पुणे ता. २८ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालया
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचालक ऍड नितीन आपटे यांचे ‘सावरकरांचे कार्य कर्त्तृृत्व’ या विषयावर व्या‘यान झाले. शाहीर हेमंत मावळे व सहकार्यांनी पोवाडा सादर केला.
सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाही डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक प्रमोद रावत, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. मोहन आगाशे, पंडित वसंतराव गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. स्वाती जोगळेकर आणि प्रा. आनंद काटिकर यांनी संयोजन केले.
सावरकर यांचे सन १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली क‘. १७ मध्ये वास्तव्य होते. सावरकरांचा पलंग, खुर्ची, वकीली करीत असताना परिधान केलेले परिधान केलेले दोन गाऊन या खोलीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्ररुप करण्यात आले आहेत.
फर्ग्युसनमध्ये सावरकरांना आदरांजली
बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी..
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. बारावीचा राज्याचा एकूण निकाल ८५.८८ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल २.५३ टक्क्याने घटला आहे. यंदाही निकालात मुलीच सरस ठरल्या असून उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे.
मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.२५ तर मुलांचा निकाल ८२.४० टक्के आहे. विज्ञान शाखेचा ९२.६०, कला शाखा ७६.४५, वाणिज्य ८८.२८ आणि व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ असा निकाल लागला आहे. राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. त्यानंतर अनुक्रमे पुणे विभाग ८७.८८, नागपूर ८२.५१, औरंगाबाद ८७.२९, मुंबई ८३.८५, कोल्हापूर ८७.१२ , अमरावती ८७.५५, नाशिक ८४.७७, लातूर८६.०८, कोकण ९३.२३ असा निकाल लागला आहे.


विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा सर्वच शाखेचा निकाल यंदा घसरल्याचे राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितले. राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.६० टक्के तर वाणिज्य शाखेचा ८८.२८ टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के, कला शाखाचे ७८.९३ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८९.५० टक्के निकाल लागला होता. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्यावर्षी ८२.१८ टक्के निकाल लागला होता तर यंदा ७८.९३ टक्के निकाल लागला आहे.
संपूर्ण राज्यात तब्बल ४,४७० विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विभागानिहाय निकाल पाहिल्यास यंदा पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के लागला आहे.
mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
येथे पाहा निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
and mahahsscboard.maharashtra.gov.in.
विभागनिहाय असा आहे निकाल
– औरंगाबाद 87.29%
– नाशिक 84.77%
– लातूर 86.08%
– अमरावती 87.55%
– मुंबई 83.85%
– पुणे 87.88%
– नागपूर 82.51%
– कोल्हापूर 87.1%
– कोकण 93.23%
पुण्यामध्ये पहिल्या पॉप-अप ‘कनेक्शन्स’ चे आयोजन
आघाडीचे आर्किटेक्ट्स कल्पक शाह, निशिता कामदार, रिचा बहल, सारा शाम व माधव रमण यांनी घराच्या सजावटीपासून तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर माहितीपूर्ण विचार मांडले
पुणे: नाविन्यपूर्ण पद्धतीने सजवण्यात येणाऱ्या जागा व त्यामागील कल्पक व सर्जनशील व्यक्ती यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को‘ या विशेष एकदिवसीय कार्यक्रमात आघाडीचे आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स व घरगुती सजावटीत तज्ञ असे अनेक नामवंत आवर्जून उपस्थित होते. पुण्यातील केशवनगर येथील गोदरेज रेजुवे येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डिझाईन डेक्को हा कोणत्याही ब्रँडला पुरस्कृत न करणारा गोदरेज समूहाने स्थापन केलेला मंच आहे. इंटिरियर डिझाईन व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपले नेटवर्क वाढवावे, मित्रमंडळी, ब्रँड्स व ग्राहक यांच्यासोबत संबंध प्रस्थापित व विकसित करावेत हा यामागचा उद्देश आहे. फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर यासारख्या डिजिटल व सोशल मीडियावर डिझाईन डेक्को सक्रिय आहे. कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को या विशेष कार्यक्रमातून या मंचाचे प्रत्यक्ष अस्तित्व दिसून येते. सध्याचे व संभाव्य घरमालक, सजावटीची आवड असणाऱ्या व्यक्तींपासून ते आर्किटेक्चर व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंतांपर्यंत विविध व्यक्तींचा समावेश असलेले कनेक्शन्स बाय डेक्को संवाद व विचारांच्या देवाणघेवाणीतून सर्व संबंधितांसाठी आगळावेगळा अनुभव निर्माण करते.
तंत्रज्ञानामुळे भविष्यातील घरांवर कशाप्रकारे प्रभाव पडत आहे याच्याशी निगडित एक्सपीरियन्स झोन्स, मास्टरक्लासेस व परिसंवादांचा कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को मध्ये समावेश होता. सहभागी झालेल्या विविध ब्रॅंड्ससोबत संलग्न उपक्रम व सहयोग संधींमार्फत आर्किटेक्ट्स व इंटिरियर डिझायनर्सना यामध्ये सामावून घेण्यात आले होते. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स व गोदरेज लॉक्स यांच्या सिक्युरिटी झोनमध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती. गोदरेज प्रॉपर्टीजने इझी बिगिनिंग्स हा आपला उपक्रम याठिकाणी सादर केला, यामध्ये संभाव्य घरमालक व ऍक्सिस बँक व होम कॅपिटल यांच्यासारखे आर्थिक सहयोगी यांना एकत्र आणून स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करण्याचे स्वप्न अधिक सोपे, सहज करण्याचा हा उपक्रम आहे. युअँडअस झोनमध्ये घरमालकांना इंटिरियर डिझायनर्सकडून मोफत सल्ला मिळवण्याची संधी मिळाली.
स्टुडिओ कोर्सचे आर्किटेक्ट श्री. कल्पक शाह यांनी घरामध्ये स्टाईल व सौंदर्य यांचा अनोखा मिलाप कसा साधता येईल याच्या साध्यासोप्या टिप्स यावेळी सांगितल्या. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले घर स्मार्ट आणि सुरक्षित कसे बनवता येईल याबद्दलची उपयुक्त माहिती यानिमित्ताने घरमालकांना मिळाली.
या विशेष कार्यक्रमात अनेक नामवंतांनी आपले विचार मांडले. सारा शाम (एस्साजीस ऍटेलिर), रिचा बहल (रिचा बहल डिझाईन स्टुडिओ) व निशिता कामदार (स्टुडिओ निशिता कामदार) यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीवरील रंगांचा प्रवास उलगडून सांगितला. ख्यातनाम आर्किटेक्ट व अर्बानिस्ट माधव रमण (अनाग्राम आर्किटेक्टस) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा डिझाईन क्षेत्रावरील प्रभाव या विषयावर विचारप्रवृत्त करणारे व्याख्यान दिले. चित्रकार व शिल्पकार केतकी पिंपळखरे आणि मायक्रो स्कल्प्टर यश सोनी (पेन्सिल कार्विंग्स) यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून कला हे त्यांच्यासाठी विचार व्यक्त करण्याचे माध्यम कशाप्रकारे आहे ते समजावून सांगितले.
या उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट व हेड कॉर्पोरेट ब्रँड अँड कम्युनिकेशन्स श्री. सुजित पाटील यांनी सांगितले की, “सहभाग व समन्वयाला प्रोत्साहन देणारे मंच निर्माण करण्यात गोदरेज समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कनेक्शन्स बाय डिझाईन डेक्को या आमच्या पहिल्या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद नक्कीच आनंददायी व उत्साहवर्धक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही डिझाईन डेक्कोची सुरुवात केली. आर्किटेक्टस, इंटिरियर डिझायनर्स व सहयोगी क्षेत्रांमधून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या पॉप-अप्सच्या सीरिजमधून आम्ही डिझाईनमध्ये विशेष आवड असणारे व या क्षेत्रातील व्यावसायिक यांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक मंच उपलब्ध करवून देत आहोत. या वैचारिक संमेलनामुळे या उद्योगक्षेत्रात नवनवीन संकल्पना आणल्या जाव्यात असा आमचा उद्देश आहे.”
‘कनेक्शन्स बाय डेक्को‘ला जीपरॉक इंडिया, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, एचआर जॉन्सन, गोदरेज लॉक्स, युअँडअस, जोश टॉक्स व गोदरेज प्रॉपर्टीज यांचे सहकार्य मिळत आहे.
हेल्मेटसक्ती केली नसून हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी -शिवसेना नेते, परिवहन मंत्री रावते
मुंबई, दि. 27 : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात या कालावधीत 1 लाख 41 हजार 730 मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन आयुक्तालयामार्फत देण्यात आली. राज्यात या प्रकरणांमध्ये 8 कोटी 32 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. यासंदर्भात सूचना देताना शिवसेनेतील नेते असलेले परिवहनमंत्री श्री. रावते म्हणाले की, विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. शासनाने कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती केली नसून हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेटचा वापर करणे हे वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
मंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. बैठकीस परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते. बैठकीस परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह,अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगावकर,मुंबईचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) शहाजी उमाप, महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील,सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, अतिरिक्त परिवहन आयुक्त सतिश सहस्त्रबुद्धे,सहआयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, शिक्षण आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दर 5 वर्षांनी वाहनचालकांना 8 दिवसांचे वाहतुकीचे अद्ययावत प्रशिक्षण देणे तसेच वाहतुकीविषयी विविध प्रश्नांवर संशोधन करणे आदींसाठी राज्य शासनाची स्वतंत्र‘वाहन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
टायर तपासणीची यंत्रणा सुरु करा
मुंबई ते नागपूर दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी रस्ते बांधकामाच्या वेळीच होणे गरजेचे आहे. या महामार्गासाठी जी अधिकची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्यास अनुसरुन आपल्या वाहनांचे आणि त्यांच्या टायर्सचे डिझाईन आहे का याचा विचार व्हावा, अशी सूचना यावेळी परिवहनमंत्री श्री. रावते यांनी केली. यासाठी वाहन उत्पादक आणि टायर उत्पादक कंपन्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करावी. राज्यात बरेच अपघात हे टायर फुटून किंवा ते पंक्चर झाल्याने होतात. त्यामुळे टायर तपासणीची काही यंत्रणा आपल्याकडे सुरु करता येईल का याचाही अभ्यास करण्यात यावा,अशी सूचनाही त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली. निकामी किंवा गुळगुळीत टायरसह प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी,असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कंत्राटदारांवर
अवजड (ओव्हरलोड) वाहनांप्रमाणे ग्रामीण भागात मोजमापबाह्य (ओ.डी.सी.) वाहनांचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात अनेक ट्रक, ट्रॅक्टर हे ओव्हर डायमेंशनल प्रवास करताना आढळतात. यामुळेही अपघात होत असून या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही अधिक असून याप्रकरणी संबंधीत रस्त्याच्या कंत्राटदारावर किंवा टोलवसुली करणाऱ्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी दिल्या. प्रवासी वाहनांमधून टपावरुन किंवा डिक्कीमधून बेकायदेशीररित्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,असेही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
बेदरकार मोटारसायकलस्वारांवर कडक कारवाई करा
मुंबई शहरात बेदरकार मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मोटारसायकलींच्या शर्यती लावणे, सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात मोटारसायकल चालविणे आदी प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. दंड वाढीसह मोटारसायकल जप्तीची कारवाई करता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देश यावेळी मंत्री श्री. रावते यांनी दिले.
मागील वर्षी अंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या गंभीर अपघाताबाबतही यावेळी चर्चा झाली. राज्यात राज्य महामार्गाचे साधारण 1 हजार 228 किमी लांबीचे घाटरस्ते असून त्यावरील धोक्याची वळणे, संभाव्य अपघातांची ठिकाणे आदींचे परिक्षण करुन अपघात कमी करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
वाहनचालकांच्या कमाल वयोमर्यादेवर चर्चा
वाहनचालकांसाठी वयाची कमाल मर्यादा निश्चित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. काही विशिष्ट वयोमर्यादेनंतर दृष्टी क्षीण होणे यासह प्रकृतीविषयक विविध समस्या वाहनचालकांमध्ये निर्माण होतात. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी काही विशिष्ट उच्च वयोमर्यादा निश्चित करण्यात यावी का, याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबाबत अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोपोडीत खास महिलांसाठी ‘रोजा इफ्तार’
मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 27,28 जुलै रोजी नांदेडमध्ये होणार
मुंबईः मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे व्दैवार्षिक अधिवेशन यंदा 27 आणि 28 जुलै रोजी नांदेड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज मुंबई येथे केली. दोन दिवस चालणार्या या अधिवेशनास देशभरातून दोन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांसाठी वैचारिक मेजवाणी असते.दोन दिवस चालणार्या या अधिवेशनात मान्यवरांची विविध विषयांवरची भाषणं,परिसंवाद,मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले असतात.त्यामुळं अधिवेशन केव्हा आणि कोठे होणार याची उत्सुकता देशभरातील मराठी पत्रकारांना कायम लागलेली असते.यावर्षीचे व्दैवार्षिक अधिवेशन ऐतिहासिक नगरी नांदेड येथे घेण्याचे नक्की झाले आहे.1998 मध्ये यापुर्वी परिषदेचे अधिवेशन नांदेडला झाले होते.त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी पुन्हा नांदेडला अधिवेशन होत आहे.अधिवेशन आम्हाला द्यावे अशी विनंती करणारे शिडीॅ,लातूर आणि नांदेड येथील पत्रकार संघाची निमंत्रणं आली होती.त्यापैकी नांदेडचीं विनंती परिषदेच्या 20 मे रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापुर्वी अलिकडच्या काळात परिषदेचे अधिवेशन 2011 मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे,2013 मध्ये औरंगाबाद येथे,2015 मध्ये पिंपरी चिंचवड येथे तर 2017 मध्ये शेगावला झाले होते.यावर्षीचे अधिवेशन नांदेडला होत आहे.रस्त,रेल्वे आणि विमानमार्गे नांदेड देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले असल्याने नांदेडला मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगानं लवकरच नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांनी दिली.
देशभरातील जास्तीत जास्त पत्रकारांनी अधिवेशनास उपस्थित राहून नांदेडचे अधिवेशन अविस्मरणीय करावे अशी विनंती परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजयकुमार जोशी, प्रमोद माने, उपाध्यक्ष विजय दगडू, शिवराज काटकर तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे,परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर तसेच अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे..
शिवसेनेला चार मंत्रीपदासह उपसभापतीपद मिळणार ?
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट,दोन राज्यमंत्रीपदासह लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे सूत्रांकडून समजते.आज होणा-या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, मोदींच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यानी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. कीर्तिकर यांच्यासह , संजय राऊत, प्रतापराव जाधव, भावना गवळी, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत.
सुरतमधील मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादीकडून राजकारण
मुंबई-सुरत मध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण सुरत घटनेचा संबंध नगर विकास खात्याच्या परवानगीशी आहे. शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, हे पण माजी शिक्षणमंत्र्याला कळत नाही हे दुर्दैवी आहे, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
कोचिंग क्लासचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला, त्याला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, अनिल देशमुख स्वत: शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झोपा काढत होते का? आता त्यांना जाग आली. केवळ सुरतमध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मृताचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारण करु पाहतेय हे दुर्दैवी आहे, अशी टिकाही तावडे यांनी केली.
कोचिंग क्लासच्या मसुद्याबाबत तावडे यांनी स्पष्ट केले की, जो मसुदा तयार झाला त्यात सामान्य गृहीनी जी घरी शिकवणी घेते आणि जे गरीब विद्यार्थी शिकवण्या करुन आपले उच्च शिक्षण करतात ते भरडले गेले असते, म्हणून या मसुद्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात येत आहेत. क्लासवाल्यांकडून पैसे घेतले हे सिध्द करावे असे खुले आव्हानही श्री तावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला दिले.गरीब विद्यार्थी जो शिकवण्या करुन शिक्षण घेतो आणि सामान्य महिला शिकवण्या घेऊन आपल्या कुटूंबाला घराला हातभार लावतात, त्यांनाच उध्वस्त करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आहे का? असा थेट सवालही तावडे यांनी उपस्थित केला.
कोचिंग क्लासेसचे मालक आणि विनोद तावडे यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण-माजी मंत्री अनिल देशमुख
मुंबई-कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केला.
दरम्यान याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.सुरत येथे कोचिंग क्लासेस मध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ लहान मुलांचा मृत्यू झाला.त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात १ लाख १० हजाराच्यावर कोचिंग क्लासेस आहेत.त्यामध्ये मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत असा आरोपही देशमुख यांनी केला.
सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही असेही देशमुख म्हणाले. २०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. २०१८ ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत. विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही असेही देशमुख म्हणाले.पक्षाच्यावतीने कोचिंग क्लासेसवर कायदा करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे.मात्र सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे कोचिंग क्लासेसला मदत करत आहेत असेही देशमुख यांनी सांगितले.
2 लाख 20 हजाराची बाईक ..टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच..(व्हिडिओ)
पुणे – दुचाकी व तीन- चाकी वाहन उत्पादन क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लच तंत्रज्ञानासह टीव्हीएस अपाचे RR ३१० लाँच केल्याचे जाहीर केले. टीव्हीएस रेसिंगचा समृद्ध वारसा घेऊन अद्यावत करण्यात आलेली ही गाडी ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव उंचावणारी आहे. या गाडीचे गियर आता जास्त सफाईदारपणे बदलता येतात व त्यामुळे हातावर जास्त ताण येत नाही. शिवाय, गियर कमी करताना वेग जास्त असूनही विशेषतः तीव्र कोपऱ्यांवर गाडी स्थिर राहाते. नव्या गाडीचं स्टायलिंगही बदलण्यात आलं असून त्यात फँटम ब्लॅक हा नवा रंग आता ग्राहकांना खरेदी करता येईल. बाइकचा वळणदार आकार आणि अँग्युलर डिझाइन नव्या रंगाला सुसंगत ठरणारं आहे.
बारकाईने तयार करण्यात आलेले गाडीचे स्लिपर फंक्शन व्हील हॉप आणि चेन व्हिपदरम्यान झटपट गियर कमी करण्यास मदत करते. शिवाय त्याला असिस्ट फंक्शनची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे क्लच प्लेट घट्ट बंद होतात आणि क्लच लागण्याचा जोर वाढतो. या सगळ्यामुळे क्लचवरील ताण कमी होतो. नवी टीव्हीएस अपाचे RR ३१० RT स्लिपर क्लच हे खूप ताकदवान आणि उपयुक्त वैशिष्ट्य आहे. या क्लचमुळे शहरी रस्ते, द्रुतगती मार्ग आणि ट्रॅक रायडिंग सोपं होतं. सध्याच्या टीव्हीएस अपाचे RR ३१० ग्राहकांनाही नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल, कारण रेस ट्युन्ड स्लिपर क्लच टीव्हीएस रेसिंग अक्सेसरी म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे, जे त्यांच्या मोटारसायकलला रेट्रोफिट करता येईल. ही सुविधा देशभरातील निवडक टीव्हीएस अपाचे RR ३१० वितरकांकडे वाजवी किंमतीत मिळेल.
लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन म्हणाले, ‘टीव्हीएस अपाचे RR ३१० मध्ये रेस ट्युन्ड स्लिपर क्लच उपलब्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. मला खात्री आहे, की आमचे सध्याचे आणि नवे ग्राहक गाडीच्या या अद्यावत वैशिष्ट्यांची प्रशंसा करतील. ट्रॅकसाठी उत्तम मानली जाणारी ही सुपर- प्रीमियम मोटारसायकल आमच्या रेसिंग उत्पादनांचा वारसा घेऊन आलेली असून त्यातील बरीच वैशिष्ट्ये या इंडस्ट्रीत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. हाच अनुभव आमच्या सध्याच्या टीव्हीएस अपाचे RR ३१० ग्राहकांना देण्याची इच्छा असून ते ही रेसिंगच्या या नव्या पैलूचे कौतुक करतील. नव्या स्टायलिंगमुळे मोटारसायकलीचा रेसिंग स्टान्स आणखी उंचावला असून तो ही ग्राहकांना आकर्षित करणारा आहे.’
भारतीय क्रिकेट खेळाडू महेंद्र सिंग धोनी हे टीव्हीएस अपाचे RR ३१० – रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लचचे पहिले सन्माननीय मालक ठरले आहेत.
नव्या मोटारसायकलीबाबत उत्सुक असलेले महेंद्र सिंग धोनी म्हणाले, ‘मी गेल्या १२ वर्षांपासून टीव्हीएस मोटर कंपनीशी जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक वर्षागणिक कंपनीशी असलेले माझे नाते आणखी दृढ झाले आहे. एक बाइकप्रेमी या नात्याने मी टीव्हीएस अपाचे RR ३१० – रेस ट्युन्ड (RT) स्लिपर क्लच मिळाल्याबद्दल खूष आहे, कारण या गाडीमध्ये आकर्षक डिझाइन व दर्जेदार कामगिरीचा मेळ घालण्यात आला आहे. त्याचबरोबर एका भारतीय उत्पादकाची सुपर- प्रीमियम बाइक आपल्याकडे असल्याचा मला जास्त अभिमान वाटतो. ही नवी मोटरसायकल रस्त्यावर उतरवण्यासाठी मी उत्सुक आहे. कंपनीच्या टीमला भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.’
टीव्हीएस अपाचे RR ३१० ला रिव्हर्स इनक्लाइन्ड डीओएटसी (डबल ओव्हर हेड कॅम) लिक्विड कुल्ड इंजिन अतिरिक्त ऑइल कुलिंग तंत्रज्ञानासह बसवण्यात आले असून त्याला ६ स्पीड गियर बॉक्स, रेस इन्स्पायर्ड व्हर्टिकल स्पीडो- कम टेक्नोमीटर, बाय- एलईटी ट्विन प्रोजेक्टर हेड लॅम्प्स आणि मिशेलिन स्ट्रीट स्पोर्ट टायर्स यांची जोड देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही मोटारसायकल चालवण्याचा एकंदर अनुभव आणि विश्वासार्हता उंचावणारी अद्यावत वैशिष्ट्येही देण्यात आली आहे. गाडीची अद्यावत आवृत्ती रेसिंग रेड आणि फँटम ब्लॅक या दोन रंगांत उपलब्ध करण्यात येईल.
ही मोटरसायकल देशभरातील निवडक वितरकांकडे रू २,२०,००० या किंमतीत (एक्स शोरूम पुणे) उपलब्ध आहे.
पंढरपूर च्या विठ्ठल भवन मध्ये निशा फुले आणि अजिंक्य देवमारे यांचा पहिला सत्यशोधक विवाह सम्पन्न..
पंढरपूर -विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीत सामजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांनी सांगितल्या प्रमाणे सत्यशोधिका निशा फुले आणि सत्यशोधक अजिंक्य देवमारे यांचा पंढरपुरातील पहिला सत्यशोधक विवाह विठ्ठल भवन येथे 26 मे 2019 रोजी दु.12.30 वाजता पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रा तर्फे रघुनाथ ढोक ,सदस्य महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावला.निशा फुले ह्या उच्चशिक्षित असून झेप फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून काम करतात आणि महाराष्ट्रभर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर व्याख्याते म्हणून प्रबोधन करतात.त्यामुळे या सत्यशोधक विवाह प्रसंगी आमदार भारत भालके,युवा नेते प्रणव परिचारक ,नगरसेवक डी. राज सर्वगोड,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट समता परिषदेचे चंद्रशेखर जाधव,सय्याजी बनसोडे,सावता महाराज वंशज रमेश महाराज वसेकर,सावता जाधव,रमाकांत पाटील,संतोष राजगुरु,ट्रॅडिशन इंजिनअर विष्णू बनकर उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक विवाहाचे सुरुवातीला रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाहाबाबत मौलिक माहिती दिली.त्यानंतर नवदाम्पत्यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळ्यांना पुष्प हार अर्पण करण्यात आला.ह्या विवाहाची सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.महात्मा फुले रचित मंगलाष्टक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त सुदाम धाडगे,आकाश ढोक यांनी म्हंटले. फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराने कार्य करणारी तरूण पिढीतील कार्यकर्ते,विचारवंत मोठ्या संख्यने महाराष्ट्र भरातून उपस्थित होते
त्यामुळे या विवाहाचे कौतुक होऊन या नवदाम्पत्यांसोबत अनेकांनी सेल्फी फोटो काढले.
भाव अंतरीचे….(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)
‘‘भाभी, मैं एक महिना गाँव जाती, लेकीन बदली दे के जाती!’’ सत्या म्हणजेच माझ्या कामवाली बाईने हे सांगितल्यापासून मनात थोडी धास्तीच वाटत होती.
सत्याला माझ्याकडे कामाला लागून नुकताच दीड-एक महिना झाला होता. आत्ता कुठे ती ऍडजस्ट झाली होती. सत्या हैद्राबादची. दहा वर्षांपूर्वीं कामासाठी मुंबईत आली. आमच्या बिल्डींगमध्ये बर्याच जणांकडे काम करते ती. आपलं काम बरं नी आपण, हा स्वभाव! सत्याचा चेहरा नेहमीच हसमुख आणि तिचं ते तामिळ टोनमधलं हिंदी ऐकायला कानाला खूप गोड वाटतं. आताशा तिची मला आणि माझी तिला सवय होऊ लागली होती आणि अचानक तिने गावाला जाणार असल्याचं सांगून टाकलं. एक दिवस बदली कामवालीला ती घेऊनही आली. तिला सगळं काम समजावून सांगितलं. मला म्हणाली की, ‘‘भाभी ये गाव से नया आया, हिंदी थोडा-थोडा समजता’’. हाय रे देवा! म्हणजे आता थोडं कठीणच आहे हिला समजावणं, माझ्या मनात विचार चमकून गेला.
दोन-तीन दिवसांनी सत्या गावाला गेली आणि नवी बाई म्हणजेच भाग्ग्या काम करायला आली. सत्याने तिला तसं काय काय काम करायचं ते आधीच बजावून ठेवलं होतं. थोडी ती मनातून घाबरलेलीच वाटली मला. तिच्याशी संवाद कसा साधायचा हा एक यक्षप्रश्न होता माझ्यापुढे. आमच्यातला संवाद मग कधी शब्दांनी तर कधी हातवारे करुन खाणाखुणांनी सुरू झाला. मलाही थोडी गम्मत वाटली. पण हळूहळू तिचं मोडकंतोडकं हिंदी समजायला लागलं किंवा तिला काय सांगायचं आहे, याचा अंदाज मी एव्हाना करायला लागले. तिचं बावरलंपणही थोड कमी झालं. आल्या दिवसापासून सतत वाटायचं की हिला काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे. तिचे डोळे सतत मला सांगायचे. मीही तिची रोज चौकशी करायचे. आमच्या सगळ्यांबरोबर चहाही द्यायचे तिला. एखाद्या व्यक्तीच्या भावना कळण्यासाठी ती भाषाच यावी लागते असं नाही…तर मन कळावं लागतं, हे पटू लागलं.
असंच एक दिवस बोलता बोलता भाग्ग्या सांगायला लागली, जे तिला खूप दिवसांपासून सांगावंस वाटत होतं.‘‘ भाभी मेरे को 3 लडके, एक बडा 13 साल, दो जुडवा ग्यारा साल. मर्द बहोत दारु पिता, बहुत कर्जु हुवा. खाने को नही, तो मैं इधर आया. एक लडका साथ आया. स्कूल जाता. अब मैं कमाता, दो हजार भाडा झोपडी का, थोडा गाव देता पैसा…” तिची कहाणी चालूच होती. तिच्या डोळ्यांत आज भाव दाटून आले होते. किती बोलू आणि काय बोलू असं तिला झालं होतं. नकळत तिच्या अश्रूंबरोबर माझ्या डोळ्यांतील अश्रूंनीही तिला साथ द्यायला सुरुवात केली. मीही शांतपणे सगळं काही ऐकत होते आणि मनोमन तिला समजावत होते…बाई गं, तुझे कष्ट वाया नाहीत जाणार. तुझी मुलं तुझं स्वप्न साकार करतील. थोडा धीर धर, होईल सगळं नीट…
हा आमच्या दोघींमधला संवाद होता अंतर्मनाचा. त्यासाठी कुठल्याही भाषेची गरज नव्हती, तिच्या मनीचा भाव माझ्या मनापर्यंत पोचला होता.
-पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या विशेष उपस्थितीत रंगला 56 वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा आज ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला. तर उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पटकाविला.
चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना श्री. तावडे म्हणाले की, अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात बेली हे पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल.
वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान-
राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन, गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार देण्यात आले. आपल्या कामाची नोंद घेऊन राज्य शासनाने आपल्याला पुरस्कार दिला याचा अत्यंत आनंद झाल्याचे सर्व पुरस्कारार्थींनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिकमंत्र्यांकडून सत्कार-
आजच्या कार्यक्रमात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, संकलक कॅरॉल लिटलटन यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘डिजिटल डायलेमा‘ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या 50 प्रति ऑस्कर अकादमी येथे ठेवण्यात येणार आहेत.
राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात आज देण्यात आलेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा – सुधाकर रेडी (नाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा – शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )
सर्वोत्कृष्ट संवाद – विवेक बेळे (आपला माणूस)
सर्वोत्कृष्ट गीत – संजय पाटील (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट संगीत – राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – ऋषिकेश रानाडे ( व्हॉट अप लग्न)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -उमेश जाधव ( मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – के.के. मेनन ( एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -मुक्ता बर्वे (बंदीशाला )
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- स्वानंद किरकिरे ( चुंबक )
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री-छाया क़दम ( न्यूड )
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख ( तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-गौरी कोठवदे (पुष्पक विमान)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिति- शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – भोंगा
या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तेंडल्या, दुसऱ्या क्रमांकावर बंदिशाला आणि पहिल्या क्रमांकावर भोंगा चित्रपट ठरले. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून एक सांगायचंय – अन्सेड हार्मनी, आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट भोंगा ठरले.प्रेक्षकांना लवकरच हा 56वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
मिस इंडिया, मिस युनिव्हर्स होण्याचे स्वप्न ;तनिषा पाल हिची भावना
कुटुंब आणि महाविद्यालयातील प्रत्येकाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादित करू शकले. यापुढे मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेत असून, आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने हे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास तनिषाने व्यक्त केला. तिचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उपस्थितांनी तिला शुभेच्छा दिल्या.
” मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर ” उत्साहात संपन्न
पुणे-ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशन व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ” मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर ” उत्साहात संपन्न झाले . पुणे लष्कर भागातील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये झालेल्या या शिबिराचे आयोजन ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिध्द कराटे पट्टू मास्टर जमील खान व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले होते .
मोफत कराटे प्रशिक्षण सहभागी झालेल्याना कामगार नेते शशिधर पुरम यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमास विकास भांबुरे , अशोक देशमुख , इरफान मुल्ला , असित गांगुर्डे , विजय भोसले , अभिषेक झुंबरे , शीतल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
शिबीर यशस्वी करण्यासाठी ओकिनावा गोजु रू कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिध्द कराटे पट्टू मास्टर जमील खान व शिवसेवा व भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे , राजेश पुरम , राहुल तांबे , राहुल भिसे , असद सय्यद , आशिष हराळे , ओंकार नाझरे , जाई कांबळे , आकाश चव्हाण व सुमित गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले .





