Home Blog Page 2957

अलंकृता हा ठरला एकमेव दागिन्यांचा सुरेल रसाळ ठेवा

0

पुणे-‘अलंकृता’ हा डॉ.अभिजित नातू यांची संकल्पना असलेला  आणि डॉ.रेवा नातू यांची स्वरश्रीमंती लाभलेला बहारदार आणि देखणा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे दर्जेदार निवेदन मंजुषा उकिडवे आणि डॉ.मृणाल धोंगडे यांनी केले.अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक अश्या संवादाने त्यांनी या स्वर मैफिलीचे सूत्र गुंफले होते.आतिशय अनमोल असे संस्कृतीचा ठेवा असलेले अलंकार शब्द सुरांच्या माध्यमातून आलंकृत होत मैफल सजली होती.

पारंपारिक नथ,हार,पोहेहार ,चपलाहार,तन्मणी,वाकी, वाळे, पैंजण,एक स्तराची-कांची,आठ स्तरांची-मेखला,सोळा स्तरांची-रसना ,असे भरजरी अलंकार द्रुकश्राव्य  माध्यमातून  दाखवण्यात आले.वेगवेगळ्या  प्रांतातून अलंकार कसे असतात ते कशापासून तयार करतात स्त्रियांना या अलंकारांची कशी आवड असते.हेसांगून  गीतातून राजस्थानी मुन्दरी कोरस या मधून सादर केला.स्नेहल नाईक,आरती मांडके,सानिका सोमण,क्रांती साठे.यांची कोरससाथ एकसुरात होती.त्यावेळी तबलासाथ करणारे अक्षय शेवडे यांनी उत्तम ढोलक वाजवला.हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्या बरोबरच शंख वाजवला त्यावेळी  ऋषभ नातू यांनी गिटार साथ केली.त्यामुळे हा स्वरकोलाज जास्त उठावदार झाला.

रेवा नातू यांनी गेलेले “सूर्यकिरण मज भासे”हे पद पारंपारिक नाट्य गीताची आठवण करून देणारे ठरले.उमेश पुरोहित यांची संवादिनी साथ तर छानहोतीच पण त्यांनी गेलेली नाट्यसंगीतातील साकीच्या धरतीवरील रचना उठावदार झाली. स्त्री धन म्हणून अलंकारांचे महत्व,पुरुषांचे अलंकारांची जंत्री सुद्धा सांगितली.बाळ लेणी ल्यायलेला’ परब्रह्म निष्काम तो हा’हि रचना  डॉ .रेवा नातू यांनी गायली रसिकांनी त्याला टाळ्या आणि वन्समोअर दिला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या मैफलीस लाभला.

संदर कार्यक्रमाचे लेफ्ट. कर्नल फडकर सर यांच्या हस्ते ऊद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता व त्याबरोबर कार्यक्रमात गोळा झालेली  ऐच्छिक देणगी ‘भारत के वीर’ या शहीद जवाणांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक श्री. आशिष कांटे यांनी दिली. हीच  या कार्यक्रमाची सामाजिक खासियत ठरली.

मोहन जोशी ईरसाल पुणेकर…

0

विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता यात आणखी भर पडली असून श्रीचं स्मरण करून ६६ व्या कलेबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे. ही कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ’६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “६६ सदाशिव” या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये मोहन जोशी यांच्या विविध भावमुद्रा बघायला मिळतात. एका पोस्टर मध्ये ’६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असून हा चित्रपट, पुण्याच्या काही भन्नाट स्वभाव-गुणधर्मांचं हटके दर्शन घडवणार असे दिसते.

’६६ सदाशिव’ हा  ‘पुणे टॉकीज  प्रा. लि.’ यांची पहिली निर्मिती असून  हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत लाभले असून छायांकन अजित रेड्डी यांचे आहे. मोहन जोशी यांच्यासह आणखी कोणते कलाकार चित्रपटात आहेत, हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.  ६६ व्या नव्या कोऱ्या कलेचा शोध घेऊन, त्याचं शास्त्र, रचना आणि आपल्या प्रत्येकाच्या जगण्यातलं या कलेचं अविभाज्य स्थान समजावून सांगणारा, भन्नाट व्यक्तिरेखांनी नटलेला ईरसाल कलाविष्कार असलेला ’६६ सदाशिव’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हिरव्या देठाच्या पुण्याच्या पुढाऱ्याला संसदेऐवजी तमाशा बारीलाच पाठवा – मोहन जोशी

पुणे-आपला देठ अजून हिरवा असल्याचे जाहीर समारंभात कौतुकाने सांगणाऱ्या पुण्याच्या
पुढाऱ्याला संसदेत पाठवण्याऐवजी तमाशाच्या बारीला पाठवणे अधिक शोभून दिसेल असे
प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केले. आज
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात प्रभाग क्रमांक २ व ६ मध्ये आयोजित पदयात्रेच्या
समारोपा नंतर ते बोलत होते. या पदयात्रेचे आयोजनात माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील
टिंगरे, आणि किशोर विटकर आदींचा विशेष पुढाकार होता.
ते पुढे म्हणाले की, पुण्याचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी आपण रात्री कसल्या व्हिडीओ
क्लिप्स बघतो याचीही जाहीर माहिती एका कार्यक्रमात दिली होती. त्याच कार्यक्रमात आपला देठ
अजून हिरवा आहे असे ते म्हणाले होते. पुण्याला सुसंस्कृत खासदारांची परंपरा आहे त्या
पार्श्वभूमीवर अशा हिरवट देठाच्या पुढाऱ्याला संसदेत पाठवण्याऐवजी तमाशा बारीला पाठवणेच
अधिक योग्य ठरेल असेही जोशी यांनी म्हटले.


आज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात प्रभाग क्रमांक २ आणि ६ येथे मोहन जोशी
यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा परिसरात भाजी मंडई व आसपासच्या
परिसरात नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पर्णकुटी चौक येथून पदयात्रेस प्रारंभ
झाला. कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे झेंडे घेत शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी
झाले. या पदयात्रेचे मार्गावर जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी गणेश मंडळे,
व्यापारी व नागरिकांनी सर्वांना थंड पाणी व सरबत देऊन स्वागत केले. ही पदयात्रा येरवडा –
गाडीतळ – सादलबाबा – गुंजन चौक – शास्त्रीनगर – नागपूर चाळ – आंबेडकर सोसायटी –
फुलेनगर – भारत नगर – शांतीनगर – मेंटल क्वाटर्स – पंचशील नगर – जाधवनगर –
कस्तुरबा सोसायटी या मार्गाने जाऊन विश्रांतवाडी चौक येथे समाप्त झाली.
या पदयात्रेत बापू पठारे, सुनील टिंगरे, सुनील मलके, संगीता देवकर, किशोर विटकर, राजेंद्र खांदवे, भगवान
जाधव, राजेंद्र कांबळे, नाना नलावडे, जॉन पॉल, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर मोझे, विनायक माळी, जितेंद्र गुप्ता, बाबा
नायडू, शिवानी माने, सुनील गोगले, विशाल मलके, रमेश सकट, विकास टिंगरे, सुनिता भोसले, संतोष आरडे, सुनील
मोझे यांसह कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महात्मा फुले जयंती निमित्त आदरांजली -कोपरासभा सभांसाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी

0

पुणे -महात्मा फुले जयंती निमित्त कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी महात्मा फुले
वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी पुणे शहर कॉंग्रेस सरचिटणीस अजित दरेकर, उमेदवार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चवधरी, पुणे शहर
जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अॅड. अभय छाजेडआदी मान्यवर उपस्थित होते .

कोपरासभा सभांसाठीचे शुल्ककमी करण्याची मागणी

दरम्यान लोकसभा मतदार संघात कोपरासभा (कॉर्नर मीटिंग) घेण्यासाठी पुणे महानगरपालीकेने अव्वाच्या
सव्वा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एका कोपरा सभेसाठी तब्बल साडेसात हजार रुपये शुल्क
आकारण्याचा निर्णय पुणे मनपाने घेतला आहे. या रकमेमध्ये ४ हजार रुपये मूळ फी असून १००० रुपये सभे
नंतरच्या स्वच्छतेसाठीचा आकार आणि २५०० रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात येत आहे. एका कोपरा
सभेला एवढी रक्कम ही खूपच जास्त वाटते. यापूर्वी कोपरा सभेचे दर खूपच कमी होते. पुणे लोकसभा मतदार
संघात एकूण २० लाख ७४ हजार मतदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असलेल्या मतदार संघात
मतदाराशी संपर्क करण्यासाठी किमान ३०० कोपरा सभा घेण्याची गरज भासते. मात्र त्यासाठी मोजावी
लागणारी किंमत किमान १५ लाखाच्या घरात जाते. कोणत्याही उमेदवाराच्या संपूर्ण निवडणूक खर्चाला
निवडणूक आयोगाने ७० लाखाची मर्यादा घातली आहे. अशा अवस्थेत केवळ कोपरा सभांवर १५ लाख रुपये
खर्च करणे कोणालाही परवडणारे नाही. मोठ मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेद्वाराना देखील ही एवढी मोठी
रक्कम परवडत नाही. असे असताना एखाद्या अपक्ष उमेदवाराला तेवढा मोठा खर्च कसा परवडेल. यासाठी
निवडणूक आयोगाने खास लक्ष देऊन कोपरा सभांसाठी पुणे महानगर पालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क
कशी कमी करता येईल याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
या संदर्भात पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर यांनी निवडणूक
आयोगाला खास पत्र पाठवून याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित सामाजिक विकास- गिरीश बापट यांची ग्वाही

पुणे-बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणार्‍या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या विचारांवर आधारित सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबध्द असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंतीनमित्त ‘समता भूमी’ येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बापट यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
बापट म्हणाले, ‘समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला-मुलींचे शिक्षण यावर ज्योतिबा फुले यांनी भर दिला. सामाजिक न्यायाबाबत त्यांचे विचार सुस्पष्ट होते. त्यांच्या विचारांच्या आधारेच आम्ही राज्यकारभार करीत आहोत.’
बापट पुढे म्हणाले, ‘महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इतर मागासवर्गीय समाजासाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. राज्यात ३२ टक्के इतर मागासवर्गीय समाज आहे. त्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रालयामार्फत  २४ योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय समाजासाठी कि‘मीलेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांहून सहा लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे या समाजाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्‍वास वाटतो.’
नगरसेवक राजेश येनपुरे, सम‘ाट थोरात, महेश लडकत, आरती कोढरे, मनिषा लडकत, विजयालक्ष्मी हरिहर, हेमंत रासने, अजय खेडेकर, विशाल धनवडे, अविनाश साळवे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, संदीप लडकत, विष्णू हरिहर, राजेश बारगुजे, संदीप गायकवाड, योगेश पिंगळे, मंजिरी धाडगे, वैशाली नाईक, प्रमोद कोंढरे, ऍड विवेक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

तूर-डाळ घोटाळ्यांबाबतच्या आरोपांना गिरीश बापट यांनी उत्तर द्यावे – आ. शरद रणपिसे

पुणे-‘ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम करताना गिरीश बापट यांच्यावर सुमारे अडीचशे कोटींचा तूर-डाळ विक्रीसंबधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. गिरीश बापट हे आता भाजपतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे आपल्यावरील झालेल्या आरोपांबाबत त्यांनी पुण्यातील जनतेला उत्तर द्यावे” असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार शरद रणपिसे यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना केले. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच प्रदेश काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष गौतम आरकडे आदी उपस्थित होते.
आमदार शरद रणपिसे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. तूर-डाळ घोटाळा, चिक्कीघोटाळा अशी त्यापैकी अनेक उदाहरणे आहेत. त्याबाबत आम्ही विरोधी पक्षांनी अनेकवेळा विधिमंडळ सभागृहात प्रश्न उपस्थित केले मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना स्वतःच न्यायाधीश असल्याप्रमाणे क्लीनचिट दिली. मात्र एक नैतिकता म्हणून तूर-डाळ घोटाळ्याबाबत आपल्यावरील झालेल्या आरोपांबाबत गिरीश बापट यांनी पुण्यातील जनतेला उत्तर द्यावे असे त्यांनी आवाहन केले.
मोदी सरकारवर टीका करताना शरद रणपिसे म्हणाले, ‘मैं नही खाऊंगा, ना किसीको खाने दूंगा’ अशा मोठ्या घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आले परंतु राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यावरून मोदी सरकार भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले आहे. राफेल-प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाहीत असा सवालही रणपिसे यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला अतिशय अनुकूल वातावरण आहे असे सांगताना आ. रणपिसे यांनी गुरुवारी झालेल्या विदर्भातील पहिल्या फेरीतील मतदान लक्षात घेता विदर्भातील काँग्रेस आघाडीचे बहुसंख्य उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.


याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, मोदी सरकारच्या राजवटीत दलित, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक जमातींवर अत्याचारच झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना बदलण्याचेही प्रयत्न झाले. त्यामुळे समाजातील सर्वच घटक असंतुष्ट आहेत. जनतेच्या मनातील या असंतोषाचे सुप्त दर्शन लोकसभा निवडणुकीतील प्रचारात दिसून येत आहे. त्यामुळे सरकारविरोधी वातावरणाची परिणीती निश्चितच भाजपच्या पराभवात होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू – खासदार काकडे

0

सर्वाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्ता काम करेल
खासदार संजय काकडेंना विश्वास
भोर : भोर व वेल्हा भागातील धरणग्रस्तांचे पूनर्वसणाचे प्रश्न आणि इतर विकासाभिमुख कामे मार्गी लावू. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा शब्द खासदार संजय काकडे यांनी आज भोर तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्यात दिला. तसेच, लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी काम करावे, असेही खासदार काकडे म्हणाले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार सौ. कांचन कुल यांच्या प्रचारार्थ भोर व वेल्हा विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख राजेश पांडे, शिवसेनेचे कुलदीप कोंडे शिवसेना, नगरसेवक शंकर पवार व राजेंद्र शिळीमकर, भाजप माथाडी संघटनेचे अध्यक्ष दिनेश धाडवे, पप्पू घोलप आणि भोर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोर आणि वेल्हा परिसरातील बहुसंख्य नागरिकांचे पूनर्वसनाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असून, या भागातील धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

‘स्वर सन्निध’संस्थेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उदघाटन

0
पुणे :भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत ‘ स्वर सन्निध ‘या संस्थेचे पिंपरी -चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले .
गुढी पाडव्याच्या दिवशी ढेपे वाडा येथे झालेल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीने या संस्थेचा औपचारिक प्रारंभ झाला .प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक ,गायिका अर्चना कान्हेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
संस्थेच्या संस्थापक मीनल दातार (शास्त्रीय गायन ),निखिल पटवर्धन(सतार वादन )यांनी ही उदघाटनाची मैफल रंगवली . हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर ,तबल्यावर निषाद पवार यांनी साथसंगत केली .
निखिल पटवर्धन यांनी सतारीवर  जौनपुरी राग सादर करून रसिकांची मने जिंकली .मीनल दातार यांनी  अल्हैया बिलावल राग सादर करून श्रोत्यांना भारावून सोडले.’दैय्या कहा गये ‘ या बडा ख्यालाबरोबर ‘कवन बतरीया गईलो’ही मध्य लयीतील अप्रतिम बंदिश त्यांनी सादर केली. शेवटी ‘जा रे ,जा रे’ ही द्रूत लयीतील  बंदिश आणि ‘का धरिला परदेस ‘ हे नाट्यपद ,’अवघा रंग एक झाला ‘ हा अभंग दातार यांनी सादर केला .
‘भारतीय शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत ,सर्व माध्यमातून पोहोचविणे   हेच ‘स्वर सन्निध ‘संस्थेचे ध्येय्य असून संस्था या ध्येययपूर्तीसाठी कार्यरत राहील ‘,असे प्रतिपादन मीनल दातार यांनी यावेळी बोलताना केले . श्रावण हर्डीकर यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून संस्थेला शुभेच्छा दिल्या .

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा – शब्बीर अन्सारी

0

मुंबई( प्रतिनिधी ) – ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषित केले आहे.

यावेळी अन्सारी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्र पक्षाला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जाहीर पाठिंबा आम्ही दिला असून आमची प्रदेश कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी पूर्ण ताकतीने काम करणार आहे असे सांगितले. गेल्या 50 वर्षांपासून आम्ही मुस्लिम समाजासाठी काम करतोय. युतीचे सरकार आम्ही पाहिले पण आताचे युती सरकार हे अतिशय वाईट राजकारण करत आहे. ओबीसी समाजासाठी फक्त घोषणा करून घोर फसवणूक केली असल्याचे अन्सारी यांनी स्पष्ट केले. लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या मिळत नाही आहेत. याला जवाबदार कोण ? असा सवाल अन्सारी यांनी उपस्थित केला. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीपूर्वी भारंभार आश्वासने देत हे दोन्ही पक्ष सत्तेत आले. पण बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेलीच नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकार मधील मंत्र्यांकडे मुस्लिम ओबीसी समाजासाठी वेळ मिळत नाही. मग हे सरकार हवं आहे तरी कशाला ? असा गंभीर प्रश्न अन्सारी यांनी उपस्थित केला.

यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा सचिव वसीम अन्सारी, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बापटांनी दिला राजकीय आठवणींना उजाळा

0

पुणे-पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी कमला नेहरू उद्यानात ङ्गिरायला, व्यायामाला येणार्‍या नागरिकांच्या भेटी घेतल्या. ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्यानातील समधीला अभिवादन केले, ज्ञानकोषाचे पूजन केले.
तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि आता लोकसभेचे उमेवार असा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास याच परिसरातून सुरू झाला. १९८३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले होते.
पहिल्यांदा विजयश्रीची माळ गळ्यात घालणारे मतदार आणि कार्यकर्त्यांच्या बापट यांनी भेटीगाठी घेऊन पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. माधव ढेकणे, सुभाष महागावकर, शिरीष बोधनी, शाम भुर्के या जुन्या स्नेह्यांशी विशेष संवाद साधला.
कमला नेहरू उद्यानासमोरील कचेरी, भेळ भत्ता, घरचा डबा आणून अंगतपंगत बसून केलेल्या जेवणावळी, रात्र रात्र जागुन रंगविलेल्या भिंती, हाताने लिहिलेल्या स्लिपा, घरोघरी पोहोचून केलेला वैयक्तिक संपर्क अशा आठवणींना उजाळा दिला. बापट यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. पहिल्यापासून साथ देणार्‍या कार्यकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. उद्यानात ङ्गिरायला आलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, आदित्य माळवे, महेश लडकत, दत्ता खाडे, संदीप काळे, गणेश बगाडे, दिलीप शेळके, नितीन कुवर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

टेनिस स्पर्धेत नील केळकर, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद

0
 
पुणे:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर याने, तर मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
 
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत मुलींच्या गटात चौथ्या मानांकीत प्रिशा शिंदेने तिस-या मानांकीत मृणाल शेळकेचा 5-4(5), 4-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीत प्रिशाने रित्सा कोंडकरचा 6-0 असा एकतर्फी सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रिशा ही संस्कृती स्कुलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून सोलारीस क्लब येथे प्रशिक्षक रविंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटातील हे दुसरे विजेतेपद आहे. 
 
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बिगरमानांकीत  नील केळकरने दुस-या मानांकीत द्रोण सुरेश यांचा 4-1, 5-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. नीलने उपांत्य फेरीच्या लढतीत दहाव्या मानांकीत शौनक सुवर्णाचा 6-2 असा पराभव करत अंतिम फरीत प्रवेश केला. नील हा सिंबायोसीस शाळेत तिसरी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना क्लब येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषीके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फिनआयक्यूच्या क्रीडा समितीचे चेअरमन राजवीर सिंग व सुशिल जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, अविनाश कोकणे, प्रनिल धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:  
प्रिशा शिंदे(4) वि.वि.रित्सा कोंडकर 6-0
मृणाल शेळके(3) वि.वि.  मेहक कपूर(2) 6-0
अंतिम फेरी:
प्रिशा शिंदे(4) वि.वि. मृणाल शेळके(3) 5-4(5), 4-1
 
10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
नील केळकर वि.वि.  शौनक सुवर्णा(10) 6-2
द्रोण सुरेश(2) वि.वि.  अयान शेट्टी(5)6-5(6)
अंतिम फेरी: 
नील केळकर वि.वि.   द्रोण सुरेश(2) 4-1, 5-3

जिल्‍हाधिकारी राम आणि पोलीस अधीक्षक पाटील यांचा दौंड तालुकयात पहाणी दौरा

0

पुणे- जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज दौंड तालुकयाचा दौरा करुन लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस उप अधीक्षक सचिन बारी यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तहसिल कार्यालयात झोनल अधिका-यांना मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी राम यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन, व्‍हीव्‍हीपॅटच्‍या प्रशिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुस्थितीत होण्‍यासाठी झोनल अधिका-यांचे योगदान महत्‍त्‍वाचे असून प्रत्‍येकाने आपल्या कामात  दक्ष रहावे. यापूर्वीच्‍या निवडणुकांचा अनुभव असला तरी यंदाच्‍या निवडणुकीत व्‍हीव्‍हीपॅटचा वापर असल्‍याने मतदान यंत्र हाताळणी करतांना खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या.

मतदानाची टक्‍केवारी वाढण्‍यासाठी मतदार जागृती कार्यक्रम राबविला जात आहे.  जिल्‍हाधिकारी राम यांनी या उपक्रमांतर्गत सादर झालेलया पथनाट्याची पहाणी करुन कलाकारांचे कौतुक केले. जिल्‍हाधिकारी राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच स्‍ट्रॉंग रुमची पहाणीही केली. स्थिर  सर्वेक्षण पथक, आचार संहिता कक्ष आदींचीही माहिती यावेळी घेण्‍यात आली.

‘लोकराज्‍य’च्‍या लोकसभा निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन

0

पुणे-  लोकसभा निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व बाजूंची व्‍यापक माहिती देणा-या ‘लोकराज्‍य’च्‍या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन आज झाले.  जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्‍या (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) समन्‍वय अधिकारी तथा आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे,सोशल मिडिीयाच्‍या पोलीस उप निरीक्षक श्‍यामल पोवार, अविनाश लोहर,  टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्‍य-सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पुणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे,सहायक संचालक वृषाली पाटील आदी उपस्थित होते.

लोकराज्‍यच्‍या विशेषांकामध्‍ये लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 ची आकडेवारी, सी-व्‍हीजील अॅप, मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या विविध सुविधा, निवडणूक प्रशिक्षण, समाजमाध्‍यमांचा वापर, पेड न्‍यूज, आदर्श आचार संहिता, निवडणुकांचे बदलते तंत्र याबाबत विस्‍तृत माहिती देण्‍यात आली आहे. हा अंक संग्रहणीय असून सर्वांना उपयोगी पडेल, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात  आला.

बापटांना बिराजदारी हिसका दाखवून चीतपट करू – मोहन जोशी

पुणे – पुणे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गिरीष बापट यांनी माझा उल्लेख रेवड्यावरचापहिलवान असा केला. पण
त्यांना सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा इतिहास महिती नसावा. सतपालांना पुण्यात चारीमुंड्या चीत
करणा-या हरिश्चंद्र बिराजदार हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेत राहून मस्तवाल झालेल्या गिरीश
बापटांना आम्ही बिराजदारांचा हिसका दाखवून चारीमुंड्या चीत करू असे खुले आव्हान, पुणे शहर लोकसभा
मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांनी आज संवाद यात्रेच्या सांगता सभेत दिले.
मोहन जोशी पुढे म्हणाले, माझा जन्म खडकमाळा आळीचा, तर माझी जडणघडण चिंचेच्या तालमीत आणि पुणेकरांचा
तालमीत झालेली आहे. या निडणुकीत गिरीष बापट यांना चारीमुंड्या चीत केले नाही तर पुन्हा पुणेकरांसमोर मतं
मागायला येणार नाही. या सभेत बोलताना आमदार अनंतराव गाडगीळ यांनी मोदींच्या स्टाइलने कार्यकर्ते व
नागरीकांना प्रश्न विचारले…….खात्यात 15 लाख जमा झाले का ? रोजगार मिळाला का ? मेट्रो पुण्यातून धावली का ?
वगैरे सर्वच प्रश्नांची उत्तरे “नाही” अशी येत असतानाच मग काहीही न करणा-यांना मतदान करणार का ? असे
विचारताच सर्वांना एक सूरात “नाही” असे सांगितले. राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम यांनी गेल्या वर्षी
पावसाळ्यात धरणे पूर्ण भरलेली असतानाही आपल्याला पुरेसे पाणी केवळ पालकमंत्र्यांमुळे मिळू शकत नसल्याने त्यांना
या निवडणुकीत पराभूत केलेच पाहिजे असे आव्हान केले. शिवाजी गदादे पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या
नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या जोरावर पुण्यातून सर्वाधिक मताधिक्य मोहन जोशी यांना निवडणुकीत देऊ अशी ग्वाही
दिली. या निवडणुकीत उरलेल्या दिवसात कार्यकर्त्यांनी आता घरोघर जाऊन आपणच उमेदवार मोहन जोशी आहोत य़ा
भावनतून मतदारांशी संवाद साधावा असे आवाहन नगरसेवक आबा बागूल यांनी केले.
या संवादयात्रेत काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गदादे पाटील, संजय बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे, काँग्रेसचे पर्वती
ब्लॉकचे अध्यक्ष सतीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम, राष्ट्रवादी कसबा ब्लॉकचे अध्यक्ष
विनायक हणमगर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना विठ्ठल हणमगर, शशिकला कुंभार, अमीत बागूल, सतीश कांबळे,
अभिजीत गायकवाड, राजेंद्र पेशने, आनंद बाफना, विकास लांडगे, जयकुमार ठोंबरे, शशिकांत तापकीर, मदन वाणी,
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.
सहकारनगर मधील संत गजानन महाराज मठात दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केले.
देवदर्शनानंतर जवळच्या डॉ. आंबेडकर वसाहतीत कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले. तेथे सर्वांशी संवाद साधल्यावर, मठाच्या
समोरच्या बाजूल असलेल्या वसाहतीत जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दत्तवाडी पोलिस स्टेशन,
लक्ष्मीनगर, पर्वतीगावातून संवाद यात्रा जनता वसाहतीत गेली. आजच्या संवाद यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक वेळ
सुमारे तीन तास मोहन जोशी हे जनता वसाहतीत मतदारांशी संवाद साधत होते. रस्त्यावर जीपमधून तर कुठे
कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. आजच्या संवाद यात्रेत वाद्यांचा दणदणाट सुरूवातीपासून

होता. जनता वसाहतीच्या प्रवेश व्दाराशी उमेदवार येताच शिवाजीराव गदादेपाटील यांनी “ए बजाओ” असे सांगतात
वाद्यांचा आवाज दुपटीने वाढला कारण त्यात आणखी एक वाद्यवृंद सहभागी झाला होता. जनता वसाहतीच्या प्रवेश
व्दारावर संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. महिलांनी त्यांना ओवाळले.
जनता वसाहत आणि लक्ष्मीनगर परिसरात काही ठिकाणी येत्या रविवारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी कार्यकर्ते करत होते. त्यांना जय भीम म्हणत मोहन जोशी यांनी प्रतिसाद देत होते. जनता
वसाहतीत कुठे शिवगर्जना कुठे महाराष्ट्र गर्जना तर कुठे भीम गर्जना करत संवाद यात्रा चालली होती. अनेक ठिकाणी
कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावून अन घोषणा देत स्वागत केले. संवाद यात्रेच्या मार्गावर दुतर्फा काँगेस, राष्ट्रवादी
काँग्रेस व महाआघाडीतील मित्र पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी मतदार, व्यापारी यांनी लिंबूपाणी,
थंडगार पाणी देत होते. जनतावसाहतीतून सिंहगड रोडवर संवाद यात्रेची सांगता छोट्या जाहीर सभेने झाली.

पुण्यातील राजस्थानी मंडळाचा मोहन जोशी यांना पाठिंबा

0

पुणे-‘राजस्थानचे वनमंत्री सुखराम विष्णोई , जालोर-सुरूही लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार
रतन देवासी तसेच जालोर जिल्हा काँग्रेसचे अध्य्क्ष सबरजित सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत
बिबवेवाडी येथील नाजूश्री सभागृहात बुधवारी पार पडलेल्या राजस्थान समाजाच्या बैठकीत पुणे
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन
जोशी यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. या बैठकीला सुमारे तीन हजाराहून अधिक नागरिक
उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुण्यात राजस्थानी समाज मोठ्या
प्रमाणावर असल्याने पुणे- जोधपूर ही दररोज नवीन रेल्वे तसेच पुणे-जोधपूर विमानसेवा सुरु
करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला राजस्थान समाजाचे ३६-कौमचे सर्व
अध्यक्ष व पदाधिकारी तसेच अशोक जैन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, काका
धर्मावत, जगदीश उणेचा या सह तीन हजारहून अधिक समाज बांधक उपस्थित होते.