विकासकामांवर चर्चा करण्याचे कॉंग्रेस ला आव्हान-आमदार विजय काळे
पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना पुणेकर बुडवितील पाण्यात -गिरीश बापट
लोहियानगरमधील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्वार
पुणे-रामनवमीनिमित्त लोहियानगरमधील श्रीराम समता मंडळाच्यावतीने श्रीराम मंदिराचा जीर्णोद्वार व श्री प्रभू रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली . यावेळी महापूजा , होमहवन करण्यात आले . त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांच्याहस्ते प्रसाद वाटप करण्यात आले .
यावेळी मधुकर चांदणे , संतोष माने , बाळू कसबे , रमेश चांदणे , विष्णू साबळे , राजू भरगुडे , अनिल भोसले , उमेश चांदणे , विलास कसबे व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .
क्षितीची कसरत ‘सेलिब्रिटी’पद राखण्यासाठी!
आजकाल सर्वत्र फोफावलेल्या सोशल मीडियाच्या युगात सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत प्रत्येकाचीच या समाज माध्यमात दिसण्या-वावरण्याची स्पर्धा सुरु आहे. मग त्यात सेलिब्रिटीं कसे बरं मागे राहतील? त्यांच्यासाठी तर हे माध्यम सुवर्णमृगच जणू! पण आपल्या मराठी कलावंतांना याचे विशेष सोयरसुतक नाही. काही अपवाद वगळता आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करणारे मराठी कलावंत अजूनही आहेत! पण या ‘प्लॅटफॉर्मचा’ वापर न करणाऱ्यांविषयी त्यांचे फॉलोअर्स बोंबा मारताना दिसतात. अश्याच सेलिब्रिटींपैकी ‘क्षिती जोग’!
सध्या ह्या अभिनेत्रीची खूपच तारांबळ उडत आहे. पण ही तारांबळ सोशल मीडियासाठी नव्हे तर प्रयोगांसाठी आहे. तिचं नवं नाटक ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ आलं आहे. या नाटकात ती आणि सुमीत राघवन हे दोनच कलाकार आहेत. अर्थातच संपूर्ण डोलारा त्या दोघांवरच आहे. एकावेळी एकच कलाकार स्टेजवर सलग वावरत असल्याने त्याची दमछाक तर होणारच! त्यात क्षितीने आधी घेतलेल्या टीव्ही आणि चित्रपटांमुळे तिची खरीखुरी ‘कसरत’ ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ साठी होताना दिसतेय. सकाळ-संध्याकाळ मालिकांचे चित्रीकरण त्यानंतर प्रयोग करून रात्री चित्रपटांचं चित्रीकरणही ती करतेय. जोगांच्या तिसऱ्या पिढीची हि शिलेदार इतकी दमूनही नाटकात तिची एनर्जी तसूभरही कमी पडू देत नाहीये. तिचं म्हणणं आहे, नाटक हे कलाकाराचं टॉनिक असतं! ते दमवत नाही तर माझा थकवा दूर करते! आणि ‘नॉक नॉक…. ‘ सारखं नाटक करायला मिळणं हेच माझं टॉनिक आहे.
-शरद लोणकर (9423508306)
युवकांना मिळणार उद्योजकतेचे मोफत मार्गदर्शन
पुणे : युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, युवा वर्गात उद्योजकता वाढीस लागावी म्हणून यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी )संस्थानी सहकार्य करार केला आहे.
या करारानुसार ‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना त्यांचे संस्थेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास आता त्यांना भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे व्यवसायाची निवड कशी करावी, व्यवसाय सुरु कसा करावा, व्यवसायासाठी बॅंकेडून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी तसेच असलेला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एखादया व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने, व्यवसायाची जागा, ग्राहक व बाजारपेठेची निवड, व्यवसायातील जोखीम, अडचणी आदी सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी बीवायएसटीचे तज्ञ् सल्लागार मदत करणार आहेत.
‘यशस्वी’ संस्थेच्या विविध स्किल डेव्हलपमेंट सेंटर मधून कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विदयार्थी -विद्यार्थीनींना यामुळे आपले उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा सहजसाध्य होणार आहे.
देशात एकीकडे कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या विविध योजना व स्किल इंडिया मिशनमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण तर उपलब्ध होत आहे शिवाय मुद्रा लोन सारख्या योजनांमुळे त्यांना अर्थसहाय्यदेखील उपलब्ध होत आहे, मात्र उद्योजक होण्यासाठी जी मेंटॉर अर्थात मार्गदर्शकाची मुख्य गरज असते ती गरज बीवायएसटीसारख्या संस्था पूर्ण करू शकतात, आणि त्यामुळे उद्योजकतेची खरी सुरुवात होण्यास मदत होईल असे मत यावेळी ‘यशस्वी’ चे संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.
या सहकार्य करार प्रसंगी ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी तर बीवायएसटीच्यावतीने राष्ट्रीय समन्वयक राधाकृष्णन निपाणी यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी ‘यशस्वी’ चे संचालक अजय रांजणे, संजय सिंग व बीवायएसटीचे पुणे विभागाचे क्लस्टर हेड रोशन अहिरे, क्षेत्रीय अधिकारी विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.
क्रीडाविश्वातून उलगडते संघटनात्मक उत्कृष्टता-ज्येष्ठ पत्रकार अयाज मेमन
समाजाला जोडणारा बंधुतेचा विचार रुजावा – भास्करराव आव्हाड
राम निर्विवाद असून हिंदूंच्या चौकटीत बंदिस्त नाही-डॉ.श्रीपाल सबनीस
मोदींची निवडणूक पाकच्या मुद्द्यावर तर राहुल-प्रियांकाची‘न्याय’च्या मुद्यावर
कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर छाप्यांचा रोज उल्लेख
-मोदींनी गेल्या १० सभांत भोपाळमधील छाप्यांचा उल्लेख तुघलक रोड घोटाळा असा केला.
-याउलट, सरकार घाबरलेले आहे, असे काँग्रेस म्हणत आहे.
– मोदी सरकार ,पोलीस ,सीबीआय ,सह सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकाना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचा कॉंग्रेस आरोप करत आली आहे.
– मोदींनी चौकीदार, नामदार, कामदार, तुकड्या-तुकड्यांची टोळी यांसारख्या शब्दांचा जास्त उल्लेख आपल्या भाषणातून केला. या वेळी ‘शहजादा’ शब्दाचा फक्त दोनदाच उल्लेख.
-मोदींच्या सभेत काँग्रेसमुक्त भारत आणि ‘सबका साथ-सबका विकास’ शब्द ऐकू आले नाहीत.
– राहुल यांनी सर्वात जास्त नरेंद्र मोदी, अनिल अंबानी, नीरव मोदी, मल्ल्या आणि चौकसीचे नाव घेतले. तीन सभांत त्यांनी दहशतवादी अझहर मसूदचाही उल्लेख केला.
-राहुल यांनी राफेल चा उल्लेख फक्त तीन सभांत. युवक, नोटबंदी, शेतकरी, जीएसटीचा उल्लेख आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त सभांत केला.
प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी?
-देश एका सुरात बोलत आहे याचा मला आनंद आहे. जे प्रथमच मत देणार आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की, राष्ट्राशी समझोता मंजूर आहे? प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी नामदार हे आता निश्चित करायचे आहे.असे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नमूद केले आहे .
पीएम मोदी चित्रपट स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात 15 एप्रिलला सुनावणी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती. परंतु , आयोगाच्या या निर्णयाविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
निवडणुकीच्या काळात ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदार प्रभावित होऊ शकतात, असे कारण पुढे करत विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्या विरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती.
चरित्रपटांमध्ये व्यक्तीच्या कामाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिलेली असते. निवडणुकांच्या काळात अशाप्रकारचे चरित्रपट प्रदर्शित करता येऊ शकत नाहीत , असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने त्यावेळी दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. न्यायालयानं त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.
रात्रीस खेळ चाले… (सीरिअल VS क्रिकेट) : लेखिका -पूर्णिमा नार्वेकर
“१०.३० वाजायला आलेत, आता ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू होईल”, सासूबाई उठून रिमोट घेणार इतक्यात…”आजी ‘रात्रीस खेळ चाले’ कुठे पाहते आता, हा बघ इथे रात्रीचा खेळ रंगात आला आहे” ओमकार झटकन म्हणाला. वानखडेवर चालू असलेला ‘मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब’ हा आयपीएलचा क्रिकेटचा सामना जबरदस्त रंगात आला होता. प्रत्येक बॉलला छातीचे ठोके वाढत होते. १० षटकांत मुंबईला फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारता आली होती. पोलार्डने मात्र फलंदाजीची एक बाजू भक्कम सांभाळत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चालवला होता आणि अशा वेळी मॅच मधेच बघायची थांबून सीरिअल लावणे काही शक्य नव्हते. सासूबाईंच्या हे लक्षात आल्यावर त्याही निमूटपणे मॅच बघत बसल्या. मॅच ऐन रंगात आली होती. पोलार्डने हाणलेल्या प्रत्येक चौकार-षटकाराला घरातही मोठ्याने आरोळ्या मारत मॅचवरचे निस्सीम प्रेम व्यक्त केले जात होते. पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबई नक्क्की जिंकणार, असे वाटू लागले असतानाच मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला. पुन्हा आता काय होणार, कोण सरशी साधणार याची मनात धाकधुक सुरू झाली. शेवटच्या षटकात ही उत्कंठा तर टिपेला पोहोचली…कोण जिंकतंय, मुंबई की पंजाब?? आता पंजाब जिंकतोय असं वाटत असतानाच शेवटच्या बॉलला मॅच फिरली आणि मुंबई जिंकली. रात्रीचा हा खेळही रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झाला. आयपीएल सुरू होण्याआधी मार्चमध्येच ओमकारने आजीला साळसूदपणे सांगितले होते, “आजी आता तुझा सीरिअलचा प्राईम टाइम चुकणार. आता आयपीएल आणि नंतर वर्ल्ड कप म्हणजे आमचा प्राईम टाइम चालू होणार.
गार्डनमध्ये संध्याकाळी राऊंड मारताना सुद्धा याचा प्रत्यय आला. नेहमी मुलांचा गोंगाट चालू असतो त्या मैदानात सामसूम होती. गार्डनमध्ये महिला मंडळाचा ग्रुप ७. ३० वाजले तरी गप्पा मारत होता. साधारणपणे ५ ते ६.३०-७ या वेळेत असणारा हा ग्रुप आता गेल्या काही दिवसांपासून उशिरापर्यंत चक्क गार्डनमध्ये कसा? आश्चर्य वाटले म्हणून ग्रुपमधीलच ओळखिच्या मावशींकडे चौकशी केली. “आता रोजच मॅच चालू असते गं, टीव्हीवर सीरिअल वगैरे काही बघायला मिळत नाही; मग आम्ही रिपीट टेलिकास्ट बघून उशिरा संध्याकाळी इकडे येतो”… मावशींनी आयपीएलच्या नावाने बोटे मोडली.
संध्याकाळी ६.३०. ते रात्री ११ हा सीरिअलचा, विशेषतः गृहिणींचा प्राईम टाइम. रात्रीच्या जेवणाची तयारी लगोलग करून रिमोटचा कंट्रोल आपल्याकडे घेऊन सीरिअलचा आस्वाद घ्यायचा हे प्रातिनिधिक चित्र, परंतु त्याच वेळेला मॅच चालू झाली की मात्र त्रागा. घरातल्या घरात द्वंद्वयुद्ध – सीरिअल विरुद्ध मॅच! सीरिअल रेकॉर्ड करून मागाहून बघता येते हो पण मॅचचं तसं नाही ना…ती लाईव्ह बघण्यातच खरी मजा. त्यामुळे आता आयपीएल ते थेट वर्ल्ड कपपर्यंत तरी हा माहोल धुमसत राहणार बहुदा.
वानखडेला पंजाबवर रोमांचक क्षणी मात करून मुंबईने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. मॅच संपली की रात्री उशिरा सीरियल. काही झालं तरी ‘रात्रीस खेळ चाले’चे एपिसोड रात्रीच बघण्यात मजा. क्रिकेटमध्ये मिनिटागणिक जशी वाढत जाते अगदी तशीच उत्कंठा …आज सरिता कशी वागणार आणि वच्छीची सून- शोभा, सरिताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्या नवीन क्लुप्त्या शोधणार…दोन्हीही रात्रीचे हे खेळ रंगात आणणारे!
लेखिका -पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी दिले गावकऱ्यांना आरोग्याचे धडे
पुणे-प्राथमिक आरोग्य केंद्र,खामगाव. ता. दौंड, जि. पुणे, येथे कम्युनिटी रुरल हेल्थ नर्सिंगच्या प्रात्यक्षिक अनुभवा करीता गेलेल्या श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग शिवाजीनगर पुणे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले यामध्ये आरोग्य केंद्रा मध्ये येणाऱ्या गरोदर महिलांचा ओटी भरून सन्मान केला व तेथील आरोग्य कर्मचार्यांच्या मदतीने आशा भागिनिना व गावकऱ्याना विविध आजारांबद्दल माहिती दिली त्यात क्षयरोग,मधुमेह,रक्तदाब,रक्तक्षय,अतिसार आणि मलेरिया ईत्यादींचा समावेश आहे तसेच विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली.
गावामध्ये व शाळांमध्ये जाऊन कुटुंब नियोजन व वैयक्तिक स्वच्छता याविषयांवर पथनाट्याचे सादरीकरण केले तसेच काहि सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले. यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक श्रीमती एन्जेला ब्रेवर, श्रीमती प्रज्ञा जाधव व श्री अमोल कानडे यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती रुपाली लोखंडे व श्री विलास माने तसेच ग्रामस्थांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले आणि यापुढे देखील आम्ही असेच नवनवीन व वेगवेगळे उपक्रम सादर करू असे आश्वासन महाविद्यालयाने गावकऱ्याना दिले.
विदूषकाच्या वेशात स्काऊट–गाईडच्या विद्यार्थ्यांनी केली धमाल !
पुणे-माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात कब-बुलबुल, स्काऊट–गाईडशिबीर आयोजित करण्यात आले.
या दिवशी सकाळी ७.३० वाजता झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत, झेंडागीत, प्रार्थना यानंतर BPG व्यायाम करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना धालेवाडीकर यांनी मुलांशी संवाद साधला. स्वावलंबन व शिस्त याचे महत्व सांगितले. हा उपक्रम राबविण्यामागचे उद्दिष्ट सांगितले.
नाश्ता झाल्यानंतर सर्व मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या सांघिकचित्रकला स्पर्धेचे परीक्षण सौ. मिताली पिंपळे यांनी केले. न्यू इंग्लिशस्कूल येथे श्री.रामदासी सरांनी तारांगण दाखविले. श्री. बापट सरांनी गाणे शिकविले. जोशपूर्ण घोषणा दिल्या. वर्तमान पत्रापासून जोकर तयार करणे ही सांघिक स्पर्धा घेण्यात आली. जेवणानंतर वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर waxपेंटिंगरुमालावर तयार करून घेण्याचे कृतीसत्रसौ.स्वातीराजगुरूयांनी घेतले. श्री. लंके सर यांनी स्काऊट–गाईडच्यासंघनायकानेरिपोर्टिंग कसे करावे हे सांगितले. गटाचे ध्येय असावे, समूहगीत तयार करावे हे सांगितले. श्री.ज्ञानेश वैद्य यांनी मागांच्या खुणा सांगितल्या, उपयोग सांगितले. आरोळ्या दिल्या. सौ. धनश्री कुंटे यांनी कब-बुलबुलच्या मुलांना गोष्टी व गाणी सांगितली. सर्व मुलांना सरबत देण्यात आले. सौ. मयुरी काळे यांनी मुलांकडून गाण्यावर एरोबिक्सचे प्रकार करून घेतले. यानंतर भेळ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ध्वज उतरवल्यानंतर समारोप व बक्षीस समारंभ घेण्यात आला. सौ. मंजिरी पारुंडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. वरदा पटवर्धन यांनी बक्षीसपात्र मुलांची यादी वाचली. निलयमालुसरेयाला उत्कृष्ट संघनायक व मृदुला कासोदेकर हिला उत्कृषसंघनायिका निवडण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण सौ. अंजली पवार, सौ.वरदा पटवर्धन, सौ. सुप्रिया देवढे व सौ. मंजिरी पारुंडेकर यांनी केले. सर्व उपक्रमांमध्ये शिक्षक प्रतिनिधी सौ. वर्षा दिवेकर यांनी सहकार्य केले. पर्यवेक्षक श्री. विकास दिग्रसकर यांनी सौ. कुंटे यांचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सौ. स्वाती राजगुरू, सौ. मयुरी काळे यांनी केले. सौ. कल्पना धालेवाडीकर यांच्या नियोजनाखाली शिबीरउत्तमरित्या पार पाडले. सर्व मावशी-काकांनी यासाठी खूप सहकार्य केले.
महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या पहिल्या संचालकपदी ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची निवड
मुंबई :- महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्वाच्या पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.
जम्मू काश्मीर येथील मूळचे असलेले ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची सेनादलात ३८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. भारतभर विविध ठिकाणी सेनादलाच्या सेवाकाळात त्यांनी महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
ब्रिगेडियर पवनकुमार गंजू हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापन, पत्रकारिता, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध, मार्केटींग, फूड अॅनालायसीस इत्यादी विषयात विविध विद्यापीठातून पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत. याशिवाय त्यांनी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनी सेना प्रशासनात मानव संसाधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महावितरणच्या मानव संसाधन विभागात अधिक सकारात्मक बदल करण्याचा मानस ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रोमुळे शहराच्या शाश्वत व गतीमान विकासाला गती मिळेल-गिरीश बापट
पुणे-सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरभर मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून शहराच्या शाश्वत व गतीमान विकासासाठी गती मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.






