पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. नवीन मध्यवर्ती इमारतीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. आज सकाळी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.
निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्तव यांची मिडीया सेंटरला भेट
पुणे- शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्तव यांनी आज मिडीया सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाची पहाणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सोशल मिडीया तज्ञ टी.पी. शर्मा, एस.बी. निकम आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शिरुर लोकसभेसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदार संघातील निवडणूक प्रचाराबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. शिरुर लोकसभेसाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या फेसबुक, ट्वीटर या सारख्या सोशल मिडीयावर तज्ञांचे लक्ष असून नियमितपणे खात्यांची पहाणी केली जात आहे, तसेच आवश्यकतेनुसार पोलिस विभागाच्या सायबर सेलचीही मदत घेतली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवा मुळशी पॅटर्न निर्माण करणार-खासदार संजय काकडे
मुळशी: मुळशीकरांनी अनेक मुळशी पॅटर्न राबविले व यशस्वी केले आहेत. आता मुळशी प्लानिंगकरून बारामती लोकसभा मतदार संघात इतिहास घडविण्याची संधी आहे. मुळशीकरांनी किमान 20 हजारांचे मताधिक्य दिल्यास हा इतिहास घडेल. मुळशीकर हा इतिहास नक्की घडवतील व आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असू, असा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज येथे केला.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप-शिवसेना व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सतीश केदारी, रासपचे तालुकाध्यक्ष अतुल सुतार, स्वाती ढमाले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदार संघात मुळशी पट्ट्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. आजपर्यंत या भागातील मतदार भाजप व शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळे या निवडणुकीतही मुळशीकरांनी भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना किमान 20 हजारांचे मताधिक्य दिले तर, बारामती लोकसभेत इतिहास घडेल व भाजपाचा उमेदवार विजयी होईल. आणि सद्यस्थिती भाजपाच्या विजयाचीच आहे, असेही खासदार काकडे यावेळी म्हणाले.
‘टेन्शन फ्री भारत’ मोहिमेत ३७१ रुग्णांना लाभ
शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभेत पाठवा -गिरीश बापट
भविष्यात मार्केटयार्ड बाजारपेठेचा संपूर्ण कायापालट -गिरीश बापट
डॉ. बाबासाहेब म्हणजे विश्वाला लाभलेली महान देणगी : बापट
मी खासदार झालो कि आबा बागूलही आमदार होतील -मोहन जोशी
पुणे-महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये असणार्या तीळवन तेली समाजाला यापुढे निश्चितच राजकीय
न्याय दिला जाईल. तसेच जगतगुरू संताजी महाराज जगनाळे यांचे अतिशय चांगले स्मारक
पुण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे
उमेदवार मोहन जोशी यांनी आज दिली. तसेच मी खासदार म्हणून निवडून आलो की तेली
तीळवन समाजाचे नेते आबा बागूलही आमदार असतील असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात
सांगितले.
तीळवन तेली समाजाचा वधू-वर मेळावा कोथरूड येथील आशिष गार्डन येथे संपन्न
झाला. सुमारे ३ हजार हून अधिक उपवर, वधूवर व पालक याप्रसंगी उपस्थित होते. त्यांना
शुभेच्छा देण्यासाठी मोहन जोशी आवर्जून तेथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत माजी
उपमहापौर नगरसेवक आबा बागुल तेथे होते. प्रारंभी अध्यक्ष विजय हाडके यांनी मोहन
जोशींचे स्वागत केले व प्रास्थाविक केले. ते म्हणाले की, आम्ही कॉंग्रेस पक्षाचेच मतदार असून
या निवडणुकीतही कॉंग्रेसलाच मतदान करणार आहोत. याप्रसंगी बोलताना आबा बागुल
म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी मध्ये १ कोटीहून अधिक लोकसंख्या तीळवन तेली समाजाची
आहे. तर पुण्यात ही संख्या १ लाखांवर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने समाज असूनही समाजाला
राजकीय न्याय मिळाला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच जगतगुरू संताजी महाराज
जगनाडे यांच्या नावाने पुणे महानगर पालिकेचा प्रतिष्टेचा पुरस्कार आम्ही सुरु केला, मात्र
भाजपने हा पुरस्कार निलंबित ठेवला असे ते म्हणाले. तसेच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी
यांनी आपल्या देशात तंत्रज्ञान क्रांती केली. त्याचा उपयोग करून यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्स
द्वारे वाढू वर मेळावे आयोजित केले जावेत अशी सूचना ही त्यांनी केली.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ग्रामदैवत रोकडोबा यांचे दर्शन
कॉंग्रेस भवन मागील मंदिरात जाऊन घेतले. याप्रसंगी माजी आमदार दीप्ती चवधरी व शिवाजी नगर गावठाणातील
प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून शेतीचा सूक्ष्म अभ्यास : कांबळे
पुणे – “ डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आधुनिक शेती पद्धतीवर भर देत शेतीचा सूक्ष्म अभ्यास केला.” असे सांगत डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अव्यक्त पैलू उलगडले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या(डिक्की) तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती व संस्थेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक व डिक्की महाराष्ट्राचे मेंटॉर अशोक खाडे, डिक्की पश्चिम विभाग उपाध्यक्ष अविनाश जगताप, डिक्की नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, डिक्की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की पुणे अध्यक्ष अनिल ओव्हाळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कृतीशील अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी केवळ सिद्धांत मांडले नाहीत तर त्याचा समाजातील मोठ्या वर्गाला फायदा झाला. आपल्या देशात ब्रिटिशांचे राज्य असतानाही ईस्ट इंडिया कंपनीच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर आक्षेप घेण्याचे धारिष्ट दाखवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होत. त्यांच्या या तपशीलवार व तौलानिक अभ्यासाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती.
बाबसाहेबांचे आर्थिक विचारासंबधित असणारे ग्रंथ ६ हे पुस्तक आपल्यासाठी गीता, कुराण आणि बायबल इतके महान असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. तसेच बाबासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या कृषी, कर प्रणाली, सामाजिक धोरणांतून सउदाहरण त्यांनी स्पष्ट केले.
‘ज्या गावात अत्यंत खडतर परिस्थितीत दिवस काढले त्याच गावात आज माझ्या इतका यशस्वी माणूस नाही. आज माझ्या कंपनीत ३ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. तर ३ हजार कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल कंपनीची आहे. आजवर एक रुपयाचेही बँक कर्ज घेतले नाही. बाबासाहेबांच्या विचारांवर वाटचाल केली म्हणूनच हे शक्य झाले,’ अशा भावना अशोक खाडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
‘नोकरी मागणारे नाही तर देणारे व्हा’ हेच ध्येय ठेऊन डीक्की ची वाटचाल आपण करू असा नारा संस्थेच्या पदाधिकारयानी दिला. यावेळी डिक्कीच्या आजवरच्या प्रवासाची यशोगाथा उलगडणारे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
डिक्कीचा थक्क करणारा प्रवास
१४ वर्षापूर्वी पुण्यात स्थापन झालेली डिक्की संस्था आज २६ राज्यात कार्यरत आहे. उद्योग क्षेत्राशी निगडित संस्थेचे १० हजाराहून अधिक सदस्य आहेत. उद्योजकतेला वाव देण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचविण्याच्या विधायक उद्देशाने, डिक्कीने केवळ १४ वर्षात केलेली वाटचाल खरोखरच थक्क करणारी आहे.
भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या संविधानातील मूल्यांना भाजपकडून हरताळ – मोहन जोशी
पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. ज्या उदात्त हेतूने डॉक्टर आंबेडकर
यांनी देशाची घटना लिहीली या घटनेतील मूल्यांना भाजपने गेल्या पाच वर्षात तिलांजली दिली
आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी
केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी अरविंद शिंदे, अविनाश
बागवे, रजनी त्रिभुवन, लताताई राजगुरु, सुजीत यादव, राहुल तायडे आदि उपस्थित होते.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचा आणि त्यांच्या तत्त्वांचा इतका अवमान या
देशात यापूर्वी कधीही झाला नव्हता भाजपने केवळ तोंडदेखलेपणासाठीच डॉ. आंबेडकरांच्या नावाचा
वापर केला. प्रत्यक्षात देशातल्या दलित बांधवांवर गेल्या पाच वर्षात भीषण अत्याचार झाले
आहेत. या साऱ्या गोष्टींचा जाब जनता विचारत असून भाजपला त्याचे उत्तर द्यावे लागेल. या
निवडणुकीत त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागेल असेही मोहन जोशी यांनी यावेळी
नमूद केले. जोशी यांनी आज दिवसभर शहरातील विविध भागात नागरिकांशी संपर्क साधला.
तसेच ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली
वाहिली. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपकक्ष हेच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी
आहेत असे ते म्हणाले.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज
सकाळी तळजाई टेकडी येथे जाऊन सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
त्यावेळी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांनी देखील
मतदारांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर मोहन जोशी यांनी क्रिकेट चा आनंद लुटला.
नगरसेवक आबा बागुल यांनी केलेल्या गोलंदाजीवर त्यांनी चौकार मारून प्रेक्षकांच्या टाळ्या
मिळवल्या. त्यानंतर पद्मावती येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेवक आबा
बागुल, सुभाष जगताप, अमित बागुल व अन्य प्रमुख कार्यकर्ते होते.
आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारअनिल जाधव यांनी साधला जनतेशी संवाद
पुण्याचा चौकीदार झोपलेलाच- मोहन जोशी
पुणे-पुण्याच्या वाट्याला येऊ घातलेले अनेक महत्वाचे विकास प्रकल्प केवळ पुण्याला कोणी वाली
नाही म्हणून पुण्याच्या बाहेर गेले आहेत. पुण्याचा चौकीदार झोपल्यामुळेच पुणे शहराच्या
विकासाची अशी दुर्दशा झाली आहे अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांनी केली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या
समारोप प्रसंगी बोलताना ते म्हणाले की पुण्यात व्यवस्थापनशास्त्राची ‘आयआयएम’ व
‘आयआयटी’ या संस्था येणार होत्या पुण्यात विधी विद्यापीठ होणार होते पण हे प्रकल्प बाहेर
गेले उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होणे अपेक्षित होते तसेच एम्सच्या धर्तीवर पुण्यात मोठा
प्रकल्प अपेक्षित होता पण गेल्या पाच वर्षात चौकीदार झोपल्यामुळे पुण्यात हे प्रकल्प मार्गी लागू
शकले नाहीत अशी टीका जोशी यांनी यावेळी केली.
झोपी गेलेल्या चौकीदार याच्याबाबतीत आणखी एक उदाहरण देताना मोहन जोशी म्हणाले की पुण्याच्या
नदी सुधारणेसाठी ‘जायका प्रकल्प’ मंजूर झाल्याची बाब भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या
कडून आम्ही ऐकली पण आज पाच वर्षे झाली पुण्यातला जायका प्रकल्प अजिबात मार्गी लागू शकला
नाही किंबहुना आता तो पुण्याच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा झोपी गेलेल्या
चौकीदाराच्या हातात पुण्याला सोपवणे नुकसानकारक ठरणार आहे याची जाण पुणेकरांना आहे. त्यामुळे या
चौकीदाराची गच्छंती आता अटळ आहे. असे ते म्हणाले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या
प्रचारार्थ कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मोठा
प्रतिसाद मिळाला. खिलारेवाडी येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. पुढे मेहंदळे गॅरेज, दीनानाथ मंगेशकर
हॉस्पिटल, शा.म. मुखर्जी उद्यान,कमिन्स कंपनी, कर्नाटक हायस्कूल, गणेशनगर ओटा वसाहत, संजय
गांधी वसाहत, निंबाळकर बाग, करिश्मा चौक, मयूर कॉलनी , गुजरात कॉलनी, मोकाटे तलाव, संगीता
हॉटेल चौक, सुतार दवाखाना, शिवाजी पुतळा, म्हसोबा मंदिर, कोथरूड बस स्टँड, गांधीभवन चौक, लक्ष्मी
नगर, गोसावी वस्ती असा मार्गक्रमण करत किशोर कांबळे यांच्या कार्यालयजवळ या प्रचारफेरीचा समारोप
झाला.
घोषणांचा जल्लोष करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी कवाडेगट शेतकरी कामगार पक्ष
आणि शेतकरी संघटनेचे हातात झेंडे घेऊन प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेलेकार्यकर्ते अशा वातावरणात
निघालेल्या या प्रचार फेरीचे चौकाचौकात, वस्त्यांमध्ये,रस्त्यावर फटाके वाजवून, मोहन जोशी यांना पुष्पहार घालून
स्वागत करत होते.
मोहन जोशी म्हणाले, काँग्रेसने गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा कायदा केला. त्या माध्यमातून अत्यंत अल्प
किमतीत गहू, तांदूळ, तुरडाळ रेशनवर उपलब्ध करून दिली. मात्र, मोदी सरकारने या गरिबांच्या हक्कावर
गदा आणत गरिबांच्या जनतेच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यामुळे मागच्या वेळी केलेली चूक पुन्हा न
करता या सरकारला सत्तेवरून घालवण्याची वेळ आता आली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना वार्षिक ७२०००/- उत्पन्नाची हमी देणारी ‘न्याय’
योजना घोषित केली आहे. त्या माध्यमातून देशातील गरिबी दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीमध्ये शिवा मंत्री, उमेश कंधारे, राजाभाऊ साठे, प्रशांत वेलणकर, किशोर मारणे, किशोर कांबळे
स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, कालिंदी गोडांबे, निलेश सुतार, शिवाजी पाडळे,अर्चना चंदनशिवे,
प्राजक्ता दुधाने, महेश विचारे, अण्णा गोसावी, दिनेश सुतार, राजू मगर, सोनाली मगर, अजित ढोकळ,
उर्मिला गायकवाड, राहूल गायकवाड, संदीप मोकाटे यांसह शेकडो महिला व कार्यकर्ते या प्रचार फेरीत
सहभागी झाले होते.
गणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील खटले मागे का घेतले नाहीत ? – संजय बालगुडे
पुणे-सवंग घोषणा करणारे मात्र प्रत्यक्षात चांगल्या गोष्टींना विरोध करणारे पुण्याचे
पालकमंत्री गिरीश बापट म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेवरील फार मोठे संकट आहे.
पुण्यातील सुजाण नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे संकट दूर करावे असे
आवाहन पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. काँग्रेस भवनात
शनिवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना सर्वश्री संजय बालगुडे, रवींद्र माळवदकर, भाऊ करपे
आणि भोलेनाथ वांजळे आदी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला छेद
देणाऱ्या बापट यांच्या कारवायांचा पाढा वाचला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित करण्यासाठी आलेल्या या
पत्रकारपरिषदेत बोलताना प्रारंभी श्री संजय बालगुडे म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर
गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकमंत्री या नात्याने गणेशोत्सव काळात अनेक
सवंग घोषणा केल्या मात्र त्याची अम्मलबजावणी केली नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात कमानी व
मंडपाचा खर्च राज्यशासन करणार असे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात त्यावर चार
आणे खर्चही करण्यात आला नाही.
गणेशोत्सव काळात कार्यकर्त्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे प्रत्येक वर्षी
आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राजकीय कार्यकर्ते आणि दंगल स्वरूपाचे गुन्हे
ज्यांच्यावर आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले मात्र कार्यकर्त्यांवरील किरकोळ गुन्हे
मात्र तसेच ठेवण्यात आले असा आरोप बालगुडे यांनी केला. याउलट काँग्रेस सरकारच्या काळात
मोहन जोशी यांनी पुढाकार घेऊन अनेक कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते
याची बालगुडे यांनी आठवण करून दिली.
रवींद्र माळवदकर म्हणाले की, पुणे हि सांस्कृतिक राजधानी आहे हे विसरून जाऊन
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करण्याचे काम बापट यांनी सुरु केले आहे. सातशे वर्षाची
परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यासाठी असलेल्या नागरी सुविधा बंद करण्याचे षडयंत्र रचले जात
आहे. त्यासाठी हभप बंडातात्या कराडकर यांना आंदोलनही करावे लागले होते. पुणे मनपातर्फे
होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावरही बंदी घालण्यात आली आहे असे सांगून माळवदकर यांनी
गिरीश बापट म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेवरील फार मोठे संकट आहे व हे संकट दूर
करण्यासाठी सुजाण पुणेकर नागरिकांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव करावा असे आवाहन
केले.
श्री भाऊ करपे यांनी सांगितले की, दरवर्षी गणेशोत्सव मंडळात वाद होतात मात्र त्यावर
पालकमंत्री या नात्याने सामंजस्याने तोडगा काढण्या ऐवजी गिरीश बापट नेहमीच
कार्यकर्त्याविरुद्ध भूमिका घेतात असा अनुभव आहे. पोलिसांच्या साक्षीने कार्यकर्त्यांना
धमकावण्याचा प्रकारही घडले आहेत असाही त्यांनी यावेळी आरोप केला.
मंडई गणपती मंडळाचे भोलेनाथ वांजळे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी गिरीश बापट यांचा पहिला
पराभव हा एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानेच केला होता त्यामुळे या निवडणुकीत गणेश
मंडळांचे कार्यकर्ते बापट यांना नक्कीच धडा शिकवितील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीरामाच्या पराक्रमाचे स्मरण करून भाजपरूपी रावणाचा पराभव करू या – मोहन जोशी
पुणे – आज राम नवमी. श्रीरामांचा जन्म दिवसाच्या सर्व मतदारांना शुभेच्छा देतो. रामाच्या पराक्रमाचे स्मरण करून या निवडणुकीत आपण सर्वजण भाजपच्या रावणाचा मतदारानातून पराभव करू. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी शेवटच्या आठवड्यात सतर्क राहून मतदारांशी सतत संपर्क ठेवून देशात शांतता रहाण्यासाठी, देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असे आवाहन, असे आव्हान पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज संवाद यात्रेच्या सांगता सभेत केले.
मोहन जोशी पुढे म्हणाले, देशात गेल्या पाच वर्षात काय परिस्थिती झाली आहे याची सर्वांनाच जाणिव आहे. मोदी सरकारच्या एकाधिकार शाहीचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला सहन करावा लागला आणि लागत आहे. या सर्वाना त्रासातून मुक्त करण्यासाठीच या रावणाचा पराभव करण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत. आज जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याचा आठवण करून देत त्या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, वेगवेगळ्या निर्णयातून देशातील समाजात, जातीत तेढ निर्माण कऱण्याचे काम या सरकारने केले आहे. सामाजिक व धार्मिक सलोख राखण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यासाठी सर्वांनीच दिवसरात्र एक करून काम करावे असे आवाहन केले. विनोद मथुरावाला यांनी १९७१ च्या विजयाची आठवण करून देतानाच या विजयाचे श्रेय घेत त्यावेळी इंदिराजी गांधी यांनी मत मागितली नव्हती याचे स्मरण करून दिले. पण
आज सेनेचे विजयाचा उपयोग त्यासाठी केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन मथुरावाला यांनी केले. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी हा परिसर कॉस्मोपॉलिटन घोरपडी बाजार ते वानवडी बाजार या परिसरातून सर्वाधिक मताधिक्य मोहन जोशी यांना देऊ असे सांगितले.

या संवादयात्रेत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जेष्ठ नगरसेवक विनोद मथुरावाला, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक बंडू गायकवाड, नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेविका सुरेखा कवडे, काँग्रेस सेवादलाचे शहर अध्यक्ष प्रकाश पवार, शिवाजी केदारी, रत्नप्रभा जगताप, अभिजीत शिवरकर, काँग्रेसचे कॅन्टोन्मेंट ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष भोला शिव, काका पवार, संकेत कवडे, विशाल कवडे, चंद्रकांत कवडे, शांताराम कवडे, संतोष कवडे, हर्षद बोराटे, पूनम बोराटे, भरत धर्मावत, शंभू जांभूळकर, रेखा जांभूळकर, सविता गिरमे, कविता शिवरकर, साहील केदारी, अमीन शेख, संजय कवडे, जमीर सैय्यद, रवी बागशीव, केविन नयनमल, राजाभाऊ चव्हाण, रॉबर्ट डेव्हीड, नईम शेख, अजय गणेशकर, राजू नायडू, गोपी पिल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने
कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
घोडपडी बाजारमधील मधील अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाने मोहन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केला. घोरपडी गावातील जयहिंद चौकातील वस्तीत जाऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर श्रावस्ती, निगडेनगर, बी. टी. कवडे रोड, सोलापूर रोड, फातिमानगर, संविधान चौक, केदारीनगरमधून वानवडीतील मतदारांशी संवाद साधल्यावर वानवडी बाजारमधील वॉर्ड क्रमांक सहामध्ये छोट्या सभेने संवाद यात्रेची सांगता झाली.
घोरपडी बाजारपासून ते वानवडी बाजारपर्यंतच्या या संवाद यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या समारंभाची जोरदार तयारी सुरू असल्याचे बघायला मिळाले. या निमित्ताने या कार्यकर्त्यांशीही संवाद साधण्याची संधी मोहन जोशी यांनी साधली. प्रत्येक भागात तेथील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे खांबाखांबावर लावून वातावरण निर्मिती केली होती. तसेच प्रत्येक ठिकाणी हातात झेंडे घेतलेले कार्यकर्ते उमेदवार मोहन जोशी यांच्या स्वागताला उभे होते. उमेदवारांच्या रॅलीचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात येत होते. सुरूवातीला बंडू गायकवाड यांनी तर नंतर माजी नगरसेविका सुरेखा कवडे यांनी त्यांच्या घरी नेऊन उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे निवासस्थानही याच मार्गवर असल्याने तेथे काही वेळ विश्रांती झाली. या विश्रांतीनेतर पुन्हा एकदा नव्या जोशात सर्व कार्यकर्ते फातिमानगरच्या दिशेने निघाले. वानवडी चौकात प्रशांत जगताप व
त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शिवाजी केदारी यांनी केदारीनगरमध्ये संवाद यात्रेचे स्वागत केले. मतदारांशी संवाद साधल्यावर सर्वांनाच थंडगार पाणी, सरबत व नाष्ट दिला. त्यानंतर वानवडी बाजारमध्ये विनोद मथुरावाला यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये सभेची तयारी करण्याबरोबरच सर्वांना थंड पाणी आणि आइसक्रिमची सोय केली होती.






