पुणे- अबब , प्रती किलोमीटर ला १८ कोटी ३९ लाखाचा खर्च … अशा आशयाचे फलक आज सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर लाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या मार्गावर होणाऱ्या उधळपट्टी कडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे .राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष नितीन कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे फलक आज लावले .
सातारा रस्ता एकेकाळी झाडी असलेला रस्ता होता वाढते अपघात ,अरुंद असलेला हा रस्ता राज्य महामार्ग होता . आता राज्य महामार्ग शहराबाहेर गेले .पण तत्पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेकांच्या खाजगी जागा ताब्यात घेऊन हा रस्ता प्रशस्त करण्यात आला . आणि एवढा प्रशस्त करण्यात आला कि तेथून सर्व वाहतूक सुरळीत होऊ शकते . पण अशी स्थिती असताना देखील आज बीआरटी ,सायकल मार्ग यांच्या नावाने रस्त्याची दुर्दशा करून ,खाजगी वाहनांची गळचेपी करण्यात आली पर्यायाने ..रस्ता मोठा झाला तरी वाहतूक सुरळीत झाली नाही .चौका चौकात मध्येच धावत जाऊन ,वाहतुकीला धोकादायक पद्धतीने आडवे जाणारे वसुली पंटर पोलीसांची आता त्यात भर पडली आहे .
भरीत भर म्हणून आज राष्ट्रवादीच्या नितीन कदमांनी या रस्त्यावर होणाऱ्या खर्चाचे आकडे जाहीर करून आणखी बॉम्ब फोडला आहे. तब्बल १८ कोटी ३९ लाख रुपये प्रती किलोमीटरला खर्च करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढे सारे पासिये खर्च करून सातारा रस्ता काही सुरळीत किंवा सोन्याचा होणार नाही हे सांगायला कोणाचीही आवश्यक्यता भासणार नाही .पण नेमके काय होते आहे ..याकडे यानिमित्ताने कदम यांनी लक्ष वेधले आहे खरे ….
पर किलोमीटरला १८ कोटी खर्च – याला काय सोनं लावलंय काय ?(व्हिडीओ)
पुरंदरेंचा पदमविभूषण पुरस्कार मागे घ्या – भीम आर्मीची मागणी
पुणे-शिवशाहीर पुरंदरे यांना पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे . याला आक्षेप घेत भीम आर्मी पुणे शहर शाखेच्या वतीने निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आले . बेलबाग चौक सिटी पोस्ट येथे भीम आर्मीचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आली . आणि शासनाने हा पुरस्कार मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली .
पुरंदरे यांनी आजपर्यंत इतिहासाचे विकृतीकरण करून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्य आणि बदनामीकारक लिखाण केले आहे . ज्यामुळे या महापुरुषांची खरी ओळख समाजासमोर आली नाही . व बहुजन समाजाची दिशाभूल झाली त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊंची बदनामी करून , जेम्स लेन सारख्या शिवद्रोही व्यक्तीला माहिती पुरवून परिवर्तनवादी जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे . अशा व्यक्तीला पदमविभूषण देउन देऊन गौरव करणे योग्य नसून , हा अपमान आहे . त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पुरस्कार तात्काळ मागे घ्यावा हि मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली . यावेळी नीता आडसुळे , दीपाली भालेराव , मीना गवळी , अभिजित गायकवाड , आबा सावंत , अंतिम जाधव , शरद ओव्हाळ , सीताराम गंगावणे , गौतम कोट , मुकेश गायकवाड , भीमराव कांबळे , राजू वाघमारे , गणेश पगारे , अजित गायकवाड , अमर पडागळे , महादू खळगे , वैभव सावंत , सुमित वाघमारे , श्रीकांत शेंडगे , जयवंत पोळ , बाळू गायकवाड , राकेश साबळें , विनोद शिंदे , दयानंद कांबळे , अर्जुन सोनवणे , प्रकाश म्हस्के , आश्रफ खान , अलोक भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते .
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत युवा महासंगम ३ फेब्रुवारी रोजी, ५० हजार तरुण येणार मुंबईत
मुंबई-मुंबईमध्ये आयोजित होणाऱ्या ‘सीएम चषक’च्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा महासंगम’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे ५० हजारांहून अधिक तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. सायनच्या सोमैया ग्राउंडमध्ये आयोजित होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ४३ लाख स्पर्धकांपैकी निवडले गेलेले ५० हजार तरुण-तरुणी या सोहळ्यात सहभागी होतील. महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर व मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी ही माहीती दिली.
सीएम चषकाच्या या भव्य समारोहात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, खासदार पुनम महाजन, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अंतिम १२९ विजेत्यांना सन्मानित करतील. सीएम चषकच्या अंतिम सोहळा यशस्वी करण्यासाठी सोमैय्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सीएम चषकची सांगता भव्य कार्यक्रमरूपाने व्हावी यासाठी कार्यकर्ते पूर्ण उत्साहाने एकत्र काम करताना दिसून येत आहेत. आमदार टिळेकर मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या बरोबर प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, युवा मोर्चाचे सरचिटणीस आमदार संतोष पाटिल दानवे व विक्रांत पाटील हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सीएम चषकच्या एकूण १२ स्पर्धामध्ये राज्यभरातील सुमारे ४३ लाख स्पर्धकांनी भाग घेतला. यातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून ५० तरुण-तरुणी युवा महासंगम मध्ये सहभागी होतील. महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात युवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी सायन येथील सौमैया ग्राउंडवर सीएम चषक सांगता सोहळा पार पडणार असून यामध्ये यावेळी क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्तरावर भव्य स्वरूपात आयोजित होणाऱ्या या ग्रँड फिनालेमध्ये कला-क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक आदर्श शिंदे आपल्या आवाजात ‘सीएम चषक’साठी रचलेलं प्रसिद्ध गीत’घेऊन टाक’ गातील. कार्यक्रमाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील सर्वात मोठी रांगोळी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून त्याचवेळी फॉर्म भरून या योजनांचा लाभ घेण्याची संधी गरजूंना मिळणार आहे. सोबतच तरुणाची आवड लक्षात घेऊन सेल्फी पॉईंटचे आकर्षण देखील य कार्यक्रमात असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कटाऊट सोबत फोटो घेण्याची संधी मिळणार आहे. तरुणांची विचारधारा लक्षात घेऊन या सोहळ्यात भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये तरुणाचे विचार समाविष्ट करून घेण्यासाठी सूचना पेटी देखील ठेवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी झापले .. ‘निष्ठावंतगिरी’ चा ढोल बडवून निवडणुका जिंकता येत नाहीत ….
पुणे- ‘करायला गेलो गणपती ,आणि झाला मारुती अशी मराठीतील म्हण आहे …त्याप्रमाणे पुण्याच्या एका बड्या भाजप नेत्याची अवस्था मुख्यमंत्र्यांपुढे झाल्याचे, स्वप्न एका भाजपच्या कार्यकर्त्याला रात्री पडले .आणि त्याने ते ‘मायमराठी’ शी सकाळी सकाळी शेअर केले … असे म्हणतात ..पहाटे पडलेले स्वप्नखरे होते .. ते सोडा, खरे होऊ ,खोटे होऊ द्यात पण काय होते ते स्वप्न जरा पाहू यात ..
.ते गेले एका खासदाराचे गाऱ्हाणे घेऊन ..याच्यामुळे बदनामी होतेय ,पक्षात संदिग्धतेच वातावरण निर्माण होतेय ,आमच्यासारख्या निष्ठावंतांची तोंड तुमच्यामुळे गप्प आहेत कारण तो तुम्हीच माझा नेता म्हणून प्रचार करतोय त्याला आवर घाला ,नाहीतर कठीण आहे ‘ …
….तुम्ही निष्ठावंत ,निष्ठावंत म्हणून ओरडू नका, माहिती आहे तुम्ही ज्येष्ठ आहात …पण निव्वळ या उपाध्या लाऊन पक्षाचे हीत साधले जात नाही, सत्ता येत नाही ..आणि तुम्हीच तर प्रचार केलात ..पुढे सत्ता येईल कि नाही सांगता येत नाही …असो तुम्ही पुण्याचे नेते समजता स्वतःला.. पण पाहता स्वतः पुरते , कधी संपूर्ण पुण्याचा सर्व विधानसभा मतदार संघाचा विचार केला आहे काय ? तुम्ही कार्यकर्ते घडवलेत काय ? सांगा ,कोण ,कोण कार्यकर्ते तुम्ही घडवलेत .. खडकवासला विधानसभा मतदार संघातून तापकिरांना किती वेळा लढवायचे ? त्यांच्या शिवाय दुसरा कोणी आहे काय पर्याय तिथे ,तुम्ही संधिसाधू स्वार्थी राजकारण केले ..कधी दुसरा कार्यकर्ता उभा राहू दिला नाही , मुंडेंचे समर्थक असलेले डवरी यांचे काय झाले ठाऊक आहे सर्वांना , जुने कार्यकर्ते प्रकाश गोरे आणि मिलिंद दास्ताने हे पक्षापासून का दूर गेले .खडकवासल्यात तापकीरांनी स्वताचेच घोडे दामटले आणि कार्यकर्त्यांचा खडखडाट झाला .माझ्याशिवाय विधानसभेला कोणी नाही हि स्थिती निर्माण केली आणि आता त्यामुळे तिथे राष्ट्रवादी जड होऊन बसली आहे त्यांच्याकडे 4/4 तगडे घोडे रेस मध्ये आहेत. आपल्याकडे एकच … एखाद्याला खेचून आणू शकता काय तुम्ही भाजपमध्ये ..आणला तर परत हा जुना तो नवा वाद घालीत बसणार … अहो पुन्हा पक्षाला मागे नेऊन ठेवता आणि स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेता . तीच परिस्थिती हडपसर विधानसभा मतदार संघात आहे.टिळेकर नकोय आम्हाला ..तो पडणार असंच एलायबी रिपोर्ट आहे तिथे तगडा पर्याय आहे काय तुमच्याकडे … सोडा .. हा फुसका निष्ठावंतांचा जयघोष स्वतःपुरते पाहणारे स्वार्थी राजकारणी तुम्ही..प्रसंगी कलमाडी आणि पवारांशी तुमची नाळ जुळलेली पुणेकरांनीच पाहिली ..
कॉंग्रेस कडे नाहीय तसा आपल्याकडेही लोकसभेला देखील तगडा उमेदवार नाही हे हि लक्षात घ्या ..साऱ्यांची मदार एकावरच .. तोच कॉंग्रेस राष्ट्रवादीला हि हवाय ..
-अहो साहेब , जोशी ,छाजेड ,शिंदे असे अनेक आहेत कॉंग्रेस मध्ये …
…पहा ,लागलात वकिली करायला कॉंग्रेसची ..भिमालेंना विचारा, यातला सेटलमेंट पंटर कोण आहे …आणि राहिले बाकीचे त्यांची पालिकेला तरी निवडून येण्याची क्षमता आहे काय ?हे सारे कॉंग्रेस वाले तसे तुम्ही हि जाणून आहात …त्यांच्याकडे सत्ता नाही पण आपल्याकडे सत्ता असून हि तुम्ही तगडे उमेदवार देऊ शकत नाही हे लक्षात घ्या ..त्या तुमच्या वर्तुळातल्यांना सांगा ..आणि बडवा हवा तेवढा ‘निष्ठावंतगिरी चा ढोल..पण त्याने निवडणुका जिंकता येत नाहीत हे देखील लक्षात घ्या ..आता तुम्हाला शिकाव्यचे किती ..तब्बेतीची काळजी घ्या …जा ..बघू आम्ही, तुम्हाला ज्याचा अवेळी त्रास होतो त्याचे काय करायचे ते करूच आम्ही …..
(अखेर स्वप्न च हे ..पण ..त्याची बातमी होऊ शकत नाही ? असा प्रश्न अनेक उपस्थित करतील…पण ‘तोता मैना च्या काल्पनिक राजकीय सफरी ‘ लिहिलेल्या आम्हाला राहवले नाही ..म्हणून ‘सपने अपने अपने ‘ हि मालिका येथे सुरु करीत आहोत. )
अहमदाबादचे आर्किटेक्ट डॉ. बिमल पटेल आज पुणे महापालिकेला देणार शहर विकासाचे धडे …
पुणे -शहरात स्थानिक विकास आराखडा (लोकल एरिया प्लॅन), तसेच नगररचना (टीपी स्कीम) योजना राबविण्यासाठीचा संभाव्य आराखडा, त्यातील अडचणी काय आहेत, योजनेचे फायदे काय होणार, याची माहिती देण्यासाठी अहमदाबाद येथील आर्किटेक्ट पद्मश्री डॉ. बिमल पटेल बुधवारी महापालिका सभागृहात सादरीकरण करणार आहेत. नगरसेवक, महापालिकेच्या अभियंत्यांसह याविषयाचे अभ्यासक या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
केंद्र सरकारने अमृत योजनेतर्गंत स्थानिक विकास आराखडा आणि नगर रचना याद्वारे बांधकाम क्षेत्राला चालना देण्याबरोबरच नियोजनबद्ध विकासासाठी या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभरातील २५ शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात येणाऱ्या तांत्रिक सल्लागारांचा खर्च हा अमृत योजनेच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. पुणे शहरात बालेवाडी (नदीपात्रालगत) आणि महंमदवाडी येथे नगररचना योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांमधून जाणाऱ्या रिंग रोडलगत नगररचना योजना राबविण्यास शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली आहे.
या योजनेसाठी किमान ५० हेक्टर, तर कमाल ५००-६०० हेक्टरपर्यंत क्षेत्राचा विचार करण्यात येतो. सरकारने नव्याने कायद्यात केलेल्या बदलांमुळे ही योजना राबविण्याचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. कायद्यातील या योजनेची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पुण्यात महंमदवाडी, तसेच बालेवाडी (नदीपात्रालगत) ही योजना राबविणे शक्य असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पटेल अहमदाबाद येथील सीईपीटी विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. शहर नियोजन, इतिहास, जमीन वापर योजना, बांधकाम व्यवसाय, इमारत नियम आणि जमीन व्यवस्थापन यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांना या क्षेत्राशी निगडीत अनेक पुरस्कार मिळाले असून भारत सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. पटेल यांचे नगर रचना विषयावर होणारे सादरीकरण पुण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया टिळक यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या खासदारकीसाठी संजय काकडेंना राष्ट्रवादीचा पाठींबा …?
पुणे- राष्ट्रवादीचे आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय काकडे यांच्या घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात नेत्यांच्या आणि समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत . तर, ‘ हे होणारच ,या पुढे अशा घटनांना वेग येईल’ असेही समीक्षकांचे म्हणणे आता ऐकायला येवू लागले आहे . ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठा असलेल्या भाजपच्या सहयोगी खासदार काकडे यांची भेट घेतल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी काकडे यांना निश्चित असल्याचे बोलले जाऊ लागले आहे . रविवारी एका कार्यक्रमानिमित्त आलेले भुजबळ हे काकडे यांच्या कार्यालयात आले. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळाच मात्र खळबळ उडाली आहे.
आपल्याला भाजप नक्की लोकसभेची उमेदवारी देईल असा वारंवार दावा करणाऱ्या आणि मुख्यमंत्री हेच आपले नेते असे वारंवार सांगणाऱ्या खासदार काकडे यांच्याबाबत ‘कामापुरता मामा’ पद्धतीचे झालेले राजकारण सारे राजकीय कार्यकर्ते आणि समीक्षक जाणून आहेत . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने पुण्याची जागा परंपरागतरित्या कॉंग्रेस कडे सोपविली आहे. मात्र पुण्यात कॉंग्रेसकडून असलेले इच्छुक पाहता कोणीही दमदार उमेदवार नाहीच हि भूमिका राष्ट्रवादीची कायम राहिली आहे . आणि पुण्याची जागा हातची घालवू नये यासाठी येथे तगडा उमेदवार द्यावा असा आग्रह राष्ट्रवादी चा आहे. आणि कॉंग्रेस मधील अनेकांचा देखील आहे. एवढेच नव्हे तर माजी महापौर ,उपमहापौर असलेल्या कॉंग्रेसच्या अनेक विविध भागातील नेत्यांनी काकडे यांच्या कामाला प्रारंभ देखील केल्याचे दिसते आहे .एकीकडे अशी स्थिती असताना ‘सेटलमेंट’ च्या कारणांनी कोणी काकडे यांना काहीहितार्थी विरोध असतील तर त्याकडे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष करावे असा आग्रह राष्ट्रवादीतून होत असल्याचा दावा समीक्षकांकडून होतो आहे .विजय हे समीकरण घेवूनच उमेदवारी हे यामागील कारण असल्याचे सांगितले जाते.
या सर्व चर्चांना आता भुजबळ -काकडे भेटीने उधाण आले आहे. आणि अनेकांनी काकडे यांची उमेदवारी कॉंग्रेस मधूनच असा दावा करायला सुरुवात केली आहे. दरम्यान काकडे यांनी या भेटी संदर्भात काहीही बोलायला अगर प्रतिक्रीया व्यक्त करण्यास नकार दिला असल्याने त्याबाबत आणखी संशयाचे धुके गडद होताना दिसते आहे . एकंदरीत काकडे यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भुजबळांनी घेतलेली भेट ..हि राजकीय वर्तुळात गूढ बनताना चित्र दिसते आहे.. खासदार काकडे यांच्यामागे ओबीसी समाजासह सर्व बहुजन समाजाने ताकदीने उभे राहावे व ओबीसी समाज ताकदीनं काकडेंबरोबर राहील असा शब्द छगन भुजबळ यांनी खासदार काकडे यांना दिला यावेळी दिल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
चलता है…. एक अॅटीटयूड
रिक्षावाल्याने सरळ चुकीच्या दिशेने गाडी घातली आणि वर समोरच्यावर दादागिरी करुन त्यालाच ओरडला… न राहून मग मी विचारलेच, तुम्ही रिक्षा वन वे मध्ये घातली, तुम्ही नियम तोडला ना… आणि त्या समोरच्यावर ओरडताय?’ त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिले, ‘मॅडम, रोजच आम्ही या रोडने येतो, मोठया गाड्या अलाऊड नाही.., एवढा टर्न घेऊन कोण लांबून येणार. रिक्षा, बाईक काय तसा प्रॉब्लेम नाही.. चलता है.. सब!’ ’ मी त्याचे हे उत्तर ऐकून उडालेच. चलता है… म्हणजे नक्की कोणाला चालतं… हे असं नियम मोडणं? आपणच आपलं ठरवायचं.. आणि नियम धाब्यावर बसवायचे. खरं तर खूप राग आला पण काहीच करु शकले नाही.
‘’चलता है…’ हा शब्दप्रयोग दिवसभर आपण अनेक ठिकाणी ऐकत असतोच की. भाजी मार्केटमध्ये गेलात तर भाजी घेताना काही बायकांना सवय असते की एखादी काकडी, गाजर किंवा टॉमेटो भाजीबरोबर सरळ भाजीवाल्याला न विचारता आपल्या पिशवीत टाकतात आणि वर सांगतातही की, चलता है … इतना सब्जी तो लिया!
कधी रिक्षाचे 21 रुपये झाले की 20 रुपये हातावर टेकवायचे आणि म्हणायचेही चलता है.. 1 रुपया ही कम है!
नो पार्कींगच्या जागी गाडी पार्क करायची… आणि चलता है .. थोडी देर के लिए तो गाडी पार्क की है…
ट्रेनमधून उतरलो की डब्यातले पंखे बंद न करणे हे तर ठरलेलेचे असते. काही बायका तर मस्त गाडीत भाजी निवडतात, संत्री खातात आणि ‘चलता है..’ च्या आविर्भावात ती पायाने सीटखाली ढकलतात. ट्रेनमध्ये सीटसाठी क्लेम लावून सुद्धा एखादी अचानक त्या सीटवर येऊन आदळते आणि वर म्हणते सुद्धा ‘चलता है…’ क्लेम लगाया है तो क्या हुवा?…
तिकीटाच्या, बसच्या रांगेत, पोस्ट ऑफीसमध्ये, बँकेत तर काही जणांना मध्ये घुसण्याची सवयच असते. आणि वर तोंड करून सांगतात ही ‘चलता है…, लेट हो गया है…’ असे आणि अशाप्रकारचे बरेच अनुभव आपल्या सगळ्यांना रोजच येत असतात.
‘चलता है…’ या अॅटीट्यूडचा रोग आता दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे. कोणाला चालतं हे असं बेशिस्त, बेजबाबदार, बेदरकार वागणं आणि का खपवून घेतो हे सारं.. याचा विचार करावाच लागेल. या अशा अॅटीट्यूडमुळेच कितीतरी अपघात होतात. बेशिस्तपणा बळावतो. दादागिरी वाढत जाते.
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांनी दिला आदिवासी मुलांना ‘माशेलकरी मंत्र’!
पुणे : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका, रोज नवे शिकण्याचा ध्यास ठेवा, चिकाटीसह कामात सातत्य ठेवा, अंगात नम्रता बानवा असा ‘माशेलकरी मंत्र’ आदिवासी मुलांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज दिला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकलव्य विज्ञान परिषद 2019’ चे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तत्ज्ञ डॉ. माधव गोडबोले होते. यावेळी मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. माधव देव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नातू, तरुण खगोल संशोधक श्वेता कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन संस्थेच्या संचालक डॉ. रिता मुल्हेरकर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे, प्रकल्प संचालक माधुरी यादवाडकर उपस्थित होत्या.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, विज्ञान हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच नसते, हा विज्ञानाचा मूलभुत सिध्दांत आहे. विज्ञानातून मिळालेले सर्वात स्वस्त आणि सुलभ उत्तरच आपण व्यवहारात वापरतो. त्यामुळे मानवी कल्याणाचे संशोधन विज्ञानाच्या माध्यमातून होणे अपेक्षीत आहे.
मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर असावा, मुले कृतीतून आणि निरिक्षणातून शिकत असतात, असे सांगत शालेय जीवनात शाळेतील एका प्रयोगादरम्यान आपल्याला विज्ञानाची गोडी लागल्याचा किस्सा डॉ. माशेलकर यांनी सांगितला. तसेच मुलांना कायम प्रश्न पडत रहावेत आणि शाळेसह घरात त्यांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असावे. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. कुतुहला शिवाय विज्ञान पूर्ण होत नाही. मुलांमध्ये नवसर्जनशीलता निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगत “पॉवर ऑफ बजेट पेक्षा पॉवर ऑफ आयडीया” महत्वाचे असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
डॉ. माधव गोडबोले म्हणाले, प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरिक्षण करून त्याचा तर्कशुद्ध अर्थ लावणे हा विज्ञानाचा गाभा आहे. विज्ञान हे अुनभवावर आधारित असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या निकषावर पडताळून पहावी. विज्ञानाच्या अभ्यासाला अनेक पैलू असून निसर्गात काय सुरू आहे, याचे निरिक्षण करणे हे सुध्दा विज्ञानच आहे. आत्मसन्मान हाच मानवाचा मोठा ठेवा आहे, विज्ञानाच्या आधारे हा आत्मसन्मान वाढण्यास मदत होते. आदिवासी समाज हा सर्वाधिक निसर्गाच्या जवळ असतो, त्यांना निसर्गाकडून उपजतच ज्ञान मिळत असते. त्यामुळे आदिवासी मुलांनी हा ठेवा विज्ञानाच्या चौकटीत बसवून समाजाचा विकास साधण्याचे अवाहन डॉ. गोडबोले यांनी केले.
यावेळी डॉ. रिता मुल्हेरकर, माधुरी यादवाडकर, डॉ. नातू, डॉ. माधव देव, श्वेता कुलकर्णी यांची भाषणे झाली. डॉ. माशेलकर यांच्या हस्ते श्वेता कुलकर्णी यांच्या खगोलशास्त्राच्या चित्रफितींचे उद्घाटन झाले.
यावेळी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातील एकलव्य आदिवासी स्कूलच्या मुलांनी तयार करून मांडलेल्या संशोधन प्रकल्प मॉडेलची पाहणी डॉ. माशेलकर यांनी केली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला.
आभार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी मानले. या कार्यक्रमाला एकलव्य आदिवासी स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
पोस्टात विमा प्रतिनिधींची भरती- 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे अवाहन
पुणे:-पोस्टाच्या जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असनाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक शिवाजीनगर पुणे ग्रामीण विभाग, अधीक्षक डाकघर यांचे मार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली नमूद केलेल्या अटीची पूर्तता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर यांच्या कार्यालयास दिनांक 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.
अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे पाठवावीत शैक्षणिक पात्रता : ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा १० वी पास असावा तसेच ५००० व त्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात राहणारा उमेदवार हा १२ वी पास असणे आवश्यक आहे. वय वर्षे १८ ते ६०
कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी / माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार / स्वयंरोजगार असणारे तरुण,तरुणी किवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवारअर्ज पाठवू शकतात.इच्छुक उमेदवारांनी विमा policy विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे.
उमेदवाराची निवड १०वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणीक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल. उमेदवाराने आपले अर्ज रजिस्टर/स्पीड पोस्ट द्वारे साध्या कागदावर शैक्षणिक पात्रता व संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतीसह लीफाफावर “डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची नियुक्ती” असे लिहून अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, पुणे ४११ ००५ यांचे नावे (अर्ज) दि ०९.०२.२०१९ पर्यंत पोहचतील असे पाठवावे. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.maharashtrapost.gov.inया वेबसाईट ला भेट द्यावी, असेही पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनीआवाहन केले आहे .
‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला
पुणे : धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय… त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू… लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा हरहुन्नरी कलाकारांसोबत जमलेली मैत्री, त्याबरोबरीने उलगडत गेलेला अभिनय-दिग्दर्शनाचा महेश कोठारे यांचा प्रवास रसिकांना स्पर्शून गेला.
चित्रपट यशस्वी होणे हे फक्त दिग्दर्शकाच्या हाती नसून यात प्रत्येकाचेच योगदान तितकेच महत्वाचे असते. मा या प्रवासात अनेकांनी साथ दिली, म्हणूनच मी या क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकलो अशी नम्र भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दिग्दर्शक महेश कोठारे यांचा एक अनोखा जीवन प्रवास ” याला जीवन ऐसे नाव” या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवातीलह्ण कार्यक्रमांद्वारे रसिकांसमोर आला आणि या ८०च्या दशकापासून आजपर्यंत एक वेगळेच स्थान निर्माण करणा-या या दिग्दर्शकाने पुन:श्च रसिकांची मने जिंकली. आयडियल कॉलनी येथील मैदानावर संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, निलीमा कोठारे, नगरसेवक हेमंत रासने, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, किरण दगडेपाटील, अभिनेते अक्षय टंकसाळे, अभिनेत्री रेशम टिपणीस,प्रवीण बढेकर, अमोल रावेतकर, हर्षद झोडगे,भावना व आनंद पटेल, नंदकुमार वढावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सावाच्या निमित्ताने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल महेश कोठारे यांचा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
तात्या विंचुमुळे महाराष्ट्रात नवी ओळख मिळाली -दिलीप प्रभावळकर
मी महेश कोठारे यांच्याबरोबरीने तीन चित्रपट केले. पण, तात्या विंचूची भूमिका देऊन त्यांनी माझ्यातील खलनायक ओळखला आणि त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात माझी एक नवी ओळख निर्माण झाली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली, म्हणूनच त्याच्यातील एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक आजच्या प्रवासात टिकून असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.
दिग्दर्शक महेश कोठारे यांचा जीवनप्रवास याला जीवन ऐसे नाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडला. त्यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, सई लोकूर, सावनी रवींद्र व प्रसन्नाजीत कोसंबी आदी कलाकार सहभागी झाले. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाणी, नृत्य, संगीत या माध्यमातून सजलेल्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. तसेच पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या कोठारे यांच्या मुलाखतीतून कोठारे यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर आले. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी काम करतानाचे अनेक किस्से मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी तर सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले.
सरकारी अनास्थेला वैतागून महिलेचा पुण्यातील टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
पुणे-समाज कल्याण विभागात मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करीत नसल्याने वैतागलेल्या एका महिलेने पुणे स्टेशन जवळील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्या एका टॉवरवर चढून मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच अग्निशामक विभागाच्या विभागाच्या जवानांनी तेथे धाव घेतल्याने संबंधीत महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनूबाई येवले असे महिलेचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्या एका उंच टॉवरवर आज (दि.२९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनूबाई टॉवरवर चढल्या आणि मोठ-मोठ्याने ओरडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संबंधीत महिलेची समजूत काढून तीला सुखरुप खाली उतरवले.
माध्यमांशी बोलताना या महिलेने सांगितले की, समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. आपल्या एका प्रकरणात हे अधिकारी लक्ष घालण्यास टाळाटाळ करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण त्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीला वैतागून आपण आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
तलवारीने कापला केक, शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा..(व्हिडीओ)
पुणे -जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्याने वाढदिवशी तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या पदाधिकाऱ्याला अटक कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.पुण्यात हेल्मेट सक्ती,पाणी कपात ,वाहतूक समस्या ,बेरोजगारी,बेघरांच्या समस्या अशा विविध समस्या असताना ..आपापले वर्चस्व अशा मार्गाने प्रस्थापित करणे शिवसेनेतील अनेकांना रुचले नव्हते .शिवाय हे वर्चस्व सर्वदूर पोहोचावे म्हणून तलवारीने कापलेला व्हिडीओ व्हायरल हि करण्यात आला होता .
पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तब्बल सहा केक आणले होते. हे केक चांदेरे यांनी तलवारीने कापले. चांदेरे यांचा तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओदेखील परिसरात व्हायरल झाला होता.या प्रकारावर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती.अखेर पोलिसांनीही या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तलवारीने केक कापणे चांदेरे यांना चांगलेच महागात पडले असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. चांदेरे हे पंचायत समितीचे माजी सदस्य असून भावी आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकवरही हाच उल्लेख होता.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रा. गुप्ते, प्रा. जैन यांना ‘गोल्डन पिक्सल’ पुरस्कार
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ऍनिमेशन विभागातील प्रा. अमोल गुप्ते आणि प्रा. अंकित जैन यांना ‘गोल्डन पिक्सल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमसीई सोसायटीच्या पीए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अँड आर्टच्या वतीने आझम कॅम्पस येथे झालेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनवाय व्हीएफएक्सवालाचे सहसंस्थापक प्रसाद सुतार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य उपस्थित होते. प्रा. अमोल गुप्ते ऍनिमेशनमध्ये पारंगत असून, विद्यार्थ्यांना नवनवीन प्रकल्पांसाठी प्रोत्साहित करण्यात ते आग्रही असतात. तर अंकित जैन यांना नुकतेच एज्युकेशन आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. नवतंत्रज्ञानाचा उपयोग करून अनिमेशनचे ज्ञान देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
कोलवडीत अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएकडून कारवाई
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ता. हवेली येथील
मौजे कोलवडी येथील सर्वे नंबर ६५९/६० मधील ८०७० चौरस फूट आकारातील अनधिकृत
बांधकाम मंगळवार दि. २९ जानेवारी २०१९ रोजी जमीनदोस्त करण्यात आले.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना
प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरील
बांधकाम हे तळमजला आरसीसी स्वरूपातील होते. दिनांक २९ जानेवारी २०१९ रोजी
अनधिकृत बांधकाम निष्कासन(पाडण्याची) कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व
निष्कासन पथक क्रमांक एक मार्फत पार पडली.
पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सह्यक
अभियंता राजेश्वर मंडगे, कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, कनिष्ठ अभियंता भानुदास शिंदे यांच्या
बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात आली. पोलीस अधिक्षक सारंग
आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या
मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे की, शासन निर्णय ७.१०.१७
नुसारच्या अटीनुसार ३१.१२.२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमनाकुल करण्यासाठी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दि. २१ जुलै २०१९ पूर्वी अर्ज करून बांधकामे
नियमनाकुल करून देण्यात येतील असे आवाहन केले आहे. अनधिकृत बांधकाम करून सदनिका
कमी दरात विकण्याचे आमिष नागरिकांना दाखविले जाते. अशा प्रकारे बेकायदा बांधकामे
नागरिकांनी खरेदी करू नयेत. सदर सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. सदर
पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामधारकांच्या तालुकानिहाय याद्या pmrda.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.
मा. उच्च न्यालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. २९/२०१८,८२/२०१७ यामध्ये दि.
२/११/२०१८ रोजी आदेश दिलेला असून त्यनुसार अनधिकृत बांधकामे प्रादेशिक योजनेतील
तरतूदी व लागू असलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार नियमित करता येतील.
‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद
निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला . २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे भरले होते . स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री . पवार यांच्या उपस्थितीत झाले . युवा कलाकार गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले .या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती मांडल्या होत्या . स्कुल ऑफ आर्टच्या संचालक हेमा जैन , स्कुल ऑफ आर्ट प्राचार्य भरत लोंढे यांनी संयोजन केले .
संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते .




