पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए)कडून पायाभूत सोई-सुविधा
निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या
अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-
लिलाव (E-auction) पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खाजगी विकसकांना देण्यासाठी
पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे.
या ई-लिलाव प्रक्रियेद्वारे माण, बावधन बुद्रूक, अशा २ गावामधील एकूण ४ सुविधा भूखंडाची लिलाव
प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी बावधन बुद्रूक मधील २ सुविधा भूखंडास कमी निविदा प्राप्त झाल्यामुळे सदर
प्रक्रियेस द्वितीय मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय (Permission Uses) वापरासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे सदरच्या गावामध्ये शाळा, दवाखाने, क्रीडांगण, व्यायामशाळा,
पोस्ट कार्यालय, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर सुविधा निर्माण करणेसाठी
जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
ई-लिलाव पद्धतीत समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या वेबसाईट
https://pmrda.auctiontiger.net वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर वेबसाईटवर निविदाधारक
यांच्यासाठी दि.07 डिसेंबर २०१८ पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व
सदरच्या निविदा सादर करण्यास दि. 17 डिसेंबर २०१८ पर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत
देण्यात आलेली आहे. सदर निविदेची ई-लिलाव प्रक्रिया (Live e-Auction) दि. २6 डिसेंबर २०१८ रोजी
सकाळी ११:०० ते सायकाळी ५:०० वा. पर्यंत करण्यात येणार आहे. तरी
https:pmrda.auctiontiger.net या वेबसाईट द्वारे ई-लिलाव पद्धतीमध्ये समाविष्ट भूखंडाची किंमत व
इतर सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
उपरोक्त नमूद सुविधा भूखंड अनुज्ञेय (Permission Uses)वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या
भाडेपट्ट्याने दिले जातील. सदर सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास
मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. सदर ई-लिलावामध्ये सहभागी होण्याचे
आवाहन महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.
पीएमआरडीएकडून सुविधा भूखंडाच्या ई-लिलाव प्रक्रियेला १० दिवसांची मुदत वाढ
थंडीपासून रक्षणासाठी बेघरांना ब्लँकेट्सचे वाटप..
अरिहंत ग्रुपतर्फे शहरातील विविध भागात ब्लँकेट्सचे वाटप
पुणे : शहरातील तापमानाचा पारा खाली उतरला तशी थंडी वाढू लागली. शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पदपथावर झोपणाऱ्या बेघरांना थंडीमध्ये उबदार ब्लँकेट्सचे वाटप अरिहंत ग्रुपच्या वतीने करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून अरिहंत ग्रुपतर्फे शहरातील बेघर लोकांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे व ब्लँकेट्चे वाटप केले जाते.
अरिहंत ग्रुपमध्ये लहान मुलेही सदस्य आहेत. नवीन पिढीत सामाजिक जाणिव वाढण्याच्या दृष्टीकोनातून लहान मुलांना अशाप्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी करुन घेतले जाते. पालकांसमवेत मुले या उपक्रमात सहभागी झाली होती. पुण्यातील मार्केटयार्ड, स्वारगेट, ससून, रेल्वे स्टेशन, पुणे कॅम्प आदी परिसरातील बेघर नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात अरिहंत ग्रुपचे संस्थापक अभय जैन, सहसंस्थापक निलेश नहार व सिद्धार्थ कटारिया, यश राठोड, तन्मय मेहता, तनय मेहता, विशाल जैन, वर्षा सोळंकी, जया ओसवाल, अंजना भंडारी, अंजना सोळंकी, आकाश निबजिया, ऋषभ गांधी, साहिल देसर्डा ,अरिहंतच्या ग्रुपचे सर्व लहान मुले आणि पालक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उघड्यावर नागरिक झोपलेले आढळून आल्यास कृपया त्याठिकाणचे लोकेशन आणि फोटो 9850600511 या व्हाट्सअप नंबरवर पाठविल्यास पुढील २४ तासात त्याठिकाणी आम्ही पोहचून गरजुंना सहाय्य करणार आहोत, असे अरिहंत ग्रुपचे अभय जैन व सिद्धार्थ कटारिया यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी पाटील इस्टेट याठिकाणी भीषण आग लागली होती. त्या ठिकाणच्या बाधित गरजू नागरिकांना देखील ब्लँकेट्सचे वाटप केले होते. ससून हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी बाहेरील गावावरून येणाऱ्या गरजू लोकांना देखील अरिहंत ग्रुप ने सहकार्य केले आहे.
राजमाता जिजाऊ संघ आणि सुवर्णयुग संघाने मिळवले एकतर्फी विजय
पुणे- – अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या नामदार राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघ आणि सुवर्णयुग संघाने आज शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत एकतर्फी विजय मिळवले . पुरुष गटात मात्र पुण्याच्या सतेज संघ व महाराष्ट्र संघाला पराभव स्वीकारावा लागला .
महिलांच्या अ गटात राजमाता जिजाऊ संघाने पालघर येथील कुर्लाई क्रीडा संघाचा ४९ — ३२ असा पराभव केला . मानसी सावंत आणि स्नेहल शिंदे यांनी राजमाता जिजाऊ संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला . दोघीनी आज आपल्या खेळाचे चांगले दर्शन घडवत चान्गल्या चढाई केल्या.. तर कुर्लाई संघाच्या फरहान शेख हिने उत्कृष्ट खेळ केला.
ब गटात सुवर्णयुग मंडळ , पुणे या संघाने मातृभूमी संघ, पुणे यांचा ५०-१८ असा पराभव केला . ऐश्वर्या काळे हिने सुवर्णयुगसाठी उत्कृष्ट खेळ केला . तर श्रीजना योगी हिने मातृभूमी संघाकडून चांगली कामगिरी केली .
पुरुष गटात ब गटात ओम क्रीडा मंडळ, ठाणे यांनी महाराष्ट्र क्रीडा मंडळ, पुणे ४९-२४ अशी मात केली . ओम क्रीडा मंडळाकडून अभिजित पाटील आणि प्रशांत जाधव यांनी उत्कृष्ट चढाई व पकडी केल्या तर महाराष्ट्र मंडळाकडून अमरजित चव्हाण आणि अमोल सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला .
ब गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर येथील शाहूपूर सडोली संघाने पुण्याच्या बलाढ्य सतेज संघाचा २४-१७ असा पराभव केला . शाहुपूर सडोली संघाकडून अक्षय पाटील व अमित पाटील यांनी चांगला खेळ केला . तर , आत्माराम कदम आणि निलेश काळभरे यांनी चांगला खेळ करीत खेळात चुरस निर्माण केली . परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाही .
12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना!
कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 चित्रकार व शिल्पकार त्यांच्या कलाकृतीतून शुभेच्छा देऊन मानवंदना देणार आहेत. तसेच, या कलाकृतींच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांतील 50 टक्के रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती चित्रकार श्रीकांत कदम, चित्रकार प्रा. सतीश काळे व अक्षय शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांनी आज पत्रकार परिषेदत दिली.
शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशनच्या यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (12 डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार असून, कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती 14 डिसेंबरपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 10 व 11 डिसेंबर रोजी हे कलाकार बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची कलाकृती साकारणार आहेत. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान या कलाकृतींचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
या उपक्रमासाठी श्रीकांत कदम, प्रा. सतीश काळे, तुकाराम जाधव, बाळासाहेब अभंग, प्रा. संतोष शिर्के, जितेंद्र सुतार, प्रशांत बंगाळ, सयाजी वाघमारे, दीपक वानखेडे, प्रा. मंगेश शिंदे, राम खरटमल व बापुसाहेब झांजे हे कलाकार त्यांची कलाकृती साकारणार आहेत.
शरद पवार हे भारतीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण व ग्रामीण तसेच शहर विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य व सर्वांनाच आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. याच कारणास्तव त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हे कलाकार त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत.
क्षयरोग निर्मुलनासाठी रुग्णकेंद्री दृष्टिकोन- डॉ. पद्मजा जोगेवार
पुणे : “महाराष्ट्रात दरवर्षी एक लाख 90 हजार क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांत एक लाख 30 हजार, तर खासगी रुग्णालयांत 60 हजार रुग्णांची नोंद होते. राष्ट्रीय धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून (एनएसपी) शासनातर्फे 2025 पर्यंत क्षयरोग निर्मुलनासाठी क्रांतीकारी उपाययोजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी रुग्णकेंद्री दृष्टिकोन ठेवून मदत यंत्रणा (सपोर्ट सिस्टम) तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे रुग्णांवर नियमित उपचार आणि खर्च कमी होण्यास मदत होईल,” अशी माहिती राज्य आरोग्य विभागाच्या (टीबी) सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली.
राज्य क्षयरोग कार्यालय आणि ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत डॉ. पद्मजा जोगेवार बोलत होत्या. नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यशाळेत त्यांनी ‘क्षयरोग निर्मुलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक नियोजन : महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि उपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. तुषार सहस्त्रबुद्धे, ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिजच्या दिव्या वैद्यनाथन आदी उपस्थित होते.
डॉ. पद्मजा जोगेवार म्हणाल्या, “भारतातील अनेक राज्यांनी क्षयरोग रुग्णांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. या रुग्णांना पोषक अन्न पुरवणे, रुग्णांचा पाठपुरावा व समुपदेशन, अन्य योजनांशी जोडून घेणे, रोख रकमेचे हस्तांतरण आणि प्रचार समूह तयार करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. मानसिक व सामाजिक समस्यांचे व्यवस्थापन हेदेखील यामध्ये महत्वाचे आहे. शासकीय पातळीवर गावांगावांतून क्षयरोगाविषयी जागृती अभियान राबवले जात असून, त्यासाठी रुग्णांनी संकोच न बाळगता योग्य उपचार घ्यावेत. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येत असेल, तर त्वरीत शासकीय अथवा खासगी दवाखान्यात जावून तपासणी करावी. यामध्ये आता अलिकडच्या काळात खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना जोडून घेतले जात आहे.”
डॉ. तुषार सहस्त्रबुद्धे म्हणाले, “क्षयरोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनाही त्याच्या नोंदी करताना संपूर्ण माहिती नसते. परिणामी, क्षयरोग असलेल्या रुग्णांवर उपचार करताना अडचणी येतात. क्षयरोगासाठी आवश्यक उपचार दिले जात नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरांमध्येही टीबीसाठी जागृती असणे आवश्यक आहे. खासगी डॉक्टरांकडे येणार्या रुग्णांची माहिती शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे. लोक रस्त्यांवर थुंकतात. परंतु, त्यातील बॅ़क्टेरिया मरत नाहीत. एकूण टीबीच्या रुग्णांपैकी 6.19 टक्के रुग्ण एमडीआर प्रकारातील आहेत. योग्य काळजी आणि उपचार घेतल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवता येईल.”
प्रास्ताविक दिव्या वैद्यनाथन यांनी केले. अंगोना पॉल यांनी आभार मानले.
आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद
सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार व व्यायामाची गरज : गिरीश बापट
पुणे : लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. त्यांचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे, त्यासाठी सकस आहार व योग्य व्यायाम गरजेचा आहे. असे मत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या “स्वास्थ भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागीय आयुक्त सुरेश देशमुख, महापालिका आरोग्य अधिकारी अंजली साबणे, अन्न प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, पल्लवी भाईटे, वि.म. जावडेकर, संशोधक डॉ. नाईकनवरे, आहार तज्ञ अनुजा किणीकर, अन्न अमृत फौंडेशन इस्कॉनचे सुरेश भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती कुलकर्णी यांनी केले.
बापट म्हणाले, देशातील अबाल वृद्ध सुदृढ राहावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ Eat Right India’ ही संकल्पना मांडली. भारतीय अन्न व मानके प्राधिकरणाने ही संकल्पना उचलून धरली. त्यातून एक लोकचळवळ उभी राहिली . ही चळवळ सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी “ स्वास्थ भारत यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब यासारख्या आजाराने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे लक्षात घेऊन बालकांना असे आजार होऊ नयेत अशी काळजी आपण घेतली पाहिजे. मुलांना सकस आहार दिला पाहिजे. त्यांना मैदानावर खेळू दिलं पाहिजे. .तेल, मीठ आणि साखर यांचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक आहे.हे समजावून सांगण्यासाठी पालकांचे प्रबोधन व्हायला हवे. या यात्रेमधून असे प्रबोधन होणार आहे. अशा प्रयत्नातून नक्कीच भावी पिढी सदृढ होऊन नरेंद्र मोदींचे स्वस्थ भारत हे स्वप्न पूर्णत्वास जाईल.
महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती तसेच जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने (१६ ऑक्टोबर ) देशातील ६ शहरांमधून या यात्रेला सुरुवात झाली. २७ जानेवारी पर्यंत ही यात्रा देशातील सर्व शहरात पोहोचणार आहे. पुणे शहरात गुरुवारी (दि. ६) ही यात्रा दाखल झाली. यानिमित्ताने आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यांत आले होते. यांनिमित्ताने सकाळी शनिवारवाड्यापासून काढलेल्या प्रभात फेरींध्ये सुमारे १००० शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. मुख्य कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
बालगंधर्व पाडू नये म्हणून पुणेकरांनी दबाव आणावा – कॉंग्रेस
पुणे-बालगंधर्व रंगमंदिर पाडू नये या साठी कॉंग्रेस तर आंदोलन करेल ,पण पुणेकरांनी सुद्धा आपल्या भागातील लोकप्रतिनिधींवर यासाठी दबाव आणावा , तसेच महापालिकेतील पदाधिकारी, आमदार ,खासदार आणि पालकमंत्री यांना फोन करावेत असे आवाहन करत आज कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी बालगंधर्व प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या सुरु झालेल्या हालचालींना रोखणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …
कोणाचा अट्टाहास ..बालगंधर्व पाडण्याचा ..(व्हिडीओ)
पुणे-बालगंधर्व ची वीट हि हलवून देणार नाही ..असे जाहीर करत आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ,आणि महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी याप्रकरणी जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.हा इशारा देताना त्यांनी नाव न घेता , हा अट्टाहास राबविणाऱ्या एका नगरसेवकावर शरसंधान साधले आहे … पहा आणि ऐका चेतन तुपे पाटील काय म्हणाले आणि ..पहा तुम्हाला तो नगरसेवक ओळखता येतोय काय ?
वीजबिलांची वाढती थकबाकी गंभीर बाब -प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे
पुणे : पुणे व पिंपरी शहरांसह ग्रामीण भागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी वाढत असून ही अतिशय गंभीर बाब आहे व ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर करावी, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये बुधवारी (दि. 5) आयोजित पुणे परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, की प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या चालू महिन्याच्या वीजबिलांसोबतच मागील थकीत वीजबिलांची 100 टक्के वसुली करण्यासाठी सुरु असलेली मोहीम आणखी कठोरपणे राबविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांच्या मीटर रिडींग घेण्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना दरमहा 5 टक्के रिडींग घेण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे या कामाची चोखपणे अंमलबजावणी करण्यात यावी. सध्या पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांसाठी वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून पेडपेडींग असणार्या ग्राहकांना ताबडतोब नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी दिले. सध्या 89 टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. डिसेंबर महिन्याअखेर या संपूर्ण वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
या बैठकीला अधीक्षक अभियंता सर्वश्री पंकज तगलपल्लेवार, राजेंद्र पवार, शंकर तायडे, उत्क्रांत धायगुडे, विजय भाटकर, वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींसह परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
साहित्य प्रकारातील आईचे होणार विश्वरूप दर्शन !
भारतीय भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे ‘ जननी ‘ एकपात्री प्रयोग
खबरदार ,बालगंधर्व पाडलं तर …पुणेकर उतरतील रस्त्यावर …
पुणे- एका लोकप्रतिनिधीनं बालगंधर्व पाडून त्याचा पुनर्विकास करण्याची स्वतःला खूप चांगली वाटणारी योजना मंजूर करवून घेतली , दीपक मानकर यांनी हे बालगंधर्व पाडू देणार नाही असा ढोस पाजल्यावर काही काळ रेंगाळलेल्या या योजनेने आता मानकर यांना मोका खाली आत घातल्यावर पुन्हा डोके वर काढले आहे .एकीकडे तिकडे शेक्सपिअरचं घर शेकडो वर्ष जतन केलं जातं आणि दुसरीकडे आपल्या इथे पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात बालगंधर्व पाडण्याचा घाट घातला जातोय . बालगंधर्व दुरूस्त करण्यास कोणाचीच हरकत नव्हती. पण आता पुणेकरांना बालगंधर्व च्या ऐतिहासिक वास्तूची पडझड उघड्या डोळ्यांनी पहावी लागते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
त्याबाबत आजच्या सकाळ मध्ये महापालिका प्रशासनाने हि जाहिरात दिली आहे पहा …
यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची हालचाल आता सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र यामुळे असंख्य रसिकांच्या ,पुणे प्रेमी नागरिकांच्या भावना उफाळून येणार आहेत .
स्वतः पु.ल. देशपांडे यांनी देखरेख करून उभे केलेले बालगंधर्व रंगमंदीर पुलंच्याच जन्मशताब्दी वर्षात पाडणे हा धक्का अनेकांना बसणार आहे.सांस्कृतिक ठेकेदार असल्याचा आव आणणारेच संस्कृती मारण्यासाठी सज्जझाल्याचे यावरून दिसून येते आहे . वरून सांस्कृतिकचा आव आणत असले तरी वाढीव एफएसआयची अनावर ओढ यामागे असल्याचे लपून राहणारे नाही.सांस्कृतिक वगैरे ढोंग मांडून सर्वकाही मेट्रोच्या सोईसाठी आणि कंत्राटं काढण्यासाठी हे चाललंय. असा आरोप होतो आहे.
त्यामुळे यांनी बालगंधर्व पाडलं तर यांना प्रत्येक निवडणूकीत पाडा अशी आवाहने देखील आता होऊ लागतील . बालगंधर्व वाचवण्यासाठी आता दीपक मानकर जरी येवू शकले नाहीत तरी असंख्य पुणेकर रस्त्यावर उतरतील आणि तेव्हाच पुण्याचा सांस्कृतिक अभिमान जिंकतो की सत्तेची मस्ती जिंकते ते स्पष्ट होईल असे दिसते आहे.
आज सकाळ मध्ये महापालिका प्रशासनाने दिलेलेया जाहिरातीनुसार ,बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तिथे सर्व सुविधांनी युक्त असे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागविले आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कलाकार, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्या सोयीचा विचार करून ज्यांनी बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू साकारली ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच महापालिकेने या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला असून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कलादालने-नाटय़गृहांच्या नूतनीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून तेथे सुसज्ज नवी इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेने आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, ही गोष्ट अधोरेखित झाली आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे निश्चित करून त्याबाबतच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करू इच्छिणाऱ्या वास्तुविशारदांनी १० ते २४ डिसेंबर या कालावधीत नोंदणी करावी, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून जाहीर करण्यात आले असून पुनर्विकासाचे आराखडे सादर करण्यासाठी २१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शहराचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांच्या हस्ते झाले. त्यानंतर २६ जून १९६८ रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. महापालिकेच्या वतीने रंगमंदिराचे नूतनीकरणही काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
कात्रजच्या तळ्याची जलपर्णी: गजकरण कि राजकारण ?(व्हिडीओ)
पुणे- दक्षिण पुणं,म्हणजे ऐतिहासिक,निसर्गसंपदा लाभलेलं पुण्याचं सुंदर असं दक्षिणद्वार समजलं जात . पण आता या दक्षिण पुण्याचं नैसर्गिक सौंदर्य लोप पावत चाललं, कॉंक्रीटच्या जंगलानं आणि बेसुमार लोकसंख्येनं बजबजपुरी बनू पाहणारंहे दक्षिण द्वार आणि येथील जपता येईल तेवढं निसर्ग सौंदर्य जपता जपता खुद्द लोकप्रतिनिधींचीही कसोटी लागते आहे. कात्रजच्या ऐतिहासिक अशा पेशवेकालीन धरणाच्या म्हणजे वरच्या तळ्याला ‘गजकरण’ जणू झालं आहे. या तळ्याला चहुबाजूनी नाले ,गटारे यांनी वेढलं आहे. आणि जलपर्णीनं विळखा मारून तळ्याचं बिभत्सिकरण जणू आरंभले आहे.
या तळ्याची स्वच्छता राहावी, येथील पाणी स्वच्छ राहावं,म्हणून झटू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता हाथ टेकण्याची वेळ जणू येवून ठेपली आहे. कात्रजचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाच्या उद्दामखोरीनं सुंदर तळ्याचं रोगराई पसरवणाऱ्या डबक्यात रुपांतर होऊ नये म्हणजे झालं.
या तळ्यात जलपर्णी आणून टाकल्याचा संशय व्यक्त करत ,येथे येणारे ड्रेनेज चे घाण पाणी ,जलपर्णी काढून तळं स्वच्छ राखण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून सातत्याने होऊ लागलेली दिरंगाई यामुळे ,आपल्या संयमतेचा अंत आता कोणी पाहू नये असा इशारा देण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे. अवघी ८ माणसे जलपर्णी काढीत आहेत आणि तेही 22 ऑक्टोबर पासून …पण हि जलपर्णी आहे तशीच जैसे थे दिसत आहे. रोज काढली जाणारी जलपर्णी आणि वाढणारी जलपर्णी यांच्यात जणू स्पर्धा सुरु असताना महापालिकेच प्रशासन मात्र का झोपेचं सोंग घेत आहे हे समजेनासे झाले आहे. रोज काढली जाणारी जलपर्णी घेऊन जाण्यासाठी वाहनव्यवस्था व्यवस्थित नाही, जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही . आणि तलावात मिसळणारे गटारांचे पाणी रोखण्याची मानसिकता उरली नाही असा आरोप करत महापालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम नगरसेवक कदमांना करावं लागतंय … या संदर्भात हा एक छोटासा व्हिडीओरिपोर्ट ….
पीएमआरडीएच्या वाढीव वाघोली नळ पाणी पुरवठा योजनेस कार्यकारी समितीची मान्यता
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या हवेली तालुक्यातील वाढीव
वाघोली नळ पाणीपुरवठा योजेनेच्या न्यूनतम २२.६८ कोटी रुपयाच्या योजनेस
मुंबई, मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीची मान्यता मिळाली आहे.
सदर बैठकीस यु.पी.एस.मदान, अपर मुख्य सचिव (वित्त) तथा अध्यक्ष, कार्यकारी समिती, (पु.म.प्र.वि.प्रा.),
संजयकुमार, भा.प्र.से.अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, किरण गित्ते, भा.प्र.से.महानगर आयुक्त तथा मुख्य
कार्यकारी अधिकारी (पु.म.प्र.वि.प्रा.), सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी (पिं.चिं.न.वि.प्रा.),
कविता व्दिवेदी, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) (पु.म.प्र.वि.प्रा.) सचिव
आदी उपस्थित होते.
वाघोली शहर पुण्याच्या जवळ असल्यामुळे वाघोली क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. नवीन गृहप्रकल्पे
विकसित झाल्यामुळे अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना कमी पडू लागली आहे. त्यामुळे सदरील योजनेला
जोडून नव्याने योजना तयार करण्याची ग्रामपंचायत वाघोली यांनी मागणी केलेली होती. त्यानुषंगाने मौजे
वाघोली ता. हवेली जि. पुणे या गावासाठी पाणीपुरवठा ग्रामपंचायत वाघोली मार्फत राबविण्यात येणार आहे.
अस्तित्वातील योजनेतून सध्या २.२ MLD पाणी पुरवठा पिण्याची मागणी १२ तास उपसा गृहीतधरून
केलेली आहे. २०११ साली ही योजना तयार करण्यात आलेली आहे. अस्तित्वातील गावातील विहिरीवर अशुद्ध
पाणी पंपिंग मशिनरी बदलून त्यासाठी वेगळी दाबनलिका टाकून ०.५ MLD पाणी साठा वाढविण्याचे काम
प्रस्तावित केले आहे. नवीन योजनेचा उद्भव भीमानदीवर वढू बंधा-याच्या वरच्या बाजूस आहे. ही योजना
१,३३,००० लोकसंख्येसाठी ९० ली./माणसी/दिन गृहीत धरून संकल्पित केलेली आहे. मे.अन्वी कन्सट्रक्शन
या कंपनीला न्यूनतम आर्थिक देकारानुसार सध्या हे काम मिळालेले आहे.
महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले की, ‘वाढीव वाघोली पाणी पुरवठा योजनेमुळे नक्कीच वाढती लोकसंख्या
व गृहप्रकल्पे लक्षात घेता नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. सध्याच्या योजनेमध्ये इनटेक
वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल, पंप हाऊस, अशुद्ध पाणी ऊर्ध्वनलिका ३५० मि.मी व्यासाची आहे.
जलशुद्धीकरण केंद्र ५ दशलक्ष लिटर क्षमतेचे उपलब्ध आहे. सदरील योजनेचा खर्च रु.२२.६८ कोटी अपेक्षित
आहे.


