Home Blog Page 2993

वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

0

पुणे :पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फसव्या सरकार विरोधात व वाढत्या बेरोजगारी विरोधात मोर्चा काढण्यात आला.
लाल महाल चौकापासून सुरूवात होउन या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला. मोर्चामध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती या मोर्चामध्ये युवकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पकोडा सेंटर तसेच गाजराची हातगाडी व स्वतःच्या गळ्यात पदवी प्रमाणपत्रांचे हार घातले होते.
मोदीसरकार जवाब दो* ,मोदी सरकार जॉब दो या सरकारच करायच काय खाली डोक वर पाय, चोकीदार चोर है!
अशा घोषणांनी युवकांनी मोर्चा दणाणून टाकला.


या सरकारने युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देतो अशी आश्वासने देउन फसविले आहे. नोटाबंदी च्या निर्णयामुळे या देशाच्या इतिहासात एवढी बेरोजगारी कधी आली नव्हती तेवढी बेरोजगारी आलेली आहे. युवकांना हे सरकार पदवीधर व्हा आणि पकोडे विका अस सांगतय , यांच्याकडे युवकांच्या रोजगारासाठी कोणताही कार्यक्रम नाही. या सरकारने देशातील कोणत्याही घटक असा ठेवला नाही की तो आंदोलन करत नाहीये, विद्यार्थी ,शेतकरी , विविध समाज ,डॉक्टर, वकील , साहित्यिक, विचारवंत, युवक समाजातील कोणत्याच घटकाच्या मागण्या या सरकारने पुर्ण केल्या नाहीत उलट त्यांचा आवाज दाबण्याच काम हे सरकार करीत आहे. भाजप सरकारने तरुणांची रोजगाराच्या नावाखाली फसवणूक केली. त्यामुळे तरुणांच्या मनात आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून मांडण्यासाठी व या फसव्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आली आहे व हाच तरुण या फसव्या सरकारचा भरलेला पापाचा घडा फोडेल व यांना घरी पाठवेल असे बोलताना *शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की , युवकांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केलेले आहे ,NSSO च्या अहवालानुसार बेरोजगारी चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे ,या सरकारकडे युवकांसाठी कोणताही कार्यक्रम नाही. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे , मा.आ.अशोक पवार,मा.आ. बापुसाहेब पठारे,मा.महापौर प्रशांत जगताप ,दता धनकवडे,सुरेश घुले,सुभाष जगताप,रवींद्र माळवदकर,जालिंदर कामठे,विशाल तांबे,बाबुराव चांदेरे,वनराज आंदेकर,अशोक कांबळे, गफुर पठाण,युवराज बेलदरे महिला जिल्हाध्यक्ष,वैशाली नागवडे युवक अध्यक्ष राकेश कामठे ,युवती अध्यक्ष मनाली भिलारे, विद्यार्थी अध्यक्ष रीशी परदेशी ,सामाजिक न्याय अध्यक्ष बापु डाकले,ओ बी सी अध्यक्ष संतोष नांगरे,नितीन कदम,विनायक हनमघर,गणेश नलावडे,भोलासिंग अरोरा,फहिम शेख,स्वप्निल दुधाणे,निलेश निकम,संतोष फरांदे,नारायण लोणकर, आबा कापरे, राजु साने,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

दुसरीतील विद्यार्थ्याचे दोरीने हात बांधून शिक्षा, प्राचार्यांसह वर्गशिक्षिकेवर गुन्हा

0

पुणे-इंग्रजी माध्यमातील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्याार्थ्याचे दोरीने हात बांधून शिक्षा देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून शाळेच्या प्राचार्यांसह वर्ग शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शालेय प्रशासनाला जाब विचारून आक्षेप घेणाऱ्या  क्रीडा शिक्षकाला कामावरून कमी करण्यात आले होते.

संबंधित मुलाच्या शिक्षेला आक्षेप घेतला म्हणून काढून टाकलेल्या शिक्षकाने, महिला व बाल विकास मंत्रालयाला मुलाला देण्यात आलेल्या शिक्षेचे छायाचित्र पाठविले होते. त्यानंतर मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कोंढवा भागातील मनसुखभाई कोठारी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्या प्रज्ञा गोखले आणि वर्ग शिक्षिका हबिबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेतून कमी करण्यात आलेले क्रीडा शिक्षक अनिकेत सातव (वय २८, रा. सहकारनगर) यांनी याबाबत तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव हे कोंढवा भागातील मनसुखभाई कोठारी शाळेत क्रीडाशिक्षक होते. १ नोव्हेंबर २०१८ रोजी दुसरीच्या वर्गातील मुलांचा खेळाचा तास होता. मुले मैदानावर आली. तेव्हा एका मुलाचे हात दोरीने बांधण्यात आले होते. सातव यांनी मुलाच्या हाताला बांधलेली दोरी सोडली आणि त्याला वर्गात पाठविले. त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा वर्गशिक्षिकेने हात बांधल्याचे मुलाने सातव यांना सांगितले. क्रीडा शिक्षक सातव पुन्हा वर्गात गेले. तेव्हा मुलाचे हात पुन्हा बांधण्यात आले होते. या घटनेनंतर सातव यांनी प्राचार्या गोखले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा मुलगा वर्गात त्रास देत असल्याने त्याचे हात बांधण्यात आले. या प्रकाराची कुठे वाच्यता करू नका, असे गोखले यांनी सातव यांना सांगितले.

या घटनेनंतर काही दिवसांनी सातव यांना कोणतेही कारण न देता शाळेतून कमी करण्यात आले. दरम्यान, सातव यांनी ५ फेब्रुवारी रोजी महिला आणि बाल विकास मंत्रालयाला या घटनेचे छायाचित्र इ-मेल केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश मंत्रालयाकडून पोलिसांना देण्यात आले. कोंढवा पोलीस तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर यांनी दिली.

‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धेस प्रारंभ

0
पुणे :‘केपीआयटी’टेक्नॉलॉजीस लिमिटेड  आणि ‘ज्ञान प्रबोधिनी ‘ यांचा संयुक्त उपक्रम असलेली   ‘छोटे सायंटिस्ट ‘ स्पर्धेस १३ फेब्रुवारी रोजी  ‘केपीआयटी’ चे अध्यक्ष रवी पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.
 स्पर्धेच्या उदघाटन समारंभास  शेखर सोनसळे(‘केपीआयटीचे फॅसिलिटीज अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट  विभाग प्रमुख ) तुषार जुवेकर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग प्रमुख ,’केपीआयटी’ ) ,’ज्ञान प्रबोधिनी ‘चे प्रशांत दिवेकर ,स्पर्धा समन्वयक प्रकाश रणनवरे उपस्थित होते .
 १३,१४ फेब्रुवारी रोजी  पुण्यात होत असलेल्या मावळ -मुळशी तालुक्यातील २०  शाळा ,पुणे महानगर  क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील ८ शाळा अशा 38 शाळा आणि २०० विद्यार्थी सहभागी झाले  आहेत .
 १४ फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या २०  शाळा आणि १०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत . 
ही स्पर्धा केपीआयटी कॅम्पस   , हिंजवडी -फेज -३  येथे सुरु झाली  आहे . स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या उपक्रमात  ‘वी  -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा असून त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्यास,प्रकल्प करण्यास सांगण्यात आले  आहे . विजेत्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,स्कुल बॅग ,व   विजयी शाळांना ट्राफी देण्यात येणार आहे .
२०१२ मध्ये २० शाळांमध्ये ८०० विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम १७७ शाळा आणि १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे . भारतातील २० शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे .
 

महावितरणमधील मनुष्यबळ पुनर्रचना ही कर्मचारी व ग्राहक हितासाठीच-श्रीकांत जलतारे

0

पुणे : महावितरणमधील कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ते अधिक सुटसुटीतपणे व प्रभावीपणे करता यावे यासाठी मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. श्रीकांत जलतारे यांनी दिली.

येथील महावितरणच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नुकत्याच झालेल्या मनुष्यबळ पुर्नरचना संदर्भात संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. राजेंद्र पवार, श्री. वादिराज जहागिरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कार्यकारी संचालक श्री. जलतारे यांनी मनुष्यबळ पुर्नरचना आराखड्याचे सादरीकरण केले व माहिती दिली.

कार्यकारी संचालक श्री. जलतारे म्हणाले, की सध्याच्या रचनेत महावितरणमध्ये एकाच कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला निरनिराळी कामे करावी लागतात. त्यामुळे एक काम करताना दुसऱ्या कामात अनपेक्षित किंवा कोणताही हेतू नसताना उणिवा राहून जातात. काम अपूर्ण राहते. लांबणीवर जाते. सोबतच कंपनीचे उद्दिष्ट साध्य होत नाही. एकाचवेळी एकच व्यक्ती अनेक प्रकारचे काम करीत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्याच्यावर मानसिक व शारीरिक ताण येतो. आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमिवर कर्मचारीहितासाठी कार्यात्मक पुनर्रचना करणे ही काळाची गरज होती. या पुनर्रचनेमध्ये बिलिंग, महसूल, देखभाल व दुरुस्ती ही कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. पुनर्रचनेच्या आराखड्यातील सर्व कर्मचार्‍यांचे जॉब चार्ट तयार करण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील उपविभाग अधिक बळकट करण्यात येणार आहेत. हे सर्व करीत असताना मंजूर पद व कर्मचारी संख्येत कोणतीही कपात होणार नाही. पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांची वाढती संख्या तसेच भविष्यातील ग्राहकसेवा याचा सध्याच्या रचनेतील ताण कमी करण्यासाठी ही कार्यात्मक पुनर्रचना करण्यात येत आहे.

मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार म्हणाले, की क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सध्या अनेक प्रकारचे कामे करावे लागतात. परिणामी कामाचा तणाव निर्माण होतो व आरोग्यावरही परिणाम होतो ही बाब अनेक कर्मचारी संघटनांनी मुख्यालयाला निदर्शनास आणून दिली होती. त्याचाही प्रामुख्याने विचार करून या पुनर्रचनेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांची जबाबदारी व कर्तव्ये नेमून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास कामाचे योग्य नियोजन करणे सोयीचे होईल व त्याचा थेट फायदा वीजग्राहकांना होणार आहे.

यावेळी उपस्थित सर्व संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आराखड्याबाबत काही मते, बदल सूचविले. प्राप्त झालेल्या सर्व सूचना व मागण्यांची यावेळी नोंद करून घेण्यात आली. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. अशोक केदारे (मुंबई), श्री. राजेंद्र म्हकांळे (पुणे), सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पालकांचा क्रीडा दिन उत्साहात

0
पुणे : येथील माधव सदाशिव गोळवलकर विद्यालयात पालकांचा क्रीडा दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या अभिनव उपक्रमाची कल्पना मुख्याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांची होती. पालक-शिक्षक संघाचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १७४ पालकांनी यामध्ये सहभाग घेतला. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी यांनी त्याचे नियोजन केले. 
या क्रीडादिनाचे उद्घाटन आजी-आजोबांच्या हस्ते फुगे उडवून व क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून झाले. पालकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. मेमरी गेम, डार्ट बोर्ड गेम, बकेट बॉल, रिले शर्यत आणि या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते संगीत खुर्ची स्पर्धा. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ््यात झुम्बा, सूर्यनमस्कार, योगासने, मंगळागौरीचे खेळ, लेझीम आादी प्रात्यक्षिके झाली. पालक संघाने सादर केलेल्या समूहगीताला विशेष दाद मिळाली. राष्ट्रकुल स्पर्धांत सुवर्णपदक विजेत्या ज्यूदोपटू आणि प्रशिक्षक रचना धोपेश्वर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. 
मुख्याध्यापिका धालेवाडीकर यांनी प्रास्ताविक केले. धोपेश्वर यांनी आॅलिम्पिकसाठी तयारी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांतून खेळाडू घडविण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असल्याचे सांगितले. नियमित व्यायामाद्वारे सुदृढ राहण्याचाही संदेश त्यांनी पालकांना दिला. तृप्ती साठे, स्नेहा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. शाळा समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी अध्यक्ष डॉ. सुनील भडंगे, डॉ. जगदीश लांजेकर, पर्यवेक्षक विकास दिग्रसकर उपस्थित होते. 

गोळवलकर गुरूजी विद्यालयात रथसप्तमी निमित्त सुर्यनमस्कार

0

पुणे-रथसप्तमीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे प्रशालेत यंदाही सुर्यनमस्कार घेण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यात सहभागी झाले होते. प्रत्येकाने ध्यानमंत्रांसह सुर्यनमस्कार घातले. विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार घालण्याचे ङ्गायदे सांगण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी सुर्यनमस्कार करणे हितावह असते याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला.
माननीय मु‘याध्यापिका सौ. लिना तलाढी यांनी विद्यार्थ्यांना योगासने, सुर्यनमस्कार, प्राणायाम यांची माहीती दिली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक‘म उपयुक्त ठरला. या कार्यक‘मासाठी शारीरिक शिक्षक श्री. सुभाष निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले.

१७ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-11, पुणे महानगरपालिका (समाज विकास विभाग), शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटक अंतर्गत रविवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आलेले आहे, अशी माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक अ. उ. पवार यांनी दिली आहे. 

यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, भोसरी, पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण – 34 उद्येाजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण – 2213 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.  उपरोक्त योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांचेद्वारे विविध पातळीवर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.  त्याअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त लाभार्थी उमेदवारांना, तसेच समाजातील इतर पात्र उमेदवारांना देखील या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार प्राप्त व्हावा, या उद्देशाने संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  यास्तव किमान 10 वी, 12 वी पास एमसीव्हीसी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए, ड्रायव्हर्स इ. पात्रता धारण केलेल्या तसेच सदर योजनेंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी, रविवार, दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) आपल्या बायोडाटा (रिझ्युम) च्या प्रती मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून याचा  लाभ घ्यावा.  सहभाग घेणा-या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन उद्योजकांची मागणी पाहून आपली संमती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, पुणे महानगरपालिका (समाज विकास विभाग), शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे  या तीनही कार्यालयांनी केलेले आहे, असेही  सहायक संचालक अ.उ.पवार यांनी कळविले आहे.

वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये वास्तुकला प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

0

पुणे : वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये (पीव्हीपीसीओए) वास्तुकलेच्या विविध डिझाईन्स, लँडस्केप व विविध प्रयोगांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी आयोजित केले आहे. जगभरातील नवीन तंत्रज्ञान व अभ्यास आत्मसात व्हावा आणि त्यातून भारतातील वास्तुकलेला नवे आयाम प्राप्त होण्यासाठी त्याचा फायदा व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक हे प्रदर्शन भरविले असून ते वर्षभर सुरु राहणार आहे. महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील सांस्कृतिक महोत्सव व प्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद व साहित्यिक माधव हुंडेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, सचिव जितेंद्र पितळिया, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, संचालक प्रा. प्रसन्न देसाई, विकास भंडारी, शैक्षणिक समन्वयक प्रा. शेखर गरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना काळानुरुप ज्ञान आत्मसात करण्यासाठीची अद्ययावत व्यवस्था उपलब्ध करण्याचे काम वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये होत आहे. त्यामुळे याठिकाणच्या विद्यार्थ्यांची व्हिजन चांगली तयार होताना दिसते आहे. भारतीय वास्तुकलेला नवीन पैलु पाडण्यात या महाविद्यालयाचे विद्यार्थी अग्रेसर राहतील, असा विश्वास युवराज शहा यांनी व्यक्त केला.

वास्तुकलेतील आधुनिकता आणि प्राचीनता याचा संगम साधून वास्तुकलेला वेगळ्याच रुपात आत्मसात करण्याचा प्रयत्न महाविद्यालयात येणाऱ्या काळात केला जाणार आहे, असे जितेंद्र पितळिया यांनी सांगितले.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रात्यक्षिकांद्वारे ज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला जातो. त्यातूनच हे प्रदर्शन भरविले असून ते वर्षभर सुरु राहणार आहे, असे प्रा. प्रसन्न देसाई यांनी सांगितले.

हटकेश्वर ज्ञानमंदिर शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील हटकेश्वर ज्ञानमंदिर(जि.प.प्राथ.शाळा गोद्रे)शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राथमिक शाळा गोद्रे च्या शताब्दी महोत्सव समारंभाची सुरूवात शनिवार दि.9 रोजी प्रभातफेरीने करण्यात आली मुख्यप्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी शतकपूर्ती शाळेचा नामफलक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ तयार करण्यात आला होता प्राथ.शाळेचे विद्यार्थी, ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक शाळेच्या प्रांगणात येताच शानदारपणे कार्यक्रमाचे उद्घाटन ललिताताई चव्हाण(सभापती, पं.स.जुन्नर) .देवरामशेठ लांडे (जि.प.सदस्य) मा.दिलीपशेठ गांजाळे(गटनेते,) ,.काळूशेठ गागरे(सदस्य, पं.स.जुन्नर),
अशोकदादाघोलप(व्हाईस चेअरमन, विघ्नहर कारखाना, जुन्नर),भाऊसाहेब देवाडे(प्रवक्ते-जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
 देवरामशेठ लांडे यांनी भविष्यात शाळेस येणा-या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पंचायत समिती सभापती ललिताताई चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना “ही शाळा एक आदर्श शाळा व्हावी व त्या शाळेचा आदर्श तालुक्यातील  इतर शाळांनी घ्यावा” असे सांगितले.
दुपारच्या सत्रात-रानकवी-कवीवर्य तुकाराम धांडे (मराठी वाड्:मय पुरस्कार प्राप्त)यांच्या काव्यगायनाचे सादरीकरण झाले या कार्यक्रमात या शाळेतील माजी विद्यार्थींनी सौ.जयश्री बांबळे यांनी ही आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
माजी विद्यार्थी स्नेहसमारंभाचे उद्घाटन  किसनराव भोजणे (प्रशासन अधिकारी म.न.पा.पुणे)यांचे हस्ते करण्यात आले
याप्रसंगी सतिश रेंगडे, जयश्री बांबळे विठ्ठल रेंगडे बुधाजी मांडवे आदींनी सहभाग घेवून शालेय जीवनातील अनेक प्रसंग, आठवणी सांगितल्या.गावातील समस्याबाबतही चर्चा झाली.
सायंकाळच्या.सत्रात महिलासाठी पारंपरिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले होते
रात्री गावातील भजनी मंडळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये ७ भजनीमंडळांनी  सहभाग घेतला होता.
रविवार दि.10/2/2019* रोजी सकाळच्या सत्रात आदिवासी संस्कृतची जोपसना करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व कांबडानृत्याचे मार्गदर्शक *निसर्गवासी ठका बाबा गांगडत्याचप्रमाणे दिवंगत
माजी विद्यार्थी, या शाळेत काम केलेले दिवंगत शिक्षक साहित्यिक विचारवंत यांना आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी *रांगोळी* *स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.यामध्येही महिलांचा उस्फूर्त सहभाग होता रांगोळी मधून *बेटी* *बचाओ,पर्यावरण* *रक्षण* *,शताब्दी* *महोत्सव,पाण्याचा* *वापर,झाडे* *लावा झाडे* *जगवा,आरोग्य* विषयक संदेश देण्यात आले होते.
शिवव्याखाते राहूल शिंदे   यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावरील शिवव्याखान झाले.अनेक प्रसंग शब्दबद्ध करून मांडले प्रेक्षक त्यांच्या प्रभावी मांडणीने भारावून गेले.
दुपारच्या सत्रात या शाळेत ज्यांनी ज्ञानदानाचे पवित्र काम केले त्या सर्व गुरुजनांचा *”गुरूपूजन”* सोहळा संपन्न  करण्यात आला.गुरूवर्याना पाहुण्यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
सांगतासमारंभप्रसंगी आमदार वैभव पिचड ,आमदार पांडुरंग बरोरा.अतुलशेठ बेनके यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी विद्यार्थी व अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी केले
या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासींचे दैवत वंदनीय *मधुकरराव* *पिचड*  यांना *”आदिवासी* *भुषण* *पुरस्कार”* व सन्मानपत्र” देवून गौरविण्यात आले.त्याचा स्विकार आमदार वैभव पिचड.यांनी केला.
.आमदार पांडुरंग बरोरा यांनी 100 वर्षातील झालेल्या शाळा बदलाचा आढावा घेवून गुरूजनांप्रती आदरभाव व्यक्त करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
युवानेते अतुलशेठ बेनके यांनी संयोजन समितीला धन्यवाद देत शाळा विकसित करण्यासाठी आतापर्यंतच्या गुरूजनांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले स्वातंत्र पुर्वकालखंडातील ही शाळा. की जिचे नाव हटकेश्वर ज्ञानमंदिर असे ठेवण्यात आले होते.अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेवून उच्च पदावर काम करत आहेत हे केवळ या शाळेमुळेच.
सांगता समारंभाच्या समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करताना .
आमदार वैभव पिचड म्हणाले की, *शतकपूर्ती* *समारंभास* *उपस्थिती* *हा* *एक* *चांगला* *योग* *लाभला*. शाळेतील पहिला विद्यार्थी व त्यावेळीची परिस्थिती पाहाता अतिशय खडतर परिस्थितीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत असे. असे असतानाही या 100 वर्षात या शाळेत 2500 चे आसपास विद्यार्थी या शाळेने घडविले ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. शिक्षण, आरोग्य पाणी या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी संभाजी साळवे,.दादाभाऊ बगाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली .
याप्रसंगी ,तुळशीराम भोईर संचालक जिल्हा बँक ,सुभाष मोरमारे माजी सभापती, समाजकल्याण .जयंतकुमार रघतवान,गोविंदराव साबळे,काळु शेळकंदे ,रविंद्र तळपे . पोपट राक्षे..मारूतीशेठ वायाळ, देवरामशेठ मुंढे ,शेख  (पालकमंत्री पुणे यांचे OHD) मा नंदकुमार तांबोळी उपस्थितीत होते आभार मुख्याध्यापक भौरले सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विद्यार्थी .आ.का.मांडवे यांनी केले.
शताब्दी महोत्सव यशस्वी साजरा करण्यासाठी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर रेंगडे, सरपंच विनोद रेंगडे, भिमाजी उतळे,किसनराव भोजणे,सुधाकर उतळे,किसनराव मांडवे,अनंता रेंगडे, दिलीप गायकवाड ,महिला मंडळ,बचतगट,ग्रामस्थ ,पोलिस मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

जलसंपदा विभागाचे मुंडे यांची अखेर बदली…

0

पुणे-जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची राज्य सरकारने औरंगाबाद येथे बदली केली असून, त्यांच्याजागी जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्रकुमार मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सुरू असलेल्या वादात मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

मुंडे यांची मोहिते यांच्या जागेवर बदली करण्यात आली असून, या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारने मंगळवारी याबाबतचा अध्यादेश काढला आहे. मुंडे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचा आधार घेऊन पुणे महापालिकेला ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी घ्यावे लागेल, अशी भूमिका घेतली होती. त्यावरून जलसंपदा आणि पुणे महापालिका यांच्यात वाद उफाळून आला होता. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने अखेर मुंडे यांची बदली करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

राज्य सरकारने बदली झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांबाबत आदेशात सूचना केल्या आहेत. त्यानुसार सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यास मूळ पत्त्यावर परत करावेत. बदली झालेल्या अधिकाऱ्याने रजेचे अर्ज पाठविल्यास त्या अर्जाची दखल घेण्यात येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

या बदलीच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचे उल्लंघन करणारी असल्याने ती गैरवर्तणूक समजून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे.

अतिरिक्त आयुक्तांना मारहाणीच्या निषेधार्थ स्थायी समिती तहकूब

0

पुणे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेली मारहाण तसेच त्यांच्यावर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ स्थायी समितीची मंगळवारी होणारी नियोजित सभा तहकूब करण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला. विरोधी पक्षाचे नगरसेवक तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून निंबाळकर यांना मारहाण झाल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने प्रशासनाच्या बाजूने उभे राहत तहकुबी मांडली.

महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलना दरम्यान निंबाळकर यांना मारहाण तसेच त्यांना अपशब्द वापरण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १७ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सभांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी होणारी स्थायी समितीची सभा तहकूब करावी लागणार होती. मात्र, सत्ताधारी भाजपने मारहाणीच्या घटनेचा निषेध करत नियोजित सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी निंबाळकर यांनी नगरसेवकांची लायकी काढली म्हणून अपमान केल्याने सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. या वेळी सत्ताधाऱ्यांनी गडबडीत मारहाणीचा निषेध करून सभा तहकूब केली.

‘हळदी -कुंकू ‘च्या माध्यमातून सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जनजागृती !

0
वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवाराचा विधायक उपक्रम  
पुणे :’ संस्कृतीचे रक्षण करतो सणवार साजरे करून , लोकशाही सक्षम करू या मतदान करून… सुदृढ लोकशाहीसाठी हवे तुमचे मतदान, विसरू नका ,चुकवू नका … मतदानाचा वसा टाकू नका, सारासार विचार करा ‘ नोटा ‘ बाद करा या आशयाच्या फलकांद्वारे हळदी – कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविलेल्या  मतदार जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुदृढ लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान होण्यासाठी भाजपचे   शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे यांनी हळदी – कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी   या विधायक उपक्रमाचे आयोजन केले होते.या उपक्रमाचे महिलावर्गांसह नागरिकांनी स्वागत करून अशा  समाजपयोगी प्रबोधनाची नितांत गरज असल्याच्या   प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबाबत भाजपचे   शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे म्हणाले कि, पारंपरिक सणांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच विविध विषयांवर प्रबोधनात्मक उपक्रम गेली १९ वर्षांपासून राबवित आहोत. सणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन प्रभावी ठरते.आरोग्य, शिक्षण , अंधश्रद्धा, पर्यटन,स्त्री शक्ती आदीसह सामाजिक प्रश्नांवर विविध उपक्रम राबविले जात आहेत.  या उपक्रमासाठी वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ माहितीपटाला कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तेजनार्थ पारितोषिक…

0
7 व्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच किफ 2019 मध्ये अमोल कचरे दिग्दर्शित ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या माहितीपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते माहितीपटाचे दिग्दर्शक अमोल कचरे यांनी पारितोषिक स्वीकारले.
महोत्सवात शॉर्ट फिल्म नॉन फिक्शन या विभागात ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या महितीपटाची निवड झाली होती. हा माहितीपट नाशिक येथील सुप्रिया आगाशे यांच्या कामावर बेतलेला आहे. सुप्रिया आगाशे या पर्यावरण संवर्धनासाठी गेली 15 वर्षांहून जास्त काळ सातत्याने काम करत आहेत.
ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी या माहितीपटाचे स्क्रिप्ट अमोल कचरे व श्रद्धा कोळेकर यांनी लिहिले असून सतिश शेंगाळे यांनी छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी पेलली आहे. ऋषिकेश कदम यांनी सबटायटल्स केली आहेत.
याआधी पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी या महितीपटाची निवड झाली होती.
माहिती : 
माहितीपटाचे नाव : ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी
निर्माता : अमोल कचरे आणि सतीश शेंगाळे 
दिग्दर्शक : अमोल कचरे 
स्क्रिप्ट : श्रद्धा कोळेकर-कचरे आणि अमोल कचरे 
छायाचित्रण आणि संकलन : सतीश शेंगाळे. 
सबटायटल्स : हृषीकेश कदम 

‘लोकराज्य’च्या फेब्रुवारी अंकाचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्या हस्ते विमोचन

0

पुणे :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या  लोकराज्य मासिकाच्या फेब्रुवारी,2019 च्या अंकाचे विमोचन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांच्याहस्ते येथील नवीन प्रशासकीय भवन येथे आज झाले. यावेळी माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नोंदणी विभागाचे राजेंद्र हिंगणे, सहायक संचालक श्रीमती वृषाली पाटील, माहिती सहायक जयंत कर्पे उपस्थित होते.

नागरिकांच्या सोईसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे विविध योजना डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. यामुळे दस्त नोंदणीची कामे सुलभ होणार असल्याने नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी याप्रसंगी केले. नोंदणी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ई-सेवांविषयी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व अभ्यागतांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी यावेळी केले. सुरक्षित कागदपत्रे-सुरक्षित समाज,गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्वच्छता हीच सेवा, नवे तंत्र-गतिमान विकास, शेती विकासाचा डिजीटल अध्याय यासह अन्य विषयांवर या अंकामध्ये माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती कार्यालय,  तळ मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे दूरध्वनी क्रमांक 020-26121307 येथे वार्षिक वर्गणी भरुन लोकराज्यचा अंक घरपोच पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

इस्रो तर्फे पुण्यात १५,१६ व १७ फेब्रुवारी रोजी अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन

0

सुरेश नाईक  स्पेस एज्युकेशन सेंटर चा अनोखा उपक्रमशालेय विद्यार्थ्यांना मिळणार अंतरिक्ष विज्ञानाचे धडे

पुण्यातील एक सुप्रसिद्ध ज्येष्ठ स्पेस शास्त्रज्ञ व इस्रो माजी समूह संचालक सुरेश नाईक, तसेच सुहास पुणेकर, व्यवस्थापकीय संचालक ‘पुणेकर एज्युकेशनल इनिटिविव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने चळवळीची सुरुवात करीत आहेत. ज्यायोगे स्पेस टेक्नॉलॉजी शिक्षणाला प्रचंड प्रेरणा मिळेल. तसेच याद्वारे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला देशव्यापी व्यासपीठ मिळेल. या चळवळीचा भाग म्हणून जगविख्यात संस्था इस्रोने पुण्यात १५,१६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाचे सह-प्रायोजक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आहे ज्यांच्या विद्यार्थ्यांनी इस्रो मदतीने स्वयं नामक उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोचे प्रदर्शन इस्रो स्पेस प्रदर्शनातील ठळक वैशिष्ट्यांमध्ये इसरो चे उपग्रह आणि त्यांच्या अनुप्रयोगांशी संबंधित पोस्टर्सचा एक संच समाविष्ट आहे. ज्यामध्ये  चंद्रयान / मंगळ  मिशन यांचा समावेश असेल.

या प्रदर्शनात इस्रो प्रक्षेपण केलेल्या सर्व उपग्रहांचे मॉडेल्स तसेच चांद्रयान व मंगळयान अभियानची क्षणचित्रे देखील या प्रदर्शनात पाहायला मिळतील. याशिवाय इस्रोचे विविध रॉकेट्स व सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांचे मॉडेल देखील या प्रदर्शनात असतील. या प्रदर्शनाच्या वेळी इस्रोचे वेब पोर्टल भुवन व त्यांची वेबसाईट याचे प्रात्यक्षिक केले जाईल. हे प्रदर्शन केवळ इस्रोचे कार्य पोस्टर्स, मॉडेल्स व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्या इतके मर्यादित नसून यावेळी विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधकांशी भेटण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही एक अविस्मरणीय संधी असेल.

अंमलबजावणीची कमी किंमत, डिझाइनची सोपी तयारी, डिझाईनचा साधेपणा तसेच स्पेस टेक्नॉलॉजी सारख्या रोमांचक विषयाची साथ यामुळे ‘सुरेश नाईक कबसॅट वर्कशॉप’ ही विद्यार्थ्यांसाठी अंतरिक्ष विज्ञान अनुभवण्याची नामी संधी आहे. पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह प्रा ली व सुरेश नाईक स्पेस एज्युकेशन सेंटर स्पेस एज्युकेशन क्षेत्रात दोन दिवसीय उपक्रमात उपग्रहाचे डिझाईन, बांधणी व प्रक्षेपण यांची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

पुण्यातील शाळेत जुलै २०१८ मध्ये प्रथम यशस्वी क्यूबसॅट कार्यशाळा आयोजित केली गेली. तेव्हापासून पुणे आणि लोणावळा  येथील विविध शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या रोमांचक कार्यशाळेत उत्साहाने भाग घेतला आहे. उल्लेखनीय आहे की पुण्याजवळील गावातील शालेय विद्यार्थ्यांना देखील या अत्यंत मनोरंजक शैक्षणिक मोहिमेद्वारे अंतरिक्ष तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आहे.

अंतरिक्ष विज्ञान, उपग्रह, इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड सिस्टीम्सचे मूलभूत ज्ञान  विद्यार्थ्यांच्या गटांना  अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शना  मूलभूत ज्ञान प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हे मिशन आदर्शपणे शाळेच्या विद्यार्थ्यांना वास्तविक उपग्रह विकासासाठी प्रथम चरण-प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. म्हणूनच “CubSat” नाव आहे.

या इच्छुक विद्यार्थ्यांना विशेषत: तयार केलेले संक्षिप्त अभ्यासक्रम दिले जाते ज्यावर प्रवेश परीक्षा (एमसीक्यू) आयोजित केली जाते. कामगिरीवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सहावी ते आठवी आणि नववी  ते बारावी  च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. या नाविन्यपूर्ण कार्यशाळेत ३५० वजनाच्या पॅराशूट ने सुसज्ज अशा उपग्रहाची बांधणी ५ विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये केली जाते.

विद्यार्थी वर्कशॉपचा भाग म्हणून पॅराशूट आणि ग्राउंड स्टेशन देखील तयार करतात. विशेषतः डिझाइन केलेले किट विद्यार्थ्यांना सर्व भाग, साहित्य आणि साधने प्रदान करते. एकत्रीकरणानंतर, प्रक्षेपणापूर्वीच विद्यार्थी  या प्रणालीचे परीक्षण करतात . या नाट्यपूर्ण मोहिमेची समाप्ती क्यूबॅट्सचे प्रक्षेपण करून होते. स्वतः तयार केला क्युब-सॅट १५ ते २० मीटर वर ड्रोनच्या साहाय्याने बघताना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होत असतो. हा उपग्रह पॅराशूट च्या मदतीने ड्रोन पासून वेगळा होतो व तो वातावरणातील तापमान यासारखी माहिती विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टेशन वर पाठवतो.

गेल्या दोन दशकांपासून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये ‘स्पेस सायन्स लोकप्रिय करण्यासाठी क्रुसेडर’ म्हणून ओळखले गेलेले माजी इसरो अंतरिक्ष शास्त्रज्ञ आणि स्पेस सोसायटीचे सध्याचे चेअरमन सुरेश नाईक यांनी या अभियानाचे मार्गदर्शन केले आहे. श्री  सुभाष पुणेकर, अध्यक्ष पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह्ज प्रा. लि. यांनी महाराष्ट्र आणि देशातील इतर भागांच्या हजारो शाळांतील विद्यार्थ्यांना हा अत्यंत मनोरंजक आणि प्रेरणादायी शैक्षणिक मोहिम घेण्याची योजना केली आहे आणि आकर्षक स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल माहिती पसरविण्याच्या क्षेत्रात क्रांती सुरू केली आहे.

१५ फेब्रुवारीला एसएसईसी आणि पीईआयची तिसरा उपक्रम गणेश कला आणि क्रीडा मंचच्या प्रेक्षागृहांमध्ये होणार आहे.