पुणे,२७ मे : “भारत माता विश्वगुरू पदावर आरूढ झालेली पहायला मिळावी, यासाठी आपली खासदारकी सुफल व्हावी” अशा निर्वाचित सांसदांना अभिनंदनासह शुभेच्छा देतानांच आपण आली शपथ संस्कृत भाषा, किंवा आपली मातृभाषा किंवा आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्येच घ्यावी, असे आग्रहपूर्वक आवाहन करणारे पत्र एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक कुलपती प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, भारत विश्व ज्ञानपीठम चे कुलपती पद्मश्री डॉ.विजय भटकर, शारदाज्ञानपीठमचे संस्थापक, गुरूकुलाचार्य पं.वसन्तराव गाडगीळ आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यानी सर्व निर्वाचित सदस्यांना पाठवले आहे.
१९९१ साली लोकसभेचे सभापति डॉ. बलराम जाखड यांच्यासह ५३ सदस्यांनी सांसद म्हणून शपथ संस्कृतमध्येच घेतली होती. त्यात काँग्रेसचे ३, जनता दल १, शिवसेनेचे श्री मोरेश्वर सावे आणि भाजपचे ४८ सदस्य होते. ज्यांच्यात विजयाराजे सिंदिया, सुमित्रा महाजन, अण्णा जोशी, ऋता वर्मा, राम नाईक, रामभाऊ कापसे, भावना चिखलिया, महन्त अवेद्यनाथ इ. प्रमुख होते. अशी आठवण सांगून या उपक्रमाचे प्रवर्तक पं. गाडगीळ म्हणाले, “ पक्ष कोणताही असो, भाषांची आदिजननी म्हणून संस्कृतबद्दल सर्वानांच आदर आहे. यामुळे आमच्या या उपक्रमाला सर्वांचाच पाठिंबा मिळतो” शारदाज्ञानपीठमचे प्रतिनिधी राजधानीत सर्व सदस्यांना भेटून संस्कृतमध्येच सर्वाधिक सदस्यांनी शपथ घ्यावी, असे आवाहन करणार आहेत.
खासदारकीची शपथ संस्कृतमध्येच घ्या ,डॉ. विश्वनाथ दा. कराड, डॉ. विजय भटकर व पं.वसंतराव गाडगीळ यांचे आवाहन
पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डेक्कन जिमखानावर 97 धावांनी विजय
पुणे, दि.27 मे 2019: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रोहन दामलेच्या नाबाद 71 धावांच्या खेळीसह यश माने, अभिषेक परमार, साहिल छुरी यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 97 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात काल पीवायसी संघाने 40षटकात 8बाद 241धावा केल्या. डेक्कन जिमखानाचा 21 षटकांपासून आज खेळ सुरु झाला. यात स्वप्निल फुलपगारे 54, अभिषेक ताटे 38, यश बोरामनी 27, धीरज फतंगरे 19, प्रखर अगरवाल नाबाद 26, निकुंज बोरा 16यांनी धावा केल्या. पीवायसीकडून योगेश चव्हाण(33-2), रोहन दामले(28-1), साहिल छुरी(17-1), दिव्यांग हिंगणेकर(49-1), प्रदीप दाढे(39-1), यश माने(30-1) यांनी सुरेख गोलंदाजी करत डेक्कनला 227 धावांवर रोखून पहिल्या डावात 49 धावांची आघाडी घेतली. डेक्कनचे 7 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 143(वजा 35धावा)झाली.
दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 6 बाद 173धावा केल्या. पण त्यांचे 6 गडी बाद झाल्याने पीवायसीची अंतिम धावसंख्या 143(वजा 30 धावा)झाली. यात रोहन दामलेने अफलातून फलंदाजी करत 46 चेंडूत 5चौकार व 3षटकारांसह नाबाद 71 धावा चोपल्या. रोहनला दिव्यांग हिंगणेकरने 39 चेंडूत 34 धावांची संयमपूर्ण खेळी करून साथ दिली. रोहन व दिव्यांग यांनी तिसऱ्या गडयासाठी 42 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दिव्यांग बाद झाल्यानंतर रोहन दामले व मंदार भंडारी(16धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 37 चेंडूत 44 धावांची भागीदारी करून संघाला 173धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखाना संघाला विजयासाठी 193धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाला निर्धारित षटकात 8 बाद 136 धावाच करता आल्या. डेक्कनचे 8 गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 96(वजा 40धावा)झाली. यात धीरज फतंगरे 58 चेंडूत 74धावा व यश बोरामनी 11 धावा यांनी दुसऱ्या गडयासाठी 43 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही व त्यामुळे पीवायसी संघाने डेक्कनवर 97 धावांनी विजय मिळवला. पीवायसीकडून यश मानेने 6 धावात 2गडी, अभिषेक परमारने 22 धावात 2, साहिल छुरीने 22धावात 2 गडी, तर रोहन दामले(31-1), दिव्यांग हिंगणेकर (14-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी दिव्यांग हिंगणेकर ठरला.
स्पर्धेत पहिला उपांत्य फेरीचा सामना पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पीवायसी विरुद्ध केडन्स संघाशी, तर दुसरा सामना डेक्कन जिमखाना विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाशी बुधवार, 29 व गुरुवार 30 मे या दिवशी होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना: 40षटकात 8बाद 241धावा (281-40धावा)(दिव्यांग हिंगणेकर नाबाद 111(119,9×4,4×6), मंदार भंडारी 45(74,4×4,1×6), अभिषेक परमार 33(39), अमेय भावे 17(35), आदित्य लोंढे 15(16), करण जाधव 13, योगेश चव्हाण 10, धीरज फतंगरे 8-77-2, श्लोक धर्माधिकारी 8-50-2, मुकेश चौधरी 8-42-1, प्रखर अगरवाल 7-55-1) वि.डेक्कन जिमखाना: 40षटकात 7बाद 143धावा(227-35धावा)( स्वप्निल फुलपगारे 54(91,4×4,1×6), अभिषेक ताटे 38(39,5×4,1×6), यश बोरामनी 27(35,6×4), धीरज फतंगरे 19, प्रखर अगरवाल नाबाद 26(57), निकुंज बोरा 16, योगेश चव्हाण 8-33-2, रोहन दामले 8-28-1, साहिल छुरी 3-17-1, दिव्यांग हिंगणेकर 6-49-1, प्रदीप दाढे 6-39-1, यश माने 5-30-1); पहिल्या डावात पीवायसीकडे 49 धावांची आघाडी;
दुसरा डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 20षटकात 6बाद 143धावा(173-30धावा)(रोहन दामले नाबाद 71(46,5×4,3×6), दिव्यांग हिंगणेकर 34(39,4×4,1×6), मंदार भंडारी 16(22), प्रखर अगरवाल 3-30-2, धीरज फतंगरे 4-26-1, श्लोक धर्माधिकारी 2-36-1) वि.वि.डेक्कन जिमखाना: 20षटकात 8बाद 96धावा(136-40धावा)(धीरज फतंगरे 74(58,11×4), स्वप्निल फुलपगारे 14, यश बोरामनी 11, यश माने 2-6-2, अभिषेक परमार 4-22-2, साहिल छुरी 3-22-2, रोहन दामले 4-31-1, दिव्यांग हिंगणेकर 2-14-1); सामनावीर-दिव्यांग हिंगणेकर: पीवायसी संघ 97 धावांनी विजयी.
12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शान वरळीकर, सौमिल चोपडे, श्रीनिकेथ कन्नन यांचा मुख्य फेरीत प्रवेश
मुंबई, 26 मे, 2019 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात शान वरळीकर, सौमिल चोपडे, श्रीनिकेथ कन्नन यांनी तर, मुलींच्या गटात माही खोरे, वन्या श्रीवास्तव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत शान वरळीकरने पर्व पटेलचा टायब्रेकमध्ये 6-7(8), 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. सौमिल चोपडेने कडवी झुंज देत आराध्य क्षितिजचे आव्हान 6-7(6), 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले. श्रीनिकेथ कन्नन याने विशाल वासुदेववर टायब्रेकमध्ये 6-3, 3-6, 7-6(5) असा विजय मिळवला. अक्षित बालसुब्रमनियम याने प्रणिल शर्माला 6-1, 6-1 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत वन्या श्रीवास्तव हिने माहिका सुरवारामचा 7-6(5), 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. माही खोरेने श्रीमान्या अनुगोंडाला 6-2, 6-0 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: 12 वर्षाखालील मुली:
एंजल पटेल वि.वि.रिशीथा बासिरेड्डी 6-1, 6-1;
सलोनी परिदा वि.वि.क्षीरीन वाकलकर 6-4, 6-2;
माही खोरे वि.वि.श्रीमान्या अनुगोंडा 6-2, 6-0;
रिहाना रोड्रिगेस वि.वि.अनन्या सिन्हा 7-5, 6-3;
वन्या श्रीवास्तव वि.वि.माहिका सुरवाराम 7-6(5), 6-1;
अवनी चितळे वि.वि.दिशा बेहेरा 6-3, 6-0;
12वर्षाखालील मुले:
अक्षित बालसुब्रमनियम वि.वि.प्रणिल शर्मा 6-1, 6-1;
अंशीत देशपांडे वि.वि.अर्जुन कीर्तने 6-4, 6-1;
प्रद्युम्न तोमर वि.वि.अनुज पाल 6-0, 6-1;
मिहीर कांतवाला वि.वि.नमन चौधरी 6-1, 6-1;
शान वरळीकर वि.वि.पर्व पटेल 6-7(8), 6-4, 6-2;
सौमिल चोपडे वि.वि.आराध्य क्षितिज 6-7(6), 6-1, 6-0;
श्रीनिकेथ कन्नन वि.वि.विशाल वासुदेव 6-3, 3-6, 7-6(5);
15 दहशदवादी बोटीतून भारतात ?
तिरुवनंतपुरम- गुप्तहेर खात्याने श्रीलंका आणि भारतच्या मध्ये असलेल्या समुद्रात आयसिसचे दहशदवादी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दहशदवादी बोटीतून भारतात आल्याची शक्यता वात्विली जाते आहे.. ते समुद्राच्या मार्गाने श्रीलंकेतून लक्षद्वीपकडे येत असावेत. या अलर्टनंतर रविवारी कोस्टगार्डनी प्रत्येक संशयित बोटीवर लक्ष ठेवण्यासाठी शीप आणि सर्विलांस एअरक्राफ्ट तैणात केले आहेत. श्रीलंकेला लागेल्या समुद्राच्या सीमेवरही लक्ष दिले जात आहे.
केरळ पोलिसांनी किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यामध्ये हायअलर्ट जारी केला आहे. सुत्रांकडून कळाले की, अलर्ट जारी केल्यामुळे तपास करणे हे सामान्य प्रक्रिया आहे, पण यावेळी दहशदवाद्यांची संख्यादेखील सांगण्यात आली आहे. तर, किनारपट्टीच्या सुरक्षा विभागानने सांगितल्याप्रमाणे श्रीलंका अटॅक आणि 23 मे रोजी दहशदवादी असल्याचे अलर्ट आल्यानंतर सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे.
श्रीलंका अटॅकपूर्वी दहशदवादी केरळमध्ये थांबले होते
आयसिसच्या दहशदवाद्यांनी ईस्टरच्या दिवशी (21 एप्रिल) श्रीलंकेत आठ सीरिअल ब्लास्ट घडवले होते. यात 250 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये हाय अलर्ट करण्यात आला आहे. एनआयएच्या तपासात समोर आले की, या ब्लास्टची प्लॅनिंग करण्यासाठी दहशदवादी काही दिवस केरळमध्ये थांबले होते.
((Representative image by ANI)
दाभोळकर हत्या प्रकरण : पुनाळेकर आणि भावेला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पुणे – नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती.
दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती. उद्या या दोघांना सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोळकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.
सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलळकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला होता. यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यासाठी बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोळकर यांचेवर गोळ्या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता.
पीवायसी संघाचे डेक्कन जिमखाना संघापुढे 281धावांचे आव्हान – पीवायसीच्या दिव्यांग हिंगणेकरची शतकी खेळी
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मां
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 40षटकात 8बाद 281धावा केल्या. पण पीवायसीचे 8 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 241(वजा 40धावा)झाली. यात दिव्यांग हिंगणेकरने अफलातून फलंदाजी करत 119 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 111 धावांची खेळी केली. सलामीचा फलंदाज अभिषेक परमार 33 धावांवर बाद झाल्यानंतर दिव्यांग हिंगणेकर(111धावा) याने मंदार भंडारी(45धावा) च्या साथीत चौथ्या गडयासाठी 150 चेंडूत 114 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अमेय भावे 17, आदित्य लोंढे 15, करण जाधव 13, योगेश चव्हाण 10 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत पीवायसी संघाला 241धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कनकडून धीरज फतंगरेने 77 धावात 2 गडी, श्लोक धर्माधिकारीने 50धावात 2 गडी, तर मुकेश चौधरी(42-1), प्रखर अगरवाल(55-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आजदिवस अखेर 21षटकात 3बाद 130धावा केल्या. यात सलामीचे फलंदाज अभिषेक ताटेने 39 चेंडूत 38धावा व यश बोरामनीने 35 चेंडूत 27 धावा केल्या. अभिषेक व यश यांनी पहिल्या गडयासाठी 68 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून योगेश चव्हाण(12-1), रोहन दामले(12-1), साहिल छुरी(17-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. डेक्कनचे स्वप्निल फुलपगारे नाबाद 20 धावा व, धीरज फतंगरे नाबाद 18 धावांवर खेळत आहे. डेक्कन जिमखाना संघाचा अजून 19षटकांचा खेळ अजून बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना: 40षटकात 8बाद 241धावा(281-40धावा)(दिव्यांग हिंगणेकर नाबाद 111(119,9×4,4×6), मंदार भंडारी 45(74,4×4,1×6), अभिषेक परमार 33(39), अमेय भावे 17(35), आदित्य लोंढे 15(16), करण जाधव 13, योगेश चव्हाण 10, धीरज फतंगरे 8-77-2, श्लोक धर्माधिकारी 8-50-2, मुकेश चौधरी 8-42-1, प्रखर अगरवाल 7-55-1) वि.डेक्कन जिमखाना: 21षटकात 3बाद 130धावा(अभिषेक ताटे 38(39,5×4,1×6), यश बोरामनी 27(35,6×4), स्वप्निल फुलपगारे नाबाद 20(36), धीरज फतंगरे नाबाद 18(19), योगेश चव्हाण 2-12-1, रोहन दामले 4-12-1, साहिल छुरी 3-17-1);
शाहू महाराज, इंदिरा गांधींचे कार्य प्रेरणादायी-वीरेंद्र किराड
पुणे : “छत्रपती राजर्षी शाहू महाराज, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. दलित, वंचित घटकांना न्याय आणि सन्मान त्यांनी दिला. गांधींच्या नावाने भारताची जगभरात ओळख आहे. मात्र, अलीकडे गांधी कुटुंबाची ओळख पुसण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी विचारांचा अनादर करण्याचाही प्रयत्न होत आहे. अशावेळी आपला इतिहास जपण्याची जबाबदारी आपली असून, शाहू महाराज, इंदिराजी यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे महत्वाचे आहे,” असे मत अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी व्यक्त केले.
सिंहगड केसरी प्रतिष्ठानच्या वतीने ‘प्रियदर्शनी इंदिरा गांधी’ व ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपनिबंधक उत्तम जाधव, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, विठ्ठल वरुडे पाटील, ऍड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बारामती ऋतुराज काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “शाहू महाराजांनी राज्य कारभार मराठीत करण्यासाठी पुढाकार घेतला. दरबारातील नोकऱ्यांत आरक्षण लागू केले. राधानगरी धरणाची उभारणी केली. दलितांना आडनाव दिले. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडविणारे आहेत. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. इंदिराजी हे कणखर नेतृत्वाचे आदर्श उदाहरण आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, खासगी सावकारीवर निर्बंध घालण्याचे निर्णय त्यांनी घेतले. बांगलादेश युद्धात शरणागतीच्या वेळी त्यांनी विजयाचे श्रेय घेतले नाही. आजचे सत्ताधारी मात्र कथित ‘सर्जिकल स्ट्राईक’चे श्रेय घेण्यासाठी धावाधाव करतात. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे.”
उत्तम जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नव्या पिढीने इतिहास समजून घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ही एक सामाजिक चळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऍड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.
रसिकांनी अनुभवला सुरेल गायनाविष्कार आणि रंगतदार नृत्याविष्कार
पुणे-गायन वादन नृत्य यांना एकत्रित पणे संगीत अस म्हणले जाते .संगीतात नृत्याला अतिशय महत्व आहे .’नुपूर नाद ’ फेस्टीवल २०१९ नुकताच दिमाखात पार पडला.भैरवी शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आणि नुपूर नाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला .
साउथच्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री रुक्मिणी विजयकुमार यांचे प्रथम सादरीकरण झाले या मध्ये त्यांनी प्रथम शंकराचे सुंदर वारणा करणारे अर्धनारी स्तोत्र सादर केले . त्यानंदर अतिशय मोहक कृष्णाला अर्जव करणारी गोपी असा गोपी कृष्ण संवाद वरनं मधून पेश केला तो लालगुडी जयराम यांची रचना होती . त्याला जोडून रामायणातील जटायुची कथा अतिशय उत्तम प्रकारे सादर केली. त्या मध्ये रामचंद्रम या रचने मध्ये रामाचे वर्णन आले आहे .त्यात अतिशय मार्मिक अभिनय त्यांनी केलेला आहे .रामाप्रती सीता समर्पण त्यातुन दर्शवलेले आढळले त्यानंतर शेवटी बालमुरली कृष्णन यांची तिल्लाना हि आदितालातील रचना आपल्या नृत्याभिनायाने सादर करून सर्वांना जागीच खिळवून ठेवले .
सत्र दोन मध्ये पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले त्यांनी प्रथम राग गोरख कल्याण मध्ये बडाख्याल आणि छोटा ख्याल सादर केले त्यानंतर राग जोग मध्ये बडा ख्याल आणि छोटा ख्याल सादर करून रसिकांना जागीच खिळवून ठेवले .आणि पंडित संजीव अभ्यंकर यांना हार्मोनियम साथ अभिनय रवंदे तबला अजिंक्य जोशी सहगायन विलीना पात्र , धनंजय म्हसकर अशी लाभली होती
या मैफलीला इंदिरा सरनोबत ,सुदिन्द्र सरनोबत ,बासरीवादक पंडित केशवराव गिंडे यांची विशेष उपस्थिती होती .डॉ स्वाती दैठणकर आणि संतूरवादक पंडित धनंजय दैठणकर यांच्या संथेचे हे फेस्टिवल खूप रंगदार ठरले .
भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर व संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नूपुर नाद महोत्सवात यापूर्वी पं. शिवकुमार शर्मा, मालविका सरूक्काई, पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास कशाळकर, राहुल शर्मा, जयतीर्थ मेवुंडी, प्रवीण गोडखिंडी, अलरमेल वल्ली,व्यंकटेश कुमार सारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला रसिकांच्या भरघोस प्रतिसादात सादर केली आहे.
राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित
वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषित
५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कारांचे वितरण
मुंबई, : राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिध्द अभिनेता श्री. भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक श्री. वामन भोसले आणि सुप्रसिध्द अभिनेता श्री. परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार ५ लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्कार रु.३. लक्ष रुपयाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मान्यवरांची सन २०१९ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.
सुषमा शिरोमणी यांनी सन १९८५ साली बालकलाकार म्हणून “सोने की चिडीया”, “लाजवंती” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सन १९६९ साली “सतीचे वाण” या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच “दाम करी काम” या चित्रपटात मुख्य नायिका साकारली. अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार, निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध भागात आपल्या कर्तृत्वाचा विलक्षण ठसा त्यांनी उमटवला आहे. १९७७ मध्ये “भिंगरी” या चित्रपटाची निर्मिती केली.
भरत जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९८५ मध्ये शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर साबळे यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा” मधून केली. भरत जाधव यांनी “सही रे सही”, “श्रीमंत दामोदर पंत”, “ऑल द बेस्ट” आणि “आमच्यासारखे आम्हीच” या नाटकांतून तसेच “गलगले निघाले”, “साडे माडे तीन”, “मुंबईचा डबेवाला”, “पछाडलेला”, “जत्रा”, “खबरदार” या सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. याचबरोबर सन १९९९ मध्ये “वास्तव -द रियालिटी” या हिंदी चित्रपटात भूमिका केली आहे. भरत जाधव यांचे “सही रे सही” या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती. याचप्रमाणे “सही रे सही” या नाटकाचे “अमे लई गया, तमे रही गया” या नावाने गुजराथीत भाषांतर झाले या गुजराथी नाटकांत शर्मन जोशी यांनी काम केले होते व त्या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. याच नाटकाचे हिंदीत ही भाषांतर झाले आणि त्यात जावेद जाफरी यानी काम केले.
वामन भोसले़ यांचे बालपण गोव्यातील पामबुरपा या छोटया गावात गेले व तेथे शिक्षण घेऊन सन १९५२ मध्ये ते मुंबईमध्ये आले. बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी.एन.पै यांच्याकडे आपण उमेदवारी सुरु केली. नवीन गोष्टी शिकण्याच्या स्वभावानुसार त्यांची ओळख गुरुदास शिराली यांच्याशी झाली. १९६९ मध्ये दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या “दो रास्ते” या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली व त्यांनी या चित्रपटाला उत्तम न्याय दिला. वामन भोसले यांना सन १९७८ साली “इन्कार” या चित्रपटासाठी आपणास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच “बिमल रॉय ट्रॉफी”, मामी चित्रपट महोत्सवामध्ये सन २००३ साली सन्मानित करण्यात आले.
परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथील आहे. ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले, तेथूनच त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. श्री रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे. हिंदी चित्रपटातून भूमिका साकारताना ते कधीच स्टारडमच्या आहारी गेले नाहीत. “हेरा फेरी”, “हंगामा”, “अंदाज अपना अपना”, “चाची ४२०”, “फिर हेरा फेरी” या चित्रपटातून त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारली आहे. २०१४ साली त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने यंदा ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे दि. २६ मे २०१९ रोजी सायं.६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष श्री जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संसदीय दलाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी-राष्ट्रपतींना दिले सत्तास्थापनेचे पत्र
दिल्ली -संसदीय दलाचे नेते नरेंद्र मोदी हे एनडीएच्या शिष्टमंडळासोबत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मोदींनी सत्तास्थापनेबाबतचे पत्र त्यांना दिले आहे.दरम्यान ३० मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत .
लोकसभा निवडणुकीच्या यशस्वी निकालानंतर एनडीएच्या घटकपक्षांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जदयूचे नेते नितीश कुमार आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. मोदींना संसदीय दलाचे नेते निवडण्यासाठी अमित शहांनी प्रस्ताव दाखल केला. त्यास राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी समर्थन दिले. या बैठकीला नवनिर्वाचित एनडीएच्या खासदारांसह वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनीही हजेरी लावली. बैठकीनंतर मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आज रात्री सत्ता स्थापनेचा दावाकरणारे पत्र दिले .
-
या निवडणुकीने देशाला जोडण्याचे काम केले…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत देशवासियांचे आभार मानले. “आचार्य विनोबा भावे म्हणायचे की निवडणुका विभाजनाचे काम करतात. दुरावे वाढतात, भिंती तयार होतात आणि लोकांमध्ये दरी निर्माण होतात. परंतु, 2019 च्या निवडणुकीने मने जोडण्याचे काम केले आहे. ही निवडणूक सामाजिक एकात्मतेचे आंदोलन बनली होती. समता आणि मता देखील. समभाव आणि मम भाव सुद्धा. भारताच्या लोकशाही जीवनात देशाच्या जनतेने एका नव्या युगाचा आरंभ केला आणि त्याचे आम्ही साक्षीदार बनलो.” मोदी पुढे म्हणाले, ”भाजप आणि एनडीएच्या सर्वच खासदारांनी सर्वसंमतीने माझी संसदेच्या नेतेपदी निवड केली. यासाठी मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. ही सेंट्रल हॉलमधील एक विशेष घटना आहे. आज आम्ही या ठिकाणी भारताच्या संकल्पाला एक नवी ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा आरंभ करणार आहोत.”मोदींना राष्ट्रपतींकडे सोपविला राजीनामा
केंद्रीय कॅबिनेटने शुक्रवारी 16 वी लोकसभा बरखास्त करण्याचा ठराव मंजूर केला. त्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. मोदींनी शुक्रवारीच आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला. त्यानंतर कोविंद यांनी मोदींना पुढील सरकार स्थापित करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर राष्ट्रपती भवनात प्रितीभोजचे आयोजन देखील करण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, संसदीय दलाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेचा दावा घेऊन शनिवारी रात्रीच राष्ट्रपतींची भेटघेतली .
राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष, राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला…
नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी सकाळी पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, समितीमधील नेत्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. कार्यकारिणीने पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींनाच दिले असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी बैठकीनंतर सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दिल्लीत काँग्रेसच्या कार्य़कारिणी समितीची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कमलनाथ हे बैठकीत अनुपस्थित होेते. यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली. मात्र, कार्यकारिणीने त्यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला.
कार्यकारिणीची बैठक तब्बल तीन तास सुरू होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी हे बैठकीतून बाहेर पडले. यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला, गुलाम नवी आझाद, ए के अँटनी यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली.
दरम्यान काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधींच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. राहुल गांधींनी चांगली कामगिरी केली हे काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सर्वांनी त्यांना सांगितले. कोणीही त्यांच्या नेतृत्वावर शंका घेतलेली नाही. सध्याच्या परिस्थिती जर कोणी काँग्रेसचे नेतृत्व करु शकते तर ते राहुल गांधी आहेत असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राहुल गांधींच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. राष्ट्रीय स्तरावर कोणी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावू शकतात तर ते राहुल गांधी आहेत असे गुलाम नबी आझाद म्हणाले.
नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावेला अटक
मुंबई-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. अॅड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.दरम्यान हिंदु विधीज्ञ परिषदचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले संजीव पुनाळेकर आणि आरटीआय कार्यकर्ते विक्रम भावे या दोघांच्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे.
संजीव पुनाळेकर मुंबई उच्च न्यायालयात वकील असून हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.
अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.
पाच वर्ष या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. मागच्यावर्षी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.
पुरोगामींसमोर सीबीआय झुकलं – सनातन संस्था
हिंदु विधीज्ञ परिषदचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव पुनाळेकर आणि आरटीआय कार्यकर्ते विक्रम भावे या दोघांच्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना संजीव पुनाळकेर आणि विक्रम भावे या दोघांना अटक होण्यामागे कारस्थान आहे. दोघेही निर्दोष असून त्यांचे निर्दोषत्व कोर्टात सिद्ध होईल असे सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनीसांगितले.पुरोगाम्यांच्या मागणीसमोर सीबीआय झुकले असा आरोप सनातनने केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामागचा खोटेपणा, असत्य संजीव पुनाळेकरांनी सिद्ध केले होते. त्यांना अटक होणे ही गंभीर बाब आहे.
कुठल्याही अपेक्षेशिवाय संजीव पुनाळेकर समाज, देश आणि धर्माची सेवा करतात. ते निर्दोष आहेत असे सनातनने म्हटले आहे. संजीव पुनाळकेर यांनी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचे वकिलपत्र घेतले होते. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत. शरद कळसकरच्या जबाबानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही उद्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शिवसेनेला मलबार हिल मधून मिळाला विजयाचा सर्वात मोठा आधार
सावंत यांची १ लाखाच्या मताधिक्याने झालेल्या विजयात मलबार हिलच्या ५९ हजार मतांचे योगदान
मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विजयात मलबार हिलचे मुख्य भूमिका राहिली आहे. दक्षिण मुंबईच्या एकूण सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये १ लाख ६७ मताधिक्क्याने विजय झालेल्या सावंत यांना भाजप उपप्रदेश अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून ५८ हजार ५६७ मतांची सर्वात मोठी लीड मिळाली.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मलबार हिल क्षेत्रातून मिळाल्या पराजयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी अनेक राजकीय पंडितांनी मिलिंद देवरा यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले होते. मारवाडी आणि गुजराती बहुतांश मतदार असलेल्या क्षेत्रांमध्ये देवरा यांच्या परिवाराचा मोठा जनाधार होता. मात्र यावेळी हा जनाधार पूर्णपणे सावंत यांच्या बाजूने उभे करण्यास आमदार लोढा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
शिवसेना उमेदवार अरविंद सावंत दक्षिण मुंबई मधून १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. सावंत यांच्या या विजयात मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगल प्रभात लोढा यांचं सर्वात मोठे योगदान राहील. लोकसभा निवडणुकीआधीच मलबार हिल विधानसभा क्षेत्रात लोढा यांनी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारांची मोठं बांधणी सुरू केली होती. मतदानाच्या दिवशीही त्यांनी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील ५६ टक्के मतदान सुनिश्चित करून शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला. भाजप उपप्रदेश अध्यक्ष लोढा यांनी शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मलबार हिल क्षेत्रातील जनतेचे आभार व्यक्त केल्या आहेत.
व्यापारी संघटित झाल्यास सरकारला व्यापाऱ्यांची दखल घ्यावीच लागेल ; बी सी भारतीय यांचे प्रतिपादन
पुणे, : देशातील व्यापाऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. व्यापाराचे आरोग्य बिघडले असून याप्रश्नी देशभरातील व्यापारी संघटीत झाला तर, सरकारला व्यापाऱ्यांची दखल घ्यावीच लागेल, असे प्रतिपादन लक्ष कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रे़डचे (कैट) अध्यक्ष बी सी भारतीय यांनी आज येथे केले.
व्यापारी दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास गुन्हे अन्वेषण विभागाचे आयुक्त अशोक मोराळे, आमदार माधुरी मिसळ, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी, बिझनेस स्टॅण्डर्डचे उपाध्यक्ष विजय कडू, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, नगरसेवक प्रवीण चोरबोले, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, धैर्यशील पाटील, बाळासाहेब धोका, सूर्य इलेक्ट्रॉनिकचे रमेश चौधरी, हरीश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. व्यापारी दिनानिमित्त चितळे उद्योग समूह, खत्री पॉट आइस्क्रीम, गोल्डन बेकरी, केदार असोसिएट्स, मॅजिक स्ट्रक्चर -मोरे, शिवशक्ती ग्रुप, साक्षी ग्रुप यांना उत्कृष्ठ व्यापारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करीत व्यापार करावा आणि येणाऱ्या स्पर्धेच्या काळात संघटीत व्हावे. संघटीत झालो तरच, व्यापार वाचेल, असेही भारतीय म्हणाले.
पुणे जिल्ह्यात रिटेल व्यापाऱ्यांना संघटीत करण्याचे काम आम्ही करीत असून फक्त प्रश्न मांडण्या पुरते नाही तर, व्यापाऱ्यांना सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी संघटना काम करीत असल्याचे सचिन निवंगुणे यांनी सांगितले. यावेळी उत्कृष्ठ क्रियाशील संघटना म्हणून बिबवेवाडी रिटेल व्यापारी संघटनेचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सांभाळत संघटनेसाठी काम करणाऱ्या ८० व्यापाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लकी ड्रॉमधील सात विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. सारंग राडकर यांनी आभार मानले.
आ.मेधा कुलकर्णी यांनी बापटांना दिले सर्वाधिक मताधिक्य
पुणे – आठ आमदार काय कामाचे …असा ओरडा साडेचार वर्षे होत असताना, पुण्यातील हडपसर वगळता सात ही विधानसभा मतदार संघानी भाजपला मताधिक्य देण्याचे काम योग्य रित्या या लोकसभा निवडणुकीत बाजवल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक मताधिक्य कोथरुड मधून मिळाल्याने येथून विधानसभेला भाजपच्या उमेदवारी साठी अनेकांनी आता प्रयत्न सुरु केले आहेत.
लोकसभा मतदार संघाअंतर्गत येत असलेल्या शहरातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी कोथरूड मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. कोथरूडमधून बापट यांनी तब्बल १ लाख ६ हजार १९६ मतांची आघाडी घेतली. त्यापाठोपाठ पर्वती मतदार संघातून बापट यांना ६६ हजार ३३२, वडगावशेरी मतदार संघातून ५६ हजार ८२१, तर कसब्यातून ५२ हजार ३९१ एवढे मताधिक्य मिळाले.
कोथरूड
विद्यमान आमदार-
प्रा. मेधा कुलकर्णी, भाजप
बापट यांना १ लाख ६ हजार १९६ मतांची आघाडी
कोथरूड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचे अनिल शिरोळे यांना मोठे मतदान झाले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली. त्यामुळेच बापट यांच्या प्रचाराची सुरुवात या मतदार संघातून झाली. त्याचा फायदा बापट यांना लोकसभा निवडणुकीत झाला. शिवसेनेची ताकद आणि त्या पक्षाबरोबर झालेल्या युतीचा फायदा होऊन बापट यांना मताधिक्य देण्यात कोथरूड मतदार संघ अव्वल ठरला. या मतदार संघातून बापट यांना एकूण १ लाख ४८ हजार ५७० मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मते मिळाली.
पर्वती
विद्यमान आमदार-
माधुरी मिसाळ, भाजप
बापट यांना ६६ हजार ३३२ मतांची आघाडी
पर्वती विधानसभा मतदार संघातून बापट यांना १ लाख १६ हजार ८९९ मते मिळाली असून मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मतदान झाले आहे. या मतदार संघात शतप्रतिशत भाजपचे नगरसेवक आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरदार प्रचारामुळे बापट यांचे या मतदार संघातील मताधिक्य थोडे घटल्याचे दिसून आले. या मतदार संघातील बापट यांचे मताधिक्य थोडे घटले असले तरी कोथरूड नंतर मताधिक्य देणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संघ ठरला आहे. विशेष म्हणजे जोशी यांना सहा मतदार संघांपैकी सर्वाधिक मतदान या मतदार संघातून झाले आहे.
वडगावशेरी
विद्यमान आमदार-
जगदीश मुळीक, भाजप
बापट यांना ५६ हजार ८२१ मतांची आघाडी
वडगावशेरी मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक आमदार आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची येथे मोठी ताकद आहे. यापूर्वी या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. तसेच या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्याही मोठी होती. त्यामुळे या मतदार संघातून मोहन जोशी यांना मोठे मतदान होईल, असा दावा केला जाता होता. प्रचारातही जोशी यांचा या मतदार संघात सर्वाधिक भर राहिला होता. मात्र या मतदार संघातून बापट यांना जोशी यांच्यापेक्षा जास्त मतदान झाले. या मतदार संघातून बापट यांनी १ लाख १७ हजार ६६४ मते मिळविली असून जोशी यांना ६० हजार ८४३ मते मिळाली.
शिवाजीनगर
विद्यमान आमदार-
विजय काळे, भाजप
बापट यांना २९ हजार ५३२ मतांची आघाडी
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना तुलनेने बऱ्यापैकी मतदान झाले. बापट यांना या मतदार संघातून फारसे मताधिक्य मिळणार नाही, मोहन जोशी या मतदार संघात आघाडीवर राहतील, असा दावा केला जात होता. बापट यांना ७७ हजार ९८२ मते मिळाली, तर जोशी यांना ४८ हजार ४५० मते मिळाली. या मतदार संघातील बापट यांची आघाडी २९ हजार ५३२ एवढी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या शिवाजीनगर मतदार संघात बापट यांनी तुलनेने चांगली मते घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट
विद्यमान आमदार-
दिलीप कांबळे, भाजप
बापट यांना १२ हजार ७३३ मतांची आघाडी
सन २०१४ पूर्वीपर्यंत या मतदार संघात काँग्रेसची ताकद होती. पुणे कॅन्टोन्मेंट मध्येही काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्याच जास्त होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे हे याच मतदार संघातून यापूर्वी निवडून आले होते. या मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा दावा मोहन जोशी यांनी केला होता. पुणे कॅन्टोन्मेंटमधून बापट यांना ६७ हजार १७७ मते मिळाली, तर जोशी यांना ५५ हजार ४४४ मते मिळाली. या मतदार संघातून बापट यांना १२ हजार ७३३ अशी मतांची आघाडी मिळाली आहे.
कसबा पेठ
विद्यमान आमदार-
गिरीश बापट, भाजप
बापट यांना ५२ हजार ३९१ मतांची आघाडी
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले बापट हे याच मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत पाच वेळा विजयी झाले आहेत. बहुतांश विधानसभा निवडणुकीत बापट यांना कसब्यातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख आहे. कसब्यातून बापट यांना १ लाख ३ हजार ५८३ मते मिळाली, तर मोहन जोशी यांना ५१ हजार १९२ मते मिळाली. त्यामुळे या मतदार संघातून बापट यांना ५२ हजार ३९१ एवढे मताधिक्य मिळाले








