मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल,हर्षवर्धन पाटील,छगन भुजबळ,जयंत पाटील आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह,जोगेंद्र कवाडे विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. परंतु, विधानसभेत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी कांदा काढणीसाठी तयार केले आधुनिक ‘हार्वेस्टर ‘ यंत्र !
गिरीश बापट हेचं पुण्यातून भाजप चे अधिकृत उमेदवार..बारामतीतून कांचन राहुल कुल ..
नवी दिल्ली: ‘माय मराठी ‘ च्या पूर्वीच्याच वृत्तानुसार भाजपने पुण्यातून गिरीश बापट यांचीच अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे .रात्री पावणेदोन वाजता हि उमेदवारी जाहीर होताच विशेष म्हणजे बापट,उदय जोशी,दीपक पोटे आणि मीडियातील मंडळी अडीच वाजता गिरीजा कट्ट्यावर पोहोचली ….आणि उमेदवारीचे स्वागत केले.तर सकाळी त्यांच्या घरी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत अभिनंदनासाठी गर्दी केली .
भाजप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीतून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आज रात्री उशिरा ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील सहा उमदेवारांचा समावेश आहे. भाजपने पुण्यातून गिरीश बापट, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तर बारामतीतून रासपच्या कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल
बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.भाजप ही जागा स्वत: लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देवून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्योसोबत होणार आहे. मागच्यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती.
काँग्रेसच्या यादीत टावरे, सुभाष झांबड
काँग्रेसनेही ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिलिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राज बब्बर आणि संबित पात्रांना उमेदवारी
काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फत्तेहपूर सिक्रीमधून तर रेणुका चौधरी यांना तेलंगणाच्या खम्मममधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संबित पात्रा यांना ओडिशाच्या पुरीमधून उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे सेना नेते सुभाष देसाई यांनी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रविंद्र गायकवाड यांचा पत्ता शिवसेनेने कट केला आहे. पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला असून या जागेवरून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. याचा फटका गायकवाड यांना बसल्याचे बोलले जात आहे. त्याच प्रमाणे हिंगोली मतदार संघातून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने प्रलंबित राहिलेली पालघरची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली आहे. या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी इथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे साताऱ्याच्या जागेवरून भाजपतर्फे लढण्याच्या तयारीत होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे आल्याने पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जागेवरून इच्छूक असललेले पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.
लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती व आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी
| संघ.क्र. | मतदारसंघ | भाजप-सेना युतीचे उमेदवार | राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार |
| 1 | नंदुरबार (अ.ज.) | हीना गावित (भाजप) | के. सी. पडवी (काँग्रेस) |
| 2 | धुळे | सुभाष भामरे (भाजप) | कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) |
| 4 | रावेर | रक्षा खडसे (भाजप) | |
| 5 | बुलढाणा | प्रतापराव जाधव (शिवसेना) | राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) |
| 6 | अकोला | संजय धोत्रे (भाजप) | |
| 7 | अमरावती (अ.जा.) | आनंदराव अडसूळ (शिवसेना) | |
| 8 | वर्धा | रामदास तडस (भाजप) | चारुलता टोकस (काँग्रेस) |
| 9 | रामटेक (अ.जा.) | कृपाल तुमाणे (शिवसेना) | |
| 10 | नागपूर | नितीन गडकरी (भाजप) | नाना पटोले (काँग्रेस) |
| 12 | गडचिरोली-चिमूर (अ.ज.) | अशोक नेते (भाजप) | डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस) |
| 13 | चंद्रपूर | हंसराज अहिर (भाजप) | विनायक बांगडे |
| 14 | यवतमाळ-वाशिम | भावना गवळी (शिवसेना) | माणिकराव ठाकरे (काँग्रेस) |
| 15 | हिंगोली | हेमंत पाटील (शिवसेना) | |
| 17 | परभणी | संजय जाधव (शिवसेना) | राजेश विटेकर (राष्ट्रवादी) |
| 18 | जालना | रावसाहेब दानवे (भाजप) | विलास औताडे |
| 19 | औरंगाबाद | चंद्रकांत खैरे (शिवसेना) |
सुभाष झांबड |
| 21 | नाशिक | हेमंत गोडसे (शिवसेना) | समीर भुजबळ (राष्ट्रवादी) |
| 23 | भिवंडी | कपिल पाटील (भाजप) | सुरेश टावरे |
| 24 | कल्याण | श्रीकांत शिंदे (शिवसेना) | बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) |
| 25 | ठाणे | राजन विचारे (शिवसेना) | आनंद परांजपे (राष्ट्रवादी) |
| 26 | उत्तर मुंबई | गोपाळ शेट्टी (भाजप) | |
| 27 | उत्तर पश्चिम मुंबई | गजानन किर्तीकर (शिवसेना) | |
| 29 | उत्तर मध्य मुंबई | पूनम महाजन (भाजप) | प्रिया दत्त (काँग्रेस) |
| 30 | दक्षिण मध्य मुंबई | राहुल शेवाळे (शिवसेना) | एकनाथ गायकवाड (काँग्रेस) |
| 31 | दक्षिण मुंबई | अरविंद सावंत (शिवसेना) | मिलिंद देवरा (काँग्रेस) |
| 32 | रायगड | अनंत गीते (शिवसेना) | सुनील तटकरे (राष्ट्रवादी) |
| 33 | मावळ | श्रीरंग बारणे (शिवसेना) | पार्थ पवार (राष्ट्रवादी) |
| 36 | शिरुर | शिवाजीराव आढळराव (शिवसेना) | डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) |
| 37 | अहमदनगर | सुजय विखे पाटील (भाजप) | |
| 38 | शिर्डी (अ.जा.) | सदाशिव लोखंडे (शिवसेना) | भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) |
| 39 | बीड | डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) | बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) |
| 40 | उस्मानाबाद | ओमराजे निंबाळकर (शिवसेना) | राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी) |
| 41 | लातूर (अ.जा.) | सुधाकरराव शिंगारे (भाजप) | मच्छिंद्र कामत |
| 44 | सांगली | संजयकाका पाटील (भाजप) | |
| 46 | रत्नागिरी-सिंधुदुर्ग | विनायक राऊत (शिवसेना) | नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) |
| 47 | कोल्हापूर | संजय मंडलिक (शिवसेना) | धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) |
| 48 | हातकणंगले | धैर्यशील माने (शिवसेना) | राजू शेट्टी स्वभिमानी संघटना (राष्ट्रवादी) |
| 3 | जळगाव | स्मिता उदय वाघ | गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) |
| 11 | भंडारा-गोंदिया | ||
| 16 | नांदेड | प्रताप चिखलीकर | |
| 20 | दिंडोरी (अ.ज.) | भारती पवार | धनराज महाले (राष्ट्रवादी) |
| 22 | पालघर (अ.ज.) | ||
| 28 | उत्तर पूर्व मुंबई | संजय दीना पाटील (राष्ट्रवादी) | |
| 34 | पुणे | गिरीश बापट | |
| 35 | बारामती | कांचन राहुल कुल | सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) |
| 42 | सोलापूर (अ.जा.) | सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) | |
| 43 | माढा | संजय शिंदे (राष्ट्रवादी) | |
| 45 | सातारा | छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) |
व्हायोलिन ,सरोद ,गायनाच्या माध्यमातून ‘वसंत ‘ ऋतूचे स्वागत !
विज्ञान परिषदेतर्फे ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’वर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवार, दिनांक २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तासनतास मोबाईल हातात धरून गेम खेळणाऱ्या टीनएजर्सच्या मेंदूत नक्की काय घडतंय? मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ नावाचा भाग काय विचार करतो? गेम खेळण्याच्या आणि सोशल मीडियाच्या लालसेतून मोबाईल- इंटरनेट व्यसन होते का? आणि व्यसनी माणसाच्या मेंदूतला ‘ग्रे मॅटर’ संकुचित होतो का? त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो? अशा अनेक प्रश्नांचा वेध डॉ. श्रुती पानसे आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. तेव्हा अधिकाधिक विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.
ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
बँकिंग व्यवस्थेला सनदी लेखापालांनी बळ द्यावे -सुब्रह्मण्यम स्वामी यांचे मत
तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश
वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैनचा स्पर्धेतील सर्वाधिक 107 गुणांचा ब्रेक
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने रॅक एम अप संघाचा 3-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यात वाडेश्वर विझार्डसच्या आशुतोष पाधीने रॅक एम अपच्या मयंक भावसारचा 01-38, 67-05, 44-37, 57-44 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात ह्रितिक जैन याने सुमित सादुलकरचा 30-32, 74-42, 51-04, 61-39 असा पराभव करून वाडेश्वर विझार्डसला 2-0अशी आघाडी मिळवून दिली.तिसऱ्या लढतीत वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत विशाल वायावर 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36 असा सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये हिमांशू जैन याने चौथ्या फ्रेममध्ये 107 गुणांचा ब्रेक नोंदवून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्डस संघाने अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचा 2-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले.
ब गटात अरुण बर्वे, रोहित नारगोलकर, सलील देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने डेक्कन रुकीज संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. ग गटात द बॉल हॉग्ज संघाने147 पूल अँड स्नूकर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अशोक शांडिल्या, लौकिक पठारे, आदित्य अगरवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर, दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने बीएसएसए मास्टर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब ब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. इ गटात केएसबीए संघाने डेक्कन रायनोजचा 2-1असा तर दुसऱ्या सामन्यात ऑटो पॉट्स संघाचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ: क्यू मास्टर्स ब वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(आर्यन राजहंस पराभूत वि.विशाल रजनी 00-48, 60-27, 16-27, 27-61; तुषार सावदी वि.वि.प्रसाद पराडे 44-01, 54-33, 22-20; अभिषेक श्रीवास्तव वि.वि.अमरदीप घोडके 09-40, 54-62, 43-09, 55-41, 31-12);
गट ब: पीवायसी जायंट्स वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(अरुण बर्वे वि.वि.श्रीवत्स शेवडे 30-40, 37-44, 44-33, 51-40, 40-21; रोहित नारगोलकर वि.वि.राजेंद्र आढाव 41-09, 11-61, 30-05, 60-24; सलील देशपांडे वि.वि.अश्विन पळणीतकर 22-35, 63-56, 18-26, 78-45, 53-21);
गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.क्यू क्लब ऍक्सेस् 3-0(राहुल सचदेव वि.वि.सत्चित जामगावकर 27-37, 115(100)-08, 45-10, 78-23; मुकुंद भराडिया वि.वि.निलेश पाटणकर 69(46)-00, 76-25, 50(50)-10; हसन बदामी वि.वि.अभिषेक बोरा 50-25, 61(61)-00, 42-11);
गट इ: केएसबीए वि.वि.डेक्कन रायनोज 3-0(योगेश कुमार वि.वि.प्रशांत पोवार 47-01, 62-38, 36-09; एम.एस.अरुण वि.वि.संतोष धर्माधिकारी 45-00, 65-18, 38-16; दक्ष रेड्डी वि.वि.विठ्ठल ढमाले 34-16, 83-30, 48-30);
गट इ: केएसबीए वि.वि.ऑटो पॉट्स 2-1( एम.एस.अरुण वि.वि.पारस शहा 05-33, 53-52, 47-07, 59-60, 36-26; दक्ष रेड्डी पराभूत वि.सिद्देश मुळे 28-35, 19-63, 46-15, 53-64; योगेश कुमार वि.वि.लव बोरीचा 19-40, 69-19, 40-11, 35-45, 49-16);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.बीएसएसए मास्टर्स 2-1(अशोक शांडिल्या वि.वि.अभिमन्यू गांधी 36-33, 67-55, 29-09; आदित्य अगरवाल पराभूत वि.आनंद रघुवंशी 37-40, 45-70, 17-44; लौकिक पठारे वि.वि.रोवीन डिसुझा 40-02, 31-52, 61-36, 73-69, 41-01);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0( अशोक शांडिल्या वि.वि.मनोज गाडगीळ 46-16, 70-25, 37-02; लौकिक पठारे वि.वि.चैतन्य हळबे 28-18, 21-57, 35-42, 68-41, 49-00; आदित्य अगरवाल वि.वि.सचिन बिचे 58-00, 70-10, 40-12);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब ब 3-0(आदित्य अगरवाल वि.वि.पंकज परमार 59-07, 74-09, 80-18; रोहन साकळकर वि.वि.कुणाल वासवानी 39-09, 51-10, 18-27, 59-25; लौकिक पठारे वि.वि.कुमार शिंदे 35-14, 58-78, 35-25, 74-67);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.रॅक एम अप 3-0(आशुतोष पाधी वि.वि.मयंक भावसार 01-38, 67-05, 44-37, 57-44; ह्रितिक जैन वि.वि.सुमित सादुलकर 30-32, 74-42, 51-04, 61-39; हिमांशू जैन वि.वि.विशाल वाया 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-1(आशुतोष पाधी वि.वि.केतन चावला 19-39, 64-35, 37-33, 67-55; ह्रितिक जैन वि.वि.भरत सिसोडिया 34-16, 80-11, 37-24; हिमांशू जैन पराभूत वि.अनुराग गिरी 06-56, 80-00, 44-16, 50-60, 17-38);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-1(आशुतोष पाधी पराभूत वि.साद सय्यद 05-45, 14-63, 02-32; हिमांशू जैन वि.वि.तहा खान 00-(52)61, 83-47, 43-21, 77-08; ह्रितिक जैन वि.वि.संकेत मुथा 43-17, 72-04, 45-33);
शक्ति स्थापना दिनानिमित्त सविता कुलकर्णी आणि रेश्मा राठोड यांना पुरस्कार जाहीर
पुणे-शारदा शक्ति या महाराष्ट्रातील महिला संघटनेतर्फे शक्ति स्थापना दिवस निमित्त रविवार दि. २४ मार्च रोजी
सामाजिक योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या सविता कुलकर्णी यांना शक्ति प्रेरणा पुरस्कारआणि युवा
कर्तृत्वाबद्दल बदलापूरच्या रेश्मा राठोड या युवतीसआय शक्ति सपोर्ट; या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या पुणे कार्यवाह मीनाताई कानडे कार्यक्रमाच्या प्रमुख असतील. हा कार्यक्रम कर्वे
रस्त्यावरील डेक्कन कॉर्नर येथे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनांक २४ मार्च रोजी
सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्ति ही संस्था देशात कार्यरत आहे.
दिनांक २२ मार्च या राष्ट्रीय शक्ति स्थापना दिनानिमित्त शारदा शक्ति या पुणे शाखेतर्फे २४ मार्च रोजी
पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सातत्याने सामाजिक काम करणारी महिला आणि परिस्थितीशी संघर्ष करीत यश मिळवणाऱ्या युवतीस
दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते. मानपत्र आणि भेटवस्तू, असे शक्ति प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच प्रशस्तीपत्र, ५००० रुपये रोख आणि भेटवस्तू असे आय शक्ति सपोर्ट पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्त्री शक्ति प्रेरणापुरस्काराच्या यंदाच्या मानकरी औरंगाबादच्या सविता कुलकर्णी या बालपणापासून
राष्ट्रसेविका समितीशी संबंधित असून त्यांनी बीड, आंबेजोगाई, रायगड जिल्हा आदि ठिकाणी सामाजिक
जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९९२ पासून औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या डॉ.
हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत गुरुवर्य लहूजी साळवे आरोग्य केंद्रात सामाजिक कामास त्यांनी प्रारंभ केला.
याबरोबरच सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची त्यांनी स्थापना केली. तसेच ४५ महिला बचत
गटांची स्थापना केली. याशिवाय अन्नपूर्णा अन्नपदार्थ प्रशिक्षण, रचना शिवणकला प्रशिक्षण, दर्पण ब्युटीशियन
प्रशिक्षण, आभूशिका आभूषण प्रशिक्षण केंद्रांद्वारे १५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना
रोजगाराची संधी उपलब्ध केली. तेजस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून २५ सेवा वस्त्यांमध्ये सामाजिक
नेतृत्वगुण विकास, रक्तक्षय निवारण, नवदांपत्य समुपदेशन, स्वावलंबन या विषयातही त्या काम करीत आहेत.
याशिवाय २५ सेवा केंद्रांमध्ये किशोरी प्रकल्प आणि ममता बालवाडीचे त्यांचे काम चालू आहे. त्यांना अनेक
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
यंदाच्या ;आय शक्ति सपोर्ट पुरस्काराची मानकरी बदलापूरची रेश्मा राठोड ही राष्ट्रीय खो-खो पटू आहे.
बदलापूरमध्ये एका लहान घरात राहणाऱ्या रेश्माने मोठा भाऊ व बहिण यांच्या प्रोत्साहनाने खो खो खेळत
आंतरशालेय खो-खो स्पर्धा, महापौर चषक खो-खो स्पर्धा याबरोबरच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय
पातळीवरील खो खो स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या क्रीडा नैपुण्याची चमक दाखवली. भोपाळ येथे झालेल्या
राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत तिच्या खेळामुळेच महाराष्ट्राला विजेते पद मिळाले. याचवर्षी प्रतिष्ठेच्या
जानकी पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तसेच खेलो इंडिया खेलो= चा ऑल राऊंडर हा
पुरस्कारही तिला देण्यात आला. नुकतीच तिने १२ वी ची परीक्षा दिली आहे.
हॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये क्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा नोकरी मेळावा उत्साहात
‘ एसएई तिफण २०१९’ राष्ट्रीय स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय विजेते
बापटांसाठी दिल्ली दरवाजे ,काकडेंसाठी पुण्याचे दरवाजे खुले…
मुंबईत आज काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय काकडे यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी काकडे भाजपासोबत राहणार असल्याची घोषणा केली. ते स्थानिक राजकारणाने रागवले होते ,रागारागात दिल्लीपर्यंत गेलेही होते पण आता ते आपल्या सोबतच राहतील तसेच त्यांच्यावर लोकसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.काकडे यांचे काम चांगले आहे..त्यांना कॉंग्रेसने तिकीट हि देवू केले होते. पण आता नानांनी निर्णय घेतला कि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम करायचे , स्थानिक पातळीवरील त्यांच्या बाबतचे राजकारण आपण याच पातळीवर संपुष्टात आणू ,नाना आता कुठे अशी शंका नको नाना आता इथेच ..त्यांच्या स्थानिक अडचणी आपण दूर करू असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे .
गेल्या अनेक महिन्यांपासून संजय काकडे हे पुण्यातील भाजपाच्या नेत्यांवर नाराज होते. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही ते आग्रही होते. तसेच भाजपाकडून काकडेंना डावलले जात असल्याची चर्चा वारंवार सुरु होती, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे आपल्या भावासारखे असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले होते. त्यामुळे काकडेंची मनधरणी करण्यात त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कामाला आल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, मित्रमंडळीचा आग्रह !
मुंबई – देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीत एकमेकांवर व्यक्तीगत द्वेषापोटी करण्यात येत असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांकडे जनहितासाठी ठोस भूमिकेचा अभाव आणि स्वार्थी राजकारण या सगळ्या परिस्थितीतीला कंटाळलेल्या जनतेला समर्थ पर्याय निर्माण करुन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केवळ लोक कल्याणाचा ध्यास असणाऱ्या आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना निवडणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे त्यागी वृत्तीने काम करणार्या निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह असंख्य मित्रमंडळीने त्यांच्याकडे धरला आहे.
श्री भुजबळ यांना निवडणुकीस उभे करण्याबाबत नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत भुजबळ यांनी खरोखरच निवडणुकीला उभे रहायचे का? भुजबळ यांच्यासारख्या सुसंस्कृत, अभ्यासू, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय जाण व प्रशासकीय ज्ञान असलेल्या व्यक्तींनी निवडून येण्याची कशी गरज आहे, ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांची खऱ्या अर्थाने कोण सोडवणूक करु शकते ? ठाणे लोकसभा मतदार संघात कोणत्या समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागते या व अशा अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. मित्रमंडळीचा आग्रह, जनतेची गरज,आपले विचार लक्षात घेऊन लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू,असे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. यावेळी विचारवंत,लेखक डॉ. त्र्यंबक दूनबळे,चित्रकार, समीक्षक डॉ. सुभाष पवार, सौंदर्यतज्ञ डॉ. आशिष शिरूरकर,”गप्पागोष्टी”कार जयंत ओक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासक तथा निवृत्त तहसीलदार सुभाष कनवाळू,कथाकार गोपीनाथ देवकर गुरुजी,सामाजिक कार्यकर्त्या लीना कुलदीप आढे,सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री भीमसेन तपासे,चंद्रकांत सोनावणे,मेदारी आदी उपस्थित होते.
अडवाणींच्या ऐवजी गांधीनगर मधून अमित शहा तर मोदी वाराणसीतून,महाराष्ट्रातली 16 नावं पहा
दिल्ली- लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. अशातच सर्व पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपनेदेखील धुलिवंदनाचे मुहुर्त साधून आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 184 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या काही जागांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत.यात यादीत 182 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील 16 जागांचा समावेश आहे.लातूरमधील विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि नगरमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना तर नगर मधून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहे. गांधीनगरमधून यापूर्वी लालकृष्ण अडवाणी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.
- नितीन गडकरी नागपूरमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या नाना पटोलेंशी होणार आहे.
- लखनौमधून गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत.
- अमेठीतून स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार आहेत.
- लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अनेक ज्येष्ठांना घरी बसवलं जाईल, अशी शक्यता माध्यमांमधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर-
1- नागपूर – नितीन गडकरी
2- नंदुरबार – हिना गावित
3- धुळे – सुभाष भामरे
4- रावेर – रक्षा खडसे
5- अकोला – संजय धोत्रे
6- वर्धा – रामदास तडस
7- चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
8- जालना – रावसाहेब दानवे
9- भिवंडी – कपिल पाटील
10- मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी
11- मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
12- नगर – सुजय विखे
13- बीड – डॉ. प्रीतम मुंडे
14- लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
15- सांगली – संजयकाका पाटील
16- सुजय विखे पाटील
महाराष्ट्रा बाहेरील –
1)वाराणसी – नरेंद्र मोदी
२)गांधीनगर – अमित शाह
3)लखनऊ – राजनाथ सिंह
४)बागपत – सत्यपाल सिंग
५)गाझियाबाद – व्ही. के. सिंग
6)मथुरा – हेमा मालिनी
विजयसिंह मोहितेंना अनेकदा फोन करुनही त्यांनी उचलला नाही : अजित पवार
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित केली होती. मात्र, त्यांचा आग्रह दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा होता. त्या व्यक्तीच्या उमेदवारीला माळशिरस मतदारसंघ वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघातून विरोध होता. त्यानंतरही आम्ही विजयसिंह मोहिते पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवून निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले. हे स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचे नाव घेणे टाळले.
अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्या खा. अॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, आमदार अॅड. जयदेवराव गायकवाड, पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.






