Home Blog Page 2983

महापालिका समिती सदस्यांच्या नियुक्त्या …पहा कोण कोण कुठे ..?

0

पुणे- महापालिकेच्या समिती सदस्यांच्या नियुक्त्या आज महापलिकेच्या मुख्य सभेत करण्यात आल्या .

यावर कोणाकोणाच्या नियुक्त्या झाल्या ते पहा …

विधी समिती –अजित दरेकर,सुनिता गलांडे,राजश्री नवले ,
प्राची आल्हाट,फरजाना शेख ,राजश्री शिळीमकर ,वीरसेन जगताप ,योगेश ससाणे,योगेश समेळ ,वनराज आंदेकर ,बाळा धनकवडे ,ज्योती गोसावी ,सुलोचना कोंढरे

शहर सुधारणा समिती-अनिल टिंगरे ,हर्षाली माथवड ,आनंद रिठे ,राजेश येनपुरे ,धनराज घोगरे ,राजू लायगुडे ,संजय घुले ,अमोल बालवडकर ,युवराज बेलदरे ,रफिक शेख ,पल्लवी जावळे ,नंदा लोणकर,परवीन शेख …
महिला बालकल्याण समिती –लता राजगुरू ,शीतल सावंत ,ज्योत्सना एकबोटे ,स्वप्नाली सायकर ,नीता दांगट,श्रद्धा प्रभुणे,मंगला मंत्री ,आरती कोंढरे ,रत्नप्रभा जगताप ,संगीता ठोसर ,मनीषा लडकत ,संजीला पठारे ,हमीद सुंडके
क्रीडा समिती -लक्ष्मी आंदेकर ,गफूर पठाण ,भैयासाहेब जाधव ,बाळासाहेब ओसवाल ,चांदबी हाजी नदाफ ,महेश वाबळे ,अजय खेडेकर ,श्रीकांत जगताप ,हरिदास चरवड ,प्रवीण चोरबोले,धीरज घाटे ,जयंत भावे ,विजय शेवाळे

जॉन्सन अँड जॉन्सन टॅल्क सुरक्षित असल्याचा भारत सरकारने दिला निर्वाळा

नवी दिल्ली – भारतातील बड्डी व मुलुंड येथील प्लांट्समध्ये जॉन्सन्स बेबी पावडरचे उत्पादन जॉन्सन अँड जॉन्सनने पुन्हा सुरु केले आहे.  सरकारने मंजुरी दिलेल्या परीक्षणातून असे आढळून आले आहे की, या उत्पादनामध्ये ऍसबेसटॉस नाही.  या निष्कर्षामुळे जगभरातील विद्यापीठे, संशोधन प्रयोगशाळा व सरकारी नियामकांनी केलेले स्वतंत्र परीक्षणांना समर्थन मिळाले आहे, या सर्व परीक्षणांमधून नेहमी असे आढळून आले आहे की, आमची टॅल्क सुरक्षित आहे.

गेल्या काही महिन्यात सिंगापूर, थायलंड,  सौदी अरेबिया,  जॉर्डन, कुवेत व  इजिप्त या देशांमधील नियामक अधिकाऱ्यांनीदेखील जॉन्सन अँड जॉन्सन टॅल्कच्या शुद्धतेची पुन्हा हमी दिली आहे.  आमची टॅल्क सुरक्षित आहे हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो.  या टॅल्कमध्ये ऍसबेसटॉस नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पुरवठादार व स्वतंत्र प्रयोगशाळांकडून याची नियमितपणे तपासणी केली जात असते.  जागतिक पातळीवरील नियामकांसोबत जॉन्सन अँड जॉन्सनने नेहमीच सहकार्य केले आहे.  त्यांनी मागितलेली १९६० च्या दशकापासूनची सर्व माहिती तसेच कॉस्मेटिक टॅल्कचे स्रोत व प्रोसेस्ड टॅल्क आम्ही त्यांना परीक्षणासाठी उपलब्ध करवून दिली.  संशोधन, क्लिनिकल पुरावे व जगभरातील स्वतंत्र वैद्यकीय तज्ञांच्या ४० वर्षांच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष कॉस्मेटिक टॅल्क सुरक्षित असल्याचे सांगतात.  हजारो स्त्री-पुरुषांना सहभागी करवून घेऊन केलेल्या अभ्यास व संशोधनातून असे आढळून आले आहे की, या टॅल्कमुळे कर्करोग किंवा ऍसबेसटॉसशी संबंधित आजार होत नाही.

मैत्री चित्रकला फौंडेशनतर्फे हास्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

0

पुणे : मैत्री चित्रकला फौंडेशनतर्फे येथील बालगंधर्व कलादालनात आज हास्यचित्र प्रदर्शनाचे  उद्घाटन ज्येष्ठ लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर हे होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य शिवारचे संपादक जयराम देसाई, प्रसिद्ध व्यंगचित्रकार  चारुहास पंडीत तसेच वैजनाथ दुलंगे, गणेश उर्फ सारंग दिवेकर, गौतम दिवार आदी उपस्थित होते.  प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, शब्दात व्यक्त करता येत  नाही ते कुंचल्याच्या एका  फटकाऱ्यातून  सांगण्याची ताकद व्यंगचित्रकाराकडे असते. हास्य चित्रातून व्यंगचित्रकार जगण्याची हसत-खेळत उलटतपासणी करतात. जोशी पुढे  म्हणाले, सध्या टीका करणारी व्यंगचित्रे सहन होत नाहीत, सगळ्यानांच फक्त कौतुकाची सवय लागली आहे, कलाकाराची कला  निर्णय शासन घेऊ लागते  किंवा  झुंडी येऊ लागतात तेव्हा कलेचे अधःपतन सुरु होते, विनोदबुद्धी क्षीण होणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. वैजनाथ दुलंगे, गौतम दिवार आणि गणेश उर्फ सारंग दिवेकर यांची व्यंगचित्रे रंजन करतानाच डोळ्यात अंजन घालणारी आहेत. व्यंगचित्रकरांची पुढची पिढी समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत आहे हि समाधानाची बाब आहे.

अनिल उपळेकर, चारुहास पंडीत  यांनीही  या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला   प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख,ग्राफिक डिझायनर शाम वायचळ, प्रथमेश पाटील, श्रीकांत तिकोने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.

सदरचे प्रदर्शन या ठिकाणी दोन मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी  ७ वाजेपर्यंत   सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये …

0

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्याशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ मध्ये कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. त्यांना उपनेतेपदही दिले होते. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे मार्फत महाराष्ट्रातील अनोखे बिजनेस मास्टरी सेमिनार- “द लिमिटलेस यु”

0

पुणे-एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे गेल्या ३ वर्षापूर्वी मणक्याच्या आजाराने अंथरुणाला खिळलेले होते  त्यानंतर त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उद्योग जगतात झेप घेतली. एक तरुण उद्योजक म्हणून ओळखले जाणारे एव्हरेस्टवीर व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिजनेस कोच आनंद बनसोडे यांचा सेमिनार पुणे येथे आयोजित केला गेला आहे. पुण्यातील पदमजी हॉल, टिळक रोड येथे ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ४ तासांचे हे सेमिनार आयोजित केले गेले आहे.

तरुण उद्योजकांनी नक्की आयुष्यात ध्येय ठेवून कसे मार्गक्रमण केले पाहिजे?, बिजनेस सेटबॅकला कसे सामोरे गेले पाहिजे, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी नक्की कोणत्या मानसिकतेची गरज असते , असे अनेक विषय या सेमिनार मध्ये घेतले जाणार आहे.

सेमिनारमध्ये काय शिकाल-

–    तुमच्या “बिजनेस बिलिफ सिस्टीम” वर काम करून त्याद्वारे अपेक्षित यश कसे मिळवले पाहिजे.

–    तुमचे नकारात्मक “मेंटल ब्लॉक” काढून त्याद्वारे सर्वोच्च सकारात्मक आयुष्य कसे जगावे.

–    बिजनेस मार्केटिंग, सेल्स ग्रोथ आणि नेटवर्क बिल्डींगसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लुप्त्या.

–    “आकर्षणाचा नियम” व “विपुलतेचा नियम” यांचा योग्य पद्धतीने वापर व त्याद्वारे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात लिमिटलेस यश कसे मिळवता येते.

–    Output based Meditation आणि त्याचा बिजनेस ग्रोथ मध्ये होणारा उपयोग.

–    आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिजनेस सिस्टीम जी तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या बिजनेसमध्ये वाढ करेल.

एव्हरेस्टवीर व बिजनेस कोच आनंद बनसोडे यांचे सेमिनार येत्या काळात पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्ये आयोजित केले जाणार असून हे सेमिनार पूर्णपणे फ्री असणार आहे. या सेमिनार ला उपस्थित राहण्यासाठी 9067045500 / 9067035500 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन “द लिमिटलेस यु” या कंपनीमार्फत केले गेले आहे.

अनुभवा ईशान्य भारताचे सौंदर्य

0
पुणे- पुण्यातील हौशी छायाचित्रकारांनी टिपलेले ईशान्य भारतातील सृष्टी सौंदर्य ‘ट्रॅव्हल डायरी’ या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे. लेह-लडाख, भूतान, आसाम, चादर, कंबोडिया, स्पिटी, अरुणाचल प्रदेश या परिसरातील पशु, पक्षी, निसर्ग संपदा, मानवी जीवन, संस्कृती या विषयांवरील छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत येत्या रविवारपर्यंत (३ मार्च) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती संयोजक अजित आपटे यांनी कळविली आहे. प्रवेश विनामूल्य.

डॉ. देगलूरकर, ठाकूर यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर

0
पुणे, 
रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे यंदाचा ‘परमपूजनीय गुरुजी पुरस्कार’ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी ही माहिती दिली. साहित्य या गटासाठीचा पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना तर सेवा या गटासाठीचा पुरस्कार भारती ठाकूर यांना प्रदान केला जाणार आहे.
भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा, मंदिरांचे कालजयी, विलोभनीय स्थापत्य तसेच मूर्तीशिल्प यांचे अलौकिकत्व या विषयावर डॉ. देगलूरकर यांनी संशोधन आणि लेखन केले आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन या क्षेत्रात ते अनेक वर्षे सक‘ीय असून अनेक ‘यातनाम संस्थांमध्येही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
मध्यप्रदेशातील निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट ऍण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेच्या संस्थापिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका अशी भारती ठाकूर यांची ओळख आहे. निमाड भागात त्यांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग‘ामीण भागात उद्योगांचे प्रशिक्षण, वसतिगृहे, गोशाळा, शिवणकेंद्र या माध्यमातून त्यांनी स्थानिक तरूणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी, ३ मार्च रोजी नांदेड येथे होणार असून शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.

…मी पुण्याच्या पोलीस आयुक्ताला सस्पेंड केलं असतं- शरद पवार (व्हिडीओ)

0

पुणे – मी राज्यकर्ता असतो तर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्‍त्यांवर खटले दाखल करणाऱ्या पोलिस आयुक्तांना प्रथम निलंबित केले असते. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज भाजप सरकारवर खरमरीत टिका केली. यावेळी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या राज्यकर्त्यांना हटविण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवगौरव शिवसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार मा.म.देशमुख आणि माजी न्यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील यांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, ज्येष्ठ अभिनेते शंतनू मोघे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

घटनेने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे, विचार पडत नसतील तर त्याचे उत्तर विचारांनी दिले पाहिजे पण सध्या मत मांडण्याचा अधिकार राहीलेला नाही. वेगळे विचार मांडणाऱ्यांना डांबून ठेवले जात आहे. त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. हे योग्य नाही. आपल्याकडे सर्वोच्य न्यायालय अजून जिवंत असल्याने थोडे फार बरे आहे तरी सुध्दा अशा वक्‍त्यांना कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार चालणार नाहीत. आम्हाला म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये त्यामुळे या राज्यकर्त्यांना उलथवून टाकण्यासाठी आता सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुरस्कार्थीमध्ये बी.जी कोळसेपाटील, मा.मू.देशमुख, प्रताप गंगावणे, शंतनू मोघे, दादा पासलकर यांची सुद्धा भाषणे झाली. याशिवाय शिवजयंतीच्या निमित्ताने आयिोजत केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सुद्धा यावेळी पारितोषिके देण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, प्रधान सचिव यांना साकडे

0
मुंबई – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यां व प्रश्नांसंदर्भात मंत्रालय व विधानभवन येथे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, प्रधान सचिव यांना निवेदन देत आपले ग्रहाणे मांडून साकडे घातले आहे.
यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्काळ बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. तसेच कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की, लवकरात लवकर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावू देऊ असे सांगितले. महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर म्हणाले की, राज्यातील सर्व आस्थापने वरील तसेच बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्या पदावर कायम समायोजन करावे, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला प्रमाणे समान काम, समान वेतन देण्यात यावे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट केले. महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी परमनंट केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, विविध महानगरपालिका आदी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, कार्याध्यक्ष  सचिन जाधव, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, सचिव बाबासाहेब कोकाटे, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, महिला अध्यक्ष माधुरी थोरात, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील सह आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील लेखकाचे पंतप्रधानांना पत्र -युद्ध नको …

0

(एकीकडे सर्वत्र पाकिस्तानला धडा शिकवाच अशी मागणी होताना दिसत असताना ,युद्ध नको …अशी मागणी करणारे पत्र पुण्यातील लेखक संजय सोनवणी यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे ,ते  -येथे जसेच्या तसे देत आहोत ..)

मा. श्री. नरेंद्र मोदीजी,

आदरणीय पंतप्रधान भारत सरकार

नवी दिल्ली

स.न.वि.वि.

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी कृत्यानंतर या दहशतवादी घटनेमागे असलेल्या अतिरेकी शक्तींना धडा शिकवणे आवश्यक होते. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करुन आपल्या हवाई दलाने चोख कामगिरीही बजावली. म्हणूनच याचे नेतृत्व करणाऱ्या आपले मनपूर्वक अभिनंदन. मात्र त्यानंतर दोन्ही बाजुंच्या युद्धज्वराने पछाडलेल्या काही गटांनी जे वातावरण निर्माण केले त्यामुळे मला जी काळजी वाटते आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून जे वाटते ते आपणासमोर नम्रपणे मांडत आहे. त्यानंतर इम्रानखान यांच्या प्रस्तावानंतर मला ही आपणासाठी ऐतिहासिक संधी आहे असे वाटते. अशा स्थितीत नियतीने आपल्याला दिलेल्या ऐतिहासिक संधीचा लाभ घेत आपण

दूरगामी मुत्सद्दीपणाचे निर्णय घेत तसे धोरण राबवत या युद्धज्वराला विराम देत, सैनिक व नागरीकांचे जीवित/वित्त सुरक्षित ठेवत देशाचा गरिमाही उंचावू शकता. आज कदाचित माझे हे म्हणणे आपणास आवडणार नाही मात्र मी मनातील भावना व्यक्त केली नाही तर इतिहास मला माफ करणार नाही असे वाटल्याने हे धाडस दाखवत आहे.

मा. महोदय, आपल्या भारतभुमीची खरी ओळख बुद्ध-महावीराचा आणि गांधीजींचा देश अशी आहे. “सबलांचा अहिंसावाद” हे गांधीजींच्या तत्वज्ञानाचे मुलभूत सार आहे आणि आपणही दहशतवादाला खरे उत्तर गांधीजींचेतत्वज्ञानच आहे असे एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हटल्याचे स्मरते. आपणही गांधीजींच्या भूमीतून आलेले आहात. आपण जगात जेथे जेथे गेलात त्यावेळीस भारताच्या या प्रतीकासमोर नतमस्तक झाला आहात. भारत आज सबळ आहे आणि तो भविष्यात अजून जास्त प्रबळ बनत महासत्ता बनेल अशी स्वप्ने देशवासी पहात आहेत. हे स्वप्न सातत्याने युद्धसदृष्य वातावरण निर्माण करत निर्माणाऐवजी विध्वंसाची भाषा करत राहिल्याने पुर्ण होऊ शकणार नाही हे आपणही जाणता. बुद्ध-गांधीजींच्या मार्गानेच हे साध्य होऊ शकणारआहे यात शंका नसावी.

आपण सरदार पटेलांचा अभिमान वाटेल असा गगनचुंबी पुतळा स्थापित केला, पण अनाहुतपणे बुद्ध आणि गांधीजींची प्रतिमा छोटी झाली. हे आपल्या लक्षातही आले नसावे. चीनने यासाठी दिलेले योगदानही आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारले. सरदार पटेल हे गांधीजींच्याच तत्वज्ञानाचे पाईक होते आणि संस्थाने विलीन करण्यासाठी त्यांनी जे जे मार्ग वापरले ते गांधीजींच्याच अनुमतीने हे बहुधा देश विसरला. शत्रुबाबत अहिंसेचे धोरण चालत नाही हे गांधीजींना माहित होते, पण त्याआधी शांततेचे सर्व प्रयत्न, प्रसंगी नुकसान सोसुनही, करणे ही पुर्वअट होती हे मात्र आपण विसरत असतो. त्यामुळेच काश्मिरमध्ये जेंव्हा टोळीवाले शिरले तेंव्हा सैन्य पाठवायची अनुमती देणारे गांधीजीच होते. शांततेचे सर्व मार्ग खुंटल्यानंतरच आपली शक्ती दाखवून देणे आणि थांबत पुन्हा कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे.

पाकिस्तानला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. आता मात्र पुढे जाताना भारताच्या इतिहासाकडे आपण जरूर डोकावून पाहायला हवे. सिकंदराबद्दल तर एक गाणे प्रसिद्ध आहे “वो सिकंदर भी क्या था जिसके होसले तो भारी थे, जब गया इस दुनियासे दोनो हाथ खाली थे”

आपणास नुकताच जागतीक शांतता पुरस्कार मिळाला आहे.  या युद्धायमान स्थितीत आपण बुद्धाला आणि गांधीजींना आदर्शभूत मानत योग्य पावले उचलत नुसती भारतीय उपखंडातच नव्हे तर जागतीक शांतीसाठी, मानवतेच्या रक्षणासाठी फार मोठी भुमिका निभावू शकता. आपणास जागतीक नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने आली आहे. दहा हजार वर्षांची सांस्कृतीक परंपरा असलेल्या या महान संस्कृतीचे सुपूत्र म्हणून आपण ही जबाबदारी कशी पार पाडता याकडे सारे जग आपल्याकडे डोळे लावून बसले आहे. आपण ती जबाबदारी युद्धज्वराला प्रोत्साहन देवून पार पाडता की शांततेला सर्वोपरी मानत पार पाडता यावर इतिहासातील आपले स्थान अवलंबून असणार आहे. सम्राट अशोकालाही कलिंग युद्द्धातील अपार हिंसेनंतर शेवटी बुद्धाकडेच वळावे लागले. आपण त्यापासून धडा घेत जर आधीच बुद्धमार्ग धरला तर ते जास्त अभिमानास्पद राहील आणि महावीर, बुद्ध आणि गांधीच्या परंपरेत जग आपली आठवण ठेवेल.

अन्यथा क्रियेची प्रतिक्रिया या न्यायाने हे एकमेकांवर होणारे हल्ले सातत्याने चालू राहतील आणि देशाची शक्ती घटत राहील. फुटीरतावादी शक्ती याचा अजुनच गैरफायदा घेतील आणि देश अजुनच पोखरला जाईल. दहशतवादी मनोवृत्ती असलेल्यांना उलट यातून प्रोत्साहनच मिळेल. हे थांबवण्यासाठी सबलांनीच कोठे थांबायचे हे समजावून घेतले पाहिजे. आणि त्यासाठी प्रथम आमच्या देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय प्रवाहात एकदिलाने आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही भागातील नागरिकांना हे राष्ट्र माझ्यासाठी आणि माझे आहे ही हार्दिक भावना निर्माण करावी लागेल. त्याशिवाय शत्रुची खरी आणि कायमस्वरुपी हार झाली आहे असे मानता येणार नाही. हा बुद्ध -गांधीजींचा मार्ग होय. आणि तोच शेवटी भारताला उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो आणि त्याचे नेतृत्व आपणच करावे आणि भावी काळातील सर्व सत्तांसाठी आणि जगासाठी एक आदर्श मार्ग घालून द्यावा व त्यासाठी जागतीक सत्तांनाही सोबत घ्यावे अशी आपणाकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा पुर्ण झाली तर भारताची ओळख जगात उद्या श्री. नरेंद्र मोदींचा देश अशी होऊ शकेल.

महाराष्ट्रातीलच एका आमदाराने अलीकडे आपल्या भक्तीपोटी आपल्याला विष्णुचे अवतार संबोधले होते. त्यात अंधश्रद्धा, अतिशयोक्ती आणि भाबडेपणा असला तरी भारतातील एक वर्ग आपल्याकडे अवताराच्याच दृष्टीने पाहतो हे वास्तव नाकारता येत नाही. बुद्धानंतरचा हा अवतार बुद्धाच्याच मार्गाला शिखरावर नेईल अशी आपल्या भक्तांचीही अपेक्षा आहे. आपण त्यांना तरी निराश करणार नाही याचीही आशा आहे.

पुलवामातील जवानांच्या हत्यांबद्दल प्रत्येक नागरिकाचे हृदय उद्रेकत आहे. त्या शोकाने काळीज पिळवटते आहे. विंग कमांडर अभिनंदन यांचीही चिंता सतावते आहे. पण हीच वेळ शांतपणे विचार करुन भावी दिशा ठरवण्याचीही आहे. युद्धखोर सत्ता जगाच्या इतिहासात काय स्थान प्राप्त करुन बसल्या आहेत हे आपणास माहितच आहेच. आम्हाला आमच्या देशाची प्रतिमा नकळतपणे “युद्धखोर देश” अशी होऊ नये तर सर्वार्थाने सबळ असलेला शांततेचा पाईक असलेला देश अशी ही अपेक्षा आहे.  माझी आपणास हा सल्ला देण्याची योग्यता नाही आणि सध्या आपलीही ऐकण्याची वेळ नाही याची जाणीव असुनही इतिहासाचा अभ्यासक म्हणून ही विनंती करीत आहे. पत्र मराठीत आहे मात्र आपण महाराष्ट्रावर प्रेम करता आणि आपली प्रेरणाभूमी महाराष्ट्र असल्याचे आपण नेहमीच सांगत असता म्हणूनच आपण जरूर विचार कराल ही भाबडी आशा.

आपला,

संजय सोनवणी

पुणे. 

Sanjay Sonawani
9860991205

१९ मार्च रोजी- एक दिवस-अन्नदात्यासाठी -अन्नत्याग

0
जुन्नर /आनंद कांबळे
आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी येत्या19 मार्च रोजी देशभरातील किसान पुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत,असे ज्येष्ठ पत्रकार अमीर हबीब यांनी सांगितले .
यंदा देशाच्या भिन्न राज्यात तसेच जगातील भिन्न देशातही एक दिवस उपवास केला जाणार आहे.
19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. साहेबराव करपे हे चिल गव्हाण (यवतमाळ) येथील राहणारे. संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंच पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱयांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. सरकारे बदलली पण शेतकऱयांचे हाल थांबले नाहीत.
आपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रूर कायदे बदलण्याचे अधिकार नाहीत. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो? किमान एक दिवस आपल्याला घास जाणार नाही. बस हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे.
ज्यांना शक्य असेल ते सामूहिक रित्या एके ठिकाणी बसून उपवास करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे.
हा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील 19 मार्चला उपवास करू शकतात.
आपण हा उपवास का करायलाच हवा कारण अन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतकर्याची मुलं मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्याला विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेतकऱयांप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे.
हा उपवास कोणत्या मागणी साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शेतकऱयांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? त्या थांबाव्यात या साठी काय केले पाहिजे?  त्यासाठी मी काय करू शकतो? याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे. होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.
आपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. मी 19 मार्चला दिल्लीत म. गांधींच्या समाधीला प्रणाम करून उपवास सुरू करणार आहे. तुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा! असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करीत आहे.

थायलंड येथील बुद्ध भीक्खु व अभ्यासकांची जुन्नर येथील बुद्ध लेणीस भेट

0
जुन्नर /आनंद कांबळे 
:जुन्नर तालुक्यात भारतातील दोन हजार वर्षां पुर्वीच्या सर्वात जास्त  लेणी आहेत.सातवाहन काळात जुन्नर हि सातवाहनांची आर्थिक राजधानी होती.कल्याण ते पैठण हा व्यापारी मार्ग जुन्नर येथील नानेघाटातून जातो.अनेक लेण्या या मार्गावर बौद्ध भीक्खुंसाठी सातवाहन राजांनी कोरल्या होत्या.आज दोन हजार वर्षां नंतर सुद्धा या लेणी पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक अभ्यासक येत असतात.जुन्नर येथील लेणींचा अभ्यास करण्यासाठी थायलंड व बांगलादेश येथील बौद्ध भीक्खु नुकतेच जुन्नर येथे आले होते.त्यांच्या सोबत मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाच्या प्रमुख डॉ.योजना भगत, लेणी अभ्यासक संजय जांभुळकर,डॉ.अमोल पुंडे,सिद्धार्थ कसबे,प्रकाश वणवे,अश्विन कांबळे,अक्षय अडबाळे,अक्षय चौरे,पराग छल्लारे,विकास ढोबळे व अनेक विद्यार्थी  होते.सातवाहन कालीन नाणेघाट,तुळजा,मानमोडी गटातील अंबा अंबालिका,भुत लेणींचा यावेळी त्यांनी अभ्यास केला.
थायलंडचे भंते अदुल जुनतुपामो यांनी सांगितले की भारत हि बुद्धांची भुमी असुन थाई लोकांना या भुमीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.आज या लेणींना भेट देवुन आम्ही धन्य झालो आहोत.येत्या डिसेंबर महिन्यात  सुमारे  थायलंडचे १०० भीक्खु हे मुंबई येथील नालासोपारा स्तुप ते अजंठा लेणी या मार्गावरील सर्व लेण्या पायी फिरून पाहणार आहेत.दोन हजार वर्षां पुर्वी अनेक भीक्खु या मार्गावरून प्रवास करत या लेण्यांत लोकांना बुद्धाच्या जीवन कल्याणाचा मार्ग सांगत असतील, तो अनुभव आम्हाला अनुभवायचा आहे व लेणी अभ्यासासाठी  आम्ही येथे आलो आहोत.
डॉ.योजना भगत यांनी  लेणींचे महत्व, उपयोग तसेच
या लेणींसाठी लेणीत कोरलेल्या पालीभाषेतील धम्मलिपीतील शिलालेखावरून या लेणी कोरण्यासाठी राजे,शेतकरी,व्यापारी तसेच ग्रीक लोक आदींनी दान दिल्याचे सांगितले.

‘एचसीएमटीआर’ रस्ता भूमिपूजनाच्या मार्गावर ! ५ हजार १९२ कोटींचे ग्लोबल टेंडर

0
पुणे: नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी  शाश्‍वत पर्याय ठरणाऱ्या  ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीसाठी [रिंगरोड ]   ५ हजार १९२ कोटी रुपयांची निविदा निघाल्याने  या  महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. आता भूमिपूजन होऊन या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे,अशी प्रतिक्रिया या रिंग रोडसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
यासंदर्भांत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’साठी ५हजार १९२ कोटींची निविदा प्रक्रिया झाल्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग सुकर झाला आहे. एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे.  रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या  मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.
 माजी उपमहापौर आबा बागुल  पुढे म्हणाले कि, १९८७ च्या आराखड्यात काँग्रेसने भविष्यातील वाहुकीचा विचार करून या  नियोजित प्रकल्पासाठी आखणी केली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला. त्यामुळे २००७ मध्ये पालिकेत विरोधीनेता पदाच्या माध्यमातून  हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग  मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तेंव्हापासून सलग १२ वर्षे पुणे महानगरपालिका , राज्यसरकार व केंद्रसरकारकडे शेकडो पत्रे , निवेदने , प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करीत आलो. या प्रकल्पासाठी वनविभाग व केंद्रसरकारच्या तसेच काही खासगी जमिनींचे भूसंपादन पाहता दिरंगाई निर्माण झाली . त्यामुळे त्या- त्या विभागांकडे पाठपुरावा करीत राहिलो.  गांधीगिरीच्या माध्यमातून रोज एक पत्र आणि गुलाबाचे फुल देऊन या प्रकल्पाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहताना या प्रकल्पाचे भूसंपादन, संपूर्ण आराखडा, सल्लागार नियुक्तीसह आर्थिक तरतूदसाठी विविध पर्याय सुचवून हा प्रकल्प मार्गी लावला, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षातर्फे गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी येत्या जूनमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन निश्चित  केल्याने आणि आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ५ हजार १९२ कोटींचे ग्लोबल टेंडर निघाल्याने  खऱ्या अर्थाने भूमिपूजनाचा   मार्ग सुकर झाला असून प्रकल्पाला चालना मिळणार आहे.

मुस्लीम सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय हवाई दलाचे अभिनंदन

0
पुणे :
दि मुस्लीम सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्त्युत्तर देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करण्यात आले. अभिनंदनाचा विशेष ठराव मांडण्यात आला. त्याला सभासदांच्या टाळयांच्या गजरात मान्यता देण्यात आली.
 अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते. आझम कॅम्पस असेंब्ली हॉल येथे ही सभा झाली. संचालक वर्ग, सभासद , कर्मचारी उपस्थित होते.

२ ते ५ मार्च दरम्यान कर्नावल २०१९ साजरा करण्यासाठी गोवा सज्ज

0

रेप एस्केपेड फूड अँड लाइफस्टाइल फेस्टिव्हल २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१९ दरम्यान

 पणजी– ही वेळ राम्बा साम्बाच्या तालावर डोलण्याची आणि लवकरच सुरू होत असलेल्या कर्नावलचे चार दिवस भरपूर मजामस्ती करण्याची.

 गोवा सरकारचे पर्यटन खाते २ ते ५ मार्च २०१९ दरम्यान सादर करत आहे, बहुप्रतीक्षीत गोवा कर्नावल. फ्लोट परेडला शनीवार, दोन मार्च रोजी गोव्याच्या राजधानीतून – पणजी येथून झेंडा दाखवला जाईल.

पणजीमध्ये नव्या मार्गावर परेडचा यशस्वी शो केल्यानंतर राजधानीतील फ्लोट परेड मीरामार ते डोना पावलादरम्यान सुरू राहील. शनीवारी पणजीतील या फ्लोट परेडला माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांच्या हस्ते दुपारी चार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवला जाईल.

यंदाच्या कर्नावलसाठी तुफान प्रतिसाद लाभेल अशी राज्याची अपेक्षा आहे. या महोत्सवाचे आयोजन मेसर्स विनायक डेकोरेटर्स करत आहे. माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज पत्रकार परिषदेत कर्नावलसाठी खास गाणे प्रदर्शित केले. या गाण्याची संगीत रचना/मिक्सिंग मुकेश अगरवाल यांनी केली आहे, तर ते रोक लाझारूझ आणि मुकेश घटवाल यांनी लिहिले आहे. क्वीनी फर्नांडीस आणि मुकेश घटवाल यांनी ते गायले आहे.

कर्नावलच्या पर्श्वभूमीवर गोव्यात सर्वत्र रंगीबेरंगी पताका, बॅनर्स, मुखवटे आणि या संकल्पनेला साजेशी सजावट करण्यात आली आहे. कर्नावलच्या या उत्साहवर्धक चार दिवसांत फ्लोट परेड गोव्यातील मुख्य शहरांत म्हणजेच पणजी (२ मार्च), मडगाव (३ मार्च), वास्को (४ मार्च) आणि म्हापसा (५ मार्च) रोजी होणार आहे. छोट्या शहरांत ही फ्लोट परेड पोंडा व कुंकोळी येथे ४ मार्च रोजी, तर मोर्जोरी व शिरोडा येथे ५ मार्च रोजी होणार आहे.

यावर्षी पणजीचे विल्यम अनीस (५३) किंग मोमो होऊन कर्नावल परेडचे नेतृत्व करतील. अनीस हे गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात व त्यांनी आतापर्यंतच्य काही कर्नावलमध्ये नर्तक म्हणून सादरीकरण केले आहे. किंग मोमो ही पौराणिक व्यक्तीरेखा असून ती कर्नावल साजरा करण्याशी संबंधित आहे. ते या चार दिवसांत ‘खा, प्या आणि मजा करा’ असा आदेश देणार आहेत. परेडमध्ये विविध विभागांअंतर्गत वेगवेगळे सहभागी पाहायला मिळतील व ते वैविध्यपूर्ण संकल्पना व संदेश दर्शवताना दिसतील. फ्लोट स्पर्धेसाठी बक्षिसाची एकूण रक्कम ५४.४० लाख रुपये आहे, तर सर्व केंद्रांच्या पायाभूत सुविधांचा खर्च १.०९ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

गोवा सरकारचे पर्यटन खाते सादर करत आहे, गोव्याचा उच्चभ्रू खाद्यपदार्थ आणि जीवनशैली महोत्सव – द ग्रेप एस्केपेड. बहुप्रतीक्षीत ग्रेप एस्केपेड खाद्यपदार्थ, फॅशन आणि मनोरंजनाच्या दुनियेतील सर्वोत्तमाचा आनंद घेण्यासाठी आयोजित केला जातो. या चार दिवसीय महोत्सवात पर्यटन, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, हॉटेल चालक, रेस्टॉरंट मालक, वायनरीज आणि उत्पादक एकत्र येत त्यांची सर्वोत्तम उत्पादने उपलब्ध करतात. हा ग्रेप एस्केपेड २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१९ दरम्यान डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे आयोजित करण्यात आला असून त्याचे व्यवस्थापन विनसन वर्ल्ड यांनी करत आहेत.

द ग्रेप एस्केपेड २०१९ मध्ये ४० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होणार असून त्यात स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाइन उत्पादकांचा समावेश असेल. वाइनसोबत मजा घेण्यासाठी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करणारे स्टॉल्स प्रेक्षकांना खाद्ययात्रेचा वेगळाच अनुभव देतील. सहभागी वायनरीजमध्ये सुला विनयार्ड्स, ग्रोवर झांपा विनयार्ड्स, बिग बन्यान वाइन्स, ओशन किंग डिस्टीलर्स, टोनिया वाइन्स, गुड ड्रॉप वाइन्स, सँटीज वाइन्स, पोमार दे फअरुटाज, फ्रॅटेली वाइन्स, इंडस वाइन्स आणि इतरांचा समावेश आहे. गोयची चुल, बे १५, यलो चिली, आनंदाश्रम, टेम्पटेशन्स, सुआ कासा रेस्टॉरंट्स, हंग्री हॅट्स ग्रिल, ओ कॉकेरिओ अँड टिंज, टोरो टोरो हे ग्रेप एस्केपेडच्या खाद्यअनुभूतीमध्ये सहभागी होतील.

महोत्सवात येणाऱ्यांसाठी लक्षवेधी मनोरंजनाची सोय करण्यात आली असून त्यामुळे या महोत्सवाची रंगत आणि खुमारी आणखी वाढण्यास मदत होणार आहे. अनुषा शेख यांच्यातर्फे फॅशन शो, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, डान्स- ओ- फिलिआ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे (जीआयपीए) नृत्य सादरीकरण, शाइन ऑन ड्युओ – सिडनी अँड सिल्विहना, राऊल विथ रॅग्ज टु रिचेस, बँडवॅगन, प्युअर मॅजिक, कार्लोस अँड फ्रेंड्स, अल्काट्राझ क्रिमसन टाइड आणि कॉफी कॅट्स यांचे संगीत सादरीकरण ग्रेप एस्केपेडची मजा आणखी वाढवतील.

महोत्सवाच्या वैशिष्ट्यांमध्ये ग्रेप स्टॉम्पिंग, ग्रेप एस्केपेड क्वीनची निवड असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विजेत्यांना खास गिफ्ट व्हाउचर्स, हॅम्पर्स व आणखी बरंच काही जिंकता येईल. वाइन्स अँड स्पिरीट्स एज्युकेशन ट्रस्ट लंडन, इंग्लंडशी संलग्न असणारे प्रमाणित सोमेलियर आणि कॉनेसेएर जॉन डिसूझा १ मार्च २०१९ रोजी टेस्टिंग सत्राचे खास आयोजन करणार आहेत.

ग्रेप एस्केपेडला हजारो प्रेक्षक विशेषतः स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. हा महोत्सव गोव्याची समृद्ध संस्कृती, वारसा, खाद्यपदार्थ आणि मनोरंजन साजरे करणारा आहे व यंदाच्या भव्य कार्यक्रमासाठी तो सज्ज होत आहे. ग्रेप एस्केपेड सर्वांसाठी खुला असून संध्याकाळी सहा वाजता मौजमजेची सुरुवात होणार आहे.