Home Blog Page 2943

रिझव्‍‌र्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेवर आर्थिक निर्बंध

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ठेवींची रक्कम मुदतपूर्व परत करण्यावर तसेच मोठय़ा रकमेच्या ठेवी स्वीकारण्यावर तसेच सध्या बँकेकडे असलेल्या ठेवींवर कर्ज देण्यावर निर्बंध घालण्यात आले असून तसे आदेश रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेला पत्र पाठवून  दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना सोमवारी पत्र पाठवले आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आर्थिक अनियमितता, नियमबाह्य़ कर्जवाटप प्रकरणी सहकार विभागाकडून सध्या कारवाई सुरू आहे. मध्यंतरी बँकेच्या काही अधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर आरबीआयने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. आरबीआयकडून बँकेला २५ एप्रिल रोजी पत्र देण्यात आल्याचा उल्लेख बँकेने शाखा व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या आदेशानुसार आरबीआयकडून पुढील आदेश येईपर्यंत बँकेकडे असलेल्या मुदतठेवींच्या रकमा मुदतपूर्व बंद करून अदा करता येणार नाहीत तसेच मुदतठेवींवर कोणत्याही प्रकारचे कर्ज ठेवीदारांना देता येणार नाही. मोठय़ा रकमेच्या ठेवी बँकेने स्वीकारू नयेत, तसेच जुन्या मोठय़ा रकमेच्या ठेवींचे नूतनीकरण करू नये, असे आदेश बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इतर शाखांच्या शाखा व्यवस्थापकांना दिले आहेत. तसेच याबाबतची माहिती बँकेचे ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांना देण्यात यावी, असेही आरबीआयच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे

आगीत कारखाना जळून खाक

पुणे : धायरी स्मशानभूमीजवळ असणा-या प्लायवूडचे दरवाजे बनविणा-या कारखान्याला पहाटे भीषण आग लागून त्यात सर्व लाकडी साहित्य, मशिनरी जळून कोळसा झाले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी मिळाली. धायरी येथील मनोहर मंगल गार्डन शेजारी व्हिजन डोअर हा प्लायवूडचे दरवाजे बनविणारा कारखाना आहे. कारखान्याच्या सुरुवातीला त्यांचे लाकडी सामानाच्या पट्ट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशिनरी व इतर साहित्य होते. त्याच्या मागे त्यांचे कामगार राहात होते.
पहाटे एक कामगार उठला. तेव्हा त्याला आग लागल्याचे समजले. कात्रज अग्निशामन केंद्राचे प्रभाकर उमराटकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण आग ही खूप अगोदर लागली होती. त्यात लाकडी साहित्य असल्याने त्याने पटकन पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व एका टँकरने ही आग अर्धा तासात आटोक्यात आणली.

याबाबत प्रभाकर उमराटकर यांनी सांगितले की, ही आग नेमकी कारखान्याच्या आतल्या बाजूला लागली की बाहेरुन आत गेली हे समजू शकले नाही. कारखान्याच्या बाहेर लाकडे कापल्यानंतरचा भुसा मोठ्या प्रमाणावर पडला होता. तोही जळून गेला होता. या कारखान्यातील सीसीटीव्ही जळून गेले असले तरी त्याचा बॉक्स कार्यालयात असल्याने तो वाचला आहे. त्यावरुन आग नेमकी कशी लागली हे समजू शकणार आहे.

कारची तीन दुचाकींना धडक, पाच जागीच ठार

चाकण : येथील एमआयडीसीत एचपी चौक ते शिंदे वसुली चौक रस्त्यावर खालूंब्रे गावच्या हद्दीत के. एस. एच. कंपनीच्या गोडावून समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टिगा कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तीन दुचाक्यांना धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन दुचाकीवरील पाच कामगार जागीच ठार झाले. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हा अपघात झाल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांवर शोककळा पसरली आहे. आज ( १ मे ) सकाळी सव्वा सहा वाजता अपघात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळावर ( दि. ३० ) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला. चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा ( वय ३८, रा. भोसरी, पुणे ), सुनील परमानंद शर्मा ( वय ४३, रा. भोसरी, पुणे, मूळ हरियाणा ), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा ( वय २४, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे ), सत्यवान पांडे ( वय ४५, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे ) व सर्वज्ञ संजय विश्वकर्मा ( वय ३५, रा. चिखली, पुणे ) अशी अपघातात ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर वाहन चालक सुहास नामदेव शेवकरी, शेवकरी वस्ती, नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे ) जखमी झाला असून त्याच्यावर चाकण येथील कोअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत पीएसआय प्रमोद कठोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ते स्वतः या घटनेचा तपास करीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पो. आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी अपघात होताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी शेवकरी हा त्याच्या ताब्यातील इर्टिगा गाडी क्रमांक ( एम एच १४ – जे एन – ३७६८ ) हि एचपी चौक ते शिंदे वासुली चौकाकडे जात असताना भरधाव वेगाने चालवून दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला व समोरून येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक ( एम एच १४ डीएल ७९६४ ), ( एम एच १४ डीई २९४२ ) व ( एम एच १४ ए जे ५१४९ ) या दुचाकींना धडक देऊन दुचाकीवरील कामगारांना ठार करून स्वतःच्या दुखापतीस व अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याने त्याच्यावर भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४(अ), ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद कठोरे हे पुढील तपास करीत आहेत.

‘गरज पडली तर शरद पवार भाजपलाही पाठिंबा देऊ शकतात’-संजय भोकरे

0

पुणे-लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नरेंद्र मोदींनाही पाठिंबा देऊ शकतात असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी व्यक्त केलं. पवारांना दोनही पर्याय खुले असून ते NDA किंवा UPAला पाठिंबा देऊन मानाचं पद मिळवतील हे नक्की असंही ते म्हणाले. न्यूज18 लोकमतच्या बेधडक या चर्चेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात राजकीय विश्लेषक भरतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रवक्ते माजीद मेमन यांनी गरज पडली तर शरद पवार पंतप्रधान व्हायला तयार आहेत असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आघाडीचं सरकार तयार करण्याची वेळ आली तर शरद पवार मुत्सद्देगिरीच्या बळावर डाव टाकतील असंही ते म्हणाले.

पक्ष्यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मोफत मातीचे भांडे

0
पुणे- उन्हाचा पारा वाढतोय आणि चारा -पाण्याच्या शोधात हजारो पक्षी कासावीस  होताहेत. दरवर्षी उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी न मिळाल्याने हजारो पक्षी तडफडून प्राण सोडतात मात्र गेल्या सहा  वर्षांपासून पक्ष्यांसाठी  ‘पाणी ठेवण्याचा उपक्रम राबविला जात आहे आणि पाणीदानाची ही चळवळ व्यापक होत आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांना वाचविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि घरपोच मोफत भांडे मिळवा ही संकल्पनाच पक्ष्यांसाठी आधारवड ठरली आहे.
माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  अमित बागुल हे हा अभिनव उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून राबवित आहेत.
 सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढली आहे,साहजिकच सर्वांच्या जीवाची घालमेल होत आहे. माणसांची ही स्थिती मग मुक्या जीवांचे काय हाल होत असतील नेमका हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन अमित बागुल आणि सहकाऱ्यानी  उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने तडफडून प्राण सोडणाऱ्या हजारो पक्ष्यांना  वाचविण्यासाठी पक्षांच्या हक्काचे पाणी  ही चळवळ उभी करण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला आणि पक्ष्यांसाठी   कुंभाराकडून  खास मातीचे भांडे बनवून घेण्यात येते . जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप करून घरालगत , टेरेसवर पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे आवाहन केले. मात्र जे खरच पक्ष्यांसाठी भांडे ठेवतील अशाच लोकांना भांडे देण्यासाठी एक एसएमएस करा आणि मातीचे भांडे मोफत घरपोच देण्याची संकल्पना राबविली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे  आणि आता  सहाव्या वर्षात या उपक्रमाने पदार्पण केले आहे आजमितीस या उपक्रमांतर्गत सुमारे आठ हजार मातीचे भांडे घरपोच स्वतः अमित बागुल , सागर आरोळे , श्री गीता सोसायटी चे चेअर मन शाह, कामत , डॉ अविनाश भूतकर इमत्याज तांबोळी आणि इतर सभासद यांच्यासह आदी सहकार्यांनी पोहचविले आहेत.केवळ सहकारीच नव्हे तर नागरिकही या पक्षांच्या हक्काचे पाणी  चळवळीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत.

‘द स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवास’ प्रारंभ

0

गोव्यातही आगळीवेगळी खाद्यसंस्कृती आणि येथे तयार होणारे देशी द्रव्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पर्यटनखात्यातर्फे पणजीतील बांदोडकर मैदानावर ‘स्पिरिट ऑफ गोवा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामहोत्सवाच्या उदघाटनाला पर्यटन खात्याचे साचीव  जे. अशोक कुमार, संचालक संजीव गडकर, व्यवस्थापकीय संचालकनिखिल देसाई आणि मान्यवर उपथित होते.

गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या या महोत्सवाला स्थानिक तसेच राष्ट्रीय पर्यटकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला  आहे. या वर्षी हामहोत्सव २८ एप्रिल पर्यंतसुरु राहणार आहे. मोहोत्सवात गोव्याची ओळख असणारे विविध खाद्य पदार्थ आणि  मद्याचे  विविध प्रकार ठेवण्यात आले. याशिवाय येथील पारंपरिक वस्तू गोमंतकीय बाज असणाऱ्या अनेक गोष्टी या महोत्सवाच्यानिमित्ताने पाहायला मिळतल्या. या मोत्सवात कार्ल फर्नांडिस अविनाश मार्टीन्स या सारख्या मास्टर्सनी मास्टरक्लास हीघेतले. या शिवाय या महोत्सवात मनोरंजन, माहिती, कार्यशाळा आणि वेगवेगळ्या स्पर्धाचा अनुभव उपस्थितांना घेता आला. ज्यामुळे त्यांना भेट वस्तू आणि बक्षिसेही मिळाली. शुक्रवारपासून सुरूझालेल्या ह्या महोत्सवाला उपस्थितांनी आपली मोठ्यासंख्येने उपस्थिती लावली होती. रविवारपासून या मोहोत्सवात अनेक कार्यक्रम झाले. गोवा आणि पोर्तुगालमधून आलेले गायकया दिवशीची संध्याकाळ जझ संगीताने रंगवली गोव्याची गायिका लॉरना हिच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली.

न्युरोफिडबॅक चिकित्सेवर मोफत निदान मार्गदर्शन शिबीर

0
पुणे : ‘ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ च्या वतीने आयोजित शिबिरात अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), एकाग्रता शीघ्र संतापी, मतिमंदता अभ्यासात अडचणी येणार्‍या रुग्णांना मोफत मार्गदर्शन व निदान केले जाणार आहे. न्युरोफिडबँक चिकित्सेच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे.
शिबीर दुपारी २.०० ते सायंकाळी ७.०० यावेळेत औंध येथील ‘ब्रेनमॅ्रपींग इंडिया फोरम क्लिनिक’ १०१ वेस्टऍन्ड मॉलसमोर, स्टोलर एनक्लेव्ह, औध येथे आयोजित केले आहे. बुधवार दि. १ मे ते शुक्रवार दि. १० मे २०१९  दरम्यान हे शिबीर होणार आहे.
शिबिरामध्ये ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरात येणार्‍या रुग्णांना सवलतीच्या दरात औषध उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना औषध उपचार करताना QEEG ब्रेन मॅपींग चाचणी आवश्यक आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, 9823832444 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले आहे.
न्युरोफिडबॅक चिकित्से विषयी अधिक माहिती :
न्युरोफिडबॅक चिकित्सा (टेस्ट) हानीविरहित पूर्णतः विना वेदनादायी असून, औषधीमुळे दुष्परिणाम होत नाही. ब्रेन न्यूरो फिजिओलॉजी या तंत्रज्ञानाने ऍटिझम, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, औषध किंवा मादक पदार्थाचे व्यसन, ट्रॉमा ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत), धमन्यांची वेदना कमी करता येते. साधारणतः आत्तापर्यंत ब्रेनमॅपींग इंडिया फोरम क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना  त्याचा फायदा झाला आहे. तर सुमारे ३० टक्के रुग्णांना औषधामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

इतिहासाच्या सुवर्ण पानांत दडलेली पहिली सर्जिकल स्ट्राईक…

0

‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडूपाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून आकारास आलेल्या ‘फर्जंद’नेतिकीटबारीचे मैदान मारत हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवली होती. ‘फर्जंद’ नंतर आत्ता छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असूनपन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे आणि लगेचचचित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावरमहाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केली. आलमंड्सक्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमीकाव्यावर आधारित आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजीमहाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ‘फत्तेशिकस्त’ या आगामीमहत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारा आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीरधर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बरकलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

असं म्हणतात की सुकर भविष्यासाठी भूतकाळाची पानं उलगडणं गरजेची असतात. इतिहास हा असा दुवा आहे जोआपल्याला तत्कालीन घटनांशी जोडून ठेवतो, आणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्याअजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.  अशाच एका शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकचीआठवण करून देणारा ‘फत्तेशिकस्त’ आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.

अनोख्या अंदाजात पुष्कर श्रोत्रीचा वाढदिवस

0

– वयाच्या ५० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ५ मे रोजी रंगणार  ‘पुष्कर शो THREE’

– पानी फौंडेशन च्या श्रमदान उपक्रमात संपूर्ण श्रोत्री कुटुंबाचा सहभाग

मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकाहून अधिक यशस्वी कारकीर्द असणारे लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या वाढदिवसाची पूर्वसंध्या अनोख्या पद्धानीने साजरी करत वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीय, नातेवाईक, चाहते, मित्र परिवारासह दरवर्षी वाढदिवस साजरा करणाऱ्या पुष्कर यांनी आपल्या वाढदिवसाची पूर्वसंध्या पत्रकार मित्र, मैत्रिणींसोबत अनौपचारिक गप्पा मारत अनोख्या अंदाजात घालवली. यावेळी अभिनेते, दिग्दर्शक विजय केंकरे, निर्माते श्रीपाद पद्माकर, अभिनेते आनंद इंगळे गायक – संगीतकार अजित परब, दिग्दर्शक आदित्य इंगळे आदी उपस्थित होते.

या विषयी बोलताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, वयाच्या पन्नाशीत पोहचत असतानाच माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संपूर्ण काळात कुटुंब, मित्र परिवार यासह प्रसार माध्यमातील मित्र, मैत्रिणींचा मोठा सहभाग राहिला आहे, मी आणि माझ्या चाहत्या मधील ते एका महत्वाचा दुवा आहेत, यामुळे वाढदिवसाची पूर्वसंध्या मी त्यांच्या समवेत साजरी केली. मी पानी फाउंडेशनसाठी दरवर्षी श्रमदान करतो, यंदा १ मी रोजी माझे संपूर्ण कुटुंब या  श्रमदानात सहभागी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात गराडे या गावात आम्ही श्रमदान करणार आहोत.

दरम्यान, ५० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये माझ्या ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचा महोत्सव दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रविवार दि. ५ मे रोजी होणार आहे. आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या सकाळी ११ वा. सादर होणाऱ्या या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ संस्थेला देण्यात येईल. बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या दुपारी ४ वा. सादर होत असलेल्या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या ‘चेतना’ संस्थेला दिले जाईल. तर रात्री ८.३० वा. जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’ चा प्रयोग होणार आहे. या  प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जेत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी दिले जाणार असल्याचे पुष्कर श्रोत्री यांनी सांगितले.

कविता माणसाच मनं तरूण ठेवते – प्रदीप रावत

0

पुणे-रंगत-संगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य प्रतिभा हा पुरस्कार यंदा आषाढ़ काव्य संग्रहाच्या कवयित्री व प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नॅशनल शिपींग बोर्डचे चेअरमन  प्रदीप रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी माजी नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर व शामची आई फाउंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.

                यावेळी भाग्यश्री देसाई त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या; रंगत-संगत प्रतिष्ठानचा हा पुण्यातला माझा पहिला पुरस्कार आहे. याचा मला खूप आनंद होतोय. आता पर्यंत मला खूप पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार मला आंनद देणारा आहे. यावेळी त्यांनी काही निवडक कविता सादर केल्या. त्यापुढे म्हणाल्या की; आषाढ काव्यसंग्रह माझ्या ह्रदयाजवळचा आहे. नवीन लेखकांनी व कवींनी बिनधास्तपणे लेखन करून रसिकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मात्र ते लेखन पाठवताना दर्जात्मक असावे असे त्या म्हणल्या.

            कीर्ती शिलेदार म्हणाल्या की भाग्यश्री देसाईयांचे आणि माझे खूप वर्षापासून ऋणानुबंध आहेत. भाग्यश्री यांच्यावर घरातूनच चांगले संस्कार झाले असल्याने त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला ते दिसतात, म्हणून भाग्यश्री या खूप चांगली चित्रे काढतात. त्याचबरोबर कवियत्री, अभिनेत्री निर्माती असे त्याच्यात सद्गुण आहेत.

            प्रदीप रावत म्हणाले कि भाग्यश्री देसाई यांचे आणि माझे कौटुंबिक नाते असून मी एक उत्तम वाचक आहे. कविता वाचन करताना माणसाचे मन तरूण ठेवण म्हत्वाच आहे.  साहित्य क्षेत्रात प्रत्येक कवीच एक वेगळ अस्तित्व असलं पाहिजे. कारण मानवी मनाचं भावविश्व एकच आहे. मराठी साहित्य अजून समृद्ध होईल असे मला वाटते. भाग्यश्री यांच्या कविता मनाला व अंतर्मनाला भिडत असल्याने त्यांच्या कविता वेगळ्या उंचीवर घेवून जातात. या प्रसंगी रावत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. भारत देसडला यांनी आभार व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

माणुसकीची हत्या थांबवली पाहिजे : डॉ.कुमार सप्तर्षी

0
पुणे :श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरपराधांना   गांधी भवन येथे आयोजित सभेत  श्रद्धांजली वाहण्यात   आली.
ही श्रध्दांजली सभा गांधी भवन , कोथरूड , पुणे येथे  २९ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी  सहा वाजता झाली.
या सभेत   आशीष  जेम्स ( सहसंस्थापक, द न्यु क्रिएशन्स आणि विश्वस्त , दीपगृह  संस्था ),   प्रा. परिमल माया सुधाकर (  जागतिक घडामोडींचे अभ्यासक ), संदीप बर्वे आणि अन्वर राजन , (सचिव , गांधी भवन ) सहभागी झाले.
    युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी या सभेच्या  अध्यक्षस्थानी होते.
‘ आपले आणि आपले नसलेले ‘ असा भेदच दहशतवादाला प्रोत्साहन देतात. जिहाद कडे तरुण आकृष्ट का होतात, याचा अभ्यास केला पाहिजे. मानवतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन आशीष जेम्स् यांनी केले.
कट्टरवादाचे अस्तित्व दाखवण्यासाठी दहशतवादी हल्ले होतात, असे नाही, तर त्या मागचा उद्देश ओळखला पाहिजे. जिहादी तरुणांना आकृष्ट करणे, हाही दहशतवादी संघटनांचा उद्देश असतो. या हल्ल्यानंतर श्रीलंकेत बाहेरील देशांचा हस्तक्षेप वाढू शकतो, श्रीलंकेचे सरकार याकडे कसे पाहते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.आत्मबलिदानाच्या वाटेवरील तरुणांना परत कसे वळवता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे., असे प्रा. परिमल माया सुधाकर यांनी सांगितले.
 या हल्ल्याने फक्त श्रीलंकाच नाही, तर जगातील मानवतावाद्यांसमोर आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा सर्वांगीण विचार करण्यासाठी ही सभा आयोजित केली, असे संदीप बर्वे यांनी सांगितले.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्माकडे वळणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्टया असुरक्षित असतात.वर्चस्ववादाच्या राजकारणातून दहशतवादी हल्ले होतात.मरणाचे दैवतीकरण, उदात्तीकरण  होता कामा नये. गरीबी नष्ट केली नाही तर मरण विकत घेणारे वाढतात. धर्माच्या नावाने होणारा वाह्यातपणा वाढू देता कामा नये.एकात्मता वाढवणारे उपक्रम वाढवले पाहिजे.भारतात आपण सजग राहिलो, तर सर्व जगासाठी उत्तर शोधू शकू . माणुसकीची हत्या थांबविली पाहिजे.

मावळ आणि शिरूर मध्ये कोठे किती मतदान

0
  • मावळ लोकसभा मतदारसंघ

विधानसभा   मतदान टक्केवारी

चिंचवड           ५७.३

पिंपरी       ५६.३

मावळ       ६१.२८

उरण        ६१.८

कर्जत       ६०.४

पनवेल                 ५५.0३

शिरूर लोकसभा मतदारसंघ

विधानसभा      मतदान टक्केवारी

जुन्नर                      ६१

आंबेगाव                 ६७

खेड                   ५९

शिरूर                 ६०

भोसरी                    ५४

हडपसर                   ५४

राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे 57 टक्के मतदान

0

*चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के मतदान*
– मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यांतील मतदान आज शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पुर्ण झाला. आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 17 लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे 57 टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

सन 2014 च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहीले असल्याचे श्री. अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे.

*चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजीत मतदानाची टक्केवारी अशी* – नंदुरबार – 67.64 टक्के, धुळे – 57.29 टक्के, दिंडोरी – 64.24 टक्के, नाशिक – 55.41 टक्के, पालघर – 64.09 टक्के, भिवंडी – 53.68 टक्के, कल्याण – 44.27 टक्के, ठाणे – 49.95 टक्के, मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के, मुंबई दक्षिण – 52.15 टक्के, मावळ – 59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी – 66.42 टक्के.

चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री. अश्वनी कुमार म्हणाले की, सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला.

महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना श्री. कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहीले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.

यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण 1 लाख 85 हजार 850 (बीयू), 1 लाख 17 हजार 139 (सीयू) आणि 1 लाख 23 हजार 206 व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.

आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

००००००

सायंकाळी पाच वाजेपर्यंत मावळमध्ये ५१.४५ टक्के तर शिरूरमध्ये ४७.१७ टक्के मतदान

0

पुणे- : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज  मतदान घेण्यात आले.सायंकाळी पाच वाजेपर्यंत मावळमध्ये ५१.४५ टक्के तर शिरूरमध्ये ४७.१७ टक्के मतदान झाले. 

चार वाजेपर्यंत 41.21 टक्के मतदानाची नोंद झाली. दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे.

मावळ मतदारसंघातून कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 44.60 टक्के मतदानाची नोंद झाली तर शिरूरमधून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 46.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या टक्केवारीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो.मावळ लोकसभा मतदारसंघ 41.30 %

पनवेल 40.90 %
कर्जत 44.60 %
उरण 42.51 %
मावळ 41.73 %
चिंचवड 41.34 %
पिंपरी 37.81 %

शिरूर लोकसभा मतदारसंघ 40.35 %
जुन्नर 43.48 %
आंबेगाव 46.53 %
खेड 42.90 %
शिरूर 41.83 %
भोसरी 41.33 %
हडपसर 31.25 %

राज्यात चार वाजेपर्यंत 41.21 टक्के मतदान

  • नंदूरबार – 50.50 %
  • धुळे 41.31 %
  • दिंडोरी 46.10 %
  • नाशिक 40.28 %
  • पालघर 46.44 %
  • भिवंडी 40.11 %
  • कल्याण 32.35 %
  • ठाणे 36.07 %
  • उत्तर मुंबई 44.66 %
  • उत्तर पश्‍चिम मुंबई 40.52 %
  • उत्तर पुर्व मुंबई 39.95 %
  • उत्तर मध्य मुंबई 38.17 %
  • दक्षिण मध्य मुंबई 39.84 %
  • दक्षिण मुंबई 38.22 %
  • मावळ 41.30 %
  • शिरूर 40.35 %
  • शिर्डी 46.59 %

राज्यात दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के मतदान

  • नंदूरबार – 39.55 %
  • धुळे 30.43 %
  • दिंडोरी 35.23 %
  • नाशिक 27.15 %
  • पालघर 35.61 %
  • भिवंडी 25.38 %
  • कल्याण 19.00 %
  • ठाणे 23.56 %
  • उत्तर मुंबई 32.92 %
  • उत्तर पश्‍चिम मुंबई 30.00 %
  • उत्तर पुर्व मुंबई 30.59 %
  • उत्तर मध्य मुंबई 28.36 %
  • दक्षिण मध्य मुंबई 28.42 %
  • दक्षिण मुंबई 27.13 %
  • मावळ 31.85 %
  • शिरूर 31.37 %
  • शिर्डी 34.79 %

मुंबापुरीच्या तारांगणात मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर या उमेदवारांची गर्दी आहे. उद्याच्या टप्प्यात बिहार (5) , झारखंड (3), मध्य प्रदेश (6), ओडिशा (6), उत्तर प्रदेश (13), राजस्थान (13), पश्‍चिम बंगाल (8) या राज्यांतही मतदान होणार आहे. याआधीच्या तीन टप्प्यांत लोकसभेच्या 543 पैकी 303 जागांवरील मतदान पार पडले असून, उद्याच्या टप्प्यानंतर ही संख्या 374 वर पोचेल. लोकसभेची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील शहाजहॉंपूर, हरदोई, उन्नाव, फारूकाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, झाशी व हामीरपूर आदी प्रतिष्ठेच्या जागांवर लढती होतील. सध्या या 13 पैकी डिंपल यादव यांची जागा वगळता साऱ्याच्या साऱ्या जागा भाजपच्या कब्जात आहेत. मात्र, यंदा सप-बसप महाआघाडीमुळे व कॉंग्रेसमध्ये प्रियांका गांधींच्या सक्रिय आगमनाने राज्यातील समीकरणे 2014 प्रमाणे एकतर्फी न राहता लक्षणीयरीत्या बदलण्याची चिन्हे आहेत.

कन्हैया कुमारकडे लक्ष –
बिहारच्या पाचपैकी बेगुसरायची जागा यंदा “हॉट’ सीट मानली जाते ती “जेनयू’चा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या आगमनाने. भाजपने तेथे गिरिराजसिंह यांना हलविले असले, तरी कन्हैया कुमारने प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशातील सहा जागांपैकी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाड्यातून व माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे पुत्र राहुल सीधीमधून मैदानात आहेत. आपली संपत्ती 660 कोटी दाखविणारे नकुलनाथ हे चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. या राज्यातील साऱ्या जागा जिंकण्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः सूत्रे हलविली आहेत. मात्र, मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी व भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या रोजच्या रोज जी मुक्ताफळे उधळत आहेत; त्याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

…यांचे भवितव्य ठरणार 
मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर (सर्व महाराष्ट्रातून), कन्हैया कुमारच्या बेगुसरायपासून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (फारूकाबाद), बाबूल सुप्रियो (आसनसोल), विजयंता पांडा (केंद्रापाडा), साक्षी महाराज (उन्नाव), डिंपल यादव (कन्नौज), श्रीप्रकाश जयस्वाल (कानपूर), मानवेंद्रसिंह (बाडमेर), वैभव गेहलोत (जोधपूर) आदी दिग्गजांचे भवितव्य आज (ता. 29) मतदानयंत्रांत बंद होणार आहे.

राज्यातील लढती 
उत्तर मुंबई : ऊर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस), गोपाळ शेट्टी (भाजप); उत्तर मध्य मुंबई : प्रिया दत्त (कॉंग्रेस), पूनम महाजन (भाजप); वायव्य मुंबई : संजय निरुपम (कॉंग्रेस), गजानन कीर्तिकर (शिवसेना); ईशान्य मुंबई : संजय दिना पाटील (राष्ट्रवादी), मनोज कोटक (भाजप); दक्षिण मध्य मुंबई : एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), राहुल शेवाळे (शिवसेना); दक्षिण मुंबई : मिलिंद देवरा (कॉंग्रेस), अरविंद सावंत (शिवसेना); ठाणे : राजन विचारे (शिवसेना), आनंद परांजपे (राष्ट्रवादी); कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना), बाबाजी पाटील (राष्ट्रवादी); पालघर : बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी), राजेंद्र गावित (शिवसेना); भिवंडी : सुरेश टावरे (कॉंग्रेस), कपिल पाटील (भाजप); मावळ : पार्थ पवार (राष्ट्रवादी), श्रीरंग बारणे (शिवसेना).

सुरक्षा दलंची परीक्षा 
भाजपला ज्या पश्‍चिम बंगालमधून मोठ्या आशा आहेत; तेथील 8 पैकी 6 जागा सध्या तृणमूलच्या ताब्यात आहेत. ज्या भागांत उद्या मतदान होणार आहे; त्या वीरभूम, पूर्व-पश्‍चिम बर्धमान व मुर्शिदाबाद जिल्ह्यांत निवडणूक काळातील प्रचंड हिंसाचार हा नेहमीचा इतिहास आहे. या स्थितीत उद्याच्या टप्प्यात खरी परीक्षा सुरक्षा दलांसह निवडणूक आयोगाचीच होणार आहे.

डीईएसमध्ये ‘संगीत सभा’

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील (डीईएस) शिक्षक व प्राध्यापकांनी ‘संगीत संध्या’ कार्यक‘म आयोजित केला होता. शिक्षकांनी हिंदी व मराठी वैयक्तिक व सामुदायिक गाणी सादर केली. शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त या आगळ्या-वेगळ्या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.