Home Blog Page 3010

…तर नारायण राणे पुन्हा कॉंग्रेस मध्ये …?

0

पुणे-कॉंग्रेस सोडून गेलेल्या नारायण राणेंना पुन्हा पक्षात आणण्यासाठी एका मोठ्या कॉंग्रेस नेत्याने मध्यस्थी केली असल्याची चर्चा आहे. राणे सध्या भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत त्यांना भाजपने  जाहीरनामा समितीत स्थान दिले असले तरीही भाजप शिवसेना युती होऊ शकते.तसे झाले तर भाजप राणेंचा पत्ता कट करणार,हे उघड आहे.कारण राणे आणि शिवसेना यांचे हाडवैर आहे.त्यामुळे राणे कॉंग्रेसमध्ये परत येण्याचा विचार करू शकतात.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी कॉंग्रेसकडे राणेंइतका तुल्यबळ नेताच नाही.

नारायण राणेंनी सध्या भाजपशी जुळवून घेतले असले तरीही शिवसेनेशी युतीसाठी भाजप त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची शक्यता आहे.त्यामुळे राणे अस्वस्थ असून राणेंना पुन्हा आपल्याकडे घेऊन कोकणातून लोकसभेची उमेदवारी देवू शकतात अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता मुंबई -दिल्ली रेल्वेने पोहचा अवघ्या १९ तासात

0

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहायाने करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासन म्हणजे डबल इंजिन आहे. त्यामुळे विकासात्मक कामे जलद गतीने होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अवघ्या १९ तास ३० मिनीटांत पोहोचविणाऱ्या पहिल्या राजधानी रेल्वेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून  गोयल बोलत होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून डिजीटल पद्धतीने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रोहा येथून  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी एकाचवेळी  दिवा -पनवेल-रोहा या ट्रेनचा शुभारंभ केला. याचबरोबर पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर विस्तारीत सेवा ट्रेनचाही डिजीटल पद्धतीने मंत्री गोयल यांनी तर पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मंत्री गोयल  आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पनवेल स्थानकातील सुधारणांच्या सुविधांचे, पश्चिम स्थानकांच्या २१ स्थानकांवर ४० नव्या एटीव्हीएम मशीनचे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण या स्थानकावरील प्रकाश व्यवस्थेमध्ये सुधारणांचे, घाटकोपर स्थानक एईडी व्यवस्था, दिवा-वसई पुल, पेण-रोहा रेल्वेमार्गातील विद्युतीकरण आदींचे डिजीटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तर, आठवले यांच्या हस्ते १०० फुटांचा राष्टध्वज समर्पित करण्यात आला. या राजधानीत एक्सप्रेसमध्ये वर्च्युअल ३डी ग्राफीक वाय फायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार असून, त्याचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला.

गोयल म्हणाले, २७ वर्षानंतर राजधानी एक्सप्रेस सुरू होत असून, मध्य रेल्वेच्या सेवेतून पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू होणे ही रेल्वे प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे. १९ तास ३० मिनीटात दिल्ली गाठणारी ट्रेन कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी या वेगळ्या पर्यटक मार्गाने जाणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांना आता दिल्लीचा प्रवास सुखर होणार आहे. एका दिवसात १०० टक्के ही ट्रेन आरक्षित झाली ही आनंदाची बाब आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता मुंबई-दिल्ली फे-या वाढविण्याचा विचार करण्यात येईल असेही गोयल यावेळी म्हणाले.

गोयल म्हणाले, मध्य रेल्वेची ही पहिली राजधानी ट्रेन ऐतिहासिक ठरणार असून, राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे विकास कार्यास गती मिळणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. याचबरोबर भारतीय रेल्वे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचेही  गोयल यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयाने ठपका ठेवूनही बापटांवर कारवाई का नाही – राष्ट्रवादीची निदर्शने

पुणे –पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अन्नपुरवठा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे यासर्व प्रकारणातील दोषी गिरीष बापट यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी व त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की पुणे शहराचे नाव खाली घालवण्याचे काम पालकमंत्र्यानी केले आहे तुरडाळ घोटाळा, रेशन घोटाळा, आणि आता तर कोर्टाने त्यांच्या कार्यपध्दतीवरच ठपका ठेवला आहे यासर्व गोष्टींची जबाबदारी स्विकारुन पालकमंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा.

मुख्यमंत्री पारदर्शक कारभाराचा आव आणतात आणि त्यांचे मंत्रीमंडळातील मंत्र्यावर न्यायलय कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत आहे हा कसला पारदर्शक कारभार , मुख्यमंत्र्यानी त्यांच्या मंत्रीमंडळातील एका जेष्ठ मंत्र्यावर न्यायलयाने ठपका ठेवला म्हणून त्यांचा राजीनामा घेतात आता मुख्यमंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचा राजीनामा घेणार का ? पालकंंत्र्यानी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामान्मुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केली.

यावेळी नगरसेवक वनराज आंदेकर , अशोक कांबळे, युवक अध्यक्ष राकेश कामठे, सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले,ओ.बी.सी विभागाचे अध्यक्ष संतोष नांगरे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इक्बाल शेख,कसबा कार्याध्यक्ष गणेश नलावडे,प्रदिप देशमुख,कॅंटोन्मेंट कार्याध्यक्ष फहिम शेख,कोथरूड अध्यक्ष स्वप्नील दुधाणे,सुनिल खाटपे ,विजय खराडे,अजय दराडे,मृणालिनी वाणी,मनोज पाचपुते,माणिकशेठ दुधाणे,दादा सांगळे,बाबा पाटील,महेश हांडे, किशोर कांबळे,विशाल नाटेकर,संजय खोपडे,प्रेम भांडे,बबलु जाधव,सागर भदारके,सागरराजे भोसले,हरीश लडकत,अब्दुल हाफिज,सदाशिव गायकवाड,निखिल बटवाल, विकी वाघे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी वा कार्यकर्ते उपस्थित होते.

डान्स बारची छमछम पश्चिम महाराष्ट्रात सुरु होऊ देणार नाही -राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग

0

पुणे :महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील डान्स बारबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे. या निर्णयानुसार रात्री ११. ३० वाजेपर्यंत डान्सबार खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभागाने दिला आहे.

सरकारच्या या निर्णयाबाबत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग (पश्चिम महाराष्ट्र विभाग) चे अध्यक्ष सनी मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मानकर म्हणाले, ‘आर आर पाटील आबा यांनी डान्सबार बंदी वर चांगला निर्णय घेतला होता. तसा कायदादेखील केला गेला. मात्र, आताच्या सरकारने ही बंदी उठवून चांगली बाजू मांडली नाही. या बंदी उठवण्याने युवक, महिला वर्गाचे बरेच नुकसान होणार आहे. आत्तापर्यंत या डान्सबारमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. कुटुंबांचे नुकसान झाले आहे. युवक वर्गात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत गेले आहे. याची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे, हे सरकार पैशांच्या मागे लागून अशाप्रकारचा निर्णय घेत आहे हे खेदजनक आहे.

‘राज्यात डान्सबारवर घालण्यात आलेली अनेक बंधने सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातले डान्सबार खुलेआम सुरू होणार आहेत. या बंदी उठवण्यामुळॆ कोणत्याही सुसंस्कृत व्यक्ती किंवा सुजाण व्यक्तीस आनंद होऊ शकणार नाही. हा निर्णय महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी दुर्दैवी आहे. आम्ही या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रात डान्सबार ची छमछम सुरु होऊ देणार नाही, यासाठी पावले उचलावी या करिता आंदोलन करणार आहोत.’

वीजबिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद

0

मुंबई-महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते.तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडींगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्रि क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य होईल.

फोटो मीटर रिडींग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येईल.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे.याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे

सायकल योजनेचा बट्ट्याबोळ – पेडल कंपनीची माघार

0
पुणे-पुणे शहरात मोठ्या धुमधडाक्यात आणि स्वतः महापालिकेत नगरसेवकांनी सायकली चालवीत येवून ‘सायकल चालवा ‘ चा इतरांना संदेश देवून  सुरू केलेल्या  पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेतून आता पेडल या कंपनीने माघार घेतली आहे. त्यांनी या योजनेसाठी दिलेल्या चार हजार सायकली परत घेतल्या आहेत. त्यासाठी सायकलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले आहे.शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी सर्वसाधारण सभेसाठी विचारलेल्या प्रश्नोत्तरातून हे वास्तव समोर कागदोपत्री  आले आहे.
एकंदरीत सायकल हि शहराची गरज उरलेली नसताना सायकलीच्या नावाखाली रस्ते अरुंद करायचे आणि खाजगी वाहनांची गळचेपी करायची असे विचित्र धोरण अवलंबून शेकडो कोटी रुपयांची उधळण करायची असे प्रकार कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या सर्वपक्षीय राजकारणात आणि अर्थकारणात ,प्रशासनाच्या मदतीने सुरु आहेत . अर्थात या अशा सायकल योजनांचा बट्ट्याबोळ उडणारच हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ च आहे. आणि ती कबूल केली नाही तरी अशा वास्तवातून स्पष्ट होणारी आहे.
शहरात एकात्मिक सायकल आराखडा योजनेनुसार एकूण ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रस्तावित आहेत. त्यांपैकी पथ विभागामार्पâत सुमारे २६ किलोमीटरचे ट्रॅक तयार केले आहेत. ६५ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रगतीपथावर आहेत.  . सायकलीचा वापर, नागरिकांची मागणी यानुसार फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, कर्वे, एमआयटी, शिवाजीनगर, कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सिंहगड रोड, नांदेड सिटी, कर्वेनगर, बी.टी. कवडे रस्ता, अ‍ॅमानोरा हडपसर, औंध, पुणे विद्यापीठ या भागात सुमारे ५२६ सायकल स्टेशन्सची आखणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
शेअरिंग योजनेअंतर्गत अनेक कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत. त्या कंपन्यांनी सायकली स्वखर्चाने भाडेतत्त्वावर उपलब्ध करावयाच्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपन्यांचीच असणार आहे. त्यापासून मिळणारे उत्पन्नही संबंधित कंपन्यांनाच मिळणार आहे. त्यातून पालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. पालिकेला त्यास आर्थिक तोषिस लागणार नाही. पेडल कंपनीने चार हजार सायकली, मोबाईकने अडीच हजार, इल्यू या कंपनीने  दोन हजार सायकली पुरविल्या आहेत. पेडल कंपनीने चार हजार सायकली पुरविल्या होत्या. मात्र, १२ डिसेबर २०१८ रोजी पत्र पाठवून त्यांच्या सायकलींमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दिले आहे. या सायकली अद्ययावत करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पासून पेडल कंपनीने चार हजार सायकली परत घेतल्या आहेत, अशी धक्कादायक लेखी माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी सर्वसाधारण सभेसाठी विचारलेल्या प्रश्नोत्तरातून समोर आली आहे.

पुणे- मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी जाहिर निवेदन प्रसिद्ध

0

पुणे-  – महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरण अधिनियमातील
तरतूदीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पुणे- मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी
जाहिर निवेदनाद्वारे शनिवार दि. १९/१/२०१९ रोजी हरकती मागविल्या आहेत.
हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या अमेरिकन
कंपनीने व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. प्राधिकरणाने पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला
नगर विकास विभागाच्या दि. २ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयाअन्वये पायाभूत सुविधा
प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच ‘डीपी वर्ल्ड एफझेई व हायपरलूप
टेकनॉलॉजीज आयएनसी’ या भागीदारी कंपनीस ‘मूळ प्रकल्प सूचक’ म्हणून मान्यता देण्यात
आली आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘स्विस चॅलेंज पद्धती’ तत्वावर करण्यात येत आहे.
तसेच प्रकल्पासाठीचा खर्च हा खाजगी गुंतवणूकीतून केला जाणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात
करणे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात पुणे महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १४ किलोमीटर डेमो
ट्रॅकची निर्मिती करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी
मार्ग तयार करण्यात येणार आहे.
हायपरलूप प्रकल्पामुळे ‘हितसंबंधित व्यक्तीस किंवा थेट बाधित होणाऱ्या कोणत्याही
व्यक्तीस अशी घोषणा प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या कालावधीच्या आत
(दि.१८/२/२०१९ पूर्वी) सदर प्रकल्पाबाबत किंवा सदर प्रकल्पाचा मूळ प्रकल्प सूचक
असलेल्या अशा व्यक्तीविरुद्ध त्याने मालकीविषयक, बौद्धिक संपदा हक्क स्वतःहून किवा
त्याच्यावतीने दोषपूर्ण रीतीने प्राप्त केला असल्यास , तसेच जाहिर निवेदनात नमूद प्रकल्पाच्या
अन्य विविध बाबी अशा कारणास्तव प्राधिकरणाकडे हरकती सादर करता येतील.
मा. महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले की, ‘पीएमआरडीएकडून हाती घेतलेला
हायपरलूप प्रकल्प हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या प्रकारचा देशातील पहिला नाविन्यपूर्ण
प्रकल्प आहे. पुणे-मुंबई या दरम्यानचे अंतर या हायपरलूप प्रकल्पामुळे केवळ ३० मिनिटांत
पार करण्याचे उदिष्ट असून नागरिकांना सुरक्षित आणि अति वेगवान प्रवासाचा अनुभव घेता
येणार आहे. प्रकल्पाबाबत जर कोणाच्या हरकती असतील तर त्या मुदतीत सादर कराव्यात
असे आवाहन करण्यात येत आहे .

दोन पोलीस अधीक्षकांना जन्मठेपेची शिक्षा -25 लाखाच्या खंडणीचे प्रकरण

0

जळगाव- चाळीसगाव (जि.जळगाव) येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालिन अप्पर पोलिस अधिक्षक आणि मुंबई होमागार्डचे पोलिस अधीक्षक मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जळगाव सेशन कोर्टाने दोघांना दोषी ठरवले होते.

मनोज लोहार आणि धीरज येवले या दोघांवर 2009 मध्ये चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात 16 जानेवारी रोजी मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाचे दोषी ठरवले होते. या प्रकरणी शनिवारी शिक्षा सुनावण्यात येणार होती. भादंवि कलम 354 (अ) अन्वये दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना 30 जून 2009 रोजी चाळीसगाव येथे घडली होती. दरम्यान, मनोज लोहार यांची जळगाव जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती

भारतीय विचार जगात महत्वाचा ठरेल :डॉ . एन . एस . उमराणी

0

पुणे :ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरु घसिदास विद्यापीठ ( विलासपूर ) चे कुलपती डॉ . अशोक मोडक संशोधित ‘ रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ‘ या विषयावरील शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशन शनिवारी ,१९ जानेवारी रोजी झाले .’संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘च्या ‘डॉ . श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ‘ तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
हा प्रकाशन कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ . एन . एस . उमराणी यांच्या हस्ते गरवारे कॉमर्स कॉलेज च्या सावरकर सभागृहात , शनिवारी १९ जानेवारी रोजी ,सकाळी ११ वाजता झाला.
डॉ . उमराणी म्हणाले ,’स्वामीजींच्या विचारांचे आंतरराष्ट्रीय पडसाद पुढे आणणारा हा शोध निबंध महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे . त्याच्या भाषांतरासाठी पुणे विद्यापीठ निधी उपलब्ध करून देईल . भौतिकवादाचा भस्मासूर फोफावत असताना भारतीय विचार जगात महत्वाचा ठरणार आहे . ‘डॉ अशोक मोडक म्हणाले ,’रशियात सध्या मांडणी होत असलेला राष्ट्रवाद आणि भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद यात नाते आहे . स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची मोहिनी टॉल्स्टॉय आणि अनेक रशियन प्राच्यविद्या अभ्यासकांवर होती .स्वामी विवेकानंद हे समाजवादी होते ,अशी मांडणी भारतात आणि भारताबाहेर केली जाते ,ती निराधार आणि विकृत आहे . ‘पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . मंगेश कुलकर्णी ,डॉ शरद खरे, डॉ. शरद देशपांडे,इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .’संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजश्री देशपांडे यांनी आभार मानले.

नृत्य नाटिकेतून घडले स्त्री संतांच्या कार्याचे दर्शन !

0
पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या   सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘भारतीय कला केंद्र ‘ प्रस्तुत  ‘ समर्पण   ‘ या  भरतनाट्यम नृत्य नाटिकेला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे  हा कार्यक्रम   शुक्रवारी ,१८ जानेवारी  रोजी सायंकाळी झाला. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
संत कान्होपात्रा ,संत मुक्ताई ,संत जनाबाई या ३ स्त्री संतांची कार्याची  रूपे मांडणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम होता.  मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची तर लेखन अनघा काकडे यांचे होते . तिन्ही संतांच्या जीवनकार्याची कथा अभंगाच्या पार्श्वभूमीवर नृत्याच्या पार्श्वभूमीवर उलगडत गेली  .
नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे ,  संगीत स्मिता महाजन यांचे होते . अनुश्री केतकर ,श्रिया एकबोटे ,प्रज्ञा कदम ,बिलंदी कुलकर्णी ,भार्गवी अत्रे ,श्रद्धा पवळे ,आदी सहभागी झाले
 भारतीय विद्या  भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम होता. 

बहारदार रागदारीने स्वरोत्सवाला सुरुवात -सानिया पाटणकर यांचे गायन; रईस खान, दीपक भानुसे यांच्या सितार-बासरीची जुगलबंदी

0
पुणे : अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित गंगाधर स्वरोत्सवाला बहारदार रागदारीने सुरुवात झाली. प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांनी नंद रागात ‘ढूंढ बन सैया’ ही विलंबित बंदिश आणि ‘मोहे करन दे बतिया’ दृत बंदिशीने गायनाला सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक बसंत रागातील ‘सरसा सुगंध फुल खिले’ या बंदिशीसह सादर केलेल्या ‘कैसी कटे बरसात रे’ कजरी रागाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नीलेश रणदिवे (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), ईश्वरी श्रीगार व सुगंधा उपासनी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यंदा स्वरोत्सवाचे चौथे वर्ष आहे. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात हा स्वरोत्सव रविवारपर्यंत (दि. २०) रंगणार आहे. सानिया पाटणकर यांच्या सुरेल गायनानंतर रईस खान यांच्या सितारवादनाने, तर दीपक भानुसे यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी गायक अमोल निसळ, स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना अन्नछत्रे, अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा आदी उपस्थित होते. मधुरा ओक यांनी सूत्रसंचालन केले.
स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते, असे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी सांगितले.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सतर्फे नऊ महिन्यांत ९४७० कोटी रुपयांचे न्यू बिझनेस प्रीमियम कलेक्शन,

0

देशातील आघाडीची विमा कंपनी एसबीआय लाइफ इन्शुरन्सने आपल्या न्यू बिझनेस प्रीमियममध्ये ३२ टक्क्यांची वाढ नोंदवली असून ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ९४७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत ही आकडेवारी ७२०० कोटी रुपये होती.

 संरक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत एसबीआय लाइफचे संरक्षण न्यू बिझनेस प्रीमियम १६०० कोटी ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १०६० कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षातल्या या कालावधीत ही आकडेवारी ३९० कोटी रुपये होती व यंदा त्यात १७० टक्क्यांची वाढ झाली आहे. वैयक्तिक न्यू बिझनेस प्रीमियम १४ टक्क्यांनी वाढून ६६०० कोटी रुपयांवर गेला आहे, तर वर्षभरापूर्वी या कालावधीत ही आकडेवारी ५७९० कोटी रुपये होती.

एसबीआय लाइफचा करोत्तर नफा ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १३ टक्क्यांनी वाढून ८७० कोटी रुपयांवर गेला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीतील करोत्तर नफा ७७० कोटी रुपये होता.

कंपनीचे सॉल्व्हन्सी गुणोत्तर डिसेंबर २०१८ मध्ये २.२३ च्या दमदार पातळीवर राहिले असून नियामक आवश्यकता केवळ १.५० आहे.

एसबीआय लाइफची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता डिसेंबर २०१८ पर्यंत १,११,६३० कोटी रुपयांवरून २०.२ टक्क्यांनी वाढून १,३४,१५० कोटी रुपयांवर गेली असून डेट- इक्विटी मिक्स ७८ : २२ आहे. डेट गुंतवणुकीचा ९० टक्के भाग एएए आणि सॉव्हेरियन इन्स्ट्रुमेंट्समध्ये आहे.

कंपनीचे वितरण नेटवर्क वैविध्यपूर्ण असून त्यात १,७४,६५१ प्रशिक्षित विमा व्यावसायिक, देशभरातील ८५९ कार्यालये, दमदार बँकइन्शुरन्स चॅनेल, एजन्सी चॅनेल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, मायक्रो एजंट्स, कॉमन सर्व्हिस सेंटर्स, विमा विपणन संस्था, वेब अग्रीगेटर्स व थेट व्यवसाय यांचा समावेश आहे.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सबद्दल

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची (एसबीआय लाइफ/द कंपनी) स्थापना २००१ मध्ये झाली असून ती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीएनपी पारिबस कार्डिफ ए.ए. यांची संयुक्त भागिदारी आहे. एसबीआय लाइफ ही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी आहे. एसबीआय लाइफचे अधिकृत भांडवल २०.० अब्ज आणि पेड अप भांडवल १०.० अब्ज आहे.

एसबीआय लाइफतर्फे जीवन विमा आणि निवृत्ती वेतन उत्पादनांची सर्वसमावेशक श्रेणी स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून ग्राहक सेवेचा उच्च दर्जा आणि जागतिक दर्जाची कार्यकालीन क्षमता यांची खात्री कंपनीतर्फे दिली जाते. कंपनीने वैयक्तिक आणि समूह उत्पादने उपलब्ध केली आहेत व त्यामध्ये विविध प्रकारच्या ग्राहकांच्या विमाविषयक गरजांसाठी बचत तसेच संरक्षक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

एसबीआय लाइफकडे बहुआयामी वितरण नेटवर्क असून त्यात विस्तारित एसबीआयबरोबर बँकइन्शुरन्स चॅनेलचा समावेश आहे. या नेटवर्कला बँकेच्या देशभरातील २२ हजार शाखांचे पाठबळ लाभलेले आहे. एसबीआय लाइफकडेही ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत १,१३,०४५ उत्पादनक्षम एजंट्सचे अतिशय मोठे नेटवर्क कार्यरत आहे. कंपनीच्या इतर वितरण माध्यमांमध्ये थेट विक्री आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, विमा विपणन संस्था व इतर मध्यस्थांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कंपनीच्या देशभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये ८४८ कार्यालयांचा समावेश होतो व त्यांच्याद्वारे ग्राहक गरजा प्रभावीपणे आणि कार्यक्षमपणे पूर्ण केल्या जातात. कंपनीची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत १२६१.७ अब्ज आहे.

कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथे नोंदणी झालेली आहे.

आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकार अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धा

0

पुणे-

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील  गौरवशाली पर्व म्हणजे  आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुजन फौंडेशन यांच्या क्रांतीअभियान या विशेष उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य चळवळीला उजाळा,हुतात्म्यांना अभिवादन, क्रांतिकार्य उजाळा,राष्ट्रीय एकात्मता, विद्यार्थी गौरव, सामाजिक समस्या व उपाय योजना बाबत जनजागृती, व्याख्यान , निबंध स्पर्धा , थोर महापुरुषांच्या, देशभक्ताच्या  व स्वातंत्र्य सैनिक यांच्या  क्रांतिकारी आठवणींना उजाळा व समाजहित व देशहिताच्या कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची ओळख व कौतुक समारंभ अशा विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.

   राज्यस्तरीय खुल्या  निबंध  स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे असे आहेत.भारतीय स्वातंत्र्य लढा व सातारा प्रतिसरकार, भारतीय स्वातंत्र्य लढा व आझाद हिंद सेना, क्रांतिसिंह नाना पाटील व शेतकरी,कामगार चळवळ , नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य क्रांतीपर्व, स्वच्छ भारत माझे योगदान, स्वदेशी चळवळ आजची गरज, सेंद्रिय शेती काळाची गरज, जलसंधारण काळाची गरज. सदर निबंध स्पर्धा ही विद्यार्थी, पालक, शिक्षक , व सर्वा करिता खुली राहील.निबंध ठरवून दिलेल्या कोणत्याही एका विषयावर असावा.निबंध हा कागदाच्या एकाच पृष्ठभागावर सुवाच्य अक्षरात सातशे ते आठशे शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंधासोबत आपलं संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर,इमेल,व्हाट्स अप नंबर असावा.

     स्पर्धा प्रवेश विनामूल्य राहिल ,महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जातील, बक्षीसाचे स्वरूप रोख रक्कम ,गौरव चिन्ह व प्रमाणपत्र असे राहील .सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.स्पर्धकांनी आपले निबंध अध्यक्ष सुजन फौंडेशन  मु पो आदरकी बु. ता फलटण जि सातारा ४१५५३७ या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख  २७ फेब्रुवारी आहे.सदर स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक अजित जाधव  यांनी केले.

ग्रंथप्रदर्शनास ग्रंथरसिकांचा चांगला प्रतिसाद

0
जुन्नर /आनंद कांबळे

 जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय व  डायमंड पब्लिकेशन्स  पुणे यांनी भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनास ग्रंथरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.ग्रँथ प्रदर्शनाचे उद्घाटन जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार कांता मस्करे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य डॉ. विलास जोशी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, ग्रंथापाल  लक्ष्मण थोरात, प्राध्यापक  व विदयार्थी उपस्थित होते.
प्रदर्शन २० जाने. २०१९ पर्यंत चालू राहणार असून प्रदर्शनात सुमारे ५० प्रकाशकांची पंचवीस हजार विविध विषयांवरील पुस्तके सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. दिवसभरात दोन हजार ग्रंथरसिकांनी प्रदर्शनास भेट देवून ग्रंथ खरेदी केली.
समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महाविद्यालयात दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षा व माहितीपर पुस्तकांना विशेष मागणी आहे.  तर महिलांकडून पाककृती व महिला वाडमयाची मागणी आहे. इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या प्रभावातही जुन्नरमध्ये वाचन संस्कृती टिकून आहे याचा प्रत्यय पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे.

माध्यम हक्कांचे वापर समाज कल्याणासाठी व्हावे -कश्मीर विधानसभेचे अध्यक्ष हाजी अनायत अली

0

पुणे, ता. १८ :- देशाला स्वतंत्रता अनेक संघर्ष आणि बलिदानामुळे मिळाली आहे. आमच्या हक्कांना समाजाच्या कल्याणासाठी वापरल्यास देशात शांतता नांदेल. समाजाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी सोशल माध्यमाच्या वापर व्हावा. फेक न्यूजपासून जागृक राहत सोशल माध्यमातील आपल्या हक्कांना समाजाच्या हितासाठी वापरावे, असे प्रतिपादन जम्मू कश्मीर विधानसभाचे अध्यक्ष हाजी अनायत अली यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेच्या पहिल्या सत्रातील फेक न्यूज आणि सोशल मिडिया या विषयावर ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि इंडियन एक्सप्रेस पुणेचे निवासी संपादक अमिताभ सिन्हा, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व प्रमुख निमंत्रक आणि एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. धारूरकर, पंजाबचे विद्यार्थी नेते नवज्योत कौर, छत्तीसगडचे विद्यार्थी नेते शैलेश कुमार पांडे, तेलगणातील विद्यार्थी नेते पी. केशवन, महाराष्ट्राचे विद्यार्थी नेते इमाद यु हुसैन आदी उपस्थित होते.

हाजी अनायत अली म्हणाले, सोशल मिडियामुळे क्रांती आली. मात्र त्याचे दुष्परिणाम होताना दिसत आहे. सोशल मिडिया चुकीच्या बातम्या पसरविण्याचे मोठे माध्यम बनले आहे. ते समाजासाठी हानीकारक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत, मात्र याच माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवत अशांतात निर्माण केली जात आहे. राजकीय लोक चुकीचे वक्तव्य करतात, त्याच्या फेक न्यूज बनतात. त्याचे विपरित परिणाम समाजावर होते. आमच्या हक्कासाठी अनेकांनी बलिदान दिले, या बलिदानाचा अनादर करत सोशल मिडियातून हक्कांची पायमली होताना दिसत आहे. युवकांनी चुकीच्या घटना आणि बातम्यांना पसरवू नये. सोशल मिडियात सुशिक्षित नागरिक चुकीच्या बातम्या परसवितात. मानवतेच्या अकल्याण आणि अशांततेसाठी या मिडियाचा वापर होताना दिसत आहे. मात्र यातून बाहेर येत समाजाच्या शांततेसाठी काम करण्याची आता गरज आहे. शांततेसाठी सोशल मिडियाचा उपयोग व्हावा.
अमिताभ सिन्हा म्हणाले, फेक न्यूज विषयी आपण कसे डील करता याकडे लक्ष असावे. सोशल माध्यमातून सकारात्मक विचार पसरविण्याची आवश्यकता आहे. चुकीच्या बातम्या न तपासता पसविल्या जातात. काही फेक न्यूज जाणूनबाजून पसरविल्या जातात. काही बायस असतात, हे समाजासाठी घातक आहे. सोशल मिडिया हे तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर चांगल्या माहितीसाठी आणि समाज हितासाठी व्हावे. या माध्यमाद्वारे आपल मत, विचार मांडू शकता, मात्र अविचार पसरविण्याचे आणि फेक न्यूज माध्यमातून तणाव पसरविला जात आहे. फेक न्यूज पसरविणे हा गुन्हा आहे. सोशल माध्यमाचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रामध्ये बातम्यांची पडताळणी करूनच छापली जाते. सोशल मिडिया मोठे माध्यम आहे. सोशल माध्यमाचा वापर सकारात्मक विचाराच्या प्रसारासाठी करावा.
नवज्योत कौर म्हणाल्या, सोशल मिडिया हा आपले विचार मांडण्याचे चांगले माध्यम आहे. फेक न्यूजच्या माध्यमातून समाजाला अशांत करण्याचा डाव आहे. उघड्या डोळ्यांनी सरासार बुद्धीने विचार करत सोशल मिडियाचा वापर करणे आवश्यक आहे.
शैलश कुमार पांडे म्हणाले, सोशल माध्यम चुकीच्या बातम्याचे व्यसपीठ झाले आहे. सर्वांच्या भावनांशी खेळ होत आहे. संचारच्या या वरदान अभिशापमध्ये बदलले आहे. अनेक वेबसाईटच्या माध्यमातून चुकीच्या फोटोसह व्हिडिओची ओळख पडू शकते. मिडियाला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.
पी. केशवन म्हणाले, सोशल मिडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरविले जात आहेत. युवकांनी याची खात्री करूनच पुढे पाठवावे. फोटो आणि व्हिडिओ एडिट करून राजकीय नेते परसवितात. त्यावर विश्वास ठेऊ नये. खात्री करणे आवश्यक आहे. बातम्या तपासून पाहणे आवश्यक आहे.
इमाद उल हसन म्हणाले, फेक न्यूज मुळे अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. फेक न्यूज हे समाजात अशांतता परसविण्याचे शस्त्र झाले आहे. सरकारने यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी पडताळणी करूनच सोशल माध्यमामध्ये बातम्या पसरवाव्यात.
प्रा. डॉ. व्ही. एल. धारूरकर यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट आणि नलिनी शर्मा यांनी केले.