Home Blog Page 2972

आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कार्यवाही; ‘सी व्हिजिल’ अॅपचा प्रभावी वापर,सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून…

0

मुंबई-लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.

ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, पैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ‘सी व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ॲपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सी व्हिजिल मोबाइल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेक न्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिताभंगाच्या प्रकरणात ॲपवर तक्रार करता येते .

सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून, तर सर्वात कमी धुळे, जालन्यातून

अॅपवरील सर्वाधिक १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातून निवडणूक आयाेगाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल ठाणे ६८, सोलापूर ६१, मुंबई उपनगर ४५, तर मुंबई शहर येथे ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगर ३५, अकोला ११, अमरावती ११, औरंगाबाद १२, बीड ८, भंडारा २, बुलडाणा १३, चंद्रपूर ३, धुळे २, गडचिरोली २, गोंदिया ३, हिंगोली ७, जळगाव २०, जालना १, कोल्हापूर १८, लातूर ११, नागपूर ३०, नंदुरबार २, नाशिक २२, उस्मानाबाद ८, पालघर २४, परभणी ७, रायगड ८, रत्नागिरी ४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदुर्ग १९, वर्धा १४, वाशिम ६, तर यवतमाळ जिल्ह्यातून २ तक्रारी नोंदवण्यात आल्याचे अायाेगाकडून सांगण्यात अाले.

पुण्यानं भरभरून प्रेम दिलं,मग उतराई आम्हीही केली -गिरीश बापट (व्हिडीओ)

पुणे-पुण्याने आम्हाला भरभरून दिलं,मग आम्ही हि नको का उतराई करायला ,तो प्रयत्न आम्ही केला . विरोधकांचे काम आहे ओरडायचे ,पण त्यांनी निव्वळ चर्चा केल्या ते ते प्रकल्प आम्ही प्रत्यक्षात सुरु केले .असे आज आपल्या ५ वर्षाच्या कामाचा संक्षिप्त आढावा ‘मायमराठी ‘पुढे सांगताना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नमूद केले .बापट यांचे म्हणे जसेच्या तसे आम्ही आमच्या फेसबुक पेज वरून लाइव्ह केले आहेच .इथेही वेगळ्या व्हिडीओ दर्जात तेच देत आहोत …नेमके बापट यांनी काय म्हटले आहे ते ऐका व पहा त्यांच्याच शब्दात

मोदींनी मीडिया विकत घेतली, प्रणिती शिंदेंचा खळबळजनक आरोप (व्हिडीओ)

0

पंढरपूर-देशातील वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या भाजप आणि पंतप्रधान मोदींनी विकत घेतली असून भाजपची बाजू रंगवून दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय हे समाजासमोर येऊ दिले जात नसल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभा मतदार संघातील कांसेगाव येथे काँग्रेसतर्फे घेण्यात आली. प्रणिती शिंदे देखील आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी आल्या होत्या.

या सभेत प्रणिती यांनी माध्यमांना लक्ष्य केले. भाजपकडून माध्यमांना पैसे दिले जातात आणि खोट्या गोष्टी किती छान आहेत हे पटवून दिले जाते. सत्य काय हे दडविले जाते ते लोकापर्यंत येऊ दिले जात नाही. त्यांच्या या नितीमुळे मतदारांमध्ये आणि खास करुन तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप प्रणिती यांनी जाहीर सभेत केला.

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी घेतले भाजपचे कमळ हाती

0
दिंडोरी- शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी मतदारसंघातून निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर परत एकदा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा डॉ. पवार यांनी हाती घेतला होता. राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उमेदवारी मिळेल आशी त्यांना आशा होती, पण राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी देऊन पवार यांचा पत्ता कट केला. राष्ट्रवादीकडून निराशा पदरी पडल्याने त्यांनी शेवटी त्यांनी कमळाला हाती घेण्याचा निर्णय घेतला.

भाजपमध्ये प्रवेश करावा का नाही यासाठी त्यांनी दिंडोरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सर्वांचे मतं जाणून घेतले. बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. पवार जो निर्णय घेतील तो मान्य असून, सदैव पवार यांच्या पाठिशी उभे आहोत असे सांगितले. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. येत्या रविवारी देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असल्याने त्याच दिवशी डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

निसर्ग,इतिहास,कला,साहित्य विषयक प्रेम ,रुजविण्यासाठी पिंपरी -चिंचवड , पुण्यामध्ये ‘जिप्सी क्लब’ ची स्थापना !

0
पुणे:आजच्या धकाधकीच्या, ताण तणावाच्या आयुष्यात प्रत्येकाला  निसर्ग , कला, संगीत , इतिहासप्रेमात रममाण करण्यासाठी   उद्योगनगरी पिंपरी -चिंचवड आणि विद्यानगरी पुण्यात  ‘जिप्सी क्लब ‘ची स्थापना होत आहे .
युवक ,युवती ,महिला आबाल वृद्धाना   हे नवे दालन उपलब्ध होत आहे.
संस्थापक निनाद थत्ते यांनी ही माहिती दिली .
पिंपरी -चिंचवड ,पुणे या ठिकाणी जिप्सी क्लबचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत . भटकंती , ट्रेकिंग  पासून साहित्य ,संगीत ,कला अशा गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात येत आहे .
प्रत्येक महिन्यात अशी वेगळी वाट  धुंडाळणारे भटकंती, साहित्य,संगीत ,कला अशा क्षेत्रातील जिप्सीशी गप्पा ,साहस,निसर्ग,इतिहास अशा विषयांवर आधारित वर्षातून  एक चित्रपट महोत्सव /रसग्रहण ,अनुभव कथन,फोटो आणि पेंटिंग्ज ,त्यांनी जोपासलेल्या छंदाचे प्रदर्शन ,दासबोध अभ्यास वर्ग असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत .
 शास्त्रीय पद्धतीने दुर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न , स्मृतिवन – डोंगर /गडांवर शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण, अक्षय ऊर्जा  असे उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत . अधिक माहितीसाठी,नोंदणीसाठी   जिप्सी क्लब ,निनाद थत्ते ,मोबाईल नंबर 96899 38912 वर संपर्क  साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात

0

सातारा-लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात एका तृतीयपंथीयाने निवडणूक लढवायचे ठरवले आहे. प्रशांत वारकर असं या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव आहे. आपण निवडणूक ही उदयनराजेंच्या विरोधात नाही तर व्यवस्थेविरोधात लढवत असल्याचं वाडकर यांनी सांगितलं. प्रशांत वारकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

तृतीयपंथी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हायला लागले आहेत. एकीकडे प्रशांत वाडकर हे निवडणूक लढवत असून दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या मान्यवरांची मदत घेतली आहे त्या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक सदिच्छादूत (ॲम्बेसेडर)म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे.

2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन 2014च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. 2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या 2,086इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या चार मतदारसंघात अनुक्रमे 113, 184, 324 आणि 123 तृतीयपंथाची नोंद झाली आहे. मुंबई उत्तर या मतदारसंघातून सर्वाधिक 324तृतीयपंथीची नोंद झाली आहे.

गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल.येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथीसुद्धा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहेत.

राहुल:प्रियांका गांधींसह दिग्गजांच्या सभांसाठी शहर कॉंग्रेस सज्ज – रमेश बागवे

0
 
पुणे-कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही देवू द्यात , आम्ही मोदी सरकारची फसवेगिरी या सरकारचे भांडे फोडण्याचे काम सातत्याने रस्त्यावर येवून केले आहे. आता घरो घरी पोहोचणार आहोत ,प्रचारासाठी आम्ही सज्ज झालो आहे.पक्षाचे दिग्गज नेते सोनिया गांधी,राहुल गांधी ,प्रियांका गांधी  आणि बड्या नेत्यांच्या सभा पुण्यात व्हाव्यात ,प्रचार फेऱ्या ,दौरे पुण्यात व्हावेत यासाठी आम्ही सज्ज आहोत.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत अशी माहिती येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे दिली .
ते म्हणाले ,’स्वतः चव्हाण नांदेड मधून उमेदवार असल्याने  पुण्याचे कार्यकर्ते नांदेड मध्ये जावून येतील आणि चव्हाण हे देखील पुण्यात सभा जरूर घेतील . त्यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण ,हर्षवर्धन पाटील ,वसंतराव पुरके आणि केंद्रातील राज्यातील दिग्गज नेते यांच्या  सभांसाठी ,दौऱ्यांसाठी आम्ही जय्यत तयारी करत आहोत . पक्षाने उमेदवाराचे नाव घोषित करताच उमेदवारी अर्ज दाखल करू,बूथ कमिट्या आमच्या तयारीत आहेत . कार्यकर्ते तयारीत आहेत .काही सिलेब्रीटी प्रचाराला येतील यासाठी प्रयत्न  सुरु आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात विधान सभेसाठी इच्छुक असणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे हे कार्यकर्ते कामाला लागले आहेत .पुण्याची भाजपने कशी वाट लावली, देशाची कशी फसवणूक केली याचा पुन्हा पुन्हा पाढा जनतेपुढे वाचण्याचे काम हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता करेल .या साठी युवक ,महिला वर्ग यांच्या प्रचार फेऱ्यांचे नियोजन देखील अंतिम टप्प्यात आहे असेही बागवे यांनी सांगितले.

मोदींसह दिग्गजांच्या सभा आणि प्रचारफेऱ्या पुण्यात – योगेश गोगावले

0
 
पुणे-उमेदवार कोणीही देवू द्यात आमची तयारी झाली आहे ,पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पंकजा  मुंडे आणि नामवंतांच्या सभांसाठी ,दौऱ्यांसाठी आम्ही जय्यत तयारी करत आहोत . अजून तारखा ठरल्या नसल्या तरी आम्ही संपर्कात राहून पाठपुरावा करतो आहोत.पक्षाने उमेदवाराचे नाव घोषित करताच उमेदवारी अर्ज दाखल करू.२४ तारखेला कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फुटत आहे . या कार्यक्रमासाठी पुण्यातून नेते ,कार्यकर्ते जातील .अशी माहिती येथे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली .
ते म्हणाले ,पुणे लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ येतात ,या सहाही मतदार संघात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होईलचं त्याबरोबर पंकजा मुंडे ,गडकरी उयांच्या सभांचे नियोजन केले जाते आहे .पदयात्रा ,प्रचार फेऱ्या , यांचे नियोजन अखेरच्या टप्प्यात आहे. आम्ही प्रत्येक भागात पोहोचण्याचा प्रयत्न करू . बारामती मतदार संघात देखील आम्ही पुण्याचा काही भाग येतो येथे आम्ही वेगळे नियोजन करतो आहोत .सभांसाठी मैदाने आणि प्रचार फेऱ्यांसाठी कार्यकर्ते ,मार्ग याबाबत वारंवार माहिती घेतो आहोत .आम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत असे ते म्हणाले .

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘आदर्श माता’ व ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

0
गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजन
 
नवी सांगवी-
गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘आदर्श माता’ आणि ‘समाजभूषण’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
         भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘आदर्श माता पुरस्कार’ देवून विमलबाई धुरगुडे (तुळजापूर, मंगरूळ), शकुंतला पवार (धारूर, मोर्डा तुळजापूर), धन्वंतरी गोजमगुंडे (लातूर), शालिनी चौधरी (अंबाजोगई), द्रोपदी काळे (चारे, बार्शी) यांना गौरविण्यात आले.
           यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, परिमंडळ १ पुणेचे उपायुक्त सुहास बावाचे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजाताई महेश लांडगे, शुभांगीताई लांडे पाटील, विद्याताई जाधव, आयोजक प्रकाश इंगोले व डी. एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
         समाजभूषण पुरस्कारार्थी : डॉ. अंबिका पतंगे (स्त्री रोग तज्ज्ञ), स्मार्तना पाटील (पो.उप- आयुक्त परिमंडळ-१ पिं.चिं), प्रतिभाताई कव्हेकर पाटील (लातूर), डॉ. दीपाताई मोरे (उमरगा), अंजली तापडिया (सुवर्ण पदक विजेत्या), प्रीतीताई काळे (समाजसेविका), पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी), आशाताई सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे (समाजसेविका), स्नेहल शहाणे (लोकसेवा फाउंडेशन), ऍड. प्रीती वैद्य (संचालिका किनारा वृद्धाश्रम ), अर्चनाताई अंबुरे –उस्मानाबाद, पोपटबाई जाधव (लघुउद्योजिका), रिंका जाधव- काळे, अदिती साखरे, अनिता खांदवे – कराळे, निताताई मोघे, प्रतीक्षा इंगोले.
         रवींद्र गायकवाड म्हणाले, पुरस्कारामुळे महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. मराठवाडा ही संताची भूमी आहे व आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिला या आपल्या मराठवाड्याच्या मातीतील आहेत. पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी असली, तरी  आपल्या जन्मभूमीवर तेवढीच माया व प्रेम करतात.
          पुरस्कारार्थींचेच्या मनोगतातून सद्यस्थितीत समाजामधील एकमेकांसाठीचा ओलावा आणि संवेदना हरवत चालल्याच्या भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, “स्वराज्य शांतीदूत परिवार” या संस्थेचे उद्घाटन व स्वराज्य महिला विशेषाकांचे प्रकाशनही करण्यात आले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक राजेंद्र कोरे यांनी, तर आभार डी.एस.राठोड यांनी मानले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी २८ उमेदवारांची नावे -२० नावांना होतोय विलंब -भाजप मध्ये तर छुपी रणनीती

0

पुणे-महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला 20 मतदारसंघात उमेदवारीवरून पेच निर्माण झालेला असून संभाव्य बंडाळी आणि विरोधकांचा बेबनाव यामुळे उमेदवार निवडीला विलंब लागत आहे. पहिल्या व दुसरया टप्प्यातील ११ आणि १८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गेली २ दिवसांपासून प्रारंभ झाला आहे तरी अखेरच्या दिवसाची वाट पाहण्याची वेळ विरोध पक्षांच्या रणनीतीमुळे आली आहे. भाजप-सेनेने अद्याप एकही उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने तब्बल २८ मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरु केलेला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून आतापर्यंत २८ मतदारसंघातील जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-

अ.क्र. संघ.क्र. लोकसभा मतदारसंघ काँग्रेस/राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार
1 1 नंदुरबार (अ.ज.) के. सी. पडवी (काँग्रेस)
2 2 धुळे कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
3 3 जळगाव गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
4 5 बुलढाणा राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
5 8 वर्धा चारुलता टोकस  (काँग्रेस)
6 10 नागपूर नाना पटोले (काँग्रेस)
7 12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)
8 14 यवतमाळ-वाशिम माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
9 17 परभणी राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
10 20 दिंडोरी (अ.ज.) धनराज महाले (राष्ट्रवादी)
11 21 नाशिक समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
12 24 कल्याण बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
13 25 ठाणे आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
14 28 उत्तर पूर्व मुंबई संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
15 29 उत्तर मध्य मुंबई प्रिया दत्त (काँग्रेस)
16 30 दक्षिण मध्य मुंबई एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
17 31 दक्षिण मुंबई मिलिंद देवरा (काँग्रेस)
18 32 रायगड सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
19 33 मावळ पार्थ पवार (राष्ट्रवादी)
20 35 बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
21 36 शिरुर डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
22 38 शिर्डी (अ.जा.) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
23 39 बीड बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
24 42 सोलापूर (अ.जा.) सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
25 45 सातारा छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
26 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
27 47 कोल्हापूर धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
28 48 हातकणंगले राजू शेट्टी स्वभिमानी संघटना (राष्ट्रवादी)


काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला खालील 20 मतदारसंघात उमेदवारीवरून पेच

अ.क्र. संघ.क्र. लोकसभा मतदारसंघ
1 4 रावेर लोकसभा मतदारसंघ
2 6 अकोला लोकसभा मतदारसंघ
3 7 अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ
4 9 रामटेक (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ
5 11 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
6 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
7 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघ
8 16 नांदेड लोकसभा मतदारसंघ
9 18 जालना लोकसभा मतदारसंघ
10 19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
11 22 पालघर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
12 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ
13 26 उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
14 27 उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ
15 34 पुणे लोकसभा मतदारसंघ
16 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
17 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ
18 41 लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ
19 43 माढा लोकसभा मतदारसंघ
20 44 सांगली लोकसभा मतदारसंघ

परभणीत राष्ट्रवादीला खिंडार, आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला

0

परभणी– काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा भाजपच्या गळाला सापडला आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

समीर दुधगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रवेशामुळे पाटील पुत्रांनंतर दुधगावकरांमुळे आणखी एक धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. समीर दुधगावकर यांनी देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन भाजप प्रवेश निश्चित केला.

समीर यांनी अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यामातून उद्योग क्षेत्रात कार्य सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपल्या वडिलांना निवडणूक प्रचारात मदत करत आहेत.

गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होता, पण मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळेसही दुधगावकरांना डावलून राजेश विटेकर यांना लोगसभेची उमेदवारी दिली, त्यामुळेच हा भाजप प्रवेश झाला असल्याचे सांगितले जात आहे.

रणजीतसिंह आणि सुजय यांनी भाजपात प्रवेश केला,पण त्यांच्या वडिलांनी आपला पक्ष सोडला नाही. त्यामुळे आता गणेश दुधगावकर राष्ट्रवादी सोडणार का नाही, तसेच जर भाजपने समीर यांना परभणीतून उमेदवारी दिली तर परभणीत शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा पत्ता कट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पुरे झाला भाजपचा खेळ -अभिनेते सिन्हा शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

0

पाटना -भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि अभिनेते सिन्हा शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाटण्यामध्ये 22 मार्चला होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा होईल.

भाजपने पटनासाहिब इथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते. यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांची मोट बांधून महागठबंधनला एकत्र ठेवण्यात शत्रुघ्न सिन्हा यांची महत्त्वाची भूमिका आहे, असं बोललं जातं.

त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच पटना साहिबमधून त्यांना उमेदवारी देण्यात आलीय. केंद्रीय मंत्री असलेले ‘बिहारी बाबू’ रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात ते निवडणूक लढवू शकतात.

माढ्यात भाजपचाच खासदार.. विजयसिंह पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह भाजपमध्ये- मुख्यमंत्री

0

मुंबई- राष्‍ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह पाटील यांच्या आशीर्वादाने रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच माढ्यात भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुढील चर्चा आम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत करून असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कविर्तक लढविले जात आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत केले. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मोहिते-पाटील घराण्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. याच मोहिते-पाटील घराण्यातील तिसरी पिढी अर्थात रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशमुळे मोठे घराणे भाजपसोबत जोडले जात असल्याचा सर्वात जास्त आनंद आहे.

नव्या चेहर्‍यांना संधी- गिरीश महाजन
लोकसभा निवडणुकीत भाजप नव्या चेहर्‍यांना संधी द्यायला हवी. भविष्याचा वेध ओळखून राज्यातील मोठी घराणी भाजपवर विश्वास दाखवत आहेत. येत्या आठवडाभरात भाजपमध्ये आणखी लोक येतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

0

लंडन – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला मंगळवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. 13 हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनी बनावट गॅरंटी आणि खोटी कागदपत्रे दाखल केली होती. हे दोघेही गतवर्षी जानेवारीत भारत सोडून पसार झाले. नीरव मोदी नुकताच दोन वेळा लंडनमध्ये फिरताना दिसून आला होता. भारताच्या विनंतीनंतर त्याच्याविरुद्ध लंडन कोर्टाने अटक वॉरंट जारी केला होता. इंग्लंडमधील माध्यमांच्या माहितीनुसार, नीरवने पुन्हा हिऱ्याचा व्यापार सुरू केला आहे. त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले.

नीरव मोदीला आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे. यानंतर त्याचा खटला सुद्धा विजय माल्ल्यासारखाच चालवला जाईल. हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेल्या विजय माल्ल्याला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याला जामीन मंजूर झाला होता. माल्ल्याला अशा स्वरुपाची अटक आणि जामीन दोन वेळा मिळाले आहेत.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरव मोदीची पत्नी अमी मोदी विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 3 कोटी डॉलर ट्रान्सफर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेच्या खात्याचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हे पैसे बँकेतून घेण्यात आलेल्या कर्जाचे असल्याचा संशय आहे. या पैशातून न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये मोदीने एक मालमत्ता खरेदी केली होती.

जागतिक स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’ उपयुक्त- डॉ. संजय बी. चोरडिया

0
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच ‘ग्लोबल एक्सपो’चे आयोजन केले होते. व्यवस्थापन क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टीम वर्क आणि टीम बिल्डिंग अतिशय महत्वाचे असते. हीच बाब लक्षात घेऊन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये नियमित वेगवेगळ्या कार्यशाळा, सेमिनार आणि तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली जातात. त्याचाच एक भाग म्हणून बावधन येथील व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी हा एक्स्पो आयोजिला होता.
या एक्स्पोमधून विविध देशांच्या भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक माहितीचे दर्शन घडले. विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांना जागतिक व्यापार, व्यावसायिक स्थिती, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि देशाची राजकीय धोरणे समजण्यासाठी या व्यसपीठाचा उपयोग झाला. पीजीडीएम आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांनी याचे आयोजन केले. पाच विद्यार्थ्यांचा एक गट अशा २३ गटांत विद्यार्थी विभागले गेले. प्रत्येक गटाने एक देश निवडला आणि भौगोलिक-राजकीय आणि आर्थिक माहितीचे सादरीकरण केले. त्यासाठी सर्च इंजिन, सोशल मीडिया, परस्परसंवाद आणि बाजार संशोधनाचा उपयोग करण्यात आला. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, रशिया, जर्मनी, नेदरलँड, चीन, इंग्लंड इत्यादी देशांचे दर्शन या एक्स्पोमध्ये घडविण्यात आले. त्यासाठी पावरपॉइंट सादरीकरणे, व्हिडिओ, माहिती आलेख, चार्ट्स, फ्लेक्स आणि इतर साधनांचा वापर करण्यात आला. संस्कृती, इतिहास, लोकसंख्या आणि विकास नमुनादेखील निवडलेल्या देशानुसार प्रत्येक गटाने सादर केला. १००० हुन अधिक विद्यार्थी, कर्मचारी, अभ्यागत आणि उद्योग क्षेत्रातील लोकांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
२३ गटांनी केलेल्या सादरीकरणामुळे २३ देशांची माहिती तपशीलवार समजली. या एक्सपोदरम्यान, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी सहकाऱ्यांनी तसेच विद्यार्थी सहकारी गटांनी मूल्यांकन केले. मनोज बर्वे – बीव्हीएमडब्ल्यूचे (जर्मन फेडरेशन एसोसिएशन ऑफ एसएमई) भारतातील प्रमुख, काझुको बॅरिसिक- जपानी कलाकार आणि सल्लागार, टॉमियो इसोगई इंडो-जपानी रिलेशनशिपचे सल्लागार, आशिष जोशी- स्किल्समार्ट वर्ल्डचे संचालक, मार्केट रिस्क चेंज मॅनेजमेंटचे पुष्कर पानसे आदींनी एक्स्पोला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एक्स्पोतील विजेत्या संघाला रु. ११,००० रुपयांचे पारितोषिक मिळाले. तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे ७००० रुपये, ५००० रुपये, ३००० रुपये आणि १००० रुपयांचे पारितोषिक मिळाले.
डॉ. संजय बी. चोरडिया, “जागतिक बाजापेठेतील स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ग्लोबल एक्स्पोसारख्या उपक्रमांची गरज आहे. चांगला व्यावस्थापक होण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाची मदत होईल. विश्लेषणात्मक क्षमता विकास, सादरीकरणाची कला, विद्यार्थ्यांमधील संघ भावना, कौश्यल आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोन वाढावा, हा या एक्स्पोमागील हेतू होता. आज उद्योग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा हे त्यांपैकी एक आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या देशांशी आयात-निर्यातीच्या स्वरूपात व्यवसाय करीत आहेत. जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करता यावा, यासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. “