Home Blog Page 3035

‘सीएम चषक’ला जबरदस्त प्रतिसाद, ३३ लाख लोक सहभागी

0

मुंबई: ‘सीएम चषक’ला महाराष्ट्र प्रदेशस्तरावरून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. सोमवारी संध्याकालपर्यंत एकूण ३२ लाख ६१ हजार ७४६ लोकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धामध्ये आपली नोंदणी केली आहे. मुंबई शहरातून सुमारे साडेपाच लाखांहूनही जास्त लोक ‘सीएम चषक’मधल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राभरात या स्पर्धेत सहभागी होण्यात युवतींचा कल जास्त असल्याचे दिसून येत आहे. फक्त रांगोळी, कविता, नृत्य, पेंटिंग यासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी एकूण ४ लाख ७६ हजार ८७२ युवतींनी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर आणि युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ‘सीएम चषक’मध्ये सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘सीएम चषक’मध्ये सहभागी होण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही नोंदणीप्रक्रिया समानांतर चालू आहेत. युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करत आहेत. तर युवती आणि ग्रामीण भागांमधे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून नोंदणीप्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र स्तरावर आयोजित केल्या जात असलेल्या या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेकडे पाहता ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रदेश स्तरावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचासुद्धा ‘सीएम चषक’ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने होत असलेली हि विशाल आणि व्यापक स्पर्धा महाराष्ट्रभरातल्या लोकांना एकमेकांशी जोडण्यात आणि खेळाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल असा सूर युवावर्गातून उमटत आहे. प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात ‘सीएम चषक’ स्पर्धा सुरु झाली असून या स्पर्धेत लोक हिरीरीने सहभाग घेत आहेत.

पाण्याच्या टाकीचं काम आता रखडवू नका हो :प्रकाश कदम (व्हिडीओ)

0

पुणे- कात्रज ते कोंढवा रस्त्याचं रुंदीकरण अखेर मार्गी लागतंय , येवलेवाडी चा आराखडा झाला … पण आता येथे या भागासाठी केलेल्या रिठे माळ येथील जवळ जवळ पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचं काम केवळ किरकोळ इनलेट,आऊटलेट,प्लास्टर अशा गोष्टींसाठी रखडवून ठेऊ नये अशी विनंती वजा कैफियत आज कात्रजचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी येथे मांडली .
ते म्हणाले , या भागात झपाट्याने प्लॉट खरेदी विक्री ,आणि मोठ मोठी बांधकामे उभी राहत आहेत ,राहिली आहेत , वाहतूक वाढली, लोकसंख्याही खूप वाढली. सध्या ज्या केदारेश्वर च्या टाकीतून पाणीपुरवठा होतो ,त्या टाकीला पाण्याची उपलब्धता कमी पडते आहे. वडगाव जलकेंद्रातून कात्रज येथे व तेथून या ठिकाणी पाणी येते . विजेचा लपंडाव व अन्य कारणाने येथे पाण्याची कमतरता भासते .आणि वाढणारी वस्ती पाहून गेल्या ३ वर्षापूर्वीच येथे आणखी टाक्या उभारण्याचे काम भारती कदम नगरसेविका असताना सुरु करण्यात आले . आता या म्हणजे रीठेमाल येथील 1 कोटी लिटर क्षमतेच्या टाकीचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले आहे . किरकोळ कामे राहिली आहेत .ती तातडीने पूर्ण करून घ्यावीत . टाकीचे काम रखडले तर काही महिन्यातच येथे पाण्याची समस्या उग्र रूप धरण करू शकते . तेव्हा महापालिका प्रशासनाने तातडीने या सर्वाधिक आवश्यक बाबी कडे लक्ष देऊन या नव्या टाक्यांचे काम पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात अशी मागणी प्रकाश कदम यांनी केली आहे …. पहा हा त्याबाबतचा व्हिडीओ रिपोर्ट

पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड, लोकसभेत भाजपला पुन्हा संधी : सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित

0

पुणे :’ गुरुकुल विश्वपीठ ‘ आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री , ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन कार्यक्रम मौलाना आझाद सभागृह ( कोरेगाव पार्क ) येथे सकाळी साडेदहा वाजता झाला.

संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ . अजयचंद्र भागवत (गुरुजी ), राजकीय ज्योतिष अभ्यासक सिध्देश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे , डॉ.मधूसुदन घाणेकर , पल्लवी भागवत उपस्थित होते.

संमेलनात उद्घाटन सत्राच्या उद्घाटक प्रतिभा शाहू मोडक होत्या . अध्यक्षस्थानावरुन बोलताना सिद्धेश्वर मारटकर यांनी २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने प्रकाश टाकला.

मारटकर म्हणाले, ‘पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश अटीतटीची लढत होईल. तेलंगणमध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकात सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला सत्ता स्थापनेची पुन्हा संधी असून इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या तर युतीला लाभ मिळेल, मात्र, नंतर घेतल्यास जड जातील.

प्रतिभाताई मोडक म्हणाल्या, ‘ ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते.

नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष , ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष ,नक्षत्र आणि ज्योतिष ,नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे आयोजित करण्यात आली होती.

ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट,नंदकिशोर जकातदार, डॉ.मधूसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे , डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे इत्यादी मान्यवरानी विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन केले.

सायंकाळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘खेलो इंडिया’च्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे : विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त चाकण परिसरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे सनी साकला, क्रीडा सहायक संचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसिलदार विकास भालेराव आदी उपस्थित हेाते.

या स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी या  स्पर्धेच्या ठिकाणी  देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्पर्धा आयोजनात प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव  यांनीही उद्योजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला उपस्थित विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण परिसरातील उद्योजक उपस्थित होते.

आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन

0

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रस्ता रोको करण्यात आला. जवळपास दीड तास रस्ता रोखून धरत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासह या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, किरण भालेराव यांच्यासह सर्व मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “अंबरनाथ येथे आठवले साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय असून, त्याचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आठवले साहेब सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळेच आठवले साहेबांवर हल्ला झाला आहे. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच आठवले साहेबांना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत हयगय करू नये. लोकनेता असलेल्या आठवले साहेबांवरील हल्ल्याचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांततेच्या मार्गाने आपापल्या प्रभागात निषेध व्यक्त करावा.”

बाळासाहेब जानराव म्हणाले, “आठवले साहेबांवर हल्ला केल्याने आंबेडकरी चळवळ थांबणार नाही. उलट त्यांचा झंजावात कैक पटीने वाढेल. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आसुया आहे. याच राजकीय भावनेतून हा हल्ला झाला असावा. पण विचारांचा सामना अशा पद्धतीने करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. कार्यकर्त्यांनीही आठवले साहेबांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नवीन माणसांना साहेबाना भेटवताना काळजी घ्यावी.”

परशुराम वाडेकर म्हणाले, “साहेबांना झालेल्या धक्काबुक्कीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आठवले साहेब लोकनेते आहेत. ते दलित, शोषित, आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर लढणारे नेते आहेत. हा हल्ला प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने झाला आहे. त्यांना झेड सुरक्षा असताना तेथील पोलीस काय करत होते, हा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे की, त्याची सखोल चौकशी करावी.”

महेश शिंदे म्हणाले, “झेड सुरक्षा असतानाही स्थानिक पोलीस का नसतात, हा प्रश्न आहे. शासनाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आमचे आव्हान आहे. दोन हात करायचे असतील, तर आमच्यासोबत करा. यापुढे आठवले साहेबांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फोडून काढल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही.”

शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, अशोक कांबळे, रोहिदास गायकवाड, शैलेंश चव्हाण, जगन्नाथ गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही आठवले साहेबांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन समाप्त झाले.

माधुरी ची पुडी ‘सुखावह ‘ -हेडमास्तरांचा टोला (व्हिडीओ)

पुणे-गिरीश बापट कि संजय काकडे ? शिवाय योगेश गोगावले, अनिल शिरोळे ..अशा नावांची यादी असताना ,पुण्याची लोकसभा डेंजर झोन मध्ये असल्याचा कावा साधून कुणीतरी ..पुडी सोडली आणि इच्छुकांना धक्का देण्याचा प्रयत्न केला … पण आता हा धक्का ‘सुखावह ‘ असल्याचे सांगत ‘तुम्हीच हि पुडी सोडली’ आम्ही त्याचा आनंद घेतो आहोत …असा टोला भाजपचे शहराध्यक्ष आणि लोकसभे साठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते ,महापालिकेच्या रिंगणातील ‘हेडमास्टर’ योगेश गोगावले यांनी मिडीयाच्या काही प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. ..पहा आणि ऐका ते काय म्हणाले….

‘पुन्हा-26/11’ मराठी चित्रपटाचे  ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

0
पुणे : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि दिग्दर्शित ह्या सिनेमाचा  ट्रेलर आणि म्यूजिक  लाँचिंग सोहळा पुण्यात झाला.
ह्या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, मित्ताली पोकळे, गंगाराम कडूकर, पुलिस निरिक्षक मिलिंद गायकवाड़, अतुल साथपळे, आशिष सिंग, रोहिदास कोकरे, जयेश कोकरे, चैताली रोडे, ब्रह्मानंद क्लोपासक आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून येणा-या 3 महिन्यात 5 लाख पोलिस मित्र बनवणे हा मुख्य उद्देशआहे. आजवर सिनेमांमध्ये एकतर पोलिस भ्रष्ट असतात असेच दाखवले जाते किंवा अशा प्रकारच्या सिनेमात दहशतवाद्यांनी कशा प्रकारे हल्ला केला हेच दाखवले जाते, परंतु सुमीत पोफळे यांनी सिनेमातून पोलिसांची खरी कामगिरी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या सिनेमात मिताली पोफळे ही एटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर नितीन कर्जतकर, सुनील गोडबोले,राजेंद्र कांबळे, गोपाळ गायकवाड, सरोज राव,संगीता एस. यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. तसेच प्रशांत तपस्वी आणि कै. सागर बेंद्रे यांनी ह्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केलं आहे.छायांकन अनक भागवत यांचे आहे. सुमीत पोफळे आणि मेल्विन मेंडस हे या गाण्याचे संगीतकार असून डॉ. कपिल जोशी हे ह्या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच समीर भेदी आणि रोहिदास कोकारे हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

विजय रणस्‍तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे- विजय रणस्‍तंभ येथे 1 जानेवारी  रोजी अभिवादन करण्‍यासाठी असंख्‍य नागरिक येत असतात. पेरणे येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत,अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या. पेरणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते.  1 जानेवारी रोजी होणा-या अभिवादन कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रशासनाच्‍यावतीने बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्‍योती  कदम, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव, आदी उपस्थित होते.

            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले,  1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्‍न होण्यासाठी. गेल्‍या वर्षी झालेल्‍या घटनेची पुनरावृत्‍ती होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठीसर्वांनी योग्य नियोजन करुन आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत रित्या पार पाडाव्यात. या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था, अखंडीत वीज, शुध्द पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असेही ते म्‍हणाले.

            पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आढळून आल्यास  ते पोलीस विभागाच्या निर्दशनास आणून द्यावे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र जवळ ठेवावीत. सोशल मिडीयावरुन नेहमी चुकीचा संदेश प्रसारित होत राहातात त्यांच्याविरुध्‍द पोलीस प्रशासनाचे लक्ष असून त्‍यांच्‍यावर कडक कारवाई केली जाईल. 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्‍नहोण्यासाठी आपण सर्व जण सज्ज आहोत हे आपण आपल्या नियोजनातून दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले.

               यावेळी  सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विजयस्तंभ परिसर विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

0
पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ व परिसराच्या विकासाचा आराखडा करून शासनाने त्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. शौर्य दिन (१ जानेवारी) काही दिवसांवर आला आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजिली होती. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवा आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे, शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, उपाध्यक्ष भगवान गायकवाड, तानाजी ताकपेरे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी आंबेडकरी समाजाने अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याकडे शासनाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर भीमा कोरेगाव परिसर लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस स्टेशन शहर पोलीस मुख्यालयाच्या अखत्यारीत लवकरात लवकर घ्यावे. १ जानेवारी २०१९ रोजी होत असलेल्या शौर्य दिनाला आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था पुरवावी. गेल्या वर्षी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी सर्व खबरदारी घ्यावी व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पक्षाच्या वतीने प्रशासनाला आवश्यक ते सहाकार्य केले जाईल.”
“शौर्यदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून, देशभरातून आंबेडकरी जनता येत असते. त्यांच्या सोयीसाठी पुणे स्टेशनवरून बस सेवा द्यावी. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वाळवावी. विजयस्तंभ परिसर सीसीटीव्ही कॅमेरात आणावा. ५०० मीटर परिसरात कसल्याही प्रकारचे स्टॉल, मंडप, स्पीकर, सभा घेण्यास परवानगी देऊ नये. ऍम्ब्युलन्स, डॉक्टरांचे पथक, पिण्याचे पाणी, वाहनतळ, वीज आदी सुविधा पुरवाव्यात,” याही मागण्या बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत केल्या त्याचे निवेदन प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
परशुराम वाडेकर म्हणाले, “सोशल मीडियावरून अफवा पसरविण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनतेने यावर विश्वास ठेवू नये. स्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या बांधवाना सगळ्या सोयी पुरविण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊया. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वयंसेवक, पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाणार आहे. गोंधळ व गडबड होणार नाही, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सदैव तयार आहेत.”
महेश शिंदे म्हणाले, “भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्याचे संरक्षण झाले पाहिजे. गेल्या वर्षी घडल्या प्रकाराला शासन व प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारखी चूक पुन्हा होणार नाही, याची दक्षता सरकारने व प्रशासनाने घ्यावी. तेथे येणाऱ्या बांधवाना सुरक्षा आणि इतर सुविधा देण्यासाठी व्यवस्था उभारावी. कडेकोट पोलीस बंदोबस्त पुरवावा. तसेच विजयस्तंभाला सुरक्षा द्यावी.”

रोहित म्हणतोय ‘मनवाच्या लग्नाला जाऊ दे न व…’

0

सध्या लग्नसराई सुरू आहे. कलाकारांसह मालिकांमध्ये देखील लगीनघाई दिसत आहे. झी युवावरील तू अशी जवळी राहा मालिकेत देखील मनवा आणिराजवीर हे लग्नबेडीत अडकणार आहेत. लग्न अगदी मराठमोळ्या वैदिक पद्धतीत पार पडणार असून मेहंदी, हळदी, संगीत या सर्व समारंभाची लगबगमालिकेत दिसत आहे. मनवाच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत सज्ज होऊन या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. नाळ चित्रपटातील जाऊ देन व या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना सोशलमीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. मनवा आणि राजवीरचा लग्न सोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे.

भारतीय भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे ‘ नृत्य संध्या ‘

0

पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत   ‘  नृत्य संध्या  ‘ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे   शुक्रवार ,१४ डिसेंबर रोजी आयोजन   करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल ,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली .
आकांक्षा ओडिसी नृत्यालय च्या संस्थापक रसिका गुमास्ते ,त्यांच्या शिष्या आणि शुभदा वारदेकर यांच्या शिष्या शमा अधिकारी या हा कार्यक्रम सादर करणार आहेत .
 भारतीय विद्या  भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६४ वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे

बालगंधर्व प्रकल्पाच्या .. कारणानेच त्यांनी जोडले कला क्षेत्राशी संबध …?

0

पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या ‘तथाकथित’ पुनर्विकास प्रकल्पाला विरोध जरी असला  तरी  पण जरा वेगळ्या पद्धतीने असातसाच दिखाऊ विरोध करा, .असे ठासविण्यासाठी  एका माजी पदाधिकारी असलेल्या लोकप्रतिनिधीने   हा प्रस्ताव आणल्यापासून  कलाक्षेत्राशी संबध जोडून ठेवून आपला गट या क्षेत्रात निर्माण करून ठेवल्याचे येथे स्पष्ट जाणवत  आहे .यामुळेच  नटराजसिनेमागृहाचा  बळी गेला तसा बालगंधर्व रंगमंदिराचा बळी जाणार काय ? असा प्रश्न निर्माण होतो आहे.आता कोणी कितीही सांगितले वास्तू पाडणार नाही ,वास्तूला हात लावणार नाही, तरी या प्रकल्पाने या ऐतिहासिक स्थळाची आज असलेली ‘ ‘रया’ मात्र उरणार नाही .जी ‘रया ‘ शनवार वाडा जोपासून आहे ,ती अशा स्थळांना जोपासता येणे कठीण झाले आहे ,हे वेगळे सांगण्याची गरज उरेल असे वाटत नाही. कोणी कमाई साठी किंवा अन्य कोणासाठी काहीही राजकारण करत असले तरी  शहराला मेट्रो देखील हवी आहे आणि शहराच्या ऐतिहासिक खुणा देखील जपायच्या आहेत ,अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिराची मान अडकणे हि बाब निश्चितच अनेकांच्या मनाला वेदना देणारी ठरणार आहे.
मेट्रो चे स्थानक,त्या साठीचे बांधकाम  आणि त्याला लागणारी जागा हि बालगंधर्व रंगमंदिराची वापरली जाणार आहे. मेट्रो च्या स्थानकाला अन्य जागा नाही, संभाजी उद्यानाला हात लावता येत नाही.आणि संबंधच नसल्याने रमणबागेच्या मैदानाला किंवा लगत असल्या तर  मोकळ्या जागांना  हात लावता येत नाही.शहरात मोकळ्या जागाच नाहीत .अशा स्थितीत अगोदरच रस्ता रुंदीत झाशीच्या राणीचा पुतळा बाहेर काढून मुस्कट दबलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा आता मेट्रो स्थानकाने चुराडा मात्र होणार आहे . कोणताही वास्तू विशारद येथील मोकळी जागा वाचवून येथे मेट्रो चे स्थानक उभारू शकत नाही . नदीच्या पात्रात अगोदरच रस्ते बांधण्यात आलेले आहे . आता मेट्रो हि काहीश्या प्रमाणात नदीवरून जाणार आहे .मेट्रोच्या स्थानकाच्या बांधकामासाठी शहरात जागा उपलब्ध होणे कठीण आहे .अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिर निवडण्यात आले आहे.  हि निवड फार पूर्वीच करून ठेवली गेली आहे. पुण्याची ऐतिहासिक पेशवेकालीन ‘कोतवाल चावडी’ कोणाला आठवतेय काय ?आज ती कोणाला ठाऊक आहे काय ? ती पाडली आणि तिथे वाहनतळ उभारले तेव्हा  लोकं ढसाढसा रडली होती . आता याच  राजकीय कुटनितीपुढे या रंगमंदिराचा आणि येथील जागेचा बळी जाईल आणि तिथे बांधकामाचे जाळे उभारले जाईल अशी शक्यता नाकरली जाऊ शकत नाही . शेजारी संभाजी बाग उरेल हे मात्र पुणेकरांचे नशीब असेल. पुण्याच्या कला क्षेत्रात सांस्कृतिकतेचा टेंभा मिरवून गल्लाभरूपण करणारे  ‘मॅनेज ‘ झाले काय आणि नाही झाले काय ? पण वाहतुकीचा बोळबट्ट्या पुढे करून या रंगमंदिराचा चुराडा येत्या काही वर्षात होईल,हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज उरणार नाही .आम्ही मराठी सिनेमासाठी असलेले प्रभात सिनेमागृह खाजगी होतो म्हणून वाचवू शकलो .पण आता येथे मोठा कारभार आहे बालगंधर्व रंग मंदिर वाचवू शकू किंवा नाही हे सांगू शकत नाही .असाही प्रवाह आहेच . भानुविलास सिनेमा ची जागा धूळ खात पडली असताना आता त्याच्या बाजूचे विजय सिनेमा ने पुढे रंग बदलल्यास नवल वाटणार नाही . या दोन्ही सिनेमागृहांमधील जागेचे अंतर हि फार छोटे आहे .
पुण्याच्या जुन्या खुणा ..आता हळू हळू नाहीश्या होतात कि काय अशी भीती वाटू लागली आहे . बदलत्या शहराचे बदलते रूप ..जुन्या खुणा जतन करवून पाहता येणार नाही काय ? हा प्रश्न भेडसावतो आहे .पण एवढे मात्र निश्चित जुन्या खुणा बुजवूनही पुण्यातील वाहतुकीचा खेळखंडोबा नाहीसा होईल याची शाश्वत हमी देखील कोणी देऊ शकणार नाही .मेट्रो आल्याने मध्यवस्तीतला काय उपनगरातला वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल काय ? कि दिल्ली / नवी दिल्ली प्रमाणे… जुने शहर आहे तसेच ठेऊन जुन्या शहरालगत नवी नियोजनपूर्व शहरे वसविल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटेल ? यावर मंथन होणे गरजेचे आहे . लोकवस्ती होण्यापूर्वीच अगोदर भव्य रस्ते ,सुविधा निर्माण होतात आणि नंतर शहरे वसतात ती शहरे समस्यामुक्त असू शकतील . पण जिथे अगोदरच गजबजणाऱ्या लोकवस्त्या आडव्या तिडव्या उगवितात ,तेथील समस्या मात्र   कितीही कोट्यांवधीचा खर्च केला तरी आ वासुनच उभ्या राहतात अशी स्थिती आजवर दिसून आलेली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याच्या खुणा मिटवून येथील वाहतूक सुरळीत होईल यावर विश्वास ठेवण्या ऐवजी पुण्यालगतच्या परिसरात भव्य दिव्य रस्ते केल्यास जुन्या पुण्यातील वाहतूक हि तिकडे वळून येथील समस्या फारशी भेडसावणार नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शहराला मेट्रो देखील हवी आहे आणि शहराच्या ऐतिहासिक खुणा देखील जपायच्या आहेत अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिराची मान अडकणे हि बाब निश्चितच अनेकांच्या मनाला वेदना देणारी ठरणार आहे हे मात्र निश्चित .

ही आहेत  मेट्रो ने जाहीर केलेली  सहा स्थानकाची डिझाईन्स… यात बालगंधर्व रंगमंदिरा लगतच्या डिझाईनचा अर्थात समावेश अजून व्हायचा आहे.

आमचा गौरवपूर्ण इतिहास या शीर्षकाखाली मेट्रोने प्रसिद्ध केलेली हि 2 छायाचित्रे …. यात काही ऐतिहासिक वास्तूंचे फोटो आहेत . मात्र बालगंधर्व रंग मंदिराचा नाही …..

ध्‍वजदिन निधीसाठी आपले योगदान द्या- विजयसिंह देशमुख

0

पुणेसैनिक सीमेवर खडा पहारा देत असतात, म्‍हणून आपण सुरक्षित असतो, या सैनिकांच्‍या ऋणातून उतराई होण्‍यासाठी सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधीसाठी आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन करत आपण सर्व सैनिकांविषयी कटीबध्‍द असायला हवे, असे प्रतिपादन सैनिक कल्‍याण विभागाचे प्रभारी संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधी संकलन शुभारंभात ते बोलत होते. यावेळी सैनिक कल्‍याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, कर्नल शिंदे, कर्नल गोरे, कर्नल नाईकवडे, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मिलींद देवदत्‍त तुंगार आदी उपस्थित होते.

            देशमुख म्‍हणाले, सीमेवर डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणारा  सैनिक सेवानिवृत्‍ती नंतर नागरी जीवन जगत असतो, अशावेळी त्‍याला विविध प्रश्‍नांबाबत अडचणी येऊ शकतात, त्‍या निवारण करण्‍यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्‍न करायला हवेत. सैनिकांविषयी असलेले ऋण व्‍यक्‍त करण्‍याचा हा एक छोटासा प्रयत्‍न असतो. सैनिकांच्‍या मुलांमध्‍ये असलेल्‍या कौशल्‍यांचा विकास होण्‍यासाठी क्षमता बांधणी उपक्रम हाती घेण्‍याची गरजही त्‍यांनी प्रतिपादन केली. माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मासिक बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

            सैनिक कल्‍याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे यांनी महाराष्‍ट्र माजी सैनिक महामंडळाच्‍यावतीने (मेस्‍को) राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. प्रत्‍येक सैनिक हा शेतकरी असतो. सेवानिवृत्‍तीनंतर अनेक जण शेतीव्‍यवसाय करत असतात. त्‍यांच्‍या शेतमालाला योग्‍य बाजारपेठ मिळावी, यासाठी मेस्‍कोच्‍या वतीने प्रयत्‍न करण्‍यात येतील, असे ते म्‍हणाले.

            जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मिलींद देवदत्‍त तुंगार यांनी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयाच्‍यावतीने माजी सैनिकांच्‍या कल्‍याणासाठी विविध उपक्रम राबवत असल्‍याचे सांगितले. शासनाच्‍या विविध विभागांनी ध्‍वजदिननिधीसाठी सढळ हस्‍ते मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.  या कार्यक्रमात गतवर्षी ध्‍वजदिननिधी संकलनासाठी उत्‍कृष्‍ट संकलन केलेल्‍या विविध संस्‍था,कार्यालयांच्‍या प्रमुखांना उत्‍तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्‍यात आले. या शिवाय माजी सैनिक, विधवा पत्‍नी यांच्‍या पाल्‍यांना गौरव पुरस्‍कार प्रीत्‍यर्थ धनादेश वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्‍वलनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्‍णा वाघमारे यांनी केले. यावेळी माजी सैनिक, पाल्‍य, विद्यार्थी  मोठ्या संख्‍येने  उपस्थित होते.

‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व- सुशीलकुमार शिंदे

0

पुणे-“महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात महिलांचे नेतृत्व उभारण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देण्यासह स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले. महिलांना स्वयंरोजगार कसा द्यावा, याचे उत्तम उदाहरण लिज्जत पापडच्या रूपाने आपल्यासमोर आहे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या महोत्सवात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे नेते अभय छाजेड, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते राहुल सोलापूरकर, खासदार वंदना चव्हाण, युएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे, सचिन ईटकर, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, चेतना नहार, कमल कोळगे, मंदाकिनी डावखे, रत्नमाला जाधव, विमल कांबळे उपस्थित होते. यावेळी राहूल सोलापूरकर यांच्या ‘प्रभात ते सैराट’ या मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रवासावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “घरात असणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे काम लिज्जत पापडने केले आहे. आज लिज्जत पापडच्या कुटुंबात ५० हजार पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. या उद्योग समूहाचे नेतृत्व महिलांच्या हाती असल्याने त्याचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होते आहे. शिवाय, महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होत आहेत. आगामी काळातही हे काम असेच सुरु राहावे.”

सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, “महिलांना सन्मान आणि आत्मविश्वास देण्याचे काम ‘लिज्जत’ने केले आहे. दिवसभर कष्ट करून आपल्या संसाराला हातभार लावणाऱ्या बायकोचे कौतुक करण्याची सवय नवऱ्याने लावावी. त्यातून नात्यातील गोडवाही वाढेल. आपल्या कुटुंबातील आपण प्रमुख आहोत याच आत्मविश्वासाने आपण आयुष्य जगले पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वत:ची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे आहे.”

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,”लिज्जतचा हा पुरस्कार म्हणजे माहेरची साडी मिळाल्याचा आनंद आहे. जगभरात आपल्या उद्योगाची ख्याती पसरविणाऱ्या ‘लिज्जत’वर चित्रपट बनावा. विविध अनुभवांचा सामना करीत या महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याप्रमाणेच मुलीला आणि सुनेलाही घडवावे. त्यांची प्रेरणा बनावे.”

अनिता दाते म्हणाल्या, “लहानपासून लिज्जत पापडची जाहिरात पाहत आले आहे. ती जाहिरात पाहून पापड खायची नेहमीच इच्छा व्हायची. इतकंच नव्हे, तर ‘राधिका’ साकारतानाही तुमच्या सर्वांकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी काम करते. त्यातूनच ती प्रमुख बनते.”

यावेळी ‘लिज्जत पापड’तर्फे सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संसथेला तीन लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. सुरेश कोते यांनी आभार मानले.

खेळाडूंच्या यशात पालकांचे योगदान महत्त्वाचे : बापट

0

पुणे-आपल्या पाल्याला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर करण्यासाठी पालक सतत त्याग करतात, आपल्यामुलांमुलींना प्रोत्साहन देतात. त्यामुळेच खेळाडूंच्या यशात पालकांचे योगदानास अनन्यसाधारण महत्व आहे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
क्रीडा भारती संस्थेतर्फे पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा बापट यांच्या हस्ते जिजामाता पुरस्कार देऊन सन्मान
करण्यात आला. या वेळी क्रीडा भारतीचे अखिल भारतीयम हामंत्री राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य विजय पुरंदरे,
अखिल भारतीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, जनता सहकारी बँकेचेअध्यक्ष संजय लेले, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते हेया वेळी उपस्थित होते. या समारंभात शिरीन लिमये, संपदाबुचडे, अभिजित व मृणालिनी कुंटे, नुपुर हगवणे, तारा शहा,
देविका वैद्या, ऋतुजा सातपुते, पूजा शेलार, रोहिणी मोहिते,अंकिता गुंड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव करण्यात
आला.

बापट यांनी पुढे सांगितले, खेळाडूंच्यामातापितांचा गौरव करणे हा अतिशय स्वागतार्ह उपक्रम आहे.समर्थ नागरिक होण्यासाठी क्रीडांगणावरील संस्कारांना अतिशयमहत्त्व आहे. समाज घडविण्यात खेळाडूंचा मोठा वाटा असतो. हे
लक्षात घेऊनच क्रीडागणांसाठी राखीव असलेले भूखंडांचे आरक्षणखेळासाठीच राहील असेच आम्ही शासनाकडून धोरण राबवितअसतो. अधिकाधिक मैदाने उपलब्ध झाली की आपोआपचखेळाडूंची संख्या वाढली जाईल.
चौधरी म्हणाले, आपल्या देशात आरोग्यादायी जीवनाबाबतखूप अनास्था वाढत चालली आहे. जागतिक स्तरावरील तंदुरुस्त
व सशक्त नागरिकांच्या मापदंडात आपला देश खूप पिछाडीवरचालला आहे ही अत्यंत शोकांतिका आहे. स्वास्थ्य सुधारण्यासाठीप्रत्येक नागरिकाने मैदानांवर दररोज काही ना काही तरी खेळखेळण्याची गरज आहे. खेळाकडे स्पर्धेचे साधन म्हणून न पाहताआनंद मिळविण्यासाठी मनोरंजनाचे उत्तम माध्यम पाहिलेपाहिजे. क्रीडा भारतीतर्फे सर्वसामान्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयीजाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांघिकखेळांवरही आम्ही भर देत असतो.

सत्कारार्थींच्या वतीने अभिजीत कुंटे व मौसमी वैद्य यांनी आपलेविचार मांडले. प्रा. शैलेश आपटे यांनी प्रास्ताविक केले. जयसिंगजगताप यांनी आभार मानले.