Home Blog Page 3038

‘ गुरुकुल विश्वपीठ ‘ तर्फे ९ डिसेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन

0
पुणे :’ गुरुकुल विश्वपीठ ‘ तर्फे  रविवार ,९ डिसेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मौलाना आझाद सभागृह ( कोरेगाव पार्क ) येथे सकाळी १0 ते ५ या वेळेत होईल, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ . अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी पत्रकाद्वारे  दिली.
ज्येष्ठ कवयित्री व ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू मोडक, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिध्देश्वर मारटकर , गुरुकुल विश्वपीठ ‘ चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी, संयोजक पल्लवी भागवत  यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सिध्देश्वर मारटकर हे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थांनीं असतील .  समारोप पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. समारोप सत्राला महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदिश मुळीक उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात उद्घाटन सत्रानंतर ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सिद्धेश्वर मारटकर हे  २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने भाकितावर प्रकाश टाकणार आहेत.
नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष , ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष ,नक्षत्र आणि ज्योतिष ,नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे या संमेलनात आयोजित करण्यात आली आहेत.
ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट,नंदकिशोर जकातदार, डॉ.मधूसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे , डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे  इत्यादी मान्यवर विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
ज्योतिष क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव प्रदान ,पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या संमेलनात होतील .

ई-बस माहितीसाठी विरोधकांचा ठिय्या

0

पुणे-

ई-बस खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येत असून वारंवार मागणी केल्यानंतरही माहिती देण्यात येत नाही. ‘पीएमपी’च्या कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयातून पळ काढत असल्याने खरेदी प्रक्रियेबाबत संशय वाढल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी ‘पीएमपी’च्या कार्यालयात ठिय्या मांडून खरेदी प्रक्रियेच्या कागदपत्रांची मागणी केली.’पीएमपी’कडून ई-बस खरेदीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात येत असून अधिकाऱ्यांवर दबाब आणण्यात येत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. ही माहिती मिळावी म्हणून शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, भय्यासाहेब जाधव आणि चाँदबी नदाफ आदींनी ‘पीएमपी’च्या कार्यालयात ठिय्या मांडला होता.

‘पीएमपी’ने २५ ई-बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या २६ जानेवारीपर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल करण्याचा चंग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. ई-बस खरेदीमुळे पीएमपीचे करोडो रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ई-बस खरेदीबाबत अनेक आक्षेप नोंदविले होते. त्या आक्षेपांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसकडून आक्षेपांची माहिती ‘पीएमपी’ने द्यावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे.

‘पीएमपी’कडून एखादी माहिती मिळावी यासाठी नगरसेवक म्हणून माहिती अधिकारात माहिती मागविण्याची वेळ येत असेल तर, सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. यामध्ये कुठलाही गोंधळ नसेल तर पारदर्शकपणे ही माहिती तत्काळ सर्वसामान्यांसाठी खुली करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने याबाबत संशयाचे धुके दाट झाले असल्याची टीका शिंदे यांनी केली. शिंदे यांनी पाठविलेल्या पत्रात ई-बस खरेदी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यामधून मोठ्या प्रमाणात ‘पीएमपी’चे नुकसान होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच, तत्कालीन अध्यक्ष मुंढे यांच्या काळात देखील ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी काढलेले आक्षेप, टिपणी तसेच या प्रक्रियेची संपूर्ण फाइलची एक प्रक तातडीने मिळावी, अशी विनंती केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या वतीने ‘युनायटी टू एन्ड व्हायोलन्स अगेन्स्ट गर्ल्स अँड वुमेन’ मोहिमेद्वारे जनजागृती’

0
पुणे :राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने “Unite To End Violence Against Girls And Women” मोहिम राबविण्यात आली. लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. म्हणूनच समाजात जागृती निर्माण करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते
 राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस पुणे शहर अध्यक्ष मनाली भिलारे व सांस्कृतिक, कला व साहित्य विभागाचे सनी मानकर यांनी हा उपक्रम राबविला.
शहरातील प्रमुख भागात कथ्थकली व ग्रुप डान्स च्या स्वरूपात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेंतर्गत युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. खासदार वंदना चव्हाण देखील या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या.
औंध, परिहार चौक, जंगली महाराज रोड, एफ.सी. रोड, डेक्कन, सारसबाग, सिंहगड रोड, कर्वेनगर, एम.आय.टी.कॉलेज, पौड़ रोड या भागांत ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मोहिमेला मिळाला.
याप्रसंगी बोलताना मनाली भिलारे म्हणाल्या ‘लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन या अत्याचारांचे स्वरूप देखील भयानक होत आहे. महिलांवरील अत्याचार हा केवळ स्त्री जातीचा प्रश्न नाही तर हा सामाजिक प्रश्न आहे म्हणूनच आपण सर्वांनी या प्रश्नावर एकत्र काम करण्याची गरज आहे.’
सनी मानकर म्हणाले ,’समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी ही मोहिम राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस आणि  सांस्कृतिक, कला व साहित्य विभाग यांनी हाती घेतली आहे .यामध्ये महिला, युवती, युवक सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.

‘अप्सरा आली’ची परीक्षक बनली सोनाली कुलकर्णी

0

झी युवा लवकरच ‘अप्सरा आली’ हा  लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.
अप्सरा आली हे ठसकेदार गाणं आणि या गाण्यातून जिने अख्ख्या महाराष्ट्राला घायाळ केलं ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिच्या मनमोहक अदा आणिसौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेली सोनाली आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
. महाराष्ट्राची अप्सरा सोनालीकुलकर्णी खुद्द ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावणार आहे. या
कार्यक्रमात स्पर्धक महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अखंड महाराष्ट्रातील टॅलेंटप्रेक्षकांना पा
हायला मिळेल, तसंच या कार्यक्रमात प्रेक्षक अनेक अदाकारा आणि त्यांच्या लावणीचा ठसका पाहू शकणार आहेत. नुक
तंच या कार्यक्रमाचा टिझर प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांचीकार्यक्रमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अप्सरा
आली हा कार्यक्रम ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.हा कार्यक्रम आणि तिच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली,’डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे आणि अप्सरा आली सारख्या डान्स रिऍलिटी शोच परीक्षण करण्याची माझ्यावर खूप
मोठीजबाबदारी आहे. महाराष्ट्रातील लोकनृत्य या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे तसंच ‘अप्सरा आली’मुळे लाव
णी नृत्याची परंपरादेखील प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे मी या कार्यक्रासाठी खूप उत्सुकआहे आणि प्रेक्षक देखील तितके
च उत्सुक असतील याची मला खात्री आहे.’

सीरत कमिटीच्यावतीने पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांचा सत्कार

0

पुणे -शहर पोलीस व सीरत कमिटी यांच्या सहकार्याने ईद ए मिलादुन्नबी निमित्त शहरात प्रथम सकाळी मिरवणूक  ” नो डी जे व लाऊडस्पिकर ”  या संकल्पनेने शांततेत काढली . या आवाहनास पोलीस बांधवांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल सीरत कमिटीच्यावतीने पुणे शहर पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांचा  शाल व पुष्पगुछ देउन सत्कार करण्यात आला  .

यावेळी पुणे शहर सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे , पोलीस उपायुक्त अशोक मोराळे , सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ , पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर , इस्माईल शेख सीरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान , सरचिटणीस रफीउद्दीन शेख , सिराज बागवान , असिफ शेख , हाफिज एजाज , वस्ताद आतिक खान , उस्मान तांबोळी , कासम शेख , लुकमान खान , हाजी नदाफ , इसहाक चावीवाले , अहमद सय्यद , अतिक मोमीन , हाफिज इद्रिस , सादिक लूकडे , आयाज शेख , नदीम मुजावर , रेहान शेख , मुख्तार शेख व मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

यंदाच्या वर्षी सीरत कमिटीच्या आवाहनाला प्रतिसाद देउन अनेक तरुणांनी व मंडळांनी डी जेचा वापर करण्याऐवजी त्यावर होणाऱ्या खर्चातून लहान मुलांना खाऊ वाटप , फळे , पाणी वाटप केले. काही तरुणांनी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केली . अल कुरेश यंग सर्कलच्यावतीने बाराशे किलो मोतीचूर लाडूवाटप केले . तसेच सफाई कामगारांना मिठाई वाटप करण्यात आले . आय टी शेख मित्र परिवाराच्यावतीने प्रथमच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले . डी  जे , महागडी सजावट यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लोकपयोगी काम करणे म्हणजेच पैगंबर यांच्या शिकवणुकीचे व संदेशाचे पालन करणे होय , असे सीरत कमिटीचे सदस्य वस्ताद आतिक खान  यांनी सांगितले . 

‘धर्म आणि नैतिक मूल्ये ‘ विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

0
आझम कॅम्पस तर्फे  २२ डिसेंबर रोजी   पुण्यात आयोजन 
पुणे :आझम कॅम्पस तर्फे ‘धर्म आणि नैतिक मूल्ये ‘ विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा  शनिवार ,२२ डिसेंबर रोजी   पुण्यात होईल .
हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट या संस्थांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे .
‘आधुनिक तंत्रज्ञान आणि धर्मातील नैतिक मूल्यांचा प्रसार  ‘,’ इस्लाम धर्मातील कष्टाचे महत्व ‘,’विविध धर्मातील नैतिक मूल्ये ‘असे विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी आहेत . मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तीन भाषांत आठवी ते दहावी ,अकरावी -बारावी ते डी . एड . ,आणि पदवी -व्यावसायिक अभ्यासक्रम  अशा तीन गटात ही स्पर्धा होईल .
प्रत्येक विषयाच्या ,प्रत्येक गटातील प्रथम स्पर्धकास १० हजार ,द्वितीय क्रमांकाशी ८ हजार आणि तृतीय क्रमांकाशी ५ हजार रुपये ,स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे ,अशी माहिती हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष झुबेर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली .
सर्व धर्मीय स्पर्धकांना सहभागी होता येईल . १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. . नाव नोंदणीसाठी संपर्क :०२०२६४५२२८८
इ मेल –hgmaetrust@gmail.com

भारत विकास परिषद तर्फे मोफत जयपूर फुट वाटप

0
पुणे-भारत विकास परिषद तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगांना मोफत जयपूर फुट प्रदान करण्यात आले.
कर्वे रोड येथील  कार्यालयात श्री.नामदेव परीट-सांगली,अविनाश गोरे-अहमदनगर,तानाजी शेंडे-अकलूज,भाऊसाहेब जैनक-सासवड,त्रिंबक जाधव-औरंगाबाद, बाबू एडके-बार्शी यांना जयपूर फुट ,दत्ताजी चितळे,नितीन अग्रवाल यांचे हस्ते मोफत वाटप करण्यात .यावेळी विनय खटावकर,जयंत जेस्ते,मधुसूदन देवधर,अजित साळुंखे तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,पुणे महानगर पश्चिम चे अध्यक्ष रघुनाथ ढोक,सुदाम धाडगे उपस्थित होते.
यावेळी नितीन अग्रवाल म्हणाले की रोजगार करण्यासाठी आमची संस्था लार्सन अँड टुबरो,पुणे तर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल तर विनय खटावकर म्हणाले की भारत विकास परिषद तर्फे आतापर्यंत आम्ही जयपूर पुट देत होतो आता हात पण देणार आहोत तरि अपंग व्यक्ती ने संपर्क साधण्याचे आव्हान करून कोणाची शिफारस व कागदपत्रांची गरज नसल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन देवधर तर आभार प्रदर्शन रघुनाथ ढोक यांनी मानले.

युरोस्कूलने केली पुण्यातील तिसऱ्या कॅम्पसची घोषणा

0

पुणे-युरोस्कूल या भारतातील 6 शहरांत कार्यरत असणाऱ्या, K-12 शाळांच्या आघाडीच्या जाळ्याने पुणे येथे युरोस्कूल वेस्ट कॅम्पस- वाकड हा नवा कॅम्पस सुरू केल्याची घोषणा केली आहे. युरोस्कूलची ही पुण्यातील तिसरी शाळा आणि देशातील 11वी शाळा असणार आहे.

“वेस्ट कॅम्पस – वाकड येथील आमची नवी शाळा म्हणजे आमच्यासाठी वाटचालीतील महत्त्वाचा मैलाचा टप्पा आहे आणि त्यामुळे भारतातील आघाडीचा शैक्षणिक ब्रँड, हे आमचे स्थान अधिक सक्षम होणार आहे,” असे युरोकिड्स इंटरनॅशनलचे सह-संस्थापक व समूह कार्यकारी अधिकारी प्रजोध राजन यांनी सांगितले. “आनंदी शिक्षण देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती व शिक्षणाची नावीन्यपूर्ण पद्धत अवलंबण्याच्या बाबतीत आम्ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वतःला शोधा या आमच्या विचारसरणीद्वारे, आम्ही बालकांना त्यांच्यातील गुणवत्ता ओळखण्यासाठी, त्यांना ऋची असलेले विषय ओळखण्यासाठी व त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी उत्तेजन देतो, जेणे करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू शोधता येतील.”

युरोस्कूलचा विशेष उपक्रम सर्वांगीण विकास करण्यासाठी व 21व्या शतकातील नागरिक घडवण्यासाठी, लॅटरल व क्रिटिकल थिंकिंग, सर्जनशील तर्कशुद्ध विचार व आवश्यक जीवनकौशल्ये यावर भर देतो. शिक्षणाप्रति सहभाग व प्रयोग यावर आधारित दृष्टिकोन यांचा विद्यार्थ्यांच्या विकासावर सकारात्मक परिणाम होतो. अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक अभ्यासक्रम शिकवतात. विद्यार्थ्यांना दररोज नवे धडे देऊन व शिक्षणाचा आनंद देऊन बालकांना घडवत असतात.

युरोस्कूल वेस्ट कॅम्पसमध्ये आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम अवलंबला जाणार आहे व ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण दिले जाणार आहे. नवा कॅम्पस 2.25 एकर क्षेत्रामध्ये साकारण्यात आला असून, त्यामध्ये अद्ययावत शैक्षणिक व शिक्षणेतर सुविधा उपलब्ध आहेत. ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षणाचा आनंद देण्यासाठी, या सुसज्ज कॅम्पसमध्ये फूटबॉल मैदान, स्विमिंग पूल, स्केटिंग रिंक, स्क्वॅश कोर्ट, 300-आसनी ऑडिटोरिअम, इन्डोअर स्पोर्ट्स अॅरेना आणि पूर्णतः सज्ज लॅब व नृत्य, संगीत व कला यासाठी अॅक्टिविटी रूम असणार आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवण्याच्या हेतूने नव्या ऑडिओव्हिज्युअल प्रणालींचा समावेश असलेल्या वर्गांमध्ये, शिक्षणाला पोषक, प्रोत्साहक व उत्साही वातावरण निर्माण करणे, हे कॅम्पसचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची बसण्याची स्थिती योग्य असेल व त्यांना आराम मिळेल, असा प्रकारे बैठक व्यवस्थेचे अर्गोनॉमिकली नियोजन केले आहे. युरोस्कूल हे भारतातील पहिले सर्टिफाइड सेफ स्कूल नेटवर्क आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला व कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच, बालकांना पोषक वातावरणात शिकता यावे व प्रगती करता यावी, या हेतूने नवा कॅम्पस युरोस्कूलच्या दमदाटी-विरोधी कठोर धोरणाचा अवलंब करणार आहे. हा कॅम्पस आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाकडेही कटाक्षाने लक्ष देणार असून, त्यासाठी स्टुडंट बॅग वेट लॉस कार्यक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या बॉडी वेटच्या केवळ 10% वजनाचे दप्तर आणता येऊ शकते.

युरोस्कूल भविष्याच्या दृष्टीने विचार करत आहे आणि विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यास मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य कौशल्ये देणार आहे. त्यांना भविष्यासाठी सज्ज केले जाणार आहे, आणि अशा प्रकारे युरोस्कूल स्कूल्स ऑफ टुमारोचा विचार करते.

युरोस्कूलविषयी

युरोस्कूल हा युरोकिड्स इंटरनॅशनल ग्रुपचा भाग आहे आणि मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद व सूरत येथे 11 K-12 शाळा चालवते.

युरोस्कूलने स्वतःला शोधा या विशेष विचाराद्वारे स्वतःचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. हा विचार, विद्यार्थ्यांना त्यांची ऋची व क्षमता शोधण्यास व ओळखण्यास मदत करण्यासाठी, युरोस्कूलच्या शिक्षण व को-करिक्युलर विकास यांचा समतोल साधणारी बॅलन्स्ड स्कूलिंग ही संकल्पना स्पष्ट करते. सर्व शाळांतील युरोस्कूल अभ्यासक्रम हे सीबीएसई/आयसीएसई बोर्डांनुसार आहेत आणि काही निवडक शाळांमध्ये केम्ब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन (आयजीसीएसई) दिले जाते. बालकांसाठी शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी व ताणमुक्त करण्यासाठी अभ्यासक्रम तयार केले आहेत. ब्यूरो व्हेरिटास या जागतिक ऑडिट फर्मकडून ‘सुरक्षित शाळा’ हे प्रमाणपत्र मिळवणारी युरोस्कूल नेटवर्क ही पहिली भारतीय शाळा आहे. यातून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत जागतिक मापदंड निर्माण करण्याची शाळेची बांधिलकी दिसून येते.

इन्कमटॅक्स अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना पकडले

0

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पकडले.
गुलटेकडी येथील बोधी टॉवर्स इमारतीत प्राप्तिकर विभागाचे कार्यालय आहे.
शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीवर असलेला कर काही प्रमाणात कमी करायचा होता. याबाबत त्याने प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. कर कमी करून देणे तसेच बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करण्यासाठी प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याने त्याच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
मंगळवारी रात्री बोधी टॉवर्स इमारतीतील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सापळा लावून अधिकाऱ्याला पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बांधकाम परवाने मंजुरीसाठी लाच – एजंटला अटक

0

पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते असे सांगून ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून पकडले. सुवेद शिवराम दुडये (वय ३२, रा. गंगाधाम, गोकुळनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. बिबवेवाडीतील ढेरे असोसिएटस येथे तो कामाला आहे.

याबाबतची माहिती अशी, महापालिकेचे अधिकारी बांधकाम परवानग्या व नकाशे मंजूर करण्यासाठी स्वत: लाच न स्वीकारताना एजंटामार्फत पैसे घेत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. तक्रारदार यांचे कोंढव्यातील टिळेकरनगर येथील जागेवर बांधकाम परवानगी व नकाशा मंजूर करण्यासाठी त्यांनी ढेरे असोशिएसमध्ये नोकरी असणारे सुवेद दुडये यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.

दुडये यांनी मंजुरीसाठी महापालिका अधिकाऱ्यांना ३० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी केल्यावर दुडये हे महापालिका अधिकाऱ्यांसाठीच लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी ढेरे असोसिएटस येथे उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, कांचन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना दुडये याला पकडण्यात आले.

अच्छे दिन नकाे पुर्वीचे सच्चे दिन हवेत : प्रियंका चतुर्वेदी

पुणे : काॅंग्रेसने देशासाठी त्याग करणारे चार गांधी दिले. त्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा समावेश होतो. भाजपने मात्र देशाला तीन मोदी दिले आहेत. त्यामध्ये ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदींचा समावेश आहे. माेदींनी साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे अशी स्थिती राममंदिराबाबत अाणि राफेल की किमत नही बताएेंगे अशी परिस्थीती राफेल विमानाबाबत असल्याचे मत काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. तसेच अाम्हाला अच्छे दिन नकाे तर पुर्वीचे सच्चे दिन हवे अाहेत असेही त्या ठणकावून म्हणाल्या.  

    काॅंग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास त्या येथे आल्या होत्या.. काॅंग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्याच्या विकासात काॅंग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी  कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते. 

    चतुर्वेदी म्हणाल्या, भाजप सरकारकडे त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाची नोंद नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरमध्ये या सरकारविरोधी रोष आहे. सन १९८० पासून धर्म आणि जातीमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करीत आहे. त्यागाच्या नावावर राजनैतिक पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. अटलबिहारी वाजपेयी एका कार्यकाळापुरतचे प्रधानमंत्री होते. ती वेळ भाजपावर पुन्हा येणार असून नरेंद्र मोदी सरकारचा देखील सत्तापालट होणार आहे. देवाला जाती-धर्मामध्ये विभागण्याचे काम त्यांनी केले आहे. सबका साथ सबका विकास ऐवजी कुछ का साथ कुछ का विकास याप्रमाणे हे सरकार काम करीत आहे. सुटा-बुटातील त्यांच्या मित्रांचाच फायदा करुन दिला जात आहे. 

15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आयडीयाज्‌ अ सास कंपनी, इन्फोसीस संघांची विजयी सलामी

0
पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2018-19 स्पर्धेत आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने कॅपजेमिनि संघाचा तर इन्फोसीस संघाने सनगार्ड संघाचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात परेश दहिवालच्या जलद 60 धावांच्या बळावर आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने कॅपजेमिनि संघाचा 8 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना परेश दहिवालच्या केवळ 36 चेंडूत  60 धावांच्या बळावर  आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने 20षटकात 7 बाद 178 धावा केल्या. श्रीकांत जयरामनने 23, प्रसाद कुंटेने 21 व अरूण सिंगने 25 धावा करून परेशला सुरेख साथ दिली. 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमोल चौधरीच्या अचूक गोलंदाजीने कॅपजेमिनि संघाचा डाव 20 षटकात 7 बाद 170 धावांत रोखला. यात संकेत देशपांडेने 45 धावा करून संघाचा डावाला आकार दिला. 60 धावा करणारा  परेश दहिवाल सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत प्रभज्योत मल्होत्राच्या 79 धावांच्या बळावर इन्फोसीस संघाने सनगार्ड संघाचा 85 धावांनी पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसीस संघाने 20 षटकात 6 बाद 192 धावांचा डोंगर रचला. प्रभज्योत मल्होत्राने 46 चेंडूत 79 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. संजय पुरोहीतने 34 चेंडूत 47 धावा करून प्रभज्योतला सुरेख साथ दिली. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रवी थापलीयार व सागर दुबे यांच्या आक्रमक गोलंदाजूपुढे सनगार्ड संघ 19.2 षटकात सर्वबाद 107 धावांत गारद झाला. प्रभज्योत मल्होत्रा सामनावीर ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज्‌ अ सास कंपनीचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज्‌ अ सास कंपनीचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज्‌ अ सास कंपनीच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

आयडीयाज्‌ अ सास कंपनी – 20षटकात 7 बाद 178 धावा(परेश दहिवाल 60(36), श्रीकांत जयरामन 23(20), प्रसाद कुंटे 21(15), अरूण सिंग 25(20), विक्रांत बांगर 3-32) वि. वि कॅपजेमिनि- 20 षटकात 7 बाद 170 धावा(संकेत देशपांडे 45(33), फनिंद्र पायला 21(27), अंकुश महासाहेब 40(23), अमोल चौधरी 3-27) सामनावीर- परेश दहिवाल
आयडीयाज्‌ अ सास कंपनी संघाने 8 धावांनी सामना जिंकला
इन्फोसीस- 20 षटकात 6 बाद 192 धावा(प्रभज्योत मल्होत्रा 79(46), संजय पुरोहीत 47(34), मेहबुब शोख 23(17), थॉमसन शोरॉन 24(12), सुमित चोपडे 2-28, पवन आनंद 2-33) वि.वि सनगार्ड- 19.2 षटकात सर्वबाद 107 धावा(पार्थ शर्मा 47(29), रवी थापलीयार 4-11, सागर दुबे 3-26) सामनावीर- प्रभज्योत मल्होत्रा
इन्फोसीस संघाने 85 धावांनी सामना जिंकला.

सिडनी आणि मेलबर्नच्या डेस्टिनेशनवर व्हिडीयो पॅलेसची ‘झिलमिल’

0
बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचे वेड लावणार-या व्हिडीयो पॅलेसने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक नवीन म्युझिक व्हिडीयो प्रेक्षकांसाठी आणण्याचा बेत आखला आहे. सेलिब्रेशन उत्साहाने झाले पाहिजे या हेतूने व्हिडीयो पॅलेसचा आगामी म्युझिक व्हिडीयो ‘झिलमिल’चे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे.
व्हिडोयो पॅलेस त्यांच्या प्रत्येक म्युझिक व्हिडीयोमधून हटके, इंटरेस्टिंग आणि रॉकिंग देण्याचा प्रयत्न करतात. मग ते गायक असो, कलाकारांची जोडी असो किंवा लोकेशन्स… पण व्हिडीयो पॅलेसने प्रत्येकवेळी काहीतरी नवीन प्रेझेंट करावं हा त्यांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ‘बेखबर कशी तू’ या गाण्याला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिल्यावर, प्रेक्षकांसाठी आणखी एक खास भेट म्हणून ‘झिलमिल’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिलमिल’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन्स. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे शूट झाले आहे.  हल्ली मराठी चित्रपट, गाणी यांचे शूटिंग परदेशात होऊ लागल्यामुळे प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या वातावरणाने आणि सुंदर देखाव्यामुळे अनेकांना भुरळ पाडणा-या या लोकेशन्सवर या गाण्याचे शूट झाले असून या गाण्याच्या टीझर पोस्टरवर दिसणारा अभिनेता नेमका कोण आहे, असा प्रश्न अनेकांना नक्की पडला असेल. तसेच ‘गेट ऑन दि बीट’ हे कॅप्शन असे सुचविते की हे डांसिंग नंबर आहे जे प्रेक्षकांना आपल्या बीटवर थिरकायला भाग पाडतील.
आता फक्त काही दिवसांचा अवधी, मग सेलिब्रेशनच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘झिलमिल’. तोपर्यंत ओळखा पाहू सिडनी आणि मेलबर्नच्या लोकेशन्सवर कोणता अभिनेता करणार आहे डांसिंग नंबरच्या बीटवर ‘झिलमिल’.

 

अमर्यादित मजामस्ती आणि उत्पादनक्षमतेचा लाभ घ्या गॅलेक्सी नोट ९ वर एक टीबी खास ऑफरसह

0

गुरुग्राम – भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड मानल्या गेलेल्या सॅमसंगने आज आपल्या नोट- गॅलेक्सी नोट ९ वर खास ऑफर जाहीर केली आहे. गॅलेक्सी नोट ९ ५१२ जीबी व्हेरिएंटची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल १२,९०० रुपयांचे ५१२ जीबीचे मेमरी कार्ड केवळ ४९९९ रुपयांत मिळणार असून यामुळे ज्यांना सर्व काही घ्यायला आवडतं त्यांच्यासाठी ही ऑफर पर्वणी ठरणार आहे. ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे.

 गॅलेक्सी नोट९ १२८ जीबी आणि ५१२ जीबी अशा दोन इंटर्नल स्टोअरेज पर्यायांत उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्ड घालण्याच्या क्षमतेमुळे गॅलेक्सी नोट ९ चे ५१२ जीबी व्हेरिएंट १ टीबीसाठी सज्ज आहे व याचाच अर्थ ग्राहकांना त्यांचे आवडीचे फोटो, व्हिडिओ आणि अप्ससाठी भरपूर जागा असल्याचा दिलासा अनुभवता येईल. आता तुम्हाला जास्तीत जास्त स्टोअर करता येईल णि कमीत कमी डिलीट करायची गरज पडेल.

 या ऑफरच्या आकर्षकतेमध्ये भर घालण्यासाठी सॅमसंगने सोशल मीडियावर पाच डिसेंबरपासून १ टीबी चॅलेंज सुरू करायचे ठरवले असून त्यामध्ये देशभरातील लोकांना २०८ मधील त्यांच्या आठवणी व्हॉट्स अपद्वारे शेअर करता येतील व ती भाग्यवान विजेत्यांना गॅलेक्सी नोट ९ १ टीबी रेडी उपकरण दिले जाईल.

 गॅलेक्सी नोट ९ हा अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना त्यांच्या स्मार्टफोनकडून बरंच काही हवं आहे, म्हणजे त्यांना त्यांचं काम आणि मजा असं दोन्ही अनुभवायचं आहे. १ टीबी स्टोअरेज व त्याला दिलेली ४००० एमएएचची बॅटपी यांमुळे गॅलेक्सी नोट ९ प्रवासी, फोटोग्राफर्स, व्यावसियाक आणि मनोरंजनप्रेमींसाठी आदर्श आहे. अतिशय सामर्थ्यवान अशा गॅलेक्सी नोट ९ मध्ये तब्बल पाच लाख इमेजेस, २,५०,००० गाणी किंवा ५०० सिनेमे मावतात. इतक्या स्टोअरेज क्षमतेसह ग्राहकांना आता त्यांच्या आवडीचा कोणताही कंटेंट डिलीट न करता आपल्या सामर्थ्यवान आणि १ टीबी रेडी नोट ९ सह प्रत्येक नव्या क्षणाचे फोटो काढता येतील, प्रेझेंटेशन करता येईल.

 गॅलेक्सी नोट ९ हा सर्व काही हवं असणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सार्थ कामगिरी करणारा आहे. १ टीबी रेडी गॅलेक्सी नोट ९ सह आम्ही ग्राहकांना अर्थपूर्ण नाविन्य आणि असामान्य कामगिरी करणारी उपकरणे देण्याचे आमचे तत्व परत एकदा पाळले आहे. ग्राहकांना आता त्यांच्या फोनवरून काय डिलीट करायचे याची काळजी करायची गरज नाही आणि त्यांना त्यांची कामगिरी व कल्पनाशक्ती उंचावणं सहज शक्य होईल,असे आदित्य बब्बर, मोबाइल व्यवसाय, सॅमसंग इंडिया म्हणाले.

 गॅलेक्सी नोट सीरीज ही सॅमसंगची क्रांतीकारी उत्पादने लाँच करणारी म्हणून ओळखली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेला गॅलेक्सी नोट ९ याच वारशासह तयार करण्यात आलेला प्रीमियम स्मार्टफोन आहे जो रिमोट कंट्रोलप्रमाणे कामगिरी करणाऱ्या, प्रेझेंटेशन दरम्यान सहजपणे स्लाइड्स बदलू देणाऱ्या, सॅमसंगच्या आतापर्यंतच्या सर्वात बुद्धीमान कॅमेऱ्यासह फोटो घेणाऱ्या आणि पीसीप्रमाणे अनुभव देणाऱ्या नव्या एस पेनसह असामान्य कामगिरी करतो. 

 गॅलेक्सी नोट ९ हे पीसीप्रमाणे अनुभव देणारे इंजिन आहे जे सहजपणे कुठेही नेता येणाऱ्या एचडीएमआय अडॅप्टर्ससह टीव्ही किंवा मॉनिटरला जोडता येते. सॅमसंग डेक्सची कार्यक्षमता ग्राहकांना प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी व ते देण्यासाठी, फोटोज एडिट करण्यासाठी, आपले फोटो मोठ्या स्क्रीनवर पाहाण्यासाठी मदत ग्राहकांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मदत करते.

 गॅलेक्सी नोट ९ ला नोटवर आतापर्यंत उपलब्ध करण्यात आलेला सर्वात मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ६.४ इंची क्यूएचडी + सुपर अमोल्ड इन्फिनिटी डिस्प्ले मल्टीमीडियाचा अनोखा अनुभव देते. एकेजीने ट्यून केलेले स्टिरिओ स्पीकर्स डॉल्बी अटमॉस अनुभव देतात ज्यामुळे मनोरंजनाचा असीम अनुभव घेता येतो.

 १ टीबी खास ऑफर

गॅलेक्सी नोट ९ ५१२ जीबी व्हेरिएंट खरेदी करणारे ग्राहक २२,९०० रुपयांचे सॅमसंग ईव्हीओ प्लस ५१२ जीबी मेमरी कार्ड १७,९०० रुपयांच्या सवलतीनंतर ४९९९ रुपयांत खरेदी करण्यासाठी पात्र ठरतील. सॅमसंगचा सर्वात नवा ईव्हीओ प्लस ५१२ जीबी मायक्रो एसडी कार्ड सर्वोत्तम अनुभव देणारा, सर्वोत्तम कम्पॅटिबिलिटी आणि दीर्घकालीन विश्वासार्हता असणारा, ग्राहकाला असामान्य कामगिरी व सोयीस्करपणा आहे. ग्राहकांना यात २४ तासांपर्यंतचे ४ के यूएचडी व्हीडिओ किंवा ७८ तासांचे पूर्ण एचडीओ व्हीडिओ रेकॉर्ड करता येतात व पर्यायाने मेमरी संपण्याची काळजी न करता जग अनुभवता येते. नवे मायक्रो एसडी कार्ड लिहिण्या- वाचण्याचा १०० एमबी आणि ९० एमबीपर्यंतचा वेग देते. त्याला ४- प्रुफ तंत्रज्ञानाची जोड देण्यात आल्यामुळे ते पाणी, चुंबक, क्ष- किरण आणि तापमान प्रतिरोधक आहे.

 गॅलेक्सी नोट ९ ५१२ जीबी हा निवडक दालनांमध्ये आणि ई- कॉमर्स स्थळांवर मिडनाइट ब्लॅक, ओशन ब्लू आणि मेटॅलिक कॉपर रंगांत ८४,९०० रुपयांत उपलब्ध आहे.

 सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि. आपल्या परिवर्तन घडवू शकणाऱ्या संकल्पना आणि तंत्रज्ञानांच्या मदतीने जगाला प्रेरणा देते व त्याचे रूपही बदलते. कंपनी टीव्ही, स्मार्टफोन्स, वेअरेबल उपकरणे, कॅमेरे, वैद्कीय उपकरणे, नेटवर्क यंत्रणा, सेमीकंडक्टर आणि एलईडी सोल्यूशन्स या क्षेत्रांतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे.

शिवाजीनगर गावठाण राजे शिवाजी क्लाइंबींग वॉल च्या खेळाडूंची थायलंड येथील स्पर्धेसाठी निवड

0

पुणे-स्पोर्ट क्लाइंबींग या खेळाचा समावेश नुकताच जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत
होता तसेच हा खेळ २०२० च्या ऑलिंपिक मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा
साहसी खेळांमधील एकमेव ऑलिंपिक क्रीडा प्रकार असून जगभरात खूप लोकप्रिय आहे.
पिंपरी चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशन व श्री शिवाजी व्यायाम मंडळ संचालित राजे
शिवाजी क्लाइंबींग वॉल या ठिकाणी सराव करीत असलेल्या ५ मुली व २ मुलांची
निवड थायलंड मधे बँकॉक येथे दिनांक ७ डिसेंबर २०१८ ते दिनांक ९ डिसेंबर २०१८ या
कालावधीमधी होणाय्रा K CHAMPIONSHIP या आशियायी स्पर्धेसाठी निवड झाली
आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
मुली
१. सानिया शेख – Youth C
२. निर्मयी नेवे – Youth C
३. दीक्षा बोडके – Youth C
४. अनन्या अनभुले – Youth D
५. सई पुणेकर – Youth C
मुले
१. अर्णव खानझोडे – Youth D
२. अधिराज मगर – Youth D

International Federation of Sport Climbing (IFSC) च्या आशियाई संघटनेने भरविलेल्या
यास्पर्धेत चीन, जपान, कोरिया, आदी देशातील मातब्बर खेळाडू भाग घेणार आहेत. हि
स्पर्धा Youth C, Youth D अशा दोन वयोगटात मुले आणि मुली अशी खेळवली जाणार
आहे. या खेळांडूच्या प्रशिक्षणाची जबाबदारी अमोल जोगदंड, इरफान शेख तसेच मान्तु
मंत्री या प्रशिक्षकांनी समर्थपणे पेलली आहे.
शिवाजीनगर गावठाण येथील पुणे म न पा च्या स्थायी समिती चे माजी अध्यक्ष श्री
बाळासाहेब बोडके, सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन मुळीक तसेच श्री शिवाजी व्यायाम
मंडळाचे श्री प्रभाकर दुर्गे, पिंपरी चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशन चे श्री सुरेंद्र
शेळके, आंतरराष्ट्रीय पंच श्री श्रीकृष्ण कडूसकर, यांनी सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी
शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडू पदक पटकावून भारताचे व पुण्याचे नाव मोठे करतील
असा विश्वास व्यक्त केला.
सदर संघ दिनांक ५ डिसेंबर २०१८ ला बँकॉक, थायलंड ला या स्पर्धेसाठी रवाना होणार
आहे.