Home Blog Page 3021

हरवलेली ३७ मुले केली पालकांच्या सुपूर्त -पोलिसांची कार्यवाही

0

पुणे : उत्तर प्रदेशातून त्या दोन अल्पवयीन मुली दोघामुलांबरोबर पळून आल्या होत्या़. त्यांनी घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून मोबाईलमधील कार्डही बदलले़ पण, त्यावरुन त्यांनी नकळत एक कॉल केला होता़. या एकुलत्या एक कॉलच्या धाग्यावरुन सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले़ . ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत डिसेंबर महिन्यात १५ अल्पवयीन मुले व २० अल्पवयीन मुली व २ सज्ञान मुली अशा ३७ मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़.
याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातून पळून आलेल्या या दोन मुलींच्या शोधासाठी अन्य १० जणांची चौकशी करण्यात आली़. त्यांच्याविषयी काहीही माहिती नसताना केवळ एका फोन कॉलवरुन त्यांचा शोध घेण्यात यश मिळाले़. ते १५ दिवस पुण्यात मुलांच्या ओळखीच्या नातेवाईकांकडे रहात होते़. ही दोन्ही मुले बांधकाम व्यवसायात कामाला लागणार होती. पश्चिम बंगालमधून असाच एक अल्पवयीन मुलगा घरातून निघून पुण्यात आला होता़. तसेच गुजरातमधून बारामतीला नातेवाईकांकडे एक अल्पवयीन मुलगा आला होता़ पुन्हा घरी जातो, असे सांगून तो बारामतीहून निघाला व चुकला होता़. त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते़. त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़.
ऑपरेशन मुस्कानअंतर्गत हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याबरोबरच सापडलेल्या बालकांची ओळख निष्पन्न करुन त्यांच्या पालकांचा शोध घेऊन बालक व त्यांचे पालक यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याची ही कामगिरी केले जाते. ही कामगिरी करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, सहायक फौजदार नामदेव शेलार, हवालदार प्रमोद म्हेत्रे, राजाराम घोगरे, नितिन तेलंगे, सचिन कदम, सुनिल वलसाने, रमेश लोहकरे, राजेंद्र कचरे, प्रदीप शेलार, तुषार आल्हाट, निलेश पालवे, संदीप गायकवाड, अनुराधा धुमाळ, ननिता येळे, कविता नलावडे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे यांचा समावेश आहे़.

मृत्यू दाखल्यासाठी ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या शिपायाला पकडले

0

 

पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.

महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. याबाबत एकाने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बचपन वर्ल्ड फोरम या सामाजिक संस्थेमधील मुलांना अन्नदान

0

पुणे-नववर्षानिमित्त पुणे कॅम्प भागातील जाफरीन लेनमधील नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाच्यावतीने बचपन वर्ल्ड फोरम या सामाजिक संस्थेमधील मुलांना अन्नदान करण्यात आले . तसेच त्यांना केक व चॉकलेट वाटप करण्यात आले . नवीन वर्षानिमित्त मंडळाने सामाजिक कार्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्य्रक्रमासाठी क्लेमेंट सॅम्युअल , झेवियर सॅम्युअल , हसन रंगरेज , राजेंद्र शहा , राजू पहाडिया , चेतन भांबुरे , किशोर भस्मे , एडवर्ड अँथोनी , हरीश सेठ , लचू ललवानी , संगीता सॅम्युअल , पिंकी भोसले , आशिष भस्मे , गोपाळ भांबुरे , मन्नू पिल्ले , गनी शेख , शैलेश परदेशी , बिट्टू खत्री आदींनी विशेष परिश्रम घेतले .

या कार्य्रक्रमास प्रमुख पाहुणे , नगरसेवक दिलीप गिरमकर , माजी नगरसेवक प्रसाद केदारी , मंजूर शेख , अमीन शेख , विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते . 

उपमहापौरांच्या पुढाकारातून विजयस्तंभ परिसर चकाचक

0
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त (१ जानेवारी) अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आले होते. अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. मानवंदना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी २ जानेवारीला पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेऊन विजयस्तंभ परिसराची स्वच्छता केली. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सकाळी सात वाजता कोरेगाव भीमा येथे येऊन सरपंच रुपेश ठोंबरे यांची भेट घेतली. त्यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कोरेगाव भीमाचे उपसरपंच शिवाजी वाळके, महिला समिती आयुक्त सुवर्णा चव्हाण व स्वच्छ संस्थेचे कर्मचारी यांना घेऊन परिसर चकाचक केला.
विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आल्याने विजयस्तंभावजवळ पुष्पचक्र, फुले आणि इतर साहित्याचा ढीग लागला होता. तसेच परिसरात पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याच्या प्लेट्स, जेवणाच्या पत्रावळ्या असा कचरा पडला होता. नगर रस्त्यावरील लोणीकंद ते कोरेगाव भीमा हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. डॉ. धेंडे यांनी स्थानिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली.
याबाबत डॉ. धेंडे म्हणाले, “विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा मोठी गर्दी झाली. प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. मात्र, गर्दीचा अंदाज न आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी वगळता अभिवादनाचा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.”

पाटील इस्टेट जळीतग्रस्तांतील विद्यार्थ्यांना वहया वाटप

0
पुणे :शिवाजीनगर पाटील इस्टेट मधील जळीतग्रस्तांमधील १६o विद्याथ्र्यांना वहयांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने  लतीफ मगदूम, इरफान शेख,डॉ.व्ही.एन. जगताप, डॉ. किरण भिसे, मुझफ्फर शेख, यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
खलीद अन्सारी, मजीद उस्मान, एस.ए. पटेल, मुफ्ती जमील, मौल अब्दुल समद, मौलाना समीर उपस्थित होते.
डॉ. किरण भिसे, डॉ.व्ही.एन. जगताप यांनी संयोजन केले.

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ ला अभ्यास भेट

0
पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट   ‘आयएमईडी’ २१७ च्या  विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ कंपनी(हिंजवडी)ला अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती .  ‘ स्टुडंट कनेक्ट ‘ प्रोग्राम अंतर्गत ही अभ्यास भेट नुकतीच झाली.
या अभ्यास भेटीत एमबीए, एमसीए , बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले. प्रा. दीपक नवलगुंद यांच्यासह प्रा.रणप्रित कौर, प्रा.स्वाती देसाई, प्रा.हेमचंद्र पाडळीकर, प्रा.वृषाली यादव, डॉ.आर. व्ही. महाडिक उपस्थित होते.डॉ. सचिन वेर्णेकर, श्री. जोसेफ यांनी मार्गदर्शन केले.

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबीर

0

पुणे : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), पोलिओ कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय हे शिबीर शनिवार, ५ जानेवारी व रविवार, ६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क, पुणे येथे होणार आहे. हे शिबीर पूर्णतः मोफत आहे, अशी माहिती जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक सेठिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन राजेंद्र गोयल, लायन श्याम खंडेलवाल, लायन वीरेंद्र पटेल, सुनील पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दीपक सेठिया म्हणाले, “लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. पुण्यात शनिवार व रविवार या दोन दिवशी होत असलेले हे ५१ वे शिबीर आहे. आजवर जवळपास सात ते आठ हजार लोकांना जयपूर फूटचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅलिपर्स, सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा शेकडोच्या संख्यने वाटण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, नाशिक, कोपरगाव, संगमनेर या ठिकाणी हे शिबीर आयोजिले जाते. एका शिबिरात साधारणतः ६००-७०० लोकांना लाभ होतो.”

वीरेंद्र पटेल म्हणाले, “पुण्यासह ३ व ४ जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात हे शिबीर आयोजिले आहे. त्याचबरोबर फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकीत्सा शिबीर महावीर प्रतिष्ठान येथे त्याच दोन दिवशी होणार आहे.”

हे शिबीर संपूर्णतः मोफत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय आयोजकांतर्फे केली जाणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सुरेश पटेल (९४२२०८५६६४) व संध्या दहिवळकर (९८८१३३२४८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘दिव्य ज्योति परिवार’ शाखा-पुणे आयोजित सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ची सांगता

0

पुणे :‘दिव्य ज्योति परिवार’ आयोजित तसेच दिव्य ज्योति जागृति संस्थानतर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ची सांगता आज मंगळवारी झाली. ही सांगता प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज (संस्थापक व संचालक दिव्य ज्योति जागृती संस्थान) यांच्या शिष्या भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी यज्ञ, पूर्णाहुति, भागवत पूजन तसेच आरतीने ने झाली, अशी माहिती चिदानंद स्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली.

हा कार्यक्रम रोज सायंकाळी 5 ते 9 या वेळेत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे संपन्न झाला.

दि. 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होता. यामध्ये आध्यात्म, विज्ञान, भक्तिरस आणि सुमधूर संगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले होते. यावेळी अनिल शिरोळे (खासदार), शिवाजीराव आढळराव-पाटील (खासदार), मुक्ता टिळक (महापौर), राहुल जाधव (पिंपरी-चिंचवड महापौर), योगेश गोगावले (भाजप शहराध्यक्ष), माधुरी मिसाळ (भाजप आमदार), रवींद्र धंगेकर (नगरसेवक), लक्ष्मण जगताप (आमदार, पिंपरी-चिंचवड), दिलीप मोहिते-पाटील (आमदार, खेड तालुका) उपस्थितीत होते.

या सप्ताहामध्ये भागवत माहात्म्य सांगून सद्य चालू परिस्थितीबाबत लोकांचे प्रबोधन करून समाज जागृतीचे संदेश प.पू. सर्वश्री आषुतोश महाराज यांच्या शिष्या भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांनी दिले.

कलश यात्रा, भागवत महात्म्य (परीक्षित को शाप), कपील देवहूति संवाद, वृत्रासूर कथा, प्रल्हाद प्रसंग आणि होळी उत्सव, बलिवामन कथा, कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण बाल लीला, गोवर्धन उत्सव, मथुरा गमन व कंस वध, रुक्मिणी विवाह, भागवत पूजन, पुर्णाहुती यज्ञ व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या सप्ताहात संपन्न झाले.

प.पू. सर्वश्री आशुतोष महाराजींच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीला मानव समाजाला जीवन जगण्याची कला शिकवितात. आज मनुष्य जीवन अनेक समस्यांनी व्यापलेले आहे. उदा. भ्रष्टाचार, नशाखोरी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार, चरित्रहिनता, गो-हत्या, तसेच पर्यावरणाचा असमतोल या सारख्या अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांमध्ये आहे. आज 21 व्या शतकातही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यलीला मानव समाजाला अध्यात्म ज्ञानाद्वारे (ब्रह्मज्ञानाद्वारे) शाश्वत भक्ती मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ठरत आहे. आध्यात्मिक रहस्यांनी ओतप्रोत असलेल्या लीलांना श्रीमद्भागवत महापुराणाच्या आधारे समाजा समक्ष प्रकट करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रमुख उद्देशासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता असे चिदानंद स्वामी यांनी सांगितले.

पुण्याचे पोलीस म्हणजे पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर – अंकुश काकडेंचा हेल्मेटसक्ती वर प्रहार

0

पुणे -पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात येत्या 3 जानेवारीला कृती समितीच्या वतीने हेल्मेट शिवाय दुचाकीवर जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ‘सविनय’ कायदेभंग आंदोलनकरण्याचा निर्धार आज हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने जाहीर केला .यावेळी पुण्याचे पोलीस म्हणजे पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत असा जोरदार प्रहार हेल्मेटसक्ती च्या अनुषंगाने बोलताना माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला .

पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारा विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 31 डिसेंबरला एकाच दिवसात पाच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करून नवीन वर्षात हेल्मेट शिवाय दुचाकी चालविणाऱ्या विरोधात कडक कारवाई चे धोरण आखले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हेल्मेट विरोधी कृती समितीने हेल्मेट सक्ती विरोधात येत्या तीन तारखेपासून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. तीन तारखेला सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार भवन येथून हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना हेल्मेट सक्ती करू नये यासाठीचे निवेदन दिले जाणार आहे.

या बैठकीला ग्राहक चळवळीचे नेते सुर्यकांत पाठक  माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे,मोहनसिंग राजपाल,, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव,  डॉ. शैलेश गुजर, बाळासाहेब रूनवाल, मंदार जोशी आदी उपस्थित होते.
हेल्मेटचा ऐच्छिक वापर असावा परंतु सक्ती नसावी ही भुमिका मांडण्यात आली. पहा आणि ऐका ..यावेळी सुर्यकांत पाठक आणि अंकुश काकडे नेमके काय म्हणाले …

आयुक्त साहेब,गुन्हेगारांवर दहशत बसवा, दुचाकीस्वारांवर नको – खर्डेकरांचा तडाखा

0

पुणे- हेल्मेट सक्ती आम्ही आजवर जुमानली नाही आणि जुमानणार देखील नाही ,सविनय कायदेभंग करू असे सांगत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांवर आपला वचक ,दहशत बसवावी , दुचाकीस्वार आणि सामान्य पुणेकरांवर दहशत बसविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीनंतर संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांना जशी आमच्या जीवाची काळजी आहे तशीच आम्हालाही पोलिसांच्या जिवाची काळजी आहे  .. आम्ही त्यांचे हि फोटो काढू .. हेल्मेट विना फिरणारे, सीटबेल्ट न लावणारे … नियमभंग करणारे या सर्वांचे फोटो नागरिकांनी काढावेत आणि प्रसारित करावेत .या
हेल्मेट सक्ती मागे काही काळेबेरे संशय आपल्याला येतो असून
हेल्मेट मुळे मानेचा त्रास होतो याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले आहे .
आयुक्त आणि उपायुक्त अशा कृतीने पोलीस आणि नागरिकात  दरी निर्माण करत आहेत असा आरोप हि त्यांनी केला ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दीव्यांचे संग्रहालय

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी संकलित केलेल्या दीव्यांच्या संग‘हालयाचे उद्घाटन दीव्यांचे संग्राहक शाम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
लामणदीवा, समई, पणती, निरांजन, पंचारती अशा विविध प्रकारच्या आणि माती, लाकूड, चांदी, तांबे, पितळ, कथिल अशा विविध माध्यमांतील वैशिष्टपूर्ण १३८ दीव्यांचा संग‘हालयात समावेश आहे. छत्तीसगड आणि नेपाळमधील दोनशे वर्षांपूर्वीचे दीवे हे संग‘हालयाचे विशेष आकर्षण आहे.
स्वतःतील आवड ओळखून छंद जोपासला पाहिजे. छंद जोपासण्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची तयारी लागते असे मत शाम जोशी यांनी व्यक्त केले. नववर्षानिमित्त छोटे संकल्प करुन ते जिद्दीने पूर्ण करा असे आवाहन डॉ. कुंटे यांनी केले.
सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, डॉ. विनय आचार्य, वस्तु संग‘ाहक विनायक आवटे, विक‘म मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिका अनिता जाधव, सुरेश वरगंटीवार, विकास पडेळ, मंगेश कुडले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचा पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने समारोप

0
पुणे: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे  एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्‍वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथील विश्‍वराज बंधार्‍याच्या परिसरात आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, सौ. उर्मिला  विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, प्रा. स्वाती कराड-चाटे,  डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. सुनीता मंगेश कराड , नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, माईर्स एमआयटीचे कुलसचिव सु.वा.उर्फ नाना कुलकर्णी व प्राचार्य गणाचार्य हे उपस्थित होते.
दि. ३१ डिसेंबरला झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोपप्रसंगी मध्यरात्री १२.०० वाजता त्याग व  समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०१९ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ नववर्षाच्या पूर्व संध्येला आपल्यातील अवगुणांची आहूती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. आजच्या तरूण पिढीमध्ये स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आम्ही करीत आहोत.”
“ संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटामुळे संपूर्ण जगात शांती, सहिष्णूता आणि मानवतेचा संदेश पोहोचेल. त्यामुळेच भविष्यात भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्‍व गुरू म्हणून उदयास येईल. तसेच, भारत हा जगासमोर ज्ञान-विज्ञान असे स्वरूप मांडेल.”
यावेळी लक्ष्मण घुगे लिखित सुवर्ण पिंपळ हा ग्रंथांचे लोकार्पण डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, गायिका गोदावरी मुंडे, प्रा. ज्योती कराड-ढाकणे व आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. पौरवी साठे व प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांनी आपल्या सुरेल रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच प्रमाणे अझरूद्दीन शेख यांनी बासरीवादन   केले. सुरूवातीला कृष्ण वंदना व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून प्रा. अबोली थत्ते यांनी कालिया दमन, कृष्ण भजन व अन्य नृत्ये सादर केली. तसेच, आर्यव्रत राहुल कराड यांनी तबला वादन व विरेंद्रप्रताप मंगेश कराड यांनी गिटार वादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संगीत महोत्सवात विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आपली गायन-वादनाची कला सादर केली.
या प्रासंगी डॉ. एस.एन.पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. पायल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ज्योती कराड ढाकणे यांनी आभार प्रदर्शन केले.

कमिशनर साहेब …लोकांच्या जिवाची काळजी आहे तर अगोदर दारू-मटका अड्डे बंद करा …

0

पुणे-पुण्याच्या पोलीस कमिशनरांच्या मानगुटीवर बसलेले हेल्मेटसक्ती चे भूत उतरविण्यासाठी पालकमंत्री  बापट यांनी काहीही न करण्याची घेतलेली भूमिका भाजपला आगामी निवडणुकीत मातीत घालणारी असून ,  जर कमिशनरांना खरोखरच लोकांच्या जिवाची काळजी असेल तर अगोदर त्यांनी आपल्या हद्दीत सुरु असलेले बेकायदा दारू आणी मटक्याचे अड्डे पूर्णतः बंद करावेत .दारू आणि मटका यामुळे लाखो संसारे धुळीस मिळत असून ,त्यांना ठाऊक च नसेल आपल्या हद्दीत असे बेकायदा धंदे सुरु आहेत तर त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील रायटर ची नार्को टेस्ट करावी असे आवाहन हि करण्यात येते आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या अंगात  हेल्मेट सक्ती राबविण्याचे भूत संचारले आहे . आणि त्या कारवाई अंतर्गत लाखोची दंड वसुली त्यांनी सुरु केली आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारू -आणि मटका धंदे सुरु असतील त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित करण्याचा फर्मान मात्र ते सोयीस्करपणे विसरलेले असावेत .किंवा पुण्यात कुठेच अशा पद्धतीचे दारू आणि मटका अड्डे नाहीतच असा त्यांचा ‘अत्यंत मधुर आणि गोड ‘ समज असावा .पण तमाम पुणेकरांना याची जाणीव आहे त्याची जाणीव मात्र या आयुक्तांना नाही हे विशेष . आयुक्त साहेब आपण पुण्यात आल्या पासून असे किती बेकायदा दारू आणी मटका धंदे बंद केलेत ?आणि ते ज्यांच्या हद्दीत चालू होते त्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांवर कुठे आणि कशी कारवाई केली ? याची उत्तरे तुम्ही देऊ शकलेला नाहीत .किंवा बेकायदा दारू आणि मटका अड्ड्यांनी संसारे उध्वस्त होतात यावर त्यांचा विश्वास नसावा . असे असले तरी असे धंदे सुरु ठेवावेत असा कुठला न्यायालयीन आदेश आहे काय ? या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावे .लोकंच्या जिवाची काळजी करणारे  आयुक्त पुण्याला लाभणे हे खरे तर पुणेकरांचे नशीबच म्हणावे लागेल.पण मग गेली असंख्य वर्षे हेल्मेट सक्ती करण्या ऐवजी हेल्मेट ऐच्छिक ठेवावे .. अशी मागणी करत आयुष्यभर लढा देणारे सुर्यकांत पाठक ,संदीप खर्डेकर ,अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला आणि आम्ही वेडे आहोत काय ?याचे उत्तर द्यावे . आणि जर तुम्हाला हेल्मेट सक्ती राबवू नये यासाठी वारंवार वर्षानुवर्षे चळवळ करणारे वेडे वाटत असतील तर त्यांना एकदाचे ‘हे वेडेअसल्याचे ‘आपल्या सहीचे प्रमाणपत्र देवून टाकावे .
न्यायालयाचा निर्णय आजचा नाही , यापूर्वी अनेक आयुक्तांनी अशी सक्ती राबविण्याचा अट्टाहास धरला होता . त्या अट्टाहासाचे काय झाले ? ते या ‘ वेड्यांपुढे’ का नमले .. नमले तर त्या त्या आयुक्तांना देखील .. वेड्यांपुढे कमजोर ठरलेले आयुक्त म्हणून आपल्या सहीचे प्रमाणपत्र देवून टाका .
वाहतूक समस्येने त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या मानगुटीवर हेल्मेटचे  ओझे टाकण्यास तुम्ही खूपच आतुर झाला आहात . हि खरोखरच तुमची तळमळ आहे कि, आणखी कोणी तुमचा बोलविता धनी असेल तर तसे सांगून टाका.. म्हणजे तुमच्या मानगुटीवर वरचे तरी हे ओझे उतरेल .तेव्हा अट्टाहास सोडा.. भाजपचे सरकार घालवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जनतेला त्रास देण्याचे कारण नाही . जनता समर्थ आहे .. कोणाचे सरकार घालवायचे आणि कोणाचे आणायचे याचा निर्णय जनता घेईल . तुम्ही कशाला या त्रांगड्यात पडता ? त्या पेक्षा दिवसेंदिवस वाढलेल्या चोऱ्या, गुन्हे , बेकायदा दारू धंदे , मटका अड्डे या कडे लक्ष द्या ..तिथे कायदा राबवा ..अशा प्रकारातून कोण किती हप्ते वसूल करताहेत हे पाहून त्यांच्यावर कारवाई करा .
तुमच्या कार्यालया समोर एका महिलेने पेटवून घेण्याची वेळ का आली ? त्यावर मंथन करा . दारू धंद्याविरोधात तक्रार केली म्हणून दारू धंद्यावाल्यांनी तिचा छळ सुरु केला आणि तिने तुमच्या कार्यालया समोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला .. या ची थोडी तरी बाळगा .. तुमच्या पोलिसांचे कोणाला सहाय्य आहे हे यावरूनही तुमच्या लक्षात येत नाही काय ?जनतेची खरी काळजी घ्या, तसा आता नव्या वर्षात तरी संकल्प  करा साहेब ..आणि दर महिन्याला जनतेसमोर अहवाल ठेवा किती मटका अड्डे आणि बेकायदा दारू धंदे कायमचे बंद केले ,आणि त्ये ज्यांच्या हद्दीत सुरु होते त्या त्या पोलीस प्रमुखांवर काय काय कारवाई केली ते कळू द्यात .. म्हणजे मग पटेल कि खरोखर तुम्हाला जनतेची काळजी आहे म्हणून.. हेल्मेट सक्ती करून उगाच आपला जनतेच्या हिताचा कळवळा दाखवू नका , ये पब्लिक है ..सब जानती है …तेव्हा अट्टाहास सोडा .. भाजप सरकार चे काय करायचे ते जनतेवर सोडा …
..आम्ही कित्येक वर्षे जेव्हा जेव्हा सक्ती राबविण्याचे भूत अवतरले तेव्हा तेव्हा त्याला पळवून लावले आहे , आता तुमच्या मानगुटीवर बसलेले भूत हि पुन्हा पळवून लावण्याची जबाबदारी ‘त्याच त्याच ‘आमच्या सारख्यांना पार पाडावी लागणार आहे .तेव्हा पहा समजुतीने घ्या .. तुम्ही चांगले अधिकारी आहात ..चांगले म्हणूनच रहा .. जनता जनार्दनाची  खरी काळजी वाहा … आज तर एवढेच पुरे

राज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी

0

मुंबई :-सौभाग्य योजनेंर्तगत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत राज्यातील सर्वच १० लाख ९३ हजार ६१४ घरांना वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ३१ डिसेंबर पर्यंत १०० टक्के वीजजोडणी द्यावयाची होती. परंतू महावितरणने हे उद्दिष्ट २७ डिसेंबरलाच पूर्ण केले आहे.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना “सौभाग्य” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ दि. २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला होता. या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. अशा सर्वच लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे.
वीजजोडणी देण्यात आलेल्या एकूण १० लाख ९३ हजार ६१४ घरांपैकी महावितरणने पारंपारिक पध्दतीने १० लाख ६७ हजार ६०३ घरांना तर महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारे उर्वरित २६ हजार ०११ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. राज्यातील सर्वच ३४ जिल्ह्यात वीजजोडणीचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून सर्वाधिक १ लाख ४८ हजार २६४ वीजजोडण्या पूणे जिल्ह्यात देण्यात आलेल्या आहेत.
सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यांत वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. अरविंद सिंह यांच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने सौभाग्य योजनेत १०० टक्के वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

हेमंतकुमार टम्टा बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालक पदी रुजू

0

पुणे: सर्वात जुन्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकां पैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून श्री. हेमंतकुमार टम्टा रुजू झाले. त्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी कार्यभार सांभाळला आहे.

1985 मध्ये परिवीक्षा अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या नंतरच्या 33 वर्षांच्या कालावधीत बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्टकार्य केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नियुक्ती पूर्वी ते
कॅनरा बँकेमध्ये रिटेल विभागाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनरा बँकेने यामध्ये सर्वात जास्त वाढ नोंदविली होती. श्री. हेमंतकुमार टम्टा यांनी त्यांच्या कार्यकाळात बँकिंगमध्ये विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.बँकेच्यामूलभूतधोरणमध्येसुधार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्णयोगदान आहे.बँकिंगकार्यक्षेत्राच्या विविध अंगाचा त्यांना समृद्ध अनुभव असून कॅनरा बँकेच्या नागपूर, आग्रा येथील शाखा आणि प्रशासकीय कार्यालये तसेच दिल्लीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्य  केलेआहे.
हेमंतकुमार यांना एलएलबी पदवी, एमबीएआणिबँक व अर्थ क्षेत्रातील आयबीसीएफपदवी प्राप्त आहे.