Home Blog Page 2970

आठव्या यादीतही पुण्याचा उमेदवार नाही ..कॉंग्रेसचे चाललय तरी काय …?

0

पुणे–आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) आठवी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.आठव्या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचे नाव नव्हते .यामुळे कॉंग्रेस पुण्यातील मराठा आणि बहुजन समाजाचा विचार महत्वाचा मानून भाजपच्या उमेदवाराचा सामना करायला धक्का तंत्र अवलंबणार  काय याची शंका व्यक्त करणारी चर्चा पुण्यात सुरु झाली . एकीकडे कार्यकर्त्यांचा जोश आणि हिम्मत खच्ची होऊ नये म्हणून पक्षाने आज कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा मेळा घेवून प्रत्येक विधानसभा मतदार संघात प्रचाराची धुरा सोपविणारी नावे जाहीर केलीत .कॉंग्रेसचे मोहन जोशी ,अरविंद शिंदे हे दोन इच्छुक उमेदवार या मेळाव्यात उपस्थित राहिले .आज तरी नावे जाहीर होईल अशी अपेक्षा येथे खुद्द रत्नाकर महाजन यांनीही व्यक्त केली असताना सायंकाळी हि यादी आली त्यात हि पुण्याच्या उमेदवाराचे नाव नव्हते यामुळे बाहेरील नेत्यांच्या  नावांचा धक्का तर बसणार नाही .. अशी शंका घेत अखेरीस पक्षातील तिघांपैकी एक नाव येईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती . कार्यकर्ते दिल्ली च्या संदेशाकडे डोळे लावून बसलेट असे चित्र आहे .

दरम्यान हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव आणि मुकुल वासनिक हे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडेऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा यापूर्वी केली होती. त्यानंतर आज पक्षाने नववी यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर येथून विनायक बंगाडेऐवजी सुरेश धनोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील.

मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको:मतदार जागृती परिषद’ सभेत तीस्ता सेटलवाड , बिशप थॉमस ढाबरे, डॉ.कुमार सप्तर्षी, मनिषा गुप्ते , मौलाना निजामुद्दीन यांचा सहभाग

0
पुणे :’मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे   मतदार जागृतीसाठी  शनिवार, २३ मार्च   रोजी  पुण्यात म.फुले सभागृह, वानवडी  येथे आयोजित ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर झालेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.
सर्व आघाड्यांवर अपयशी झालेले मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको, असा  सूर सभेत उमटला.
सभेत सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड ,  बिशप थॉमस ढाबरे, डॉ.कुमार सप्तर्षी, मनिषा गुप्ते , मौलाना निजामुद्दीन   सहभागी झाले . डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली    ही सभा झाली .
प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.अन्वर राजन ,जांबुवंत मनोहर इत्यादी उपस्थित होते.
‘ जात आणि आपण ‘ , ‘ हिंदू  आणि हिंदुत्व ‘, ‘ कोणीही चालेल, भाजप नको ‘ या डॉ.कुमार सप्तर्षी लिखित  पुस्तिकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
बिशप थॉमस ढाबरे म्हणाले, ‘ मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण प्रथम आणि शेवटी ही भारतीय आहोत. सामाजिक क्रांती, स्वातंत्र्यलढयात   ख्रीस्ती बांधवांचे योगदान आहे.   तसेे सर्व अल्पसंख्यकांचे आहे. राष्ट्र् सर्वांचे आहे आणि   निरपेक्ष आहे.  धर्मावरुन भेदभाव होता कामा नये. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण होता कामा नये.
तीस्ता सेटलवाड म्हणाल्या, ‘ देशातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न होत आहे.जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही, केवळ सत्ताधारी पक्षाला हव्या त्याच मुद्दयांवर चर्चा घडवली जात आहे. त्यात माध्यमेही मागे नाहीत.  भय आणि संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे.  सीआरपीएफ सैनिकांना जे सुरक्षित ठेवू शकले नाहीत, तेच त्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहे .
देशाची साधनसंपत्ती, संसाधने खासगी भांडवलशहांना दिली जात आहेत.
 माहिती अधिकारासह काँग्रेस आघाडी सरकारने केलेले जनहिताचे कायदे कमजोर करण्याचे काम संघप्रणित भाजपा सरकारने केले. संविधान धोक्यात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.’ या सरकारने भयग्रस्त वातावरण निर्माण केले आहे. मजूर, शेतकरी, बेरोजगारीचे प्रश्न संपले नाहीत. मागील दहा वर्षात जे लोकशाहीवादी कायदे बनले, ते कमकुवत करण्याचे, रद्द करण्याचे काम या सरकारने केले आहे
मनिषा गुप्ते म्हणाल्या, ‘ धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही राज्य घटनेतील मूल्ये धोक्यात आहेत.फॅसिझमची लक्षणे दिसत आहेत. हे सरकार धर्माधिष्ठीत संघाचे आहे. मनू वादी हिंदूराष्ट्र त्यांना आणायचे आहे. लोकशाही सदृढ करण्यासाठीच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. ‘
 मौलाना निझामुद्दीन म्हणाले, ‘मताच्या माध्यमातून सरकार बदलण्याच्या कामात आपण कुचराई करता कामा नये. मल्ल्या, चोकसी पळवून लावणारा, राफेल फाईल गहाळ करणारा,  पत्नीची काळजी न करणारा,जो असताना गांधींच्या प्रतिमेवर गोळया चालवल्या जातात,वेमुलाची आत्महत्या होते, अशा चौकीदाराची देशाला गरज नाही.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले. ‘ दुसऱ्या पक्षाचे उमेदवार पळवले जात आहेत, असे या निवडणुकीचे वातावरण आहे. मोदी हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलें. मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली. इतर पक्षाला दिलेले मत भाजपला जाते, हे गंभीर नाही. भाजपला दिलेले मत संघाला जाते, हे गंभीर आहे. बहुमत मिळणार नव्हते म्हणून युद्धज्वर तयार करण्यात आला. संविधान पूर्व भारत त्यांना हवा आहे. आपण संविधानानंतरच्या भारताचा आग्रह धरला पाहिजे.डॉ. प्रकाश आंबेडकर हे संभ्रमाचे वातावरण तयार करुन भाजपला मदत करीत  आहेत. त्यापेक्षा भाजपला उघड सामील झालेले आठवले जास्त बरे.
घोषित आणीबाणी विरुद्ध  लढल्यानंतर ४२ वर्षांनी अघोषित आणीबाणी विरुध्द लढण्याची वेळ आली आहे. इथली लोकशाही जिवंत राहावी, विचारवंत जिवंत राहावेत, विचार जागृत राहावेत यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत राहण्याची गरज आहे. हे मतदार जागृती ध्येय यशस्वी केले पाहिजे.
भारतीय घटनेच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘मतदार जागृती परिषद ‘ आयोजित जाहीर सभेला प्रारंभ झाला.

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

0

कोल्हापूर-: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सीसीआय संघाने महाराष्ट्र अ संघाचा 30-26 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए-क्रीडा संकुल कोर्ट, कोल्हापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम साखळी फेरीच्या सामन्यात सीसीआय संघाने महाराष्ट्र अ संघाचा 30-26 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत सीसीआय संघाचा सामना हा पीवायसी अ संघाशी होणार आहे.

अन्य लढतीत एमसीए  संघाने महाराष्ट्र ब संघाचा 32-16 असा तर, महाराष्ट्र अ संघाने पीवायसी ब संघाचा 32-13 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एमसीए वि.वि.महाराष्ट्र ब 32-16(110अधिक गट: श्रीकांत पारेख/किरण कुलकर्णी वि.वि.गोविंद कुमार/करण सिंग 8-2; 90अधिक गट: सुनील लोणकर/नरेंद्र पवार वि.वि.राजेश नायर/ विमल राय 8-5; खुला गट: प्रवीण गायसमुद्रे/ मनीष सूर्यवंशी वि.वि.धर्मेंद्र शर्मा/आनंद मूर्थी 8-4; खुला गट: अभिजित मोहिते/डॉ सुनील बर्वे वि.वि.आकाश काळे/रोहन मानेक 8-5);

सीसीआय वि.वि.महाराष्ट्र अ  30-26(110अधिक गट: निखिल संपत/सागर इंजिनियर पराभूत वि.डॉ अतनूर/अली हुस्सेन 6-8; 90अधिक गट: किशन शहा/लव कोठारी वि.वि.विजय मेहेर/गोपाळ पांडे 8-6; खुला गट: इम्रान युसूफ/शंतनू इंजिनियर वि.वि.पृथ्वीराज इंगळे/श्रीकांत कुमावत 8-6);

महाराष्ट्र अ वि.वि.पीवायसी ब 32-13(110अधिक गट: डॉ अतनूर/अली हुस्सेन वि.वि.राजेंद्र कांगो/हनीफ मेमन 8-4; 90अधिक गट: विजय मेहेर/गोपाळ पांडे वि.वि.डॉ. अभय जमेनीस/वरून मागीकर 8-3; खुला गट: आदित्य राव/नरहर गर्गे वि.वि.अभिषेक सोमण/सारंग देवी 8-3; खुला गट: पृथ्वीराज इंगळे/श्रीकांत कुमावत वि.वि.ध्रुव मेड/मिहीर दिवेकर 8-3).

लोकसभा निवडणुकीला समोरे जाण्यासाठी काँग्रेसची तयारी….

पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस भवन
येथे पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या नियोजनाच्या तयारीसाठी बैठक बोलविण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या
प्रचारासाठी पक्षाच्या आदेशानुसार विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. पक्षाचा प्रचार सामान्य
जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विधानसभा निहाय प्रमुख व निरिक्षक नेमण्यात आले आहेत. विधानसभा
प्रमुख व निरिक्षकांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांच्याशी
संपर्क साधून ब्लॉक कमिटी व वॉर्ड कमिटीची बैठक घेऊन त्यांच्या बुथमधील माहिती घेऊन त्या ठिकाणी
प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे असे सांगितले.

गेली ५ वर्ष मोदी सरकारने जनतेला अच्छे दिनचे
स्वप्न दाखविले आणि २०१४ मध्ये जनतेला जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही. मोदी
सरकारचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे. नोटबंदीच्या चूकीच्या निर्णयामुळे व जी.एस.टी. ची
योग्य पध्दतीने अंमलबजावणी न केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा त्रास झालेला आहे. शेतकरी,
शेतमजूर, कष्टकरी कामगार हवालदिल झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला टेकल्यामुळे
सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. जनतेच्या या प्रश्नाकडे मोदी सरकारने जाणून बुजून पाठ
फिरविली आहे आणि खोटे बोला पण रेटून बोला ही ग्लोबल नीती मोदी सरकार राबवित आहे. पक्षाच्या
जाहिरनाम्यामार्फत, जाहिर सभा व सोशल मिडियामार्फत काँग्रेस पक्षाने केलेला विकास आणि सत्तेवर
आल्यावर देशाचे विकास कसे करणार हे मतदारापर्यंत पोहचविणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी
व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेला उमेदवारासाठी रात्रंदिवस एक करून निवडून आणण्याचा निर्धार करूया.’’
यानंतर डॉ. रत्नाकार महाजन व उल्हासदादा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, कमल व्‍यवहारे, अरविंद शिंदे, आबा बागुल,
नीता रजपूत, रशिद शेख, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, अविनाश बागवे, मनिष आनंद,
लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, भुषण रानभरे, शिवाजी केदारी,
दत्तात्रय गायकवाड, डॉ. सतिश देसाई, दत्ता बहिरट, काका धर्मावत, शिवाजी बांगर, सचिन आडेकर,
सुनिल घाडगे, विजय खळदकर, प्रविण करपे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रमेश सकट, विठ्ठल थोरात,
भगवान धुमाळ, ॲड. निलेश बोराटे आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

भारताच्या पुनर्निर्माणासाठी संघटीत सेवाभाव महत्वाचा—मीनाताई कानडे

0

पुणे-सेवाभाव हा प्रत्येक माणसाचा स्थायीभाव आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने
समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या मर्यादेने संघटीतपणे सेवा केली आणि माझ्या आत्म्याचे समाधान ही
भावना त्यामध्ये ठेवली तर वैभवशाली भारताचे पुनर्निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास
राष्ट्रसेविका समितीच्या पुणे कार्यवाह मीनाताई कानडे यांनी व्यक्त केला.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्ति ही संस्था देशात कार्यरत आहे.
दिनांक २२ मार्च या राष्ट्रीय शक्ति स्थापना दिनानिमित्त शारदा शक्ति या पुणे शाखेतर्फे रविवार दि. २४ मार्च
रोजी सामाजिक योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या सविता कुलकर्णी यांना शक्ति प्रेरणा पुरस्कार
आणि युवा कर्तृत्वाबद्दल बदलापूरच्या रेश्मा राठोड या युवतीस आय शक्ति सपोर्ट या
पुरस्काराने मीनाताई कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. सातत्याने
सामाजिक काम करणारी महिला आणि परिस्थितीशी संघर्ष करीत यश मिळवणाऱ्या युवतीस दरवर्षी पुरस्कार
देऊन गौरविले जाते मानपत्र आणि भेटवस्तू, असे शक्ति प्रेरणा पुरस्काराचे तर प्रशस्तीपत्र, ५००० रुपये रोख
आणि भेटवस्तू असे आय शक्ति सपोर्ट; पुरस्काराचे स्वरूप होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून
महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्तिही संस्था देशात कार्यरत आहे. ‘शक्ति’च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.
लीना बावडेकर, शारदा शक्तिच्या अध्यक्षा डॉ. राजश्री कशाळकर या यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मीनाताई कानडे म्हणाल्या, साधू संतांनी आधी केले मग सांगितले. एकनाथांनी काशीची गंगा गाढवाला वाहून
त्याचे प्राण वाचवले. परंतु आज दुर्दैवाने समाजात जाती जातीमध्ये विघटन केले जात आहे. साधू संतांनी
आपली संस्कृती, मानवता टिकवली. आपण संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग, प्रवचने
ऐकतो परंतु त्यांच्या विचारांचा प्रसार करीत नाही. पारायणे करण्यापेक्षा चरित्रे वाचली पाहिजेत. चरित्र नुसते
वाचू नका तर त्यातून बोध घेऊन काहीतरी सेवाभाव अंगीकारा. ज्याठिकाणी गुरांना पाणी नाही त्याठिकाणी
संघटीत सेवेच्या माध्यमातून चारा छावण्या उभारणे, पाणी देऊ शकत नसेल तर त्यासाठी आर्थिक मदत करणे
अशा विविध माध्यमातून आपण सेवा देऊ शकतो. सेवा हा दोन अक्षरी शब्द आहे परंतु त्याची व्याप्ती मोठी आहे
असे त्या म्हणाल्या. आपण काम करतो ते करून दुसऱ्याला मदत करावी. हे करताना माझेच काम मोठे हा
अहंकार त्यामध्ये नसावा किंवा न्यूनगंडही असू नये असे सांगून मीनाताई म्हणाल्या, माझ्या आत्म्याचे समाधान
हीच खरी सेवा आहे या भावनेतून प्रत्येकाने काम केले तर वैभवशाली भारताचे पुनर्निर्माण हे लक्ष्य साध्य
झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. लीना बावडेकर म्हणाल्या, जे जे शर्यतीत धावत असतात त्यांना नेहेमी भीती वाटत असते. मागून
येणाऱ्याला पुढे जाऊ द्यायचे नाही म्हणजे एकतर त्याच्यामध्ये अडथळा आणला पाहिजे अथवा आपली लेन
बदलली पाहिजे अशी वृत्ती समाजात सध्या पाहायला मिळते. मात्र आजच्या पुरस्कारार्थी हे कोणत्याही स्पर्धेत
नाहीत. त्यांची स्पर्धा हे त्यांच्या स्वत:शीच आहे. आपले काम करत त्यांच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी ते
समर्पित भावनेने काम करतात. प्रत्येक महिलेमध्ये प्रचंड शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग मीनाताईंनी
सांगितल्याप्रमाणे संघटीत सेवा कार्यासाठी होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.
सौ. साविताताई कुलकर्णी म्हणाल्या, हा पुरस्कार माझा एकटीचा नसून माझ्या संपूर्ण टीमचा सन्मान आहे.
टीमवर्कमुळेच माझ्या व्यक्तिमत्वामधील ज्या मर्यादा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या. सेवाकार्य करताना ज्या

समाजात काम करतो त्याच्या शेवटपर्यंत पोहचावे या भावनेतून काम केले. सेवा घेतो तो कमी व सेवा देतो
म्हणून तो उच्च अशी भावना कधीच असू नये असे सांगून त्या म्हणाल्या, उच्च नीचतेची भावना समाजातून
काढून टाकण्याचे काम आमची संस्था करते.
रेश्मा राठोड म्हणाली, माझे आई-वडील,इतर कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक यांच्यामुळे खो-खो या खेळामध्ये मी
प्राविण्य मिळवू शकले.
रेश्माचे प्रशिक्षक श्री म्हसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजश्री कशाळकर यांनी, सूत्रसंचालन स्वाती जोगळेकर यांनी तर आभार सीमंतिनी
वझे यांनी मानले.

दहा लाखाच्या खंडणीसाठी चिमुरड्याचे अपहरण, पोलिसांनी ११ तासात केली सुखरूप सुटका

0

पुणे-दहा लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या दोन वर्षीय चिमुरड्याची पुणे पोलिसांनी ११ तासात सुखरूप सुटका केली. पुण्यातील वडाची वाडी येथून या चिमुरड्याचे अपहरण झाले होते.
पुष्कराज धनवडे असं या चिमुरड्याचे नाव आहे. अपहरण करणारे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कराज हा वडाची वाडी येथील घराच्या आवारात खेळत असताना तो अचानक गायब झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनीही शोधाशोध सुरू केली. परंतु रात्री दीडपर्यंत काहीही मागमूस लागला नाही. पुष्कराज राहत असलेल्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिराच्या आवारात एका बिस्कीट पुड्याखाली एक चिट्ठी आढळली. या चिट्ठीत एक मोबाईल नंबर होता. या मोबाईल नंबरवर पुष्कराजच्या काकांनी फोन केला असता समोरून पुष्कराजचे अपहरण केल्याचे सांगित आणि उद्या सकाळी १० लाखाची खंडणी घेऊन नाशिकला या असे सांगितले.

त्यानंतर पोलीसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी उंद्री परिसरातच असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी संपूर्ण उंद्री परिसर पिंजून काढला. शनिवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर पुष्कराज पोलिसांना आढळला. मात्र अपहरणकर्ते त्या ठिकाणी नव्हते. अशाप्रकारे पुणे पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पुष्कराजची सुखरूप सुटका केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चव्हाण नाटयगृहात विंग पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

पुणे-सांस्कृतिक पुण्यातील सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या कोथरुड मधील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विंग पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रंगमंच सहाय्यक विजय महाडीक असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय महाडीक हे पुण्यातील धनकवडीत रहात होते. ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे कर्मचारी होते. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ते स्टेज रिकामं करण्याचं काम करत होते. त्याचवेळी हा अपघात घडला.

स्टेज रिकामं करण्यासाठी महाडिकांनी विंग हलवली. त्यावेळी एक लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात पडला. डोक्यात रॉड पडल्यानं महाडिकांना गंभीर दुखापत झाली. यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात आज सकाळी हॅम्लेट नाटकाचा प्रयोग होता. त्याचमुळे ते रंगमंच रिकामा करत होते. रात्री ही घटना घडल्याने पुण्यात हळहळ व्यक्त होते आहे. डायनोसॉर ची मोठी प्रतिकृति कोथरुड मध्ये उभारू पहाणाऱ्या लोकप्रतिनिधिने या थिएटर कड़े सातत्याने दुर्लक्ष केले , या थिएटर च्या दुरावस्थेबाबत  एका अभिनेत्रीने सुमारे दीड वर्षापूर्वी फेसबुक वरुन आवाज उठविला होता तो महापालिकेच्या मुख्य इमारतीत देखील घुमला होता .त्यानंतर ही अशी दुर्घटना घडावी हे दुर्दैव आहे.

विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारला मत द्यावे – बापट

0
पुणे :- विकासाला प्राधान्य देत भाजप सरकारने  कायमच लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले. यामुळेच यावर्षीदेखील भाजपाला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
पुणे शहर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून गिरीश बापट यांची निवड झाल्यानंतर सर्वात आधी बापट यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर पक्षाच्या शहर कार्यालयात खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पक्षनेते श्रीनाथ भिमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, यांच्यासह शिवसेना, भाजप आरपीआय व शिवसंग्राम संघटनेच्या अनेक कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. पक्ष कार्यालयात शहर अध्यक्ष तसेच सहयोगी पक्षाची बैठक घेऊन प्रचारा संबंधी रणनीती तयार केली.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, केसरी वाड्यातील लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बापट यांनी प्रचाराची सुरुवात केली.

भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचं राजकारण- अशोक चव्हाण

0

मुंबई-. भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचं राजकारण केलं जात असून या राजकारणाला काही  बळी पडत आहेत, अशी तोफ आज येथील महा आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डागली. राज्य आणि केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर कसं अपयशी ठरलं आहे, याचा पाढा वाचताना युतीचे मंत्री जुमलेबाज आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. यावेळी अजित पवार यांनीही युतीवर निशाणा साधताना युतीचे २५ टक्के उमेदवार आयात असल्याचे सांगितले. युतीचा पराभव करायचा असेल तर मतभेद विसरून आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना आरएसएसच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे मनुवादी सरकार हद्दपार करण्यासाठी आपण महाआघाडीत आलो असल्याचे सांगितले. आम्ही दोन जागांची अपेक्षा केली होती. मात्र, या जागा मिळाल्या नसल्या तरी व्यापक हितासाठी आम्ही महाआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला, असेही कवाडे पुढे म्हणाले. यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार प्रहार करताना ‘कमळाचं बीज समूळ नष्ट करायला हवं’, असं सांगितलं.
कॉंग्रेस  २४ जागांवर तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे. महाआघाडीच्या जागावाटपावर यामुळे आता शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी ही घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्या जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिक पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट हे सगळे पक्ष महाआघाडीत सहभागी झाले आहेत.

केंद्रीय मधुमक्षिका संशोधन  केंद्रात प्रशिक्षण 

0
पुणे :खादी  ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण  केंद्र(पुणे ) येथे  कृषी विभागाच्या ‘आत्मा ‘ प्रकल्प कार्यक्रमांतर्गत अंदमान -निकोबार ,ओरिसा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच  १८ ते २२ मार्च दरम्यान पार पडला . मधुमक्षिका पालनातील नवे तंत्र ,राणीमाशीची  कृत्रिम निर्मिती ,रोग ,नियंत्रण ,अधिकाधिक मध उत्पादन याची माहिती देण्यात आली .साधना सरपोतदार ,नवनाथ शितोळे ,संतोष मनोहर ,किशोर मराठे ,ओंकार पुजारी ,सागर कुदळे सहभागी झाले .  कृषी विभागाचे श्री . उसुफ यांनी मार्गदर्शन केले . संशोधन केंद्राचे सहसंचालक सुनील पोकरे ,हेमराजसिंह मुवेल ,यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली .
आर जी बोबडे ,एन आर भिलारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले . प्रशिक्षणार्थीना मधमाशा वसाहती आणि सामग्री केंद्रातर्फे देण्यात आली

तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत अमनोरा द फर्न क्लब संघाचा सनसनाटी विजय

0

 पुणे-पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत  पांडुरंगा, विजय निचाणी, दिलीप कुमार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर अमनोरा द फर्न क्लब संघाने द बॉल हॉग्ज  संघाचा 3-0 पराभव करून आजचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ग गटात अमनोरा द फर्न क्लब संघाने द बॉल हॉग्ज संघाचा पराभव करून त्यांची विजयी मालिका खंडित केली. सामन्यात पांडुरंगा याने आदित्य अगरवालचा 32-15, 69-27, 33-35, 81-36 असा सहज पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात भारताचा मानांकित खेळाडू असलेल्या विजय निचाणी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत लौकिक पठारेचा 12-45, 65-58, 37-21, 54-37 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात दिलीप कुमार याने रोहन साकळकरला 38-26, 69-32, 27-57, 53-28 असे पराभूत करून संघाला 3-0असा एकतर्फी विजय मिळवून दिला.

फ गटात दिग्विजय कडीअन, ब्रिजेश दमानी, अनुज उप्पल यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन संघाने प्राधिकरण युथ फोरमचा 3-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली.इ गटात कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने केएसबीए 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ- पीवायसी वॅरियर्स वि.वि क्यु मास्टर्स 3-0(योगेश लोहिया वि.वि तुषार सवदी 23-36, 61-15,31-02,79-16; आदित्य देशपांडे वि.वि अभिषेक श्रीवास्तव 57-01, 66-65,56-14; राजवर्धन जोशी वि.वि आर्यन राजहंस 21-41,78-23,38-33,56-64,36-06)

गट ई- कॉर्नर पॉकेट वॅरियर्स वि.वि डेक्कन रायनोज् 3-0(शिवम अरोरा वि.वि संतोष धर्माधिकारी 48-14,50-16,31-17; संदिप गुलाटी वि.वि प्रशांत पवार 42-12,69-07,43-16; शोएब खान वि.वि विठ्ठल ढमाळे 40-09,46-58,47-12,50-27)

गट ग: अमनोरा द फर्न क्लब वि.वि.द बॉल हॉग्ज 3-0(पांडुरंगा वि.वि.आदित्य अगरवाल 32-15, 69-27, 33-35, 81-36; विजय निचाणी वि.वि.लौकिक पठारे 12-45, 65-58, 37-21, 54-37; दिलीप कुमार वि.वि.रोहन साकळकर 38-26, 69-32, 27-57, 53-28);

गट ग: बीएसएसए मास्टर्स वि.वि.पूना क्लब अ 3-0(रोविन डिसुझा वि.वि.राजीव खांडके 44-03, 56-23, 62-02; अभिमन्यू गांधी वि.वि.पंकज परमार 38-00, 80-04, 47-00; आनंद रघुवंशी वि.वि.कुणाल वासवानी 15-36, 37-62, 38-01, 75-49, 38-12);

गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.केव्हीडी 2-1(मुकुंद भराडिया पुढे चाल वि.अभिनय एडके; राहुल सचदेव वि.वि.जयेश साळवी 38-11, 33-57, 43-07, 54-82, 39-13; हसन बदामी पराभूत वि.गौरव जयसिंघानी 35-22, 40-67, 42-04, 06-51, 15-40);

गट फ: पांडे डिझाईन वि.वि.प्राधिकरण युथ फोरम 3-0(दिग्विजय केडीअन वि.वि.अमित अगरवाल 21-30, 51-42, 33-05, 82-09; ब्रिजेश दमानी वि.वि.अंकुश प्रसाद 43-00, 60-06, 52-00; अनुज उप्पल वि.वि.बिपीन संकपाळ 40-09, 93(93)-00, 35-22);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0(अशोक शांडिल्या वि.वि.मनोज गाडगीळ 46-16, 70-25, 37-02; लौकिक पठारे वि.वि.चैतन्य हळबे 28-18, 21-57, 35-42, 68-41, 49-00; आदित्य ए वि.वि.सचिन बिचे
58-00, 70-10, 40-12);

गट इ: कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.केएसबीए 2-१(संदीप गुलाटी पराभूत वि.एम योगेश कुमार 14-35, 00-73, 00-32; शोएब खान वि.वि.एम.एस.अरुण 18-43, 67-14, 31-22, 53-22; शिवम अरोरा वि.वि.दक्ष रेड्डी 37-10, 80-42, 24-09);

सर्व महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना’बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे’ हे पुस्तक भेट

0
पुणे-भा.ज.पा विद्यार्थी आघाडी,पुणे शहर तर्फे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा कार्यअहवाल असलेले
‘बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
या वेळी विद्यार्थी आघाडीचे पुणे शहर संपर्क प्रमुख प्रतीक नितीन गुजराथी यांच्यासह धवल देशमुख , शशांक सुर्वे , यश ओव्हाळ , सिद्धार्थ भावकर , प्रसाद गाडे , तेजस मारणे , प्रज्वल बलुतकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर देशाचा आणि राज्याचा आमूलाग्र विकास होत आहे. राज्याचा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्यात आणि पुणे जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडवण्याचा या साडेचार वर्षात प्रामाणिक प्रयत्न केला. ‘बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे ‘ या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. या पुस्तकाचे संपादन माजी पत्रकार व कंटेन्ट कन्सेप्ट कम्युनिकेशन चे संचालक सुनील माने यांनी केले आहे.
प्रतीक गुजराथी म्हणाले, पुणे शहर विद्यार्थी आघाडी कायम बापट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आली आहे व आता लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायच्या प्रयत्न करणार आहे . आज पर्यंत विद्यार्थी आघाडी तर्फे नवीन मतदार नोंदणी असेल कनेक्ट कॉलेज असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असेल असे अनेक कार्यक्रम विद्यार्थी आघाडीने केले आहेत .भा.ज.पा. विद्यार्थी आघाडी कायम विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मागे उभी आहे व येणार्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार जास्तीत जास्त मताधिकाने निवडून आणायच्या दृष्टीनेच असणार आहे.

आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितित शिवजयंती सोहळा संपन्न

0
जुन्नर /आनंद कांबळे
 तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतियेस साजरा होणारा शिवजयंती सोहळा २३ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितित साजरा करण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या समवेत खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल, अनिल देसाई,  आमदार शरद सोनवणे यांनी किल्ले शिवनेरीवर छत्रपति शिवरायांना अभिवादन केले.
      युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी  सकल जनांचे आराध्य दैवत छत्रपति शिवरायांना वंदन  करन लोकसभा निवडणुकांसाठी आशीर्वाद घेण्यासाठी शिवजन्मस्थळी आल्याचे  मोजक्या शब्दात सांगितले.
      शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा समन्वयक संभाजी  तांबे,  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत गाडे , गुलाब पारखे, तालुका प्रमुख माऊली  खंडागळे, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान घोलप, नगराध्यक्ष शाम  पांडे, नगरसेवक समीर भगत, दीपेश परदेशी, अविनाश करडिले, नगरसेविका सुवर्ण बनकर, अंकिता  गोसावी, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर  पांडुरंग काजळे, शहरप्रमुख शिवा खत्री, भाजपा शहराध्यक्ष नंदू  तांबोळी, हेमंत मावळे, गडसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजमगुंडे, शिवव्याख्याते पराग  ठाकुर,  शिवसेना, भा. ज. पा. चे तालुका व जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.
  शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर  पांडुरंग काजळे यांनी दिली.
गुरुवार दि.२१ रोजी सायंकाळी  शिवजन्मस्थानी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने दिपोत्सवाचे  तसेच दि. २२ रोजी गडप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते.आश्रमशाळेच्या विद्यार्थि यांनी बजने सादर केली. आज सकाळी शिवजयंतीदिनी सकाळी ७ वाजता सौ. श्रीजा व श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते शिवाई देवीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छबिना पालखी मिरवणुक वाजत गाजत शिवाई देवी मंदिरापासून  शिवजन्मस्थळापर्यंत काढण्यात आली .शिवजन्म स्थानी पारंपरिक पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ध्वजारोहण व पोवाड्यांचा  कार्यक्रम  झाला.तसेच जाहिर धर्मसभा व ह. भ. प. डॉ.मोहिनी विठ्ठल पाबळे यांना यावर्षाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१२ वाजता पायथ्याशी  महाप्रसादाचे आयोजन केले  होते.

निवडणुकीच्या काळात ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित झाल्यास खळ्ळ-खट्यॅक: मनसे

0

मुंबई -विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असे पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ-खट्यॅक करावं लागेल, असा इशाराच संघटनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉयने प्रमुख भूमिका साकारली आहे. निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस व डीएमकेने केली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. शालिनी ठाकरे म्हणतात, गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी-भाजपाने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ या दोन सिनेमांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. या घटनेला एक वर्ष उलटत नाही तोच आणखी एक मोठा ‘पराक्रम’ भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे. समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सिनेमातील गाणी ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचं जाहीर करण्यात आलं. सिनेमाच्या अधिकृत पोस्टरवर तसा त्यांचा नामोल्लेख करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, जावेद अख्तर आणि समीर या दोघांनीही या सिनेमासाठी गीतलेखन केलेलं नाही. तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, याकडे शालिनी ठाकरेंनी लक्ष वेधले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील या चित्रपटावर आक्षेप घेतला.

संजय काकडे यांची महत्त्वाची भूमिका-गिरीश बापट(व्हिडीओ)

0

पुणे-संजय काकडे यांची भूमिका महत्त्वाची (क्रीम रोल )असणार आहे आणि अनिल शिरोळे हे नाराज नाहीत असे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रीय राजकारणात जातो आहे. पुणे लोकसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र पक्षाने मला संधी दिली असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदार दिली जाणार आहे. त्या प्रश्नावर बापट म्हणाले की, संजय काकडे हे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक असून त्यांची महत्त्वाची भूमिका असेल असेल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, पुणे शहराच्या राजकारणात मागील ४० वर्षापासुन असून शहरातील प्रत्येक घटकांसोबत चांगला संपर्क आहे. तर आता लोकसभेसाठी नावाची घोषणा झाल्याने प्रत्येक भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. त्याच बरोबर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी देखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार अनिल शिरोळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली. त्यानंतर गिरीश बापट यांना भेटण्यासाठी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. त्याच दरम्यान विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी गिरीश बापट यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या