्तम अभिनेते आहेत. या सिनेमाबाबत असे सांगितले जाते कि , २००४ ते २०१४ या काळातील राजकीय घटना यामध्ये जास्त प्रमाणात आहेत .

हि फिल्म म्हणजे मनमोहन सिंह यांची बायोपिक असे म्हटले जाते.अलीकडे अनुपम खेर यांनी एफटीआय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तत्पूर्वी त्यांनी या सिनेमाबाबत 2 व्हिडीओ शेअर केले आहेत ,जेव्हा या सिनेमाचा लास्ट सीन चित्रित केला गेला  या सिनेमाचे चित्रीकरण पूर्णही झाले आहे ,खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मुळे  कुतूहल निर्माण होते आहे .पहाच हा व्हिडीओ.. जसा अनुपम खेर यांनी शेअर केला तसाच्या तसा …

पुण्याला जगातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

कात्रज-कोंढवा रस्त्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे, दि. 1 – पुणे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचे चित्र पालटण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक प्रकल्प आणले आहेत. पुण्याला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्त्याचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. हा रस्ता बनवल्यानंतर तो शहरातील सर्वांगसुंदर रस्ता म्हणून ओळखला जाईल. स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी  या रस्त्याकरिता प्रचंड संघर्ष व सातत्याने पाठपुरावा केला. त्यास महानगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम करण्यास मान्यता दिली आहे. पुणे शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. स्वारगेट मल्टीमॉडेल हब, आऊटर रिंग रोड, रस्त्यांचे जाळे, नदीसुधार प्रकल्प, कचरा नियोजन व पाणीपुरवठा यामुळे शहराची एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुणे शहरातील सर्वात मोठा व भव्य रस्ता म्हणून कात्रज-कोंढवा रस्ता तयार करण्यात येत आहे. यामुळे सातारा, सोलापूर, अहमदनगर तसेच मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. शहरातील सर्व नागरिकांचे समाधान होईल, अशा स्वरुपात रस्ता बनवला जाणार आहे.

आमदार योगेश टिळेकर यांनी रस्त्याच्या कामास मान्यता दिल्याबद्दल राज्य शासन तसेच पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील सर्वात जास्त जड वाहतूक कात्रज-कोंढवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. रस्ता पूर्ण झाल्यानंतर शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होईल.या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कात्रज-कोंढवा परिसरातील रहिवासी, शाळकरी मुले मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

रस्त्याचे वैशिष्ट्ये –

कात्रज-कोंढवा 84 मी. डीपी रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळीगाव पुणे मनपा हद्दीपर्यंत विकसित करण्यात येणार आहे. कामाचा कालावधी36 महिन्यांचा आहे. अंदाजपत्रकीय किंमत 192.44 कोटी अधिक वस्तू व सेवा कर व स्वीकृत निविदा रक्कम 149.52 कोटी अधिक वस्तू व कर इतकी आहे.  रस्त्याची एकूण लांबी 3.43 कि. मी तर रूंदी 84 मीटर आहे. या रस्त्यामुळे सातारा रोड व पुणे-सोलापूरवरील वाहतुकीत सुधारणा होणार आहे. चांदणी चौक,वारजे माळवाडी , वडगाव, कात्रज तसेच साता-य़ाकडून सोलापूर व अहमदनगरकडे जाणा-या वाहतुकीस थेट व जलद पर्याय  उपलब्ध होणार असून त्यामुळे कात्रज ते स्वारगेट व स्वारगेट ते हडपसर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. वाहतुकीच्या वेळेत व इंधनात बचत होईल. पर्यायाने, प्रदूषणात घट होईल. अपघाताचे प्रमाण कमी होईल.

ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची स्थापना

0

 

 पुणे पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र. नाव पद दुरध्वनी क्रमांक ई मेल आयडी क्रमांक
1 श्री. शिवाजी बोडखे,

पोलीस सह आयुक्त, पुणे शहर

अध्यक्ष 020-26122784 Jtcp.pune@nic.in

 

2 श्री. सुहास बावचे,

पोलीस उपआयुक्त  परिमंडळ-1 पुणे शहर

सदस्य 020-24454450 Dcpzone1.pune@nic.in

 

3 श्री. बच्चन सिंग,

पोलीस उपआयुक्त  परिमंडळ-2 पुणे शहर

सदस्य 020-26334249/387 Dcpzone2.pune@nic.in

 

4 श्री. मंगेश शिंदे,

पोलीस उपआयुक्त  परिमंडळ-3 पुणे शहर

सदस्य 020-27487777/226 Dcpzone3.pune@nic.in

 

5 श्री. प्रसाद अक्कानवरू,

पोलीस उपआयुक्त  परिमंडळ-4 पुणे शहर

सदस्य 020-26684001 Dcpzone4.pune@nic.in

 

6 श्री. प्रसाद गायकवाड,

पोलीस उपआयुक्त  परिमंडळ-5 पुणे शहर

सदस्य 9823943123  
7 श्री. एच. डी. गंधे,

प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ

सदस्य 020-25811694/25811627 ropune@mpcb.gov.in

 

 

 

सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी असे, पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा-1, पुणे शहर यांनी कळविले आहे.

वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण अनुदानासाठी पशुपालक व शेतक-यांनी अर्ज करावेत.

0

पुणेसन 2018-19 या वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये (आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरुर आणि वेल्हे) चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळ  सदृष्य परिस्थितीमध्ये सदर तालुक्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत 100 टक्के अनुदानावर पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या योजनेकरिता पुणे जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रु. 70 लक्ष इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक/शेतकरी यांच्याकडे किमान  10 गुंठे जमीन उपलब्ध आहे, तसेच सिंचनसुविधा उपलब्ध आहे त्यांना 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते (प्रती 10 गुंठे रक्कम रु 460/- च्या मर्यादेत) अनुदान अनुज्ञेय असेल.

सदर योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी 29 ऑक्टोंबर ते 12 नोव्हेंबर 2018 असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक/शेतकरी यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पुणे यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुशसंवर्धन खात्याचा टोल फ्री क्र. 18002330418 क्रमांकावर संपर्क साधावा.

नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय एकता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

0
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक‘मासाठी श्री नितीन म्हसवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक‘माच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माननीय मु‘याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी सर्वांना एकीचे बळ नेहमी श्रेष्ठच असते आणि म्हणूनच आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्यही ‘एकी हेच बळ’ असे आहे हे सांगून सर्वांनी एकोप्याने राहा असा संदेश दिला.
शाळेतील शिक्षिका सौ. प्रिया इंदुलकर यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची व गुजरात मध्ये उभारण्यात येणार्‍या स्टॅच्यू ऑङ्ग युनिटी ची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना सांगितली आजच्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला, पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवणे, भेटकार्ड, घोषवाक्य, कविता व एकतेतून किल्ले उभारणी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
शालासमिती अध्यक्ष  डॉक्टर श्री. सुनील भंंडगे , ज्येष्ठ शिक्षक सौ. तनुजा तिकोने,  श्री. धनंजय तळपे उपस्थित होते.

पुण्याच्या हेमा कोटणीस यांना २०१८ चा दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार

0
करण कोटणीस यांना दादा साहेब फाळके बेस्ट आंत्रप्रेन्योर पुरस्कार
पुण्याने मिळविले २ दादासाहेब फाळके पुरस्कार 
पुणे– पुण्यातील कल्याणीनगरच्या हेमा कोटनीस यांना नुकतेच प्रतिष्ठीत अश्या दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या बेस्ट मिसेस इंडिया (एप्रीसीएशन अॉफ द क्रिएशन) मध्ये त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आज १ नोहेंबर रोजी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे.
सतपाल महाराज (उत्तराखंडचे पर्यटन मंत्री) आणि संदीप मारवा (चित्रपट निर्माता) यांच्या  हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मान वितरणाच्या वेळी संगीतकार रफ्तार आणि अंजना ओम कश्यप(टीव्ही अॅंकर) यांच्यासह अनेक, महत्वाचे मान्यवर सेलीब्रीटीज, समाजसेवी आणि उद्योजक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना हेमा कोटनीस म्हणाल्या, “हा प्रतिष्ठीत पुरस्कार  आणि गौरव मिळणे ही माझ्यासाठी मोठी गर्वाची आणी सौभाग्याची बाब आहे. मला आनंद आहे की या यशाने  माझ्या कुटुंबाचा आणि शहराला अभिमान वाढविला आहे.  माझ्या कुटुंबाचा आणि शुभचिंतकांच्या  पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. “
याआधी हेमा कोटनीस यांना एलिट मिसेस  इंडिया 2016 ने देखील सन्मानित करण्यात आहे आहे. हेमा कोटनीस सौंदर्य जगतातील एक प्रसीद्ध नाव आहे. याचबरोबर त्या सामाजिक कर्यात देखील त्या अग्रेसर आहेत . गरजू मुलांना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास देखील त्या मदत करतात.
कोटणीस ग्रुपचे सीईओ करण कोटणीस यांना पर्यटन आणि आतिथ्य उद्योगसाठी  दादासाहेब फाळके बेस्ट अंत्रोप्रिन्युअर हा पुरस्कार मिळाला आहे .यावेळी ते उपस्थित होते. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्या कुटुंबाचा व वडिलांचा आभारी आहे त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी बहुमूल्य होता. यातुनच मला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत युवान नांदलचा अव्वल मानांकीत खेळाडूवर विजय

0
औरंगाबाद-  एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या  अव्वल मानांकीत आयुश भटचा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. 
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे  सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आयुश भटचा 3-6,6-0,6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत  अर्जुन गोहडने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पश्चिम बंगालच्या आकराव्या मानांकीत  अरुनवा मजुमदारचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत परी सिंगने तेलंगणाच्या आकराव्या मानांकीत अपूर्वा वेमुरीचा  6-1, 6-2  असा सहज पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कर्नाटकच्या सुहिता मारुरीने तामिळनाडूच्या अनन्या एसआर हीचा 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
 
दुहेरी गटात उपांच्य फेरीत मुलांच्या गटात दीप मुनीम व  आयुष भट या जोडीने अरूनवा मुजुमदार व अर्जुन गोहड  यांचा 6-2, 6-3 असा तर आयुष्मान अरजेरिया  व युवान नांदल यांनी आदित्य राठी व काहीर वारीक यांचा 4-6,7-5, 10-6 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात अपुर्वा वेमुरी व अभया वेमुरी यांनी सायना देशपांडे व ईशीता जाधव यांचा 7-5, 7-5 असा तर राधिका महाजन व अंजली राठी या जोडीने  सुर्यांशी तन्वर व मधुरीमा सावंत यांचा 6-2, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी गट उपांत्यपूर्व फेरी: मुले:  
युवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि.आयुश भट(कर्नाटक)(1)  3-6,6-0,6-4
अर्जुन गोहड(महा)(4)वि.वि.  अरुनवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(11)6-2, 6-3
दीप मुनीम(मध्यप्रदेश)(3)वि.वि.  अजय सिंग(चंदीगढ)(5)   6-2,7-6(4)
आयुष्मान अरजेरिया(मध्यप्रदेश)(2)वि.वि.  सुखप्रीत जोजे(चंदीगढ)(7) 6-4, 6-4
 
एकेरी गट उपांत्यपूर्व फेरी: मुली:   
सुहिता मारुरी(कर्नाटक) वि.वि.  अनन्या एसआर(तामिळनाडू) 6-4, 6-4
कुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि.  अभया वेमुरी(तेलंगणा)(12) 7-6(4),6-0
श्रृती अहलावत(5) वि.वि वेदा प्रापुर्ना(तेलंगणा)(4)  6-1, 6-2
परी सिंग(महा)(2)वि.वि.   अपूर्वा वेमुरी(तेलंगणा)(11) 6-1, 6-2 
 
दुहेरी गट- उपांत्य फेरी- मुले
दीप मुनीम/ आयुष भट(1) वि.वि अरूनवा मुजुमदार/अर्जुन गोहड  6-2, 6-3
आयुष्मान अरजेरिया /युवान नांदल वि.वि आदित्य राठी/काहीर वारीक 4-6,7-5, 10-6
 
दुहेरी गट- उपांत्य फेरी- मुली
अपुर्वा वेमुरी/अभया वेमुरी वि.वि सायना देशपांडे/ईशीता जाधव  7-5, 7-5
राधिका महाजन/अंजली राठी वि.वि सुर्यांशी तन्वर/मधुरीमा सावंत 6-2, 6-0 

अभियंत्यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’ शिकावे -राजेंद्र निंबाळकर

0
पुणे महापालिका अभियंता संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

पुणे : “शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. पाण्याचे वाटप, रस्त्यांचे नियोजन, देखण्या इमारती आणि इतर अनेक गोष्टींचे ते शिल्पकार असतात. मात्र, बऱ्याचदा विभागांतर्गत समन्वयाचा अभाव दिसतो. परिणामी कामांना विलंब होतो. त्यामुळे अभियंत्यांनी नवनिर्मितीबरोबरच ‘सोशल इंजिनिअरिंग’ शिकावे व अधिकारी-अभियंत्यांनी एकदिलाने काम करावे,” असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिला.

पुणे महानगर पालिका अभियंता संघातर्फे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त अभियंत्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राजेंद्र निंबाळकर बोलत होते. प्रसंगी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, सुनील कदम, शिवाजी लंके, सतीश भोसरेकर, वसंत पाटील, प्रदीप बेलदार, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, नरेंद्र वाघ, संजय पोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र निंबाळकर म्हणाले, “प्रत्येक कामात सुधारणेला वाव असतो. टीका होत राहणार आहे. त्यामुळे निराश न होता त्यात सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कामावर प्रेम असावे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’ वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आवश्यक तेथेच सल्लागाराची मदत घ्यावी. आपल्या कौशल्याचा योग्य उपयोग होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अंतर्गत संवाद गरजेचा असून, स्वतःवर विश्वास असावा.”
पराग करंदीकर म्हणाले, “नकारात्मक गोष्टीवर प्रहार करुन त्याला सकारात्मक करण्यासाठी माध्यमे प्रयत्न करत असतात. चांगल्या गोष्टींचा आपण सांगितल्या पाहिजेत. अभियंता शहराचा शिल्पकार असतो. भविष्यातील समस्या लक्षात घेऊन आपण तसे नियोजन केले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगले केले हे दाखवता आले पाहिजे. अभियंता कारकून होऊ नये, यासाठी अभियंता संघाने पुढाकार घेऊन कपॅसिटी बिल्डिंग करावी.”

सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. सिमरन पिरजादे यांनी आभार मानले.

..तर मुख्यमंत्री तुम्हीसुद्धा बेकायदा कामांच्या पाठीशी समजावे काय ? तुपे पाटलांचा सवाल (व्हिडीओ)

पुणे-महापालिका मुख्य सभेने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्याचा ठराव केलेला असताना हा ठराव धुड्कारून होत असलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात जर मुख्यमंत्री सहभागी झाले तर त्यांचा अशा बेकायदा उद्योगांना पाठींबा आहे असा अर्थ घ्यायचा काय ? असा सवाल आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पा. यांनी केला आहे .
सध्या बदनामी च्या वावटळीवातावरणात सापडलेले भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कात्रज  कोंढवा रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होतो आहे .या पार्श्वभूमीवर तुपे पाटील यांनी हा सवाल उपस्थित केला आहे ..पहा आणि ऐका नेमके तुपे पाटील काय म्हणाले आहेत …

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ माॅल पेक्षाही कमी दराने माल विक्री करणार

0

आॅनलाईन खरेदी न करण्याची घेतली सामुहीक शपथ

पुणे- आॅनलाईन खरेदी-विक्रीला टक्कर देण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने एका अभिनव उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्या सदस्य असलेल्या विक्रेत्याकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकाला माॅल पेक्षाही कमी दराने वस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी आज केली.

दिवसेंदिवस आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अनेकदा आपण एक वस्तू आॅनलाईन आॅर्डर करतो मात्र प्रत्यक्षात ग्राहकाला वेगळीच वस्तू मिळत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासाचा सामना ग्राहकांना करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांच्या प्रति बांधिलकी जपत रिटेल व्यापारी संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळ आॅनलाईन खरेदी करणार नाही अशी सामूहीक शपथ देखील रिटेल व्यापाऱ्यांनी घेतली. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष सोमाराम राठोड, सुनील गेहलोत, नवनाथ सोमसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या दुकानातून ग्राहकांनी माल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे. यासाठी एकत्र खरेदी सारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.