Home Blog Page 2931

उत्पादनाला चालना देण्यासाठी कम्पोनंटसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी

~ देशांतर्गत उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी अंतिम उत्पादन व त्याचे कम्पोनंट यासाठी शुल्काच्या बाबतीत तफावत करण्याची शिफारस

~ एअर कंडिशनरसाठी जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत व 5 स्टार मॉडेलसाठी 12% पर्यंत कमी करण्याची मागणी

~ भारतीय ईपीआर (एक्स्टेंड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी) धोरण आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार साकारण्यावर भर

 

दिल्ली, मे 24, 2019: कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीईएएमए) या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस व मोबाइल उद्योग यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतातील सर्वोच्च संघटनेने स्थानिक स्तरावरील उत्पादनाला चालना देण्यासाठी  कम्पोनंटसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे. तसेच, देशांतर्गत उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी अंतिम उत्पादन व त्याचे कम्पोनंट यासाठी सरकारने शुल्काच्या बाबतीत तफावत करावी, अशी शिफारसही केली आहे. मेक इन इंडियावर अधिक भर देत, या उद्योगाने आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणाऱ्या व कालानंतराने स्थानिकीकरण गरजेचे असणाऱ्या वस्तू व कम्पोनंट यांच्यासाठी फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रॅम (पीएमपी) हाती घ्यावा, अशी शिफारस केली आहे. या बाबतीत यश मिळवल्यानंतर, या उद्योगाने एअर कंडिशनरसाठी व भारतात उत्पादित करता येतील अशा इनपुटसाठ पीएमपीची विनंती केली.

सध्याच्या फ्री ट्रेड अग्रिमेंटचा (एफटीए) (एशियन+ थायलंड) आढावा घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे, कारण त्यामुळे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या वाटचालीमध्ये अडथळे येत आहेत. नवे एफटीए हे कन्झमशन-आधारित अर्थव्यवस्थेच्या ऐवजी उत्पादन-आधारित अर्थव्यवस्थेवर बेतले असावेत, असा प्रस्ताव आहे.

सीईएएमएच्या कार्यकारी समितीच्या 5व्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत समाविष्ट करण्यात  आलेले अन्य मुद्दे होते, एअर कंडिशनर व रेफ्रिजरेटरसाठी स्टार लेबलिंग व ई-वेस्ट व्यवस्थापन. पुढील चर्चेसाठी या शिफारसी सरकारपुढे मांडल्या जाणार आहेत.

सीईएएमएचे अध्यक्ष व गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांनी सांगितले, “गेली दोन वर्षे हा उद्योग तणावाखाली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन करण्यास उत्तेजन देण्यासाठी कम्पोनंटसाठी पोषक वातावरण  निर्माण करणे महत्त्वाचे आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने मुक्त व्यापार करारांचा पुन्हा आढावा घ्यावा. एअर कंडिशनरसाठी जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याच्या मागणीही आम्ही पुन्हा केली आहे. कमालीच्या उकाड्यामुळे हे गरजेचे ठरत आहे. रेटिंग ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे व त्यामुळे विजेची बचतही झाली आहे. परंतु, विजेबाबतचे नियम आणखी कडक केले तर त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढेल व विजेची बचत करणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये अडथळे येतील. हा उद्योग ऊर्जाक्षमतेच्या तक्त्याचा व वारंवारितेचा पुनःआढावा घेण्यासंदर्भात सध्या सरकारशी चर्चा करत आहे. भारतीय ईपीआर धोरण आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  परंतु, हा उद्योग एकट्याने ई-वेस्ट समस्येचा सामना करू शकणार नाही. ही समस्या हाताळण्यासाठी, सर्व संबंधित घटकांना सहभागी करून घेणारे पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.”

2020 मध्ये, ऊर्जाक्षमता तक्त्याचा आढावा घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावावर समितीने चर्चा केली. सध्याचा तक्ता विचारात घेताही हा उद्योग अनेक विकसित देशांच्या तोडीचा किंवा त्याहून उत्तम आहे आणि ऊर्जाक्षमता तातडीने वाढवण्याची तशी गरज नाही. तक्त्यामध्ये बदल केल्यास केवळ समस्येची तीव्रता वाढेल, कारण अधिक ऊर्जाक्षमता साध्य करण्यासाठी अवलंबण्यात आलेली प्रक्रिया व तंत्रज्ञान यातील बदल आधीच सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. तंत्रज्ञानामध्ये आणखी कोणताही बदल केला तर खर्चामध्ये वाढ होईल व त्यामुळे ग्राहकांना किफायतशीर ठरणार नाही इतकी किंमत वाढेल. 5 स्टार मॉडेल खरेदी करण्यासाठी कॉस्ट-बेनिफिट विश्लेषण ग्राहकांच्या विरोधात जाते. एअर कंडिशनर व रेफ्रिजरेटर या दोन्हींच्या 5 स्टार मॉडेलच्या विक्रीत घट झाली आहे. ही विक्री फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या बाबतीत शून्यावर आली आहे. याचे संपूर्ण कारण किंमत हे आहे. अनेक ब्रँडनी 5 स्टार मॉडेलचे उत्पादन करणे बंद केले आहे आणि विकला न गेलेला साठा कायम आहे.

तक्त्यांमध्ये मोठे अंतर असावे, असे या क्षेत्राला वाटले आणि हे अंतर 4 वर्षांचे असावे, असे सुचवण्यात आले आहे. 40% थ्रुपुट 5 स्टार मॉडेलचा असेल तर 4 वर्षांपूर्वी घेतलेल्या आढाव्यावर परिणाम होऊ शकतो आणि आगामी काळात 5 स्टार मॉडेलचा 40% थ्रुपुट साध्य नाही केला तर 4 वर्षांच्या नंतरही सद्यस्थिती कायम राखली जाऊ शकते.

एअर कंडिशनर व रेफ्रिजरेटर यांतील तफावत भरून काढण्यासाठी विद्युत पंखे व डेझर्ट कूलर यांसाठी एनर्जी लेबलिंग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. एसी आता चैनीची वस्तू राहिले नसून गरजेची वस्तू बनली असल्याने त्यावरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करावा, असे समितीने म्हटले आहे.

ई-कचरा व्यवस्थापनांतर्गत एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी (ईपीआर) आणि हाताळणीचे नियम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतातील ई-कचराविषयक नियम आंतरराष्ट्रीय प्रमाणकांच्या व पद्धतींच्या तोडीचे करावेत, असे या क्षेत्राचे म्हणणे आहे. सध्या, संकलनातील 85% लक्ष्य अनौपचारिक क्षेत्राकडून बाय-बॅकमार्फत पूर्ण केले जात आहे आणि केवळ 15% संकलन औपचारिक क्षेत्रातून होत आहे. उत्पादकांकडून प्रभावी अनुपालन होण्यासाठी, आपले लक्ष्य विशिष्ट वर्षांमध्ये विभागण्याचे सुचवण्यात आले. तसेच, नियमांचे पालन करण्यासाठी ईपीआरअंतर्गत, डीलर, रिफर्बिशर, बल्क कन्झ्युमर डिसमँटलर अशा विविध भागधारकांमध्ये जबाबदाऱ्या विभागल्या जाव्यात. अनौपचारिक क्षेत्रे औपचारिक करण्याची जबाबदारी स्थानिक सरकारांना द्यावी. ई-कचऱ्याची गळती अनौपचारिक क्षेत्रामध्ये झाल्यास ईपीआरद्वारे आखण्यात आलेल्या फ्लो-बॅक प्रक्रियेमध्ये असंतुलन निर्माण होते. हे असंतुलन सुरळित केल्याशिवाय, औपचारिक क्षेत्रासाठी ठरवलेले अनुपालन प्रत्यक्षात साकारता येणार नाही. ई-कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची औपचारिक क्षेत्राची क्षमता मर्यादित आहे व त्यामुळे औपचारिक चॅनलद्वारे संकलित केलेला ई-कचरा रीसायकलिंगसाठी अनौपचारिक चॅनलकडे येतो.

खासदार गिरीश बापट यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहरतर्फे महायुतीचे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गिरीश बापट यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत, फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. प्रचारातील सक्रिय सहभागाबद्दल गिरीश बापट यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, ‘आरपीआय’चे पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, ‘आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, युवक आघाडीचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, संजय सोनावणे, निलेश आल्हाट, जयदेव रंधवे, किरण भालेराव, संतोष खरात, चंद्रकांता सोनकांबळे, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, आशिष भोसले, बाबुराव घाडगे,सुन्नबी शेख, रमेश तेलवडे, के. जी पवळे, नंदा निकाळजे, मंगल राजगे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या थोर समाजसुधारकांना अभिवादन करून खासदार म्हणून काम करण्यास सुरुवात करीत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेली तीन महिने अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. माझ्या विजयात ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. झोपडपट्टीधारकाना स्वत:चे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

सीएसआर : भारतातील सद्यस्थिती’वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : “भारतातील उद्योजकांनी आपल्या नफ्यातील काही भाग समाजाच्या हितासाठी वापरावा, याकरीता महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला. गांधी हे भारतातील ‘सीएसआर’चे प्रणेते आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून होत असलेल्या समाजपयोगी उपक्रमात टाटा उद्योग समूहाचे मोठे योगदान आहे. आज देशातील अनेक कंपन्या ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी पुढे येत आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अशा विविध प्रकारच्या उपक्रमात भारतात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहे, ही देशाच्या विकासासाठी महत्वाची बाब आहे,” असे मत आंतरराष्ट्रीय रिटेल मार्केटमधील रिटेल ऑपरेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सावरकर यांनी व्यक्त केले.

तर ‘सीएसआर’च्या निधीचा विनियोग हा समाजातील गरजू आणि पात्र लोकांसाठीच व्हायला हवा. तसेच उद्योगांकडून दिल्या जाणाऱ्या ‘सीएसआर’ निधीचे मूल्यांकनही व्हायला हवे, असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एसआयबीएमटी) आयोजित ‘सीएसआर : भारतातील सद्यस्थिती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत अभिजित सावरकर बोलत होते. प्रसंगी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, राउंड ग्लास ऑर्गनायझेशनचे प्रमुख धवल मोदी, डॉ. संजय चोरडिया, कावेरी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. श्वेता बापट, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड मास कम्युनिकेशन्स रिसर्च हेड डॉ. धनंजय अवसरीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

अभिजित सावरकर म्हणाले, “उद्योगातील नफा आणि त्याचा समाजासाठी विनियोग याचा ताळमेळ घालता आला पाहिजे. ‘सीएसआर’साठी अनेक देश पुढाकार घेत आहेत. भारतातही अनेक उद्योग ‘सीएसआर’च्या माध्यमातून भरीव काम करीत आहेत. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासह सामाजिक उपक्रमात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. ‘सीएसआर’सह पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाने देशाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे.”

रवींद्र धारिया म्हणाले, “वनराईमार्फत ‘सीएसआर’ निधीतून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जलसंधारण, पर्यावरणाचा ऱ्हास, विजेची टंचाई आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये मोठे काम व्हायला हवे. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा, झव्हेरी ऍग्रो यासह इतर अनेक बड्या कंपन्या वनराईशी ‘सीएसआर’मुळे जोडल्या आहेत. वनराईमध्ये वेळ, विश्वास, ठेवी, पारदर्शकता, कार्य, चिकाटी, कौशल्य, तत्रंज्ञान, आणि कृतज्ञता या गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो.”

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांतील उद्यमशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य सूर्यदत्ता करत आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच त्यांच्यात संवेदनशीलताही तेवत ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने उच्च दर्जाचे संशोधनपर शिक्षण, तज्ञ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुरवले जाते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट देखील अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना ‘सीएसआर’चे महत्व पटवून देते.”

डॉ. धवल मोदी यांनी ‘सीएसआर’ संदर्भातील संरक्षण, नवकल्पना आणि विस्तार याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्था किंवा विविध कंपन्यांमध्ये ‘सीएसआर’ प्रकल्प घेण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता बापट यांनी शाश्वत विकासातील ‘सीएसआर’चे महत्व स्पष्ट केले. डॉ. धनंजय अवसरीकर यांनी ‘सीएसआर’च्या कायदेशीर बाबींविषयी माहिती दिली. डॉ. श्रीप्रकाश सोनी यांनी आभार मानले.

महाराष्ट्रीयन पदार्थांच्या लोकप्रियतेसाठी ‘अंगतपंगत’

मराठी शेफ मधुरा बाचल यांचा पुढाकार; सुगरणींच्या 100 मिसळींची मेजवानी

पुणे : साऊथ इंडियन, पंजाबी, नॉर्थ इंडियन, चायनीज आणि फास्ट-जंक फूडच्या जमान्यात महाराष्ट्रीयन पदार्थांना म्हणावी तशी उपलब्धी मिळत नाही. अनेक हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थांना दुय्यम स्थान देतात. अशावेळी स्वादिष्ट, पोषक महाराष्ट्रीय पदार्थ सगळीकडे उपलब्ध व्हावेत, या हेतूने प्रसिद्ध मराठी शेफ मधुरा बाचल यांच्या पुढाकारातून ‘अंगतपंगत दिवस’ हा उपक्रम राबविला जात आहे. याच निमित्ताने शुक्रवारी पुण्यातील शंकर शेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या इन ग्रीन या हॉटेलमध्ये ‘अंगतपंगत दिवस’ साजरा झाला. मधुरा बाचल यांचे चाहते असलेल्या पुण्यातील 100 पेक्षा अधिक सुगरणींनी खास मिसळीचा बेत बनवला होता. या सर्वांनी एकत्र येत पंगत धरली आणि एकमेकांच्या मिसळीचा स्वादही अनुभवला. जोडीला मधुरासोबत सेल्फी आणि त्यांच्या खमंग टिप्स ऐकून पुणेकर सुगरणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

‘मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल आणि क्यूकी अ‍ॅड्स यांनी संयुक्तपणे या अंगतपंगत दिवसाचे आयोजन केले होते. विविध प्रकारच्या मिसळ तयार करण्यासाठी 100 हुन अधिक चाहत्यांनी इनग्रीन हॉटेलच्या किचनमध्ये गर्दी केली होती. या 100 मिसळींमध्ये मधुरा यांनी बनवलेल्या विशेष मसालांचा वापर केला होता. तोंडाला पाणी आणणार्‍या या पुणेकरांच्या शंभर मिसळींचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देशी, वैदर्भीय, कोकणी, पुणेरी, कोल्हापुरी अशा वैशिष्ट्यांचे हजारो पदार्थ आहेत. त्यांची चव सगळीकडे उपलब्ध व्हावी, याकरिता या पदार्थांना प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठीच हा ‘अंगतपंगत’ उपक्रम असल्याचे मधुरा यांनी नमूद केले. अनेक महिलांनीही महाराष्ट्रीयन पदार्थांच्या लोकप्रियतेसाठीच्या कल्पना सांगितल्या.

अंगतपंगतच्या यशाविषयी बोलताना मधुरा बाचल म्हणाल्या, “पाककला हा माझ्या अगदी मनाला भावनारा विषय आहे. त्याच्याच प्रेमातून हे मसाले बनले आहेत. मिसळ हा पदार्थ अतिशय चटकदार आणि जीभेवर रेंगाळणारा आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मिसळीची निवड केली आहे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक हॉटेलांमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याविषयी प्रयत्न करीत आहोत. देशाच्या विविध भागात महाराष्ट्रीयन पदार्थांबाबत जागृती करुन खाण्यासाठी, बनविण्यासाठी आणि त्यावर प्रेम करण्यासाठी मधुराज रेसीपी काम करत आहे.”

क्युकी अ‍ॅड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर बांगरा म्हणाले, “मधुरा बाचल अतिशय हुशार आणि उत्साही शेफ आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालत तिच्या चाहत्यांना पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील अशा रेसीपीज तिला बनवायच्या आहेत. अंगतपंगत हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम असून, लोकांचा प्रतिसाद मोठा आहे.”

मधुरा बाचल यांच्याविषयी : 
मधुरा बाचल या प्रसिद्ध मराठी शेफ आहेत. मधुराज रेसीपी या नावाने त्यांचे युट्यूब चॅनेल असून, त्याला 19 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत. मुळच्या पुण्याच्या असलेल्या मधुरा यांचा पाककलेविषयीचा चॅनेल भारतातील क्रमांक एकचा असून, मराठीमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या रेसिपी अतिशय चविष्ट आणि इंटरनेटवर हिट ठरलेल्या आहेत. भारतासह अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत.

टेनिस स्पर्धेत धृव तंग्री, कृष्णा हुडा, संजना सिरीमल्ला, रेनी सिंगला यांचा अंतिम फेरीत प्रवेश

0
मुंबई: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित योनेक्स सनराईज एमएसएलटीए 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात धृव तंग्री व कृष्णा हुडा तर मुलींच्या गटात संजना सिरीमल्ला व रेनी सिंगला यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात चंदीगडच्या पाचव्या मानांकीत कृष्णा हुडा याने हरियाणाच्या दुस-या मानांकीत चिराग दुहानचा 2-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत पंजाबच्या चौथ्या मानांकीत धृव तंग्रीने हरियाणाच्या नवव्या मानांकीत करण सिंगचा 6-4, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
मुलींच्या गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकीत संजना सिरीमल्ला हीने हरियाणाच्या आठव्या मानांकीत परी सिंगचा 6-1, 6-1 असा तर दुस-या लढतीत हरियाणाच्या सातव्या मानांकीत रेनी सिंगलाने कर्नाटकच्या नैशा श्रीवास्तवचा 6-1, 6-3 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 
 
दुहेरीच्या मुलांच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत कर्नाटकच्या निखिल निरंजनने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवच्या साथीत चंदीगडच्या  अजय सिंग व कृष्णा हुडा या जोडीचा   6-3, 6-4  पराभव करत विजेतेपद पटकावले. तर मुलींच्या गटात हरियाणाच्या रेनी सिंगलाने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरच्या साथीत महाराष्ट्राची जोडी  ऋतूजा चाफळकर व हृदया शहा यांचा 3-6, 6-3, 11-9 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुले:
धृव तंग्री(4)(पंजाब)वि.वि.  करण सिंग(9)(हरियाणा)6-4, 7-5
कृष्णा हुडा(5)(चंदीगड) वि.वि चिराग दुहान(2)(हरियाणा) 2-6, 6-4, 6-1
 
उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुली:
संजना सिरीमल्ला(1)(तेलंगणा) वि.वि परी सिंग(8)(हरियाणा) 6-1, 6-1 
रेनी सिंगला(7)(हरियाणा) वि.वि  नैशा श्रीवास्तव(कर्नाटक) 6-1, 6-3
 
दुहेरी गट-मुले- अंतिम फेरी
निखिल निरंजन(कर्नाटक)/ डेनिम यादव(मध्यप्रदेश) वि.वि अजय सिंग(चंदीगड)/ कृष्णा हुडा(चंदीगड)   6-3, 6-4

 

दुहेरी गट-मुली- अंतिम फेरी   

रेनी सिंगला(हरियाणा)/वैष्णवी अडकर (महाराष्ट्र) वि.वि   ऋतूजा चाफळकर(महाराष्ट्र)/ हृदया शहा(महाराष्ट्र)  3-6, 6-3, 11-9

फर्ग्युसनमध्ये सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असतानाची वसतिगृहातील खेाली यांच्या जयंतीनिमित्त येत्या मंगळावरी (दि. २८ मे) सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०६.०० यावेळेत दर्शनासाठी सर्वांना खुली ठेवण्यात आलेली आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, अध्यक्ष नियामक मंडळ मा. डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

सन १९०९ ते १९०५ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहात खोली क‘. १७ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी वकीली करत असताना परिधान केलेले दोन गाऊन या खोलीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत.

या कार्यक‘मास उपाध्यक्ष मा. श्री. महेश आठवले, अध्यक्ष वसतिगृह व्यवस्थापन समिती मा. श्री. प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, वसतिगृह प्रमुख प्रा. (मेजर) श्रीधर म. व्हनकटे, प्रा. स्वाती जोगळेकर, मुलींचे वसतिगृह रेक्टर, डॉ. आनंद काटीकर, मुलांचे वसतिगृह रेक्टर तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, फर्ग्युसन महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य व वसतिगृह व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

धीरज फतंगरे व स्वप्निल फुलपगारे यांची शतकी भागीदारी

पहिल्या दिवसअखेर डेक्कन जिमखाना संघाचे वर्चस्व 

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाने अचूक गोलंदाजी करत पूना क्लब संघाला 175 धावांवर रोखले व त्यानंतर धीरज फतंगरे(नाबाद 91धावा) व स्वप्निल फुलपगारे(नाबाद 41धावा)यांनी तिसऱ्या गडयासाठी 105 धावांची भागीदारी करून पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कनच्या अचूक गोलंदाजी व सुरेख क्षेत्ररक्षणापुढे पूना क्लब संघाचा डाव 37षटकात 175 धावांवर संपुष्टात आला. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्यामुळे पूना क्लबची अंतिम धावसंख्या 125धावा (वजा50धावा) झाली.  सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात अकिब शेख 31धावा व ऋषीकेश मोटकर 24धावा यांनी चौथ्या गडयासाठी 75 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आशिष सूर्यवंशी 47 धावा व ओंकार आखाडे 30धावा यांनी सातव्या गडयासाठी 103 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली.डेक्कनकडून मुकेश चौधरीने शिस्तबद्ध गोलंदाजी करत 26 धावांत 4 महत्वपूर्ण गडी बाद केले. प्रखर अगरवालने 42धावात 2 गडी, तर आशय पालकर(30-1), धीरज फतंगरे(33-1), आर्यन बांगळे(37-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून पूना क्लबला 175धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आजदिवस अखेर 27षटकात 2बाद 149धावा केल्या. यामध्ये धीरज फतंगरेने संयमपूर्ण खेळी करत 115 चेंडूत 10 चौकार व 1षटकारांच्या मदतीने नाबाद 91 धावांची खेळी केली. धीरजला स्वप्निल फुलपगारेने 70 चेंडूत नाबाद 41धावा काढून सुरेख साथ दिली. धीरज व स्वप्निल यांनी तिसऱ्या गडयासाठी 147 चेंडूत 105 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थित आणून ठेवले. पहिल्या डावातील डेक्कन जिमखाना संघाचा अजून उर्वरित 13 षटकांचा खेळ बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: पूना क्लब: 37षटकात सर्वबाद 125धावा(175-50धावा)(आशिष सूर्यवंशी 47(70), अकिब शेख 31(55), ओंकार आखाडे 30(73), ऋषीकेश मोटकर 24(26), यश नाहर 16(35), मुकेश चौधरी 8-26-4, प्रखर अगरवाल 8-42-2, आशय पालकर 7-30-1, धीरज फतंगरे 6-33-1, आर्यन बांगळे 8-37-1) वि.डेक्कन जिमखाना: 27षटकात 2बाद 149धावा(धीरज फतंगरे नाबाद 91(115,10×4,1×6), स्वप्निल फुलपगारे नाबाद 41(70,3×4), अभिषेक ताटे 11, धनराज परदेशी 5-13-1, सौरभ यादव 5-30-1).

यश मोदींचे की ईव्हीएमचे ? छगन भुजबळांचा सवाल

मुंबई-लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये जे कल समोर आले आहे त्यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार अशी स्पष्ट चिन्ह दिसायला लागली आणि हे कल पुढे आल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे यश मिळताना दिसत आहेत ते मोदींचे आहे की ईव्हीएमचे असा प्रश्न विचारला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय

पुणे-शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८,४८३ मतांनी पराभव करत शिरूरचा गड  अभिनेता, डॉ. अमोल कोल्हे यांनी जिंकून घेतला.     आढलराव यांनी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा जोर लावला होता. स्थानिक उमेदवारांना संधी देऊनही यश न मिळाल्याने राष्ट्रवादीने यंदा शिवसेनेतून आयात केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना संधी दिली आहे. कोल्हे यांनाही तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, इथे अटीतटीची लढत बघायला मिळाली .
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तसे सर्वच फेऱ्यांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली..त्यांना या निवडणुकीत शिरूरमध्ये ६,३५,८३० मतं मिळाली असून शिवाजीराव आढळराव यांच्या पारड्यात ५, ७७, ३४७ मतं पडली आहेत.
2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग विजय मिळवित हॅटट्रिक साधली होती. आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख 1 हजार 453 मतांनी विजय मिळविला होता. आढळराव यांना 6, 42, 828 तर देवदत्त निकम यांना 3, 41, 375 मते मिळाली होती. शिवसेनेतून ऐन वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ 36, 431 मते तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना 16, 653 मते मिळाली होती.

11 हजार 971 मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला

आढळराव पाटील यांनी आतापर्यंत तीनदा विजय मिळवत शिरूरला हॅट्रिक साधली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर मतदारसंघ जिंकायचाच असा निर्धार करत कोल्हेंसाठी अपार मेहनत घेतली होती.

लेकीनं बारामतीचा गड राखला……

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याविरोधात १ लाख ५४, ९९४ चे मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधत गड राखण्याच काम केल

कुटुंबीयांच्याच नातेवाईक असलेल्या तसेच रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुरुवातीपासूनच सुळे यांच्यासमोर त्यांना तगडे आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ६, ८६,७१४ तर कांचन कुल यांना ५, ३०,९४० मते पडली. सुळे यांनी १,५५,९४० मतांनी विजय प्राप्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच ,दादा, बिटीया गिरनी चाहिए अशी सूचना केली होती. त्यासाठी मंत्री पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून होते. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे चित्र निर्माण करण्यास भाजप यशस्वीदेखील झाली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशात भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातच पवार यांना विरोध करण्यासाठी भाजपने मोठी राजकीय व्यूहरचना आखली होती.
भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातल्याने यंदा यंदा प्रथमच बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून या मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या भागात सभा घेऊन पाणी प्रश्नावर परिवर्तन करा, तुमचा प्रश्न सोडवितो, असे खुले आव्हान दिले होते.
२०१४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा केवळ ६७ हजार ७१९ मतांनी विजय झाला होता. सुळे यांनी पाच लाख ६९ हजार ८२८ मते, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी चार लाख ५२ हजार ५३१ मते घेतली. तर आपच्या सुरेश खोपडे यांनी २६ हजार ४६२ मते घेतली. अचानक उमेदवारी मिळवून जानकर यांनी दिलेली लढत असूनही त्यांना मिळालेली मते चर्चेचा विषय ठरली होती. यंदा ऐनवेळी जानकर यांच्या पक्षातील आमदाराच्या पत्नीलाच कमळ चिन्हावर भाजपने उमेदवारी दिली. मात्र,भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या रासपच्या प्रमुखाने २०१४ मध्ये पक्षाच्या चिन्हावर दिलेली लढत यंदाच्या लढतीच्या तुलनेने उजवी ठरली. २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांना जानकर यांच्याविरोधात केवळ ६७ हजार ७१९ मताधिक्य मिळाले होते. यंदा कुल यांच्याविरोधात १ लाख ५४ हजार ९९४ चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे जानकर यांची त्या वेळची लढत तुलनेने अधिक कडवी होती, हे स्पष्ट होते.
२०१४ च्या निवडणुकीत घटलेल्या मोठ्या मताधिक्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी यंदा चांगलीच दक्षता घेतल्याचे या वेळी दिसून आले. लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच भर दिला. मतदारसंघातील समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्यावर त्यांचा विशेष भर होता. बारामती भागात दुष्काळी दौऱ्यांच्या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले. सोशल मीडियाच्या माध्यमाचा सुळे यांनी सर्वाधिक प्रभावी वापर करीत तरुणाईशी संवाद साधलेला संवाद त्यांच्यासाठी महत्ववपूर्ण ठरला. सोशल मीडियावर मतदारसंघातील विविध प्रश्नांसह महत्वाच्या प्रश्नांवर सुळे यांनी कमालीची आक्रमकता दाखविली. गेली पाच वर्षे लोकसभा मतदारसंघ विविध कार्यक्रम व उपक्रमांनिमित्त पिंजून काढला. संसदेतील उपस्थिती, उपस्थित केलेले प्रश्न आणि सलगपणे मिळालेल्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारामुळे लोकसभेतही त्यांनी खासदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला. महाविद्यालयीन तरुणांमध्ये पोहोचण्यासाठीही त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्याचाही त्यांना फायदा झाला. भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊन खूष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीएसटी, नोटाबंदी, धनगर समाजाचे आरक्षण, शेतमालाचे अडचणीतआलेले बाजारभाव, कर्जमाफी, बारामतीच्या जिरायती भागातील पाणीप्रश्न या बाबी निवडणुकीत अधिक महत्त्वाच्या ठरल्या.

मावळमध्ये पार्थ पराभूत ,बारणेंचा विजय

पुणे- मावळ  लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होती.

या लढतीत श्रीरंग बारणे यांनी २, १५, ५७५ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवत विजयश्री खेचून आणली.
मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९पासून झाली. तेव्हापासून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदारसंघात हा परिसर विभागला होता. मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघ शिवसेनेनं वरचष्मा राखला आहे. या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक मानली जाणारी ही लढत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना ७, १८,९५० मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात ५,०३,३७५ मते मिळाली आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले आहे.
गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 60.11 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना 5 लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती.

शिवसेनेतील मंत्रीपदाचे चारही उमेदवार पराभूत

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चे पानीपत      झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर विजय निश्चित झाला आहे असला तरी त्यांचे पराभूत झालेल्या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार हे केंद्रीय मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. यामुळे राजकीय वर्तुळाने याची विशेष नोंद घेतली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते हे निवडणूक लढवत होते, त्यांचा राष्ट्रावादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केल्यामुळे ते मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

दुसरे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले चंद्रकांत खैरे हे तब्बल तीनवेळा लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता होती, परंतु, त्यांचाही वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे तिसरे मंत्रीपदाचे दावेदार हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीनवेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव होते. परंतु त्यांचाही राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हेनी पराभव केला आहे. तसेच, शिवसेनेचे मंत्रीपदाचे चौथे प्रबळ दावेदार हे अमरावतीचे आनंदराव आडसूळ हे होते. परंतु, त्यांचाही आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी पराभव केला आहे.

मंत्रीपदाचे शिवसेनेच्या चारही प्रबळ दावेदारांचा पराभव झाल्याने आता मात्र केंद्रात मंत्रीपद कोणाला दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेना हा भाजपचा जुना आणि महत्वाचा मित्रपक्ष असल्याने केंद्रात शिवसेनेचे मंत्रीपद फिक्स आहे. तसेच, 2014ला शिवसेनेच्या अनंत गिते यांना मंत्रीपद दिले गेले होते ती जागा आता रिक्त होणार असल्याने शिवसेना कोणत्या खासदाराला मंत्रीपद देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.

मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित शहा

नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले.

भाजपप्रणित लोकसभा निवडणुकीत 350 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळविला. या विजयानंतर भाजप मुख्यालयात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना मोदींची स्तुती केली.

शहा म्हणाले, की आजचा विजय हा मोदींच्या लोकप्रियतेचा आहे. भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मोदींनी देशभर तुफानी दौरा केली.

त्यामुळे भाजपला हे यश मिळू शकले. या विजयाचे पूर्ण श्रेय मोदींना जाते. काम करणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा पूर्ण बहुमत मिळाले आहे. 50 टक्के मते मिळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मी सांगितले होते.

त्यानुसार काम करत आज 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. मोदींची लोकप्रियता आणि भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम यांचा फायदा भाजपला झाला आहे. उत्तर प्रदेशात आम्ही सप आणि बसपला आघाडीला मात देऊन विजय मिळविला.

देशात आता परिवार आणि जातीवाद कऱणाऱ्या पक्षाला स्थान नाही. ईव्हीएमबद्दल विरोधकांनी आकडतांडव केला. तिच मेहनत विरोधकांनी मते मिळविण्यासाठी केला पाहिजे होता. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, ओडिशात नवीन पटनाईक यांना विजय मिळविल्याने त्यांचे अभिनंदन करतो

गिरीश बापटांचा 3 लाख १८ हजार मताधिक्यांनी दणदणीत विजय..पहा कोणाला किती अधिकृत मते …

पुणे- शहर भाजप मधील अनेक मान्यवरांनी वर्तविलेले मताधिक्य तंतोतंत राखत म्हणजे तब्बल 3 लाख १८ हजार ,८६३ मतांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला . त्यांना 6 लाख 20 हजार ९०२ एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख २ हजार एकोणचाळीस एवढी मते मिळाली .वंचीतआघाडीच्या अनिल जाधवांना ६३ हजार ८२१ एवढी मते मिळाली . तर नोटा ची मते 10 हजार ७६२ एवढी आहेत .या निवडणुकीत पुणे लोकसभेला ३१ उमेदवार उभे होते .एकूण 10 लाख 14 हजार १३८ एवढे मतदान झाले होते तर पोस्टाने १४१२ एवढे मतदान झाले .एकूण मतदानापैकी ६१.14 टक्के एवढी मते बापट यांनी खेचून आणली .तर जोशी यांना केवळ २९ .७४ टक्के मते मिळाली .

Maharashtra-Pune
Results
O.S.N. Candidate Party EVM Votes Postal Votes Total Votes % of Votes
1 Uttam Pandurang Shinde Bahujan Samaj Party 4689 13 4702 0.46
2 Girish Bhalchandra Bapat Bharatiya Janata Party 619942 960 620902 61.14
3 Mohan Joshi Indian National Congress 301702 337 302039 29.74
4 Anil Narayan Jadhav Vanchit Bahujan Aaghadi 63762 59 63821 6.28
5 Amol Jayraj Shinde Hum Bhartiya Party 933 3 936 0.09
6 Krupal Paluskar Prabuddha Republican Party 324 0 324 0.03
7 Chincholikar Jayant Eknath Bahujan Republican Socialist Party 338 0 338 0.03
8 Prof. Nalawade Hanmant Mahadeo Ambedkarite Party of India 376 0 376 0.04
9 Nikhil Umesh Zingade Bharatiya Praja Surajya Paksha 224 0 224 0.02
10 Balasaheb Misal Patil Bahujan Mukti Party 770 1 771 0.08
11 Adv. Mahesh Gajendragadkar Swarna Bharat Party 435 1 436 0.04
12 Adv. Ramesh Devaram Dharmavat People’s Union Party 539 1 540 0.05
13 Rajesh Surendrakumar Agarwal Hamari Apni Party 827 0 827 0.08
14 Sayyad Raj Faiyaz Bhartiya Kisan Party 584 0 584 0.06
15 Sim Khirid Bahujan Maha Party 480 2 482 0.05
16 Suhas Popat Gajarmal Rashtriya Janshakti Party (Secular) 1099 0 1099 0.11
17 Amol Alias Yabes S. Tujare Independent 609 0 609 0.06
18 Anand Prakash Vanjape Independent 1309 0 1309 0.13
19 Adv. Kumar Devba Kalel Patil Independent 513 1 514 0.05
20 Jafar Khursid Choudhari Independent 543 0 543 0.05
21 Javed Shabbir Sayyed Independent 333 0 333 0.03
22 Johnson Vasant Kolhapure Independent 632 0 632 0.06
23 Ravindra Bansiram Mahapure Independent 165 1 166 0.02
24 Rakesh Prabhakar Chavan Independent 201 0 201 0.02
25 Rahul Vishwas Joshi Independent 418 1 419 0.04
26 Vijay Laxaman Saroade Independent 225 0 225 0.02
27 Sawant Chandrakant Parmeshwar Independent 156 1 157 0.02
28 Sanjay Baburao Jadhav Independent 300 1 301 0.03
29 Hemant Baburao Kolekar Patil Alias Hemant Patil Independent 258 1 259 0.03
30 Kshirsagar Kanchan Devdas Independent 428 0 428 0.04
31 Znyosho Vijayprakash Independent 291 0 291 0.03
32 NOTA None of the Above 10733 29 10762 1.06
Total 1014138 1412 1015550

राहुल गांधींकडून राजीनाम्याचा प्रस्ताव! पराभव मान्य करत,मोदींना दिल्या शुभेच्छा

दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असल्याचे पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पराभव मान्य केला. निकालाच्या दिवशी काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा स्पष्ट विजय दिसून आला. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक विचारधारेचा लढा होता. तसेच हा लढा कायम राहील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरू नये असेही राहुल म्हणाले आहेत. या पत्रकार परिषदेच्या अवघ्या काही मिनिटांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
अमेठीची प्रेमाने काळजी घ्या…
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना अमेठीतून आपला पराभव मान्य केला. स्मृती इराणी यांचा अमेठीतून विजय झाला आहे. निश्चितच त्या अतिशय प्रेमाने अमेठीची काळजी घेतील अशी अपेक्षा करतो असे राहुल गांधी म्हणाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाड येथूनही लोकसभा लढवली. त्या ठिकाणी त्यांना 7 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने आघाडी मिळाली. तरीही राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे, केवळ काँग्रेसच नव्हे तर राहुल गांधी यांच्यासाठी देखील अमेठीचा पराभव गंभीर चिंतेचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय आहे.