Home Blog Page 3011

– उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

0

शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण…ही आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची गोष्ट.

आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, “नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.

आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला… त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर…

या अभिनेत्रीला मिळाला ‘झी युवा तेजस्वी सन्मान’

0

फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात

अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत.

अशाकृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे

. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’

पुरस्कार जाहीर झालेआहेत. हा कार्यक्रम झी युवावर रविवार २० जानेवारीला संध्याकाळी ७

वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर

यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिला ‘तेजस्वी चेहरा’ या सन्मानाने गौरवण्यात येणार

आहे.

हिंदी-मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली श्रिया पिळगावकर हिने

वयाच्या ५व्या वर्षांपासूनच कॅमेराची भाषा शिकली. लहानपणी तिने तू तू मे मे या मालिकेत

बिट्टूची भूमिकावठवली. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं पण तिने

तिच्या अभिनय कौशल्याने भारतातच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता मिळवली.

अभिनयच नव्हे तर श्रियानेदिग्दर्शन क्षेत्रात देखील आपली चुणूक दाखवली. तिने द पेन्टेड

सिग्नल आणि ड्रेसवाला या २ शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या. तसेच पंचगव्य या डॉक्युमेंट्रीच

दिग्दर्शन करून तिने वेगळ्याच विषयाला हातघातला. अशा सर्वगुण संपन्न अभिनेत्रीला झी

युवा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात ‘तेजस्वी चेहरा’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

…झी युवा सन्मान रविवार २०जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर.

नाते स्नेहबंधाचे

0

आमचाही असाच एक दहिसरचा ग्रुप आहे पण आम्ही कुणीही एकमेकांचे नातेवाईक नसून  स्नेही आहोत. आमच्यामधले असलेल्या स्नेहबंधाचे नाते तयार झाले आहे. त्याची सुरुवात  सिद्धेश कामत यांच्या तबला कार्यशाळेने झाली. आमची मुलं त्यांच्याकडे तबला शिकतात. कार्याक्रमाच्या निमित्ताने आम्ही पालक एकमेकांना भेटतो. त्यातून मग वर्षातून किमान दोन वेळा तरी कौटुंबिक सांगितिक कार्यक्रम  होऊ लागले. त्यात मुलांबरोबर पालकांच्या सुप्त गुणांनाही वाव दिला जातो.  सिद्धेश सरांनी आमच्या समोर तबला कार्यशाळेची संकल्पना मांडली.

या नवीन  उपक्रमाची सुरुवात आश्रमशाळेच्या कार्यशाळेपासून झाली. त्यानंतर मग आमच्याच ग्रुपमधल्या सौ. कांचन वहिनींच्या घरी केळवे-माहिमला, सौ. नीता वहिनींच्या फार्म हाऊसवर बोर्लीला, श्री. पै. मामांकडे केळवे-माहिमला तबला कार्यशाळेचे आयोजन केले. साधारण 10 ते 16 वयोगटातील 15-16 मुलं आणि 4-5 पालक असे आम्ही एकत्र जमतो. इथे कुठल्याही प्रकारच्या जाती-धर्मांचे बंधन नाही, येईल त्याला आमच्यात सामावून घेतो. खेळीमेळीच्या या कार्यक्रमात सगळे उत्साहाने सहभागी होतात. मुलांना कुठल्याही क्लासला न जाता व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे मिळतात. एकत्र कुटुंब पद्धती, गावातल्या त्या घरामुळे आजोळ म्हणजे काय याचा अनुभव  मुलांना मिळतो. चुलीवरचा स्वयंपाक, पंक्तीपद्धतीने जेवण, अंगणातल्या गप्पा-गोष्टी या सर्वांचा सगळे जण मनसोक्त आस्वाद घेतात. कुणीही कुणाचे नातेवाईक नसलो तरी एक स्नेह कुटुंबाचा आनंद आम्ही सगळेच घेतो.  पहाटे उठून रियाझ करणे, आपापली कामे करणे, छोटया-मोठया कामांना मदत करणे या सगळ्यामुळे थोड्याप्रमाणात का होईना पूर्वीच्या काळच्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा मुलांना अनुभव मिळतो. वेग-वेगळ्या विषयांवर चर्चा करणे. त्यांच्या तबला विषयावर वाद-विवाद स्पर्धा, त्यातून त्या मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो. आम्हा पालकांना सुद्धा एकत्र आल्यामुळे खूप  काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात.  एकमेकांचे रिती-रिवाज, नवीन काही पदार्थ, राजकारण, साहित्य, कला विषयांवरच्या चर्चेत विचारांची देवाण-घेवाण होते. आमच्यापैकी कुणी व्यावसायिक आहेत तर ते एकमेकांना कसे उपयोगी पडू शकतात यावरही चर्चा होते.

मुलांना आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक कलेचीही माहिती असावी, त्यांना गोडी निर्माण व्हावी या हेतूने नवीन उपक्रम राबवणार आहोत.  कौटुंबिक,  सांगितिक कार्यक्रमाबरोबर कविता वाचनाचा कार्यक्रम, पुण्याच्या कार्यशाळेबरोबर सिंहगड, शनिवार वाडा तसेच केळकर म्युझियम यांचीही सहल असेल. केळवे-माहिमला आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी कार्यक्रम, त्यांच्या ग्रंथालयासाठी पुस्तके आणि मुलांसाठी अभ्यासाचे साहित्य. अशा या छोट्या-मोठ्या उपक्रमांतून  समाजकार्य करण्याचाही प्रयत्न असणार आहे.

मुलांचे तबला शिक्षण पूर्ण झाले तरी आमच्यातील स्नेहबंध हे असेच राहणार आहेत. आणि ह्या स्नेहबंधातूनच नव-नवीन उपक्रम  आणि सामाजिक कार्य करण्याचा आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न असेल. असे हे आमचे स्नेहबंधातून निर्माण झालेले स्नेह-कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत.

– पुर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

अखेर ‘एचसीएमटीआर’ रस्ता ‘ट्रॅक’वर ! १२ वर्षांच्या पाठपुराव्याला यश :माजी उपमहापौर आबा बागुल

0
पुणे: (प्रतिनिधी)  नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी  शाश्‍वत पर्याय ठरणाऱ्या  ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीसाठी [रिंगरोड ]  पालिका आयुक्तांनी    २०१९-२० च्या अंदाजपत्रकात २११ कोटी रुपयांची तरदूत केल्याने या  महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे,अशी प्रतिक्रिया या रिंग रोडसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
 
यासंदर्भांत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’चा आराखडा पूर्ण झाला असून केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे. साहजिकच एक मोठे शहर म्हणून पुणे उदयास येत आहे. आता तर स्मार्ट सिटीच्या दिशेने पुण्याचा प्रवास सुरु झाला आहे. विस्तारणाऱ्या या शहराच्या गरजाही वाढल्या आहेत.विशेषतः वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या एचसीएमटीआर रस्त्यासाठी  नियोजन होणे आवश्यक आहे मात्र गेले अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. प्रशासन पातळीवर प्रक्रिया सुरु होती मात्र मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवल्याने या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. तसेच स्थायी समितीनेही ३०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. 
एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे.  रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या  मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.तसेच काही जागेचे भूसंपादन अजून होणे बाकी आहे. या रस्त्याच्या उभारणीसाठी बीओटी , पीपीपी मॉडेल, डिफर्ड पेमेंट  यांचा अवलंब करण्याबरोबर  केंद्र शासनाच्या योजनांमधून अनुदान मिळविता येऊ शकते अशा  सूचनाही यापूर्वीच करण्यात आलेल्या आहेत  असेही आबा बागुल यांनी नमूद केले. 
गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी रिंगरोड हा शाश्‍वत पर्याय ठरला आहे. मागील ३५  वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर)  आता  दिलासादायक ठरणार आहे.  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा रिंग रोड आता  मार्गी लागणार असल्याने  पुणेकरांना शहरांतर्गत भेडसावणारा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल, असा विश्वासही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केला.   

‘ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स् ‘ साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

0

पुणे :युनायटेड नेशन्सने सर्वांसमोर उद्दिष्ट म्हणून ठेवलेले ‘ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स् ‘ जगासाठी हितकारक आहेत , ते साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे ‘ असे प्रतिपादन विकसनविषयक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर यांनी आज केले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून  आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर   यांच्या हस्ते ,डॉ कुलजित उप्पल यांच्या उपस्थितीत  १८ जानेवारी रोजी ,सकाळी ११ वाजता या परिषदेचे उद्घाटन झाले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ  पी ए  इनामदार हे उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते .

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (आझम कॅम्पस )असेम्ब्ली हॉल येथे ही परिषद सुरु झाली. अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘महिला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने भारत आंतरराष्ट्रीय उदिष्टे साध्य करण्यात मागे आहे. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात आपण प्रगती केली असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आली आहे.केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ  भूषण पटवर्धन हे परिषदेच्या समारोप कार्य्रक्रमाला १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत .आबेदा इनामदार ,मुझफ्फर शेख, इरफान शेख,डॉ.एम.जी. मुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी प्रास्ताविक केले.डॉ. आफताब आलम यांनी आभार मानले.आंतरराष्ट्रीय पातळीवरील ६ विद्यापिठातून  १२० तज्ज्ञ ,संशोधक,प्राध्यापक  या परिषदेला उपस्थित आहेत. ६५ संशोधनपर पेपर्स (शोध निबंध )सादर केले जाणार आहेत .

..तर दानवेंचे सीट ही धोक्यात..पुण्यातल्या भेदाभेदीच्या राजकारणावर खासदार काकडे नाराज

पुणे-शिवसेनेसोबत युती नाही झाली तरीही भाजपचे राज्यात ४० खासदार निवडून येतील, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना आता भाजपमधूनच घरचा आहेर मिळाला आहे.भाजपचे सहयोगी सदस्य असणाऱ्या संजय काकडे यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे.खुद्द दानवे यांचेच सीट युती झाली नाही तर धोक्यात येईल .तर दुसरीकडे पुण्यातून देखील हे नवे ते जुने असा भेद निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केला जातोय .नव्यांना जर अशा पद्धतीने वागणूक दिली तर पुण्यात खूप मोठे नुकसान होईल हे मी सांगण्याची गरज नाही असेही ते म्हणाले हे सर्व सांगताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस हेच आपले नेते असून त्यांच्या कामकाज पद्धतीवर मात्र विश्वास व्यक्त केला आहे .

एका वृत्त वाहिनीला काकडे यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे कि ,दानवे यांनी ४० जागा मिळतील हे कुठल्या आधारावरम्हटले हे मला  ठाऊक नाही  , पण जर शिवसेना आणि भाजपची युती नाही झाली तर रावसाहेब दानवे यांचाच  दीड लाख मतांनी पराभव होईल, अशी भविष्यवाणी काकडे यांनी केली आहे.एवढेच नाही तर  त्यांच्या मतदार संघातून अर्जुन खोतकर यांचे त्यांना आव्हान ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी काकडे म्हणाले, रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात माझा चांगला संपर्क आहे. त्यांच्या मतदारसंघात मी सर्व्हे केला असून त्यामध्ये दानवे यांची जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. जवळपास दीड लाख मतांनी त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे..मला राजस्थानचा सर्वे करायला मुख्यमंत्र्यांनीच पाठवले होते ,महाराष्ट्राचा सर्वे करायला सांगितला  तर तो हि मी करेल ,मध्यंतरी मी जरी शरद पवार ,अशोक चव्हाण यांना भेटलो असलो तरी माझे आणि फडणवीस यांचे चांगले संबध आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजावर मी नाराज नाही. पण पक्षातील काही लोकांच्या कामकाजावर मी नाराज आहे. नवीन आणि जुने असा भेद जो पुण्यातून केला जातो आहे तो चुकीचा आहे असे मला वाटते हे नवीन ,हे जुने विसरून निवनुकांच्या तोंडावर एकत्रित काम करायला हवे आहे. नव्या लोकांची गरज लागणारच आहे , त्यांना डावलले तर पुण्यात खूप मोठे नुकसान होईल हे मी सांगण्याची गरज नाही . असे ते म्हणाले

चौथ्याही दिवशी आंदोलन सुरुच; जय महेशच्या वेळ काढूपणामुळे आंदोलक संतप्त

0
पुणे प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे बीले (एफ.आर.पी.) मिळण्यासाठी गेल्या चार दिवसापासून पुण्यातील साखर संकुलासमोर सुरु असलेले माजलगाव तालुक्यातील पीडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनामुळे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव (जि.बीड) आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव (जि.बीड) च्या प्रशासनाने खडबडून जागे होवून ऊस बीलाची रक्कम संबंधितांच्या बॅक खात्यावर जमा केली असली तरी जय महेश साखर कारखाना मात्र वेळ काढू धोरण अवलंबित असल्यामुळे आंदोलक तीव्र संताप्त झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यांनी 2018-19 गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाला 15 दिवसाच्या आत पैसे मिळावेत अफा कायदा असताना साखरसम्राट या कायद्याला धाब्यावर बसवून तब्बल तीन-तीन महिने ऊसाचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत नाहीत म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 जानेवारी पासून साखर आयुक्त कार्यालयासमोर अनोखे रसवंती आंदोलन सुरु केले आहे तरीही या आंदोलनाच्या रेट्याने सावरगाव आणि तेलगाव येथील कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर टाकले आहेत. मात्र गेड्यांची कातडी पांघरुन झोपेचे सोंग घेतलेल्या जय महेश साखर कारखाना पवारवाडी प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक 18 जानेवारी रोजी साखर संकुलासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला उत्फुर्त असा प्रतिसाद मिळत असून या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, जिल्हा संघटक रामदास ढगे, अॅड.दत्ता रांजवण, अनिल धुमाळ, विक्रम सोळंके, आकाश खामकर, ओंकार जाधव, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, तिर्थराज पांचाळ, हनुमान सरवदे, सुखदेव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बापमारे, गोविंद काळे, करण थोरात आदींसह शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
दरम्यान चौथ्याही दिवशी मोठ्या प्रतिसादात पुण्यातील साखर संकुलसमोर सुरु असलेल्या अभिनव आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रसवंती आंदोलनानंतर जागरण गोंधळ आंदोलनाला उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन साखर कारखान्यांनी समन्वयाची भूमिका घेतली असली तरी जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जय महेश साखर कारखान्याने अशीच मनमानी सुरु ठेवली तर पुढील काळात घडणाऱ्या अनुचित प्रकाराला संबंधित कारखाना प्रशासन आणि राज्य सरकारच जबाबदार असेल असे आंदोलकांनी बोलताना सांगितले.

गीतरामायण हा जीवनमुल्यांचा खजिना – गिरीश बापट

0
गीतरामायणामध्ये जीवनमूल्य आणि संस्काराचे मार्गदर्शन मिळते. भारताचा हा फार मोठा सांस्कृतिक खजिना आहे. असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मेरठ येथे गीतरामायणाच्या कार्यक्रमप्रसंगी काढले.
बुधवारी रात्री मेरठ येथील चौधरी चरणसिंह विद्यापीठाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी बापट बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ. सिध्दार्थनाथ सिंह, मेरठ महानगर पालिकेच्या महापौर सुनिता वर्मा, खासदार राजेंद्र अग्रवाल, छत्रपती संभाजी राजे,  विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रकुमार आदी मंचावर उपस्थित होते.
बापट म्हणाले, ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फड़के यांची गीत रामायण ही रचना आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन करते. वाल्मिकी रामायणानंतर सर्वाधिक लोकप्रिय झालेली रचना ही गीतरामायण आहे. गीतरामायणाचा हिंदी, बंगाली, इंगजी, गुजराती, कन्नड, कोकणी, सिंधी आणि तेलगु भाषेत भावानुवाद झालेला आहे. ही रचना ग.दि. माडगुळकरांनी लिहिली असून सुधीर फड़के यांनी संगीतबद्ध केले आहे.  यामधे रामायण या महाकाव्याच्या प्रसगांवर ५६ गीतांचा संग्रह आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.
महाराष्ट्र शासन आणि उत्तर प्रदेश शासन यांच्यामधे सांस्कृतिक करार झालेला आहे.  त्यानिमित्त गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भाजपच्या राजकारणात बहुजन नेत्यांची घुसमट

0
 पुणे- आरएसएस चा चेहरा म्हणून ओळखल्या जावु लागलेल्या,2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेल्या भाजपान्तर्गत राजकारणात मराठा आणि बहुजन समाजातील नेत्यांची उपेक्षा होताना दिसू लागली आहे.                                   मुंडे यांच्या मृत्यूनंतर आता खडसे ,राणे यांची पक्षान्तर्गत  नेतृत्वाच्या दुय्यम स्थानीच सुरू राहिलेला संघर्ष ,पुण्यातून भाजपचा बहुजन चेहरा अशी ओळख निर्माण झालेल्या काकड़े यांचे पाय खेचण्याचे सुरु असलेले राजकारण अशा गोष्टींची पार्श्वभूमी या’बहुजनांची घुसमट’या वृत्ताला लाभणार आहे*
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे, राज्यातील भाजपातंर्गत काही नेत्यांची घुसमट वाढली असल्याचे बघावास मिळत आहे. पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मंत्रीपदावरून दूर केल्यापासून नाराज आहेत. त्यांची असलेली नाराजगी त्यांनी अनेकदा बोलावून दाखविली. मात्र, मंत्रीपदाच्या गाजरापलीकडे खडसे यांच्या हाती काहीही लागलेले नाही. याउलट खडसे यांचे कट्टर विरोधक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद देऊन, खडसे यांचे खच्चीकरण करत असल्याची चर्चा पक्षातंर्गत आहे. यातच मुख्यमंत्री यांनी खासदारांच्या कामगिरीचे सादर केलेल्या अहवालात खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांची कामगिरी सरस नसल्याचा बोलबोला करत, त्यांचे तिकीट कापण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे खडसे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याची भाषा सुरू केली आहे. खडसे यांच्या पाठोपाठ ओबीसी चेहरा असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या देखील पक्षातंर्गत नाराज असल्याची चर्चा आहे. चिक्की प्रकरणावर मुख्यमंत्री यांनी त्यांना अभय दिल्याचे वरवर दाखविले असले तरी, मुंडे यांचे जलयुक्त खाते काढून घेत त्यांची कोंडी केली. भगवान गडावरील मुंडे वाद चिघळण्यासही पक्षातंर्गत नेत्यांची रसद असल्याची खुलीआम चर्चा आहे. भाजपा वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेले स्व. गोपनीथ मुंडे यांचा फोटो अनेक कार्यक्रमांच्या होर्डींगवरून गायब करून पंकजा यांना शह देण्याचे प्रकार अनेकदा झाले. कॉंग्रेसला शह देण्यासाठी बुलंद तोफ नारायण राणे यांना सुरूवातीस भाजपात प्रवेशाचे अमिष दाखविण्यात आले. मात्र  घटकपक्ष शिवसेनेची थेट नाराजी नको यासाठी त्यांना स्वाभिमानी पक्षाची स्थापना करण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्या पक्षाला एनडीएचे घटक पक्ष करून घेतले. मात्र, सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेची होणारी सातत्याने होणारी टिका लक्षात घेऊन अखेर राणे यांना डावलण्याचे काम पक्षातंर्गत सर्रासपणे करण्यात आले. राणेंना बळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्यावरच पक्षांतील नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले.  .                              पुण्यातून भाजप ला लाभलेला बहुजन-मराठा चेहरा देखील आता भाजपा पासून दूर होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेलेले संजय काकडे यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ पुण्यातून काढलेली रॅली आणि महापालिकेच्या निवडूनकीत निवडून आणलेले 100 नगरसेवक यात काकडेंचे योगदान सर्वश्रुत आहेच.पण मुख्यमंत्री फडणवीस यांचे हात पुण्यातून बळकट करण्याचे काम कोणी केले असेल तर या बाबतही काकडेंचे नाव पुढे येते.
*पुण्यातला बहुजनांचा-मराठ्यांचा भाजप चा चेहरा अशी ओळख काकडे यांची झाली असताना 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या राजकारणात मात्र भाजपच हा स्वतः चा चेहरा उखडून फेकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते आहे.आणि यात भाजप मधील अंतर्गत राजकारण यशस्वी झाले तर मात्र भाजप ला मोठा झटका बसण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही*

गायमुखवाडी येथे लक्झरी बस व पिकअप ची धडक होऊन तीन जण ठार तर पंधरा ते वीस जण जखमी

0
जुन्नर /आनंद कांबळे
नगर कल्याण राष्ट्रीय मार्गावरील गायमुखवाडी ( ता. जुन्नर ) येथे विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गेलेल्या नगर येथील ट्रॅव्हल्स व कांदयाने भरलेल्या पिकअप ४o७ ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले .
टॅव्हल्स मधील पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झाले. जखमीमध्ये काही शिक्षकांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. हा अपघात गुरुवार दि. १७ रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबत पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर व सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे अधिक माहिती घेताना सांगितले की, अहमदनगर येथील डॉन बॉस्को विद्यालय सावेडी येथील विद्यार्थ्यांच्या सहलीची खाजगी बस क्र. एम.एच. १६ बी.सी. २६५१ वसईकडून नगरकडे जात असताना जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडीत  आळेफाटया कडून मुंबईकडे कांद्याने भरलेला पिकअप ४०७ क्रमांक एमएम१६ ए वाय ४१८९ ची समोरासमोर जोरदार धडक होऊन पिकअप  चालकासह अन्य दोघे  ठार झाले.पिकअप चालक महादेव बाबाजी खोसे(वय४८), बसचा क्लिनर शैलेश बाबासाहेब निमसे (वय१९)
त्यात एका शिक्षकाचा समावेश आहे. शिक्षकाचे नाव समजू शकले नाही.
अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स व पिकअप गाडीने पेट घेतला . या अपघातात ट्रॅव्हल्स मधील १५ ते २० सहलीतील विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात स्थळी ओतूर व आळेफाटा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी जुन्नरच्या पोलिस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांनी भेट दिली.

स्वस्त धान्य अपीलावरील निर्णय हा गुणवत्तेला अनुसरून –   गिरीश बापट

0
पुणे-
बीड जिल्ह्रयातील मुरंबी (ता. अंबेजोगाई ) येथील स्वस्त धान्य दुकान अपीलावरील निर्णय हा गुणवत्तेला (मेरीट) ला अनुसरून घेण्यात आला होता. मा. उच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात शासन स्तरावरून कायदेशीर सल्ला घेवून या बाबत पुढील ‍निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
बीड जिल्हयातील मुरंबी ( ता. अंबेजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाचे मालक श्री बिभिषण नामदेव माने यांच्या अपीलावरील निर्णयात शासनाने घेतलेला निर्णय हा शासनाकडे आलेल्या माहिती व पुराव्याच्या आधारावर घेण्यात आला आहे. शासनाकडे प्राप्त अपीला वरील निर्णय हा गुणवत्तेला अनुसरून व उपलब्ध कागदपत्रावरून आधारेच घेण्यात येत असतो. शासनाला अपीलाचे अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला. मा. उच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून पुढील काळात या प्रकरणा संदर्भात कायदेशी सल्ला घेवून कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पुणे जिल्हा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी – रमेश कोंडे

0
जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन चालूच राहणार- आप्पासाहेब जाधव
पुणे:- येथील साखर संकुलासमोर बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांच्या विरोधात गाळप झालेल्या ऊसाची बीले शेतकऱ्यांना न मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने मंगळवार पासून सुरु असलेले रसवंती आंदोलन आज दिनांक 17 जानेवारी गुरुवार रोजी तिसऱ्या दिवशी देखिल सुरु असून जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन चालूच राहणार असे वक्तव्य शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव  यांनी केले तर सदरिल आंदोलनाला शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी भेट देवून पुणे जिल्हा शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी असल्याचे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील एन.एस.एल.प्रा.लि.युनिट 3 जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी ‘रसवंती आंदोलन’ सुरु केलेले असून आज दिनांक 17 जानेवारी गुरुवार तिसऱ्या दिवशी देखिल सुरु आहे. साखर आयुक्त कार्यालयात दोन कारखान्याचे शिष्टमंडळ आणि आंदोलनकर्ते यांच्यात साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी बैठक घेतली या बैठकीत तीन कारखान्यांपैकी छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या दोन कारखाना प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंतच्या गाळप झालेल्या ऊस बीलाची रक्कम येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असे कळविल्या मुळे रसवंती आंदोलनाला यश आले आहे. मात्र जय महेश साखर कारखाना प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना काहीही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलक व शेतकरी आंदोलनाची तिव्रता अधिक वाढविणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. हा कारखाना मात्र शेतकऱ्यांची बीले देण्यास मागील वर्षांपासून सतत टाळाटाळ दिरंगाई करत आहे व सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीले देण्या संदर्भात जय महेश साखर कारखान्याचे प्रशासन ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत हे रसवंती आंदोलन सुरु राहील असे शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले आहे. यावरुन जय महेश साखर कारखान्याची अडेलतट्टूपणाच्या भूमिकेचे सर्व जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. उद्या दिनांक 18 जानेवारी पासून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.
या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, जिल्हा संघटक रामदास ढगे, अॅड.दत्ता रांजवण, भागवतराव सावंत(परभणी), किसान सभेचे विलासराव बाबर, एकनाथ सावंत, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, सुखदेव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बापमारे, गोविंद काळे, करण थोरात आदींसह शिवसैनिक व शेकडो शेतकऱ्यांची या रसवंती आंदोलनाला उपस्थिती आहे.

ग्राहकांची विश्वासार्हता जपण्याला प्राधान्य- विजयकुमार कादे

0
पुणे : “शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे पैशांच्या मोलाची जाणीव आहे. मारुती सुझुकीनेही गेली अनेक वर्ष ग्राहकांना विश्वासार्ह सेवा दिलेली आहे. हीच परंपरा आणि विश्वास कायम ठेवत ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर सुमनकीर्ती कार्सचे प्राधान्य राहणार आहे,” अशी भावना उद्योजक विजयकुमार कादे यांनी केली.
मुंबई-बंगलोर मार्गावरील बाणेर-म्हाळुंगे येथे सुरु करण्यात आलेल्या सुमनकीर्ती कार्स या मारुती सुझुकी अरेना शोरुमच्या उद्घाटनावेळी विजकुमार कादे बोलत होते. यावेळी मारुती सुझुकी इंडियाचे रिजनल मॅनेजर विनित जैन, झोनल मॅनेजर कौशल किशोरे, अभिजित तांदुळवाडकर, दीपक सभरवाल यांच्यासह विजयकुमार कादे यांचा मित्र परिवार, कुटुंबीय व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयकुमार कादे म्हणाले, “आमच्याकडे मारुती सुझुकीची 2012 पासून अधिकृत डीलरशीप आधीपासूनच होती. आता आम्ही या पुण्यातील पहिलीच ‘मारुती सुझुकी अरेना’ ही प्रिमियम शोरुम सुरु केली आहे. जवळपास 7000 चौरसफूट परिसरात ही शोरुम असून, येथे 250 पेक्षा कर्मचारी ग्राहकसेवेत असणार आहेत. मारुती सुझुकीची नवी मॉडेल्स येथे सादर करु शकणार आहोत. आई सुमन कादे, दादासाहेब कादे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्नी दीपाली कादे यांच्या सहकार्याने व्यावसायात यशस्वीपणे वाटचाल करत आहे, याचा आनंद आहे. ग्राहकांचा हाच विश्वास यापुढेही जपण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.”
याप्रसंगी काही ग्राहकांना पाहुण्यांच्या हस्ते गाड्यांची चावी हस्तांतरित करण्यात आली. शोरुमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पर्यायी इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल भारतासाठी गरजेची : नितीन गडकरी

0

पुणे: पेट्रोल आणि डिझेल या खर्चिक आणि प्रदूषण करणा-या इंधनांचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल यांसारख्या पर्यायी इंधनांवर प्रगत व्हावी यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. पर्यायी इंधने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल (फीड स्टॉक ) भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन श्री गडकरी यांनी केले.
येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ने आयोजित केलेल्या १६ व्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान विषयक दिवसांच्या परिषदेच्या (सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी) दुस-या दिवशी श्री गडकरी यांनी पर्यायी इंधने, इलेक्ट्रिक वाहने, देशातील वाहतूक समस्या याबाबत सरकारने योजलेल्या उपायांची तसेच धोरणांची माहिती दिली. संस्थेच्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे, केंद्रीय नीती आयोगाच्या मिथेनॉल विषयक समितीचे सदस्य प्रशांत गुरुश्रीनिवास, द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (TERI ) चे महासंचालक श्री अजय माथूर तसेच परिषदेचे निमंत्रक ए बादुशा या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मिथेनॉल उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोळशाच्या राखेपासून, भाताच्या तसेच अन्य पिकांच्या ताटापासून किंवा जंगलात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींपासून मिथेनॉल ची निर्मिती करता येईल, असे सांगून श्री गडकरी म्हणाले, की मिथेनॉल इंधन वापरणा-या वाहनाचा प्रति किलोमीटर खर्च खूपच कमी आहे. देशात मिळणा-या पेट्रोल मध्ये १५ टक्के मिथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेची पडताळणी करण्याच्या कार्यक्रमाचा श्री गडकरी यांनी शुभारंभ केला. पुण्यात ARAI मध्ये मिथेनॉल विषयक संशोधनासाठी रस्ते वाहतूक खात्याच्या निधीतून एक प्रगत संशोधन केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स ) सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली.
देशात शेती क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत असताना अशा उत्पादनाचा वापर इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल अशा पर्यायी इंधनाची निर्मिती करण्यासाठी केला पाहिजे यावर भर देत श्री गडकरी यांनी सांगितले की अशी पर्यायी इंधननिर्मिती करणे उद्योगांना आर्थिकदृष्ट्या आकर्षक व्हावे यासाठी सरकार उपाययोजना करील. पर्यायी इंधनाचे १००० कारखाने सुरु करता येतील एवढा कच्चा माल भारताच्या शेतीक्षेत्रातून मिळू शकेल आणि त्यातून शेतक-यांचे अनेक प्रश्न सुटायला मदत होईल असे श्री गडकरी म्हणाले.
ARAI च्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी पेट्रोल मध्ये १५ टक्के मिथेनॉल मिश्रण करण्यासाठी होत असलेल्या चाचण्यांची माहिती दिली. असे मिश्र इंधन वापरून चाललेल्या वाहनांतून उत्सर्जन कमी होते तसेच ही वाहने प्रति लिटर जास्त अंतर कापतात असे निदर्शनाला आल्याचे सांगितले. खास पाहणीसाठी चालवलेल्या दुचाकी तीनचाकी आणि मोटारी यांच्यावर या चाचण्या झाल्या आणि आता चालू वापरातल्या ववाहनांवर या चाचण्या होतील असे त्या म्हणाल्या.
श्री. गुरुश्रीनिवास म्हणाले की मिथेनॉल चा ईंधन म्हणून वापर यशस्वी झाला तर २०३ पर्यंत भारताची कच्चे तेल आयात करण्याची गरज २० टक्क्यांनी कमी होईल. वीजनिर्मितीनंतर तयार होणा-या कोळशाच्या राखेपासून मिथेनॉल उत्पादन करणारा एक प्रकल्प येत्या तीन वर्षात सुरु होणार आहे असे त्यांनी सांगितले.
परिषदेचे निमंत्रक श्री अकबर बादुशा यांनी उपस्थितांचे आभार मानले. शुक्रवारी परिषदेच्या समारोपाच्या सत्रात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री अनंत गीते यांचे प्रमुख भाषण होईल.

‘ रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ‘ या विषयावरील डॉ . अशोक मोडक यांच्या शोध निबंधाचे शनिवारी प्रकाशन

0

पुणे :डॉ . अशोक मोडक संशोधित ‘ रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ‘ या विषयावरील पुस्तक स्वरूपातील शोध निबंधाचा प्रकाशन कार्यक्रम शनिवारी १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे .

‘संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘च्या ‘डॉ . श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ‘ तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

‘संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
हा प्रकाशन कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ . एन . एस . उमराणी यांच्या हस्ते गरवारे कॉमर्स कॉलेज च्या सावरकर सभागृहात , शनिवारी १९ जानेवारी रोजी ,सकाळी १० वाजता होणार आहे .

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . मंगेश कुलकर्णी ,डॉ शरद खरे, डॉ. शरद देशपांडे,इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत .