विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर हवा -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
राहुल गांधीकडून मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली: ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी DRDOचे अभिनंदन केले आहे. तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे पण सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या सोशल मिडियावर राहुल गांधी यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.
पंतप्रधान मोदी हे जाहिरातबाजी करण्यात कायम पुढे असतात असा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत असतो. तोच रोख ठेवत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर ही खोचक टीका केली आहे. आज जागतिक रंगभूमी दिन आहे. पंतप्रधान हे सारखंच काहीतरी ड्रामेबाजी करत असतात असा संदेश तर राहुल गांधी यांना या ट्विटमधून द्यायचा नाही ना? अशी चर्चा सध्या सोशल मिडियावर होताना दिसत आहे.
दरम्यान, भारताने आज आपले नाव अंतराळात मोठे नाव केले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच आतापर्यंत ही कामगिरी करता आली आहे. भारत हा चौथा देश आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा गर्वाचा क्षण आहे. एलईओ या उपग्रहाला आपल्या शास्त्रज्ञांनी ऩष्ट केले आहे. फक्त तीन मिनिटांत शास्त्रज्ञांनी ही कामगिरी केली आहे, याबाबत राहुल गांधी यांनी DRDO चे अभिनंदन केले आहे.
‘आयसीएआय’तर्फे मोफत ‘सीए करिअर कौन्सिलिंग’
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘मेगा सीए करिअर काउंसलिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. ३० मार्च २०१९) सकाळी १० ते १ या वेळेत काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना पुणे येथे हे मार्गदर्शन शिबीर होणारआहे. दहावी, अकरावी, बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच पालकांसाठी हे करिअर कौन्सिलिंग महत्वपूर्ण ठरणार आहे. हे करिअर मार्गदर्शन शिबीर सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थरार पाहायला मला फार आवडतं – सुयश टिळक
झी युवा वाहिनीवर ‘एक घर मंतरलेलं’ ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सुरुची अडारकर गार्गी महाजन ह्या पत्रकाराची भूमिका निभावत आहे. आता यामालिकेत सुयश टिळकची एंट्री झाली आहे . सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. सुयश सोबत या मालिकेबद्दल आणि त्यातील त्याच्याव्यक्तिरेखेबद्दल साधलेला हा खास संवाद
१. ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय वाटतं?
– एक घर मंतरलेलं या मालिकेत मी साकारत असलेला क्षितिज निंबाळकर, हा एक अत्यंत शिस्तप्रिय व व्यावहारिक माणूस आहे. तो एक रिअल इस्टेट एजंट आहे. दुर्मिळ वस्तू गोळा करायचा त्यालाछंद जडलेला आहे. दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करून, त्यांचा इतिहास जाणून घेण्याची क्षितिजला आवड आहे.
२. ही भूमिका स्वीकारावी असं तुला नेमकं का वाटलं?
– ‘झी युवा’ वाहिनी आणि आयरिस प्रोडक्शन यांच्याविषयी मुळातच मला एक आपुलकी आहे. शिवाय, क्षितिजचं पात्र, मला फारच आवडलं. क्षितिजचा स्वभाव, त्याचं वागणंबोलणं या गोष्टी व माझ्यास्वतःच्या सवयी बऱ्याचशा मिळत्याजुळत्या आहेत. ‘एक घर मंतरलेलं’ मधील ही भूमिका स्विकारण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण होतं.
३. सुरुची अडारकर सोबत तू पुन्हा एकदा काम करत आहेस. तुम्हा दोघांच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयी काय सांगशील?
– गेल्या अनेक वर्षांपासून आमची छान मैत्री आहे. त्यामुळेच, ऑनस्क्रीन काम करणं फार सोपं जातं. याआधी दोनवेळा एकत्र काम करत असतांना, जसं सगळ्यांचं प्रेम मिळालं, तसंच याहीवेळी मिळेलयाची खात्री वाटते. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, ‘झी युवा’वरील ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिकादेखील आम्ही यशस्वी करू पाच वर्षांनंतर सुरुचीसोबत पुन्हा काम करायला मिळत असल्याचा आनंद आहेच.
४. ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिका, रोमांचक आणि थरारपूर्ण अशी आहे. अशा प्रकारच्या मालिकेत काम करत असताना कसं वाटतं?
– मालिका आणि चित्रपटांतील थरार पाहायला मला फार आवडतं. त्यामुळे, अशा धाटणीचं काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मनासारखी भूमिका करत असल्याने खूप मजा येतेय. ही मालिकाअधिकाधिक रंजक व्हावी यासाठी दिग्दर्शक अमोल पाठारे व संपूर्ण टीम अतिशय मेहनत घेत आहे. त्यामुळेच काम करण्याचा आनंद अधिक आहे.
५. या निराळ्या भूमिकेविषयी तुझ्या चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत?
इतर भूमिकांप्रमाणेच माझी ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे. आठवड्याभराच्या कालावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली, याचा आनंद आहे. चाहत्यांकडून मिळणारं प्रेम, ही आमच्या पोचपावती ठरते. पुढे काय होणार याविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता, त्यांना पडणारे प्रश्न यातून आम्हाला ती पोचपावती मिळाली. सगळ्यांना मी एवढंच सांगेन, की मालिकेतील थरार आणि रहस्य जाणूनघेण्यासाठी, सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता, ‘झी युवा’वर ‘एक घर मंतरलेलं’ ही मालिका पाहायला विसरू नका.
सुप्रिया सुळे एक लाख मताधिक्याने पराभूत होतील -महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांना विश्वास
पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागा महायुती जिंकणार–गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत-
पुणे, दि. 27 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला निश्चितपणे हादरा बसेल अशी परिस्थिती सध्या अाहे, असे सांगून महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख खासदार संजय काकडे यांनी बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.
महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला सुमारे 4 लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता तर, आघाडीच्या सभेला अल्पसा प्रतिसाद होता. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा मैदानावर व्हायच्या. शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे झालेली प्रचाराच्या शुभारंभाची सभा एका चौकात घ्यावी लागली. यावरुनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनाधार संपला असून भाजप-शिवसेना महायुतीला मोठा जनाधार प्राप्त झाल्याचे दिसून येते. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आमची ताकद आणखी वाढत आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत महायुतीचे चित्र आणखी चांगले झालेले दिसेल आणि यातूनच विजयाची खात्री येते.
बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदार संघातून भाजपला आघाडी मिळेल व किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे आणि त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार आहे. भाजपचे उमेदवार गिरीश बापट आज सकाळी भेटीसाठी आले होते. प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून प्रचारात मी असणार आहे, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत. इच्छुक अनेकजण असतात मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचं काम करायचं असतं. हा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे मी पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे खासदार संजय काकडे म्हणाले.
कोकण किनाऱ्यावर कोळथरे (दापोली ) येथे १ एप्रिल पासून ‘कासव जलार्पण ‘ सोहळा !
कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन देणार – उप आयुक्त दिपक पुजारी
म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे निवेदन
भाईंदर. (प्रतिनिधी) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन दिले जाईल अशी ग्वाही उप आयुक्त दिपक पुजारी यांनी म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांना दिली आहे. यावेळी मुलाणी यांनी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर यांना व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान आयुक्तांनी पत्र वर्ग केले असता अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा कारावाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन परिपत्रकाचे कटाक्षाने पालन करावे असे नमूद करत कार्यालयीन परिपत्रक उपायुक्त मुख्यालय, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, आस्थापना विभाग सहित सर्व विभाग सूचना दिल्या आहेत.
म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन आदा करावयाच्या देयकांची कार्यपद्धती विहित करण्याबाबत राज्य शासनाने दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन परिपत्रक जारी केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 01) मूळ वेतन, 02) विशेष/ महागाई भत्ता, 03) घरभाडे भत्ता, 04) इतर भत्ते, 05) भविष्य निर्वाह निधी (P.F.), 06) राज्य कामगार विमा योजना (ESIS) / कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), 07) व्यावसायिक कर (P.T.), 08) बोनस, 09) कामगार कल्याण निधी, 10) सुट्यांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा करण्यात यावे असे नमूद आहे. त्यानुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य शासने जारी केलेले शासन परिपत्रक लागू करण्याची लेखी मागणी मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगांवकर व उप आयुक्त मुख्यालय दिपक पुजारी यांना केली असता पुजारी म्हणाले की, आज समाजात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षित होत आहे. परंतु, नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मिळेल तेथे तरुण वर्ग काम करत आहे. कंत्राटी कर्मचारी हा महानगरपालिकेच्या भरपूर उपयोगी येत आहे. कंत्राटी कर्मचारी हा उत्तम काम करत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकाप्रमाणे वेतन प्राप्तीची हमी दिली जाईल, असे पुजारी म्हणाले.
काकडे हाऊसवर गिरीश बापट ..( पुणेरी राजकारण )
पहिल्याच प्रचार सभेत ‘क्रीम रोल’ ..ची अनुभूती ?
पुणे जिल्हयाच्या 4 लोकसभा मतदार संघाचे ईव्हीएम /व्हीव्हीपॅट मशीनची प्रथम सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण
पुणे- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तथाजिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी ईव्हीएम / व्हीव्हीपॅट मशीनचे प्रथम यादृच्छिकीकरण (सरमिसळ) प्रक्रिया दिनांक 26 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, ईव्हीएम नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख यांचीही उपस्थिती होती.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी एकूण 1238 मतदान केंद्रासाठी बॅलेट युनिट (बीयु) 1486, कंट्रोल युनिट (सीयु) 1486, वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रेल (व्हीव्हीपॅट) 1659 तसेच पुणे मतदार संघाच्या 1997 मतदान केंद्रासाठी बीयु 2396, सीयु 2396 व्हीव्हीपॅट 2676 आणि बारामती मतदार संघाच्या 2372 मतदान केंद्रासाठी बीयु 2846, सीयु 2846, व्हीव्हीपॅट 3178 व शिरुर मतदार संघाच्या 2296 मतदान केंद्रासाठी बीयु 2755, सीयु 2755 व्हीव्हीपॅट 3077 असे एकूण 7903 मतदान केंद्रासाठी बीयु 9484, सीयु 9484 व्हीव्हीपॅट 10 हजार 590 एवढ्या मशीन त्या त्या मतदार संघाच्या एकूण मतदान केंद्राच्या बीयु 120 टक्के, सीयु 120 टक्के, व्हीव्हीपॅट 134 टक्के या प्रमाणात उपलब्ध प्रथम स्तरीय चाचणीत सुव्यवस्थीत असलेल्या मशीनचे यादृच्छिकीकरण/ सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या मशीन संबंधित लोकसभा मतदार संघाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनच्या समोर उभारलेल्या मंडपामध्ये 21 मतदार संघाचे स्वतंत्र कंपार्टमेंट मधून करण्यात आली.
जिल्हा नियंत्रण कक्ष
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेच्या निवडणूक विषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर 24 X 7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीची सदर नियत्रंण कक्षामध्ये नोंद घेण्यात येणार असून विविध पथकामार्फत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जनतेला संपर्क करण्यासाठी पुढीलप्रमाणे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 020 – 26121281, 26121291, 26121231, 26121271असे हे क्रमांक असून जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट मतदार
आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1 लक्ष 47 हजार 739 इतक्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये साधारणपणे वरील प्रमाणे मतदानाची वाढ होणार आहे. पुणे व बारामती या लोकसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणीसाठी मुदत संपलेली आहे तर मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील जनतेला दिनांक 30 मार्च 2019 पर्यत नोंदणी करता येईल, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी कळविले आहे.
निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी खर्चाची दर सूची जाहीर
लोकसभा निवडणूक 2019 करिता निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी विविध वस्तूंच्या खर्चाचा दर (रेट लिस्ट) निश्चित करण्यात आलेली असून ही यादी निश्चित करताना मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या सूचना विचारात घेवून अंतिम करण्यात आलेली असून एक खिडकी योजनेच्या नोडल ऑफीसरमार्फत संबंधित उमेदवाराला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
बालेकिल्ल्यातच भाजपच्या पहिल्याच सभेला सुरुंग
पुणे-भाजपचा बालेकिल्ला समजणाऱ्या कोथरूड मध्येच भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पहिल्याच प्रचार सभेला सुरुंग लागल्याचे चित्र आज सायंकाळी दिसून आले.सर्वप्रथम उमेदवाराच्या नावाची घोषणा करून सर्वप्रथम प्रचार यंत्रणेचा प्रारंभ करून पहिल्याच सभेला आलेल्या अनुभवाने आता खरी भाजपची कसौटी लागू शकते असे म्हटले तर वावगे होणार नाही .
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या सभेचा प्रचाराचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथे फोडण्यात आला.या सभेतील भाषणे लांबली आणि कंटाळवाणी ठरली, त्यामुळे शिस्तबद्ध असा हवाला देणाऱ्या या पक्षाच्या प्रचार सभेस दीड तासाहून अधिक काळ नागरिक तग धरून बसू शकले नाही . काही नगरसेवकांनी आणलेली लोकं नगरसेवकांच्या फोटोचे फलक आणि भाजपचे झेंडे जागेवरच सोडून निघून गेले .
या सभेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. या सभेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षाच्या तब्बल सात नेत्यांची खूप वेळ चाललेल्या भाषणामुळे सभा ठिकाणी असलेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी प्रकाश जावडेकर यांच्या भाषणापूर्वी बाहेर पडणे पसंत केले. नागरिक बाहेर जाताना पाहून आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे तसेच भाजपचे शहरातील आमदार आणि पदाधिकारी सभेला उपस्थित होते.
पुण्यातील कोथरूड हा परिसर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो .आमदार येथे भाजपचेच आणि बहुसंख्य नगरसेवक हि भाजपचेच आहेत . पुण्यात 100 नगरसेवकांचे बाहू बल लाभलेल्या आणि पालकमंत्री हेच उमेदवार असलेल्या त्यांच्या पहिल्या सभेची हि अवस्था पाहून भाजपच्या कार्यकत्यांच्या डोक्यातील हवा निश्चित वेळेत निघून जाईल असे समीक्षकांना वाटते आहे.
राजा गोसावी यांच्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे-कै. राजा गोसावी प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजा गोसावी यांच्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आपल्या सहजसुंदर अभिनयाने मागील शतकातील अनेक दशके गाजविलेले मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते स्व. राजा गोसावी यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सायं. ५ वा. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे चित्रपट सृष्टीत केलेल्या योगदानाबद्दल यावर्षीचा पुरस्कार राजभाऊसारखे व्यक्तिमत्त्व आणि विनोदी भूमिका साकारणारे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना ज्येष्ठ सिने अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी साई संस्थान प्रति शिर्डीचे संस्थापक अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक माजी आमदार प्रकाश देवळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री लीला गांधी, दिलीप देशमुख, नवचैतन्य हस्यक्लबचे मकरंद टिल्लू, विठ्ठल काटे, सपना लालचंदनी, राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रसाद खंडागळे, विदुला गोसावी, दिलीप हांडे, जनाई गोसावी, शमा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ध्येयनिश्चितीच्या जोरावर यशशिखर गाठता येते -मृणाल जोशी यांचे मत
मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक- अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
पुणे- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असून स्वीप ( सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी तथा शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यासाठी स्वीप समिती स्थापन करण्यात आली असून विविध कार्यालयांच्या माध्यमातून मतदार जागृतीचे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वच विभागांनी राबविलेल्या उपक्रमांचे रमेश काळे यांनी कौतुक केले. प्रत्येक निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य असते. या निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित होऊ नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने खास प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून या कामी यश येईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी प्रत्येक कार्यालयाने स्वीप उपक्रमांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. लोकशाही पंधरवडा, जागतिक दिव्यांग दिन, जागतिक महिला दिन या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशाळा घेण्यात येऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बैठकीस उपजिल्हाधिकारी संतोष भोर, सहायक आयुक्त अण्णासाहेब बोदडे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, प्रवीण आष्टीकर आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, खार जिमखाना संघाचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बाद फेरीत द बॉल हॉग्ज, क्यू क्लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, कॉर्नर पॉकेट शूटर्स, बीएसएए मास्टर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत शाहबाज खान, आशिक मुदसेर यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर क्यू क्लब वॉरियर्स संघाने फायर बॉल्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब अ संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात पहिल्या लढतीत द बॉल हॉग्जच्या लौकिक पठारेला पूना क्लबच्या विग्नेश संघवीने 14-49, 66-29, 17-40, 16-69 असा पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्जच्या आदित्य अगरवाल याने दिनेश मेहतानीचा 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत द बॉल हॉग्जच्या रोहन साकळकरने पूना क्लबच्या सुरज राठीचा 35-22, 32-67, 33-24, 70-22 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत अक्षय कुमार, आयुश मित्तल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एलसीएसए संघाने ऑटो पॉट्स संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने क्यू मास्टर्स अ संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. विजयी संघाकडून संकेत मुथा व तहा खान यांनी सुरेख कामगिरी बजावली. चुरशीच्या झालेल्या लढतीत खार जिमखाना संघाने एसआरके मास्टर्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डाला कडवी झुंज देत एसआरकेच्या वाहीद खानने 22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35 असा विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीने एसआरकेच्या कृष्णराज अरकोटचा 46-16, 67-53, 50(42)-14 असा तीन फ्रेममध्ये सहज पराभव करून संघाचे आपल्या सामन्यातील आव्हान कायम राखले. तिसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या रिषभ ठक्कर याने एसआरकेच्या मोहम्मद सलमानचा 35-14, 10-62, 38-14, 75-42) असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.फायर बॉल्स 2-0(शाहबाज खान वि.वि.अमेय काळेकर 48-13, 80-35, 38-05; आशिक मुदसेर वि.वि.नितीन भोसले 44-16, 86(56)-22, 14-34, 63-17);
द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब अ 2-1( (लौकिक पठारे पराभूत वि.विग्नेश संघवी 14-49, 66-29, 17-40, 16-69; आदित्य अगरवाल वि.वि.दिनेश मेहतानी 29-17, 73-52, 26-32, 66-(55)87, 33-15; रोहन साकळकर वि.वि.सुरज राठी 35-22, 32-67, 33-24, 70-22);
एलसीएसए वि.वि.ऑटो पॉट्स 2-0(अक्षय कुमार वि.वि.लव बोरीचा 28-07, 54-09, 19-11; आयुश मित्तल वि.वि.सिद्देश मुळे 46-05, 64-69, 38-05, 62-55);
एमपी स्ट्रायकर्स वि.वि.कॉर्नर पॉकेट टायगर्स 2-0(केतन चावला वि.वि.माधव जोशी 44-06, 79(58)-16, 37-17; भरत सिसोडिया वि.वि.चिंतामणी जाधव 62(62)-00, 71-15, 39-07);
केएसबीए वि.वि.केव्हीडी स्कवाङ 2-0(दक्ष रेड्डी वि.वि.गौरव जयसिंघानी 40-28, 81(49)-42, 43-08; एमएस अरुण वि.वि.अभिनय एडके 01-34, 73-01, 07-39, 71-64, 39-01);
बीएसएए मास्टर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 2-0(रोविन डिसुझा वि.वि.अरुण बर्वे 33-09, 72-26, 30-10; अभिमन्यू गांधी वि.वि.रोहित नारगोलकर 51-01, 63-08, 49-00);
कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.क्यू मास्टर्स अ 2-0(संकेत मुथा वि.वि.आकाश पाडाळीकर 66-00, 72-42, 37-17; तहा खान वि.वि.समीर बिडवई 37-35, 75-05, 43-12);
खार जिमखाना वि.वि.एसआरके मास्टर्स 2-1(ईशप्रित चड्डा पराभूत वि.वाहीद खान 22-35, 61-42, 57-00, 03-59, 28-35; स्पर्श फेरवानी वि.वि.कृष्णराज अरकोट 46-16, 67-53, 50(42)-14; रिषभ ठक्कर वि.वि.मोहम्मद सलमान 35-14, 10-62, 38-14, 75-42).










