Home Blog Page 2935

4 एग्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, तर यूपीएला 2014 च्या तुलनेत दुप्पट जागा;निकालापूर्वीचा निकाल

दिल्ली- लोकसभेच्या 542 जागेंसाठी एग्झिट पोल्स येणे सुरू झाले आहे. 4 एग्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, यूपीएला 2014 च्यु तुलनेत दुप्पट जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014 मध्ये एनडीएला 336, यूपीएला 60 आणि इतर 147 जागा मिळाल्या होत्या.

एक्झीट पोल्सचे निकाल-

सर्वे/एजंसी भाजपा+ काँग्रेस+ सपा+बसपा इतर
सी वोटर-रिपब्लिक 287 128 40 87
जन की बात-रिपब्लिक 305 124 26 87
वीएमआर-टाइम्स नाउ 306 132 20 84
न्यूज नेशन 286 122 134

2014 चे निकाल

एकून जागा: 543, बहुमत: 272

पक्ष जागा वोट%
भाजपा+ 336 39%
काँग्रेस+ 60 23%
एआईएडीएमके 37 3%
तृणमूल 34 4%
बीजद 20 2%
इतर 56 29%

बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांनी कार्यपध्दती बदलावी – अ‍ॅड. असीम सरोदे

पुणे-जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिन्दुस्तान देशातील न्यायपालीकेमध्ये जुन्या पद्धतीने कामकाज चालत असल्यामुळे वकील, पक्षकारांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधुनिक काळात न्यायपालीकेतील देखील कामकाज ‘डिजीटल’ होण काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञ वकीलांमार्फत व्यक्त करण्यात आले.

न्यायपालीकेतील कामकाज आधुनिक व्हावे यासाठी प्रयत्न करणार्‍या लीगलनेट द्वारा आयोजित करण्यात आलेल्या ‘लीगनेट फोरम’ या चर्चासत्रा दरम्यान वकील व तज्ज्ञांनी आपले मते व्यक्त केली. यावेळी माजी सत्र न्यायाधीश आर. व्ही. कुलकर्णी, पर्यावरण कायदे तज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे, मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. सुकंद कुलकर्णी, अ‍ॅड. राजस पिंगळे, पुनीत कपूर, अ‍ॅड. अतुल जुवळे, लीगलनेट चे संस्थापक मंदार लांडे, गुरमीत सिंग, कपील जवेरी, चंद्रकांत भोजे पाटील, अनिरूध्द कोटगिरे,  अ‍ॅड. हर्षद काटीकर, अ‍ॅड. अक्षदा गुदाधे, विजय देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, हिंदुस्थानातील न्यायपालीकेमध्ये जुन्या काळात कायद्याचा पुस्तकांचा ढिग घेऊन वकील युक्तीवाद करताना पहायला मिळायचे. बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांच्या कार्यपध्दतीतही बदल होणे गरजेचे आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. फौजदारी खटल्यांना लागणारा कालावधी पाहता अशा खटल्यांमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. मात्र अशा खटल्यांमध्ये डिजीटल प्रणाली वापरासाठी पोलिसांचे सहकार्य देखील तीतकेच महत्वाचे आहे.

अ‍ॅड. पिंगळे म्हणाले, कागदपत्रे बाळगण्या पेक्षा प्रत्येक वकीलाने स्मार्ट फोन किंवा टॅबलेटचा वापरून करून त्यामध्ये कागदपत्रे जमा केली पाहिजे. त्यामुळे कागदपत्रे बाळगणे सोपे होऊन जाईल. यावेळी उपस्थित तज्ञ वकीलांनी न्यायपालिकेच्या कामकाजामध्ये आधुनिक बदल का व्हावे याची माहिती दिली.

यावेळी देशभरातून अनेक वकिलांनी या चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. ‘लीगल नेकस्ट’ या मासिकाच्या पहिल्या आवृतीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सामान्य जनतेपासून सर्वांना लीगलनेट हे हक्काच व्यासपीठ ठरेल असा विश्वास आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला.

उन्हापासून वाचण्यासाठी सिग्नलवर तयार केले कापडी छत..पुणे तिथे …काय उणे ?

पुणे : पुणेकरांच्या डोक्यात काय काय येईल याचा नेम नसतो, आता हरे तर उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे .. कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक वेगळीच संकल्पना एका नगरसेवकाने राबविली आहे. आयडियाची कल्पना… असे म्हणत  हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. मध्यवस्तीतील तीन चौकांमधील ७ सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून एकूण २० ठिकाणी अशी सुविधा करण्यात येणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील ७ सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. याकरीता सुवर्णयुग तरुण मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर यांसह कार्यकर्त्यांनी सलग तीन दिवस अहोरात्र विशेष परिश्रम घेतले आहेत.
फरासखाना चौकात ६० बाय ४० आणि ५० बाय ३० आकाराच्या हिरव्या कापडाचे छप्पर, अप्पा बळवंत चौकामध्ये ३० बाय २०, २० बाय २० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर तसेच सिटी पोस्ट चौकामध्ये ६० बाय ३० आणि ४० बाय २० आकाराचे छप्पर लावण्यात आले आहे. प्रत्येकी ३ फूट रुंदीचे कापड शिवून त्याद्वारे मोठे छप्पर तयार करण्यात आले आहे. याशिवाय १२ आणि ४ एमएम आकारच्या दो-यांचा वापर करुन हे छप्पर बांधण्यात आले आहे.
हेमंत रासने म्हणाले, पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरीता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याकरीता ही सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला असून त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढील काही दिवसात इतरही चौकात अशी सुविधा देण्यात येणार आहे. कापडी छप्परमुळे उन्हाचे प्रमाण कमी झाले असून रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

* कापडाचे छप्पर असल्याने आपोआप होतेय वाहतूक नियमांची अंमलबजावणी
प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल, अशा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक देखील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे रहात आहेत. तसेच अशा प्रकारच्या सुविधेमुळे आम्हाला आनंद झाला असून अशी सुविधा शहरात सर्वत्र व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून केली जात आहे.

‘मोबाईल वापराचे परिणाम’मिलिंद बेंबळकर यांचे व्याख्यान

पुणे : मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद बेंबळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘मोबाईल वापराचे परिणाम : मिथक आणि सत्य’ या विषयावर मंगळवार, दि. मे २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.
 
गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानग्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेच मोबाईलच्या स्क्रीनवर आहेत. याचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम आहेत. एकीकडे या तंत्रज्ञानाने जग जवळ आले, तर माणसांची मने मात्र दुरावली आहेत. नेमके हे परिणाम काय आहेत? त्याचा वापर कमी होईल का? मोबाईलचे व्यसन किती योग्य? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिलिंद बेंबळकर आपल्या व्याख्यानातून उलगडणार आहेत. तरी अधिकाधिक पुणेकरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे संयोजकांनी कळविले आहे.

राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त हेमंत देसाई, अनंत बागाईतकर यांची व्याख्याने

पुणे : राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव, पुणे शहर काँग्रेस व गोपाळदादा तिवारी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचे ‘राजीव गांधी – जोखीम घेणारा पंतप्रधान’ या विषयावर, तर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांचे ‘राजीव गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राज्याचे माजी मंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
 
मंगळवार, दि. २१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कमिन्स सभागृह, पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे, डॉ. विश्वजित कदम, अनंतराव गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक गोपाळ तिवारी यांनी दिली आहे.

मतमोजणी प्रक्रियेचा जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

पुणे- जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्‍तात्रय कवितके, स्‍नेहल बर्गे, भानुदास गायकवाड, प्रकाश अहिरराव, संजय देशमुख, भाऊसाहेब गलांडे, आरती भोसले, निता सावंत, सचिन बारावकर यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्‍या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्‍या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्‍ह्यातील मावळ, शिरुर, पुणे आणि बारामती या 4 लोकसभा मतदार संघाच्‍या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जिल्‍ह्यातील लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार दिनांक 23 मे रोजी होणार आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल तर पुणे आणि बारामती मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्‍या गोदामात होणार आहे. जिल्‍हाधिकारी राम यांनी मतमोजणी कक्ष, पत्रकार कक्ष,मतमोजणी कर्मचारी प्रशिक्षण, सार्वजनिक संदेश व्‍यवस्था, वाहनांची पार्किंग आदींची माहिती घेतली.

सायकलमार्ग करताहेत वाहतुकीची कोंडी ..(का केला एवढा अट्टाहास २०१७ ची व्हिडीओ झलक )

पुणे- सायकल चालवा आणि आरोग्य सुधारा हे सांगणारे खूप आहेत आणि पुणेकरांच्या खिशातील शेकडो कोटी रुपये अशा सुधारणावादी योजनांसाठी उधळले गेलेत .त्यासाठी अनेकांनी अट्टाहास हि केला .पण आज काय स्थिती आहे ..पुण्यात कोण ,कोण किती लोक सायकली चालवतात ..किती संख्या आहे त्यांची … आणि सायकल चालवा ..प्रदूषण टाळा ..म्हणनारे खरोखर स्वतः सायकली चालवितात काय ? अशा अनेक प्रश्नांवर पुणेकरांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे .
पुण्यात ३५० कोटीचे सायकल मार्ग करणाऱ्या योजनेला मोठा अट्टाहास करत २०१७ मध्ये महापालिकेने कशा पद्धतीने मुख्य सभेत मतदान घेवून हा विषय कसा संमत झाला हे हा आम्ही इथे दिलेला व्हिडिओ  सांगेल . जो २०१७ च्या मुख्य सभेतला आहे. पण आज काय स्थिती आहे या सायकल मार्गांची .. कि हे सायकल मार्गच वाहतुकीची कोंडी करत आहेत ? या प्रश्नांची उत्तरे माहिती असूनही पुणेकर बोलत नसतील तर अर्थात त्यांच्या सोशिक पणाला दोष द्यावा लागेल. या योजनेतील सायकली आणि त्यांचे मार्ग ..कुठे हरवलेत .काय अवस्था आहे ? याचा विचार प्रत्येक पुणेकराने करावा .
पुण्याहून हडपसरला निघा आणि सांगा येथील सायकल मार्गावर किती सायकली असतात. जिथे बीआरटी आणि सायकल मार्गाने चं स्राव्धिक कोंडी होते तो हा रस्ता म्हटले तर नवल वाटू नये .आणि मग अखेरीस जीवनाच्या धावपळीत अडकलेला पुणेकर हे सारे मार्ग धुडकावून आपली वाहने बीआरटी आणि सायकल मार्गावरून घुसवून पुढे मार्गक्रमण करतो ..नव्हे त्या शिवाय त्याला गत्यंतर उरत नाही .सातारा रस्त्यावरील पद्म्वाती ते रावत ब्रदर्स पर्यंत देखील सायकल मार्गाचा वेगळाच उपयोग होतो आहे. एक ना अनेक ठिकाणे  वाहतुकीच्या कोंडीला हेच सायकल मार्ग अडथला ठरताना दिसत आहेत . पुण्यात कोणती वाहने किती ? आणि त्या संख्येनुसार त्यांना रस्ते उपलब्ध आहेत काय ? याचे उत्तर शोधून तशी योजना कोणी राबविणार नाही .सायकल मार्गाचा अट्टाहास गेली 15 वर्षाहून अधिक काळ पुण्यात लोकप्रतीनिधी आणि विशिष्ट आपमतलबी संस्था करत आल्यात पण दुर्दैवाने त्यांनी स्वतः फक्त फोटो पुरते सायकली वर बसण्याचे धाडस दाखविले. मग जर खरोखर यांनही सायकली वापरायच्या नव्हत्या आणि पुणेकर हि वापरतील असे चित्र नव्हते .. तर हा अट्टाहास करून आजवर शेकडो कोटींची उधळण नेमक्या कोणत्या कारणासाठी केली गेली ? हे न  समजण्या इतके पुणेकर दुधखुळे निश्चित नाही . पण ठीक आहे करू द्यात त्यांना हे सारे ..पण जेव्हा त्यांच्या कृत्यांनी तुमची वाहने कोंडीत अडकून पडतात तुम्हाला त्रास भोगावा लागतो तो कुठवर सहन करणार आहात असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो .
एवढा अट्टाहास तुम्ही गरजूंना नौकऱ्या देण्यासाठी नाही केला. एवढा अट्टाहास तुम्ही बेघरांना घरे देण्यासाठी नाही केला .एवढा अट्टाहास पुण्यातून वाहून जाणारे पाणी अडवून साठविण्यासाठी नाही केला आणि एवढा अट्टाहास तुम्ही खरोखर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केला असता ..तर निश्चितच ते चांगले नसते काय ठरले ?जिथे ऐतिहासिक कोतवाल चावडी वाहतुकीची कोंडी होते म्हणून पाडली तिथली वाहतुकीची कोंडी सुटली काय ?निव्वळ पाडापाडी आणि अशा योजनांचे उद्दिष्ट्य  जेव्हा ‘घोटाळा’ हेच असेल तर वाहतुकीची कोंडी पुण्यात दिवसेंदिवस जटील चं होत जाईल.ना ती बालगंधर्व पाडून सुटेल ना अन्य कोणत्या योजना लादून  सुटतील . महापालिकेच्या हद्दींना कायमस्वरूपी मर्यादा घालणे .आणि हद्दीबाहेरील गावांचा .खेड्यांचा ती बकाल होण्यापूर्वीच विकास करणे ..हे जेव्हा साध्य केले जाईल तेव्हाच हि वाहतूक कोंडी सुटेल अन्यथा हा राक्षस पुणेकरांना कायमस्वरूपी छळत राहील यात शंका नाही .

केदारनाथमध्ये पुजेनंतर 2 किलोमीटर चढाई करून गुफेत पोहचले मोदी, उद्या सकाळपर्यंत तिथेच ध्यान करणार

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दोन दिवसाच्या यात्रेवर केदारनाथला पोहचले आहेत. तिथे त्यांनी अर्धा तास पुजा-अर्चना केली. त्यानंतर 2 किलोमीटर चढाई करून मोदी एका गुफेत पोहचले. त्या गुफेत मोदी उद्या सकाळपर्यंत ध्यान करण्यासाठी बसणार आहेत. काही फोटोज घेतल्यानंतर आता येथे मीडियाला बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथवरून मोदी रविवारी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने उत्तराखंड दौऱ्याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली आहे. आयोगाकडून सांगण्यात आले की, मोदींच्या या यात्रेमुळे आयोगाला काहीच त्रास होणार नाहीये. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पतंप्रधानांची ही एक अधिकृत यात्रा आहे, त्यामुळे ती केली जाऊ शकते. त्यासोबतच आयोगाने पीएमओला सांगितले आहे की, आचारसंहिता अजून लागू आहे.

पोलिस कर्मचारी मोबाईल वापरू शकणार नाहीत- डीजीपी
उत्तराखंडचे पोलिस महानिदेशक(डीजीपी) अशोक कुमार यांनी मोदींच्या एत दिवसीय यात्रेदरम्यान मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच न सांगता ड्यूटीस्थळ न सोडण्यासदेखील सांगितले आहे. ड्यूटी दरम्यान हलगर्जीपण करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल.

9 मे रोजी उघडले कपाट
यावर्षीय 9 मे रोजी केदारनाथचे कपाट उघडण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी एकसोबत 6 हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान 300 पेक्षा जास्ती टेंट लावण्यात आले आहेत. बद्रीनाथचे कपाट 10 मे रोजी उघडण्यात आले आहेत.

जागतिक परिचारिका दिन उत्साहात

पुणे-ससून सर्वोपचार रुग्णालयात महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत , प्रमुख पाहुण्या म्हणून  ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचर्या अधीक्षक राजश्री कोरके , मनोरुग्ण विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ इवान नेटो , परिचर्या विभागाचे पाठयक्रम समन्वयिका प्रियांका साळवे , सहाय्यक प्राध्यापक सुमित खरे आदी मान्यवर उपस्थित होते .

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या परिचर्या विभागाचा वार्षिक अहवाल सुमित खरे यांनी सादर केला .  जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचर्या विभागामार्फत मनोरुग्ण बांधव व संस्थेमधील कर्मचारी यांच्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी विजेत्यांचा संस्थेमार्फत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .

सन २०१९ करीता नर्सेस थीमचे अनावरण ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचर्या अधीक्षक राजश्री कोरके यांच्याहस्ते करून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास मनोरुग्ण , मानसशास्त्र , मनो सामाजिक विभागाचे शिक्षक , विदयार्थी तसेच संस्थेत कार्यरत परिसेविका , अधिपरिचारिका व अन्य कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी प्रथम वर्षाची एम. एस. सी. नर्सिंगची विद्यार्थिनी रुपम गायकवाड हिने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .

अवयवदानाने आठ, तर पेशींदानाने ५० व्यक्तींना मिळते जीवदान-प्रीती दामले

पुणे : अवयवदानाची जनजागृती करणे आज खूप महत्वाचे आहे. अवयवदानाचे दोन प्रकार असतात. यात एक संपूर्ण अवयव आणि दुसरे पेशीदान. अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० लोकांचे जीव वाचू शकतात. अवयदानामध्ये दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय आणि स्वादुपिंड या अवयवांचा समावेश होतो. अवयवातील एक पेशींचा समूह ज्याने तुम्ही ५० लोकांचे जीव वाचू शकतो. यामध्ये डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, स्नायुबंध, रक्तवाहिनी, त्वचा आणि हाडे याचा समावेश होतो, असे मत समवेदना फाउंडेशनच्या सीईओ प्रीती दामले यांनी व्यक्त केले.
 
मराठी विज्ञान परिषदेतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर प्रीती दामले ‘अवयवदानाचे महत्व‘ या विषयावर बोलत होत्या. सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. शर्मिला पाथेसह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. धनंजय चांदककर, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.
प्रीती दामले म्हणाल्या, “जिवंतपणी दात्याच्या शरीरातून १ मूत्रपिंड, १/३ अंश यकृत, स्वादुपिंड आणि त्वचेचा दान करू शकतात. मेंदू मृत अवस्था म्हणजे ज्यात रुग्णाचे कृत्रिम स्वासोच्छवासाशिवाय श्वास घेऊ शकत नाही आणि कालांतराने हृदयही बंद होते. या अवस्थेतील रुग्णाचे दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय, स्वादुपिंड, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या परिस्थितीत अवयवदान करण्यास कायद्याने मान्यता दिली आहे. मृअवस्थेत रुग्णाचे डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या सर्व अवस्थेत महत्त्वाचे म्हणजे हे अवयव सदृढ असणे खूप गरजेचे आहे तरच त्याचा वापर दुसऱ्या प्राप्तकर्त्याला होऊ शकतो. व्यक्तींना अवयवदान करायचे असल्यास ती व्यक्ती अर्ज भरू शकते आणि डोनरकार्ड आपल्या जवळ बाळगू शकते.”
“अवयवदानाबद्दल समाजात जागृती करणे गरजेचे आहे. अवयवदानात पैशांची देवाणघेवाण होत नाही. दात्याचे नाव आणि प्राप्त कर्त्याचे नाव गुपित ठेवले जाते. काही देशात मेंदू मृत अवस्थेत आणि मृत्युमुखी अवस्थेत अवयवदान करणे बंधनकारक असतो. भारतात सध्या तरी हा कायदा नाही. पण इतरत्र देशात रुग्णाचा औपचारावर खर्च जर सरकार करत असेल, तर त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याला अवयवदान करणे बंधनकारक आहे,” असे डॉ. धनंजय चांदककर यांनी सांगितले.
प्रस्तावना संजय मा. क., परिचय दिपक अडगावकर आणि आभार विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय आर. आर. यांनी मानले.

प्रा.विनायक खोत यांना शंभू पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे
 छत्रपती युवा क्रीडा मंडळ महाराष्ट्र राज्य व शाओलीन कुंग फु इंटरनॅशनल ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने मानाचा राज्यस्तरीय शंभू पुरस्कार  जुन्नर येथील प्रा.विनायक खोत यांना देवून गौरविण्यात आले.दूर्ग संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय काम केल्याबद्दल  प्रा.विनायक खोत यांना शंभू पुरस्कार मिळाला.
 धुळे येथील कल्याण भवन येथे पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय खो खो संघाचे माजी  कॅप्टन मा.आनंद पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मा. भूषण काटे , लेखक मा. हरी महाजन , प्रसिद्ध गायक पी.गणेश, मराठी चित्रपटाचे अभिनेते मा. गणेश खाडे , अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर, शिफू व्ही सुरेंद्रन  सामाजिक कार्यकर्त्या शिवमती किरण नवले , आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे , सचिव प्रसाद पाटील , मनोज रुईकर ,हेमंत भडक, अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हि  प्रतिमा पूजन व  दीपप्रज्वलन करून करण्यात  करण्यात आली. ह्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे ह्यांनी केले. कार्यक्रमाची सुरवातीला लवकरच सम्पूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट फफूटा चे पहिले पोस्टर व गाणे  लाँच करण्यात आले. ह्यावेळी फफूटा चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण काटे ह्यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली. त्यानतंर संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक, शैक्षणिक , क्रीडा , पत्रकारिता , वैद्यकीय, उद्योजक , पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५  मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात जितेंद्र देसले ,मा. यशवंत गोसावी, मनीषा माली, शिवमती किरण नवले, प्रवीण महाजन , अनिल मराठे , योगेश पाटील , विनायक खोत, एक वादळ भारतचे, प्रज्ञा मालपुरे , वैशाली मालपुरे, दीपक पाटील , अतुल दहिवेलकर , अनिल चव्हाण, पवन मराठे,डॉ. योगेश ठाकरे , डॉ.अमित पाटील, कैलास देवरे , पांडुरंग पाटील , संतोष देवरे , नितीन पाटील , गोकुळ पाटील , डॉ. विजय भोसले , प्रज्ञा पाटील, प्रसाद पाटील, गिरीश दारुंटे , वीरेंद्र मोरे , प्रा. रवींद्र निकम , सिद्देश कॉम्प्युटर्स , रामकृष्ण सूर्यवंशी , सरमोड पाटील , स्वप्नील रमेश पाटील , विशाल सूर्यवंशी, प्रवीण बारकू खैरनार ह्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी चित्रपटाचे नायक गणेश खाडे व अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ह्यानंतर प्रसिद्ध गायक मा. पी गणेश ह्यांनी आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांतर समस्त फफूटा टीम च्या वतीने आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशश्वी होण्यासाठी संदेश दाभाडे , मंगेश पाटील, प्रमोद पाटील, दिग्विजय पाटील, ऋषीं दाभाडे , कुणाल चौधरी , शुभम शिंदे, पंकज पाटील, राजेंद्र देवरे, पवन सोनार , आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी सर ह्यांनी केले

कलेतून उलगडणार गुरु परंपरेचा अतूट वारसा

नृत्यभारतीतर्फे

‘स्रोतस्’ कथक मैफल

पुणे : “नृत्यकला म्हणजे उपासना, साधना मानून स्वत:च्या मिळालेल्या कलेचा वारसा श्रध्देने पुढे नेणारे लखनौ घराण्याचे प्रसिद्ध नर्तक सुभाषचंद्र यांच्या ‘स्रोतस्’ या कथक मैफिलीचे आयोजन येत्या सोमवारी (दि.२०) करण्यात आले आहे. नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे  बालशिक्षण सभागृहात ही मैफल सायंकाळी ५ वाजता भरविण्यात येणार आहे.

त्यकलेचे इतिहासकार आणि सुप्रसिद्ध समीक्षक पद्मश्री सुनील कोठारी यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभणार आहे.

‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या सुरावटींनी दुमदुमला आसमंत

बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित धम्मपहाटमध्ये राहुल देशपांडे यांचे गायन, रोणु मुजुमदार यांचे बासरीवादन
पुणे : सप्तसुरांतून उमटलेल्या ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा नादाने अवघा आसमंत दुमदुमला. पंडित राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने आणि रसिकांना मोहिनी घालणाऱ्या पंडित रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरीवादनाने गौतम बुद्धाना स्वरांतून मानवंदना देण्यात आली. त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या शनिवारची सकाळ स्वरमयी झाली. या धम्मपहाट कार्यक्रमाला संयोजक परशुराम वाडेकर यांच्यासह मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पंडित वसंतराव गाडगीळ, टेक्सास विद्यापीठाचे प्रा. स्कॉट, प्रा. विजय खरे, नगरसेविका सुनीता वाडेकर व राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बुद्ध जयंतीच्या (बौद्ध पौर्णिमा) निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे धम्मपहाट महोत्सवाचे आयोजन केले होते. धम्मपहाट महोत्सवाचे हे अठरावे वर्ष असले, तरी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय संगीताची मैफल आयोजिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगलेल्या या मैफिलीत राहुल देशपांडे यांनी गायनातून, तर रोणू मुजुमदार यांनी बासरीतून सादर केलेल्या रागदारीने रसिकांना भुरळ घातली. त्यात भर घालण्याचे काम गौरव महाराष्ट्राचा फेम गायक सिद्धेश जाधवने केले.
देशपांडे व मुजुमदार यांनी स्वरमालेतून भूप रागाने गायनाला सुरुवात करत ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ हे वंदन गायले. त्यानंतर तीन ताल बंदिश सादर केली. अहिर भैरव रागातील रोणुजी आणि राहुलजी यांच्या मिश्र सादरीकरणाने रसिकांना मोहिनी घातली. दोघांनी एकमेकांना दिलेली उत्स्फुर्त दाद हा क्षण रसिकांना देखणा होता. ‘घेई छंद मकरंद’, ‘अलबेला सजन आयो रे’ या बंदिशीने आणि सुनता है गुरु ग्यानी या संत कबीरांच्या दोह्याने रसिकांनाही ठेका धरायला लावला. ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा’, ‘चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया’ ही दोन गीते सिद्धेश जाधव याने सादर केली. तबल्यावर निखील फाटक यांची, तर पखावजावर ओंकार दळवी, कीबोर्डवर विशाल धुमाळ यांची तालबद्ध साथसंगत झाली. दीपक म्हस्के यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कबीराचे निर्गुण भजन गात भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

डॉ आंबेडकरांवरील मालिकेत आदित्य बीडकर

पुण्याचा युवा कलाकार आदित्य बीडकर हा ‘स्टार प्रवाह ‘ मराठी वाहिनीवर ‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा’ या महामालिकेत  डॉ.आंबेडकर यांचे ज्येष्ठ बंधूंच्या  भूमिकेत  बालपणीच्या सर्व प्रसंगात दिसणार आहे .
 नितीन वैद्य यांच्या ‘दशमी क्रिएशन ‘ ची ही मालिका १८ मे २०१९ ( बुद्धजयंती )पासून छोट्या पडद्यावर दिसणार आहे . अजय मयेकर दिग्दर्शक आहेत.
लहानपणापासून प्रकाश पारखी  यांचे नाट्यसंस्कार शिबिर ,अनेक स्पर्धा ,अभिनय ,शॉर्ट फिल्म , ग्रिप्स थिएटर ,स . प . कलामंडळ ,मौनांतर स्पर्धा, फिरोदिया ,पुरुषोत्तम  करंडक गाजवून आदित्य इथपर्यंत अत्यंत मेहनतीने ,संघर्ष करीत स्वबळावर पोहोचला . निर्मिती सावंत यांच्यासमवेत ‘ निर्मल ग्राम ‘ अभियानावरील माहितीपटात  फार पूर्वी त्याने अभिनय केला केला होता. इंडियन मॅजिक आय ‘ बरोबर जाहिरातीत त्याने काम केले आहे. समवयीन मित्र – मैत्रिणींसाठी त्याने स्वतःच अभिनय प्रशिक्षण शिबीर पण घेतले आहे.
 प्रसिध्द युवा कलाकार अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे यांच्याबरोबर ‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ या व्यावसायिक नाटकातही त्याने भूमिका केली आहे.
स. प. महाविद्यालय ( पुणे ) येथे कला शाखेच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सुरु असतानाच या मालिकेचे शूटींग सुरु झाले.
‘लाठी ‘ या  संजय सूरकर दिग्दर्शित  ,त्यांच्या अखेरच्या मराठी सिनेमात आदित्य मोठ्या पडद्यावर झळकला . मग अनेक वर्ष रंगभूमी वर वावरत राहिला . ‘भूमिका ‘ या व्यावसायिक नाटकाच्या अनेक प्रयोगात तो होता. आणि आता १८ मे  २०१९ पासून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर झळकणार आहे !
आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधूंची , बालपणीची भूमिका आदित्यने साकारली आहे. ते घरचा संघर्ष पाहून आक्रमक पणे परिस्थितीशी सामना करणारे, पण कला आवडणारे व्यक्तीमत्व होते. लहान वयातील डॉ.आंबेडकर यांना संघर्षाची दीक्षाच ते देतात. आंबेडकरांच्या बालपणातील  महू, आंबवडे येथील प्रसंगात आदित्य आहे. हे चित्रीकरण भोर, मुंबई येथे झाले.
भारतीय इतिहासातील मोठया चरित्र नायकाच्या भावाची भूमिका करणे, हा आजवरच्या अभिनय प्रवासात जुळून आलेला सर्वात मोठा योग होता. मिलिंद अधिकारी, चिन्मयी सुमित या कलाकारांसमवेत काम करता आले.डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेतील सागर देशमुख यांचा अभिनय शूटींग दरम्यान पाहता आला आणि टी.व्ही. वर आपण दिसणार आहोत,हेच मोठे समाधान आहे ‘ असे आदित्य बीडकर सांगतो !

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे २० मे ‘रोझा ईफ्तार ‘ चे आयोजन

पुणे :’महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'(गांधीभवन ) तर्फे सोमवार ,२० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘रोझा ईफ्तार ‘ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी पत्रकाद्वारे दिली.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून उपवास सोडण्यासाठी रोझा इफ्तार ‘चे आयोजन केले जाते . सर्व धर्मियांचे  धार्मिक प्रसंग  एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘तर्फे सर्वधर्मीय नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित करीत आहे . या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . पुणे ,कोथरूड ,वारजे परिसरातील मुस्लिम बांधव ,मशिदीचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहे. गांधीभवन (कोथरूड ) येथे हा कार्यक्रम होईल .

या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के .व्यंकटेशन  ,’लिज्जत पापड ‘ संस्थेचे सुरेश कोते,पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित राहणार आहेत . डॉ कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत .