पुण्यातील उत्तर भारतीयांचा गिरीश बापट यांना पाठिंबा
जैन समाजाची विचारसरणी विकासकार्यामध्ये महत्त्वाची-बापट
शहरी मध्यमवर्गीय भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत – मोहन जोशी
पुणे-बँकिंग सेवांचे वाढलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा बोजा आणि जीएसटीमुळे सोसावा लागणारा अतिरिक्त करांचा भार अशा सार्या समस्यांमुळे शहरी मध्यमवर्गीय चांगलाच वैतागला असून हा वर्ग यावेळी भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे असे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज कोथरूड विधानसभा मतदार संघात आयोजित विशाल रॅली नंतर ते बोलत होते.
ते म्हणाले की, मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात छोटे फ्लॅट निर्माण करण्यासाठी जे धोरणे भाजपने आखली नाहीत. तसेच मध्यमवर्गीय घरातील करती मुले शिक्षण घेऊनही बेकार बसले आहेत. वणवण फिरूनही त्यांना नोकर्या मिळत नाहीत. शिक्षण आणि आरोग्य याचा खर्च हाताबाहेर गेला आहे. मिळणार्या महिन्याच्या पगारात प्रपंच चालवणे मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेल्याने
हा वर्ग हतबल झाला आहे. आणि भाजपच्या सरकारवर तो कमालीचा वैतागला आहे. हा वर्गच भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मोठी भूमिका बजावेल असे चित्र आहे. पुण्यात हे चित्र सर्वत्र जाणवत आहे असेही जोशी यांनी यावेळी नमूद केले.
पाषाण गावठाण येथील शिवाजी पुतळ्यास हार अर्पण करून व वंदन करून या रॅलीची सकाळी सुरूवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे रिक्षातून केली जाणारी अनाउन्समेंट, जोरदार घोषणा आणि फटाक्यांचा कडकडाट अशा जल्लोषात निघालेल्या या रॅलीला मार्गात ठिकठिकाणी नागरिक थंड पाणी, नारळ पाणी देत होते. अनेक ठिकाणी महिलांनी मोहन जोशींना ओवाळून शुभेच्छा दिल्या. मार्गावरील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोहन जोशींचे स्वागत केले. शिवाजी पुतळ्याहून ही रॅली पाषाण गावठांण – सुस रोड – साई चौक
– (पाषाण बाणेर) लिंक रोड – महाबळेश्वर हॉटेल – सोमश्वर वाडी – बाणेर फाटा – सानेवाडी – डी. पी. रोड – विधाते वस्ती – पल्लोड – ग्रीन पार्क – महाबळेश्वर हॉटेल – बाणेर गावठाण – बालेवाडी फाटा – बालेवाडी गाव – शरद बालवडकर यांच्या निवासस्थान येथे समाप्त झाली.
या रॅलीमध्ये बाबूराव चांदेरे, चंदूशेठ कदम, प्रमोद निम्हण, उमेश कंदारे, विजय खळदकर, रामदास काळे, नितीन कळमकर, दत्ता जाधव, रोहित धिंडे, बालन सुतार, शिवाजी बांगर, सुनिल चांदेरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल
पुणे- मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर देशात संविधान आणि लोकशाही टिकणार नाही. या निवडणूकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या होत्या. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या करुन महाआघाडीत येणे टाळले. राज्यात प्रत्येक मतदार संघात उमेदवार देऊन ते मतांचे विभाजन करुन अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत.
असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच लोक हुशार आहेत, सत्याची बाजू त्यांना कळते त्यामुळे ते महाआघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ गोखले नगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, उमेदवार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, भटक्या विमुक्ताच्या प्रतिनिधी प्रा. सुषमा अंधारे, गोपाळ तिवारी, सचिन तावरे, माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे-पाटील,निलेश निकम, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, मोदींनी भरमसाठ आश्वासने दिली. मात्र एकाहीची पुर्तता केली नाही. त्यामुळे पाच वर्षे अत्यंत निराशाजनक गेली. त्यांनी चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांना उद्धवस्त केले. एक कोटी लोकांचा रोजगार गेला. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. देशभरात अन्याय अत्याचार करणार्यांना मोदी पाठिशी घालीत आहेत. मागील निवडणूकीत भाजपला
केवळ 31 टक्के मते मिळाली होती. सुमारे 62 टक्के मतदारांनी त्यांना नाकारले होते. यावेळी महाआघाडीमुळे मतविभाजन टळेल. राफेल विमान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर मोदींची जागा संसदेत नाही, तर जेलमध्ये असेल. त्यांचे सहकारी अमित शहा जेलमध्ये जावून आले आहेत. ते देशासाठी जेलमध्ये गेले नव्हते, तर
दंगलीत कत्तल केल्यामुळे अटक झाली होती. त्याच वेळी त्यांना अहमदाबाद येथून हद्दपार करण्यात आले होते. असा हल्लाबोल चव्हाणांनी केला. न्यायाधीश लोया यांच्यावर राजकीय दबाव होता. त्यांचा मृत्यूही संशयास्पद आहे. सत्तेवर आलो, तर प्रथम लोया, सोहबराद्दीन खुन प्रकरणाची चौकशी करु. देशात खुनाची मालीका सुरुच आहे. पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. हवाई हल्ल्यात दहशतवादाचे नेटवर्क नष्ट करणे आवश्यक असते. ते केले गेले का असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, समाज माध्यमावर उथळ भक्त कलम 124 अ वरुन भरभरून चर्चाकरीत आहेत. मात्र काँग्रेसने हे कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
डॉ. नितीन राऊत म्हणाले, संविधानाने महिलांचा स्वाभिमान बहाल केला. हा देश संघराज्य आहे. या राष्ट्राला तडा जाता कामा नये. महिलांवरील अत्याचार वाढले, बेरोजगारी वाढली. आवाज दाबून अभिव्यक्तीवर घाला घातला जात आहे. ज्यांनी आजपर्यंत देशासाठी काहीच केले नाही तेच आता देशवाशीयांना देशभक्ती शिकवित आहेत. त्यामुळे या खोट्या सरकारला या निवडणूकीत पराभव
केला पाहिजे. डॉ. नितीन राऊत, प्रा. सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरे, निलेश निकम, दत्ता बहिरट, दिप्ती चवधरी यांची भाषणे झाली.
महावीर जयंतीनिमित्त अमृता फडणवीस यांनी केली पूजा
महावीर जयंती : जय आनंद ग्रुपतर्फे धान्यदान उपक्रम
गोव्यात रात्री ११ नंतर दारू विक्री / सर्व्हिंगवरील बंधने शिथिल करण्याची मागणी
पणजी- २३ एप्रिल २०१९ रोजी आगामी लोक सभा निवडणुका लक्षात घेता गोवा पर्यटन विभाग, गोवा सरकारने हॉटेलचालकांच्या प्रतिनिधींसह राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे रात्री ११ नंतर दारू विक्री/सर्व्हिंगचा नियम शिथिलकरण्यासाठी ईसीआयकडे संपर्क साधलाआहे.या वेळमर्यादेच्या परिणामांविषयी चिंता वाटून गोव्यातील हॉटेलचालकांनी पर्यटन खात्याच्या संचालकांकडे सादरीकरण करतयासंदर्भात ईसीआयने नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे. सध्या जोरात सुरू असलेला पर्यटन हंगाम आणि वीकेंडफेस्टिव्हिटीजवर परिणाम होऊ नये या भीतीने प्रतिनिधींनी या सादरीकरणामध्ये वेळमर्यादा शिथिल करण्याच्या मुद्द्यावर भरदिला आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला पर्यटन खात्याचे संचालक श्री. संजीव गडकर यांनी हॉटेलचालकांच्या प्रतिनिधी मंडळांसहगोव्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हॉटेल उद्योगाला (बार्सरेस्टॉरंट्स) होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा केली.पर्यटन खात्याने सांगितले आहे, की गोव्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने खात्याच्या निदर्शनास आणून दिलेल्यासमस्या ऐकून घेतल्या आणि हे प्रकरण ईसीआयकडे नेण्याचे आश्वासन दिले असून लवकरच त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा हॉटेलचालकांना आहे.
गोवा टुरिझमचे व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल प्रचंड यशस्वी
पणजी- गोवा टुरिझमने १४ एप्रिल २०१९ रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड, पणजी येथे गोवा व्हिंटेज कार अँड बाइकफेस्टिव्हल आयोजित केला होता. व्हिटेंज कार आणि बाइक्स जमवण्याची व त्यांचे जतन करण्याचा ध्यास साजरा करण्याच्याहेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
यादरम्यान आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये १८ व्या शतकातील काही सर्वोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्या. गोव्याच्याविविध भागांतून तसेच त्याजवळच्या राज्यांतूनही कित्येक व्हिंटेज कार्स आणि मोटरसायकल्स यामध्ये सहभागी झाल्याहोत्या. कार्यक्रमस्थळ ४५ कार्स आणि ७० बाइक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आल्या होता. गोव्याच्या राज भवनाने जतन केलेलीकॅडलॅक लिमोझिनचे १९५९ मधील मॉडेल प्रेक्षकांचे सर्वात आवडते बनले.
व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांच्या सहकार्याने आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजितकरण्यात आलेल्या २०१९ गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य निवडणूकअधिकारी, श्री. कुणाल यांनी गोवा टुरिझमचे सचिव श्री. जे. अशोक कुमार यांच्यासह, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमतीआर. मनेका, टुरिझमचे संचालक श्री. संजीव गडकर, इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्री. विवेक गोएंका, ऑटोकार मासिकाचेसल्लागार श्री. बर्सिस बांद्रावाला आणि कार्यक्रमाचे आयोजक, अशोक व्हिंटेज वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप नाईकयांच्या हस्ते करण्यात आले.
या व्हिंटेज कार्स आणि बाइक्सनी कंपाळ आणि मीरामार बीच सर्कलवरून मांडवी नदीच्या काठाने रॅली काढली आणि परतपणजीमध्ये आले व पुढे अब्बे फॅरिया पुतळ्यावरून (जुने सचिवालय) यू- टर्न घेत परत आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये डिस्प्लेसाठीपरतले.
आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर आणि गोव्याच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन वर्मा डिमिलो यांनी गायिका मेरी जो यांच्यासहप्रेक्षकांसाठी खास फॅशन शोचे आयोजन केले होते. त्यात कुणबी हे गोव्याचे पारंपरिक वस्त्र प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेहोते. गोव्याचा लोकप्रिय बँड क्रिमसन टाइडने धमाकेदार नृत्य सादरीकरण केले. यावेळेस खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सहीउपलब्ध होते.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मतदार जागृती, न्याय्य मतदानाबद्दल प्रचारकरण्यासाठी #सेव्हदडेट आणि #गोव्होट या खास अभियानांचा प्रचार करण्यासाठी गोवा टुरिझमसह सहकार्य केले. २३ एप्रिल२०१९ रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी त्यांनी कार्यक्रमस्थळी सेल्फी पॉइंट्स आणि बॅनर्सच्या मदतीनेजनजागृती केली.
या कार्यक्रमाचे आयोजन अडव्हर्टायझिंग असोसिएट्स आणि क्युरेटेड बाय अशोक व्हिंटेज वर्ल्ड, सपोर्टेड बाय व्हिंटेज अँडक्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांनी देशातील आघाडीचे वाहनउत्पादन मासिक- ऑटोकार हे मीडियाभागीदार या नात्याने विवा गोवा लाइफस्टाइल मासिक भागीदार म्हणून केले होते.
झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी !!
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.
सूत्रांच्या अनुसार, स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर ह्या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाउंडेशनच्या वर्षभर होणा-या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती.
अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते, “मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणा-या लोकांची आयुष्य पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमूळे मला पाहायला मिळाली. पाणी फाउंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन संघटित होणारे, जातव्यवस्था निर्मुलन होऊन, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.”
स्पृहा पूढे सांगते, “पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकर-यांच्या आणि शेतक-यांच्या चेह-यावर मला दिसून आलाय. ह्या आनंदात मीही सहभागी असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी असेन.”
- शरद लोणकर
..खुशमस्करेच प्रगतीपथावर …(काहीही न करणारे , नेत्यांना जास्त प्रिय)
गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नावीन्यपूर्ण, भविष्यात्मक कूलिंग तंत्रज्ञान दाखल
नवा क्युब हा आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले, विविध पर्याय असणारा स्टायलिश व आटोपशीर फूड व बेव्हरेज कूलर दाखल
मुंबई: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने व रेफ्रिजरेशनमधील कौशल्यासाठी नावाजलेल्या ब्रँडने क्युब हे वैशिष्ट्यपूर्ण लाइफस्टाइल उत्पादन दाखल केल्याचे जाहीर केले आहे. या उत्पादनामध्ये आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश असून हे तंत्रज्ञान कूलिंग करते, फ्रीझ करत नाही. भारतामध्ये हे प्रगत तंत्रज्ञान दाखल करणारा गोदरेज हा पहिला ब्रँड आहे.
सर्व पारंपरिक कूलिंग उपकरणे रेफ्रिजरंटवर आधारित कूलिंगवर अवलंबून असतात, तर गोदरेज क्युबमध्ये रेफ्रिजरंट, कॉम्प्रेसर यांचा वापर केला जात नाही. गोदरेज क्युब थर्मो-इलेक्ट्रिक चिपवर चालते. बहुतेकशी रेफ्रिजरंट निरनिराळ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरतात. त्यामुळेच, नॉन-रेफ्रिजरंट प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान सर्वात पर्यावरणपूरक कूलिंग सोल्यूशन ठरते.
काही महिन्यांपूर्वी, देशातील विविध राज्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी श्रेणीसाठी क्युब प्रायोगिक तत्त्वावर दाखल करण्यात आले. भरभरून प्रतिसाद मिळाल्याने आता या ब्रँडने आपल्या ट्रेड चॅनलद्वारे बी2सी श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारे गोदरेज क्युब हे कूलिंग उपकरण प्रामुख्याने लहान प्रमाणातील कूलिंगची गरज असणाऱ्या लोकांसाठी तयार केले आहे. सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे, हे उत्पादन या श्रेणीतील अन्य उत्पादनांपेक्षा वेगळे असून ते 0 फ्रॉस्ट उत्पादन आहे, म्हणजेच डिफ्रॉस्ट करण्याची आवश्यकता भासत नाही. डिफ्रॉस्टिंग करावे लागत नाही, या वैशिष्ट्याबरोबरच आटोपशीर आकार व तुलनेने अधिक स्टोअरेज क्षमता, शांतपणे चालणे व आकर्षक डिझाइन अशा वैशिष्ट्यांमुळे गोदरेज क्युब हे कामाच्या व राहण्याच्या ठिकाणी, किचनच्याही पलीकडे जाऊन एक वैयक्तिक फूड व बेव्हरेज कूलिंग उपकरण म्हणून आदर्श ठरते – किचनव्यतिरिक्तचे हे ठिकाण बेडरूम असेल किंवा कार्यालये असतील, दुकाने असतील किंवा हॉटेल, होस्टेल व गेस्ट हाउस.
यामध्ये अन्यही काही वैशिष्ट्ये आहेत, जशी एलईडी फिट इंटिरिअर, स्टॅबिलायझरमुक्त कार्य, घरातील इन्व्हर्टरशी कम्पॅटिबिलिटी, मॅग्नेटिक ऑटो डोअर यंत्रणा, सहज देखभाल व सेवा आणि ग्राहकासाठी श्रेणीतील सर्वोत्तम सोय व कामगिरी, तसेच हे उत्पादन 100% हरित व पर्यावरणपूरक असणे.
उत्पादन दाखल केल्याविषयी, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी नमूद केले, “आम्ही 61 वर्षांपूर्वी, आम्ही उत्पादन केलेले पहिला भारतीय रेफ्रिजरेटर दाखल केल्यापासून, भारतातील घराघरातील फ्रॉस्ट फ्री व डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरसाठी लोकप्रिय पर्याय ठरण्याच्या हेतूने, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने विकसित होत आहोत. गेल्या काही वर्षांत, आम्ही रेफ्रिजरेशन / कूलिंग व त्यासंबंधीच्या क्षेत्रामध्ये मोठे कौशल्य विकसित केले आहे. गोदरेजमध्ये, पृथ्वी व भविष्यातील पिढ्या यांच्याविषयीच्या जबाबदारीचे पालन करत, आमच्या संबंधित घटकांना आनंद देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. क्युबच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांच्या कमी प्रमाणातील कूलिंगच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आणखी एक विशेष लाइफस्टाइल उत्पादन दाखल केले आहे व या उत्पादनामध्ये प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे हे उत्पादन शाश्वतही ठरले आहे. ब्रँडच्या ‘सोच के बनाया है’ या विचारसरणीला अनुसरून, ग्राहकांना नव्या नावीन्यपूर्ण, महत्त्वाच्या व हरित तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे क्युब हे प्रतिक आहे.”
तंत्रज्ञानाविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे थर्मोइलेक्ट्रिक अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट संजय लोनिअल यांनी सांगितले, “हवामानातील बदल ही एक जटिल समस्या असताना, सध्या वापरल्या जाणाऱ्या व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीमच्या ऐवजी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध सुरू आहे. बहुतेकशा व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीममध्ये रेफ्रिजरंटचा वापर केला जातो व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी वाढते. पर्यायी तंत्रज्ञान म्हणजे, रेफ्रिजरंट-मुक्त प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा कूलिंग, हीटिंग, वीजनिर्मिती व वेस्ट हीट रिकव्हरी या बाबतीत स्वच्छ वापर केला जातो. या प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गोदरेज विशेष अॅप्लिकेशन विकिसत करण्याचा प्रयत्न करत आहे. शाश्वतता, कार्यक्षमता, पोर्टेबिलिटी, स्मॉलर फॉर्म फॅक्टर अशा विविध पैलूंच्या बाबतीत हे तंत्रज्ञान सरस असल्याने आम्ही या क्रांतिकारी प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर क्युब या आमच्या नव्या उत्पादनामध्ये केला आहे. हे उत्पादन घरातील इन्व्हर्टरच्या बाबतीत कम्पॅटिबल असून ते 24/7 काम करते. स्टाइल व आरामदायीपणा असणारे गोदरेज क्युब हे आदर्श लहान कूलिंग उपकरण आहे.”
गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव यांनी सांगितले, “प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान समाविष्ट असणारे नवे मल्टि-अॅप्लिकेशन गोदरेज क्युब उत्पादन सादर करताना आम्हा अतिशय अभिमान वाटतो आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये या उत्पादनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही हे उत्पादन एंड युजर्ससाठी घरे व कार्यालये यांसाठी दाखल करत आहोत. आम्ही आमच्या आघाडीच्या ट्रेड पार्टनरकडे नमुना म्हणून हे उत्पादन दिले आहे आणि ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे. आमच्या सक्षम ट्रेड नेटवर्कचा लाभ घेण्याव्यतिरिक्त, आम्ही संभाव्यग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल सुविधांचाही वापर करणार आहोत. आटोपशीर आकार, डिफ्रॉस्टिंगची चिंता नाही व शांतपणे कार्य, या वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे वापरता येऊ शकते: आवाज करणाऱ्या बेडरूम रेफ्रिजरेटरऐवजी वापरणे किंवा विशेष पदार्थांसाठी स्वतंत्र जागा देणे किंवा कार्यालये, दुकाने, हॉटेल, होस्टेल, गेस्ट हाउस आदी ठिकाणी वापरणे. शिजवलेले पदार्थ, पेये, दूध व दुग्ध उत्पादने, फळे व चॉकलेट, औषधे अशा विविध प्रकारच्या घटकांच्या साठवणुकीसाठी क्युब हे उत्पादन आदर्श ठरेल.”
नवे क्युब दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे व ब्लॅक, तसेच त्यांची किंमत 6999 रुपये आहे, आणि हे उत्पादन भारतभर सर्वत्र उपलब्ध केले जाईल.
श्नायडर इलेक्ट्रिकने केले पुण्यातील नव्या कार्यालयाचे उद्घाटन
16,000 चौरस फूट कार्यालयामध्ये ऊर्जा, इमारती, मशीन व प्रकल्प यासाठी इकोस्ट्रक्शर सोल्यूशन्सचे प्रात्यक्षिक दिले जाणार
पुणे– श्नायडर इलेक्ट्रिक या ऊर्जा व्यवस्थापन व ऑटोमेशन या क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील स्पेशालिस्ट कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे, ओपन स्पेस या संकल्पनेवर आधित असणाऱ्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्याचे आज जाहीर केले आहे. श्नायडर इलेक्ट्रिक ही शहरातील व आजूबाजूच्या उपनगरांतील महत्त्वाच्या ग्राहकांसाठी पसंतीची ऊर्जा व्यवस्थापन भागीदार आहे. या विस्ताराच्या निमित्ताने, कंपनीने वैविध्यपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने व सोल्यूशन याद्वारे, महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीतील आपले आघाडीचे स्थान व उत्पन्न बळकट करायचे ठरवले आहे. कंपनीचा सर्व व्यवसाय आणि अमेरिकेतील एएससीओ पॉवर टेक्नालॉजीजचे डिझाइन इंजिनीअरिंग सेंटर यांसाठी कंपनीचा हा एकात्मिक प्रकल्प असणार आहे.
नव्या कार्यालयामध्ये श्नायडर इलेक्ट्रिकची दर्जेदार उत्पादने व सोल्यूशन दर्शवली जाणार आहेत, तसेच ग्राहकांना झटपट सेवा देण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमताही वाढवली जाणार आहे. यानिमित्त बोलताना, श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे नॅशनल सेल्सचे उपाध्यक्ष मनीष खंडेलवाल यांनी समावेशक, खुल्या व भविष्यात्मक वर्कप्लेसचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विचार व्यक्त केले. पुण्यातील नवा प्रकल्प हा भारतातील कंपनीच्या सर्वोत्तम कार्यालयांपैकी एक असणार आहे आणि कार्यालयांच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण करणार आहे.
श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे जनरल मॅनेजर श्रीकर पैठणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना नमूद केले, “या शहरामध्ये असणाऱ्या क्षमतेविषयीचे आमचे आकलन या विस्तारातून अधोरेखित झाले आहे, तसेच ग्राहकांना उत्तम अनुभव देऊन स्थानिक व्यवसाय झपाट्याने वाढण्यासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्नही स्पष्ट झाला आहे. मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी असल्याने आम्हाला ग्राहककेंद्रित सेवा देणे व त्यांना सहज उपलब्ध होईल, अशी सेवा देणे शक्य होणार आहे.” अमर कॅलिबर, सीटीएस नं. 911, बीएमसीसी रोड, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर येथे असणारे नवे कार्यालय श्नायडर इलेक्ट्रिकची ऊर्जा, इमारती, मशीन व प्रकल्प यासाठीची इकोस्ट्रक्शर सोल्यूशन दर्शवण्याच्या दृष्टीने आखले आहे. कार्यालयामध्ये ग्राहकांसाठी प्रशिक्षण सुविधा व नॉलेज शेअरिंग सुविधाही आहे.
केटरिंग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित व्हा:सरपोतदार
‘फिक्की फ्लो’ पुणेच्या अध्यक्षपदी रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड
पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांच्याकडून रितू प्रकाश छाब्रिया यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. ही निवड २०१९-२० या कालावधीसाठी असणार आहे.
रितू प्रकाश छाब्रिया मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अत्याधुनिकरण करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी विभागाचा चेहरामोहरा त्यांनी बदलला आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून रितू प्रकाश छाब्रिया आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास, स्वच्छता आणि जलसंवर्धन या क्षेत्रात भरीव काम करीत आहेत. अनेक प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन व अंमलबजावणीचे काम त्या गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने करीत आहेत.
समाजातील वंचितांचा सर्वांगीन विकास, शेती, आरोग्य आणि शिक्षण सुधारण्यासाठी ‘शहरातून गावाकडे’ या उद्दिष्टावर काम करणार असल्याचे रितू प्रकाश छाब्रिया यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले. शहरातील महिलांच्या साथीने ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या वर्षभरात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह ‘फ्लो’चे सदस्यत्व वाढविण्यात यश आल्याचे मावळत्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी सांगितले.
उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन महिलांचे सबलीकरण, आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘फ्लो’ या संस्थेची १९८३ साली स्थापना करण्यात आली. या संस्थेत सहा हजारांपेक्षा अधिक महिला उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्हजचा समावेश आहे. पुणे विभागात सध्या ४०० पेक्षा अधिक महिला सदस्य आहेत. या संस्थेचे देशभरात एकूण १५ विभाग आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी ‘फ्लो’तर्फे विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्याने, प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय !!
स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. त्यानूसार, ‘मिर्झापूर’ नंबर वन स्थानी तर ‘सॅक्रेड गेम्स’ दूस-या स्थानावर आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमधली ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात वेब दुनियेत ‘मेड इन हेवन’, ‘दि फायनल क़ॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘दि शोले गर्ल’ ह्या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेत सर्वौच्च स्थानी दिसून येतेय.
गेल्या काही दिवसांपासून स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्ट्सवर ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापुर’ ह्या दोन क्राइम थ्रिलर्सची प्रचंड लोकप्रियता दिसून आलीय. ह्या दोन्ही वेबसीरिज लोकप्रियतेत नेहमी पहिल्या किंवा दुस-या स्थानावरच असतात. त्यांना त्या स्थानावरून हटवणे हे बाकी वेबसीरिजसाठी एक आव्हानच म्हणावे लागेल.
यंदा मार्चमध्ये अमेज़ॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजिटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि वायरल न्यूजमध्ये ह्या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामूळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली. आणि मार्च 2019मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली.
ह्यासोबतच, अर्जुन रामपाल, जावेद जाफरी आणि नीरज काबी स्टारर ‘झी-5 ओरिजिनल’च्या ‘द फाइनल कॉल’ने 42.57 गुणांसह लोकप्रियतेत सहावे स्थान पटकावले आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दुस-या स्थानावर पोहोचली आहे.
इरॉस नाउ ओरिजिनलची बिजॉय नांबियार दिग्दर्शित, ‘फ्लिप’ 25.54 गुणांसह वेबसीरिजच्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 11 व्या स्थानी पोहोचलीय. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये तिस-या स्थानी आलीय.
ह्याशिवाय नेटफिक्स ओरिजिनल्सची ‘दिल्ली क्राइम’ 20.27 गुण मिळवून लोकप्रियतेच्या लिस्टमध्ये 12 व्या पदावर आहे. आणि मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताची पहिली स्टंटवूमन रेश्मा पठाणवर आधारित बायोपिक सीरिज, Zee 5 ओरिजिनलची ‘दि शोले गर्ल’ 10.41 गुणांसह14 व्या स्थानी पोहोचलीय. मार्च 2019मध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेच्या शिखरावर कमी अवधीत चढत गेली. ‘द फाइनल कॉल’, फ्लिप आणि ‘द शोले गर्ल’ ह्या मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजही सध्या जनमानसात लोकप्रिय झालेल्या दिसून येतायत. वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, वायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्स मध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पूरावा आहे. मार्चमध्ये रिलीज झालेली ‘दिल्ली क्राइम’ सुध्दा कमी अवधीत लोकप्रिय झाली.ज्यामूळे आम्हांला असं वाटतंय, की ही वेबसीरिज येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करेल. “
अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”







