Home Blog Page 2961

बावनकशी व्‍यंगचित्रांचे धनी ज्ञानेश सोनार

0

 

व्‍यंगचित्रकला आणि चित्रकला क्षेत्रात आघाडीवर असलेलं नाव म्‍हणजे ज्ञानेश सोनार.  ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्‍या संस्‍थेच्‍यावतीने सोनार यांना शनिवार, दिनांक 13 एप्रिल रोजी नाशिक येथे जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येत आहे. दिवाळी अंकांतील जादूई खिडक्‍यांचे अनभिषिक्‍त सम्राट असलेल्‍या सोनारांनी मराठीतील लोकप्रिय दिवाळी अंकासह हिंदी,इंग्रजीतही आतापर्यंत 80 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत.

            ज्ञानेश सोनार यांचा जन्‍म 1 मार्च 1944 रोजी झाला. त्‍यांचे बालपण आणि शिक्षण नाशिक येथेच झाले. न्‍यू हायस्‍कूलमध्‍ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेतून मेकॅनिकल ड्राफ्टसमनचा अभ्‍यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ओझर येथे  मिग विमान बनवणा-या ‘हिंदुस्‍थान एरोनॉटीक्‍स’मध्‍ये अधिकारी म्‍हणून सोळा-सतरा वर्षे सेवा केली. दरम्‍यान, 1964-65 च्‍या सुमारास पुण्‍याच्‍या ‘स्‍वराज्‍य’मध्‍ये त्‍यांचे व्‍यंगचित्र छापून आले. त्‍यानंतर अधून-मधून वर्तमानपत्रे, नियतकालिके,विविध दिवाळी अंकांत त्‍यांची व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द होत होती. 1970च्‍या सुमारास त्‍यांनी मोठी झेप घेतली. मराठीतील नामवंत दिवाळी अंकात त्‍यांची व्‍यंगचित्रे झळकून रसिकांचे मनोरंजन करु लागली. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांचे विषयही नावीन्‍यपूर्ण असत. खिडकी चित्रे पहातांना अनेक वाचकांनी खळाळून हसण्‍याचा आनंद मिळवला आहे. लेखकांपेक्षा जास्‍त मानधन घेणा-या व्‍यंगचित्रकारांमध्‍ये ते आघाडीवर होते.    विनोदी व्‍यंगचित्रांप्रमाणेच त्‍यांनी सामाजिक आणि राजकीय व्‍यंगचित्रेही रेखाटली. समाजाच्‍या विविध क्षेत्रातील खोटारडेपणावर आपल्‍या ब्रशचे फटकारे मारलेत.

             मला आठवते, नांदगावला (रेल्‍वे स्‍टेशन) 1979 -80 च्‍या सुमारास असतांना आम्‍ही मध्‍य रेल्‍वेच्‍या लायब्ररीत आणि लोकमान्‍य वाचनालयात वाचायला जायचो. शालेय विद्यार्थी असल्‍याने ग्रंथपाल आवाज, जत्रा सारखे दिवाळी अंक वाचायला तर दूरच, पहायलाही देत नसे. अशावेळी ज्‍याच्‍या हातात हे अंक असतील त्‍याच्‍यामागे गुपचूप उभे राहून ज्ञानेश सोनार यांच्‍या जादूई खिडकी चित्रांचा आनंद चोरुन का होईना लुटायचो. महाविद्यालयात गेल्‍यानंतर वयोमानाप्रमाणे थोडी समज वाढली. व्‍यंगचित्रांतील मार्मिकता, मिश्किलपणा, बोचरेपणा कळायला लागला.  मी आणि माझा मित्र राजेंद्रकुमार भिमकर आम्‍हा दोघांना वाचनाची गोडी. दिवाळी अंक म्‍हणजे आनंदाची पर्वणीच असायची. त्यावेळी अंक घरी दिले जात नसत. ग्रंथालयात जाऊनच वाचावे लागायचे. ‘आवाज’,‘जत्रा’ आणि ‘मार्मिक’ या अंकाना वाचकांची अधिक मागणी असायची. अशावेळी ग्रंथालय उघडण्‍यापूर्वीच दारात जाऊन उभे रहायचे आणि आपला आवडता अंक घ्‍यायचा, ही आमची कार्यपध्‍दती. आवाज, जत्रामधील  ज्ञानेश सोनारांसह विविध व्‍यंगचित्रांवर आम्‍ही चर्चा करायचो. एखाद्या व्‍यंगचित्रातील विनोद कळला नाही तर थोडक्‍यात,विनोदबुध्‍दीचा वापर करावा लागला तर त्‍याला आम्‍ही ‘सस्‍पेन्‍स कार्टून’ म्‍हणायचो. ज्ञानेश सोनार यांच्‍या खिडकी चित्रातील दुस-या पानावर काय असेल, यावरही आम्‍ही आमच्‍या बुध्‍दीप्रमाणे विचार करायचो. पण अनेकदा आम्‍ही चुकायचो. दुसरे पान उघडले की त्‍यावरील गुपित पाहून हसून-हसून मुरकुंडी वळायची.‘चावट चित्रे’ काय पहातात रे, असा एखादा वयस्‍कर वाचक म्‍हणायचाही.. पण आम्‍ही त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करायचो. दुस-या वेळेस हाच वाचक याच व्‍यंगचित्रांना पाहून खुदूखुदू हसतांना दिसायचा, हा भाग वेगळा. ज्ञानेश सोनारांच्‍या हास्‍यचित्रांसाठी दर आठवड्याला ‘रविवारची  जत्रा’ची खास वाट पहायचो.  एवढंच नाही तर सोनारांसाठी आम्‍ही जुने दिवाळी अंक मिळवून वाचून काढले.

            माझे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक जिल्‍ह्यातील नांदगावलाच झाले. तेव्‍हा करमणुकीची साधने फार नव्‍हती. वाचन हे त्‍यातल्या त्‍यात स्‍वस्‍तातील साधन. रेडिओ ऐकण्‍यावर मर्यादा, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाण्‍यासाठी आर्थिक मर्यादा,टीव्‍ही अजून यायचा होता. त्‍यामुळे वाचनावरच अधिक भर. ज्ञानेश सोनार यांची दैनिक गांवकरीमधील  ‘आरसा’ ही दैनंदिन व्‍यंगचित्रे आणि ‘मोटूमामा’ ही मालिकाही मनोरंजक आणि मार्मिक विचार देऊन जायची. दिवाळी अंकातील व्‍यंगचित्रात जे सौंदर्य असायचे, तेच सौंदर्य दैनंदिन व्‍यंगचित्रातही दिसायचे. थोडक्‍यात, ज्ञानेश सोनार यांनी कलेबाबत कुठलीही तडजोड केलेली दिसत नव्हती. मी कामानिमित्‍त अनेकदा नाशिकला यायचो. व्‍यंगचित्रांचा चहाता म्‍हणून त्‍यांना भेटावेसे वाटायचे, पण हिंमत होत नव्‍हती. एवढा मोठा कलाकार भेटेन की नाही, ही शंकाही होतीच. पुढे मी 1989 ला औरंगाबादला गेल्यावर कामाच्‍या व्‍यापात प्रत्‍यक्ष भेट घ्‍यायची राहूनच गेली. पण विविध दिवाळी अंकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची व्‍यंगचित्रे पूर्वीप्रमाणेच हास्‍यानंद देत होती. पुढे 2009 मध्‍ये दिवाळी अंकाच्‍या संपादकांच्‍या संमेलनात पुण्‍याला भेट झाली. त्‍यांचा स्‍पष्‍टवक्‍तेपणा जाणवला. मनात एक आणि ओठावर दुसरे असं त्‍यांना जमतच नाही. दिवाळी अंकांचे संपादक आणि व्‍यंगचित्रांबाबतचे अनुभव त्‍यांनी कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले. ज्ञानेश सोनार यांच्‍याशी तेव्‍हापासून जो स्‍नेह जुळला तो आजतागायत कायम आहे.

            ज्ञानेश सोनार यांच्‍या वैवाहिक जीवनाला नुकतीच 51 वर्षे पूर्ण झाली. पत्‍नी सौ. अनुराधा, मुलगा डॉ. सुनील,स्‍नुषा सारिका, मुलगी अंजली, जावई दुर्गेश चित्‍ते आणि नातवंड असे आनंदी व समाधानी परिवार आणि जीवन लाभलेल्‍या ज्ञानेश सोनार यांनी चित्रकलेप्रमाणेच लेखन क्षेत्रातही उत्‍तुंग भरारी घेतली आहे. ‘चंदनदाह’, ‘फॅन्‍स्‍टॅटिका’, ‘ऑथेल्‍लोचा मृत्‍यू’ हे कथासंग्रह त्‍याचे उत्‍तम उदाहरण ठरावे. ‘चंदनदाह’मधील काही कथांवर तर चित्रपट निर्माण होऊ शकतो, इतक्‍या त्‍या सशक्‍त, दृश्‍यमान आणि अर्थपूर्ण आहेत. त्‍यांच्‍या कथासंग्रहातील भाषा त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांतील रेषांप्रमाणेच लालित्‍यपूर्ण,प्रवाही आणि वाचकांच्‍या मनाला गुदगुल्या करणारी आहे. त्‍यांची ‘मस्‍त हसा’, ‘चंदेरी हास्‍य’, ‘मोटूमामा’ ही व्‍यंगचित्रसंग्रह असलेली पुस्‍तके, ‘तेजस्‍वीनी’(बालकादंबरी संग्रह), इंग्रजीतील ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’, ‘पेंटीग्‍ज बाय ज्ञानेश सोनार’, ‘मामू द मडलर’ (कॉमिक बुक), ‘कार्टून वर्कशॉप’(लहान मुलांसाठी)  ही पुस्‍तके लोकप्रिय आहेत. ‘तिरक्‍या रेषा-हसरे बाण’ हा त्‍यांचा व्‍यंगचित्रांचा कार्यक्रम महाराष्‍ट्रातील असंख्‍य रसिकांना हास्‍यानुभव देऊन गेला.

            जी. ए. कुलकर्णी, पु.ल. देशपांडे,गो. नी. दांडेकर, पु.भा. भावे, जयवंत दळवी, व. पु. काळे हे त्‍यांचे आवडते लेखक तर कुसुमाग्रज, वा.रा. सोनार,उत्‍तम कोळगावकर हे आवडते कवी. व्‍यंगचित्रक्षेत्र गाजवल्‍यानंतर आज ते आनंदी जीवन जगत असले तरी शांत बसलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या मदतीने वास्‍तववादी चित्रे रेखाटून रसिकांना खुश करीत आहेत. संगणकाच्‍या मदतीने रेखाटलेल्‍या चित्रांचे प्रदर्शनही त्‍यांनी मुंबईला भरविले होते.

            सुप्रसिध्‍द चित्रकार दीनानाथ दलाल, मुळगावकर, एस.एम. पंडित यांच्‍यासह बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्‍या व्‍यंगचित्रांचेही ते चाहते आहेत. ‘मार्मिक’ आणि ‘शंकर्स विकली’मधील व्‍यंगचित्रे ते नेहमी पहात. पण त्‍यांनी कुणाचे अनुकरण केले नाही. प्रत्‍येकातील चांगले ते त्‍यांनी पारखून घेतले आणि आपली कलाकुसर पेश केली. रंगसंगती चमकदार होईल, शरीर-चित्रण देखणे होईल, वेशभूषा आकर्षक होईल,पार्श्‍वभूमी नयनरम्‍य होईल याचा सर्वंकष विचार त्‍यांनी व्‍यंगचित्रे रेखाटतांना केलेला दिसून येतो. त्‍यांचे व्‍यंगचित्र पहातांना एखाद्या चित्रपटातील दृश्‍याचे छायाचित्र आपण पहात आहोत की काय, असा भास रसिकांना होतो. श्रेष्‍ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्‍यासह श्याम जोशी,वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, गवाणकर,शि. द. फडणीस, उद्धव ठाकरे यांच्‍याशी त्‍यांचा जवळून स्‍नेह आला. यातील व्‍यंगचित्रकारांकडे त्‍यांचे जाणे-येणे होते. पण त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा अहंभाव नव्‍हता.

            नवोदित व्‍यंगचित्रकारांना ते ही कला समृध्‍द करण्‍याचे आवाहन करतात. दहा-बारा व्‍यंगचित्रे खरडली की झाला व्‍यंगचित्रकार, हा समज दूर होण्‍याची गरज ते प्रतिपादन करतात. व्‍यंगचित्रकाराला दैवी देणगी लाभलेली असते. वाचन,निरीक्षण, कल्‍पनाशक्‍ती, रेखाटने,नावीन्‍यपूर्ण विषयांचा सातत्‍याने शोध या गुणांच्‍या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन व्‍यंगचित्रकार जाहिरात,दूरचित्रवाणी, सोशल मिडीया, चित्रपट अशा माध्‍यमांमध्‍ये उत्‍तुंग झेप घेऊ शकतो,हेही  ते लक्षात आणून देतात.

            ज्ञानेश सोनार यांनी आपल्‍या बावनकशी व्‍यंगचित्रांनी रसिकांचे मनोरंजन करण्‍याबरोबरच वाहतूक सुरक्षा, पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण, अंधश्रध्‍दा निर्मूलन अशा विविध विषयांवर वाचकांचे प्रबोधनही केले आहे. रसिकांच्‍या हशा आणि टाळ्यांनी त्‍यांनाही समाधान दिले आहेच. जीवनगौरव पुरस्‍काराच्‍या निमित्‍ताने सोनार यांच्‍या शंभर नंबरी कार्याचा गौरव होत आहे. सोनार सरांचे भावी आयुष्‍य सुखी, समाधानी, आनंदी आणि आरोग्‍यसंपन्‍न जावो, हीच प्रार्थना.

राजेंद्र सरग 9423245456

हडपसर मध्ये तुपे पाटलांच्या दुचाकी वरुन अमोल कोल्हेंची प्रचार फेरी

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी आज हडपसर भागात शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉ अमोल कोल्हे ह्याच्या सोबत प्रचार चक्क दुचाकीवरून केला.. कोल्हे ह्यांनी आज हडपसर भागात प्रचार सुरू होता यावेळेस माजी महापौर प्रशांत जगताप, निलेश मगर, सुरेख कवडे, नंदा लोणकर, उपस्थित होते

आघाडीचे उमेदवार मार्केट यार्ड मध्ये …

पुणे-काँग्रेस पक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्ष आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्री. मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सौ. सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पुण्यातील मार्केटयार्ड येथे शेतकरी व नागरीकांची भेट घेतली. तसेच त्यानंतर श्री. मोहन जोशी यांनी जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्र मंडळ, एसपी कॉलेज 1, लॉ कॉलेज लायन्स, पीसीएलटीए क्ले किंग्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात महाराष्ट्र मंडळ, एसपी कॉलेज 1, लॉ कॉलेज लायन्स, पीसीएलटीए क्ले किंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात महाराष्ट्र मंडळ संघाने पीवायसी ड संघाचा 23-12 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्र मंडळ संघाकडून अभिषेक चव्हाण, राजेंद्र देशमुख, कमलेश शहा, विकास बचलू, संजय सेठी, अर्पित श्रॉफ यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात आशिष डिके, मंदार मेहेंदळे, आदित्य जोशी, केदार पाटील, गजानन कुलकर्णी, उमेश भिडे, स्वेतल शाह, संतोष शाह यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर एसपी कॉलेज 1 संघाने सोलारिस 2  संघाचा 24-06 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

अन्य लढतीत पीसीएलटीए क्ले किंग्स संघाने सोलारिस गो गेटर्स संघाचा 19-14 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: प्लेट डिव्हिजन:
महाराष्ट्र मंडळ वि.वि.पीवायसी ड  23-12(100अधिक गट: संजय सेठी/अर्जुन वाघमारे पराभूत वि.रणजित पांडे/संजय बोथरा (1)5-6; खुला गट: अभिषेक चव्हाण/राजेंद्र देशमुख वि.वि.केदार देशपांडे/प्रतीक वांगीकर 6-2; 90अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू वि.वि.संजू घोलप/तुषार नगरकर 6-3; खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.रणजित पांडे/अमोल काणे  6-1);

एसपी कॉलेज 1 वि.वि.सोलारिस 2  24-06(100अधिक गट: आशिष डिके/मंदार मेहेंदळे वि.वि.डॉ. शिंदे/मनोज पालवे  6-0; खुला गट: आदित्य जोशी/केदार पाटील वि.वि.मनोज पालवे/अमित मते 6-0; 90अधिक गट: गजानन कुलकर्णी/उमेश भिडे वि.वि.राजू पिंपळे/बापू पायगुडे 6-2; खुला गट: स्वेतल शाह/संतोष शाह वि.वि.राजेंद्र देशमुख/संतोष दळवी 6-4);

लॉ कॉलेज लायन्स वि.वि.डेक्कन 3 23-12(100अधिक गट: श्रीकृष्णा पानसे/केतन जाठर वि.वि.हेमंत साठे/बाबू जाधव 6-0; खुला गट: अभिजित मराठे/शिवाजी यादव पराभूत वि.बाबू जाधव/धनंजय सुमंत (2)5-6; 90अधिक गट: राहुल पंढरपुरे/प्रोफेसर जयभाई वि.वि.मिलिंद लुंकड/किरण सोनावणे 6-3; खुला गट: केतन जाठर/तारख पारीख वि.वि.के जाधव/दत्तू शिंदे 6-3);

पीसीएलटीए क्ले किंग्स वि.वि.सोलारिस गो गेटर्स 19-14(100अधिक गट: विजय खन्ना/नंदू रोकडे वि.वि.वसंत साठे/हेमंत भोसले 6-0; खुला गट: नंदू रोकडे/प्रवीण घोडे पराभूत वि.रवींद्र पांडे/अमोल घोडे 1-6; 90अधिक गट: रवी जौकनी/निर्मल वाधवानी वि.वि.शिव जावडेकर/स्वरूप सवनूर 6-5(1); खुला गट: गिरीश कुलकर्णी/धर्मेश वाधवानी वि.वि.सिद्धांत गुणेश्वर/प्रसाद श्रीमनी 6-3).

यशस्वीतेसाठी इच्छाशक्ती, आत्मविश्वास महत्वपूर्ण -डॉ. अनुराग बत्रा

0
वुमेन प्रोवेस’मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान
पुणे : “स्वप्न प्रत्येकाने पाहावीत. स्वप्नपूर्तीसाठी झोकून देत मेहनत घ्यावी. आपण जे बोलतो आणि करतो, त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवावा. आपल्यातील इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास प्रबळ असेल, तर प्रत्येक क्षेत्रात आपण यश मिळवू शकतो,” असे मत बिझनेसवल्ड आणि एक्सचेंजफोरमीडियाचे चेअरमन डॉ. अनुराग बत्रा यांनी व्यक्त केले.
समाजातील महिलांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवत, आपल्यातील कलागुणांना वाव देऊन स्वयंसिद्ध व्हावे, या उद्देशाने होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचालित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नटराजन एज्युकेशन सोसायटी (एनईएस) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ‘होप फाउंडेशन’च्या अध्यक्षा अरुणा कटारा, ‘एनईएस’चे संस्थापक विश्वस्त डॉ. गणेश नटराजन, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमा गणेश आदी उपस्थित होते.
हिंजवडी येथील होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात तुडीप सॉफ्टवेअरच्या सहसंस्थापक दीप्ती अगरवाल, ईझेस्टच्या मार्केटिंग हेड जानकी संपत,  सोशल वेंचर पार्टनर्स पुणे चॅप्टरच्या महाव्यवस्थापक पारुल वैद्य, लेक्ट्रोलेक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उमा निडमारती, बीडब्ल्यू बिझिनेस वल्डच्या उपाध्यक्ष शीतल खारका यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित ‘नवी आशा, उभरते व्यक्तिमत्व : नव्या महिलांची ओळख’ विषयावरील परिसंवादाचे समन्वयन डॉ. उमा गणेश यांनी केले. सर्वसामान्य स्त्री ते यशस्वी महिला उद्योजिका असा प्रवास सन्मानित महिलांनी उलगडला.
डॉ. अनुराग बत्रा म्हणाले, “समाजात आणि उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करण्यासह इतर अनेकांना नोकरीच्या संधी देण्याचे काम या महिलांनी केले आहे. चांगला हेतू कधीच निष्फळ ठरत नाही. प्रेम, करुणा, दयाळूपणा, वचनबद्धता या स्त्रियांमधील गुणधर्मामुळे यशस्वी उद्योजक होण्यास मदत होते. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून ठराविक मार्गावर चालत राहिल्यावर यश नक्की मिळेल.”
अरुणा कटारा म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करून तरुणींना चांगले करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. यंदा महिला उद्योजिका आणि करिअर घडविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आदर्श ठेवला आहे.” कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यांसारखे नवतंत्रज्ञान येत असल्याने सध्या सर्वच पातळ्यांवर खूप स्पर्धा वाढल्या आहेत. येणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांनी यशस्वी उद्योजक होण्याची गरज असल्याचे डॉ. नटराजन यांनी नमूद केले.

‘गिरीष बापट हे दांभिक लोकप्रतिनिधी’ – मोहन जोशी

पुणे-मुंबईप्रमाणेच पुण्यालाही देशात मोठे महत्व असून पुण्याच्या विकासाचे गिरीश
बापट व भाजप पक्ष ‘स्पीडब्रेकर’ बनले आहेत. आमदार व पुण्याचे पालक मंत्री म्हणून त्यांनी
पुण्याच्या विकासाच्या कोणत्याही योजना आणल्या नाहीत. विकासासाठी केंद्र व राज्याकडून
विकासनिधी आणण्यास ते अपयशी ठरले आहेत. खऱ्या अर्थाने ते दांभिक लोकप्रतिनिधी आहेत
त्यांना पुणेकर या निवडणुकीत निश्चित पराभूत करतील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यास
पुण्याच्या विकासासाठी संधी देतील असा विश्वास पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज व्यक्त केला. भवानी माता
मंदिरात भवानी मातेचे दर्शन घेऊन सर्वांना गुढी-पाडव्याच्या शुभेच्छा देऊन भव्य पदयात्रेद्वारे
त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, सर्व पक्षांचे दिमाखात
उंचावलेले झेंडे, ढोल-लेझीमची लय आणि घोषणांच्या निनादात सकाळी साडेनऊ वाजता या भव्य
पदयात्रेस
प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर दुतर्फा नागरीकांनी व महिलांनी कुंकुमतिलक लावून व ओवाळून
मोहन जोशी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मार्गावर ठिकठिकाणी अनेक व्यापारांनी जंगी स्वागत
केले तस्सेच मार्गावर विविध ठिकाणी गुलाब-पुष्पांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. ठिकठिकाणी
पाणी व उसाचा रस घेण्याचा आग्रह होत होता. मार्गावरील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील जोशी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
दुपारी दोनपर्यँत चाललेल्या या पदयात्रेत माजी मंत्री नितीन राऊत व उमेदवार मोहन जोशी
यांच्यासह शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे, खा.
वंदना चव्हाण, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रांतीकच्या सहप्रभारी सोनल पटेल, प्रवीण गायकवाड,
अंकुश काकडे, काँग्रेसचे मनपा गटनेते अरविंद शिंदे , अविनाश बागवे, माजी आमदार कमल
ढोले पाटील, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड , रोहित टिळक, मनीष आनंद, नीता परदेशी, संगीता

तिवारी, सुजाता शेट्टी, चांदबी नदाफ, लताताई राजगुरू , वीरेंद्र किराड , जयंत किराड, रवींद्र
धंगेकर, रफिक शेख, सुनील मलके, रशीद शेख, भारत कांबळे, शानी नौशाद, विठ्ठल थोरात,
सुजित यादव, सुनील घाडगे, सुरेश व्यास व इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत
महिलांची संख्या लक्षणीय होती.

पदयात्रेनंतर झालेल्या समारोपाच्या सभेत माजी मंत्री नितिन राऊत म्हणाले की,
केंद्रातील मोदी सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना बदलण्याचा
प्रयत्न करीत असून देशातील गरीब मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत
आहेत, अन्याय होत आहेत. देशातील लोकशाही व राज्यघटना शाबूत ठेवण्यासाठीं हुकूमशाही
वृत्तीच्या नरेंद्र मोदी व भाजप सरकारला आता बदललेच पाहिजे. आज गुढी पाडव्याचा दिवशी
मोहन जोशी यांचा प्रचाराचा शुभारंभ होत आहे आता विजयाची गुढी देखील आपण उभारू असे
नितीन राऊत यांनी म्हटले.
याप्रसंगी उल्हासदादा पवार म्हणाले कि, केंद्रातील मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था
खिळखिळीत केली आहे. कोट्यवधी तरुण बेकार असून शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला
आहे. त्यामुळे देशात आता परिवर्तनाची गरज आहे असे ते म्हणाले.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले कि, मोदी सरकारच्या काळात महागाई मोठ्या
प्रमाणात वाढली असून गरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय जनता महागाईच्या आगीत होरपळून
निघत आहे. त्यामुळेच जनता आता निर्धार करून केंद्रातील मोदी सरकार निश्चित बदलेल असा
विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दलित आणि मुस्लिम समाजावर मोठे अत्याचार होत असून
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सरकार केंद्रात आणावयाचे आहे असे ते
म्हणाले.
याप्रसंगी प्रवीण गायकवाड म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची मोठी परंपरा
महाराष्ट्राला आहे. केंद्रातील जातीय धर्मांध सरकार राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करीत असून
आपल्याला लोकशाहीमुळे मिळालेल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावरही घाला घालीत आहे. हि विचारांची
लढाई असून समानता आणि विषमता हे दोन विचार आहेत. याच पुण्यात विषमतेच्या
विचाराविरुद्ध महात्मा फुले यांनी संघर्ष सुरु केला. नरेंद्र मोदी यांचे जातीय-धर्मांध सरकार आता

बदललेच पाहिजे. राहुल गांधी यांनी गरिबांच्या उत्पन्न वाढीसाठी जाहीर केलेल्या योजनेमुळे
गरिबांना मोठा आधार मिळेल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रशीद शेख म्हणाले, महागाई
गगनाला भिडली असूनअच्छे दिन आले आहेत काय? असा मतदानाला जाताना मतदारांनी
विचार करायलाच हवा. भारत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

भवानी माता मंदिरापासून निघालेली ही पदयात्रा -जुना मोटार स्टॅन्ड चौक – सरस्वती
सोसायटी – पदमजी चौकी- कादरी मंजिल- जीज्ञासा वसाहत- मिलिंद मंडळ-जय भीम मंडळ- एसं
आर.ए. वसाहत पत्राची चाळ – प्रगतीशील मंडळाच्या गल्लीत- कॉलनी नंबर १२- ए.डी . कॅम्प
चौक- किराड हॉस्पिटल- संत कबीर चौक- भोर्डे आळी -बुढण आळी – इस्लामपूर- रास्ते मांग
वाडा – राजेवाडी – भवानी पेठ पोलीस लाईन – पदमजी चौकाकडून निशात टॉकीज – गाडी अड्डा
– मंजुळा बाई चाळ – वोचमकर शाळा – गणपती भुई चाळीतून चुडामण तालीम चौक- नवी हिंद
समोरून चुडामण तालीम वसाहत – बाहेर निघून सातशे सातारा भवानी पेठ कब्रस्तान – हरका
नगर वसाहत – ५१२ भवानी पेठ- भीम जादे अपार्टमेंट – बर्फाचा कारखाना – तबेला – नंदेश
कॉइनर – राजीव गांधी पतसंस्था – कामगार मित्र मंडळ – काशेवाडी- श्री कृष्ण मंदिर परिसर –
अमरज्योत मित्र मंडळ पोलीस चौकी – सिद्धार्थ नगर- पोलीस चौकी – दीपज्योती मंडळ –
लमाण गल्ली- बंधुभाव मित्र मंडळ- सीताई मित्र मंडळ- सरळ मार्गे पोलीस चौकी – किशोर
जरबंडी घरामागून आकाश ज्योत मंडळ – महात्मा फुले मंडळ – शाहिद अब्दुल रहमान अंजुमन
मस्जिद – शिंदे कागदवाले – विशाल क्रांती मंडळ – चमन शहा दर्गा पासून नवनाथ मंडळ ते १०
नंबर कॉलनी – गेट नं १ मधून राजीव गांधी वसाहत – कॉलनी परिसर – गेट नं २ – म्हसोबा
मंदिर – सेवक मंडळ – सुरेश भंडारी घर मागील परिसर – हनुमान मंडळ – डोईफोडे मामा घरा
पासून – सुरेख खंडाळे यांच्या घर पासून चमन शाळा चौक- शाहिद अब्दुल रहमान चौक-
एस.आर.ए. बिल्डिंग – या मार्गाने जाऊन पिंपळ मळा येथे दुपारी समारोप करण्यात आला.

“सविंधानाचा सरणामा हाच वंचितचा जाहीरनामा” -वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा प्रसिद्ध

0

पुणे  : देशाचे संविधान अडचणीत असून संविधानाचा आदर्श समोर ठेऊन कारभार केल्यास देशाचा विकास नक्कीच होईल त्यामुळे संविधानाचा सरनामा हाच वंचित बहुजन आघाडीचा मुक्या जाहीरनामा असल्याचे वंचित आघाडीच्या वतीने जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी सांगितले
अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले.

वंचित आघाडीच्या जाहीरनाम्याचे नवी पेठेतील पत्रकार संघात प्रकाशन करण्यात आले. वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव, समन्वयक लक्ष्मण माने, भारीपचे शहर अध्यक्ष अतुल बहुले आणि प्रवक्त्या रमा गोरख यावेळी उपस्थित होत्या.
सत्ता आल्यास कोणत्याही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. एकाच बोर्डाच्या अधिनियमाखाली सर्व अभ्यासक्रम असतील, अशी यंत्रणा उभी केली जाईल. उपलब्ध सर्व स्रोतांचा वापर करून शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज पुरवठा केला जाईल. सहकाराची बांधनी ढासळली असून त्याचे पूर्णजीवन केले जाणार आहे. त्यातून ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार निर्माण केला जाईल. 5 एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वर्षांतून दोनदा प्रत्येकी एकरी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. उद्योग व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना संधी उपलब्ध केल्या जातील. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देणार, आदी बाबी जाहीरनाम्यात असल्याचे माने यांनी सांगितले.

महिला केंद्री, स्त्रीवादी भूमिकांचा स्वीकार, सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणार. स्वतःचे सांस्कृतिक धोरण असून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर असेल असे गोरख यांनी सांगितले.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या :
राज्यातील अनेक पक्ष्यांचा ईव्हीएमवर संशय आहे. असे असतानाही निवडणूक आयोग एव्हीएमचा आग्रह का धरत आहे? बाळासाहेब आंबेडकर त्याबाबत बोलले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला. ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास विरोध असून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी माने यांनी केली.

आरएसएसचे संघटन बेकायदा :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटना, तिरंगा आणि राष्ट्रगीत मानत नाही. हजारो कोटींची उलाढाल होत असलेली आरएसएस ही संघटना अजूनही रजिस्टर नाही. संघटनेवर बंदी आणावी अशी आमची मागणी नाही. मात्र ती कायदेशीर बाबींवर सुरू नसून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. संघटनेचे सभासद असावेत, निवडणूक व्हावी. अशा बाबी पाळल्या जाव्यात, असे लक्ष्मण माने म्हणाले.

10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी यांची आगेकूच

0

पुणे:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी, विरेन चौधरी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य योगीने निहाल तुराकियावर 6-5(5) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मिहीर कदम याने कुशाग्रा बेडेकरचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव केला. विरेन चौधरी व अंशूल पुजारी यांनी अनुक्रमे अचिंत्य कुमार व आरव मुळे यांचा 6-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. अर्जुन परदेशी याने शौर्य बोऱ्हाडेला 6-0 असे पराभूत केले.

स्पर्धेचे उदघाटन फिनआयक्यूच्या क्रीडा समितीचे चेअरमन राजवीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 10 वर्षाखालील मुले:
विरेन चौधरी वि.वि.अचिंत्य कुमार 6-3;
राम मगदूम वि.वि.रोहन बोर्डे 6-0;
आदित्य योगी वि.वि.निहाल तुराकिया 6-5(5);
मिहीर कदम वि.वि.कुशाग्रा बेडेकर 6-5(3);
अंशूल पुजारी वि.वि.आरव मुळे 6-3;
अथर्व येलभर वि.वि.रिषभ मोदी 6-1;
अर्जुन परदेशी वि.वि.शौर्य बोऱ्हाडे 6-0;
क्षितिज अमीन वि.वि.श्रेय भोर 6-3;
वेदांत खानविलकर वि.वि.कारव शाह 6-1.

चेटीचंड महोत्सवानिमित्त भगवान साई झुलेलाल यांची रथयात्रा

0

पुणे : सिंधी नववर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या १०६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित चेटीचंड महोत्सवाची सुरुवात रथयात्रेने झाली. भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव चेटीचंड महोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील सिंधू सेवा दलाच्या वतीने शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता भगवान झुलेलाल यांची आरती करून ही रथयात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये सर्वात पुढे भगवान झुलेलाल यांच्या वेशभूषेतील झुलेलाल, त्यामागे त्यांची मूर्ती, सिंधी भजनसंगीत म्हणणाऱ्या महिला आणि प्रसाद असे या रथयात्रेच्या स्वरूप होते. साधारणपणे २५०-३०० नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.

भवानी पेठेतल्या पदमजी कंपाउंड येथून या रथयात्रेला सुरुवात झाली. बाबाजान चौक, एमजी रस्ता, अरोरा टॉवर्स, लाल देऊळ, मित्तलकोर्ट, क्वार्टर गेट, पदमजी पार्क, पदमजी कंम्पाउंड अशी ही रथयात्रा मार्गस्थ झाली. सर्वात पुढे वेल्हे तालुक्यातील कोंडगाव येथील श्री शिवाजी मित्र मंडळाचे लेझीम व झांजपथक, तर मुंबईतील महेश ग्रुपचे ढोलपथक सहभागी झाले होते. त्यांचे वादन आणि विविध खेळ यामुळे रस्ता दुमदुमून गेला. वाटेत अनेक ठिकाणी पाणी, नाश्ता व इतर सेवा पुरविण्यात आली. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, उपाध्यक्ष अशोक वासवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार पिशू पर्यानी, सहसचिव परमानंद भटिजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विजय दासवानी, सिमरन जेठवानी, डिंपल वासवानी, विनोद रोहानी यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी झाले. शालेय विद्यार्थी आणि महिला वर्गाने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतल्याचे दीपक वाधवानी म्हणाले.

फॉरच्युनर गाडीतील पोत्यातले जप्त केले नऊ लाख सत्तर हजार रुपये…

0

इंदापूर : इंदापूरपोलिस ठाण्याअंतर्गत तैनात असलेले, स्थिर सर्वेक्षण पथक ( एस.एस.टी ) पथकाने इंदापूर टोलनाक्यावर गाड्यांची तपासणी करत असताना, तपासणीदरम्यान एका फॉरच्युनर गाडी मध्ये एका पोत्यात, एकूण नऊ लाख सत्तर हजार रुपये आढळून आले आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

शनिवार ( दि. ६) रोजी दुपारी ४.३० वाजता पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर गाडी क्रमांक एम. एच २४ एक्यू १११ गाडीची इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर तहसिलदार सोनाली मेटकरी, पोलीस उपनिरीक्षक सुशिल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह जाधव यांच्या पथकाने तपासणी केली असता, त्या गाडी मध्ये एका पोत्यात एकूण नऊ लाख सत्तर हजारांची रक्कम सापडली.

त्याबाबत गाडीचा चालक विजय नारायण ताटे – देशमुख रा. संगम ता. माळशिरस जि. सोलापूर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत योग्य खुलासा देता आला नाही, म्हणून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी आचारसंहिता भंग होवू नये म्हणून इंदापूर तालुक्यातील सराटी गावात व सरडेवाडी येथील टोल नाक्यावर नाकाबंदी करून चेकपोस्ट लावला आहे. यामध्ये प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे. त्या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी व एक कॅमेरामॅन चे पथक तैनात केले आहे.

ज्या गाडीतून रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांना इंदापूर पोलिसांनी त्या पैशाबाबत पुरावा सादर करण्याची नोटीस दिली आहे. ती रक्कम सोमवार ( दि.८) रोजी इंदापूर तहसिल कार्यालयात जमा करणार आहेत. त्यानंतर तहसीलदार हे जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर आरोपी विजय ताटे – देशमुख यांनी सात दिवसांच्या आत त्या पैशांच्या पुरावा व खुलासा केल्यानंतर, त्यामध्ये योग्य पुरावे असल्यास ते पैसे त्यांना परत मिळणार आहेत. अन्यथा ती रक्कम सरकार जमा होणार आहे.

मोदींच्या हातीच देशातील मुस्लीम सुरक्षित : शहनवाझ हुसेन(व्हिडीओ)

0

पुणे : भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, महापाैर मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित हाेते. माेदींच्या राज्यात मुस्लिम सुरक्षित असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

हुसेन यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर बाेलत विराेधकांवर हल्ला चढवला. हुसेन म्हणाले, माेदींवर सगळेच प्रेम करतात. राहुल गांधींना देखील बाेलावं लागलं की ते माेदींवर प्रेम करतात. गांधी जे बाेलतात ते करत नाहीत. संसदेत माेदींची गळाभेट घेतात आणि नंतर डाेळा मारतात. आणि बाहेर माेदींचा द्वेष करतात. काल राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या सभेत माेदींनी अडवाणी यांना स्टेजवरुन खाली उतरवले अशी टीका केली हाेती. त्यावर बाेलताना हुसेन म्हणाले, गांधी भाषेची मर्यादा ताेडत आहेत. टीका करताना आम्ही कधी भाषेची मर्यादा साेडली नाही. गांधी यांनी टीका करताना जी भाषा वापरली त्याचा आम्ही निषेध करताे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी. गांधी कधी भारतीय सेनेचा अपमान करतात तर कधी ज्येष्ठांचा अनादर करतात. अमित शहा यांच्या अर्जात कुठलिही त्रुटी नाही. काॅंग्रेसला सगळीकडे खाेटं दिसतं. त्यांनी आपली नजर बदलावी. त्यांनी केलेल्या आराेपात कुठलेही तथ्य नाही.

देशातील सहाशे कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपाच्या विराेधात मतदान करा असे आवाहन केले आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांच्याबराेबरच अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा सहभाग आहे. या सहाशे कलाकारांची मते विराेधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून भाजपाच्या बाजूने चाैकाचाैकात सहा हजार मतदार उभे राहतील अशी टीका हुसेन यांनी कलाकारांवर केली.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. भाजपाविरोधात मतदान करून त्यांना व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून पायउतार करा, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे.कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरं तर हे पत्र एक दोन, नव्हे तर 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.

यावर बोलताना हुसेन म्हणाले, सहाशे कलाकारांची मते नाही मिळाली तरी भाजपाला फरक पडत नसल्याचे हुसेन म्हणाले. तसेच अशी टीका करण्यापेक्षा कलाकारांनी राजकारणात येऊन थेट टीका करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी कलाकारांना दिले. देशात भिती वाटते असे नसरुद्दीन शहा एका मुलाखतीत म्हंटले हाेते. त्यावर हुसेन म्हणाले की शहांना भीती वाटते तर आम्ही काही करु शकत नाही. 600 कलाकारांनी आम्हाला मतदान केले नाही तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला देशातील 132 कराेड लाेक मतदान करतील.

केंद्रातील सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही- शरद पवार

पुणे(प्रतिंनिधी)— पुण्यामध्ये ज्या ज्या वेळी समोरच्या उमेदवाराची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली
जाते ता-त्या वेळी आपला उमेदवार हमखास निवडून येतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पुणे
लोकसभा मतदार संघाबरोबरच जिल्ह्यातील चारही जागांवार कोंग्रेस-राष्ट्रवादी कोंग्रेस आघाडीचे
उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ज्यांना
संवेदना नाहीत असे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. त्यांना बदलल्याशिवाय गत्यंतर नाही
असेही ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी
संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा निसर्ग
मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा
मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्राच्या
सहप्रभारी सोनल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री
हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री नितिन रावूत, बाळासाहेब शिवरकर, शेकापचे नेते प्रविण गायकवाड,
काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, कमलताई
ढोले पाटील, दीप्ती चवधरी, पी.ए. इनामदार, अरविंद शिंदे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ज्यावेळी समोरच्या उमेदवारां विषयी जास्त प्रसिद्धी केली जाते तेव्हा त्या विरोधातला
उमेदवार हमखास विजयी होतो, तशी परिस्थिती सध्या पुण्यात आहे.विरोधकाकडे काही सांगण्यासाठी
काही नाही फक्त पैसे आहेत. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.
पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकण्याची खात्री मला आहे. विरोधकाकडे पैसे आहेत लक्ष ठेवा आणि
भाजपा- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खाजगीत सांगा की भले करून घ्या पुन्हा संधी मिळणार नाही.
भाजपवर टीका करताना मोदी म्हणाले, भाजपच्या राजवटीत हल्ले वाढले आणि माणस आपापसात
भिडले गेल्या तीन चार वर्षांत विविध घटकात हल्ले होत आहेत.गेल्या तीन चार वर्षांत आत्महत्या
करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्याला इतकी टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडले
याचे कारण त्याला दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नाही.ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदी यांची आहे.
इतकी गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी पक्षाचे नेते बेताल वक्तव्य करत फिरत आहेत. एकदा
त्यांचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष दानवे शेतकर्‍यांना साले म्हणाले, तर काही दिवसांपूर्वी एक नेत्याने
आत्महत्या करणार्‍या शेतकऱ्यांची पोर म्हणजे लावारीस असे वक्तव्य केले. याचा अर्थ स्पष्ट की
सामान्य नागरिकांची यांना काही देणेघेणे नाही.
मोदी मला जाहीर सभेत प्रश्न विचारतात की शेतकरी आत्महत्या करताना तुम्ही कृषीमत्री होते तर
तुम्ही काय केले? मी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना घेवून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या घरी

पंतप्रधानांना घेऊन यवतमाळला गेलो आणि दुसऱ्या दिवशी ७० हजार कोटीच कर्ज माफ केलं,तुम्ही
काय केलं सांगा ते सांगा असा सवाल त्यांनी केला? .
मोदीच्या राजवटीत शेतकरी उध्वस्त झाला. प्रत्येक भाषणांत मोदी काय केलं हे न सांगता काँग्रेस
आणि गांधी घराण्याला शिव्या घालत बसतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी काय केलं म्हणून हे
विचारतात यांना काय माहिती नाही का ? आज शेतात काम करणारी बाई देखील फोनवर बोलते. हे
तंत्र्द्यान कोणी आणले? राजीव गांधी म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाने आणले. यांना माहीत नाही का
लष्करातील जवान शहीद झाले त्यानंतर बैठक बोलावली त्यात आम्ही सर्व नेते सहभागी होतो. जी
मदत करायची असेल ती लष्कराला करा अस आम्ही संगितले होते. त्यानंतर आपण प्रत्त्युत्तर दिल…
दुर्दैवाने यात आपलं एक विमान पडलं आणि आपला अभिनंदन हा जवान त्यांच्या हद्दीत गेला. एक
आंतरराष्ट्रीय करार होता…सर्व देशांनी ठराव केल्यानंतर त्या मार्गातून आपला अभिनंदन परत आला
आहे. मोदी म्हणतात ५६ इंचाची छाती मग कुलभूषण जाधव यांची सुटका का करून आणत नाहीत
असा सवाल त्यांनी केला. आमच्या जवानांनी शौर्य दाखवलं त्याचा राजकीय फायदा कुणी घेऊ नका
अशी विनंती अभिनंदनच्या कुटूंबानी आणि मित्रांनी केली होती. मात्र भाजपा त्याचा राजकारणासाठी
उपयोग करत आहे.
मोदी आणि फडणवीस यांच्या काळात पुण्यात कुठला नवीन कारखाना आला हे त्यांनी
दाखवावं.लोकांच्या समोर मोठं मोठं बोलायच आणि सगळं मीच केलं अस लोकांना सांगयाच.राजीव
गांधी यांनी बोफोर्सच्या चौकशीची करण्याची तयारी दर्शवली होती. हे ना खाऊंगा ना खाणे दुगां
म्हणायचे मग राफेल प्रकरण काय आहे.? ज्या अनिल अंबानी यांनी कागदाच विमान उडवल नाही
त्यांना संरक्षण खात्यातल विमान बनविण्याच काम दिले अशी टीका पवार यांनी केली.
मोदी प्रत्येक सभेत काँग्रेस वर टीका करतायत, गेल्या आठवड्यापासून माझं ही नाव घ्यायला लागलाय
बाबा, मला पण बर वाटल की मी पण मोठा झालोय काँग्रेसच्या लाईनित आलो.सभेत वर्ध्याला हे
माझ्यावर बोलले काय बोलले अजित पवार यांनी कुटूंबाचा ताबा घेतला, घरात आलबेल नाही, त्यांना
सांगतो मोदी साहेब आमच्यावर आमच्या आईचे काही संस्कार होते आमच्या घरात तीन पदंश्री आणि
पद्म विभूषण आहे विचार करा जिने हे घडवलं ती कशी असेल.यांना घरदार नाही, आणि दुसऱ्याच्या
घरात डोकावतायत असा टोला त्यांनी मोदी यांना लगावला. स्वतः च अपयश झाकण्यासाठी काँग्रेस
आणि गांधी घराण्यावर टीका करतायत आणि आता माझ्यावर पण आलेत. परंतु कितीही काही बोला
माझ्या अंगाला भोकं नाही पडत असे पवार म्हणाले.
नितीन राऊत म्हणाले, २०१९ची ही निवडणूक अत्यंत अटीतटीच्या प्रसंगावर येऊन ठेपली आहे. या
देशाला स्वातंत्र्यलढाई प्रमाणे परिस्थिति निर्माण झाली आहे. सामाजिक वातावरण बिघडवले जात
आहे. मोदींनी देशाचे संपूर्ण सामाजिक वातावरण कलुषित केले आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी
एकही काम मोदी सारकारने केले नाही. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सत्तेवर आल्यानंतर
दलितांवरील अत्याचार्यांमध्ये वाढ झाली आहे. रोहीत वेमुलाला आत्महत्या का करावी? मुस्लिमांना
मांस खाल्ले म्हणून मारहाण केली जाते तेव्हा चौकीदार कुठे होते? असा सवाल त्यांनी केला.

पुलवामा हल्ला करण्यासाठी गाडी आरडीएक्स घेऊन गेली. तेव्हा यांचा इंटेलिजन्स कुठे होता. सर्व
यांच्या संगनमताने हे झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. न्यायाधीशांना धमकवण्याचे काम सुरू
आहे. संविधानाचे बारा वाजवले आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्यातील कलमे बदलण्याचा
प्रयत्न झाला. संविधान बदलण्याची तर २०१९ ची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे
नेते करत आहेत. ज्यांनी संविधान जाळले त्यावेळी हे चौकीदार काय करत होते? आम्हाला
कोणत्याही परिस्थितीत भाजप पुणे शहरातून घालवावे लागेल.
सोनल पटेल म्हणाल्या, गुजरातचे विकासाच्या मॉडेलचा प्रचार करून मोदींनी सर्वाना फसविले.
गुजरातच्या विधानसभेच्या वेळी जनतेच्या लक्षात आले. काँग्रेसला सत्तेसाठी फार थोड्या कमी जागा
कमी पडल्या. लोक या सरकारला वैतागले आहेत. लोकांना मोदी सरकारला घालवण्याची ईच्छा आहे.
लोकांकडे जाऊन त्यांना विश्वास द्यावा लागेल.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील चारही जागा चांगल्या मताधिक्याने निवडून आणायच्या
आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्याय झाला आहे. तशा प्रकारची वागणूक यापुर्वी कोणत्याही
सरकारच्या काळात दिली गेली नाही. सर्वांची जबाबदारी मोहन जोशी शहरी भागात तळागाळातील
कार्यकर्ता आहे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी
सर्वांनी एकत्रितपणे काम करावे लागेल. व मोहन जोशींना चांगल्या मताधिक्याने निवडून आणावे असे
आवाहन त्यांनी केले.

प्रवीण गायकवाड म्हणाले, लोकशाही धोक्यात आली आहे. पुरोगामी विचारांच्या ६३ जणांना पोलीस
संरक्षण देण्यात आले आहे. बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला
असताना आमची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार उलथवून टाकण्याची
आवश्यकता आहे.
रमेश बागवे म्हणाले, ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही तर मूल्य टिकवण्याची आहे. लोकशाही
पाहिजे की हुकूमशाही पाहिजे हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. संविधान धोक्यात आहे. त्यामुळे
सर्वांनी लोकशाहीला धोका ओळखून केंद्रातील भाजप सरकार घालविले पाहिजे.
मोहन जोशी म्हणाले, या निवडणुकीला सामोरे जाताना १९९८ सालची लोकसभेची निवडणूक आठवते.
त्यावेळी विठ्ठल तुपे होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन विठ्ठल तुपेंना विजयी
केले होते. आजची निवडनुक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर
आणि आघाडीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर या निवडणूकीमध्ये विजयी होईल असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाला 3 किलो सोन्याचे रत्नजडीत उपरणे अर्पण -पाडवा विशेष

0

पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच हिंदू नववर्षानिमित्त 3 किलोचे सुवर्ण उपरणे व्यंकटेश्वरा हॅचरिजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे,ट्रस्टचे डॉ.बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी राजाभाऊ घोडके नगरसेवक हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित  होते.देवाने दिलेली हि संधी आहे आणि या संधीमुळेच एवढं करता येत आहे असं यावेळी व्यंकटेश राव यांनी सांगितले.
तसेच यावेळी गुढीपाड्वानिमित्त परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या गणराजाच्या मंदिरातील गुढीचे सहपरिवार  पूजन केले . यावेळी मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित होते

पुणे शहर आणि जिल्ह्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा मनसे करणार प्रचार

0

पुणे-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशावरून बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ  पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे व पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांना मनसेचे गटनेते वसंत मोरे व नगरसेवक साईनाथ बाबर यांनी जाहीर पाठिंबा दिला मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तन मन धनाने वरील चारही उमेदवारांचा प्रचार करतील व मोदी शहा या अभद्र समीकरणाला व युतीला पुणे जिल्ह्यात संपूर्णपणे पराभूत आणि नेस्तनाबूत करू अशी भूमिका मांडली
तसेच शिरूर चे उमेदवार अमोल कोल्हे यांना वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी त्यांचे महानगरपालिकेचे एक महिन्याचे मानधन अमोल कोल्हे यांना निवडणूक निधी म्हणून राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष चेतन पाटील तुपे यांच्या कडे सुपूर्द केले
याप्रसंगी चेतन पाटील तुपे यांनी सांगितले की महाआघाडी बरोबर आज मनसे देखील पूर्ण ताकतीने प्रचारामध्ये उतरली आहे आहे त्यामुळे महाआघाडीच्या जिल्ह्यातील चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील तसेच आता ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होत आहे त्यामुळे अडाणी अंबानीच्या पाठिंब्यावरती लढणारे सत्ताधारी आणि सामान्य जनतेच्या मनातले त्यांना भावणारे आपले वाटणारे उमेदवार अशी आहे आणि ज्यावेळी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा झाला आहे त्यावेळी जनतेचे उमेदवार निवडून आले आहेत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे पार्थ पवार अमोल कोल्हे मोहन जोशी यांचा विजय निश्चित आहे

काँग्रेस भवन मधील मीडिया सेंटरचे खा. वंदना चव्हाण याच्या हस्ते उदघाटन

0

पुणे-पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी
यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे सुरु करण्यात आलेल्या अत्याधुनिक मीडिया सेंटरचे उदघाटन
खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याप्रसंगी उमेदवार मोहन जोशी, काँग्रेस शहर
अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, अंकुश काकडे, कमल ढोले पाटील, दीप्ती चवधरी,
अभय छाजेड, आबा बागुल, अश्विनी कदम, नितीन कदम, सदानंद शेट्टी, बाळासाहेब अमराळे, सोनाली
मारणे, रमेश अय्यर आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी या मीडिया सेंटरचे माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सगळ्यांचे स्वागत करून मीडिया
सेंटरच्या कामकाजाबद्दल माहिती दिली.