घटक पक्षांची मदत घेऊन मोदी सरकार येईल: सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित
जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी प्रतिष्ठेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स चा बहुमान चित्रकार संदीप सिन्हा यांना
४८.७८ चौरस मीटर आकाराच्या या चित्रात हिमालयाचे एकच दृश्य रेखाटले असून त्याने अमेरिकेतील २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्राचा याआधीचा सर्वाधिक मोठ्या चित्राचा विक्रम मोडला.
पुणे-भारतातील प्रख्यात कलावंतांपैकी एक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या संदीप सिन्हा या पुणेस्थित चित्रकाराने ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे. संदीप सिन्हा या चित्रकाराने रेखाटलेल्या जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी प्रतिष्ठेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (जीडब्ल्यूआर) बहुमान प्राप्त केला आहे.
यासंदर्भात सांगताना संदीप म्हणाले, “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एकाच चित्रकाराने रेखाटलेल्या जगातील सर्वांत मोठ्या व्यावसावसायिक तैलचित्रासाठी विजेता म्हणून भारताच्या नावाची घोषणा केली तेव्हा तो माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. हा विक्रम यापूर्वी अमेरिकेच्या नावावर २२.४६ चौरस मीटर आकाराच्या चित्रासाठी जवळपास चार वर्षे जमा होता. आपण ४८.७८ चौरस मीटर आकाराचे चित्र रेखाटून तो विक्रम मोडला आहे.”
संदीप यांच्या तैलचित्रातून हिमालयातील ग्रामीण देखावा प्रतित होतो. संदीप यांच्या चित्रांच्या गेल्या २५ व २६ ऑक्टोबर २०१८ रोजी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या ‘आवाहन – अवेकनिंग द गॉडेस विदीन’ या एकल चित्रप्रदर्शनात हे तैलचित्र प्रथम प्रदर्शित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वतः असामान्य चित्रकार असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्या हस्ते झाले होते.
“या चित्राचे शीर्षक ‘हिमाखन’ आहे. त्याचा अर्थ हिमालयासारखा खंबीर मनाचा आणि लोण्यासारखा (माखन) मृदू अंतःकरणाचा असा आहे. माखन हे माझ्या वडिलांचेही नाव असल्याने मी चित्राला ते शीर्षक दिले. तैलचित्र पूर्ण करायला मला अडीच महिने लागले. जागतिक विक्रमाच्या नियमांनुसार असे चित्र एकच देखावा रेखाटलेले (सिंगल सीन) असावे लागते. त्यामुळे मी निसर्गाची प्रतिकात्मकता आणि भव्यता रसिकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने माझ्या कलाप्रकारासाठी हिमालय पर्वतरांगा ही संकल्पना निवडली,” असे संदीप सिन्हा यांनी स्पष्ट केले. संदीप यांनी आपले हे चित्र ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांना समर्पित केले आहे. हिमालय हा सर्व आव्हानांना तोंड देऊन खंबीर उभा असतो, तशाच हल्ल्यातून वाचलेल्या महिलाही निर्धाराने जीवनात उभ्या आहेत, असे संदीप यांनी आदराने नमूद केले.
‘हे माझे यश माझे कुटूंब, मित्र आणि हितचिंतकांचेही आहे, ज्यांच्या पाठिंब्याखेरीज हे हिमालयाएवढे उत्तुंग आव्हान पेलणे शक्यच झाले नसते,’ या शब्दांत संदीप यांनी गौरवपूर्ण समारोप केला.
संदीप हे माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक असून ते टेकमहिंद्र कंपनीत काम करतात. ते स्वयंप्रज्ञ अमूर्त चित्रकार असून याआधी त्यांनी वर्ष २०१५ मध्ये आपल्या लघुचित्रांद्वारे (मिनिएचर पेंटिंग्ज) आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याअंतर्गत त्यांनी ‘जीवन आणि वैश्विक तापमानवाढ’ (लाईफ अँड ग्लोबल वॉर्मिंग) या संकल्पनेवर आधारित एक सेंटीमीटर लांबी-रुंदीच्या आकाराची ९४५ लघुचित्रे १४ इंच गुणिले ११ इंच आकाराच्या कॅनव्हासवर साकारली होती. या कलाकृतीला कलारसिकांकडून खूपच वाखाणले गेले आणि जागतिक मान्यताही मिळाली.
बाल साहित्य बोजड, बोधवादी असू नये -भानू काळे
तळजाई टेकडी वर्षभर राहणार हिरवीगार-आबा बागुल
आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. विशेषतः आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते मात्र कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाच लाख लिटर पाणी पोहचत आहे. मात्र येथील वनसंपदा हिरवीगार ठेवण्यासाठी पेशवेकालीन उच्छवासातून आता ४५ लाख लीटर पाणी उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे .पाच- सात वर्षांपूर्वी पेशवेकालीन उच्छवासाचा उन्हाळ्यात उपयोग करण्यात आला होता. आता ग्रे वॉटरचे पाच लाख आणि पेशवेकालीन पाणी योजनेच्या उच्छवासाचे ४५ लाख असे दररोज पन्नास लाख लिटर पाणी येथे मिळत आहे. त्यामुळे आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे. शिवाय
-
ग्रे – वॉटर प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज
महावितरणमधील उत्कृष्ट 58 कर्मचाऱ्यांचा गौरव
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत तत्पर ग्राहकसेवा, वीजवाहिन्यांची व उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल व दुरुस्ती आदी निकषांप्रमाणे सन 2017-18 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 14 यंत्रचालक व 44 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
रास्तापेठ येथे महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, उपसंचालक (दक्षता) व प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) कमांडर (निवृत्त) श्री. शिवाजी इंदलकर, महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. वंदनकुमार मेंढे, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्र म्हकांळे, अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन उत्कृष्ट 58 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता श्री. तालेवार म्हणाले, की वीजग्राहकांना तत्पर व सुरळीत वीजसेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक कर्मचाऱ्यांनी वीजयंत्रणेचे काम करताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक श्री. इंदलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी केले तर सौ. अपर्णा माणकीकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे परिमंडलातील उत्कृष्ट कर्मचारी पुढीलप्रमाणे – मनोज सूर्यवंशी, मझर इनामदार, लाझरस रणभिसे, सुरेश भोसले (बंडगार्डन विभाग), पोपट कांबळे, अजित लोखंडे, नवनाथ मुंढे, तुकाराम कातकाडे (नगररोड विभाग), राधाकृष्ण चावरे, जमालुद्दिन सय्यद, सखाराम भोजने, गणेश मेश्राम (पद्मावती विभाग), रामदास पिटेकर, हनुमंत शिवरकर, गोरखनाथ पोकळे, अशोक मुंडे (पर्वती विभाग), सुशांत गोगावले, परसराम गायकवाड, विशाल कानपिळे, सुरेंद्र मोहिते (रास्तापेठ विभाग), अभिजित भालेराव, अरविंद वराडे (रास्तापेठ चाचणी विभाग), तानाजी रेंगडे, तुकाराम हिंगे, खंडू कारंडे, निवृत्ती पडवळ, प्रशांत निर्मल, सुभाष मोरे (मंचर विभाग), बापू दिवेकर, सचिन मेघुंडे, शुभम गित्ते, कृष्णा दानवले, पोपट केसकर (मुळशी विभाग), राजेंद्र अडसुळे, प्रसाद पोकळे, सागर शेळके, गोरक्षनाथ थिटे, सचिन कळढोणे, अजय सोनटक्के (राजगुरुनगर विभाग), रवींद्र रुपे, अंकुश चव्हाण, गणपत केवाळ, अमोल शिंगाडे (भोसरी विभाग), विकास कुलकर्णी, नागेश ढगे, प्रशांत कदम, अविनाश लिंबोळे (कोथरूड विभाग), संदीप साळुंके, राहुल पारधी, दुर्गेश पाटील, विठ्ठल इरनक (पिंपरी विभाग), श्रीकृष्ण ढेरे, तानाजी राठोड, सतीश टेकाळे, शेखर मांजरे (शिवाजीनगर विभाग), अनुराग भोईर (गणेशखिंड चाचणी विभाग), शैलेश भालेराव, गुलाब झारगड (स्थापत्य विभाग).
आगामी दोन दशकांत दीडलाख टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याचे ब्रिजस्टोनचे ध्येय
2019 च्या अखेरीपर्यंत 7 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीची योजना
पुणे-– ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ब्रिजस्टोन इंडिया) चे भारतातील दोन
सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून या माध्यमातून स्वच्छ उर्जा उपलब्ध झाली आहे. पश्चिम
भारतातील महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या चाकण येथील पुणे प्रकल्पाची सध्याची सौर क्षमता 1 मेगावॅटची
आहे. याठिकाणी आणखी 4 मेगावॅट क्षमतेची प्रक्रिया सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू होईल. मध्य भारतातील
मध्यप्रदेशातील खेडा येथे 1 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प सुरू असून त्याची क्षमता आणखी एक मेगावॅटने
वाढविण्यात येणार असून 2019 च्या तिसऱ्या तिमाहीपासून कार्यरत होणार आहे.
ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले की, “स्वच्छ उर्जेचा वापर हे
ब्रिजस्टोनचे प्रमुख स्थिर उद्दिष्ट्य आहे. याच जोडीने आपण सौर उर्जेचा अवलंब केल्यास, पारंपरिक उर्जा
प्रकारांवर विसंबून राहणे कमी होते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनालाही आळा बसतो. 1 मेगावॅट सौर क्षमता
दरवर्षी 1000 टन कार्बन उत्सर्जन थांबवते. या हिशोबाने दोन दशकांत 7 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे 150,000
कार्बन उत्सर्जन टळेल. आमच्याकरिता भारतात, हे कंपनीच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दृष्टीने उचलले
पाऊल असून त्यामुळे 2050 आणि त्यापलीकडे 50% कपात गाठता येणार आहे.”
सौर उर्जेचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने हितावहच आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम
दिसेल. 1 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे 20 वर्षांमध्ये जवळपास 59 दशलक्ष रुपयांच्या वीज खर्चाची बचत होणार
आहे.
ब्रिजस्टोन ग्रुपचा भर ‘पर्यावरणा’वर आहे, कारण समूहाच्या सीएसआर वचनबद्धता ‘अवर वे टू सर्व” (सेवा
करण्याची आमची पद्धत) अनुषंगाने याला प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 पर्यंत (2005 च्या तुलनेत)
कार्यवहन आणि उत्पादन वापरानंतर कार्बनडायऑक्साईडमध्ये 35 टक्क्यांची घट आणण्याचे लक्ष्य निश्चित
करण्यात आले आहे. त्याशिवाय 2050 आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी समाजपूरक अक्षय्य उर्जा लक्षात
घेऊन दीर्घकालीन पर्यावरण उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी
कार्बनडायऑक्साईड घटविण्याची जाणीव मुख्य भूमिका बजावेल. ब्रिजस्टोन ग्रुपपैकी एक असलेली
ब्रिजस्टोन इंडिया सद्य आणि आगामी पिढ्यांसाठी आरोग्यदायक पर्यावरणासाठी काम करण्याकरिता
वचनबद्ध आहे.
‘अवर वे टू सर्व’ विषयी
2017 मध्ये शुभारंभ झालेले ‘अवर वे टू सर्व’ ब्रिजस्टोनच्या पुनर्रचित ग्लोबल कॉर्पोरेट सोशल
रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) वचनाचा भाग असून तीन प्राधान्य क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहे: मोबिलिटी
(गतिशीलता), पीपल (लोक) आणि एन्वायर्मेंट (पर्यावरण). “अवर वे टू सर्व” मध्ये कंपनीचे दीर्घकालीन
तत्वज्ञान “सर्विंग सोसायटी विथ सुपिरिअर क्वालिटी” (समाजाची सर्वोत्तम दर्जेदार सेवा) झळकते आणि ही
पावती आहे की, सर्वोत्तम कंपन्या केवळ त्यांच्या सहयोगींसोबत कार्यरत नसतात, तर उत्तम जगाकरिता
योगदान देत असतात.
ब्रिजस्टोन इंडियाबद्दल:
ब्रिजस्टोन इंडिया प्रा लिच्या कामकाजाला 1996 मध्ये सुरुवात झाली. मार्च 1998 मध्ये मध्यप्रदेशातील
खेडा येथे निर्मिती सुविधा स्थापण्यात आली. भारताच्या रस्त्यांकरिता ब्रिजस्टोन टायर्सची निर्मिती करून
भारताला धावते ठेवण्याचे ध्येय ब्रिजस्टोनने गाठले. 2013 मध्ये कंपनीने पुण्यातील चाकण येथे आणखी
एक सुविधा केंद्र उभारून आपला विस्तार वाढवला. 20 वर्षांहून अधिक कालावधीच्या आपल्या छोट्या
वाटचालीत ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही ओईएम आणि रिप्लेसमेंट मार्केट अशा दोन्हीतील अग्रगण्य टायर
कंपन्यांपैकी एक मानली जाते.
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनविषयी:
ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे मुख्यालय टोकयो येथे असून आज ती जगातील सर्वात मोठी टायर आणि रबर
कंपनी मानली जाते. या कंपनीने तयार केलेले टायर विविध कामांसाठी वापरण्यात येतात. त्याशिवाय
अनेक तऱ्हेच्या इतर उत्पादन श्रेणींची निर्मिती कंपनी करते, ज्यामध्ये औद्योगिक रबर आणि रासायनिक
उत्पादने व स्पोर्टींग वस्तूंचा समावेश आहे. त्यांची उत्पादने जगभरातील 150 हून अधिक राष्ट्रांत व प्रदेशांत
विकली जातात.
घरखरेदी ची यंदा सुवर्णसंधी क्रेडाईचा दावा
पुणे-क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख,आणि क्रेडाई नैशनल चे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी घर खरेदी साठी यंदा सुवर्णसंधी असल्याचा दावा करत या अक्षयतृतीयेला घर खरेदी जरूर करा असे आवाहन पुणेकरांना केले आहे.
या दोहोंनी असे म्हटले आहे कि,मालमत्ता खरेदी करण्यासाठी साडे तीन मुहूर्तमधील सर्वोत्तम असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, असे आपण मानतो. पुण्यातील बांधकाम क्षेत्राविषयी सांगायचे झाल्यास, ज्या ८ शहरांमध्ये भारतातील ७५ टक्के बांधकाम व्यवसाय चालतो त्यापैकी पुणे हे एक शहर असून इतर शहरांपेक्षा अग्रगण्य देखील आहे. व्यवसाय, राहणे आणि गुंतवणुकीच्या कारणास्तव मालमत्ता खरेदीतही इतरांपेक्षा पुण्याला मागणी जास्त आहे. १ ते 5 टक्के जीएसटी, महरेरा कायद्याच्या प्रभावी अंमबजावणीमुळे बांधकाम क्षेत्रा विषयी निर्माण झालेला आत्मविश्वास आणि पारदर्शकता, सर्वात कमी व्याजदर आणि सुलभ गृहकर्ज, गेल्या ४ वर्षातील मालमत्तेचा सर्वात कमी दर, भविष्यात नव्हे तर कार्यान्वित असलेले मेट्रो, फ्लाय, अंडरपास, नवीन डीपी रस्ते, नवीन विमानतळ, रिंग रोड, आयटी पार्क, प्रधानमंत्री आवास योजनेस झालेली गती, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट, शिक्षण क्षेत्राचा विस्तार आणि आरोग्य सेवा, निरोगी वातावरण, विविध क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी आदी बाबींचा विचार करता, अक्षय तृतीयेला घराच्या सर्वाधिक विक्रीसाठी उत्तम वातावरण आहे असे वाटते. घर खरेदीसाठी अगदी योग्य वेळ आहे. ही संधी ग्राहकांनी दवडू नये.
पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी प्रधान मंत्री आवास योजनेच्या २.६७ लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेतला पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, सोने आणि शेअरसारख्या इतर गुंतवणुकीपेक्षा रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीमध्ये कर लाभ अधिक आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीवरील परतावा सोन्याच्या आणि शेअर्सच्या तुलनेने अधिक आहे.पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी खूप उज्ज्वल भविष्य आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील उत्कृष्ट, आश्वस्त पाणी उपलब्धता तसेच सुरक्षित, निरोगी वातावरण हे पुणेचे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील बहुतांशी नामांकित विकसक क्रेडाईचे सदस्य असून क्रेडाई म्हणजे विश्वास असे समीकरण आहे.असे त्यांनी म्हटले आहे .
यावर्षी घरखरेदी करण्याची सुवर्ण संधी यांची कारणे त्यांनी पुढीलप्रमाणे दिली आहेत …
१. घरांवरील जीएसटीचा दर १ एप्रिल पासून १ टक्के व ५ टक्के (परवडणाऱ्या घरे व इतर अनुक्रमे) करण्यात आला आहे.
२. रेडीरेकनरच्या दरांमध्ये कुठलीही दर वाढ न झाल्यामुळे स्टॅम्प ड्युटी देखील वाढली नाही
३. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट्स कमी केल्यामुळे घर खरेदीसाठी बँकेच्या व्याज दरातही घट झाली आहे.
४. महारेराच्या पारदर्शकतेमुळे आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्राहक यावर्षी घर खरेदीचे असंख्य पर्याय निवडू शकतो
५. क्रेडाई मधील विश्वासार्ह विकसकांच्या विश्वासार्हतेचा आणि बाकी सर्व गोष्टींचा फायदा जाणकार घरखरेदीधारकांना होणार आहे.
टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत-जिल्हाधिकारी
पुणे, दिनांक 6- जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल,रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी प्रारंभी तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. जिल्हयात निर्माण होणा-या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, आतापर्यंत केलेल्या कामाची सद्यस्थिती, उपलब्धता याचीही विस्तृत माहिती घेतली. टंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी क्षेत्रिय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील, असेही ते म्हणाले. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास त्याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत. पिण्याचे पाणी, चारा टंचाईबाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात. अधिका-यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. महत्त्वाची विकास कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे.
यावेळी लघुसिंचन, लघुपाटबंधारे, यांत्रिकी, भूजलसर्व्हेक्षण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, या विभागाकडून करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या बाबत यंत्रणानिहाय कामांच्या सद्यस्थितीचा व खरीप हंगामात केली जाणारी खरीप/ रब्बी पीक कर्ज वाटप, खतांचे वाटप इ. कामे यांचा आढावाही घेण्यात आला. सर्वांनी चांगला समन्वय ठेवून कामे करावीत असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.यावेळी जिल्हयातील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य-दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल
मुंबई, दि. 06 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.
दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.
सिमेंटची दर वाढ अवाजवी –राजीव परीख
शासनाकडे दर कमी करण्याची क्रेडाई महाराष्ट्ची मागणी
पुणे :-भारतातील सर्व सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची किंमत प्रती बॅगमागे ३० टक्क्यांनी वाढविल्याने सर्वसामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही कुठल्याही प्रकारचे बांधकाम करणे शक्य होणार नाही तसेच यामुळे बांधकाम खर्चात देखील वाढ होणार असून विकसकांना आणि पर्यायाने ग्राहकांना देखील याचा फटका बसणार आहे.त्यामुळे शासनाने यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
क्रेडाई महाराष्ट्राने असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे तसेच लवकरच हे निवेदन प्रत्येक शहरातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे निवेदन याआधीच देण्यात आले आहे. या अवाजवी दरवाढीमुळे २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकणार नाही.बांधकाम व्यवसाय सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांवर देखील या भाव वाढीचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या दर वाढीवर पुनर्विचार करून सरकारने सिमेंट कंपन्यांना दर वाढ कमी करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात सांगितले आहे.
राजीव गांधींवरील टीका मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक
पुणे : “स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका ही सभ्यतेच्या आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादा ओलांडणारी आहे. अशी वक्तव्ये नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. गमावलेला आत्मविश्वास, घसरलेली जीभ आणि विरोधकांच्या बाबतीत वापरले जात असलेले शब्द यातुन लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की होणार, हे त्यांनी मान्य केल्यासारखे आहे,” अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.
उल्हास पवार म्हणाले, “स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी वापरलेली भाषा अतिशय असभ्य, बदनामीकारक आणि खोटारडेपणाची आहे. त्यांच्या कर्तृत्वाची अवहेलना करणारी आहे. संस्कृतीचा टेम्भा मिरवणाऱ्या नरेंद्र मोदींना ‘मरणांती वैराणी’ हे भारतीय संस्कृतीतील मूलभूत तत्वज्ञानाचे भान राहिलेले नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेष मोदींच्या मनामध्ये शब्दाशब्दातुन रोज प्रगट होत आहे. स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी, स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाच्या ऐक्यासाठी, अखंडत्वासाठी दहशतवादाशी लढताना प्राणार्पण केले. त्यांच्या देहाचे तुकडे, शरीराची झालेली चाळण आणि भारतभूमीवर सांडलेले त्यांचे रक्त मोदींनी पाहिलेले नाही. देशासाठी त्यांचा त्याग माहित असूनही अशा प्रकारचे टोकाच्या द्वेषभावनेतून उदगार काढणे हे केवळ पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे. मोदी यांच्या मनात असलेला द्वेष भारतीयांनी पाहिला आहे. अशा प्रकारे द्वेषाने आणि अहंकाराने भरलेला पंतप्रधान देशाने याआधी कधी पहिला नाही.”
“मोदींची भाषणे हुकूमशाहीची, द्वेषाची आणि विघटनकारी शक्तींना बळ देणारी आहेत. राजीव गांधींच्या योगदानामुळेच २१ व्या शतकात भारत जगाच्या नकाशावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. संगणक, मोबाईल आणि इंटरनेट या डिजिटल क्रांतीचे ते जनक आहेत. याऊलट मोदींच्या काळात नोटबंदी, जीएसटी यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे, असे स्पष्ट मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताळतंत्र सोडून प्रधानसेवक नरेंद्र मोदी टीका करीत आहेत. स्मृती इराणी यांना सहानुभूती मिळावी, याकरिता खालच्या पातळीची भाषा करीत आहेत, हे दुर्दैवी आहे. सोनिया गांधी यांच्या मनाला वेदना देत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पितृशोकावर मीठ चोळण्याचे काम मोदी करीत आहेत. याची जाणीव कौटुंबिक पार्श्वभूमीपासून दूर असलेल्या मोदींना नाही. राजकीय स्वार्थापोटी पातळी सोडून बोलणाऱ्या मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सांस्कृतीचे देणेघेणे नाही. स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजी आणि राजीवजी यांच्या निधनानंतर वाहिलेल्या श्रद्धांजलीवेळीचे उद्गार मोदींच्या वाचनातही आले नसतील. सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या पक्षाचा असंस्कृत पंतप्रधान हेच ब्रीद वाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी ‘पार्टी विथ डिफरंन्स’चा फार्म्युला देत आहे,” असेही उल्हास पवार आणि मोहन जोशी यांनी नमूद केले.
पुलवामातील भारतीय सैनिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश-मनमोहनसिंग
नवी दिल्ली – पुलवामातील भारतीय सैनिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश आहे. रुपया हे आशियातील सर्वात घसरते चलन ठरले आहे. मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातील शेतकरी, तरुण, व्यापारी आणि प्रत्येक स्वायत्त संस्थेसाठी त्रासदायक आणि विनाशकारी होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्तेतून हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे.अशी जहरी टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केली आहे. केंद्रातील एनडीए च्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर मनमोहनसिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
देशात मोदी लाट ओसरली आहे. या सरकाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी नागरिकांनी तयारी केली आहे. या सरकारचा विकासावर विश्वास नाही. सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आल्याने ते असहाय्य झाले आहेत. नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे, असा गंभीर आरोप मनमोहनसिंग यांनी केला.
पाकिस्तानसंदर्भात मोदींचे परराष्ट्र धोरण अतिशय निष्काळजीपणाचे होते. या सरकारने पाकच्या धोरणांवर अनेक कोलांटउड्या खाल्ल्या. पाकिस्तानला अचानक दिलेली भेट. त्यानंतर पठाणकोट विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयला दिलेले निमंत्रण. हा सर्व प्रकार संतापजनक आहे, असं मनमोहनसिंग म्हणाले.मोदी यांनीच भारतीय अर्थव्यवस्थेला खाईत लोटले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीने गेल्या पाच वर्षांतील नीचांक गाठला आहे. रुपया हे आशियातील सर्वात घसरते चलन ठरले आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर आहे. सततच्या बदलत्या आर्थिक धोरणांना जनता कंटाळली आहे. जनतेत प्रचंड नाराजी आहे. पण याला तोंड देण्यासाठी भाजपने निवडणुकीत दहशतवाद आणि राष्ट्रवादाचा मुद्दा मोठा केला आहे. मात्र, पुलवामातील दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश आहे. दहशतवादाविरोधात सरकारची तयारी अपू्र्ण आहे. हे यावरून स्पष्ट होतं. या सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप मनमोहनसिंग यांनी केला.
अनिल अंबानी यांचा राहुल गांधींवर पलटवार
खोटी बदनामी करण्याची मोहीम राहुल राबवत आहेत: अंबानी
मुंबई-राफेल करारावरून उद्योगपती अनिल अंबानी यांना घेरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना अंबानी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात आमच्या रिलायन्स ग्रुपला १ लाख कोटींची कंत्राटं देण्यात आली होती. याचा अर्थ त्यावेळी काँग्रेस अप्रमाणिक उद्योजकाला साथ देत होती काय? असा पलटवार करतानाच राहुल गांधी खोटा आणि वाईट प्रचार करत असून द्वेष भावना निर्माण करत आहे, असा आरोपही अंबानी यांनी केला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने एक पत्रक काढून त्यांच्यावरील सर्व आरोपांना उत्तर देताना राहुल गांधींवर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत; त्याला काहीच आधार नाही. बदनामी करणाऱ्या या आरोपाबाबतचे कोणतेही पुरावेही दिलेले नाहीत, असंही अंबानी ग्रुपने या पत्रकात नमूद केलं आहे. राहुल गांधी अपप्रचार करत असून त्यांनी आमच्या बदनामीची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी आमचे चेअरमन अनिल अंबानी यांची राजकीय हितसंबंधातून कामं मिळवणारा भांडवलशहा आणि अप्रामाणिक उद्योजक म्हणून संभावना केली असून आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असंही रिलायन्सने म्हटलं आहे.
२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसच्या यूपीए सरकारने अंबानी यांच्या नेतृत्वाखालील पॉवर, टेलिकॉम, रोड, मेट्रो आदी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्सला १ लाख कोटी रुपयांची कंत्राटं दिली आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकार कथित भांडवलशहा आणि अप्रामाणिक उद्योजकाचं दहा वर्ष समर्थन करत होती का? हे सुद्धा राहुल यांनी स्पष्ट करायला हवं, असं आव्हानही रिलायन्सने दिलं आहे.
गलीच्छ् कारभाराचा घाणेरडा अनुभव
पुणे- आज सकाळी येरवडा भागातील सांडपाण्याची वाहणी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. वाहनचालकांना या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागला. अखेर पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीन तास शाेध घेतल्यानंतर ही समस्या साेडविण्यात आली. परंतु ताेपर्यंत येथील रहिवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पुण्यात कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरल्याने गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेकांचे संसार रस्त्याावर आले हाेते. त्यानंतर पुन्हा एकदा जलवाहिनीचा वाल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणी रस्त्यावर आले हाेते. काही दिवसांपूर्वी देखील जनता वसाहत येथे पाणी शिरले हाेते. अशा घटना वारंवार घडत असताना आज पुन्हा येरवडा भागात सकाळी सांडपाण्याची वाहिनी तुंबली. त्यामुळे येरवडा गाडीतळ ते गुंजन चाैकापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी आले हाेते. या घाणेरड्या पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील या प्रकारामुळे अडचणींचा सामना करावा लागले. या प्रकारामुळे या भागात वाहतूककाेंडी देखील झाली हाेती. शेवटी तीन तासानंतर तुंबलेल्या वाहिनीतील अडकलेल्या वस्तू काढल्यानंतर पाण्याचा लाेंढा कमी झाला. या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली हाेती. सांडपाणी तुंबल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
बॉसच्या त्रासाला कंटाळून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल
पुसेगाव : कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पंकज शिवाजी गायकवाड (वय २७, रा. शिंदेवाडी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस आणि मयत युवकाचे वडील शिवाजी श्रीरंग गायकवाड (रा. शिंदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआय या बँकेत दोन वर्षे कॉन्ट्रक्ट बेसेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रिलेशनशीप ऑफिसर म्हणून पद मिळविले. एक वर्षे पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करू लागला. शिंदेवाडीतून तो कामावर ये जा करत होता.
दरम्यान, वर्षेभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावरून काढून टाकेन, अशी विनाकारण धमकी देत होते. ‘तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहे, तुझा प्रवासभत्ता बील मंजूर करणार नाही, काय करायचे ते कर,’ अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत पंकज याच्या मोबाईलवर या दोघांतील संभाषण रेकॉर्डींग झालेले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. ‘तुझ्यामुळे बँकेचा परफार्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाही तर तुझी बदलीच करतो,’ अशी धमकी त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्यांच्याकडून दिली जात होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, त्यामुळे पंकज गेल्या चारपाच दिवसांपासून मानसिक धडपणाखाली व प्रचंड दबावाखाली होता. या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, वडील शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर शाखाधिकारी महेश पाटीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.


