पुणे-
‘पुण्याचा लौकिक लक्षात घेऊनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचा नियोजनबद्ध
विकास केला मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात भाजपच्या नियोजनशून्य आणि भोंगळ
कारभारामुळे पुणे शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, ‘सोन्याच्या कोंबडी’ वर नक्की
कोणाचा डोळा आहे हे सहज लक्षात येईल अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आ.
अनंतराव गाडगीळ यांनी बुधवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत केली.
‘पुण्याचा आजवरचा विकास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सोन्याची अंडी
देणारी कोंबडी’ या हेतूने केला असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच पुण्यात केला
त्याला प्रत्युत्तर देताना अनंतराव गाडगीळ म्हणाले, गेल्या चाळीस-पन्नास वर्षाचा इतिहास पाहता
पुण्याचा विकासाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे हे कोणीही सांगू शकेल. सांस्कृतिक
नगरीपासून औदयोगिक नगरी, आयटी हब नगरी पर्यंत पुण्याच्या विकासाचा प्रवास काँग्रेस
राजवटीतच झाला. एकेकाळी ज्या हिंजेवाडी आयटी नगरीमुळे वर्षाला तीन हजार कोटींचा महसूल
मिळत होता तो भाजपच्या राजवटीत दीड हजार कोटींपर्यंत खाली आला. त्यामुळे विकासाला
उतरती कळा कोणामुळे लागली हे सहज कळून येईल असे सांगून गाडगीळ यांनी पुण्यात
एक खासदार, एक मंत्री, आठ आमदार आणि शंभर नगरसेवक असलेल्या भाजपच्या राजवटीत
पुण्याच्या विकासाची कशी अधोगती झाली त्याची अनेक उदाहरणे दिली.
‘स्मार्ट सिटी’ म्हणून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या एकूण ५६ प्रकल्पांपैकी फक्त १०
प्रकल्प कसेबसे पूर्ण करण्यात आले अशी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात कबुली दिली होती
त्याची आठवण करून देऊन गाडगीळ म्हणाले, पुण्याचा पाणी प्रश्न तसेच वाहतुकीची समस्या
यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे हे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत कारण विकाच्या
प्रश्नाकसे कोणत्याही प्रश्नांकडे भाजपने गांभीर्याने पाहिलेले नाही असाही आरोप त्यांनी यावेळी
केला.
पुण्यातील लोकसभा निवडणुकीतील गिरीश बापट-मोहन जोशी यांच्या लढतीबाबत
विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला मिश्कीलपणे उत्तर देतांना गाडगीळ म्हणाले, आमचा काँग्रेसचा
पैलवान हा शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीत तयार झाला आहे त्यामुळे तो या निवडणुकीत
नक्कीच बापट यांना धोबीपछाड करेल असा आमचा विश्वास आहे.
‘सोन्याच्या कोंबडी’ वर नक्की कोणाचा डोळा आ. गाडगीळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राहुल गांधींनी लग्न करावं आणि संसार करावा : रामदास आठवललेंची अनकट पत्रकार परिषद -व्हिडीओ
पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुढील पंधरा वर्ष काही केल्या जात नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशभरात किती प्रचार केला. तरी देखील युपीएची सत्ता येणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडत. मोदी फकीर असून राहुल फकीर नाहीत. त्यामुळे देशभरातील जनतेला राफेलवरून गाफील करू नये. हे लक्षात घेता राहुल गांधी यांनी लवकर लग्न करावं, आणि 10 /15 वर्षे संसार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, विजय काळे, चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले, रिपाइंचे शहारध्यक्ष अशोक कांबळे.मंदार जोशी आदी उपस्थित होते. त्यावेळी आठवले बोलत होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देशभरात एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात देखील महायुतीच्या प्रत्येक ठिकाणी होणार्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहे. मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजनांच्या माध्यमातुन सर्व सामन्याचे जगणे सहज केले आहे. शेवटच्या घटकाला केंद्र बिंदू ठेवून त्यांनी योजना राबविल्या आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या या कारभारामुळे पुन्हा देशात मोदी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेच्या सभांचा फायदा आघाडीला होणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगले इव्हेंट मॅनेजमेंट करणारे नेते आहेत. ते चांगले भाषण करतात. महायुतीच्या विरोधात राज्यभरात घेणार्या सभा फायदा आघाडीला होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या सभा मुळे महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. अशी भूमिका राज ठाकरे यांच्या सभा बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी
वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात तिसरी आघाडी यशस्वी होत नाही. मी सगळ्या आघाड्यांमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपसोबत यावे, त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद मिटला. पण माझा आणि प्रकाश आंबेडकरला वाद असाच आहे. ते माझा एवढा तिटकारा का करतात हे माहीत नाही, असेही आठवले म्हणाले.
कांचन कुल येणार निवडून
बारामती मतदारसंघात यावेळी परिवर्तन होणार असून, काचंन कुल निवडून येतील. गेल्यावेळी महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतले असते तर पवारांचा बुरूज ढासाळला असता. यावेळी महाराष्ट्रात महायुतीच्या 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील.
राज ठाकरेंच्या सभांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले असते. मात्र, त्यांच्या सभांचा आमच्या मतांवर होणार नाही.
चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेबांनी शिकवले
काळ्यापैशाला आळा घालण्यासाठी 10 वर्षातून एकदा चलन बदलण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले होते. मोदींनी बाबासाहेबांच्या मार्गावर जात नोटबंदी लागू केली. काँग्रेसने जीएसटीला पाठिंबा दिला. जीएसटीमध्ये चार-पाच वेळा मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, असेही आठवले म्हणाले.
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र चित्रपट आचार संहितेचं उल्लंघन करतोय का हे निवडणूक आयोगच ठरवेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचं भवितव्य निवडणूक आयोगाच्या हातात असल्याचं दिसून येत आहे. अद्याप या चित्रपटाला सेन्सॉरनेही प्रमाणपत्र दिलेलं नाही.
‘चित्रपटासंदर्भात हस्तक्षेप करणं घाईचं ठरेल,’ असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केलेल्या सुनावणी दरम्यान ही याचिका फेटाळून लावली आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल का? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित होतो की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
यापूर्वी दोन वेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. या पूर्वी हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. त्यानंतर त्याच्या तारखेत बदल करुन तो ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र या तारखेत पुन्हा बदल करत ११ एप्रिल करण्यात आली.
दरम्यान,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार होत असल्यामुळे मतदार प्रभावित होऊ शकतात, असं काही राजकीय पक्षांचे मत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांचा राजीनामा मागितला होता. चित्रपट निर्माता प्रदर्शनाच्या तारखेच्या ५८ दिवसांआधी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाची अंतिम कॉपी पाठवतात. त्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला कुठल्या आधारावर विशेष वागणूक देण्यात आली? असा सवाल मनसेने उपस्थित केला होता.
20 राज्यांत 91 जागांचा प्रचार थंडावला; 1279 उमेदवार निवडणूक रिंगणात,
नागपूर – विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम या सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे.
दिग्गज नेते : केंद्र सरकारमधील ६ मंत्री व एकूण ४४ खासदार
नितीन गडकरी: नागपूरमधून मैदानात. संघाच्या या बालेकिल्ल्यात २०१४ मध्ये २.५ लाख मतांनी विजयी.
ओवेसी: एआयएमआयएम नेते ओवेसी हे हैदराबादमधून तीन वेळा निवडून अाले. पुन्हा येथूनच रिंगणात.
व्ही. के. सिंह: गाझियाबादेत यांची लढत काँग्रेसच्या डॉली शर्मा व महाअाघाडीचे सुरेश बन्सल यांच्याशी.
अजित सिंह: रालोदचे हे संस्थापक मुझफ्फरनगरमधून उभे. त्यांचा सामना भाजपच्या संजीव बालियान यांच्याशी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा, उद्धव ठाकरे, मायावती, शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या नेत्यांनी विदर्भात अनेक ठिकाणी प्रचाराच्या सभा घेतल्या. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी पूर्व नागपूर परिसरात सभा घेऊन प्रचाराची समाप्ती केली, तर चंद्रपूरमध्ये राजनाथसिंह यांनी त्यांचे हंसराज अहिरांसाठी सभा घेतली. दरम्यान, प्रचार थंडावताच आता उमेदवारांनी वैयक्तिक भेटी, बैठकांवर भर दिला.
पुणे हि सोन्याची अंडी देणारी कोंबडी याच नजरेतून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने कारभार केला -फडणवीस
पुणे-‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने पुण्याकडे कायमच सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. या पक्षातील नेते मोठे झाले; पण पक्ष संपत गेला ,शहरे,गावे भकास करत गेला ,’ अशा शब्दांत विरोधकांना लक्ष्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्याचे आश्वासन मंगळवारी दिले. भारतीय जनता पक्षाच्या काळातील केंद्र आणि राज्य सरकारांनी पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याचा दावा त्यांनी केला. ‘पुण्याची खडानखडा माहिती असणाऱ्या गिरीश बापट यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार संजय काकडे ,अनिल शिरोळे,आमदार जगदीश मुळीक,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक ,महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याची मेट्रो, उड्डाणपूल यासारख्या दळणवळणाच्या सुविधा असो किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पंतप्रधान आवास योजनेद्वारे मिळणारी घरे, अशा सर्व योजनांची यादी मुख्यमंत्र्यांनी सादर केली. भविष्यात म्हाळुंगे-माण येथे हिंजवडी आयटीपार्कपेक्षा मोठी ‘हायटेक सिटी’ उभारण्यात येणार आहे. पुढील ५० वर्षांत पुणे कुठे असेल, यासाठीचे नियोजन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. बापट यांच्या रूपाने महायुतीने अनुभवी आणि शहराच्या विकासात योगदान देणारा उमेदवार दिल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसचा जाहीरनामा, बालाकोट हल्ला आणि इतर विषयांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले.
नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच शक्य ,काँग्रेस सत्तेत आल्यास अशक्य -इम्रान खान
नवी दिल्ली -भारतात कोण सत्तेत आले पाहिजे यावर आता पाकिस्तानचे हि लक्ष लागून राहिले आहे कि या निवडणुकीत सामान्य माणूस या ऐवजी भारत -पाक हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे हे निवडणूक झाल्यावर स्पष्ट होईलच पण आता निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
इम्रान खान यांनी आपल्याला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआऱपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावंर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचं लढाऊ विमान पाडलं होतं. यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे. काँग्रेस हा विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं की, ‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही’.
यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने डझनहून जास्त दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी विचारलं असता, तो खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही आहे असं त्यांनी सांगितलं.
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ येरवड्यात रैली व खडकीत पदयात्रा
पुणे-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आज
शिवाजीनगर मतदारसंघात आज मोटारसायकल रैली आणि
पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी येरवडा येथील ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे यांच्या
कार्यालयापासून मोटारसायकल तालीस सुरुवात झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे
घेतलेल्या असंख्य युवकांच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. या रैली मध्ये जोशी स्वत सहभागी
झाले होते. ही रैली भगतसिंग चौक -लक्ष्मीनगर- येथे आली असता तेथील गुरुद्वारा मध्ये जाऊन
मोहन जोशी यांनी दर्शन घेतले. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामनगर -शह दालबाबा दर्गा
– डेक्कन कॉलेज- जुना होळकर ब्रीज–राजघराना चौक- गोपी चौक -जुनी तालीम -दर्गा वसाहत -डेपो
लाईन- -आसूडखाना- हुले रोड -शिवाजी पुतळा- -गांधी चौक -सराफ बाजार – आकाश दीप -मेहेता तोवर-
दवंडे चौक -गाडी अड्डा परिसर येथे आली. तेथून या रैलीचे पदयात्रेत रुपांतर झाले. खडकी व खडकी
बाजार परिसरात सुमारे दोन हजार कार्यकर्ते व नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी
नागरिक व व्यापारी जोशी यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देत होते.
कैन्तोंमेंचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन जोशी यांनी यावेळी दिले. या रैली व
पदयात्रेत तरुण आणि व्यापाराचा मोठा सहभाग होता त्यामध्ये मनीष आनंद, ज्ञानेश्वर मोझे, सुरेश
कांबळे, संगीता देवकर, दीप्ती चवधरी, सुनील मलके , कमलेश चास्कर ,दुर्योधन भापकर, अभय सावंत, पूजा
आनंद, ज्ञानेश्वर यादव, तुषार गांधी, निलेश निकम, बाळासाहेब आहेर, राजेंद्र भुतडा, संगीता कचरे, विवेक
कदम यांच्यासह मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सह्भागी झाले होते . नागरिक व व्यापारांनी सर्वांना थंड
पाणी व सरबत दिले.
गिरीश बापटांनी उडविली आघाडीच्या उमेदवारांची खिल्ली (व्हिडीओ)
मुख्यमंत्री भाषणाला उभे रहाताच’त्या’ महिलेने केले धाडस ..(व्हिडीओ)
निवडणूक खर्च निरीक्षक तिवारी आणि गुलाठी यांची एमसीएमसीला भेट
पुणे- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध व्हावी, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मिडीया सेंटरला तसेच जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) निवडणूक खर्च निरीक्षक सौरभ तिवारी आणि प्रियंका गुलाठी यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तहसिलदार पल्लवी घाडगे, नायब तहसिलदार प्रमोद काशीकर आदी उपस्थित होते. एमसीएमसीकडून प्रमाणित करण्यात येणा-या जाहिरातींची कार्यपध्दती, पेडन्यूज याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
नवीन मध्यवर्ती इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्थापन करण्यात आला असून विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जात असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील (कॅण्टीनजवळील) तळमजल्यावरील मिडीया सेंटरमध्ये तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
बोलत नाही, करून दाखवतो हे आमच्या प्रचाराचे सूत्र-महापौर मुक्ता टिळक
पुणे-कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील कोरेगाव पार्क, ताडीवाला रोडवर आज सायंकाळच्या सत्रात प्रचार फेरी काढली.यावेळी माझ्यासोबत राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, मंगला मंत्री, अतुल गायकवाड, पल्लवी जावळे, शिवसेनेचे अजय भोसले, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
-वाहतूक, पाणी, आरोग्य, नदी सुधारणा आदी महत्त्वाच्या विकासकामांना कॉंग्रे सच्या राज्यात राजकीय इच्छा शक्ती अभावाने खिळ बसली होती. केद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या पायाभूत क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू झाली आहेत. म्हणूनच ‘बोलत नाही, करून दाखवतो’ हे महायुतीच्या प्रचाराचे आगामी काळातील सूत्र असेल अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
महापौर टिळक म्हणाल्या, ‘कॉंग‘ेसच्या सत्ता काळात विकास आराखड्याला दहा वर्षे मंजुरी मिळू शकली नाही, शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर प्रकल्प सुरू होण्यास तब्बल ३२ वर्षे प्रतिक्षा करावी लागली, मेट्रोचे काम सुरू होण्यास १३ वर्षे लागली, बसेसची खरेदी अभावानेच झाली, समान पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली, मुळा-मुठा नदीची गटारगंगा झाली. कॉंग्रेस आघाडीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला दैनावस्था प्राप्त झाली होती.’
महापौर टिळक पुढे म्हणाल्या, ‘भाजप सत्तेत आल्यानंतर विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. यावर्षी प्रलंबित एचसीएमटीआर प्रकल्पाचे काम सुरू झाले. मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. सुमारे एक हजार बसेस खरेदीची प्रकि‘या सुरू झाली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ६० साठवण टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जायका प्रकल्पाअंतर्गत मुळा-मुठा शुद्धीकरण व नदीकाठ सुधारणांच्या विकासकामांना प्रारंभ झाला आहे. म्हणजेच आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो हेच या विकासकामांतून निदर्शनास येते. हे प्रकल्प मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बोलत नाही, करून दाखवतो हे आमच्या आगामी प्रचाराचे सूत्र राहणार आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, पथनाट्य, सोशल मीडिया या सर्व माध्यमातून आम्ही आक‘मक आणि सकारात्मक प्रचार करणार आहोत.’
इव्हीएमबाबत सर्तक राहिल्यास आमचा विजय निश्चित-माजी मंत्री हर्षवर्धन पाटील(लाइव्ह )
पुणे : जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपने पूर्ण न केले नाही. त्यामुळे लोकांचा आता भाजपावर विश्वास राहिला नाही. मतदारांचा भ्रमनिराश झाला असल्यानेभाजपाविरोधात मतदान करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. असे असले, तरी इव्हीएम मशिन आणि संबंधित यंत्रणेबाबतपदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सर्तक रहावे लागणार आहे. असा सुचक इशारा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना दिला.
पाटील यांनी पुण्यातील आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचेसरचिटणीस अभय छाजेड, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, शहर काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख रमेश अय्यर उपस्थितहोते.
पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळ आहे. लोकांना टँकर मिळत नाही. जनावरांना चारा नाही. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी, जिल्हा बँका, शेतकरी, कष्टकरी, तरूण अडचणीत आहेत. राज्यावरील कर्जात दुप्पटीने वाढ झाली आहे. ग्रामसेवकांप्रमाणे आयपीएस आएएसच्या दर महिन्याला बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातभाजपाविषयी असंतोष पसरला आहे.
त्यामुळे राज्यात युतीपेक्षा महाआघाडीला जास्तीच्या जागा मिळणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
मागील पाच वर्षांत कधी नव्हे इतका सामाजिक तणाव होता. सद्य:स्थितीतही राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे आश्वासने आणि फसविगिरीला लोकविसरणार नाहीत. आमच्या धनदांडगे लोक नाहीत, जाहीरातीत तसेच फ्लेक्सबाजी करण्यात आम्ही मागे असू, मात्र आमच्या पाठिंशी सामान्य मतदार उभे आहेत. राज्यातासहदेशात कोणत्याच प्रकारची लाट नाही. सरकारवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने त्यांच्या मागे मतेही नाहीत. त्यामुळे फक्त काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इव्हीएममशिनबाबत सर्तकता बाळगल्यास निश्चितच विजय आपला असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामतीत सुळेंना पूर्ण पाठिंबा
लोकशाहीत प्रश्न मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे आमचेही काही प्रश्न होते. ते मांडले, त्याची उत्तरेही आम्हाला मिळाली. त्यामुळे कालच बारामतीतीलआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी इंदापूरात मेळावा घेतला. भोरलाही मेळावा झाला. बारामती मतदार संघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेखंबीरपणे सुळे यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे
त्यांचा चांगल्या मतांच्या फरकाने विजय होईल, यात शंका नाही. तसेच विजयसिंह मोहिते पाटील एका खासगी कामानिमित्तआले होते. ते थेट माझ्या घरी चहाला आले. ती राजकीय भेट नव्हती. चहा घेऊन ते त्यांच्या कामाला निघून गेले. असा खुलासाही पाटील यांनी यावेळी केला.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई
पुणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोहन जोशी यांच्यासारख्या निष्ठावान व सामान्य
कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. ही
लढाई जिंकण्यासाठी मतदारांनी मोहन जोशींना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन
नगरसेवक आबा बागुल यांनी केले.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी
यांच्या प्रचारार्थ आयोजित पर्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत
होते.
मोहन जोशी यांच्या पदयात्रेला आज सकाळी ९.३० वाजता मॅरेथॉन भवन येथून प्रारंभ झाला. ‘पुणे की
खुशी, मोहन जोशी’ येणार येणार पंजा येणार, चौकीदार चोर है..अशा घोषणांचा निनाद, फटाक्यांची
आतषबाजी, देशभक्तीपर गीते तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे झेंडे अशा वातावरणात सुरू झालेली
ही पदयात्रा पुढे इंदिरा मिनीमार्केट, पर्वती दर्शन, मनमाना म्हसोबा चौक, पंचशील चौक, शिवदर्शन, राजीव
गांधी ई लर्निंग स्कूल, शिवदर्शन लक्ष्मीमाता मंदिर,मुक्तांगण शाळा, तावरे कॉलनी, अण्णाभाऊ साठे
नगर, ट्रेझर पार्क, दाते बसस्टॉप, सहकारनगर पोलीस चौक, नवजीवन चौक, पद्मावती वसाहत, वीरकर
सभागृह, चव्हाण नगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत मार्गे जाऊन छत्रपती मंगल कार्यालय येथे
तिचा समारोप झाला.
पदयात्रेच्या या मार्गावर ठिकठिकाणी महिला मोहन जोशी यांना कुंकूम तिलक लावून औक्षण करत
होत्या. अनेक चौकामध्ये फटाके वाजवून आणि मोहन जोशी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत
केले जात होते. शिवदर्शन येथे त्यांच्यावर गुलाब फुलांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. पदयात्रेच्या
मार्गावर ठिकठिकाणी महिला व कार्यकर्ते पदयात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी होत होते. तसेच पदयात्रेत
सहभागी कार्यकर्ते व नागरिकांना नागरिक उत्स्फुर्तपणे द्राक्षे., सफरचंदे, थंड पाणी व टाक देत होते .
मोहन जीशींशी हस्तांदोलन करण्यासाठी देखील झुंबड उडत होती.
पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले, देशातले सध्याचे सामाजिक वातावरण
बिघडले आहे. त्याला मोदी सरकारची धोरणे जबाबदार आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील २० टक्के गरीब जनतेला दारिद्र्य रेषेच्या
वर आणण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘न्याय’सारख्या योजनेचा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे. या
योजनेमुळे देशातील गरिबी संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पदयात्रेत अभय छाजेड, संजय बालगुडे, अश्विनी कदम, नितीन कदम, शशिकांत तापकीर, विनायक
हनमघर, अमित बागुल,हेमंत बागुल, राकेश ताकवले, वैजनाथ वाघमारे, ईश्वर घायाळ, दत्ता कांबळे, प्रमोद
गालिंदे, राणी खत्री, सतीश पवार, प्रकाश अरणे, सोनाली मारणे दीपक ओहाळ, साजीद कुरेशी, इम्तिहाज
तांबोळी, सागर आरोळे, शाम काळे, मामा परदेशी, स्वप्नील नाईक, ताई कसबे, संतोष गोळे, हरीश खर्डेकर,हरीश यादव, महेंद्र गावडे, महानंदा साखरे, रुपेश मारणे, फारूक शेख यांसह शेकडो पुरुष व महिला
कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुण्यात आश्चर्यकारक निकाल लागणार –पृथ्वीराज चव्हाण
पुणे- नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपला मतदार संघ सोडून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तिथे वेगळा निकाल लागला तर आश्चर्य वाटू देऊ नका. तसेच वातावरण पुणे मतदार संघात आहे. गेल्या चार दिवसात या मतदार संघातील मतदारांचा प्रतिसाद बघता पुणे लोकसभा मतदार संघातही आश्चर्यकारक निकाल लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवारा मोहन जोशींच्या प्रचारार्थ कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे पार पडला त्यावेळी चव्हाण बोलत होते. पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले पाटील, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ, लताताई राजगुरू, रफिक शेख, , अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, , भोलासिंगअरोरा, सईम शेख, भारत कांबळे, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, रशीद शेख माजी महापौर प्रशांत जगताप, वालचंद संचेती ,कासमभाई शेख, प्रकाश साळवे, आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मोदी विकास करण्यात अपयशी ठरले असून त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी पायाभूत सुविधांची कामे केली मात्र शिक्षण आरोग्य याबाबत काहीच काम केले नाही. शेतकऱ्यांच्या मालाला किमती न देता ग्राहकांना कमी दरात शेतीमाल मिळण्यासाठी चुकीचे आयात निर्यात धोरण त्यांनी राबवले. नोटबंदी , जीएसटी सारखे अविचारी निर्णय घेतले. मोदींना सत्ता मिळाली परंतु त्यांची हुकुमशाही प्रवृत्ती आहे. ते लोकशाही मान्य असल्याचा ते केवळ देखावा करतात. परत त्यांच्या हातात आत्ता गेली तर पुन्हा निवडणुका न होण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मोदींना प्रश्न विचारले की प्रश्न विचारणारा लगेच देशद्रोही ठरतो. त्यामुळे मोदी प्रत्येक बाबतीत या देशाच्या भवितव्यासाठी घातक आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रकाश आंबेडकरांनी काय गणित मांडले माहिती नाही. मात्र, त्यांच्या उमेदवारांमुळे मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय बातम्यांना मोदी उत्तर देत नाही. निवडणुका जवळआल्या की राष्ट्रीय सुरेक्षचा प्रश्न चर्चेत आणायचा असे हे मोदी ही निवडणूक व्यक्ती केंद्रित करू करू पाहत आहे, परंतु तुंम्ही त्यांना उत्तरे देत बसू नका, तर त्यांना प्रश्न विचारा असे आवाहन त्यांनी केले.
अरविंद शिंदे म्हणाले,लोकसभेची ही एकमेव निवडणूक आहे. जिथं जिथं जातो तिथं भाईचारा, दलित आणि
अत्याचाराचा विषय, बरोजगरीची भाषा संविधान धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पामनामध्ये
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात नेहेमी विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली गेली आहे. 11 दिवस जलपर्णीचा विषय
सभागृहात मांडला तर ६० ते ७० पोलिसानी घराला वेढा घातला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला . बापटांनी
पोलिसांना सांगून एक दिवस तरी आत टाका, असे सांगितले. जलपर्णीच्या २३ कोटींच्या निविदेबाबत आपण काही
बोलायला गेलो की हे दुसरेच काहीतरी बोलणार. असे ते म्हणाले.
रमेश बागवे म्हणाले, या देशात लोकशाही आणायची की हुकुमशाही आणायची हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.
मोदी सरकारने एकही विकासकामे केले नाही. शेतकरी, गरिबांची चेष्टा करून त्यांनी लोकांना फसवले. प्रत्येकाला
आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे. मात्र, भाजप सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच
गदा आणली आहे. मोदी महात्मा गांधींचा उदोउदो करतात परंतु गांधीजींची हत्या केली त्या नथुराम गोडसेचे मंदिर
बांधण्याची भाषा भाजपचे खासदार करतात त्यांच्याबाबत मोदी काही बोलत नाही आणि कारवाईही करत नाही. देशात
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. दलितांची, बेरोजगारांची
फसवणूक केली कॉंग्रेसने केलेला अन्न सुरक्षेचा कायदा भाजपने रद्द केला अशी टीका त्यांनी केली.
प्रशांत जगताप म्हणाले, एक खासदार, पालकमंत्री, आठ आमदार, ९७ नगरसेवक एवढे असूनही भाजपकडून पुणे
शहराला काय मिळाले याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्रामध्ये डॉ. मनमोहनसिंगांचे सरकार असताना
विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुणे शहरासाठी केंद्राकडून २८०० कोटी रुपये
पुणे शहरासाठी मिळाले. त्यातून बीआरटी, जॅकवेल अशी अनेक कामे मार्गी लागली. गिरीश बापट यांना पालकमंत्री
असूनही २८० रुपये सुद्धा केंद्रसरकारकडून आणता आले तर नाहीच त्याउलट त्यांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळवले,
अशी टीका त्यांनी केली.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, कॅन्टोन्मेंटचा अध्यक्ष हा लोकांमधून निवडून गेलेला असावा यासाठी सरकार
बदलण्याची आवश्यकता आहे. या देशाचे संरक्षण खर्या अर्थाने महात्मा गांधीं, ६४ गोळ्या अंगावर झेलून इंदिरा गांधी
आणि आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या राजीव गांधींनी केले आहे. असे असताना पंतप्रधान मोदी आपण चौकीदार
असल्याचे सांगतात परंतु हे सरकार निकामी आहे. मोदींना कुटुंब नाही, मुले नाही ते देशाला काय सांभाळणार असा
सवाल त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यात, विकासात, विविध संस्थांच्या निर्मितीत आणि विज्ञान व तंत्रज्ञानात जी
प्रगती झाली ते कॉंग्रेसच्याच काळात झाली आहे. म्हणून देशात पुन्हा आघाडीचे सरकार आणण्याची आवश्यकता
आहे, त्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा असे आवाहन त्यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली. लोकांना परिवर्तन
हवे आहे, हे लोकांना भेटल्यानंतर लोकच सांगतात. आता उरलेल्या दिवसांमध्ये राहुल गांधींचा संदेश, त्यांनी
जाहीरनाम्यात दिलेली न्याय योजना या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
कमल ढोले पाटील, सुजाता शेट्टी, भीम आर्मीचे दत्ता पोळ, राष्ट्रवादीचे कासमभाई शेख, दलित पंथरचे प्रकाश
साळवे यांचीही यावेळी भाषणे झाली. अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप परदेशी यांनी आभार मानले.
मतदार जनजागृतीसाठी ‘यशस्वी’ संस्थेचा पुढाकार
पिंपरी : निवडणूक प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे स्विप कार्यक्रम (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्राम) राबविला जातो. याच स्विप अंतर्गत ईव्हीएम – व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्या कार्यक्रम यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी बोलताना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व स्विप व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी आशाराणी पाटील यांनी सांगितले की, निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो . मात्र यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा ठाम निश्चय करायला हवा, कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा.तर याप्रसंगी बोलताना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उपायुक्त व मतदान नोंदणी अधिकारी डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले की, प्रत्येकाने स्वतः मतदानाचा हक्क बजावतानाच मित्र नातेवाईंकांनाही मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रोत्साहित करायला हवे.
यावेळी सर्वांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफेबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ईव्हीएम यंत्रावर असलेल्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन दाबल्यानंतर उमेदवाराचे नाव, क्रमांक, चिन्ह उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लीप ७ सेंकद मतदाराला दिसणार आहे, त्यानंतर आपोआप हि स्लीप कट होऊन बीप वाजल्यानंतर स्लीप सीलबंद पेटीत जमा आहे, यामुळे मतदारांना आपण दिलेल्या मताची खातरजमा करता येणे शक्य झाले आहे. यावेळी अतिरिक्त निवडणूक तहसीलदार राधिका हावळ यांनीही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी केले तर आभारप्रदर्शन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी केले. या कार्यक्रमाला निवडणूक नायब तहसीलदार उषा ठोंबरे, नायब तहसीलदार विमल डोलारे, आय. टी. असिस्टंट ढेकळे यांच्यासह निवडणूक कार्यालयाचे विविध पदाधिकारी तसेच ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक संजय छत्रे, सर्व विद्यार्थी, अध्यापक वर्ग व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आदिती चिपळूणकर व शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.



