Home Blog Page 2979

गोदरेज अप्लायन्सेस ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल सर्वात कमी असणारे भारतातील सर्वात पर्यावरणपूरक एसी दाखल करून नवा मैलाचा टप्पा निर्माण करणार

38 हून मॉडेल असणाऱ्या, नव्या एअर कंडिशनरमध्ये केवळ सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट्सचा वापर – ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल सर्वात कमी असणारे R290 व R32

~ ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल सर्वात कमी असणाऱ्या R290 या जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंटचा वापर करणारा भारतातील एकमेव एसी उत्पादक

~ आगामी उन्हाळ्यामध्ये एसी श्रेणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% वाढ करण्याचे उद्दिष्ट

 

मुंबईब्रँडच्या ‘सोच के बनाया है’ या विचारसरणीनुसार आणि पर्यावरण या ब्रँड मूल्यानुसार, गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस उद्योगातील एका आघाडीच्या कंपनीने विविध प्रकारचे पर्यावरणपूरक एअर कंडिशनर दाखल केले. नव्या एसींमध्ये 38+ मॉडेलचा समावेश असून, त्यामध्ये R290 व R32 या सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंटचा वापर करण्यात आल्याने ही एसी सर्वात कमी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल (जीडब्लूपी) असणार आहेत.

नासा गिसच्या मते, सन 1880 पासून जागतिक तापमान दरवर्षी 1.9F या प्रमाणात वाढते आहे. आजवर नोंदवण्यात आलेल्या सर्वात उष्ण वर्षांमधील 18 वर्षे केवळ 2001 या वर्षानंतरच्या वर्षातील आहेत. येणारा प्रत्येक उन्हाळा अगोदरच्या वर्षातील उन्हाळ्यापेक्षा उष्ण असतो. ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनात वाढ होत असल्याने हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होते. हवामानातील बदलांबद्दल चर्चेमध्ये भारतही केंद्रस्थानी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड विचारात घेता, ग्लोबल वॉर्मिंगवरील व हवामानातील बदलांवरील परिणाम यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पर्यावरणाप्रती असणाऱ्या ब्रँडच्या दीर्घकालीन बांधिलकीच्या अनुषंगाने, गोदरेज अप्लायन्सेसने जास्तीत जास्त कूलिंग देण्यासाठी, पण पर्यावरणावर कमीत कमी परिणाम करण्यासाठी नवे एअर कंडिशनर दाखल केले आहेत. हरित हे वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवून, नव्या गोदरेज एसीच्या मालिकेत केवळ R290 व R32 रेफ्रिजरंटचा वापर केला आहे. या दोन्ही रेफ्रिजरंट्समध्ये ‘झीरो ओझोन डिप्लिशन पोटेन्शिअल (ओडीपी)’ आहे, त्यामुळे पृथ्वीच्या ओझोन स्तराला हानी पोहोचवली जात नाही, त्यामुळे पृथ्वीचे व तिच्या वातावरणाचे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण केले जाते. दुसरे म्हणजे, या रेफ्रिजरंट्समध्ये ‘लोएस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल’ असून R290 मध्ये ते केवळ 3 आहे आणि R32 मध्ये केवळ 675 आहे, या तुलनेत अन्य रेफ्रिजरंट्समधील जीडब्लूपी 1810 व त्याहून अधिक आहे.

विविध प्रकारच्या गोदरेज एसींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये समाविष्ट असून ती उत्तम कूलिंग देतात. गोदरेज एसींमध्ये अचूक कूलिंगसाठी इन्व्हर्टर तंत्रज्ञान आहे, कार्यक्षमपणे चालण्यासाठी ट्विन रोटरी कॉम्प्रेसर आहे, सुलभ देखभालीसाठी स्मार्ट आयओटी एनेबल्ड डायग्नॉसिस आहे, उत्पादनाचा सुरळित वापर करता येण्यासाठी इव्हॅपोरेटर व कंडेन्सर यावर अँटि कोरोसिव्ह ब्लु व गोल्ड फिन कोटिंग आहे, सायलेंट ऑपरेशनसाठी बहुस्तरीय अॅकॉस्टिक जॅक्ड आहे, हवेच्या शुद्धिकरणासाठी अॅक्टिव्ह कार्बन, अँटि-बॅक्टेरिअल व अँटि-डस्ट फिल्टर आहेत, सोयीस्कर इन्स्टॉलेशनसाठी 30 मीटरपर्यंत लांब पायपिंगची सुविधा आहे, तसेच यातून एसीची हेव्ही ड्युटी कूलिंग क्षमताही दिसून येते. या आणि आणखी काही वैशिष्ट्यांमुळे हे उपकरण ग्राहकांना उपयुक्त ठरेल, अशा नावीन्याचा विचार करून बनवले असल्याचे अधोरेखित होते. गोदरेज एसींबरोबर सर्व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरसाठी 10 वर्षांची वॉरंटी मिळेल व अन्य कॉम्प्रेसरवर 5 वर्षांची वॉरंटी मिळेल. R290 रेफ्रिजरंट असणाऱ्या एसींमधअये कंडेन्सरवर आणखी 5 वर्षांची वॉरंटी मिळेल.

उन्हाळ्याच्या काळात एसी अधिक आकर्षक ठरण्यासाठी, गोदरेजने मर्यादित कालावधीसाठी काही ऑफर जाहीर केल्या आहेत, सर्व स्प्लिट एसींवर 499 रुपये + जीएसटी यामध्ये सर्वसाधारण इन्स्टॉलेशन आणि त्याच दिवशी इन्स्टॉलेशन करण्याची सोय, सर्व उत्पादनांसाठी आकर्षक फायनान्स ऑफर व कॉपर कंडेन्सर असणाऱ्या सर्व एसींवर 5 वर्षांची सर्वंकष वॉरंटी.

गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी याविषयी बोलताना म्हणाले, “उत्तम जीवनशैलीचे गोदरेजचे आश्वासन प्रत्यक्षात साकारत, ग्राहकांना नावीन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण व हरित तंत्रज्ञान देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, तसेच त्याच वेळी पर्यावरणाबदद्लची आमची बांधिलकीही जपली जाते. जगामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान सादर करण्याची प्रवर्तक असणारा गोदरेज अप्लायन्सेस हा निवासी एअर कंडिशनर श्रेणीमध्ये R290 या जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंटचा वापर करणारा पहिला ब्रँड आहे. R290 रेफ्रिजरंट असणारे एसी व्यावसायिक उद्देशाने निर्माण करणे, इन्स्टॉल करणे व सर्व्हिसिंग करणे, या बाबतीतल क्षमतेला युनायटेड नेशन्सनेही (यूएनईपी) नावाजले आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून, आम्ही अप्रतिम उत्पादने तयार करण्यासाठी वर्षागणिक अधिकाधिक प्रयत्न करत आहोत. 0 ओडीपी व सर्वात कमी डीडब्लूपी असणारे नवे गोदरेज एसी हे कूलिंग यू अँड प्लॅनेट याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

 

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड संतोष सालिअन यांनी सांगितले, “एअर कंडिशनरसारखी उपकरणे ग्रीन हाउस गॅसेस सोडत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी वाढते. देशाचे शाश्वततेचे उद्दिष्ट विचारात घेऊन, आम्ही 38 नवी गोदरेज एसी मॉडेल दाखल करत आहोत – लोएस्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल असणारे भारतातील सर्वात पर्यावरणपूरक एसी. या नव्या एसीमध्ये जगातील सर्वात हरित रेफ्रिजरंट R290 आणि R32 यांचा वापर केला असून, त्यामुळे ओझोनमध्ये घट होण्याची शक्यता शून्य झाली आहे व ग्लोबल वॉर्मिंग होण्याची शक्यताही कमीत कमी आहे. उदा. 1810 जीडब्लूपी असणाऱ्या R22 रेफ्रिजरंटने 1 वर्ष सोडलेल्या ग्रीनहाउस गॅसचा परिणाम नाहीसा करण्यासाठी अंदाजे 49 झाडे लावावी लागतील, तर या तुलनेत, R290 रेफ्रिजरंट असणाऱ्या 5-स्टार एसीसाठी केवळ 29 झाडे लागतील. ग्रीन इन्व्हर्टर टेक्नालॉजी असो किंवा ब्लु फिन अँटि कोरोजन संरक्षण असो किंवा स्मार्ट आयओटी एनेबल्ड डायग्नॉसिस किंवा ट्विन मोटर रोटरी कॉम्प्रेसर असो, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे व तंत्रज्ञानामुळे हे एसी शक्तिशाली कूलिंग देतात, उर्जेचा वापर कमी करतात व कमीत कमी ग्लोबल वॉर्मिंग करतात. 5-स्टार श्रेणीतील एसी अंदाजे 30% असून, या पर्यावरणपूरक एअर कंडिशनरच्या वापराने ग्राहक व पर्यावरण या दोन्हींना फायदा होईल, याची दक्षता आम्ही घेतली आहे.”

गोदरेज अप्लायन्सेसचे नॅशनल सेल्स हेड संजीव जैन म्हणाले, “ही विविध प्रकारची पर्यावरणपूरक उत्पादने सर्व माध्यमांतूनव आघाडीच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध केली जातील. दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे, हे आपण सर्वजण जाणतो आणि आगामी उन्हाळाही यासाठी अपवाद नसणार आहे. गेल्या वर्षी एसी उद्योगाची नकारात्मक वाढ झाली असली तरी या वर्षी वाढीला चालना मिळेल आणि आगामी हंगामात एसींसाठी चांगली मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. नव्या एसींच्या 38 मॉडेलद्वारे आमचे स्थान अधिक बळकट होईल आणि या आर्थिक वर्षात 20% वाढेल, असा विश्वास आहे.”

एसीच्या बाबतीत सर्व्हिस हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका स्वतंत्र संशोधनामध्ये, गोदरेज स्मार्टकेअर या गोदरेज अप्लायन्सेसला पहिल्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले. गोदरेज स्मार्टकेअरद्वारे 660 सर्व्हिस सेंटरचे आणि 4500 हून अधिक स्मार्टबडी टेक्निशनचे सर्व्हिस नेटवर्क उपलब्ध केले जाते. तुम्हाला अॅप, 12 भाषांतील 24×7 कॉल सेंटर, अधिक विस्तार व जलद सेवा यासाठी 160 स्मार्टमोबाइल आणि सीएसएन (कम्प्लिट सॅटिसफॅक्शन नंबर) यांच्या मदतीने या नेटवर्कची मदत घेता येऊ शकते. तसेच, यामुळे ग्राहकांना विशिष्ट कोडद्वारे सेवेचे रेटिंगही नोंदवता येते. उन्हाळ्यातील कमालीच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी एसी खरेदी करण्याची तातडीची गरज विचारात घेता, आम्ही सर्व महत्त्वाच्या शहरांत, खरेदी केल्याच्या दिवशीच एसी बसवून देण्याची सेवाही देत आहोत.

नवे पर्यावरणपूरक गोदरेज एसी इन्व्हर्टर व फिक्स्ड स्पीड टेक्नालॉजी यामध्ये, स्प्लिट व विंडो, 5 स्टार व 3 स्टार एनर्जी रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत आणि 1 Tr (~3514 Watts), 1.5 Tr (~5271) व 2Tr (~7028) या कूलिंग क्षमतेमध्ये, 27,900 रुपये ते 73,000 रुपये या दरामध्ये मिळतील.

बजाज इलेक्ट्रिकल्सतर्फे भारतातील पहिली जंतू आणि धूळरोधक पंख्यांची दर्जेदार श्रेणी उपलब्ध

  • पंख्यांवरील जंतूरोधक आवरणामुळे त्याचे ९९.२ टक्के जंतूंपासून संरक्षण व पर्यायाने जंतूंचा नाश
  • अत्याधुनिक पॉलीमर तंत्रज्ञानाच्या धूळरोधक वैशिष्ट्यामुळे धूळ साचण्यास प्रतिबंध होऊन सफाईचे काम सोपे
  • पंख्याच्या या आकर्षक श्रेणीमध्ये मेटॅलिक फिनिशसह उठावदार रंग उपलब्ध

 पुणे पंखे छोटी उपकरणे आणि प्रकाशयोजना क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सने आज पुणे शहरात अँटी- जर्म विथ बाय बाय डस्ट ही दर्जेदार सिलिंग फॅन्सची श्रेणी लाँच केल्याचे जाहीर केले. ही अशा प्रकारची पहिलीच श्रेणी जंतूरोधक आवरण, मेटॅलिक फिनिश व उठावदार रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही उत्पादने सर्व प्रमुख रिटेल दालनांत उपलब्ध करण्यात आली असून त्याची किंमत २८०० रुपये आहे.

अँटी- जर्म विथ बाय बाय डस्ट (बीबीडी) अंतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या मेल्समध्ये युरो एनएक्सजी, एलिगन्स रॉयल आणि हॅरियर यांचा समावेश आहे.

आटोपशीर घरे आणि ग्राहकांची बदलती जीवनशैली लक्षात घेता आजच्या काळात घरांमधली हवा ही बाहेरच्या हवेपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. यामुळे ग्राहक जंतूंचा सामना करू शकणाऱ्या उत्पादनांबाबत जास्त जागरूक झाला असून बजाज इलेक्ट्रिकल्सच्या अद्यावत जंतूरोधक श्रेणीमध्ये जंतूरोधक आवरण देण्यात आले आहे, जे ९९.२ टक्के जंतूंपासून संरक्षण करते व पर्यायाने पंख्यावरील जंतूंचा नाश करते. त्याशिवाय या पंख्यांमध्ये अत्याधुनिक पॉलीमर तंत्रज्ञानासह धूळरोधक वैशिष्ट्यही समाविष्ट करण्यात आले आहे, जे पंख्यावर धूळ साचण्यास प्रतिबंध करते, शिवाय ग्राहकांना सोप्या व सोयीस्कर पद्धतीने स्वच्छता करण्यास मदत करते.

बजाज पंख्यांच्या या जंतूरोधक श्रेणीची चाचणी घेण्यात आली असून त्याला मान्यताप्राप्त स्वतंत्र टेस्टिंग सर्व्हिस एजन्सीद्वारे आयएसओ/आयईसी १७०२५:२००५ देण्यात आले आहे.

बजाज इलेक्ट्रिकल्सने दर्जेदार सिलिंग पंख्यांची आकर्षक डिझाइन्स व रंगातील श्रेणीही लाँच केली आहे.

लाँचप्रसंगी श्री. अतुल शर्मा, Executive President & Country Head – Consumer Products, बजाज इलेक्ट्रिकल्स म्हणाले, ‘नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेल्या अशा प्रकारच्या पहिल्याच पंख्यांची श्रेणी सादर करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत आहे. या पंख्यांमध्ये आरामदायीपणा आणि अभिजातता यांचा मेळ घालण्यात आला आहे. मला खात्री आहे, की जंतूविरोधी आवरण आणि धूळरोधक तंत्रज्ञानामुळे हे नवे लाँच ग्राहकांच्या पसंतीस उतरले. मेटॅलिक फिनिश आणि कलात्मक सौंदर्यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्येही ग्राहकांना आवडतील. पंख्यांची ही श्रेणी खरेदी करणं ग्राहकासाठी स्मार्ट आणि खास निर्मय ठरेल. बाजारपेठेतील समीकरणे व सातत्याने बदलणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत बजाज इलेक्ट्रिकल्स लि.मध्ये आम्ही कायमच ग्राहकाची जीवनशैली उंचावू शकणारे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.’

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही बजाज समूहाचा भाग असलेली विश्वासार्ह भारतीय कंपनी आहे. जागतिक स्तरावर नावाजली गेलेली बजाज इलेक्ट्रिकल्स ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात (उपकरणे, पंखे आणि प्रकाशयोजना), ल्युमिनारीज, ईपीसी (इल्युमिनेशन, ट्रान्समिशन टॉवर्स आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन) व निर्यात विभागात कार्यरत आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सची १९ शाखा कार्यालये आणि ५०० पेक्षा जास्त ग्राहक सेवा केंद्रे देशाच्या विविध भागांत कार्यरत आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त बाल जत्रा….

0
आई ने मुलींसोबत मुलांना ही घरातील कामे करण्याची सवय लावावी – सौ.मंजुश्री खर्डेकर.

पुणे-समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यातील समानतेच्या वागणुकीबाबत पुरेशी जनजागृती झाली असली तरीही मुलींना शाळा सुटल्यानंतर घरातील कामात हातभार लावावा लागतो तर मुलांना मनसोक्त खेळायला किंवा टीव्ही बघायला वा तत्सम करमणूकीसाठी मोकळीक दिली जाते हे सत्य नाकारता येत नाही.आता आईनेच स्वतःत बदल करावा आणि मुलींबरोबर मुलाला ही घरकामात हातभार लावण्यास सांगावे असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.क्रिएटिव्ह फौंडेशन आणि ग्लोबल ग्रूपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने शाळेतील मुलींना परीक्षेपूर्वी थोडेसे तणावमुक्त होता यावे यासाठी आयोजित बाल जत्रेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पुणे मनपाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील सुमारे १००० विद्यार्थ्यांनी जंपिंग जॅक,चक्री,टॅटू काढणे व बंदुकीने फुगे फोडणे या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रमाचे संयोजन क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,ग्लोबल गृप चे संजीव अरोरा ,मनोज हिंगोरानी यांनी केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे व शशीकला चव्हाण उपस्थित होत्या.

सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगची टीम टाटा क्रूसिबल कॅम्‍पस् क्‍वीझ २०१९च्‍या पुण्‍याच्‍या रिजनल फायनल्‍समध्‍ये बनली विजेती

0

पुणे: सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्‍या अभिषेक मुथांगे आणि जयमा जगदेश्‍वरन यांनी आपल्‍या विरोधकांवर मात करत टाटा क्रूसिबल कॅम्‍पस् क्‍वीझ २०१९च्‍या पुणे एडिशनमध्‍ये विजेतेपद प्राप्‍त केले.

अव्‍वल स्‍थान प्राप्‍त करण्‍याकरिता सिटी लेव्‍हल फिनालेमध्‍ये एकूण ३२५ टीम्‍स एकमेकांसमोर उभ्‍या ठाकल्‍या. याचे आयोजन बीआयएमएम बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, पुणे येथे करण्‍यात आले. या क्‍वीझच्‍या विजेत्‍यांनी अभिषेक मुथांगे आणि जयमा जगदेश्‍वरन यांनी ७५,०००* रुपयांचा रोख पुरस्‍कार प्राप्‍त केला आणि आता नॅशनल फिनालेमध्‍ये क्‍वालिफाय करण्‍याकरिता झोनल राऊंडमध्‍ये स्‍पर्धा करतील. सिम्‍बॉसिस सेंटर फॉर इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (एससीआयटी)चे दिगंत बाकरी आणि विश्‍वेश मेहेंदळे यांना उपविजेता घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यांनी ३५,०००* रुपयांचा रोख पुरस्‍कार जिंकला. फिनालेमध्‍ये कर्नल (डॉ.) ए. बालासुब्रमण्‍यन, संस्‍थापक अध्‍यक्ष, श्री बालाजी सोसायटी प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते.

यावर्षी, क्‍वीझच्‍या थीमला २०१९ क्रिकेट वर्ल्‍ड कप साजरा करण्‍याकरिता टी-२० क्रिकेट फॉर्मेटमध्‍ये डिझाईन करण्‍यात आले आहे. ‘पिकब्रेन’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले प्रतिष्ठित क्वीझमास्‍टर गिरी बालसुब्रमण्‍यम यांनी आपल्‍या सर्वोत्‍तम, अद्वितीय व मजेशीर शैलीमध्‍ये क्‍वीझचे सूत्रसंचालन केले.

भारताच्‍या सर्वात मोठ्या कॅम्‍पस् क्‍वीझच्‍या १५व्‍या पर्वाचे आयोजन जवळपास दोन महिने ४० शहरांमध्‍ये करण्‍यात येईल. यामध्‍ये पाच झोनल राऊंडस् असतील आणि त्‍यानंतर मुंबईमध्‍ये नॅशनल फिनालेचे आयोजन करण्‍यात येईल. नॅशनल फायनल्‍सच्‍या विजेत्‍यांना प्रतिष्ठित टाटा क्रूसीबल ट्रॉफीसह ५,००,०००/-* रुपयांचा भव्‍य पुरस्‍कार देण्‍यात येईल.

फास्‍ट्रॅकद्वारे क्‍वीझच्‍या या पर्वाकरिता पुरस्‍कारामध्‍ये योगदान दिले जात आहे.

वीजक्षेत्रातही महिलांची कामगिरी उल्लेखनीय- मुख्य अभियंता सचिन तालेवार

0

पुणे : महावितरण, महापारेषणमध्ये महिला अभियंता व कर्मचारी वीजमीटर जोडण्यांपासून ते टॉवरलाईनच्या देखभाल व दुरुस्तीचे सर्व तांत्रिक कामे अतिशय कौशल्याने व आत्मविश्वासाने करीत आहे. संधी मिळाल्यास वीजक्षेत्रात सुद्धा महिला महत्वाची व उल्लेखनीय कामगिरी बजावू शकतात हे प्रत्यक्षात दिसून आले आहे, असे मत मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी व्यक्त केले.

रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये शुक्रवारी (दि. 8) आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. वंदनकुमार मेंढे, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्र म्हंकाळे व श्री. प्रशांत चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महिला दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमात महावितरणमधील महिला क्रीडापटू निशा पाटील, अनिता कुलकर्णी, कमलरुख दारूखानवाला, अंकूर ठाकूर, वर्षा बोपटे, वैष्णवी गांगरकर, ऋुतुजा तारे, अश्विनी जाधव, अनिता सोनेरी, शितल नाईक, सायली कचरे, संगिता देशमुख, माया येलवंडे तसेच महापारेषणमधील नाट्यकलावंत स्नेहल चौरे, पुजा शिंदे, मधुश्री खाटपे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले जयश्री शेलोकार यांनी केले तर रोहिणी पाटसकर यांनी आभार मानले. यावेळी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ये जो पब्लिक है,सब जानती है …. महापालिकेसमोर आंदोलन (व्हिडीओ)

0

पुणे : हीरे-मोती तुमने छुपाये कुछ हम लोग न बोले
हीरे-मोती तुमने छुपाये कुछ हम लोग न बोले
अब आटा-चावल भी छुपा तो, भूखों ने मुंह खोले
अरे भीख न मांगे,अरे  क़र्ज़ न मांगे
भीख न मांगे क़र्ज़ न मांगे
ये अपना हक मांगती है
ये जो पब्लिक है, सब जानती है
ये जो पब्लिक है
ये जो पब्लिक है सब जानती है..

राष्ट्रवादीने आज महापालिकेच्या दारात ‘रोटी ‘ चित्रपटातील या गाण्यासह  वादा तेरा वादा ,झुटा है तेरा वादा .. क्या हुवा तेरा वादा आणि भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे ..अशी गाणी वाजवून त्याबरोबर गाजरे झळकवून भाजपला संगीताच्या लयीतून  ..गाण्यांच्या शब्दातून चेहरा दाखविण्याचा प्रयत्न करणारे आंदोलन केले .पक्षाचे शहराध्यक्ष , नगरसेवक चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत पुणे शहराचे स्थान घसरल्याने महापालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलनाची मालिकाच सुरू केली आहे. ‘पुणे शहर देशातील सर्वोत्तम शहर करू’ या भाजपच्या आश्‍वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकारचे  महापालिकेच्या दारात आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची घसरण झाली असूून या स्पर्धेत पुणे 37 व्या क्रमांकावर गेले आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचंड तयारी करीत, कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र स्पर्धेत महापालिकेला आपले स्थान टिकविता न आल्याने विरोधक आक्रमक झाले आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मनसे आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आंदोलन करून सत्ताधारी भाजपची कोंडी केली.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा समन्वयकांची भूमिका महत्वाची – नरेंद्र पाटील

0

पुणे :  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास  महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणी प्रक्रियेत जिल्हा समन्वयकांची  भूमिका ही  खूप जबाबदारीची व महत्वाची असल्याने सर्व जिल्हा समन्वयकांनी  आपापल्या कामाच्या प्रक्रियेत अंतिमतःलाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत खूप संयमीपणे व चिकाटीने प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत  महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते आज पुण्यात ‘यशस्वी’ संस्थेच्या सभागृहात झालेल्या जिल्हा  समन्वयकांच्या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा जिल्हा  समन्वयकांनी  हाताळण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्रपणे  तपशीलवार नोंद ठेवून प्रकरण मंजूर किंवा नामंजूर होईपर्यंतच्या

टप्प्यातील सर्व घटनाक्रमाची नोंद ठेवावी, जेणेकरून एखादे कर्ज प्रकरण नेमके कोणत्या कारणामुळे पूर्ण होऊ शकले नाही याची माहिती आपल्याला सर्व समन्वयकांना पाठविता येईल. त्यामुळे प्रकरण स्वीकारण्यापूर्वीच संभाव्य अडचणी समजून घेता येतील आणि असे केल्याने योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होईल असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

याप्रांसगी  बोलताना  महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी   करताना सांगितले कि,  महामंडळाच्या योजना लाभार्थ्यांना पोहोचविताना  सादर करण्यात येणाऱ्या  विविध कागदपत्रांचे महत्व, कागपत्रे पडताळणी, बँकेकडे प्रकरण सादर करतानाची प्रक्रिया, लाभार्थ्यांसाठीचे निकष आदिंबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी  प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही जिल्हा समन्वयकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर समारोप सत्रात सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनीही आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून काम करत असताना कामाप्रती निष्ठा बाळगत आणि ध्येयप्रेरित व संघटन कौशल्याचा वापर करत काम करावे असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, महामंडळाचे पदाधिकारी आकाश मोरे,सोमनाथ आहेर, जिल्हा समन्वयक प्रमुख श्रीकांत तिकोने व राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रसाद शाळीग्राम, प्रथमेश पाटील आदींनी विशेष सहकार्य केले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत शासनाचा जीआर

0

# वेतन व भत्ते,
# मूळ वेतन,
# विशेष / महागाई भत्ता,
# घरभाडे भत्ता,
# इतर भत्ते,
# पीएफ,
# इएसआयएस / कर्मचारी नुकसान भरपाई,
# व्यावसायिक कर (P.T.),
# बोनस व सुट्टयांच्या दिवशी केलेले काम इ.
अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे.

मुंबई( विशेष प्रतिनिधी ) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपध्दती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात उद्योग, उर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपध्दती अवलंबीण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सर्व विभागांना दिले.

प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेऊन विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभागाने शक्य असेल तेथे संबंधित कामे बाह्य यंत्रणेकडुन करुन घेण्याबाबतचे धोरण राज्य शासनाने अंगिकारले आहे. सदर धोरणानुसार शासनाच्या विविध, विभागाअंतर्गतच्या कार्यालयांमार्फत कंत्राटदारांकडून कंत्राटी स्वरुपात मनुष्यबळ घेण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे  कंत्राटी कर्मचारी हे शासनास सेवा देण्यास कायम कटिबद्ध असतात. ज्या शासकीय विभागात आणि कार्यालयात कंत्राटदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसांनुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्याचे करारानुसार वेतन व भत्ते, मूळ वेतन, विशेष/ महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी (P.F.), राज्य कामगार विमा योजना (E.S.I.S)/कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), व्यावसायिक कर (P.T.), बोनस व सुट्टयांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे, असे निर्देश मंत्री निलंगेकर यांनी दिले. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, कर्मचारी नुकसान भरपाई, व्यावसायिक कर, कामगार कल्याण निधी इत्यादी वैधानिक देणी/वजावटी कापुन घेऊन संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वैधानिक देणी जमा करण्याच्या खात्यांमध्ये जमा कराव्यात. तद्नंतर, कंत्राटदाराने एकूण प्रदान केलेले वेतन, सेवाशुल्क व अन्य करांसह एकत्रित व प्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या पुराव्यांसह देयक संबंधित कार्यालयास सादर करावे. कंत्राटदारामार्फत परिपत्रकातील नमूद यादीप्रमाणे सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे, पुरावे तपासुन सदर शासकीय विभागामार्फत संबंधित कंत्राटदारास रक्कम आदा करण्यात यावी. असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व आस्थापनेवरील, बाह्यस्त्रोत, मानधनावरील अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्या पदावर कायम समायोजन करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सामान काम, सामान वेतन द्यावे अशी मागणी आमची आहे तसेच हा जीआर शासनाने महासंघाच्या आंदोलनांमुळे काढला आहे .
– शाहरुख मुलाणी, मंत्रालयीन सचिव, म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघ

सार्वत्रिक निवडणूक तयारीसंदर्भात ‘स्वीप’ आणि ‘पीडब्ल्यूडी’ समितीची बैठक संपन्न

0

पुणे– लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विविध समित्यांची स्थापना करुन तयारीचा आढावा घेण्यात येतोया अनुषंगाने स्वीप’ आणि पीडब्ल्यूडीसुकाणू समितीची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलीयावेळी मतदान जनजागृती मोहिममतदान संकल्प पत्र वितरणशाळा व महाविद्यालयात इलेक्टोरल लर्नींग क्लबची स्थापना करणेशासकीय व निमशासकीय कार्यालयेसंस्थांमध्ये मतदार साक्षरता मंच स्थापणे, ग्राम पंचायत स्तरावर चुनाव पाठशाला’ आयोजित करणेदृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणे,दिव्यांग मतदारांचा शोध घेणेदिव्यांग मतदारांची नोंदणीदिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेनिवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे याचा आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकरजिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी उपस्थित अधिकारी व समिती सदस्यांना मार्गदर्शन केलेबैठकीला विविध विभागांचे अधिकारीसमितीचे सदस्य उपस्थित होते.

महिला व्‍यंगचित्रकार ( जागतिक महिला दिनानिमित्‍त)

0

महिला आज विविध क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. साहित्‍य क्षेत्रातील विनोद प्रांतही त्‍याला अपवाद नाही. तथापिव्‍यंगचित्र किंवा अर्कचित्र या प्रांतात व्‍यंगचित्रकारांची त्‍यातही महिला व्‍यंगचित्रकारांची संख्‍या खूप कमी आहे. मराठी भाषेत बोटावर मोजता येतील इतक्‍या महिला व्‍यंगचित्रकार आहेत, पण म्‍हणून त्‍यांचे महत्‍त्‍व कमी होत नाही. त्‍यांनी आपल्‍या परीने या कलेची सेवा केलेली आहेकरीत आहेत.

 डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, शरयू फरकंडे, राधा गावडे, कल्पना नान्नजकर या मराठी भाषेतील महत्‍त्‍वाच्‍या महिला व्‍यंगचित्रकार आहेत. अश्विनी मेनन, शुभा खांडेकर या इंग्रजी भाषेत कार्यरत आहेत.महिलांना विनोदाचे, व्‍यंगचित्रांचे  वावडे असते, असे उपहासाने म्‍हटल्‍या जाते. या सर्वांनी मात्र हा शिक्‍का व्‍यंगचित्रांच्‍या बाबतीत नक्‍कीच पुसून टाकला आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्‍यांनी आपली व्‍यंगचित्रकलेची आवड जोपासली आहे. महिलांमध्‍ये विशेषत: विद्यार्थिनींमध्‍ये  व्‍यंगचित्रकलेची आवड निर्माण व्‍हावी, यासाठी ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाइन’ या व्‍यंगचित्रकारांच्‍या संघटनेमार्फतही  विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.

            डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर

यांचा जन्‍म पुण्‍याचा. त्‍यामुळे पंचविशीपर्यंतचा टप्‍पा  पश्चिम महाराष्‍ट्रात  पुणे-अहमदनगर येथील आणि त्‍यानंतरचा प्रवास मराठवाडयातील नांदेड येथील.वडील प्राध्‍यापक.  वडिलांकडून कलाप्रेम, संगीत आणि रेषा व आईकडून भाषा असा वारसा प्राप्‍त झाला. लग्‍नानंतर 1984 मध्ये नेत्रतज्ञ म्हणून नांदेडला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. मुले जराशी  मोठी झाल्यावर  लेखन  सुरु केले.  प्रासंगिक, वैद्यकीय, पुस्तक समीक्षा,  ललित अशा प्रकारचे लेखन महाराष्ट्र टाइम्स,  लोकसत्तासारख्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. नांदेडच्‍या ‘दैनिक प्रजावाणी’ मध्ये पहिले व्‍यंगचित्र प्रसिध्‍द झाले. त्‍यानंतर  शतायुषी, मिळून सा-या जणी, मोहिनी, यक्ष,  कमांडर अशा अनेक दिवाळी अंकांमधून व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली.

व्यंगचित्र म्हणजे रेषांमधून बोलणारे साहित्य. एखाद्या घटनेतील विसंगती हेरुन ती रेषांमधून व्यक्‍त  करण्‍यासाठी त्या घटनेचा वेगवेगळ्या कोनातून विचार आवश्यक. ‘कुठल्याही गोष्टीची दुसरी-तिसरी बाजू ‘टेक इट इझी’ या भूमिकेतून बघण्याची वृत्ती ही जगण्याचे गणित सोपे करुन टाकते’ हीच  वृत्ती जोपासत डॉ. पाटोदेकर यांनी  विडंबन काव्ये  रचली,  सादर  केली.  ई टीव्ही मराठीच्या ‘हास्य दरबार’  कार्यक्रमात, लोकसत्‍ताच्‍या ‘हास्‍यरंग’पुरवणीमध्‍ये आणि विविध कवी संमेलनात विडंबनकार म्हणून रसिकांची  दाद मिळविली. गीतलेखन व घोषवाक्‍य स्‍पर्धांमध्‍ये पारितोषिकेही मिळवली. ‘भेट कांगारुंची स्‍मरते’ हे प्रवासवर्णनपर पुस्‍तक तसेच यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठाच्‍या रुग्‍ण सहायक अभ्‍यासक्रमासाठी  पुस्‍तक लेखन केले. नांदेडच्‍या इंडियन मेडीकल असोसिएशनचे मुखपत्र असलेल्‍या  ‘इमेज’चे संपादनही केले.

           शरयू फरकंडे –

यांचा जन्‍म 9  आक्‍टोबर 1962 मध्‍ये नांदेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणही नांदेड येथेच झाले. आजोबा शिक्षक, वडील सरकारी सेवेत तरआई गृहिणी. घरात चित्रकलेचा वारसा नसतांनाही त्‍यांनी हा छंद जोपासला. त्‍यांचे शिक्षण एटीडी, एम.ए. बी.एड, बीएफए (प्रथम वर्ष) इतके झाले आहे. ग्राफीक डिझायनर म्‍हणून त्‍यांनी  काम केले आहे. तसेच चित्रकला शिक्षक, हिंदीच्‍या प्राध्‍यापक म्‍हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सेवानिवृत्‍तीनंतर शरयू फरकंडे यांनी अर्कचित्रांची आवड जोपासली आहे. यूट्यूबवरील व्हिडीओ आणि या विषयावरील पुस्‍तकांचे वाचन करुन त्‍यांनी आपली कला विकसित केली, हे विशेष. अर्कचित्र क्षेत्रातील क्षितीज अलंकार पुरस्‍कारानेही त्‍यांना गौरवण्‍यात आले आहे. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे अशा ठिकाणी झालेल्‍या व्‍यंगचित्र संमेलनात त्‍यांनी सहभाग घेतलेला आहे. त्‍यांची वैयक्तिक प्रदर्शनेही झाली असून त्‍यांना उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्‍ये ‘शेड्स ऑफ डान्‍स’ या शीर्षकांतर्गत चित्रांतून नृत्‍यशैली हे नावीन्‍यपूर्ण प्रदर्शन झाले. राजस्‍थानी, गुजराथी, आदिवासी, मणिपुरी अशा विविध लोककला आणि तेथील नृत्‍यप्रकार यांचा कलाविष्‍कार फरकंडे यांनी विविध रंगछटा वापरुन साकारला. वेगवेगळ्या भागातील नृत्‍यशैली, त्‍यातील नर्तकींचे भावविश्‍व आणि त्‍यांची वैशिष्‍ट्ये या प्रदर्शनात पहावयास मिळाली. ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’, ‘तुमचे व्‍यंगचित्र तुमच्‍यासमोर’, ‘फर्स्‍ट एक्‍सप्रेशन’अशा विविध उपक्रमांत त्‍यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.  शरयू फरकंडे सध्‍या पुण्‍यात स्‍थायिक झाल्‍या आहेत.
सौ. राधा गावडे –

 यांचा जन्‍म 29 सप्‍टेंबर 1970 चा असून शिक्षण बी.एफ.ए,व डीप. इ.एड इतके झाले आहे. त्‍या सध्‍या वसईला स्‍थायिक झाल्‍या आहेत. राधा गावडे यांनी 1995 पासून व्‍यंगचित्र रेखाटण्‍यास सुरुवात केली. विदूषक, सुगंध, चौफेर साक्षीदार, स्‍नेहदा, साप्‍ताहिक गावकरी, ढिश्‍यांव-ढिश्‍यांव, बहिणा,लिलाई या सारख्‍या विविध दिवाळी अंकांमध्‍ये व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत. अॅनिमेशन क्षेत्रात यूटीव्‍ही, झी टीव्‍ही  या स्टुडीओमध्ये बरीच वर्ष काम केल्यानंतर आता वसई येथील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयात अप्‍लाइड आर्टच्‍या विभाग प्रमुख म्‍हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वसई येथील नरवीर चिमाजी या वृत्‍तपत्रासाठी वसईच्या समस्यांवर आधारित  व्‍यंगचित्रे काढलेली आहेत.1998 मध्‍ये हिंदुस्‍थान टाइम्‍सने घेतलेल्‍या व्‍यंगचित्र स्‍पर्धेत त्‍यांना पारितोषिक मिळाले आहे.तसेच1999 मध्‍येही श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्‍या हस्‍ते व्‍यंगचित्राचे पारितोषिक मिळाले आहे. कमर्शियल आर्टीस्‍ट म्‍हणून काम केलेले असल्‍यामुळे राधा गावडे यांच्‍या व्‍यंगचित्रांना एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्राप्‍त झालेले दिसते. सामाजिक विषयांवरची त्‍यांची व्‍यंगचित्रे खूपच लोकप्रिय आहेत. व्यंगचित्रांव्यतिरिक्त लहान मुलांच्या कथाचित्रांची कामेही त्या करतात तसेच या विषयावर कार्यशाळाही घेतात.

राजेंद्र सरग 9423245456

 

मंत्री बापट यांच्या विकासकामांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे  : मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या तसेच पुण्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या  मंत्री काळातील निर्णयाबरोबरोच  राजकीय जीवनावर दृष्टीक्षेप टाकणारे,  पुण्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उहापोह करणारे ‘ बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे ’ या  पुस्तकाचे प्रकाशन आज नागपूर येथे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माजी पत्रकार व कन्टेंट कन्सेप्ट कम्युनिकेशन्सचे संचालक सुनील माने या पुस्तकाचे संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची माहिती लोकांना झाली पाहिजे हे आपले कर्तव्य समजून बापट त्यांच्या कामाचा अहवाल प्रतिवर्षी प्रकाशित करतात. याच धर्तीवर मंत्री म्हणून बापट यांच्या चार वर्षात घेतलेल्या निर्णयाच्या अहवालाचे प्रकाशन  यावेळी मुख्यमंत्री व गडकरींच्या हस्ते करण्यात आले.

अहवाला सोबतच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसंघाचा एक कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री अशी गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द उलगडणारे ‘बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे’  हे  पुस्तक ही या वेळी प्रकाशित करण्यात आले.  या पुस्तकाचे वैशिष्ठ म्हणजे आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात बापट यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आणि  त्याचा सर्वसामान्य माणसाला होत असलेला फायदा यावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.

यातील काही ठळक नमूद करण्याजोगी कार्ये म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी ही व्यवस्था संगणकीकृत केली. रेशनवर मिळणारे धान्य योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी ‘ई – पॉस’ मशीन आणले, सार्वजनिक वितरण प्रणालीमधील भ्रष्टाचार व काळाबाजार संपवण्यासाठी द्वारपोहोच योजना,रेशन दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन, साठवणूक क्षमतेत वाढ करण्यासाठी अनेक गोडावून  बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

तसेच शेतकऱ्याला लाभ मिळावा म्हणून विकेंद्रित धान्य खरेदी योजना सुरु केली. भेसळ रोखण्यासाठी त्यांनी कायद्यात बदल करून कठोर शिक्षेचे प्रावधान केले. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्टेंट तसेच इतर वैद्यकीय उपकरणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणली. हाफकिनचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित असावा यासाठी त्यांच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केल्या.

 ग्राहक संरक्षक मंत्री म्हणूनही त्यांनी ग्राहकाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे, लोकांच्या समस्येला सभागृहातून न्याय मिळावा यासाठी संसदीय कार्यमंत्री म्हणून नेहमीच त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विधिमंडळाचे कामकाज खासगी वाहिन्यांसाठी उपलब्ध करून देऊन सभागृहातील कामकाजात आणखी पारदर्शकता आणली.

पुण्याच्या विकासासाठी आमदार म्हणून ते नेहमी सभागृहात आवाज उठवत होते. मात्र विरोधात असल्याने त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरत होते. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री या नात्याने त्यांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. पुण्याचा विकास आराखडा, पीएमआरडीएची स्थापना,रिंग रोड, पुण्याच्या वाहतूक समस्येवर उपाय योजना म्हणून पुणे मेट्रोचा निर्णय , हिंजवडी आयटी नगरीच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे रुंदीकरण तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा निर्णय, म्हाळुंगे – माण टाउनशिप, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, नदीचे पाणी सुधारण्यासाठी जायका प्रकल्प, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, इंद्रायणी नदीसुधार योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बहुमजली उड्डाणपूल, राष्ट्रीय स्मारक म्हणून भिडे वाड्याचे संवर्धन,या व यासारख्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे निर्णय व त्याची सुरवात, त्यामागील पार्श्वभूमी, या बाबत सुरु झालेले काम, भविष्यकालीन पुण्यासाठी घेतलेले निर्णय  या सर्व विषयांची छायाचित्रांसह पार्श्वभूमी या पुस्तकात देण्यात आली आहे.

लोकसभा -काँंग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

0

नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. यात १५ उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर ,यात १५ उमेदवारांचे जागावाटप करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या १५ जागांपैकी ११ जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील आहेत. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत.

पहा हि उमेदवार यादी

महिंद्रा लाइफस्पेसेस ने ‘सेन्ट्रलिस’ ची यशस्वी सुरुवात -पहिल्या तीन दिवसात ३०० पेक्षा जास्त घरांची विक्री

पुणे: २०.७ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहातील महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (“महिंद्रा लाइफस्पेसेस”) या स्थावर मालमत्ता व पायाभूत सोयीसुविधा विकास उद्योगातील कंपनीने भारतातील आपले प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून पुण्यावर लक्ष केंद्रित करण्याची परंपरा कायम राखली आहे.  या कंपनीच्या सेन्ट्रलिस‘ या मध्यम श्रेणीतील आवास प्रकल्पाला शुभारंभाच्या टप्प्यातच लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे.  राहण्याच्या दृष्टीने लोकांच्या पसंतीच्या पिंपरी शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पाचा एकूण विस्तार ४.५ एकर असून यामध्ये चार टॉवर्समध्ये ४०० पेक्षा जास्त वन बीएचके व टुबीएचके घरे आहेत.  सेन्ट्रलिसमधील घरांचा कार्पेट एरिया ३७.५ चौरस मीटर (४१६.८९ चौरस फीट) ते ५३.४४ चौरस मीटर (५९३.८५ चौरस फीट) आहे व त्यांच्या किमती ४०.५६ लाख रुपयांपासून पुढे आहेत.  हा प्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (“महारेरा”) अंतर्गत नोंदणीकृत आहे. 

 महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीमती संगीता प्रसाद यांनी सांगितलेसेन्ट्रलिस च्या शुभारंभालाच मिळालेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला आनंद व प्रोत्साहन देणारा आहे.  पुणेकरांनी नेहमीच महिंद्रा लाइफस्पेसेसवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. ग्राहकांच्या गरजाआवडीनिवडी पूर्ण करण्यावर पूर्ण भर देत देशभरातील रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून पुणे शहरात आमचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.   

 सेन्ट्रलिस हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा पुण्यातील पाचवा निवासी प्रकल्प आहे.  शैक्षणिक संस्थाहॉटेल्स व रेस्टॉरंट्समॉल्ससिनेमा थिएटर्स या सर्व सोयीसुविधा या प्रकल्पापासून अगदी जवळ आहेत.  आपले सर्व निवासी प्रकल्प सामाजिक पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असावेत हा कंपनीचा दृष्टिकोन असतो. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपीसीएमसी लिंक रोडउत्तम बस सेवापिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानके व पुणे विमानतळ यांच्याशी हा प्रकल्प अगदी सोयीस्कररीत्या जोडला गेलेला आहे.  प्रस्तावित पिंपरी मेट्रो स्टेशन हे या प्रकल्पापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.

 आधुनिक ग्राहकांच्या गरजा  लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सेन्ट्रलिसमधील सोयीसुविधा डिझाईन करण्यात आल्या आहेत.  यामध्ये पोहोण्याचा तलावलहान मुलांसाठी पोहोण्याचा विशेष तलाव,जिमवेगवेगळे खेळ खेळता येतील असे मैदानटेनिस कोर्टजॉगिंग ट्रॅकक्लबहाउसलहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र जागाज्येष्ठ नागरिकांसाठी खास प्लाझा यांचा समावेश आहे. 

 भारतात पर्यावरणाला अनुकूलशाश्वत शहरीकरणाला प्रोत्साहन देणारीआपले सर्वांचे आरोग्य व कल्याण यांचे हित जपणारी हरित घरे विकसित केली जावीत हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा मुख्य उद्देश आहे.  भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा प्रत्येक घराला मिळावी यासाठी सेन्ट्रलिसची रचना एल आकारात करण्यात आली आहे.  ऊर्जा बचत करणाऱ्या भिंती व छतकृत्रिम लायटिंग डिझाईनसौर उर्जेवर पाणी तापविण्याची सुविधा उपलब्ध करवून देऊन सुविधांचा खर्च कमी केला आहे. त्याचप्रमाणे घरातील हवा शुद्ध राहावी यासाठी लो-व्हीओसी रंगबागा सुशोभित करण्यासाठी कचरा प्रक्रियापावसाचे पाणी साठवण्याची सुविधाप्रत्येक स्तरावर कचरा वर्गीकरण या इतर सुविधाही याठिकाणी आहेत.  सेन्ट्रलिसला ग्रीन रेटिंग फॉर इंटीग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट यांचे फोर स्टार प्रमाणपत्र मिळाले असून याठिकाणी ग्राहकांना तुलनेने कमी देखभाल खर्चाचे लाभ मिळतील.  

 महिंद्रा लाइफस्पेसेस  पुण्यामध्ये २००७ पासून कार्यरत आहे.  आजतागायत त्यांनी २.८७ मिलियन चौरस फीट जागेचा विकास केला आहे.  त्यांच्या आधीच्या प्रकल्पांमध्ये पिंपरी-चिंचवड येथे महिंद्रा रॉयल‘,वाकडमध्ये द वुड्स‘ सोपानबाग येथे ला आर्टिस्ट‘ यांचा समावेश असून ते पूर्णपणे विकले गेले आहेत. पिंपरी येथील त्यांचा अजून एक प्रकल्प अँथेईआ‘ लवकरच पूर्ण होईलयाठिकाणी १००० घरांचा ताबा देऊन झाला आहे.

 महिंद्रा लाइफस्पेसेस  डेव्हलपर्स लिमिटेड

महिंद्रा लाइफस्पेसेस  डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी १९९४ साली सुरु करण्यात आली.  २०.७ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा ग्रुपची ही रिअल इस्टेट व पायाभूत सोयीसुविधा विकास कंपनी भारतात पर्यावरणानुकूल शाश्वत शहरीकरणाची पुरस्कर्ती आहे.  महिंद्रा लाइफस्पेसेस‘ हॅपीएस्ट ब्रॅण्ड्स‘ अंतर्गत निवासी प्रकल्प उभारून व महिंद्रा वर्ल्ड सिटी‘ व ओरिजिन्स बाय महिंद्रा वर्ल्ड सिटी‘ या ब्रॅण्ड्समार्फत एकात्मिक शहरे व औद्योगिक केंद्रांचा विकास करून भारतातील शहरांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.  

 ग्राहकांच्या गरजात्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनविश्वास व पारदर्शिता या परंपरेवर आधारित नाविन्यपूर्ण सुविधा महिंद्रा लाइफस्पेसेस निर्माण करते.  या कंपनीने २४.५ मिलियन चौरस फूट (२.३ मिलियन चौरस मीटर) जागेचा विकास पूर्ण केला असून भारतातील सात शहरांमध्ये अजून निवासी प्रकल्प उभारले जात आहेत.  चार ठिकाणी  ५००० एकरांपेक्षा जास्त जागेवर एकात्मिक विकासकामे / औद्योगिक केंद्र अशा ठिकाणी काही प्रकल्प सुरु आहेत तर काही भविष्यात हाती घेतले जातील.

 भारतातील हरित घरे चळवळीची पुरस्कर्ती असलेल्या महिंद्रा लाइफस्पेसेसला २०१७ जीआरईएसबी रिअल इस्टेट ईएसजी (एन्व्हायरन्मेंटलसोशल अँड गव्हर्नन्स) असेसमेंट‘ मध्ये आशिया खंडात चौथे स्थान मिळाले आहे.  ग्रेट प्लेसेस टू वर्क इन्स्टिटयूटने भारतातील ग्रेट मिड-साईज वर्कप्लेसेस – २०१८ च्या यादीत या कंपनीला २२वे स्थान दिले आहे.

महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीची दुरुस्ती पूर्ण पुण्याच्या मध्यवर्ती व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत

0

पुणे: खोदकामामध्ये तोडलेली महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 7) पहाटे पावणेदोन वाजता पूर्ण झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून सुरु असणारा पुणे शहरातील मध्यवर्ती व परिसराचा वीजपुरवठा आज सकाळी मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत करण्यात आला.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात पुणे महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे शनिवारी (दि. 2) सकाळी 11.33 पासून रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला होता. या उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या महावितरणच्या 6 उपकेंद्राचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभाग अंतर्गत पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड आदी परिसरात वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र महावितरणकडून या परिसरातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांसाठी इतर उपकेंद्रांद्वारे 75 ते 80 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन करून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला.

महापारेषणकडून 132 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चेन्नई येथून तज्ञ कर्मचारी व वाहिनी जोडण्यासाठी जॉईंट मागविले होते. गेले पाच दिवस दुरुस्ती काम सुरु होते व गुरुवारी (दि. 7) पहाटे पावणेदोन वाजता वीजवाहिनीला 4 जॉईंट लावल्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली. आज पहाटेच महापारेषणकडून रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर महावितरणकडून सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा या 132 केव्ही उपकेंद्रातून सुरु करण्यात आला व सकाळच्या सुमारास पुणे शहराचा मध्यवर्ती भाग व परिसरातील वीजपुरवठा मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत करण्यात आला. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत वीजग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरणने आभार मानले आहे.

डिजीटल डिटॉक्सवरून परतलेल्या सई ताम्हणकरचे ‘क्लासी’ फोटोशूट

0

अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहिर केले. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने ह्या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली. आणि सोशल मीडियवरही परतली. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केले.

सई ताम्हणकर परतल्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगला खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामूळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. ह्या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरूनही शेअर करेनच.”

सईच्या ह्या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ह्या पोस्टनंतर सईचे लागोलाग आलेले बॉस बेब लुकमधले फोटो तर तिच्या चाहत्यांसाठी व्हिजुअल ट्रिट होती असंच म्हणायला हवं. फोटोशूटविषयी सई ताम्हणकर म्हणते, “फोटोशूट करणं, किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पून्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय, की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला, आणि ते आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करायचं एक वरदान असलं. तरीही कधीतरी ह्यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.”