Home Blog Page 2936

आठवणीतला रविवार …

0

‘रामायण’ची कुणी तरी आज क्लिप पाठवली, जुन्या आठवणी ताज्या करायला… ती क्लिप बघता बघता दूरदर्शनचा तो  काळ  डोळ्यांसमोर उभा राहिला.

रविवारची आतुरतेने आम्ही वाट पाहायचो. तेव्हा फक्त आणि फक्त दूरदर्शनच होते, आता सारखं भरमसाठ च्यानलचं जाळं त्या वेळी नव्हतं.  आणि मुख्य म्हणजे 24 टीव्ही चालू नसायचा.  त्याच्या नेमक्या वेळा ठरलेल्या असायच्या.

रविवार म्हणजे साप्ताहिकी – आठवड्याच्या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती.  भक्ती बर्वे ती उत्तमरित्या सादर करायच्या.  आम्ही वहीत नोंद करून ठेवायचो कधी चांगला कार्यक्रम आहे ते.

रामानंद सागर यांच्या रामायण ने तर प्रसिद्धीचा कळस गाठला. इतका की त्या सीरिअलच्या वेळी रस्ते ओस पडायचे. प्रचंड लोकप्रियता  रामायण ने मिळवली होती. ही मालिका बघणारे सर्वच भक्तिभावाने त्यात रंगून जात. असा अनुभव त्या सर्वानाच आला असेल. ‘स्टारट्रेक’ नावाची एक इंग्रजी मालिका ही त्यावेळी रविवारी असायची, ती थरारक मालिका बघायला तेवढीच मजा यायची.

रविवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्या अगोदर टीव्ही ची अँटिना  बरोबर आहे ना कुठे वाकडी तिकडी तर  झालेली नाहीना हे आधी  बघितले जायचे. अँटिना बरोबर नसेल किंवा त्यावर पक्षी येऊन बसला कि टीव्ही वर रेषा रेषा यायच्या त्यामुळे मग मूड जायचा.  कार्यक्रमात व्यत्ययची पाटी आली तरीही सगळा मूड जायचा. संध्याकाळी हिंदी सिनेमा सुरु असताना २-३ वेळा तरी व्यत्यय यायचाच.

 

रविवार संध्याकाळ म्हणजे हिंदी सिनेमा. ही पण एक पर्वणी असायची.  घरातील सर्वजण एकत्र बसून तो सिनेमा एन्जॉय करत असू.  सिनेमामध्येही इंटरवलला बातम्या असायच्या, त्या तितक्याच आवडीने एखादा कार्यक्रम असल्यासारख्या बघितल्या जायच्या. साधारण रात्री 10 वाजता टीव्ही बंद व्हायचा.

आताचा रविवार म्हणजे टिव्हीवरील सतराशे साठ चॅनल आणि तेवढेच अठरापगड कार्यक्रम.  आता तर महा रविवार म्हणजे काही सीरिअलचे  १ तासाचे विशेष भाग दाखवले जातात. काय बघावं तेच कळत  नाही.

पूर्वीच्या रविवारच्या कार्यक्रमाची ती मजा आता नाही आणि आपल्या लडिवाळ आवाजाने, हसऱ्या चेहऱ्याने साप्ताहिकी सांगणाऱ्या भक्ती बर्वे ही हयात नाहीत. आता आहेत मनात साठवून ठेवलेल्या त्या आठवणी, ज्या आज पुन्हा जाग्या झाल्यात. रामायण ची व्हाट्सअप वर पाठवलेली क्लीप बघताना… दूरदर्शनची अविस्मरणीय रविवार सकाळ…

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

‘नूपुर नाद’ महोत्सव दि. 25 मे रोजी

पुणे-शास्त्रीय नृत्य व शास्त्रीय गायन यांचा मनोहारी मिलाफ असणारा ‘नूपुर नाद महोत्सव’ यंदा शनिवार, दि. 25 मे 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता कोथरूड येथील डॉ. शामराव कलमाडी प्रशालेतील शकुंतला शेट्टी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. विख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना व अभिनेत्री बंगलोरच्या रूक्मिणी विजयकुमार यांचे बहुचर्चित ‘अभिमता’ एकल नृत्यनाट्य आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे सुरेल गायन यांचा हा कार्यक्रम ‘नूपुर नाद’ आणि श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या ‘नूपुर नाद’ महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यास प्रवेशमूल्य आहे.

भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर व संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नूपुर नाद महोत्सवात यापूर्वी पं. शिवकुमार शर्मा, मालविका सरूक्काई, पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास कशाळकर, राहुल शर्मा, जयतीर्थ मेकुंडी, प्रवीण गोडखिंडी, अलरमेल वल्ली, व्यंकटेश कुमार सारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला रसिकांच्या भरघोस प्रतिसादात सादर केली आहे.

संगीत कलाविष्कारातून पांडुरंगाची ‘अनुभूती’

कवयित्री सौ.उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या ‘अनुभूती’ कविता संग्रहाचे गायन व वाचन
 पुणे: संसाराच्या रणसंग्रामी विचलित मन स्थिर झाले, रूप सावळे श्यामलवर्णी विटेवरी ठाकले… या कवितेला गाण्यात स्वरबध्द करून संपूर्ण सभागृहाला विठ्ठलाची अनुभूती दिली. निमित्त होते कवी कुसुमाग्रज मंच यांच्या सौजन्याने ‘अनुभूती’ संगीत कलाविष्कार या कार्यक्रमाचे.
कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अनुभूती’ या कार्यक्रमात त्यांच्या जवळपास दहा कवितांना संगीतबध्द चालीत गुंफून त्याचे सादरीकरण संगीतकार व गायक पं. रवींद्र यादव व गायिका अमृता यादव यांनी केले.
यावेळी सुप्रसिध्द मराठी लेखिका डॉ. माधवी वैद्य, जगविख्यात संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, कवी कुसुमाग्रज मंचाचे विजय जोग आणि श्री. नाईकडे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. एन. पठाण आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ यांनी दीप प्रज्वलन केले.
या कार्यक्रमात कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड यांनी डोळे, हुंदका, मायबोली, सृजन, संगणक यासारख्या अनेक कवितांचे वाचन केले. या कवितांच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक, पर्यावरण, संगणकीय क्षेत्र व कुटुंबाची स्थिती मांडली.
गायक पं. रवींद्र यांनी आपल्या सुरेल आवाजात परब्रह्म ते विटेवरती अठ्ठावीस युगे ठाकले.. हे गीत सादर करून रसिकांना जणू पंढरपूरची वारी घडविली. त्यानंतर गाडी चालली टेचात, पाहटंच्या चांदण्यात…, विश्‍वाची जननी आदिमाया माउली आणि श्री गरूडस्तंभाचा सोहळा भेदिला गगनमंडळा… या कवितांना स्वरबध्द केले.
यावेळी कवयित्री सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड म्हणाल्या, आज मी माझ्या आयुष्याची ७६ वर्षे पूर्ण केली, हे भाग्याचे आहे. जीवनात आलेला सर्व अनुभव अनुभूती कविता संग्रहात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात आध्यात्मिक वाटचाल, वारकरी संप्रदायातील अनुभव आणि जीवनातील विविध प्रसंग आहेत. रसिकांच्या प्रेमातूनच या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली आहे.  सत्य सुंदर विश्‍व माझ्या दृष्टीला पडले, त्यातूनच माझी कविता जन्माला आली. या कविता म्हणजे सुख, शांती, समाधान व आत्मिक आनंदाचा ठेवा आहे.
गायक पं. रवींद्र यादव व अमृता यादव यांना ज्ञानेश्‍वर सणस (तबला), प्रकाश सुतार (सिंथ.) व गुरूनाथ कदरेकर( तालवाद्य) यांनी साथ दिली.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, प्रा. सुनिता मंगेश कराड व शेकडो रसिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निवेदन मनोजकुमार देशपांडे यांनी केले.
प्रा.डॉ.मिलिंद पांडे यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. प्रा.ज्योती कराड-ढाकणे यांनी आभार मानले.

जे अँड के बँकेचा नफा दुपटीने, म्हणजे 465 कोटी रुपयांपर्यंत वाढला

श्रीनगर: जेअँडके बँक या प्रमुख सरकारी वित्तीय संस्थेने आर्थिक वर्ष 2018-19 साठीच्या निव्वळ नफ्यामध्ये 129% म्हणजे 465 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. य तुलनेत बँकेला अगोदरच्या वर्षात 202 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. मार्च तिमाहीमध्ये बँकेने 214.80 कोटी रुपये नफा मिळला, या तुलनेत आर्थिक वर्ष 2018 मधील याच तिमाहीतील नफा 28.41 कोटी रुपये होता. रिटेल क्रेडिटमधील उत्तम वाढ, पीएनबी मेटलाइफमधील काही हिश्श्याची विक्री व काही मोठ्या एनपीएलचा प्रश्न सुटला, यामुळे आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बँकेचे एकूण उत्पन्न 8487 कोटी रुपयांपर्यंत वाढले, तर वर्षभरापूर्वी ते 7116 कोटी रुपये होते.

बँकेच्या संचालक मंडळाने श्रीनगर येथील मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ऑडिटेड निकालांना मंजुरी दिल्यानंतर, बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 व आर्थिक वर्ष 18-19 मधील चौथी तिमाही यातील निकाल आज जाहीर केले. जम्मू व काश्मीर राज्यातील क्रेडिटमध्ये व नेट इंटरेस्ट इन्कममध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 23% वाढ झाली आहे आणि कर्जांवर मिळालेले व्याज व ठेवींवर दिलेले व्याज यातील तफावत आर्थिक वर्ष 2018-19 मधील चौथ्या तिमाहीत 42% वाढली. नफात्मकतेचे प्रतिक असणारे एनआयआयएम चौथ्या तिमाहीत 4.05 हे आणि संपूर्ण वर्षात 3.84% होते, तर या तुलनेत अगोदरच्या आर्थिक वर्षात 3.65% होते.

आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असताना संचालक मंडळाने दिलेला पाठिंबा व मार्गदर्शन यांचा आवर्जून उल्लेख करत, जेके बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुधारणा आणि बँकेच्या टॉप व बॉटमलाइनमध्ये झालेली वाढ यांचे श्रेय बँकेच्या प्रमोटरनी व ग्रहकांनी व विशेषतः जम्मू व काश्मीर राज्याने दर्शवलेल्या विश्वासाला दिले. आव्हानात्मक स्थितीतही क्रेडिटमधील उत्तम वाढ, एनपीएचे व्यवस्थापन, एनपीए वसुली, अनुपालन याबद्दल त्यांनी व्यवस्थापन टीम, बिझनेस हेड व ऑपरेटिव्ह स्टाफ यांचे कौतुक केले.

“जम्मू व काश्मीर राज्यात, प्रामुख्याने एसएमई व रिटेल या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी आमचे मनुष्यबळ बिझनेसविषयक नियोजनाच्या अनुषंगाने काम करत आहे. आम्ही जम्मू व काश्मीर येथे सातत्याने बाजारहिसा मिळवत आहोत, तसेच कर्जाची पुरेशी उपलब्धता नसणाऱ्या भौगोलिक ठिकाणी व श्रेणींमध्ये ही सेवा देत आहोत. विशेषतः कन्झ्युमर व हौसिंग क्षेत्रांवर भर देत आहोत. रिटेलमधील श्रेणीनिहाय आकडेवारी पाहिली असता, हौसिंगमध्ये 79% म्हणजे 3117 कोटी रुपयांवरून 5384 कोटी रुपयांपर्यंत, कन्झ्युमर फायनान्समध्ये 195 म्हणजे 1978 कोटी रुपयांपर्यंत, कारलोनमध्ये 37% म्हणज 2000 कोटी रुपयांवरून 2741 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली असून, एकूण रिटेल क्रेडिट 33% वाढले आहे. एकंदर अडव्हान्सेसमध्ये कॉर्पोरेट ते रिटेल मिक्स आता 43 कॉर्पोरेट ते 57% रिटेल आहे, तर या तुलनेत काही वर्षांपूर्वी हे प्रमाण 53 कॉर्पोरेट ते 47 रिटेल असे होते”, असे अध्यक्षांनी नमूद केले.

 

“आमचे मध्यम कालावधीतील धोरणही या निकालांच्या निमित्ताने अधोरेखित झाले असून, ते आर्थिक वर्ष 2022 अखेरीपर्यंत, एकूण 2.50 लाख कोटी रुपयांची उलाढाल, 2000 कोटी रुपये नफा, 3.5-4% या दरम्यान एनआयआयएम, 1.3% आरओए, 16% आरओई व 1% हून कमी क्रेडिट कॉस्ट असे आहे. आम्ही अगोदरच्या आर्थिक वर्षातील उत्तम व्यवसायाची वाटचाल चालू आर्थिक वर्षातही कायम ठेवणार आहोत आणि नफ्यामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने वाढीची गती कायम राखणार आहोत. एनपीएच्या बाबतीतील आमच्या तरतुदी 3-4 तिमाहींमध्ये पूर्ण झाल्या की आम्ही अजून चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे“, असे परवेझ अहमद यांनी सांगितले.

केची वाढ व व्यवसाय आणखी पुढे नेण्यासंबंधीच्या नियोजनाबद्दल बोलत असताना अध्यक्षांनी चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जिल्हा स्तरावर लागू करण्यात येणाऱ्या नव्या झोनल रचनेविषयी माहिती दिली. राज्य सरकारच्या बजेट/विकास योजनेची सांगड राज्यामध्ये सामाजिक-आर्थिक विकास साधण्याच्या बँकेच्या प्रयत्नांशी घातली जाणार आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणातील ग्रामीण लोकसंख्येला सेवा देण्यासाठी बँक अधिकाधिक विस्तार करणार आहे. यामध्ये, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनौपचारिक पर्यायांवर अवलंबून असणाऱ्या अशा समाजातील तळागाळातील लोकसंख्येचाही समावेश आहे. असे केल्याने बँकेच्या लो कॉस्ट कासा फ्रेंचाइजी सक्षम होतील. सध्या हे प्रमाण 50.7% असून, बँकिंग उद्योगातील ते एक उत्तम मानले जाते.

“मी आधीपासून सांगत असल्याप्रमाणे, एसएमई, पर्यटन पायाभूत सुविधा, शेती व जोडधंदे, पायाभूत सुविधा (सरकारी खर्च), गृहकर्ज, सरकारी कर्मचाऱ्यांना पर्सनल फायनान्स, बागायत, गोल्ड लोन अशा क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे व मोठी मागणी आहे आणि गेल्या काही तिमाहींमध्ये या क्षेत्रांमध्ये झालेल्या वाढीने ही बाब अधोरेखित झाली आहे. स्टार्ट-अप व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे, या क्षेत्रालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत, राज्य व केंद्र सरकारमध्ये स्टार्ट-अपसाठी धोरणाच्या बाबतीत पाठिंबा देणार आहोत. तसेच, आम्ही राज्यातील गुणवान युवकांसाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत,” असे परवेझ अहमद यांनी प्रेसला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केले आहे.

31 मार्च 2019 या दिवशी बँकेचा एकूण व्यवसाय 1,61,864 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामध्ये 89638 कोटी रुपयांच्या ठेवी व 72226 कोटी रुपये ग्रॉस अडव्हान्सेस यांचा समावेश होता. अगोदरच्या वर्षातील 1,42,466 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात अंदाजे 14% वाढ झाली. बँकेने 4.90% प्रमाणे स्थिर लो कॉस्ट फंडची नोंद केली व कासा योगदान 50.7% होते. आयएलअँडफ सँड व समूह कंपन्या यांच्या घसरणीमुळे एनपीए कव्हरेज रेश्योमध्ये सिक्वेन्शिअल पद्धतीने किरकोळ, 64.30% पर्यंत घट झाली. एकूण कर्जांच्या टक्क्यांच्या तुलनेत विचार करता, बँकेच्या ग्रॉ व नेट एनपीए रेश्योंमध्ये अनुक्रमे 8.97% व 4.89% पर्यंत सुधारणा झाली, तर अगोदरच्या वर्षात हे प्रमाण अनुक्रमे 9.96% व 4.90% होते. बँकेने

2750 कोट रुपये एनपीएची वसुली केली, शिवाय वाईट व संशयास्पद कर्जांसाठी 1000 कोटी रुपये तरतूद केली.

ठळक वैशिष्ट्ये:

Ø  2017 मध्ये 1632 कोटी रुपये नुकसान झाल्यावर सलग आठ तिमाही नफा कमावला

Ø  एकूण व्यवसायाने ओलांडला 1,60,000 कोटी रुपयांचा टप्पा

Ø  बॅलन्सशीट 100,000 कोटी रुपयांहून अधिक वाढली

Ø  अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत नफ्यामध्ये 129% वाढ

 

 

जेके बँकेचे जम्मू व काश्मीर राज्यातील आघाडीचे स्थान व 65% बाजारहिस्सा, वाढता व उच्च कासा रेश्यो, राज्यातील अडव्हान्सेसवरील वाढत्या उत्पन्नामुळे एनआयएम 5% हून अधिक असणे यामुळे बाजारातील तज्ज्ञ जेके बँकेच्या भविष्याबाबत आशावादी आहेत. उर्वरित भारतामध्ये प्रामुख्याने मोठ्या कंपन्यांना कर्ज देण्यावर भर देणाऱ्या बँकेने गेल्या काही वर्षांत जम्मू व काश्मीर राज्यातील एसएमई व रिटेल ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे. हे ग्राहक नफ्यात आहेत व जम्मू व काश्मीर राज्यातील बँकेच्या भौगोलिक विस्ताराशी संबंधित असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यातील अडथळ्यांमुळे स्पर्धेपासून सुरक्षित आहेत. विश्लेषकांच्या मते, जेके रिस्ट्रक्चर्ड पोर्टफोलिओचे दडपण आता संपले असल्याने बँकेचे ऑपरेटिंग इन्कम चालू आर्थिक वर्षात आणखी वाढेल. क्रेडिटवाढीला पाठबळ देण्यासाठी, बँकेच्या संचालक मंडळाने 1600 कोटी रुपयांपर्यंत टिअर I व टिअर II भांडवल उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. बँकेचा शेअर त्याच्या 119 रुपये बुक व्हॅल्यूच्या मोठ्या सवलतीत अजूनही ट्रेडिंग करत असल्याने विश्लेषकांना मोठ्या वाढीची अपेक्षा आहे.

 

राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मानस धामणे, मधुरीमा सावंत, रुमा गायकैवारी यांचा अंतिम प्रवेश

0
पाचगण-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात  महाराष्ट्राच्या मधुरीमा सावंत, रुमा गायकैवारी यांनी, तर मुलांच्या गटात मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या मधुरीमा सावंत  हिने बाराव्या मानांकित कर्नाटकाच्या चार्मी गोपिनाथवर 6-3, 6-1 असा सनसनाटी विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित रुमा गाईकैवारी हिने सातव्या मानांकित सोनल पाटीलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रुमा गाईकैवारीचा सामना मधुरीमा सावंत हिच्याशी होणार आहे.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामणेने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या प्रणव रेथिनचा 6-3, 6-3 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. कर्नाटकाच्या आठव्या मानांकित स्कंद राव याने महाराष्ट्राच्या अर्णव ओरूगंतीचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. अंतिम फेरीत स्कंद राव समोर अव्वल मानांकित मानस धामणेचे आव्हान असणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी- 14 वर्षाखालील मुले
मानस धामणे(1)(महाराष्ट्र) वि.वि.प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) 6-3, 6-3;
स्कंद राव(8)(कर्नाटक)वि.वि.अर्णव ओरूगंती(महाराष्ट्र) 6-4, 6-1;
 
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: 
मधुरीमा सावंत (महाराष्ट्र) वि.वि.चार्मी गोपिनाथ(12)(कर्नाटक)6-3, 6-1;    
रुमा गाईकैवारी(2) (महाराष्ट्र)वि.वि.सोनल पाटील(7)(महाराष्ट्र)6-3, 6-2.   
  

अमेरिकन एनेमटेक कॅपिटल इन्क.शी पुण्‍यातील स्नॅपर फ्युचर टेकची भागीदारी

पुणे-येथील  स्नॅपर फ्युचर टेक या कंपनीने अमेरिकास्थित एनेमटेक कॅपिटल इन्क. यांच्यासोबत भागीदारी करत असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत केली. स्नॅपर २०१६ पासून भारतात ब्लॉकचेन क्रांतीला चालना देत आहे.

“ब्लॉकचेनला सर्वाधिक मागणी आहे आणि या कौशल्यासाठी मोबदलाही फार मिळतो, शिवाय पुणे हे आयटीहब असल्याने या क्षेत्रात अग्रणी व नेतृत्वस्थानी असण्यासाठीच्या सर्व क्षमता या शहरात आहेत,” असे पुण्याच्या माननीय महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण हे विकासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

आयटी तज्ज्ञ, एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्ते आणि ३९ पुस्तकांचे लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांच्या मते उमेदवारांसाठी ब्लॉकचेन क्षेत्रात प्रवेश करण्याचा हा उत्तम काळ आहे, ही त्यांच्यासाठी आयुष्य बदलवणारी संधी असू शकते. सुयोग्य कौशल्ये असलेल्या उमेदवारांना स्वप्नवत संधी देणाऱ्या ईआरपी आणि इंटरनेट क्रांतीशी ते ब्लॉकचेन क्रांतीची तुलना करतात. ब्लॉकचेन क्रांती इंटरनेटरइतकीच किंबहुना त्याहून मोठी क्रांती असेल, असा त्यांना विश्वास आहे.

“यातील महत्त्वाचा मुद्दा आहे सातत्याने अपग्रेड करत राहणं. कारण, तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत आहे आणि जे आजही पारंपरिक तंत्रज्ञानात अडकून पडले आहेत, त्यांना योग्य संधींचा लाभ घेण्यातही अडचणी येतील. त्यामुळे, सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सनाही भविष्यातील तंत्रज्ञानासाठी स्वत:ला अपग्रेड करावं लागेल,” असे एनेमटेक कॅपिटल इन्क.चे श्री. स्वेन डे वॉचर म्हणाले.

एनेमटेक कॅपिटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अवनिश गुप्ता म्हणाले, “ब्लॉकचेन हे विश्वासावर आधारित तंत्रज्ञान आहे. ब्लॉकचेन या वैश्विक माहिती सुविधेच्या माध्यमातून क्रिप्टोग्राफिकली सुरक्षित, अक्षय, ज्यात कोणतीही छेडछाड करणे शक्य नाही, निश्चित वेळ असणाऱ्या वातावरणात माहितीचे आदानप्रदान करता येते. त्यामुळे, सत्य परिस्थितीचेच रूप असलेली परिसंस्था निर्माण होते. इंटरनेट क्रांतीचे लाभ आम्ही दवडले होते. त्यामुळे, स्नॅपरमध्ये गुंतवणूक करून अनोख्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर स्वार होत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

“ब्लॉकचेनच्या माध्यमातून आम्ही इंटरनेट ऑफ इंटरअॅक्शन अॅण्ड इन्फॉर्मेशन या टप्प्यापासून इंटरनेट ऑफ व्हॅल्यूच्या दिशेने जात आहोत… जिथे कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय कोणीही विश्वास प्रस्थापित करू शकेल आणि प्रत्यक्ष वेळेत रकमेचे मोल एक्सचेंज करता येईल.”

“ब्लॉकचेनमुळे इंटरनेट हे खुले माध्यम बनले आहे आणि प्रामाणिकता व पारदर्शकता जपणारी कोणतीही संस्था ब्लॉकचेनवर असू शकेल,” असे स्नॅपर फ्युचर टेकचे संस्थापक प्रशांत सुराणा म्हणाले.

टायर फुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

पुणे:पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशामक विभागाकडून देण्यात आली.

बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल कात्रज येथील पंपावर नेले जात होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ‘घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही पेट्रोल, डिझेल ज्या भागात पडले होते. तिथे वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला. मात्र तोवर टँकर मधील अंदाजे पाच हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल पाचशे मीटर भागात वाहून गेले होते. या घटनेमुळे कोणतीही घटना घडू याची काळजी घेण्यात आली असून उलटलेला टँकर क्रेनच्या रस्त्याच्या कडेला नेण्यात आला आहे’, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात टँकर चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 

लोकसभा मतमोजणी नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान…?

मुंबई-लोकसभेच्या मतमोजणी नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. याबाबत चर्चाही राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, या संदर्भातील सर्व निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.

राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?
विशेष बाब म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्तावाची बाब म्हणजे या तिनही नेत्यांनी त्यांच्या सध्यांच्या पक्षांचे राजीनामे दिले नाहीत. पण, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या या नेत्यांना भाजप गळाला लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि त्यानंतर विस्तार झाला होता. मात्र, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा फक्त चर्चा झाल्या. पण, प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. अखेर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २६६ ‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्तांची तपासणी

आजवर ९८६ ‘सेरेब्रल पाल्सी’ ग्रस्तांना मुकुल माधव फाउंडेशनचा मदतीचा हात

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेरेब्रल पाल्सी’ आजाराने त्रस्त मुलामुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २६६ रुग्णाची तपासणी करण्यात आली. ‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्तांसाठी दोन दिवसीय सर्वंकष मूल्यांकन आणि तपासणी शिबीर रत्नागिरी आणि सातारा येथे आयोजिले होते. रत्नागिरीमध्ये ७९ मुले  आणि सातारामध्ये १८८ मुलांची तपासणी केली. आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि ऑर्थोटीकसाठी सल्ला दिला. यासाठी पुण्यातील संचेती, केईम हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल आणि रत्नागिरी व सातारा येथील वैद्यकीय टीमचा समावेश होता. आजवर ९८६ मुलांवर उपचार केल्याचा आनंद आहे, अशी भावना फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आठल्ये, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोमरे , सिव्हिल सर्जन डॉ. भोळंदे, जिल्हा परिषद एज्युकेशन डिपार्टमेंटचे गव्हाणे उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी डॉ. कैलाश शिंदे, डिस्ट्रिक्ट हेअल्थ ऑफिसर डॉ. भगवान पवार यांच्या सहकार्याने पार पडला. गेल्या २० वर्षांपासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज मुकुल माधव फौंडेशनच्या साथीने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. उपेक्षितांना आनंद आणि जगण्याचे बळ देण्याचे काम संस्थेकडून होत आहे. आजवर हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम संस्थेने केले आहे. सेरेब्रल पाल्सी निर्मूलन अभियान मुकुल मांडव फौंडेशन २०१५ पासून राबवत आहे. सध्या राज्यातील रत्नागिरी (२) आणि सातारा (४) या दोन जिल्ह्यात सहा फिनोलेक्स पुनर्वसन केंद्र सुरु आहेत.

सातारा, वाई आणि पाचगणी या केंद्रांवर संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने समुदेशन, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पाटण केंद्रावर कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या मदतीने आठवड्याला फिजिओथेरपीची सोय करण्यात आलेली आहे. अलीकडेच संस्थेने योग्य आहार आणि खाण्याच्या सवयी यासाठी आहारतज्ज्ञ जोडून घेतले आहे. या केंद्रांवर २०-२५ मुले नियमित फिजिओथेरपी घेत आहेत. आजवर ४९ शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. झडगांव, रत्नागिरी येथील केंद्रावर डेरवन येथील वालावलकर हॉस्पिटलमधील फिजीओथेरपीस्ट आणि स्पीच थेरपिस्टची नियुक्त केले आहेत.

आशा आणि एएनएम परिचारिकांना प्रशिक्षित करण्यासाठी पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगची मदत झाली. साताऱ्यातील २० जिल्हा रुग्णालयात कार्यरत ८६२ परिचारिकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. नुकतेच रत्नागिरीतील ६० आशा आणि एएनएम परिचारिकांना डॉ. सलोनी राजे यांनी प्रशिक्षण दिले आहे. सातारा आणि रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांनी फाऊंडेशनला मोलाचे सहकार्य केले.

काय आहे सेरेब्रल पाल्सी?

सेरेब्रल पाल्सी मेंदूतील काही भागांना हानी पोचल्याने उद्भवतो. त्यामुळे हालचाली, मानसिक तोल आणि इतर अवयव मंदावतात. लहानपणी हा आजार होतो आणि व्यक्तिपरत्वे त्यात बदल होतात. जगात त्याचे प्रमाण १००० मागे २, तर भारतात १००० मागे ३ असे आहे. परंतु, या आजाराने ग्रस्त मुलांची ज्ञानक्षमता सर्वसाधारण असते. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न

पुणे : विप्रसेवा ग्रुप, विश्वशक्ती फौंडेशन आयोजित सामुदायिक व्रतबंध (मुंज) सोहळा पार पडला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात १८ बटूंची मुंज करण्यात आली. या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यानंतर गिरीश बापट यांनी शुभाशीर्वाद दिले. चांगले आयुष्य जगण्यासाठी संस्कारांची शिदोरी अतिशय महत्वाची असते. अशा उपनयन संस्कार सोहळ्यातून ते मिळतात. त्यामुळे याचे महत्व अबाधित आहे, असे  बापट यांनी सांगितले.

चिन्मय फाटक यांच्या हस्ते भगवान परशुरामांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात झाली. या २८२ वर्षे जुन्या पेशवेकालीन मंदिराच्या प्रसन्न वास्तूत मंदिराच्या शिखरात असलेला नगारखाना ही वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. येथे बसून नगारा वाजविला तर तो मंदिराच्या गाभाऱ्यात वाजविला जातोय असे ऐकणाऱ्यास वाटते. मौजीबंधन संस्काराबरोबरच आधुनिक काळात व्यायाम, मैदानी खेळ, अन्याय सहन न करणे हेही संस्कार तितकेच महत्वाचे आहेत आणि ते अशाच कार्यक्रमातून दिले गेले पाहिजेत, असे संस्थापक चिन्मय फाटक म्हणाले. या सोहळ्यासाठी ग्राहक पेठचे संचालक सूर्यकांत पाठक, मार्गदर्शक अनिल गानूकाका, पुरोहितांचा सद्गुरू ग्रुप आणि अखिल ब्राह्मण संघाचे विशेष सहकार्य लाभले.

सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- विभागातील तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील विविध मंजूर कामांचा सर्व यंत्रणांनी आढावा घेऊन, आपापसात ताळमेळ ठेवून मंजूर विकास कामे मुदतीत पूर्ण करावीत असे निर्देश, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयातील श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ/मार्ग, श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा आणि श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन सभागृहात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भूसंपादन उपायुक्त जयंत पिंपळगांवकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण बैठकीला उपस्थित होते.

तिर्थक्षेत्र परिसराचा विकास करुन त्याठिकाणी भाविकांना आवश्यक सोई सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांना यापूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. मंजूरी देण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल संबधित जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सादर केला. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी  कालबध्द नियोजन करुन, आवश्यक असल्यास अनुदानाची मागणी वेळेवर करुन, सुरु असलेली कामे मागे पडणार नाही, याची काटेाकोरपणे दक्षता घेण्याची सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी केली.

संबधित जिल्हयांचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर परिषदेची मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामांची माहिती बैठकीत सादर केली. श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर येथील माणकेश्वर वाडा व मुख्य मंदिराभोवतीचा परिसर विकसीत करणे, श्री क्षेत्र भिमाशंकर येथील सामुहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक शैाचालय, महादेव वन, दगडी मंडप बांधकाम, मिडी बसेस तसेच श्री क्षेत्र देहू व आळंदी पालखी मार्गावरील व पंढरपूर येथील चालू असलेल्या विकास कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

आर्यन देवकर, अनमोल नागपुरे, योहान चोखणी, दीया चौधरी, स्वरा काटकर यांचे सनसनाटी विजय

0
पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटातआर्यन देवकर, अनमोल नागपुरे, योहान चोखणी यांनी तर, मुलींच्या गटात  दिया चौधरी, स्वरा काटकर, अलिशा देवगावकर या  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. 
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या आर्यन देवकर एनए सातव्या मानांकित हरियाणाच्या वंश नांदलचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(3), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. बिगरमानांकीत योहान चोखणी याने सातव्या मानांकित आसामच्या जिग्याशमान हजारीकाचे आव्हान 6-1, 6-4 असे संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या अनमोल नागपुरेने आपलाच राज्य सहकारी बाराव्या मानांकित अर्णव पापरकरचा 0-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 
 
मुलींच्या गटात  दुसऱ्या फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या दिया चौधरीने आंध्रप्रदेशच्या चौदाव्या मानांकित लक्ष्मी रेड्डीचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(9), 6-0 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. स्वरा काटकर हिने कर्नाटकाच्या दहाव्या मानांकित अमोदीनी नाईकलोक 6-2, 7-6(4) असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या अलिशा देवगावकरने अकराव्या मानांकित तामिळनाडूच्या ज्योशिथा अमुथाचा 7-5, 4-6, 6-3 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- दुसरी फेरी- 14 वर्षाखालील मुले
मानस धामणे(1)(महाराष्ट्र) वि.वि.राधेय शहाणे(महाराष्ट्र)6-1, 6-3;  
विनित मुत्याल(तेलंगणा) वि.वि. अहान धेकील(उत्तर प्रदेश) 6-0, 6-0;
आर्यन शहा(11)(गुजरात)वि.वि.आर्यन हुड(महाराष्ट्र)6-4, 6-2;
प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) वि.वि.अयान गिरधर (महाराष्ट्र)6-0, 6-2;     
जोशुवा जॉन इपेन(महाराष्ट्र) वि.वि.ईशान देगमवार(महाराष्ट्र)6-2, 6-1;
योहान चोखणी(महाराष्ट्र)वि.वि.जिग्याशमान हजारीका(7)(आसाम)6-1, 6-4;
अनमोल नागपुरे(महाराष्ट्र)वि.वि.अर्णव पापरकर(12)(महाराष्ट्र) 0-6, 6-4, 6-1;
आर्यन देवकर(महाराष्ट्र)वि.वि.वंश नांदल(2)(हरियाणा)3-6, 7-6(3), 6-4;
 
14 वर्षाखालील मुली: दुसरी फेरी:
चांदणी श्रीनिवासन(1)(तेलंगणा)वि.वि.शताक्षी चौधरी(उत्तर प्रदेश)6-0, 6-1;
अलिशा देवगावकर(महाराष्ट्र) वि.वि. ज्योशिथा अमुथा(11)(तामिळनाडू)7-5, 4-6, 6-3;
ख़ुशी शर्मा(6)(महाराष्ट्र)वि.वि.कनिष्का श्रीनाथ (कर्नाटक)3-6, 7-6(1), 1-0सामना सोडून दिला;
दिया चौधरी(महाराष्ट्र) वि.वि. लक्ष्मी रेड्डी(14)(आंध्रप्रदेश) 6-1, 6-7(9), 6-0;
स्वरा काटकर(महाराष्ट्र) वि.वि. अमोदीनी नाईक(10)(कर्नाटक)6-2, 7-6(4); 
श्रीनिधी अमीरेड्डी(तेलंगणा) वि.वि. ह्रिती आहुजा(13)(महाराष्ट्र) 7-5, 6-3;
परी चव्हाण(3)(महाराष्ट्र)वि.वि.मिनाक्षी लवकुमार (कर्नाटक)6-1, 6-0;
सौम्या रोंडे(तेलंगणा) वि.वि.कायरा चेतनानी(महाराष्ट्र) 6-2, 6-0.

कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सने मिळविला 165 कोटी रुपये निव्वळ नफा

नवी दिल्ली- कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2018-19 साठीचे निकाल जाहीर केले असून, 165 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. तसेच, संचयित तोटाही भरून काढल्याचे जाहीर केले आहे.

2018-19 आर्थिक वर्षातील कंपनीच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:

–       आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये न्यू बिझनेस प्रीमिअममधील उत्पन्न 19% वाढून 1460 कोटी रुपये झाले, तर अगोदरच्या वर्षात ते 1228 कोटी रुपये होते

–       गेल्या तीन वर्षांत (2015-16 ते 2018-19), कंपनीचा इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअम (वेटेड प्रीमिअम इन्कम) 27% या  चक्रवाढ दराने वाढला आहे, तर एकंदर उद्योगाने नोंदवलेली वाढ 16% आहे

–       कंपनीच्या ग्रॉस रिटन प्रीमिअममध्ये 26% म्हणजे आर्थिक वर्ष 17-18 मधील 2781 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 18-19 मध्ये 3491 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली

–       मार्च 31, 2019 पर्यंत आमच्या व्यवसायाची एम्बडेड व्हॅल्यू 2,575 कोटी रुपये होती

–       कंपनीचे योजनांच्या बाबतीतील 13व्या महिन्यातील सातत्याचे प्रमाण 80.9%, आणि 61व्या महिन्यातील 46%, अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत दोन्हींमध्ये 3% वाढ

–       कंपनीचे विम्याच्या दाव्यांच्या पूर्ततेचे (इंडिव्हिज्युअल प्लस ग्रुप) एकंदर प्रमाण 98%

–       ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्यो अगोदरच्या वर्षातील 13.3% वरून 11.8% पर्यंत सुधारले

–       मार्च 31, 2019 पर्यंत अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 14,854 कोटी रुपये

–       मार्च 31, 2019 पर्यंत कंपनीचे सॉल्व्हन्सी मार्जिन 394%

–       प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत 25 लाखांहून अधिक जणांना कवच

–       वेबअॅश्युअरन्स दाखल केले असून, बँकेच्या ग्राहकांना एकाच ठिकाणी, सोयीचे ऑनलाइन सोल्यूशन देण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा इन्शुरन्स सेल्फ नेटवर्क प्लॅटफॉर्मवर (आयएसएनपी) पूर्णतः डिजिटल व पेपरलेस प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यासाठी सबल केले जाणार आहे

–       कंपनीने वेग व तत्परता यासाठी विशिष्ट व्यवसाय प्रक्रियांमध्ये अगदी अलीकडच्या काळात रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए) अवलंबले आहे

स्थापनेपासून कंपनी बँकाश्युरन्स-प्रणित मॉडेल अवलंबत आहे आणि पार्टनर बँकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे कंपनीला बँकाश्युरन्स व्यवसायामध्ये नेहमी यश मिळाले आहे. अलीकडच्या काळात, कंपनीने डिजिटल बिझनेस वाढवण्यावर आणि डायरेक्ट सेल्स माध्यमातून व्यवसाय करण्यावरही भर दिला आहे. कंपनीने विविध प्रकारची विश्लेषणातमक व प्रोपेन्सिटी मॉडेल अवलंबली असून, त्यामुळे विविध श्रेणींमध्ये योजनांच्या बाबतीत सातत्य राखण्यास मदत झाली आहे.

वर्षभरामध्ये, कंपनीने ग्राहकांच्या गरजांच्या अनुषंगाने अनेक नवी उत्पादने सादर केली आहेत. कंपनीने ‘हेल्थ फर्स्ट प्लान’ हे पहिले आरोग्यविषयक उत्पादन दाखल केले असून त्यामार्फत आरोग्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने ‘इन्व्हेस्ट 4जी’ हा अत्यंत किफायतशीर ऑनलाइन युनिट-लिंक्ड प्लान दाखल केला. या प्लानसाठी अलोकेशन किंवा प्रशासकीय शुल्क आकरले जात नाही. याव्यतिरिक्त, नियमित खात्रीशीर उत्पन्न देण्यासह दीर्घकालीन फायदे देण्यासाठी गॅरंटीड इन्कम प्लान व गॅरंटीड सेव्हिंग्स प्लान दाखल करण्यात आले. तसेच, कंपनीने पीओएस इझी बिमा व पीओएस बचत (पॉइंट ऑफ सेल उत्पादन) अशा मास मार्केट उत्पादनांमार्फत अधिकाधिक विस्तार करण्याच्या अनुषंगाने वितरण धोरण आखले होते.

कंपनीने आपल्या प्रक्रियांची कार्यक्षमता व उत्पादकता यांना चालना देण्यासाठी, प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि ग्राहकांना आनंद व चांगला अनुभव देण्यासाठी सातत्याने सुधारणा करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करणे कायम राखले आहे. यासंदर्भातील काही उपक्रम पुढील आहेत:

 

  • ग्राहकांना सुरळित व एकात्मिक पेपरलेस सेवा देण्यासाठी ऑटोमेटेड फिनान्शिअल नीड असेसमेंटसह टॅब्लेटवर आधारित विक्री प्रक्रिया आणि विस्तृत वितरण जाळे योग्य प्रकारे जोडलेले असणे
  • आयव्हीआर सर्व्हिसिंग पर्यायांमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे सेल्फ-सर्व्हिसिंग पर्याय उपलब्ध
  • ग्राहकांना केव्हाही सेवा देण्यासाठी प्रतिसाद देईल असे ऑनलाइन मोबाइल कस्टमर पोर्टल
  • डिजिटल ग्राहक श्रेणीला सेवा देण्यासाठी ट्रॅडिशनल, युनिट लिंक्ड व हेल्थ अशा विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी स्पर्धात्मक उत्पादने

कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर करताना, कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आर. ए. शंकर नारायणन यांनी सांगितले, अध्यक्ष व मोठा भागधारक म्हणून, गेल्या दहा वर्षांत बरेच बदल झाले असून, कंपनी नफा मिळवत वाढ साध्य करत आहे. आम्हा तीन पार्टनर बँकांवर ग्राहकांचा दृढ विश्वास आहे आणि त्यामुळे कंपनीला उत्पादने सादर करताना मदत झाली आहे.

कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सविषयी बोलताना, नारायणन यांनी नमूद केले, आम्ही ग्राहक-केंद्री आहोत आणि ग्राहकांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये संरक्षण देण्यासाठी व मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्राहकांसाठी सादर केलेली उत्पादने स्पर्धात्मक असली पाहिजेत आणि त्यांनी दीर्घ काळ मूल्य दिले पाहिजे, असे आमचे उद्दिष्ट आहे. आर्थिक समावेशकता हे केंद्र सरकारचे अतिशय महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विस्तार करण्यासाठी आणि आमची उत्पादनेग्रामीण भागातील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रादेशिक ग्रामीण बँकांशी सहयोग केला आहे. आमच्या पार्टनर बँकांच्या वितरणाद्वारे, आम्हाला टिअर 2 व 3 शहरांमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे आणि या शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करणे शक्य झाले आहे.

कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज माथुर यांनी कंपनीच्या आर्थिक निकालांविषयी बोलताना म्हटले, गेले संपूर्ण वर्ष आमच्यासाठी एकंदर व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले होते. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत आम्ही आकडेवारीच्या बाबतीत सातत्य राखले. प्रगतीविषयी केलेले नियोजन अमलात आणण्यासाठी आम्ही काही उपक्रम हाती घेतले होते. आमच्या कंपनीने दहा वर्षे पूर्ण केली आहेत आणि संचयित तोटा भरून काढला आहे. ग्राहकांच्या गरजांना अनुसरून उत्पादने विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पीएमजेजेबीवाय अशा पंतप्रधानांच्या योजना विमा समावेशकतेला मोठी चालना देतात. या वर्षी, आमच्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये परिवर्तन आणण्यावर आम्ही भर देणार आहोत. आमच्या भागीदार बँकांना त्यांच्या उत्पादनांमध्ये आयुर्विम्याचा समावेश करता यावा म्हणून त्यांना आमच्याशी एकात्मिक करण्यासाठी आम्ही विविध पर्यायांचा वेध घेत आहोत.”

कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची स्थापना जून 2008 मध्ये झाली आणि ही भारतातील दोन सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांची संयुक्त मालकीची कंपनी आहे – कॅनरा बँक (हिस्सा 51%) व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (23%) – आणि एचएसबीसी इन्शुरन्स (एशिया पॅसिफिक) होल्डिंग्स लिमिटेड (26%), एचएसबीसी या जगातील सर्वात मोठ्या बँकिंग व वित्तीय सेवा समूहाची आशियातील विमा कंपनी. कंपनीसाठी कॅनरा बँक, एचएसबीसी व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व भागीदार यांचे देशभरातील 10000 हून अधिक शाखांचे जाळे व अंदाजे 115 दशलक्ष ग्राहक उपलब्ध आहेत. सर्व बँकांच्या सक्षम पायाभूत सुविधांमुळे देशभर विमा उत्पादनांचे वितरण व उपलब्धता करणे शक्य होते आणि ग्राहकांसाठी मोठी सोय होते व देशातील सर्व ठिकाणी (शहरी, निम-शहरी, ग्रामीण) विमा उत्पादने पोहोचवण्यासाठी मदत होते. यामुळे देशाची संरक्षणविषयक गरज पूर्ण करण्यासाठी योगदान दिले जाते.

डॉ. बुधाजीराव मुळीक व डॉ. मिलिंद कांबळे यांना ‘तथागत गौतम बुध्द पंचशील विश्‍वशांती पुरस्कार’ जाहीर

0

लातूर,: विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि रामेश्‍वर (रूई) ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना तथागत गौतम बुध्द पंचशील विश्‍वशांती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ तथागत गौतम बुध्द जयंतीचे औचित्य साधून म्हणजेच शनिवार, दि.१८ मे २०१९ रोजी सकाळी ८.१५ वा. लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर (रूई) या गावातील तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्‍वशांती स्मृतिभवन येथे होणार आहे.
या समारंभासाठी लातूर जिल्हा परिषदचे सदस्य सुधाकर श्रृंगारे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती प्रा. संजय दोरवे, सुप्रसिद्ध साहित्यिक व लेखक प्रा. रतनलाल सोनग्रा, रिपाईचे चिटणीस चंद्रकांत चिकटे, ज्येष्ठ दलित नेते मोहनलाल माने व ज्येष्ठ समाजसेवक सुनील देशपांडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
डॉ. बुधाजीरव मुळीक यांनी भूमाता चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून शेतकर्‍यांची सामाजिक व आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतातील शेती व्यवसाय आणि यांचा उध्दार कसा करावा तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य ते सतत करीत आहेत. बागायती शेतीतून औद्योगिक प्रदूषण कमी करणे व भारतीय फळे इग्लंडसाठी निर्यात सुरू करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ.मिलिंद कांबळे हे आधुनिक भारतातील क्रांतिकारी नेता आहेत. त्यांनी रचानात्मक व सकारात्मक परिवर्तनाची क्रांती घडवून दलितांच्या विचारसरणीत बदल घडविले. दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करून दलित समाजाला उद्योग आणि व्यवसायात एकत्रित बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे. नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे व्हा हा संदेश त्यांनी या समाजाला दिला. यामुळे प्रत्येक वर्षी हजारो दलित युवक उद्योग व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत.
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी) चे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांनी दिली.

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसावर व्हेरॉक संघाचे वर्चस्व; केडन्स संघाला 224धावांवर रोखले

  • शुभम तैस्वालची भेदक गोलंदाजी 

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसअखेर शुभम तैस्वाल(41-5)याने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केडन्स संघाला 224 धावांवर रोखले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हेरॉकच्या अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे केडन्सचा डाव 39.3षटकात 224धावांवर संपुष्टात आला. 10 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 174झाली. यात निखिल पराडकरने 88चेंडूत 8चौकार व 1षट्काराच्या मदतीने 86 धावा, तर गणेश गायकवाडने 74 चेंडूत 54 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. व्हेरॉककडून शुभम तैस्वालने 8 षटकात 41 धावात 5 गडी बाद करून केडन्सचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. शुभमला कार्तिक पिल्लेने 23धावात 2 गडी, तर उत्कर्ष अगरवालने 17धावात 1 गडी बाद करून सुरेख साथ दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक संघाने सावध सुरुवात केली. त्यांनी आज दिवस अखेर 13षटकात 1 बाद 85धावा केल्या. यामध्ये सुधांशु गुंडेतीने संयमपूर्ण खेळी करत 45धावात 48 धावा केल्या. सुधांशु बाद झाल्यानंतर विनय पाटील नाबाद 30धावा, मिझान सय्यद नाबाद 6 धावांवर खेळत आहेत. व्हेरॉक संघाचा उर्वररीत 27 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पहिला डाव: केडन्स: 39.3षटकात सर्वबाद 174(224-50धावा)धावा(निखिल पराडकर 86(88,8×4,1×6), गणेश गायकवाड 54(74,4×4,1×6), इझान सय्यद 21(41), शुभम तैस्वाल 8-41-5, कार्तिक पिल्ले 6-23-2, उत्कर्ष अगरवाल 2-17-1) वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 13षटकात 1 बाद 85धावा(सुधांशु गुंडेती 48(45,8×4), विनय पाटील नाबाद 30(41,3×4), मिझान सय्यद नाबाद 6(15), गणेश गायकवाड 2-8-1);