Home Blog Page 3000

पुण्यात बिबट्या …..

0

पुणे :  मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केले .सुदैवाने कोणी गंभीर जखमी नाही. मात्र बिबट्या इमारतीच्या  डक्टमध्ये पडला आणि अडकला आहे .तातडीने  वन विभागाचे पथक ,आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

मुंढवा परिसरातील रेणुकामाता मंदिर ,केशवनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 7.00 वाजता सुभद्राबाई तारु (वय 80) यांनी मोठ्याने ओरडून स्वतःची सुटका करून घेतली. तसेच एका लहान मुलीला बिबट्या ओढून नेत असताना तेथील तरुण मुलांनी सोडवले. या गोंधळाच्या वातावरणात दोघांवर जबरी हल्ला चढवला. नागरिकांच्या गडबड आणि आवाजामुळे मंदिराजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस जागेवर पोहचले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंढवा मांजरी हद्दीच्या भागात मिलिटरी डेअरीचा भाग आहे. त्याठिकाणी घनदाट झाडी आहे. त्या ठिकाणाहून बिबट्या केशवनगर भागात आल्याचा अंदाज आहे.बिबट्याने तिघांवर हल्ला केला असून, या सगळ्यांना केशवनगर भागातील एका दवाखान्यात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोणीही गंभीर जखमी नाही.

मोदींच्या निवृत्तीनंतर मी ही राजकारण सोडेल – स्मृती इराणी

पुणे : मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेल असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट येथील ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. उद्योजक अतुल चोरडिया, सागर चोरडिया, महोत्सवाच्या आयोजक वर्षा चोरडिया, सबिना संघवी आणि ‘वर्डस काउंट’ या संकल्पनेच्या प्रणेत्या अद्वैता कला हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी – फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.

यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर तर संघटन हे राजकारणावर सुरु असून एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते. मात्र विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नंतर कोण असा प्रश्न विचारला असता तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे.

यंदा देखील अमेठीमधून निवडणूक लढवणार का या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की २०१४ मध्ये कोण स्मृती इराणी हा प्रश्न अनेकांनी केला मात्र आता २०१९ मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. परंतु मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.

आज विविध माध्यमांचा सर्वत्र प्रभाव आहे. मात्र काही दशकांपूर्वी जेव्हा हा प्रभाव नव्हता तेव्हा सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांसारख्या महिला नेत्यांनी आपला राजकारणातील प्रवास सुरु केला होता. तो काल आजच्या काळापेक्षा नक्कीच कठीण होता त्यामुळे या दोघीही माझ्यासाठी प्रेरणा आहेत, असेही इराणी यांनी यावेळी नमूद केले.

आज देशाची युवा पिढी ही सक्षम आहे. त्यांना कोणाकडून देखील सल्ले घेण्याची गरज नाही. ही स्मार्ट पिढीच देशाचे भविष्य असून त्यांची सकारात्मक उर्जा देशाला पुढे नेईल. तसेच स्त्रीयांनी देखील आत्मविश्वासाच्या जोरावर आपले ध्येय साधण्यासाठी इतरांच्या सल्ला आणि सहकार्याची अपेक्षा न करता वाटचाल करावी.

भारतीय जनता पक्षाने एक महिला म्हणून दुजाभाव केल्याचा अनुभव मला आज पर्यंत आला नाही. ज्या प्रमाणे पुरुष कार्यकर्ता त्याप्रमाणेच एक महिला कार्यकर्ता म्हणून मला आणि इतर महिला कार्यकर्त्यांना समान वागणूक मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र एक महिला अध्यक्ष असलेल्या पक्षाने यासाठी काही केलं नाही ही देशाची व्यथा आहे असेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे स्‍वयंपूर्ण – मनीषा कानगुडे

0

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्‍वत:च्‍या पायावर उभ्‍या झालेल्‍या मनीषा विलास कानगुडे यांची कहानी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मनीषा यांनी पुण्यातील फुरसुंगी ढमाळवाडी येथे ‘एंजेल बुटीक्‍स ॲण्ड लेडीज शॉपी’ हे दुकान सुरु करुन प्रगतीच्‍या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे.

आपल्‍या प्रवासाविषयी मनीषा कानगुडे सांगतात, मी 2016 मध्‍ये पेपरमध्‍ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जाहिरात वाचली. त्‍यानंतर मी घराजवळच्‍याच बँक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या फुरसुंगीच्‍या शाखेत चौकशीसाठी गेले. तेथे बँक मॅनेजर लखपती हे होते. त्‍यांनी योजनेची सविस्‍तर माहिती सांगितली.  मी टेलरिंगचे काम करत होते. भरतकाम, वीणकाम मला येत होते. साड्यांवर, ब्‍लाऊजवर भरतकाम, वीणकाम करुन छोटेखानी व्‍यवसाय चालू होता. पण मला भांडवल मिळाले तर माझा व्‍यवसाय वाढू शकत होता. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे माझ्या आशा पल्‍लवीत झाल्‍या. लखपती साहेबांनी सांगितल्‍यानुसार मी कर्जप्रकरण तयार केले. कर्जाची प्रक्रिया चालू असतांनाच त्‍यांची बदली झाली. मला थोडं टेन्‍शन आले. लखपती साहेबांच्‍या जागेवर सोमनाथ ससाणे साहेब आले, त्‍यांनी कर्जप्रकरण मंजूर केले. सप्‍टेंबर 2016 मध्‍ये पहिल्‍यांदा दीड लाखाचे कर्जमंजूर झाले. माझ्याजवळचे भांडवल आणि कर्ज दोन्‍ही एकत्र करुन मी घराजवळच (लिटील फ्लॉवर स्‍कूल जवळ) ‘एंजेल बुटीक्‍स अॅण्‍ड लेडीज शॉपी’ हे दुकान सुरु केले.

मनीषा कानगुडे या मूळच्‍या करमाळा तालुक्‍यातील सरबडोह (जि. सोलापूर) येथील आहेत. त्‍यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले. पण लहानपणापासून शिवणकाम, वीणकामाची आवड होती. काही दिवस मुंबईला राहिल्‍यानंतर गेल्‍या 18-19 वर्षांपासून पुण्‍यात राहत आहेत. प्रारंभी घरगुती शिवणकाम तसेच तोरण, लोकरीच्‍या वस्‍तू विक्री  करुन त्‍या उदरनिर्वाह करत होत्‍या.  या छोटेखानी व्‍यवसायातून त्‍यांना दरमहा 5 हजार इतका नफा मिळायचा. कर्ज मिळाल्‍यानंतर त्‍यांनी व्‍यवसाय वाढवला. दुकानात फॉल, अस्‍तर, धागा, लेस, लटकन, कॅन्‍व्‍हॉस, मॅचींग ब्‍लाऊजपीस, डिझाईन ब्‍लाऊज पीस, होजिअरी, ओढणी, स्‍टोल, स्‍कार्फ अशा वस्‍तू विक्रीसाठी ठेवल्‍या. त्‍यामुळे पहिल्‍या सहा महिन्‍यात त्‍यांची उलाढाल 5लाखापर्यंत वाढली. गेल्‍या वर्षी ती 15 लाखापर्यंत वाढल्‍याचे सांगतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे व्‍यवसाय वाढीला भांडवल मिळालेच पण आत्‍मविश्‍वास वाढून आर्थिक प्रगतीही झाली. स्‍वयंपूर्ण होण्‍याची मनीषा कानगुडे यांची ‘मनीषा’ पूर्ण झाली.

दादा ……

0

 

अरविंद भाई म्हणजे म्हणजे दादा दादरला आमच्या शेजारी रहायचे. आम्ही मराठी तर ते गुजराथी. त्यामुळे
संभाषण म्हणजे मिश्र भाषा. कधी मराठीतून तर कधी गुजरातीतून. असो पण काही असले तरी त्या
संभाषणातून व्यक्त होणारे भाव महत्वाचे होते.
गॅलरीत शेजारी-शेजारी लागून आम्हा दोन्ही कुटुंबाचे बाकडे म्हणजेच लाकडी पेट्या होत्या. सकाळ झाली की
दादाही पेपर वाचायला त्या बाकड्यावर येऊन बसायचे. आमच्या घरातील कुणी बाहेर असले की विचारपूस
व्हायची आणि त्यांच्या दिनचर्येला सुरुवात व्हायची. दादांची अंगकाठी मध्यम, उंची बेताची, वर्ण गोरा.
पांढरी शुभ्र हाफ पँट आणि बनीयन व खांद्यावर छोटा टॉवेल याच त्यांच्या घरच्या पोषाखात आम्ही दादांना
कायम पाहिले. दादांना सुपारी खाण्याची सवय होती. त्यामुळे बाहेर बसले की त्यांच्या बरोबर ती
अ‍ॅल्युमिनीयमची सुपारीचा पेटी असायची. सुपारी, अडकित्‍ता आणि इतर पान बनविण्याचे सामान ही
त्याच्यात असायचे. घरात गेले की परत डबा आपल्या सोबत.
आंघोळ झाली की शर्ट पँट घालून ते खाली एक चक्कर मारायला जायचे. रेल्वेतून ते सेवानिवृत्त झाले होते.
जाण्याआधी घरच्यांना विचारायचे, हुँ नीचे जऊ छु. कई लावानू छे तो के जो ?’एक चक्कर मारुन आले की
धुतलेले कपडे गॅलरीतल्या दोरीवर अगदी नेमाने झटकून वाळत टाकायचे. तोपर्यंत जेवणाची वेळ झालेली
असायची. त्यांना जेवणात रोज काही तरी गोड पदार्थ लागायचा. जेवण झाले की थोडा वेळ विश्रांती घ्यायचे.
मग दुपारनंतर वाळलेले कपडे काढणे, त्यांच्या अगदी नीट घडया घालणे या मोठ्ठा कार्यक्रम असायचा त्यांचा.
दादांच्या या दिनचर्येत कधी बदल झाल्याचे माझ्यातरी आठवणीत नाही. बाहेर बाकडयावर बसून रात्रीच्या
गप्पा ह्या आमच्या दोन कुटुंबात ठरलेल्या असायच्या.
दादांना क्रीकेटचे खूपच वेड. क्रीकेट असली की मग काय दादा काही दिवसभर त्या टि. व्ही. समोरून हटायचे
नाहीत. त्यांच्या या क्रीकेटच्या वेडापायी माझा भाऊ निलेश तर त्यांना गमतीने कॅप्टन म्हणूनच हाक
मारायचा.
दादांचे अंकलेश्‍वरला गावी एक घर होते. त्यामुळे अधून-मधून ते आणि त्यांची पत्नी जसुबेन म्हणजेच बा सोबत
तिकडे जायचे. दादांचे कुटुंब तसे चौकोनी. दोन मुले, मन्ना आम्ही तिला मन्ना फोई म्हणत असू आणि मुलगा
हेमंत आम्ही त्यांना हेमंत मामा म्हणतो. मन्ना फोईच्या मिस्टरांना बाबा काका तर हेमंत मामाच्या बायकोला
रेखा मामी. मन्ना फोईला एकच मुलगी तिचे नाव टिना. आता ती कॅनडाला स्थायिक झाली. तर हेमंत मामाला
दोन मुले एक पिंकी म्हणजेच मेघा आता ही अमेरिकेत असते आणि मुलगा धवल, तो इकडेच असतो. तर असे हे
दादांचे कुटुंब होते.
दादांचे काही वर्षापूर्वी पायाचे फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर मग थोडी धावपळ कमी झाली आणि
वयोमानाप्रमाणे हातात काठीपण आली. तसेच त्यांच्या मनावर कौटुंबिक आघात ही खूप झाले. आणि त्यांची
मुलगी मन्ना फोईचे आजारपणामुळे निधन झाले. आपल्या मुलीचे असं आकस्मिक जाणे हे कुठल्याही बापाला
पचवणं जडच जातं. पण त्यातूनही दादा सावरले. आणि थोड्याच कालावधीत त्यांची आयुष्याची जोडीदार
म्हणजे बा पण सोडून गेली आणि सर्वात मोठा मनावर आघात झाला तो त्यांची सून रेखा वयाच्या अवघ्या 43-
44 व्या वर्षी अचानक गेली. दादांचे आणि सुनेचे नाते एका वडील आणि मुलीसारखे होते. ते रेखा मामीशी
नेहमी आपुलकीने बोलायचे. तरीही दादांनी हे तीनही आघात मोठ्या हिंमतीने पचविले आणि आपल्या
कुटुंबाला सावरले. पण अलीकडे त्यांचे दादरच्या घरी मन रमत नव्हते. तसे आमचे कुटुंबही आता दहिसरच्या
नवीन घरी अधून-मधून रहायला यायचे. त्यामुळे बोलायला कोणी नाही. मग अलीकडे दादा जास्त करुन
अंकलेश्‍वरला आपल्या जुन्या घरी त्यांच्या जुन्या आठवणी काढत रहाणं जास्‍त पसंद करत होते. दोन तीन
महिन्यांनी यायचे काही दिवस दादरला, तेव्हा त्यांची भेट व्हायची. गेल्या दोन-तीन वर्षात दादांचे काही येणे

झाले नाही. त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती… पण त्या आधीच ते गेले… ही रुखरुख मनाला कायम लागून
राहिल.
अंकलेश्‍वरला हेमंत मामाला भेटायला आम्ही जाऊन आलो. घरचे सगळेच भेटले. त्यांच्या नाती टिना आणि
मेघा पण आल्या होत्या…
आज खूप दिवसांनी दादरला आले आणि बाहेरच्या बाकड्यावर बसले. .. खूप वेळ बसून होते .. माहित होते की
आता शेजारच्या खोलीतून दादा बाहेर येणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे विचारणारही नाहीत की, ’’काय ताई
काय कुठे जाते काय?’’… खरचं आज हे बाकडे पण सुने झालेत.. आता दादाही नाहीत आणि त्या
बाकड्यांवरच्या सुख -दुःखाच्या गप्पा ही कधीच रंगणार नाहीत… डोळ्यातल्या अश्रूंना तसेच मी ओघळू दिले
आणि निघाले.. तर बोलण्याचा आवाज आला… मागे वळून पाहिले .. तर कोणीच नव्हते .. मग हे दोन रिकामे
बाकडेच एकमेकांशी संवाद साधत होते की काय … ?

ˆ- पुर्णिमा नार्वेकर, दहिसर

बापट साहेब काय केलं –पुणे बलात्कारात तिसरं शहर -हेच का तुमचे ‘अच्छे दिन ” अजित पवारांचे फटकारे (व्हिडीओ)

पुणे-पुण्याची आतापर्यंत एक वेगळी ओळख होती. आधी म्हटलं जायचं पुणे तिथे काय उणे पण आज या भाजप सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की आज म्हटलं जातंय पुणे तिथे ‘पाणी’ उणे असे मत राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार  यांनी वडगाव बुद्रुक येथील परिवर्तन सभेत व्यक्त केले.याचवेळी बापट साहेब पुण्यासाठी काय केलं ? देशात पुणे शहर बलात्कारात तिसरे शहर म्हटले जाते आहे हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सावळी त्यांनी केला आणि अखेरीस पुण्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला असताना पुण्याचे पोलीस मात्र गुन्हेगारांना पकडण्याचे सोडून हेल्मेट नाही ,म्हणून सामान्य पुणेकरांची धरपकड करत असल्याचे त्यांनी म्हटले.

आज पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही सत्तेत असताना पुण्यात कधी पाण्याची कमतरता जाणवू दिली नाही पण आज भाजपला आठ आठ आमदार दिले, पण तरी देखील भाजपाने शहराला पाणी दिले नाही. निवडणूक आली म्हणून विविध कार्यक्रम राबविले जात आहे. सीएम चषक आयोजित करत आहे लोका़चे मन वळवण्याचा नवा फंडा या सरकारने आणला आहे. सरकार नियोजन करत नाही. भाजपच्या पुण्यातील 2 आमदारांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना सरकार पाठीशी घालीत आहे ,पुण्याला कोणी वाली उरला नाही ,पुण्यातील भाजपचे नेते प्रत्येक प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि मुख्यमंत्र्यांना फक्त नागपूरबाबत; जास्त प्रेम आहे. असा टोला देखील अजित पवारांनी मारला.संपूर्ण पुणे खोदुन ठेवले आहे. शहरात वाहतूक कोंडी आहे. मनपाचे काम होत नाही, पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पुण्यात बलात्कारासारख्या घटना रोज घडत आहेत. पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. गुंडांना तडीपार केले जात नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. पण सरकार लक्ष घालत नाही. पालकमंत्री गिरीष बापटसुद्धा लक्ष घालत नाही, अशी टीकादेखील आ. अजित पवार यांनी केली.महापालिकेतील नगरसेवक कचऱ्याच्या ५०० बादल्या खरेदी करून साडेनऊ हजार बाद्ल्यांचे पैसे पालिकेच्या तिजोरीतून उकळतात . यांना निट सभागृह बांधता येत नाही, कात्रज ते स्वारगेट या 5 किलोमीटर च्या बीआरटी च्या सुशोभीकरणावर १०३ कोटी खर्च करूनही बीआरटी कोठे दिसत नाही अशा विविध प्रश्नी त्यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले .

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर कठोर टीका केली.
खडकवासल्यात कचऱ्याचे नियोजन नीट होत नाही, या सरकारला सोशल मीडियाची फार हौस आहे त्यामुळे सर्व सोशल मीडियावर मी सरकारला धारेवर धरते. इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक नगरसेवक कार्यक्षम आहे. जर कार्यक्षम नगरसेवकाचा पराभव होत असेल तर मला वाटतं की खरच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

 

हायपरलूप ही बनवाबनवी-अजित पवार

0

पुणे-मुंबई ते पुणे अशा हायपूरलूप मार्गाची घोषणा म्हणजे एक बनवाबनवीच असून जगात हायपरलूप कुठेही यशस्वी झालेली नाही .निव्वळ शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी घेतल्या जाण्याची शक्यता आहे असा आरोप आज मंचर येथे राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी केला .राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज मंचरमध्ये दाखल झाली प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील, , छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विलास लांडे, दिलीप मोहिते, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, राम कांडगे, रमेश थोरात, अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील, रोहित पवार, आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आंबेगाव – शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, अरुणा थोरात, तुळसी भोर, रुपाली जगदाळे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, प्रकाश पवार, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुनिता गावडे, आंबेगावच्या सभापती उषा कानडे, शिरुरचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले, संचालक संजय काळे, जिल्हा दूध संघाचे संचालक केशरताई पवार, संचालक दौलत लोखंडे, सुभाष उमाप, प्रकाश घोलप, सचिन भोर, अमोल जगताप, बाळासाहेब बेंडे, अॅड.प्रदीप वळसे पाटील, शैलेश मोहिते, अनिल राक्षे, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, संजोग वाघरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बैलगाडा शर्यत चालू करणार असे आश्वासन इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र अजूनही बैलगाडा शर्यत चालू झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेत बसवा आम्ही बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ, कायद्यात काय तरतूद करायची आहे ते आम्ही बघू तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी मंचर येथील परिवर्तन यात्रेत केले. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांसाठी आ. दिलीप वळसे पाटील यांनी खासगी कारखाना काढाला. गेली पाच वर्षे सांगितले जात आहे इथे रेल्वे येणार, विमान येणार पण कधी येणार हे सांगत नाही यामुळे तुम्हा लोकांचेच नुकसान होत आहे. तुम्ही वेगळे लोक निवडून देता म्हणून हे नुकसान होत आहे. इथे साधे रस्ते नीट नाही आम्ही सरकारमध्ये आलो तर इथले रस्ते नीट करू. नाही केले तर अजित पवारला पुन्हा इथे येऊ देऊ नका असे आव्हान पवार यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले आहे त्यांच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पत्र पाठवले आहे.. उपोषणासाठी शुभेच्छा पत्र ..? असा सवाल देखील आ. अजित पवार यांनी विचारला तर राज्यात पुण्यासह सर्वत्र कायदा सुव्यवस्था ढासळली असून पुण्याची यांनी वाट लावली आहे असाही आरोप यावेळी केला .

मोदींना पब जी वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे,सामन्यांसाठी नाही – धनंजय मुंडे

मंचर पुणे येथील स्थानिकांचे बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी निवेदन

मंचर( शाहरुख मुलाणी ) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटले. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लोकांच्या मागण्यांसाठी आण्णां हजारेंनी मोदींना 36 पत्रे लिहीले. मोंदीकडून फक्त ‘धन्यवाद’ असे उत्तर पाठवले गेले. यांना PUB-G वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलता नाही, अशी टीका करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी पंतप्रधान मोदींच्या वागण्याचा समाचार घेतला आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आयोजित केलेली परिवर्तन यात्रा पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पोहोचली. तिसऱ्या टप्पातील सातव्या दिवशीच्या 14 व्या सभेला धनंजय मुंडे भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी घोषणा देत त्यांचे भव्य स्वागत केले. नवी नवरी घरात आल्यानंतर काम कमी आणि बांगड्याचा आवाज जास्त करते, जेणेकरून शेजाऱ्यांना वाटेल की, नवीन सुनबाई खूप काम करते. मोदींची वर्तणुकही नव्या नवरी सारखीच आहे, काम कमी गवगवा जास्त, अशी खरपूस टीका त्यांनी केली. मंचरमधील परिवर्तन यात्रेची सभा ही थोडी वेगळी भासली. इतर सभांप्रमाणे या सभेत स्थानिक प्रश्नांबाबतचे एकही निवेदन आलेले नाही. एक निवेदन आले ते बैलगाडी शर्यत सुरू करण्याबाबतचे. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकासाचा, त्यांच्या नेतृत्वाचा लोकांनी मनापासून स्वीकार केलाय हेच यातून दिसत असल्याचे मुंडे म्हणाले. सरकारकडे दुष्काळासाठी मागितले 8 हजार कोटी आणि दिले 4 हजार कोटी ही परिस्थिती आज आहेत. त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा जुमलेबाजी करणाऱ्या सरकारवर जोरदार प्रहार केला.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी  काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे आदींसह मंचर, शिरुर,जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशाच्या विकासासाठी जगण्याचा दर्जा सुधारावा -डॉ. प्रभात रंजन

0
पुणे : “देश विकसित होण्यासाठी केवळ संरचनात्मक विकास होऊन चालणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे,” असे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रभात रंजन यांनी सांगितले. ‘व्यवस्थापन व समाजशास्त्रात बहुशाखीय संशोधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रभात रंजन बोलत होते.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (डीवायपीआयएमएस) आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बिझनेस स्टँडर्ड चे सीओओ सचिन फणशिकर, संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, कार्यकारी संचालक निवृत्त विंग कमांडर पीव्हीसी पाटील, कॉर्पोरेट रिलेशन प्रमुख डॉ. जे. जी. पाटील, प्रा. शिवाजी माने उपस्थित होते.
डॉ. रंजन यांनी २०३५ मधील तंत्रज्ञानाने समृद्ध भारताची प्रतिमाच विद्यार्थ्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, “या विकसनशील भारतापुढे जीवनावश्यक गोष्टी जसे आरोग्य, अन्न, शिक्षण, इंधन, निवारा यातील आव्हाने मोठी आहेत. या गोष्टी सर्वसामान्यांना पुरवून त्यांच्या जगण्याचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन करावे.”
फणशिकर म्हणाले, “तुमचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता, माहिती व्यवस्थापन या गोष्टींना अधिक महत्व असते. त्यासाठी वाचायला हवे, स्वतःला अद्ययावत माहितीने परिपुर्ण करायला हवे. आपल्या भवताली काय सुरु आहे, याची जण आपल्याला असायला हवी. बाहेरचे जग फार आव्हानात्मक आहे, त्यात टिकून राहायचे असेल, तर सतत धावावे लागेल.”
या दोन दिवसांच्या परिषदेत डॉ. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली एमटीएचआर ग्लोबल पुणेचे सहसंचालक राजेश कामत, जॉबमोसीसचे कार्यकारी व्यवस्थापक समीर आगाशे यांनी परिसंवादात भाग घेतला. आयआयटी पवईच्या शैलेश मेहता, स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. इंद्रजित मुखर्जी यांनीही मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पातळीवरील शोधप्रबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये आंध्रप्रदेश येथील शिवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे व्ही. आदित्य, विक्रम रेड्डी व आर. के. एस. हरीश यांनी प्रथम, तर डीवायपीआयएमएसची अश्विनी पोतदार व तामिळनाडूच्या गायत्री यांनी संयुक्तरित्या द्वितीय पारितोषिक मिळवले. गुजरातचा देवेंद्र पटेलने तृतीय पारितोषिक पटकाविले.
प्राध्यापकांत आंध्रप्रदेश येथील शिवा शिवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. एन. सी. राजलक्ष्मी यांनी प्रथम, गुजरातच्या एल. जे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजचे जिग्नेश विदानी, डॉ. नेहा मेहता यांनी द्वितीय, तर जी. एल. एस. विद्यापीठ अहमदाबादचे प्रा. देवर्षी उपाध्याय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. निधी दत्ता यांनी सूत्रसंचालन केले. मिलन वाघ यांनी आभार मानले.

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मिळणार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एचआर’कडून मार्गदर्शन

0

पुणे : बावधन येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) स्टुडन्ट चॅप्टरची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ’एचआर’कडून मार्गदर्शन मिळणार आहे. या चॅप्टरचे उद्घाटन आणि सामंजस्य करार नुकताच संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये पार पडला.

‘एनआयपीएम’ ही भारतभरातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची संस्था असून, त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर), औद्योगिक संबंध (इंडस्ट्री रिलेशन्स), मनुष्यबळ कल्याण आणि प्रशिक्षण व विकास याचा समावेश आहे. ‘एनआयपीएम’कडून ‘एचआर’मधील विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि समुपदेशन कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जातात.

यावेळी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सचिन ईटकर, ‘एनआयपीएम’चे डॉ. अजय कुलकर्णी, डॉ. अमित गिरी, डॉ. पवन शर्मा उपस्थित होते. एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंटच्या वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) हेमांगी धोकटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एनआयपीएमच्या ‘मेंटॉर-मेंटी’ उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. राजेंद्र सबनीस यांनी राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेची माहिती दिली. सूर्यदत्ताच्या बीबीए, एमबीए व पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या स्टुडंट चॅप्टरचे सभासदत्व संस्थेतर्फे देण्यात येणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.

उद्योग आणि शिक्षण यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी सुर्यदत्ता शिक्षण संस्थेचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक जगताचे ज्ञान शिकत असतानाच व्हावे, या उद्देशाने एनआयपीएमच्या स्टुडंट चॅप्टरची सुरुवात करण्यात आली आहे. या दोन संस्थातील सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा होईल, तसेच उद्योग क्षेत्रातील गरजांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल, असे मत सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश कासंडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

दाऊदच्या बायकोशी कशाला बोलू ….. खडसेंच्या वक्तव्याने हशा …

0
पुणे : गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी व भ्रष्टाचारावरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुण्यातील युवा पिढीशी एका कार्यक्रमातून  संवाद साधला.
एकनाथ खडसे म्हणाले, गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे. गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारीविरोधात लढा उभारला होता. मात्र आता इतरांसारखे केव्हा झालो हे लक्षात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
ते पुढे म्हणाले, कोणाकडे पाहून राजकारणात येण्याची आता हमी देता येत नाही. राजकारण्यांपेक्षा उत्कृष्ट अभिनेते व कलाकार कोणीही नाही. वरुन आणि आतून वेगवेगळे चेहरे पहायला मिळतात. राजकारणात कृतघ्न माणसांची संख्या जास्त असून राजकारणाची दशा आणि दिशा बदलायची असेल, तर युवकांनी राजकारणात यायला हवे.
काय म्हणाले –खडसे —
1)दाऊदच्या बायकोशी कशाला बोलू ..आहे ना,माझी बायको अजून घरी …
2)सलमान खान ,शाहरुख खान यापेक्षा हि मोठे अभिनेते ३)राजकारणात कृतघ्न माणसांची संख्या जास्त आहे ,कृतज्ञ नाही….
ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना तुम्ही घरी बसवू शकता …
4)संसदेमध्ये ,विधानसभेत अलीकडे फार काही चर्चा होत नाही .
5)मी 1977 मध्ये सरपंच झालो ,तशी मेहनत करत ,काम करत इथपर्यंत आलो .बटन दाबले अन आमदार झालो अन मंत्री झालो असे नाही .
6)एकही राजकीय पक्ष छातीठोक पणे सांगू शकत नाही कि आम्ही दिलेली आश्वासने १०० टक्के पाळली ,पूर्ण केली …

क्रीडापटू मुलींचा खेळ आकर्षणाचं केंद्र

0
मुंबई-
संपूर्ण जगासाठी एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र असलेल्या मुंबईत यावेळी ‘सीएम चषक’ साठी महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधून येणाऱ्या क्रीडापटू मुलींचा खेळ आकर्षणाचं केंद्र बनला  आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून ‘सीएम चषक’चे अंतिम सामने रंगले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हे सामने सुरू आहेत. यामध्ये राज्यभरातून खेड्यापाड्यातून आलेल्या जवळपास दोन हजारांहून अधिक महिला क्रीडापटू सहभागी झाल्या आहेत. ज्यात अहमदनगरमधून  ५८, अकोलामधून ४३, अमरावतीमधून ५६, औरंगाबादमधून ५६ बीडमधून ४२, भंडारामधून ५५, बुलढाणामधून ५६, चंद्रपूरमधून ४४, धुळेमधून ५२, गडचिरोलीमधून ४१, गोंदियामधून ५६, हिंगोलीमधून ४१, जळगावमधून ३०, जालनामधून ५५, कोल्हापूरमधून ५९, लातूरमधून ४०, मुंबई शहरमधून ३२, मुंबई उपनगरमधून ६०, नागपूरमधून ४४, नांदेडमधून ५४, नंदुरबारमधून ५४, नाशिकमधून ५४, उस्मानाबादमधून ४१, पालघरमधून ५६ पुणेमध्य १९, रत्नागिरीमधून ४६ सांगलीमधून ५४, सातारामधून ५४, सिंधुदुर्गमधून ५३, सोलापूरमधून ५४, ठाण्यामधून ५५, वर्धामधून ५५, वाशिममधून ४६, आणि यवतमाळमधून ५४ सहभागी झाल्या आहेत. सीएम चषक स्पर्धेने खेड्यापाड्यातील महिलांना हक्काचं क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या महिला विविध स्तरावरील टप्पे पार करुन विजेत्या झाल्या आहेत. रांगोळी, चित्रकला, गायन या स्पर्धांमध्ये महिलांनी विशेष सहभाग दर्शवला आहे, तर खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये युवतींनी विशेष सहभाग दर्शवला आहे.

‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्तीनिमित्त पुण्यात कलात्म जल्लोष

0
पुणे :’मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ चा तपपूर्ती महोत्सव येत्या ६ ते ८ फेब्रवारी या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे . या तपपूर्ती महोत्सवात तीन दिवसांचा कलात्म जल्लोष,  सारंग सन्मान प्रदान, स्मरणिका   प्रकाशन आणि कथक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम दिनांक  ६ ते ८ फेब्रवारी २०१९ दरम्यान  यशवंतराव चव्हाण  नाट्यगृह, कोथरुड येथे  दररोज सायंकाळी ६.४५ वाजता होणार आहेत.
‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’  च्या संस्थापक-संचालक प्राचार्या अर्चना संजय यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.  ६ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मनीषा साठे, अर्चना संजय या नृत्यगुरूंच्या संरचना ‘अभिव्यक्ती ‘ या नृत्याविष्कारांतर्गत सादर केल्या जाणार आहेत. पद्मश्री पं. सुरेश तळवळकर,प्रख्यात तबलावादक तसेच पराग करंदीकर (संपादक, महाराष्ट्र टाइम्स ) यांची   विशेष उपस्थिती सहा फेब्रुवारीला असणार आहे .
७ फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या  दिवशी ‘अभिजात ‘ या अविष्कारांतर्गत सारंग सन्मान प्रदान समारंभ आणि पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश शमसी यांची विशेष प्रस्तुती आयोजित केली आहे. यंदाच्या  तपपूर्ती सारंग सन्मानाच्या मानकरी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता मनीषा साठे या आहेत.  पद्मश्री  प्रतापराव पवार (चेअरमन, सकाळ माध्यम समूह) यांच्या  हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे.
तपपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन  मुकुंद संगोराम (कलासमीक्षक आणि  संपादक, ‘लोकसत्ता’, पुणे) , मुरलीधर मोहोळ (नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष ) तपपूर्ती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष ॲड . शीतल चव्हाण (कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक- वक्ते ) यांच्या हस्ते होणार आहे .
८ फेब्रुवारी रोजी  ‘अभिनव ‘ या अविष्कारांतर्गत  एकल नृत्य प्रस्तुती सादर होणार आहे. त्यात वल्लरी आपटे, सुजाता गावडे, दीक्षा त्रिपाठी, राजश्री  घोंगडे,  सिद्धी पोटे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.  समारोप सोहळ्यास   लक्ष्मीकांत देशमुख (माजी  अध्यक्ष, अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलन ), कॅप्टन निलेश गायकवाड (स्वागताध्यक्ष, विश्व मराठी साहित्य संमेलन) आणि दिग्दर्शक संजय सिंगलवार यांची उपस्थिती असणार आहे.
६ ते ८ फेब्रुवारी या  तीनही दिवशी नृत्यगुरू अर्चना संजय यांच्या शिष्या कथक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना चारुदत्त फडके (तबला), समी उल्लाह खान (हार्मोनियम आणि गायन), ,नितीश पुरोहित (सरोद ), रश्मी मोघे (गायन ), तुषार घरत (पखवाज ) संगीत मिश्रा ( सारंगी ) हे साथसंगत करणार आहेत.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या बिरदवडी, आंबेठाण, महाळूगे-इंगळे रस्त्याचे भूमिपूजन

0
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील खेड तालुक्यातील रस्ता पुणे -नाशिक रा. मा.५० (नव्याने घोषित रा. मा. क्र.६०) ते बिरदवाडी आंबेठाण, महाळूगे(चाकण तळेगाव) लांबी ७.०० किमी (ग्रा. मा.११) रस्त्याच्या कामकाजाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रम  जि. प. प्राथमिक शाळा आंबेठाण बिरदवडी व पाझर तलाव खोलीकरण कार्यक्रम खेड तालुक्यातील केळगाव येथे पार पडला. केळगाव पाझर तलावाचे भूमीपूजन आळंदी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास मंत्री, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, तथा अन्न औषध प्रशासन, संसदीय कार्ये , पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीए  महानगर आयुक्त किरण गित्ते, जि.प.सदस्य श्री शरद आनंदराव बुट्टे पाटील, आळंदी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर,  पंचायत समिती सदस्य श्री चांगदेव रामचंद्र शिवेकर, सरपंच आंबेठाण श्री गणेश सदाशिव मांडेकर, सरपंच बिरदवाडी सौ मंदा शांताराम लोखंडे, सरपंच महाळुंगे इंगळे सौ कल्पना गौतम कांबळे, उपसरपंच आंबेठाण श्री काळूराम बबन बंडेकर, उपसरपंच बिरदवाडी सौ आशा कांताराम पवार, उपसरपंच महाळुंगे इंगळे श्री योगेश म्हाळुंगकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर रस्त्यामुळे चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे.  परिसरातील सहा गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुणे नाशिक महामार्गापासून बिरदवडी-आंबेठाण-महाळूगे इंगळे या तीन गावांना हा रस्ता जातो.  यामध्ये ७मी. रुंद डांबरीकरण केले जाणार आहे.   या रस्त्याच्या विकासासाठी जवळपास 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर जलसंधारनाच्या विकासकामांसाठी ८.५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील गावाकरिता पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बळकटीकरण करणे व जुन्या तलावातील पाणीसाठा वाढविणेसाठी  गाळ काढून खोलीकरण करण्याचा पीएमआरडीएचा उद्देश आहे.
पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले की, ‘ग्रामीण भागाला ताकद देण्याचे काम सध्या पीएमआरडीए करत आहे. गावांना घनकचरा व्यवस्थापन, पाणी, वीज अशा समाजव्यापी पायाभूत सोईसुविधा देण्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेतले आहे. ‘
महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले की, ‘पुणे महानगर परिसर विस्तृत आहे. औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायत आणि पीएमआरडीए एकत्र येऊन काम केल्यास गावांचा विकास झपाट्याने होईल. मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

५फेब्रुवारी भव्य मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन

0
जुन्नर /आनंद कांबळे -जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य रा.पृ सबनीस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने येत्या ५फेब्रुवारी भव्य मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष संभाजी बुट्टे पाटील, माजी सेक्रेटरी अँड.सुधीर ढोबळे ,माजी विद्यार्थी संघाचे राजेंद्र जुंदरे ,आनंद सासवडे उपस्थित होते.
गुरुवर्य रा.प सबनीस यांच्या जयंतीनिमित्ताने  मंगळवारी ( ता.५) सकाळी ७.१५ वाजता मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद् घाटन विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माजी विद्यार्थी डाँ.दिलीप बांबळे, पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे जुन्नर शहरातून शोभायात्रेचे आयोजन केले असून यामध्ये जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी , व नागरिक  तसेच आमदार शरददादा सोनवणे ,नगराध्यक्ष शाम पांडे सामील होत आहेत असेही राहुल जोशी यांनी सांगितले .
वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत.दुपारी पारितोषिक वितरण होत असून यावेळी सत्यशील शेरकर,अनिलतात्या मेहेर , अप्पासाहेब बुट्टे  पाटील उपस्थित राहणार आहेत.
गुरुवर्य रा.प सबनीस यांनी जुन्नर तालुक्यात केलेल्या भरीव शैक्षणिक कामामुळेच तालुक्याची शैक्षणिक प्रगती झाली आहे.

मतदार जागृती परिषद’ तर्फे ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन

0
पुणे :
‘मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे   मतदार जागृतीसाठी ७ फेब्रुवारी   रोजी  पुण्यात सभेचे आयोजन   करण्यात आले आहे . ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा होणार असून अनेक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक त्यात सहभागी होवून विचार मांडणार आहेत .
डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक  ७ फेब्रुवारी   २०१९,सायंकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ,(मालधक्का चौक ,रेल्वे स्टेशन जवळ ), पुणे येथे ही सभा होणार आहे .
सभेचे संयोजक ,संदीप बर्वे (संघटक ,युवा क्रांती दल ),जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),मयुरी शिंदे (युवा क्रांती दल ,पुणे शहराध्यक्ष ),त्रिवेणी मार्डीकर ,सचिन पांडुळे ,अजय मेमाणे ,रोहिणी पवार ,दुर्गा शुक्रे ,इस्माईल शेख यांनी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
निरंजन टकले  (पत्रकार ),डॉ . अभिजित वैद्य (राष्ट्रीय प्रमुख ,आरोग्यसेना ),श्रीरंजन आवटे (युवा लेखक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) ,जांबुवंत मनोहर (संघटक ,युवा क्रांती दल ),सर्फराज अहमद (मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक ),हे वक्ते सहभागी होणार आहेत .
राजकीय पक्षांबाहेरील परिघांमध्ये ‘मतदार जागृती परिषद’ कार्यरत राहणार असून पुण्यात आणि राज्यभरात सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पहिली सभा २० जानेवारी रोजी एस  एम जोशी फाउंडेशन येथे झाली होती . त्यात डॉ .कुमार सप्तर्षी ,सुरेश खोपडे ,डॉ विश्वम्भर चौधरी ,श्रीरंजन आवटे ,प्रशांत कोठडीया ,मौलाना निजामुद्दीन सहभागी झाले होते .